Home Blog Page 3254

स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने डॉ. विनोद शहा यांचा गौरव .

0

पुणे-लिंगायत संघर्ष समिती, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, पुणे प्रणित महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना पुणे शहर तर्फे जगदज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा, बाजाराव रोड येथे डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित केले. या प्रसंगही मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, सुनील रुकारी, ज्योती चांदेकर, अनिल कसबेकर ( स्वामी ), लक्ष्मीताई घोसके, लीला गांधी, नरेंद्र व्यवहारे, आशिष व्यवहारे, आदि मान्यवरांच्या  उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
उल्हास पवार आपले मनोगता मध्ये डॉ. विनोद शहा यांना शुभेच्छा दिल्या व असेच समाज सेवा त्यांच्या हातून घडत राहावी. जेष्ठ नागरिक कांसाठी त्यांनी अनेक सेवा भावी कार्य केले तेही अखंड चालू रहावे  अशी इछ्या व्यक्त केली.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अनेक गोरगरीबांची सेवा करता आली . ज्येष्ठ  नागरिक संस्थान साठी विलासरावांनी अनुदान दिले, अशा एक चांगल्या व्यक्ती च्या नावानी माझा  सन्मान होत आहे याचा  मला अभिमान वाटतो असे यावेळी डॉ.शहा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र व्यवहारे यांनी केले.
सूत्रसंचालन माणिक सोनवलकर यांनी केले तर आभार सांताराम परडे आणि केले.

दापोडीमध्ये खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल

0

पुणे : दापोडी येथील खोदकामात 11 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तो़डल्याप्रकरणी महावितरणकडून शनिवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, की दापोडी येथील गणेशनगरमध्ये गुरुवारी (दि. 19 ) ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरु असलेल्या खोदकामात रात्री 10.15 वाजता  महावितरणची 11 केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे 36 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. दापोडीचे सहाय्यक अभियंता श्री. मंगेश सोनवणे व जनमित्रांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरु केली व 28 रोहित्रांवरील वीजग्राहकांचा वीजपुरवठा लगेचच सुरळीत केला. उर्वरित 8 रोहित्रांवरील सुमारे 1200 वीजग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे तुटलेली वीजवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले. वीजवाहिनीला दोन ठिकाणी जॅाईंट दिल्यानंतर रात्री 12.15 वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला.

गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे 1200 ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वीरपत्नी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडीक यांचा विशेष सन्मान

0
पुणे –
ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या  पत्नी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांच्या देहूरोड येथील निवासस्थानी  शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे दिवाळीनिमित्त  स्मरण करण्यात आले यावेळी स्वाती महाडिक यांचा   विशेष सन्मान करण्यात आला. 
 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. निवासस्थान परिसराची स्वच्छता करून भारतमातेची प्रतिकृती असलेली रांगोळी साकारण्यात आली. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लेफ्टनंट कर्नल स्वाती संतोष महाडिक यांच्या उपस्थितीत शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी अमित बागुल यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा शाल, लक्ष्मीमातेची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, सागर बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, तसेच अभिषेक बागुल,  धनंजय कांबळे, विजय बिबवे ,इम्तियाज तांबोळी, पप्पू देवकर, गणेश पवार, गणेश खांडरे, गोरख मरळ, सोमनाथ कोंडे ,महेश ढवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक म्हणाल्या की, आम्ही दिवाळी साजरी करणार नव्हतो;पण पुण्यातील या युवकांनी परवानगी मागितली आणि ते इथे आले. स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी प्रज्वलित केलेल्या शेकडो पणत्या पाहून मला शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यासमवेतील दिवाळीचे स्मरण होत आहे.खरंच असा हा उपक्रम शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण आहे. तर संयोजक अमित बागुल म्हणाले अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि  अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको!’ असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! …पण शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे काय ?त्यांची दिवाळी कशी यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. दिवाळीनिमित्त या कुटुंबियांसमवेत काही क्षण व्यतीत करावे आणि शहीद जवानांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या अगोदर,शहीद पोलीस अधिकारी अशोक कामठे यांच्या निवासस्थानी दोन वेळा दिवाळी तर  शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील  ,शहीद  चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी शौर्य गुढी उभारण्यात आलेली आहे. 

आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध’

0

पुणे-सिंहगड रस्ता, आनंदनगर येथे, शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित दिवाळी पहाट या कार्यक्रमामध्ये, .शास्त्रीय गायिका आरती . अंकलीकर-टिकेकर यांनी आपली कला सादर केली . मी राधिका, अवघा रंग एकचि झाला, या गाण्यांना रसिक श्रोत्यांनी विशेष दाद दिली.यावेळी पुणे शहर भाजपा अध्यक्ष ..योगेश गोगावले,आमदार माधुरी. मिसाळ, रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र सह-प्रमुख माधवराव देशपांडे, रा.स्व.संघ सिंहगड भाग कार्यवाह सचिन भोसले, उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, अंध माता-भगिनी उपस्थित होत्या.यावेळी बोलताना, प्रतिष्ठान च्या अध्यक्षा.नगरसेविका.सौ.मंजुषा नागपुरे यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले तसेच प्रतिष्ठान यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. माता भगीनिंबरोबर फटाके फोडून व फराळ करून, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .प्रतिष्ठान चे संस्थापक श्री.दीपक नागपुरे यांनी आभार मांडले .
कार्यक्रमाचे यंदाचे 6 वे वर्ष होते .कार्यक्रम सकाळी 5.30 वाजता, सनसिटी भाजी मंडई रोड, सनसिटी रोड, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथे संपन्न झाला .

दिव्यचक्षू, वंचितांच्या जीवनात ‘ प्रकाश ‘ निर्माण करणे कौतुकास्पद : रेणुताई गावस्कर

0

पुणे:- दिव्यचक्षू, वंचितांच्या आयुष्यात असे खूप कमी क्षण येतात ज्यात त्यांना आनंद, प्रेम, आपुलकी मिळते पण आज “रंगारंग दिवाळी पहाट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात आपण ‘ प्रकाश ‘ देण्याचे अनमोल कार्य केले आहे असे गौरवोद्गार काढले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी.

निमित्त होते संवाद पुणे आणि आम्ही एकपात्री, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  “रंगारंग दिवाळी पहाट” या कार्यक्रमाचे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘ एकलव्य न्यासाच्या ‘ वंचित मुलांना फटाक्यांऐवजी ‘पुस्तक’ भेट , दिवाळी फराळ,भेटवस्तू सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांच्या हस्ते तर अद्वैत परिवाराच्या दिव्यचक्षू रिना पाटील, शेहनाज व इतर मुलामुलींना भेटवस्तू ,फराळ रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी आणि फराळ उद्योजक सुरेश कोते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राजीव तांबे म्हणाले, ” समाजातील या दुर्लक्षित लोकांची दाखल घेऊन त्यांचा सन्मान करणे तसेच त्यांना दिवाळी सणाच्या आनंदात सामावून घेण्याचे कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे “.

या प्रसंगी रंगारंग दिवाळी पहाट या रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या कार्यक्रमात वंदन नगरकरांच्या ‘रामनगरीचा’ हास्यफराळ तर चंद्रकांत परांजपे यांच्या विडंबनगीताने, शेखर केदारी यांच्या स्कीटने खुसखुशीतपणा आला तर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या दत्तप्रसाद शहाणे यांच्या शास्त्रीय गायनाने, मधुरा गोडसे यांच्या मखमली आवाजाने, उमा नेने यांच्या किशोर कुमार, शमशाद बेगम यांच्या आवाजातील गीतांनी बहार आणली. राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांच्या उडत्या चालीच्या गीतांनी धमाल आणली तर सचिन डान्स अकॅडमीच्या नृत्य कलाकारांनी आपल्या अनोख्या नृत्यकलेने रसिकांची मने जिंकली. या सर्वांना तितकीच मोलाची साथ दिली ती किबोर्डवर श्रीकांत खडके, ड्रम मशीन विजय भोंडे, ढोलकी सुरज कांबळे, तबला अमित अत्रे यांनी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी,डॉ. कविता घिया यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता सर्व कलाकार आणि रसिकांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद पुणेचे सुनिल महाजन, निकिता मोघे, आम्ही एकपात्रीचे सचिव वंदन नगरकर यांनी केले होते.

भारतात परवडणारे गृह प्रकल्प विकसित करण्यासाठी संयुक्त उपक्रम जाहीर

0

~ पुढील तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुक

~ महत्त्वाच्या शहरांमध्ये हॅप्पीनेस्टचा ठसा उमटवण्यासाठी विस्तार आणि वाढत्या मध्यम वर्गाच्या गरजा ओळखण्याचा प्रयत्न

मुंबई : महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल), ही महिंद्रा ग्रूपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची कंपनी आहे. या कंपनीने एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड – 1 (एचडीएफसी कॅपिटल) बरोबर भागीदारी केली आहे, एचडीएफसी कॅपिटल ही एचडीएफसीची प्रमुख गुंतवणूक कंपनी आहे, या भागीदारीद्वारे भारतात परवडणाऱ्या गृहप्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठीचा संयुक्त उपक्रम प्रमुख बाजारपेठांमधील प्रकल्पांद्वारे भारतातील परवडणाऱ्या घरांच्या मागणी-पुरवठ्यातील त्रुटींचा वेध घेईल, यासाठी साधारणपणे 5 ते 10 दशलक्ष स्क्वेअर फुटांचा विकास करण्यात येणार आहे, हॅप्पीनेस्टच्या नावाअंतर्गत प्रकल्पासाठीची निवडक ठिकाणे ठरणार.

प्रस्तावित विकास `महिंद्रा हॅप्पीनेस्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ (एमएचडीएल) द्वारे विकसित केला जाईल, यासाठी महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड आणि एचडीएफसी कॅपिटल लिमिटेडचे 51:49 असे इक्विटी भाग असतील. संयुक्त व्यासपीठाअंतर्गत पहिला विकास `हॅप्पीनेस्ट – पालघर’ हा असेल, यानंतर चेन्नईत `हॅप्पीनेस्ट आवडी’ आणि मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये `हॅप्पीनेस्ट बोईसर’ असे तीन प्रकल्प चालतील, हे प्रकल्प आर्थिक वर्ष 2018च्या एच2पर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

महिंद्रा लाइफस्पेसेस हॅप्पीनेस्ट ब्रँड प्रकाराद्वारे परवडणाऱ्या गृह प्रकल्पांमध्ये 2014पासून कार्यरत आहे. चेन्नई (हॅप्पीनेस्ट, आवडी) तसेच एमएमआरमधील (हॅप्पीनेस्ट, बोईसर) 1600पेक्षा जास्त युनिट्सचे आतापर्यंत उद्घाटन करण्यात आले आहे, आणि येथे परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सध्या सुरू आहेत, याशिवाय आतापर्यंत 1000 गृह प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. या प्रक्लपांमधील घरांची किंमत सध्या 17 ते 27 लाख रुपयांमध्ये आहे, आणि याद्वारे धोरणात्मक जोडणी आणि व्हायब्रंट समाजाचे राहण्यासाठीचे पर्याय देण्यात येतात. महिंद्रा लाइफस्पेसेसने शाश्वत शहरी विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून, स्रोतांचा विचार करून आणि पर्यावरणाप्रती गरजांची संवेदनशीलता अबाधित ठेवली आहे, प्रत्येक हॅप्पीनेस्ट प्रकल्प आयजीबीसी प्रमाणित आहे, आणि येथील सुविधा पर्यावरणपूरक आहेत आणि यासाठी ऊर्जासक्षम साहित्य आणि तंत्रज्ञान वापरले जाते, यामुळे संतुलित आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली जगता येते. हॅप्पीनेस्ट आवडी ही पर्यावरणपूरक परवडणाऱ्या घरांसाठीचा भारतातील पहिली आयजीबीसी `प्लॅटिनम’ प्रमाणित प्रकल्प आहे.

हॅप्पीनेस्ट नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ देते आणि व्हॅल्यू इंजिनिअरिंगद्वारे दर्जाची खात्री देते शिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण केले जातात, आणि किंमतीच्या दृष्टीकोनातून सर्वात फायद्याचे आहे. महिंद्रा लाइफस्पेसेसद्वारे ग्राहकांना या प्रकारातील घरासाठी वित्तीय सेवेसाठी अर्थयंत्रणा निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे; एनबीएफसीच्या ग्राहकांच्या वित्तीय क्षमतांच्या सर्वेक्षणाचा या भागीदारीत समावेश आहे आणि त्यानुसार गृह कर्जे उपलब्ध करून दिली जातात.

एमएलडीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता अर्जुनदास म्हणाल्या की, “भारताच्या रियल इस्टेट उद्योगक्षेत्रामध्ये शहरी पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास याबरोबरच प्रगतीला चालना देणारा प्रमुख घटक म्हणजेच परवडणारी घरे होय. एचडीएफसीबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, यामुळे संस्थेच्या अनुभव आणि वचनबद्धतेचा लाभ घेता येणार आहे, परवडणारी घरे विकसित करताना आमच्या ग्राहकांसाठी शाश्वत मूल्य निर्मिली जाणार आहेत, याशिवाय या प्रकारातील मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत पूर्ण न झालेली मागणी पूर्ण केली जाणार आहे.’’

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायजर लिमिटेडचे सीईओ विपुल रूंगता म्हणाले की, “निवासी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प दीर्घकालीन इक्विटीसह पुरवणे हा या व्यासपीठाचा मूळ उद्देश आहे. दीर्घकालीन भांडवलाची कमतरता हा भारतातील कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील प्रगती आणि विकासातील अडथळा आहे. एचडीएफसी कॅपिटलच्या पहिल्या फंडामध्ये, दीर्घकालीन इक्विटीप्रधान भांडलल शहरी आणि निमशहरी भागांच्या विकासासाठी पुरवून या फंडातील त्रुटी भरून काढण्याचे ठरवण्यात आले आहे. परवडणाऱ्या घरांच्या प्रकारात सुयोग्य वाढ अपेक्षित आहे, यासाठी सरकारद्वारे विविध भत्ते आणि साहाय्य केले जात आहे, एमएलडीएलच्या व्यासपीठासह याची आजच्या घडीला गरज आहेच.’’

 एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेडबद्दल थोडेसे

एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड ही पूर्णपणे हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी आहे, तिच्याद्वारे रिअल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी फायनान्ससाठी गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवल्या जातात. ही कंपनी एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड 1 (एच-केअर 1)ची गुंतवणूक व्यवस्थापक कंपनी आहे, तसेच ती प्रकार IIच्या पर्यायी गुंतवणूक निधीसाठी सेबीसह नोंदणीकृत आहे. एच-केअर 1चा जागतिक गुंतवणूकदारांकडील संग्रह 2,700 कोटी रुपये आहे. एच-केअर 1चे प्राथमिक घटक दीर्घकालीन इक्विटी प्रधान भांडवल मध्यम उत्पन्न गटातील विकासासाठी आणि भारतातील परवडणाऱ्या घरांच्या विकासासाठी पुरवणे हे आहे.

एचडीएफसी लिमिटेड :

हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) या भारतातील रिटेल हाउसिंग वित्तसेवेतील प्रमुख कंपनीने आतापर्यंत तब्बल 59 लाख कुटुंबांना स्वतःचे घऱ उभारण्यासाठी मदत केली आहे. एचडीएफसीतर्फे मूल्याधिष्ठित सेवा विशेष प्रशिक्षित आणि अनुभवी व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. एचडीएफसीने सातत्याने ग्राहकप्रधान सेवाच पुरवल्या आहेत.

एचडीएफसीने तांत्रिक साहाय्य आणि आशिया, आफ्रिका, पूर्व युरोप येथील देशांमध्ये विकासासाठी समुपदेशन पुरवणाऱ्या घरांच्या वित्तसेवा कंपनीचे मॉडेलच तयार केले आहे.

एचडीएफसीचे सर्वसाधारण लोन साधारण 26 लाख रुपयांपर्यंत मिळते आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकारात सेवा दिली जाते. एचडीएफसीला प्रधान मंत्री आवास योजनेतील (शहरी) क्रेडिट लिंक उपयोजनेअंतर्गत 2017मध्ये उत्तम कामगिरी करणारी संस्था म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे.

एचडीएफसी लिमिटेडच्या अधिक माहितीसाठी www.hdfc.com येथे भेट द्या.

महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल थोडेसे

1994 साली प्रस्थापित झालेल्या, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या विकास व्यवसायातील 19 अब्ज यूएस डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपची प्रमुख कंपनी आहे, आणि ही शाश्वत शहरीकरणातील प्रमुख संस्था आहे. भारताच्या प्रमुख आणि रहिवासी निर्मितीतील विकासासाठी कंपनी वचनबद्ध आहे, हा विकास `महिंद्रा लाइफस्पेसेस’ आणि `हॅप्पीनेस्ट ब्रँड्स’अंतर्गत आणि शहरे आणि औद्योगिक समूह `महिंद्रा वर्ल्ड सिटी’ ब्रँड अंतर्गत केला जातो.

ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता यांच्या वारसा कंपनीकडे आहे, याद्वारेच महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे नावीन्यपूर्ण ग्राहकप्रधान उपाययोजना दिल्या जातात. आतापर्यंत कंपनीने 22.85 दशलक्ष स्क्वेअर फुटांचे (2.12 दशलक्ष स्क्वेअर मीटर) काम पूर्ण केले आहे. तसेच भारतातील सात शहरांमध्ये कंपनीचे सध्या सुरू असलेल्या आणि येणाऱ्या अधिवासी प्रकल्पांचे काम सुरू आहे;  शिवाय चार शहरांमध्ये एकत्रितपणे राबवल्या जाणाऱ्या विकास/व्यवस्थापनाअंतर्गत 4960 एकरांवर चालू असलेले आणि नव्याने येणारे अनेक प्रकल्प आहेत. भारताच्या पर्यावरणपूरक घरांच्या चळवळीत अग्रणी असलेल्या, महिंद्रा लाइफस्पेसेसचा या प्रकारात आशियात चौथा क्रमांक लागतो, तसेच `2017मध्ये जीआरईएसबी रिअल इस्टेट ईएसजी (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय) गुणांकन’प्राप्त झाले आहे. याशिवाय 2017मध्ये भारतातील मध्यम आकाराच्या कामाच्या ठिकाणांमध्ये 50 उत्तम कंपन्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे, ग्रेट प्लेसेस टू वर्क इन्स्टिट्यूट म्हणून हे गुणांकन मिळाले आहे.

महिंद्रा लाइफस्पेसेससंदर्भातील अधिक माहितीसाठी www.mahindralifespaces.com ; www.mahindraworldcity.com येथे भेट द्या.

महिंद्राबद्दल थोडेसे

महिंद्रा ग्रूप 17.8 अब्ज यूएस डॉलर्सचा विविधांगी कंपन्यांचा ग्रूप असून, त्यांच्यातर्फे शक्तीची गमनशीलता, ग्रामीण समृद्धी आणि शहरी जीवनशैलीचा विस्तार यामध्ये लोकांना सुलभता देणे आणि व्यवसायातील सक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

युटिलिटी वाहने, माहिती तंत्रज्ञान, वित्त सेवा आणि भारतातील व्हेकेशन ओनरशीप आदी महत्त्वाच्या आर्थिक विकास करणा-या क्षेत्रांमध्ये महिंद्राचे कार्य अग्रणी आहे. याबरोबरच महिंद्रा अॅग्रीबिझनेस, अॅरोस्पेस, कॉम्पोनंट्स, कन्स्टिंग सर्व्हिस, डिफेन्स, एनर्जी, इंडस्ट्रीअल इक्विपमेंट, लॉजिस्टीक, रिअल इस्टेट, रिटेल, स्टील, कमर्शिअल व्हेइकल्स आणि दुचाकी उद्योग आदींमध्ये भरीव कार्य महिंद्रा आनंदाने करत आहे.

भारतात मुख्य कार्यालय असलेल्या महिंद्राकडे तब्बल 100 देशांत 200,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

विशेष मुलांसह अंध महिलांनी अनुभवला ‘सांगीतिक फराळ ‘

0
पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या  ‘दिवाळी संध्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद 
पुणे-
दीपोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव , प्रसन्नतेचा उत्सव ,प्रकाशाचा उत्सव मात्र ज्यांचे विश्व स्वतःपुरतेच सीमित आहे, जग काय आहे, हे त्यांना ठाऊक नाही आणि दृष्टीअभावी जीवनात कायमचा दाट काळोख आहे अशा  समाजापासून दुर्लक्षित  असलेल्या विशेष मुलांसह अंध महिला भगिनींनी दिवाळीनिमित्त ‘सांगीतिक फराळ’ कार्यक्रम अनुभवला. आपल्याला कुणी तरी विचारात घेतेय या भावनेने अंध महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदित होते  तर  एरवी सतत एकटी असणारी ही विशेष मुले हरखून गेली होती.
निमित्त होते पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने सहकारनगरमधील कै. वसंतराव बागुल उद्यानात आयोजित १९ व्या दिवाळी संध्या उपक्रमाचे.
 माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनःश्याम सावंत, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, हर्षदा बागुल , नुपूर बागुल, हेमंत बागुल , अभिषेक बागुल, सागर आरोळे , इम्तियाज तांबोळी , विजय बिबवे  आदींसह पदाधिकाऱ्यांनी कामायनीतील विशेष मुलांचे आणि अंध  महिलांचे जल्लोषात स्वागत केले.त्यानंतर पाच हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्याने परिसर उजळून गेला. पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आतिषबाजी टाळून केवळ प्रतीकात्मक फुलबाज्या  पेटविण्यात आल्या. संगीताची धून आणि  उपस्थित नागरिकांच्या अलोट गर्दीने दिवाळी संध्याचा कार्यक्रम रंगत गेला. फराळ आणि संगीतकार आर. डी बर्मन यांच्या बहारदार गीतांवर आधारित मूड्स ऑफ आर. डी.  या राधिका अत्रे प्रस्तुत सांगीतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव . बाहेर तर दिवे पेटवायचेच ;पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे. हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटविलेल्या हजारो पणत्या निरर्थक आहेत.  या हेतूने आम्ही हा दिवाळी संध्याचा उपक्रम समाजापासून वंचित असलेल्या, दुर्लक्षित असलेल्या घटकांसाठी घेत असतो. यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. मी समाजाचा, समाज माझ्यासाठी ही भावना जोपासली पाहिजे आणि वंचित घटकांना आपण आधार दिला पाहिजे, त्यांचे जीवन सुसह्य केले पाहिजे.प्रत्येक सणांचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे ही भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभात स्वरांनी उजळली रौप्यमहोत्सवी पुण्यभूषण दिवाळी पहाट !

0
पुणे :
पणत्या, आकाश कंदील,वासुदेव, सनई चौघडा , रांगोळ्या यांच्या मंगल वातावरणात महेश काळेंच्या प्रभात स्वरांनी  रौप्यमहोत्सवी ‘पुण्यभूषण दिवाळी पहाट ‘ उजळली !
त्रिद्ल, पुणे , रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 , कॉसमॉस बँक आयोजित पहाट दिवाळीचा महेश काळे यांचा गान मैफलीचा  कार्यक्रम  बालगंधर्व रंगमंदीर येथे आयोजित केला होता.
पुण्याची पहिली ‘ पहाट दिवाळी ‘ असलेल्या उपक्रमाचा यंदा  रौप्यमहोत्सव होता.
डॉ.सतीश देसाई यांच्या संकल्पनेतून गेली सुमारे 25 वर्ष पहाट दिवाळी रसिकांचे कान तृप्त करत आहे. या वर्षीच्या रौप्यमहोत्सवी मैफलीने या परंपरेचा कळसाध्याय गाठला.
 महापौर मुक्ता टिळक, रोटरीचे डिष्ट्रीक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, कॉसमॉस बँकेचे मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल ,रश्मी कुलकर्णी, रमेश शहा,आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यभूषण टीमने उत्तमपणे आयोजन  केले होते.  तुडुंब गर्दी आणि दर्दी असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले.
शताब्दी साजऱ्या करणाऱ्या  ५ संस्थांना गौरविण्यात आले. त्यात शिक्षण प्रसारक मंडळी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट , निवारा वृद्धाश्रम, आनंदाश्रम, लायन्स इंटरने१ानल, यांचा समावेश होता..
रोटरीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी झाले
महेश काळे यांनी अनुरंजनी रागातील बंदिशी, भूपाल तोडी, तसेच ‘आधी रचिली पंढरी ‘ असे अभंग गाऊन पुणेकर रसिकांना तृप्त केले. शेवटी ‘ सूर निरागस हो ‘ मधील ‘ मोरया ‘ चा जयघोष करताना काळे यांच्यासमवेत सभागृहातील सर्व उपस्थितांनी त्यात आपले निरागस सूर मिसळले  आणि ‘पुण्यभूषण दिवाळी पहाट ‘ ची मैफल संपली !

किरकोळ केरोसीन परवाना मंजूर करण्याच्या कालावधीस मुदतवाढ

0

पुणे, दि. 18 :  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत किरकोळ केरोसीन परवाना मंजुरीसाठी जाहिर प्रकटन देण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील नवीन कायमस्वरुपी रास्तभाव दुकानांचे परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील किरकोळ केरोसीन परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. अन्न,नागरी पुरवठा व गा्रहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता महिला बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्यक्रमानुसार किरकोळ केरोसीन परवाना मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असून, 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत अर्ज स्विकृतीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तरी अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मुदतीतच सादर करावेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याच्या कालावधीस मुदतवाढ

0

पुणे :  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत स्वस्त धान्य दुकाने मंजुरीसाठी जाहिर प्रकटन देण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील नवीन कायमस्वरुपी रास्तभाव दुकानांचे परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. अन्न,नागरी पुरवठा व गा्रहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता महिला बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्यक्रमानुसार स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असून, 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत अर्ज स्विकृतीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तरी अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मुदतीतच सादर करावेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मंगेश तेंडुलकरांची परंपरा कुटुंबीयांनी जपली – दिवाळीत भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम या ही वर्षी….

0
 
पुणे- प्रसिद्ध व्यंगचित्रकार कै. मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात ऐन दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वतः रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत,नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ते प्रयत्नशील होते.त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतर ही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर,नातं श्रावणी ढवळे,शुभंकर ढवळे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटीव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,विजय कदम,सचिन दांगट,वैष्णवी दांगट,मोहन आपटे,पूजा गिरी,प्रदीप गिरी,बाबा चौकसे,यांच्यासह वाहन अपघातात आपल्या मुलांना गमावणारे गुरुसिद्धय्या स्वामी,सौ शशी स्वामी आणि त्यांची कन्या स्नेहल स्वामी,तसेच वाडिया कॉलेज जवळील अपघातात आपल्या कन्येला गमावलेल्या श्रीमती सुनंदा जप्तीवाले हे ही सहभागी झाले होते.
” बाबांना दिवाळीच्या फराळात,नवीन कपडे किंवा इतर कशात ही रस नव्हता,त्यांना समाजातील उणीवा दूर करण्याचा ध्यास होता आणि विशेष करून अपघातांमध्ये कोणाचे ही कुटुंबीय दगावू नयेत यावर त्यांचा भर होता,वाहतूक नियम पाळा हा सोपा संदेश ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून देत असत ,आणि म्हणून मी आणि माझ्या मुलीने त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला ” असे मंगेशजींच्या पत्नी स्नेहलता तेंडुलकर म्हणाल्या.
केवळ दंडात्मक कारवाईतून नव्हे तर लोकप्रबोधनातून वाहतूक समस्या सुटू शकेल असा त्यांना विश्वास होता,मी स्वतः १३ वर्ष मंगेशजींसोबत या उपक्रमात सहभागी होत असे,यावर्षी सरांच्या दुःखद निधनाने दिवाळीत पोकळी जाणवत होती पण परवा स्नेहलता तेंडुलकर काकूंचा फोन आला आणि ” आम्ही सरांची परंपरा सुरु ठेवणार आहोत ” असे त्यांनी मला सांगितले आणि माझी दिवाळी सत्कारणी लागली असे मत सातत्याने १३ वर्ष या उपक्रमात सहभागी होणारे क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.कोणत्याही मोठ्या माणसाच्या निधनापश्चात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.
आपल्या नगरसेविका भर चौकात ऐन दिवाळीत शुभेच्छापत्र वाटत आहेत आणि वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन करीत आहेत याचे वाहनचालकांना अप्रूप वाटत होते व अनेक लोक थांबून शुभेच्छापत्र स्वीकारत होते तर वर्षूनुवर्षे या चौकात मंगेशजींची भेट घेणारे अनेक नागरिक त्यांच्या आठवणी जागवत होते.

पुण्याचा स्वतंत्र फिटनेस ट्रेनर फहद खानने अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडीबिल्डिंग मध्ये सहावे स्थान पटकावले

0

पुणेपुण्याचा स्वतंत्र फिटनेस ट्रेनर फहद खान यानी अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडीबिल्डिंग मध्ये सहावा स्थान पटकावले. फहद यानी हे यश 181 सेमी प्लस केटेगरीत मि‍ळविले. या गटात स्पर्द्धे च्या टाॅप सहा फायनेलिस्ट मध्ये स्थान मिळविणारा फहद हा एकमेव  भारतीय होता. या स्पर्द्धेत भाग घेणारे इतर देश म्हणजे इराण, इराक,कुवैत आणि बहरीन होते. फहद ला ‍िमळालेले यश भारत आणि पुणे दोघांसाठी अभिमानाची बाब आहे कारण की आपल्या देशात पहिल्यांदा पुण्यात  अोलंपियाज अमेच्योर अोलंपिया या स्पर्द्धेचे  आयोजन झाले.

अमेच्योर अोलंपिया क्लासिक बाॅडी बिल्डिंग स्पर्द्धेच्या 181 सेमी प्लस केटेगरीत सहावा स्थान मिळविणारा फहद म्हणतो- मला या स्पर्द्धे साठी सतत 8 महीने जबर्दस्त तयारी आणि डाइट करावी लागली. या स्तर वर येण्यासाठी दिवसातून दोनदा भी कसून तयारी करीत असे. गेल्या वर्षी म्हणजे 2016 त माझा कार अपघात झाला आणि मला हेयरलाइन फ्रेक्चर देखील झाले. त्या मुळे मला सहा महिन्यासाठी वेटलिफ्टिंग तालमीपासून रजा घ्यावी लागली. या परिस्थितितून बाहेर पडणे नक्कीच कठिण होते. कारण या एक्सीडेंट नंतर  वजन उचलताना मला धाप लागायची. .कसेतरी मी पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केले आणि इतर काही स्पर्द्धांमध्ये भाग घ्यायला लागलो.  या पुर्वी मी बाॅडी पावर एक्सपो 2015 या स्पर्द्धेत भाग घेतला होता अ‍ाणि त्यात टाॅप 10 फायनेलिस्ट्स मध्ये सामील होतो.

फहद पुढे म्हणाला की या यशाचे संपूर्ण श्रेय माझे कोच उमेश मोहिते यांना जातं. मोहिते स्वत. अनेक राष्ट्रीय बाॅडी बिल्डिंग स्पर्द्धेत भाग त्याने घेतलेला आहे.  या स्पर्द्धेच्या तयारी साठी तर ते माझा साठी मोठा आधार होते.

विशेष म्हणजे अमेच्योर अोलंपिया सीरीज पहिल्यांदाच भारतात योजिली गेली होती. ही स्पर्द्धा बाॅम्बे एक्झीबिशन सेंटर मध्ये 13 ते 15 आॅक्टोबर पर्यंत सम्पन्न झाली. ह्या ‍इंटरनेशनल बाॅडीबिल्डिंग ची संकल्पना आणि विजन 1965 मध्ये जो वील्डर यानी मांडले. पारंपरिक पुरूष बाॅडीबिल्डिंग बरोबर मेन्स क्लासिक बाॅडीबिल्डिंग, मेन्स फिजिक, वीमेन्स बिकिनी फिटनेस एंड वीमेन फिजिक या  स्पर्द्धाही आयोजित होतात. भारतात पहिल्यांदी झालेल्या या स्पर्द्धेत  अमेच्योर अोलंपिया  हे टायटल जिंकण्यासाठी 40 देशांच्या 200 प्रतिस्पर्द्धकांनी भाग घेतला.

ताज कोणाचा ?

0

मुमताज महल चवदाव्या अपत्य जन्माच्या वेळेस १७ जुन १६३१ रोजी बु-हाणपूर येथे वारली. दारा शुकोह, औरंगजेब ते शाहजहानची लाडकी लेक जहानाअरा बेगम ही तिची आजही इतिहासात स्थान मिळवून बसलेली अपत्ये. बु-हाणपूर येथे तिला तात्पुरते दफन करण्यात आले. आग्र्यात तिच्यासाठी कायमच भव्य मकबरा बनवायची योजना असल्याने शाहजहानने राजा जयसिंगाकडून यमुनाकाठची त्याची हवेली चार हवेल्यांच्या मोबदल्यात विकत घेतली. शाहजहानच्या फर्मानात व कझ्विनी व लाहोरीच्या पातशहानाम्यात या व्यवहाराचा, ही जागा घेण्यामागील हेतुचा, म्हणजे भव्य व शानदार मकबरा बांधण्याचा, स्पष्ट उल्लेख आहे. ही जागा ४२ एकरात असून त्यात निवासी हवेली (मंझिल किंवा खाना) होती असेही त्यावरुन दिसते. याच जागेवर ताजमहालचे बांधकाम करण्यात आले की जुन्या वास्तुलाच सुशोभीकरण करुन फक्त नांव बदलण्यात आले याबद्दल मोठा विवाद आहे.

पु. ना. ओक, भट-आठवले प्रभुतींनी मानसिंगाच्या मुळच्याच बांधकामाला संगमरवरी आच्छादन देत ताजमधे बदलवले अशा अर्थाचे निष्कर्श काढले आहेत. ओकांच्या मते तर तेथे तेजोमहालय नांवाचे शिवालयच होते. या वादाला तेंव्हापासून सुरुवात झाली तो आजही शमायला तयार नाही. त्यात जायचे येथे कारण नसून आपल्याला मुळात ताजमहाल ही काही डागडुजी करुन मुळच्याच इमारतीचे सुशोभीकरण आहे की संपुर्ण ताजमहाल नव्याने बांधला गेला याची येथे चर्चा करायची आहे.

याबद्दल शंका नाही की ताजमहालाची जागा मुळची राजा मानसिंगाच्या मालकीची होती. यमुनेच्या दोन्ही काठांवर राजपूत्र आणि सरदारांच्या हवेल्या होत्या. १६२६ मध्ये डच अधिकारी पेलासर्ट आणि डलात यांनी मानसिंगाच्या हवेलीचा उल्लेख करून ठेवला आहे. ताजची जागाही तीच आहे हेही १७०७ मधील एका नकाशावरुन व पेलासर्टने दिलेल्या यादीशी तुलना करुन स्पष्ट होते. फर्मान आणि पातशहानामाही या माहितीला पुष्टी देतो. या पुराव्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होते व ती म्हनजे ताजची जागा आधी जयसिंगाच्या नांवे होती, त्या जागेचा मुळ मालक मानसिंग असून तेथे एक हवेली अथवा मंझील होती. या बाबी नाकारण्याचे काहीएक संयुक्तिक कारण नाही.

मानसिंग हा बादशाही दरबारातील बलाढ्य हस्ती होते. त्यामुळे त्यांची हवेली आग्र्यात असणे स्वाभाविक होते. जेंव्हा शाहजहानने हवेली ताब्यात घेतली तेंव्हा राजा जयसिंग मात्र स्वत: त्या हवेलीत रहात होता की नाही याचे मात्र कसलेही उल्लेख मिळत नाहीत. शाहजहानने राहती हवेली विकत मागितली असती काय किंवा जयसिंगाने विकली असती का या प्रश्नाचा कोणी इतिहासकाराने विचार केलेला दिसत नाही. शाहजहानला यमुनाकाठच्या त्या ४२ एकरांच्या जागेत रस होता, त्याच्या हवेलीत नाही हेही फर्मान व पातशहानाम्यावरून सहज लक्षात येते. शिवाय त्या जागेवर अद्वितीय वास्तुचे अस्तित्व असते तर पेलासर्ट व डलातने तिचा तसा उल्लेख केला असता. पण तसेही नाही. अन्य राजपुत्र व सरदारांच्या हवेल्यांच्या जागांचे ते जसे वर्णन करतात तसेच मानसिंगाच्या जागेचेही वर्णन करतात. वास्तूरचनाशास्त्र दृष्ट्या ती विशेष वेगळी इमारत असती तर तिचा वेगळा उल्लेख येणे व ती तेंव्हाही, भलेही संगमरवरी आच्छादन नसले तरी, तत्काळी प्रसिद्ध इमारत असती. पण ते वास्तव नाही. ती एक निवासी पण एक दुर्लक्षीत हवेलीच होती एवढेच काय ते वास्तव अनेक पुराव्यांवरुन पुढे येते.

त्यामुळेच की काय राजा मानसिंगच्या हवेलीचेच ताजमध्ये रुपांतरण करण्यात आले असा उल्लेख कोठेही मिळत नाही. मानसिंगाची तत्कालीन प्रसिद्धी पाहता जर असे झाले असते तर कोठे ना कोठे त्याचे उल्लेख मिळाले असते. शिवाय पातशहानाम्यातील नोंदी या मताला कसलीही पुष्टी करत नाहीत.

पातशहानाम्यातील या संदर्भातील जे उतारे आहेत त्याची वेगवेगळे अनुवाद प्रसिद्ध आहेत. माझे मित्र आनंद दाबक यांनीही एका स्वतंत्र पर्शियन अनुवादकाकडून अनुवाद करून घेतला होता व अन्य अनुवादही तज्ञांकडून तपासून घेतले होते. तो अनुवाद आणि ओकांनी दिलेला अनुवाद याची तुलना करता हे लक्षात येते की ओकांनी आपल्या अनुवादात मोठा घोळ घातला आहे. मुळात पातशाहनाम्यात “प्रकल्पाच्या सदस्यांनी या इमारतीला चाळीस लाख रुपये खर्च येईल असा अंदाज केला.” राजेंद्र व्ही जोशी यांनीही ओकांचा अनुवाद तपासून त्यात चूक आहे असे स्पष्ट केले होते. उदा.  ( members of project team ) budgeted / estimated the cost ( Rs forty lacs) अशा अर्थाचे वाक्य असतांना ओकांनी “Far-sighted engineers and skilled architects expended forty lakhs of rupees [Rs.4,000,000] on the construction of this building.” असा अर्थ घेतला आहे. या ओकांच्या अर्थामुळे असा समज निर्माण होतो की १६३३ मधेच ताजचे बांधकाम पुर्णपणे तयारच होते व डागडुजीसाठीच तो काय चाळीस लाख रुपये खर्च आला. म्हणजे अंदाजित खर्च आणि होऊन गेलेला खर्च यातील फरक, बहुदा जाणीवपुर्वक करत, त्यांनी आपला सिद्धांत मांडला.

याचा अर्थ असा की मानसिंगाच्या हवेलीचे रुपांतर डागडुज्या करुन सध्याच्या ताजमधे करण्यात आलेले नाही. मग मानसिंगाच्या हवेलीचे काय झाले? अर्थात या प्रश्नाच्या उत्तराकडे वळण्याआधी आपण ताजसंबंधी उपलब्ध असलेली अन्य माहिती तपासून पाहुयात.

१. फ्रेंच व्यापारी टॅव्हर्नियर हा १६३८ ते १६६८ या काळात सहा वेळा भारतात येऊन गेला. ताजमहालवर २०,००० कामगार काम करत होते आणि ते पुर्ण व्हायला २२ वर्ष लागली ही माहिती तो देतो.

२. फ्रे सबास्टियन मनरिके हा पोर्तुगीज मिशनरी डिसेंबर चाळीस ते जानेवारी ४१ या काळात आग्र्यात होता. तो या बांधकामावर एक हजार लोक काम करीत होते असे लिहितो. हे लोक रस्ते, बागांचे काम करीत होते असे तो लिहितो.

३. पीटर मुंडी हा ब्रिटिश व्यापारी १६३१ ते १६३३ या काळात आग्र्याला तीन वेळा राहिलेला आहे. त्याला मुमताजचा मृत्यू झाल्याचे माहित होते. शेवटच्या भेटीच्या वेळीस त्याने जे पाहिले ते लिहिले आहे ते असे  “ This Kinge is now buildinge a Sepulchre for his late deceased Queene Tege Moholl….. He intends it shall excell all other. The place appoynted is by the river side where she is buried, brought from Burhanpur where she dyed accompanying him in his wars.” (पान २१२,The Travels of P Mundy, Volume II Travels in Asia, edited by Lt Col Sir R C Temple,) आणि याच माहितीच्या पुढे तो लिहितो की बांधकाम सुरु झाले असून अत्यंत मोठ्या प्रमाणावर कामगार व धन वापरले जात आहेत. संगमरवर जणू एखादा सामान्य दगड असावा एवढ्या विपुलतेने वापरला जात आहे.

टॅव्हर्नियर आग्र्याला मात्र केवळ दोन वेळा आला होता. पहिली आग्रा भेट १६४०-४१ चे तर दुसरी १६६५ची. म्हणजे त्याने बांधकाम चालू असलेले पाहिले ते फक्त एकदा. बाकी जी माहिती त्याच्याकडे आहे ती सांगोवांगीची आहे हे उघड आहे. त्यामुळे २० हजार कामगार व २२ वर्ष ही एकतर अतिशयोक्तीत टाकून देता येतात किंवा त्याचा केवळ एक अंदाज म्हणून सोडून देता येतात. मनरिकेबद्दलही तसेच म्हणता येते व मुंडीबाबतही. मुळात हे प्रवासी नव्हते तर व्यापारी होते. बांधकाम सुरु असतांना एखादी इमारत पुर्ण झाल्यावर कशी दिसेल याची कल्पना येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कामगार संख्या अचूक का नाही, खर्चाचा ताळमेळ मग कसा बसत नाही याची गणिते अशा वर्णनांच्या आधारे करत मते मांडणे गैर आहे. तेथील कामगार इतकी वर्ष जुन्या वास्तुचीच डागडुजी करत असते तर मुंडीपासून असे उल्लेख सुरु झाले असते. पण तसे वास्तव नाही.

वरील उल्लेखांवरून, फर्मानांवरून आणि या लेखकांच्या वर्णनावरुन एकच गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे ताजमहालाच्या जागेवर नव्याने बांधकाम चालू करण्यात आले होते व त्यासाठी अनेक मजूर, अभियंते आणि वास्तुतज्ञ राबत होते.

मग मानसिंगाच्या मुळ वास्तुचे काय झाले? काही इतिहासकारांच्या मते शाहजहानने जयसिंगाकडून फक्त “जमीन” घेतली होती. जमीन की मंजील याबाबत वाद झडला आहे. तेथे मंजिल अथवा हवेली असण्याचीच शक्यता आहे. ही हवेलीत त्या काळात कोणी रहात असल्याची शक्यता नाही. कदाचित त्यामुळेच शाहजहानने ही जागा मागितली. जयसिंगानेही खळखळ न करता ही जागा देऊन टाकली व अन्यत्र चार हवेल्या मिळवल्या. मानसिंगाची हवेली ताजसारखी भव्य व सुंदर वास्तू नव्हती, असती तर ती त्याच्या काळातच प्रसि्द्ध झाली असती. पण तसे वास्तव नाही.

ताजमहालच्या आराखड्याबद्दल तसेच नौकानयनासाठी असलेल्या यमुनातीरीच्या (आता गाळाखाली गेलेल्या) धक्क्याचा उल्लेख गोडबोलेंनी केला आहे व कबरीत त्याचे काय काम असा प्रश्न विचारला आहे. पण हा धक्का मुलचा मानसिंगच्या काळातीलच असणार ही शक्यता त्यांनी विचारात घेतलेली नाही. ही मंझिल कोणत्याही सरदाराची असावी तशीच होती व त्यात स्वभावत:च असावीत तशीच तळघरे, नौकानयनासाठीचे धक्के वगैरे बांधकामे असने स्वाभाविक आहे व ती नष्ट करण्याचे कारणही नव्हते.  उलट मुळचे तळघ्रर कबरीसाठी वापरणे सोयिस्कर होते. बाजुच्या खोल्या बंद करुन मधल्या भागात सुधारणा करुन कबर बनवली गेली. असावी हे स्पष्ट आहे. बंद खोल्यांबाबतचा विवाद अनाठायी असला तरी त्या जनतेसाठी उघडायला हरकत नाही.

थोडक्यात वरील मुळचे मुख्य हवेलीचे बांधकाम पाडून ताजची निर्मिती नव्याने केली गेली असली तरी मानसिंगाच्या हवेलीचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत. त्यावरून संपुर्ण वास्तुचे श्रेय शाहजहानकडून काढून घेत अकारण काल्पनिक पात्रांना देण्याचे काही कारण नाही. ताजची वास्तुरचना स्वतंत्र असून मुळच्या हवेलीतील काही भाग कल्पकतेने त्यात मर्ज केला गेला असे म्हणने अधिक संयुक्तिक आहे.

औरंगजेबाच्या घुमटाच्या दुरुस्तीबाबतच्या १६५२च्या पत्राचा फार गवगवा केला जातो. औरंगजेबाचे पत्र सत्य मानून गळत्यांचा प्रश्न सोडवता येतो. एवढा मोठा घुमट डोम बांधल्यानंतर त्यात मानवी चुकांमुळे टेक्निकल डिफल्ट्स राहु शकतात. गळती होऊ शकते. पण गळती झाली, दुरुस्ती करावी लागली म्हणजे म्हणजे ते बांधकाम पुरातन हा तर्क चुकीचा ठरतो. मानसिंगाची ४२ एकर जागा जयसिंगाने त्यावरील हवेलीसह विकली ही वस्तुस्थिती आहे. त्यावर कोणतेही अलौकीक असे बांधकाम नव्हते. जमीनीवरील मुख्य हवेली पाड्न ही इमारत बांधली गेल्याचे स्पष्ट दिसते. मुंडी ते टॅव्हर्नियर यांच्या वर्णनांत कामगारांच्या संख्येबाबत गफलत असली तरी बांधकामाची सुरुवात नव्याने झाल्याची माहिती मिळते.  खुद्द पातशहानामा व शाहजहाननामा मानसिंगाकडून जागा घेऊन त्यावर ताजची इमारत उभी करण्याची सुरुवात झाल्याचे नमूद करतात. उलट पु. ना. ओक पातशहानाम्यातील या संदर्भातील वर्णनात गफलत करतात हे आपण वर पाहिले आहे. ताजमहाल पुर्ण होत आल्याचा काळ आणि राजकीय वादळी घडामोडी, शाहजहानचे आजारपण ते कैदेचा काळ दुर्दैवाने परस्परांशी भिडल्यामुळे त्याबाबतची माहिती धुसर होत गेलेली आहे.

ताजमधील सोने व अन्य संपत्तीचे काय झाले हा प्रश्न गोडबोलेंना प्रश्न पडला असला तरी सुरजमल जाटाने केलेल्या आग्रा स्वारीत ताजमहालाची लुट केली होती हा इतिहास ते विसरतात. तत्पुर्वीही लुट झाली असण्याची शक्यता कशी नाकारता येईल? तसेही ताजवर विद्रुपीकरनाचे संकट १७५७ च्या बंडाच्या वेळीसही आले होते.
मुमताजच्या कबरीभोवती सोन्याचे रेलिंग होते असा उल्लेख पीटर मुंडी करतो, पण हे रेलिंग ताजच्या आवारातील तात्पुरत्या दफनस्थळाभोवती होते. नंतर पुन्हा मुमताजजचे शव हलवून आत्ताच्या स्थानी दफन केल्यानंतर ते रेलिंग ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुले ते कोठे गेले हा प्रश्नही निरर्थक आहे.

वास्तुरचना हिंदू की पर्शियन हा वाद असाच भोंगळ आहे. किंबहुब्ना वास्तुरचनांत व त्यावरील कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. रायगडावरील जगदिश्वराचे मंदिर मुस्लिम शैलीत आहे म्हणून ते कोणी मुस्लिमाने बांधले असा कोणी तर्क केला तर तो जेवढा वेडगळपनाचा होईल तेवढाच हिंदु खाणाखुणा मिळाल्या तर ताज हे हिंदू राजांचे वास्तुशिल्प होते असा दावा करने मुर्खपनाचे होऊन जाईल. मानसिंगाच्या जुन्या वास्तुतील काही भाग पाडायची गरज नसल्याने तो तसाच राहिला. केवळ तळघर, बंद खोल्या यावरून फार मोठा दावा करण्यापेक्षा त्यंची स्पष्टीकरणे अन्यत्र शोधायला हवीत एवढेच. ताज हिंदुंचा कि मुस्लिमांचा हा वाद निरर्थक असून तो भारतीयांचा आहे हेच लक्षात घ्यायला हवे.

(लेखक – संजय सोनवणी )

 

अश्विनी भावे यांची ‘द ग्रीन डोअर’ मोहीम अमेरिकेत जपतेय ‘मराठी अंगण संस्कृती’

0

 

मराठी संस्कृती म्हणजे दारापुढे अंगण, अंगणातली तुळस आणि सोबतीला इतर झाडं! आज काल अशी संस्कृती फार कमीबघायला मिळते. फार फार तर गावी दिसून येत आपल्याला असं वातावरण. थोडक्यात अंगण ही मराठी संस्कृती कुठंतरी लोप पावत आहे .परंतू परदेशात राहूनही अभिनेत्री अश्विनी भावे यांनी मात्र या ‘अंगण संस्कृती’चे जतन केले आहे.
‘परसातल्या भाज्या’ हि पारंपारिक पद्धती आज अमेरिकेत जिंवत ठेवलीये ती अश्विनी भावे यांनी!
गेले काही वर्षे त्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि तो किती व्यवस्थितरित्या यशस्वी झाला हे लोकांनी पाहावं म्हणून अश्विनी भावे यांनी आपल्या फेसबुकवर ‘द ग्रीन डोअर’ हा नवीन उपक्रम सुरु केलाय. अश्विनी भावे ह्यांनी आपल्या अमेरिकेच्या राहत्या घरच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळ,फुल आणि भाज्यांची बाग तयार केली आहे आणि ह्याच भाज्या त्यांच्या नेहमीच्या स्वयंपाकाचा भाग असतात .आज काल वाढत चाललेला निसर्गाचा लोप हे ह्या मागचं कारण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज कालच्या पिढीला निसर्गाचं महत्त्व पटवून देईल अशी ही मोहीम आहे.

अमेरिकेसारख्या प्रगतशील देशामध्येही राहूनही अश्विनी भावे यांनी आपलं मराठीपण जपलं. ह्याच बागेमधील भाज्या त्यांच्या घरी आणल्या जातात. सध्या ह्या;द ग्रीन डोअर ह्या मोहिमेला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या बागेमध्ये आलेल्या मॅग्नोलिया ह्या सुंदर फुलाचा विडिओ व्हायरल झाला आहे. ह्या मोहिमेबद्दल बोलताना त्या सांगतात कि ;प्रत्येकाची श्रीमंतीची कल्पना वेगळी असते आणि ही बागच माझी श्रीमंती आहे. संस्कृती आणि निसर्ग ह्यांचा सुंदर मेळ घालून त्यांनी ह्या मोहिमेला सुरवात केली आहे. ह्या उपक्रमाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत हे विशेष.

मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वाभिमानाने जगा-मंत्री प्रकाश जावडेकर

0

पुणे –:  मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित ‘मुद्रा प्रोत्साहन अभियान’,बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,खा.अनिल शिरोळे,महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, डीएफएस दिल्लीचे अशोककुमार डोगरा,एमएसएलआरएमच्या मुख्य व्यवस्थापक आर.विमला,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

यावेळी सर्व बँकेच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांबद्दल  माहिती देण्यासाठी 38 स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.कुठल्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते.सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. 4 कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसताना त्यांनी  मुद्रा योजनेच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. ‘नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना’ अशी घोषणा श्री. जावडेकर यांनी दिली.