पुणे-लिंगायत संघर्ष समिती, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, पुणे प्रणित महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना पुणे शहर तर्फे जगदज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा, बाजाराव रोड येथे डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित केले. या प्रसंगही मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, सुनील रुकारी, ज्योती चांदेकर, अनिल कसबेकर ( स्वामी ), लक्ष्मीताई घोसके, लीला गांधी, नरेंद्र व्यवहारे, आशिष व्यवहारे, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
उल्हास पवार आपले मनोगता मध्ये डॉ. विनोद शहा यांना शुभेच्छा दिल्या व असेच समाज सेवा त्यांच्या हातून घडत राहावी. जेष्ठ नागरिक कांसाठी त्यांनी अनेक सेवा भावी कार्य केले तेही अखंड चालू रहावे अशी इछ्या व्यक्त केली.
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अनेक गोरगरीबांची सेवा करता आली . ज्येष्ठ नागरिक संस्थान साठी विलासरावांनी अनुदान दिले, अशा एक चांगल्या व्यक्ती च्या नावानी माझा सन्मान होत आहे याचा मला अभिमान वाटतो असे यावेळी डॉ.शहा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र व्यवहारे यांनी केले.
सूत्रसंचालन माणिक सोनवलकर यांनी केले तर आभार सांताराम परडे आणि केले.