मुंबई : महावितरण व महानिर्मिती कंपनीचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड इमारतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रकाशगड इमारतीतील तळमजल्यावरील दर्शनी भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार तैलचित्राचे अनावरण श्री. अरविंद सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव कुमार मित्तल तसेच महावितरणच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया व महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना श्री. अरविंद सिंह. सोबत तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सर्वश्री संजीव कुमार, बिपीन श्रीमाळी, राजीव कुमार मित्तल तसेच महावितरणच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया.