Home Blog Page 3253

गरीब फेरीवाल्यांवर हल्ला करण्यापेक्षा सीमेववर देशाच्या दुष्मनांशी लढा- रामदास आठवले

0

मुंबई-– शिवसेनेने भाजपा सोबत वाद करू नये असा सल्ला देत ;  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेववर  देशाच्या दुष्मनांशी लढावे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा  दिला.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे पूल आणि परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. शनिवारी १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला, ठाणे, घाटकोपर, कल्याण अशा विविध ठिकाणी फेरीवाल्यांना हुसकावून लावले होते.या पार्श्वभूमीवर आज मिरारोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे मिरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर, रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बरशिंग, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, नगरसेविका रुपाली शिंदे, मदन मनवर आदी मान्यवर उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नये. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे. सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात. सरकारने ही फेरीवाल्यांबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे. दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पात्र ठरवाव्यात या मागणीप्रमाणेच सन 2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्ला रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी रिपाइं भाजपा सोबत राहील असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

प्रभास अपने जन्मदिन पर अपने प्रसंशको को देंगे खास तोहफ़ा!

0
बाहुबली सुपरस्टार प्रभास का जन्मदिन अब बस कुछ ही दिन दूर है और हर बार प्रसंशको द्वारा उनका जन्मदिन एक त्योहार की तरह धूमधाम से मनाया जाता है।

लेकिन इस बार प्रभास ने अपने प्रसंशको के लिए एक बेहद ही खास सरप्राइज प्लान किया है। यह सरप्राइज प्रभास को अपने प्रसंशको से मिलने वाले प्यार का धन्यवाद करने का एक तरीका है।

इस खास मौके पर अपने जन्मदिन से महज कुछ घंटे पहले अभिनेता अपने सोशल मीडिया पर कुछ ऐसा पोस्ट करेंगे जिससे प्रभास के प्रसंशको दिल बागबाग़ हो जाएगा और इस साल का यह जन्मदिन उनके लिए और भी खास बन जाएगा।

लेकिन तब तक उनके प्रसंशको को करना होगा थोड़ा इंतेज़ार और अनुमान लगाते रहिये कि आखिर प्रभास से मिलने वाला ये सरप्राइज है क्या!

वही हर साल की तरह इस साल अभिनेता के प्रसंशक उनके जन्मदिन को खास बनाने की तैयारियों में जुट गए है और एक बार फिर अभिनेता के प्रति अपना प्यार जाहिर करने के लिए तयार है।

साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रात अनोखी भाऊबीज

0

पुणे-सिमेवर शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना नृत्यवंदनेतून सलाम करत   चाकाच्या खुर्चीवर कायमचे बसून आयुष्याची दुसरी लढाई लढणा-या ‘या’भावांना प्रेमाने औक्षण करण्यासोबतच लाडूचा घास भरवित साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवाराने भाऊबीज साजरी केली.
 खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी  कलाकारांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .. यावेळी ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना स्वाती दैठणकर, नुपूर दैठणकर यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख पी.आर.मुखर्जी, कर्नल बी.एल.भार्गव, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, शंकर निंबाळकर, साहिल केळकर, प्रसाद भडसावळे, सुवर्णा गोडबोले, संगीता मावळे, प्रशांत पंडित स्वाती रजपूत, संकेत निंबाळकर, नरेंद्र व्यास, नंदा पंडित, गंधाली शहा, कल्याणी सराफ, अनिल दिवाणजी, समृद्धी पाटेकर, पूर्वा देशपांडे उपस्थित होते. दोन्ही कलाकारांनी भरतनाटयम् नृत्यातून सैनिकांना मानवंदना दिली.  उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे.
स्वाती दैठणकर म्हणाल्या, देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांमुळेच आम्ही सुखाचे दोन घास खाऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. युवकांच्या मनात देशाविषयी आणि सैन्याविषयी आपुलकीची भावना जागृत करण्याकरीता आम्ही नृत्यातून नेहमीच प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. नुपूर दैठणकर म्हणाल्या, समाजातील सर्व घटकांपेक्षा सैनिकांचे कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.
पी.आर.मुखर्जी म्हणाले, अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही. तर देशातील प्रत्येकजण आपापल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.
अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले, आज भाऊबीज साजरी करताना आमच्या कुटुंबियांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अपंगत्व आले असले तरी आमचे मनोबल खचले नाही, असे त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. पीयुष शहा यांनी प्रास्ताविक केले.

एसएसपीएमएस शाळेतील श्री शिवछत्रपती पुतळ्यासमोर दीपोत्सव

0

पुणे-तुतारीची ललकारी… सनई चौघड्याचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. श्री शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक पुतळ्यासोबतच सरदार कान्होजी जेधे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासोबतच सरसेनापती वीरबाजी पासलकर, मानाचे पहिले पान सरदार कान्हेजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनोबत सरसेनापती येसाजी कंक, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे या घराण्यांच्या प्रतिनिधींचा स्वराज्य रथ सोहळ्यामध्ये ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल  जिरेटोप देऊन गौरव करण्यात आला.

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणेमहापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मंगोलीया येथे शरीरसौष्ठव स्पर्धेत मीस्टर वर्ल्ड किताब विजेते महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. शिवरायांचरणी ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली. यंदा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात प्रथमच सहभागी झालेल्या गरुड, घारे, काटे, निंबाळकर, संत तुकाराम महाराज भक्तीशक्ती, महाडीक आणि कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीनाथ भिमाले म्हणाले की, पुण्यात साज-या होणा-या दीपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दीपोत्सव पुणेकरांच्या ह्रदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा होतो. हा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या ऐतिहासिक पुतळ्याने ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुतळयाचे वजन ८ हजार किलो आहे. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात आली  . कार्यक्रमाचे नियोजन रवींद्र कंक, सचिन पायगुडे, गिरीश गायकवाड, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, निलेश जेधे, अनिल पवार, किरण देसाई, राजाभाऊ ढमढेरे, गोपी पवार, मयुरेश दळवी, किरण कंक, निलेश जगताप, युवराज शिंदे, सुशांत साबळे, सुभाष सरपाले आदींनी  केले.

“हमारी ही मुठठी मे आकाश सारा जब भी खुलेगी चमकेगा तारा “

0

बीड- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी बाल आशा ट्रस्टच्या आश्रमशाळेच्या भेटीनंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, . यावेळी आश्रमातील लहानग्यांना पाहून त्या भावूक झाल्या होत्या. या भेटीसंदर्भातच त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली. यातून त्यांनी आजपासून आपण हार, फुले स्वीकारणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.अनाथ मुलांसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अनाथ मुलांच्या इलाजासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्यावा असे आवाहन त्यांनी या फेसबुक पोस्टमधून केले आहे….
पहा नेमकी काय पोस्ट आहे ही…


“हमारी ही मुठठी मे आकाश सारा जब भी खुलेगी चमकेगा तारा ”
या गाण्याने माझं स्वागत बाल आशा ट्रस्ट च्या बालकांनी केलं …ऐकताना सुरुवातीला काही वाटलं नाही पण दोन ओळीनंतर मन भरून आलं … मी त्यांना आनंद द्यायला जाते असं म्हणणं चूक आहे मी तिथे आनंद शोधायला जाते ..सर्व वैभव पायाशी आयतं लोळत असताना लोक सूख शोधत बसतात आणि दैवाला कोसतात ,पण जन्माच्या क्षणापासून जीवनाने नाकारलेल्या त्या चिमुकल्यांची दानत बघा ते आपल्याला आशीर्वादच देतात .. राजकारणात रोज प्रचंड स्पर्धा अनुभवताना कितीही दिलं तरी कोणी आप्त, स्वकीय ,मित्र-परिवार म्हणत नाही की हो मिळालं एवढं खूप आहे .पण जन्मसोबत निष्ठुरता घेऊन आलेले ते कोवळे लेकरं किती मोठया काळजाचे बघा त्यांचे हसणे ,तो गोड कलकलाट ,ते तालासुरात म्हणलेलं गाणं, त्यांचे साहित्य नसताना बनवलेले ग्रीटिंगस …जणू ते माझी अनेक दिवस वाट पाहत होते ..माझी विनंती एवढीच वाचकांना बाल आशा ट्रस्ट आणि असे अनेक सेवाभावी चांगले लोक चांगलं काम करत आहेत त्यांना तुम्ही फुल ना फुलाची पाकळी द्या ..जन्मदात्र्यांनी नाकारून आश्रमात पाठवलं इथं पर्यंत ठीक आहे पण निर्दयीपणे उकिरड्यावर रस्त्यावर फेकून, किड्या -मुंग्यांनी डसून ,कुत्र्यांनी चावून इजा होऊन ते अनेक अपंगत्वाना बळी पडतात ..त्यांना जे जीवन मिळालं ते जगण्याची अफाट ताकत त्यांच्यात आहे पण ते सशक्त राहावेत या साठी ज्या संस्था झटत आहेत त्यांना प्रोत्साहन द्या मदत दया . सकाळचे 4 वाजायला आले आहेत पण त्या मुलांचे चेहरे मला झोपू देत नाहीत . मी निर्णय घेतला आहे ‘आज पासून फुलं हार स्वीकारणार नाही. ज्याला काही आणायचं आहे त्यांनी ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान’ च्या नावे चेक किंवा draft आणावा मी माझी काही रक्कम घालून तो या मुलांच्या इलाजासाठी देईन .. उनकी मुठठी में तारा है और वो चमकेगा ! मी योगदान देणार तुम्ही ..वाढदिवस ,दिवाळी , एखादा महत्वाचा दिवस साजरा करून तर बघा.. मी गेले 9 वर्ष हे करते आहे खूप आनंद मिळतो मला .. तुम्ही ही करून बघा ..

खासदार अनिल शिरोळे न्यूयॉर्क दौऱ्यावर….

0

पुणे-संयुक्त राष्ट्रसंघ आम सभेच्या ७२ व्या अधिवेशनामध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून पुण्याचे खासदार अनिल शिरोळे काल(२१ ऑक्टोबर) रोजी न्यूयोर्क येथे रवाना झाले आहेत.

विदेश मंत्री सुषमा स्वराज ह्यांच्या पुढाकाराने लोकसभेतील ५ खासदारांचा ह्या दौर्‍यात समावेश झाला असून त्या मध्ये भातृहरी मेहताब, जितेंद्र रेड्डी, राघव लखनपाल आणि राम मनोहर नायडू हे अन्य चार खासदार सहभागी झाले आहेत. दि. २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ ह्या कालावधीत पार पडणार्‍या ह्या दौर्‍यात राष्ट्र संघातील आम सभेच्या कामकाजाबद्दल अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत शिरोळे ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

महिला कैद्यांसाठी दर आठवड्याला कारागृहात महिला डॉक्टर, वकील, समुपदेशक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ राहणार उपस्थित.     

0

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज हर्सूल कारागृहातील कैद्यांसोबत दिवाळी साजरी केली. कारागृहात असलेल्या महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने लवकरच सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. हिवाळ्यात महिलांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं म्हणून सोलर वॉटर हिटर ही आयोगाच्यामार्फत दिला जाणार आहे.

कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कारागृहातील जगणं नशिबी आलेल्या, घरापासून नातेवाईकांपासून दूर असलेल्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना दिवाळी सणाचा आनंद मिळावा यासाठी विजया रहाटकर यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. महिलांना साड्या आणि त्यांच्या मुलांना नवे कपडे यानिमित्ताने देण्यात आले. महिलांप्रमाणेच पुरुष कैद्यांनाही भाऊबीजेच्या दिवशी फराळ तसेच १०० ब्लॅंकेटची भेट देण्यात आली.

कारागृहातील ८० महिला कैद्यांशी यावेळी विजया रहाटकर यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा समजून घेतल्या. तपासणीसाठी महिला डॉक्टर असाव्यात तसेच गंभीर गुन्हे नसलेल्या महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी लवकरच प्रत्येक आठवड्याला कारागृहात महिला डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ, समुपदेशक आणि वकील भेट देणार असून यामुळे या महिलांच्या आरोग्याच्या तसेच कायदेविषयक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

दिवाळीच्या दिवशी फराळ, नवे कपडे या भेटींसोबतच आपुलकीने  विचारपूस करण्यात आल्याने अनेक महिलांना विजयाताईंशी बोलताना भावना अनावर झाल्या.

या भेटी बाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, दुर्दैवाने कारागृहात जीवन व्यतीत करणाऱ्या आई बहिणींना ही दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून मी त्यांच्यासोबत सण साजरा केला.  सॅनिटरी पॅड  व्हेंडिंग मशीन आणि सोलर वॉटर हिटरमुळे कैद्यांचे इकडचं जगणं सुसह्य होण्यास मदत होणार आहे. लवकरच दर आठवड्याला इथे महिला डॉक्टर, वकील येतील त्यामुळे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य आणि न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल.

कारागृहात कैद्यांना प्रशिक्षण देऊन दुचाकीचे लॉक तयार करण्याचा रोजगार मिंडा या संस्थेकडून दिला जातो, या कार्यशाळेला ही विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी कारागृह अधीक्षक बी आर मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी डी काळे, महिला तुरुंग अधिकारी मेघा कदम तसेच स्थानिक भाजप
नेते मनीषा भन्साळी, भूपेश पाटील, रेखा पाटील, स्मिता दंडवते, दिव्या मराठे, मृणालिनी फुलगिरकर, अमृता पालोदकर, बबिता करवा, रुपाली वाहुळे आदी उपस्थित होते.

महिलांच्या रोजगारनिर्मीतीसाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील – योगेश गोगावले

0
पुणे-महिलांसाठी रोजगारनिर्मिती साठी भाजप प्रयत्नशील असून भगिनींना छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबी करणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले.नुकत्याच आयोजित केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या बाजाराचा उल्लेख करून त्यांनी सांगितले कि ह्या बाजारात छोट्या व्यावसायिकांचा मोठा धंदा झाला,अगदी आकाशकंदील बनविणाऱ्या महिला गटाने पस्तीस हजाराचा धंदा केल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटीव्ह फाउंडेशन ने आयोजित केलेल्या ” माझी दिवाळी स्वदेशी दिवाळी ” या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खिलारेवाडी येथे मोठ्या संख्येने महिला व इतर नागरिक उपस्थित होते,यावेळी वस्तीतील नागरिकांना पतंजली चे हळदी चंदन साबण,दंतकांती टूथ पेस्ट आणि केश कांती शाम्पू चे सॅशे भेट देऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.या उपक्रमाच्या संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले कि ” विदेशी वस्तूंनी आपली बाजारपेठ व्यापली असून,चीन वरून येणार दुय्यम प्रतीचा माल स्वस्तात आपल्या गळ्यात मारण्यात येतो,हे छुपे युद्ध असून आपण त्यांच्या वस्तू विकत घेतल्याने त्यांची दिवाळी होते पण आपल्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार बुडतो,त्यामुळे कोणत्याही वस्तू घेताना त्या भारतीय बनावटीच्या आहेत याची खात्री करूनच विकत घ्या.स्वदेशीचा वापर ही लोकचळवळ झाली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.असे कार्यक्रम कोथरूड मध्ये सर्वत्र आयोजित करणार असल्याचे क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले,स्वा.सावरकरांनी ज्याप्रमाणे विदेशी कापडाची होळी केली तशीच चळवळ पुन्हा उभी करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
नगरसेवक दीपक पोटे यांनी स्वदेशीच्या वापराची आवश्यकता विशद करताना आपल्याकडे बनणाऱ्या वस्तू ही दर्जेदार असल्याचे सांगितले.यावेळी भाजपचे विस्तारक पुनीत जोशी,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,महेश पोटे,चंद्रप्रभा खिलारे,स्वातीताई हिर्लेकर,एड प्राची बगाटे,अनुराधा एडके,हनुमान पवार,लाला कानगुडे,सुनील अभंगे,राज तांबोळी,अक्षय कुलकर्णी,इ मान्यवर उपस्थित होते.
मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक,हनुमान पवार यांनी स्वागत तर संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन केले.

ओवाळीते मी लाडक्या भाऊराया….

0

पुणे- कधी काळी ज्यांना राजकीय स्पर्धक मानले जात ,शरद पवारांचा नेमका वारस कोण ? अशा प्रश्नाने भुवया उंचावून दादा ताई च्या नात्याला  संकटात गोवणारे वातावरण झालेले अनेकांना आठवत असेल . पण जावू द्यात … सध्या तरी या भावा  बहिणीत कमालीचा म्हणजे असावा तसा गोडवा आहे हि मराठी माणसासाठी एक चांगली बातमी म्हणता येईल असाच गोडवा कायम प्रत्येक भावा बहिणीत नांदावा अशी हि इछ्या व्यक्त करता येईल .


अजितदादा -सुप्रिया ताई ची भाऊबीज एफबी वरून त्यांच्या चाहत्यांपर्यंत …पोहोचली आहे .
देशभरात आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आज भाऊबीज साजरी केली.दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज…!! सर्वांना स्नेहमयी शुभेच्छा.!! अशा वाक्यासह भाऊबीजेचा फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर करुन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकुलती एक कन्या आहेत. तर अजित पवार सुप्रिया सुळेंचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, पवार कुटुंब सगळे सण बारामतीमधील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी साजरे करतात. यंदा पवार कुटुंबाने दिवाळी बारामतीमध्ये एकत्र साजरी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची,आणि नागरिक व पत्रकारांची  शरद पवार यांनी आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.

अबब..आता आरटीआय खाली माहिती शुल्कावरही जीएसटी ?

0


पुणे :औरंगजेबाच्या जिझिया कराला काय नावे ठेवता ? किती लुबाडायचे , कुठे कुठे जनतेचे पैसे हिसकावायाचे याचे काही तारतम्य सध्याच्या काळातही जणू कुणाला नसल्याचे दिसते आहे , होय गोष्टच तशी आहे .

माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेल्या माहितीपोटी आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर  जीएसटी आणि सीजीएसटी लागू करण्याचा अजब गजब निर्णय शासनाने घेतला आहे काय ? असा सवाल    माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकरयांनी केला आहे .
शिरोडकर यांनी एस टी महामंडळाकडे माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करुन माहिती मागितली होती़ त्यातील काही मुद्यांची माहिती नियोजन व पणन खात्याशी संबंधित तर काही विभागीय पातळीवर अर्ज करुन प्राप्त करुन घ्यावी असे उत्तर देण्यात आले़ याचबरोबर त्यांनी शासकीय लेखा परीक्षण अहवाल मागितला होता़ याबाबत सहायक मुख्य लेखा अधिकारी सु़ गो़ खासनीस यांनी त्यांना पत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे की, ‘हा अहवाल उपलब्ध असल्याचे सांगून तो प्राप्त करुन घेण्यासाठी प्रती पृष्ठ २ रुपये प्रमाणे ६ पृष्ठाचे १२ रुपये व ९ टक्के एसजीएसटी १ रुपया आणि ९ टक्के सीजीएसटी १ रुपये असे एकूण १४ रुपये राज्य मार्ग परिवहन महामंडळात जमा करावे व त्याची पावती या कार्यालयात सादर करावी.’
आपण गेल्या १२ वर्षात माहिती अधिकार कायद्याखाली ५ हजार अर्ज केले़ परंतु अजूनपर्यंत कोणीही जीएसटी लावला नव्हता़ जीएसटी लागत असेल तर त्याचे नोटीफिकेशन कधी केले, असा प्रश्न करुन माहिती अधिकार कायद्याखाली केलेल्या बदलांची प्रत देण्याची मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा -स्थायी समितीची योजना

0

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. करदाता कुटुंबप्रमुख दुर्दैैवाने एखाद्या अपघातात सापडला तर त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेचा फायदा होणार आहे. अंदाजपत्रकात या योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोहोळ यांनी सांगितले कि, महापालिका यात प्रत्येक करदात्या कुटुंबाचा ७० रुपयांचा विमा उतरवणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला दिले जाईल. कराप्रमाणेच हा विमाही वार्षिक असेल. त्या वर्षात त्याला दुर्दैैवाने अपघात वगैरे झाला तर  विम्याचे पैसे तत्काळ मिळतील. याचीही रचना करण्यात आली आहे. थोडा जखमी असेल तर २५ हजार, जास्त जखमी असेल तर ५० हजार, एखादा अवयव निकामी झाला असेल तर १ लाख, त्यापेक्षा जास्त काही झाले असेल तर २ ते ४ लाख व दुर्दैैवाने मुत्युमुखी पडल्यास ५ लाख रुपये दिले जातील.
यात फक्त संबंधित करदात्याने पूर्ण कर जमा केलेला असावा, त्याच्या नावे थकबाकी नको इतकीच अट ठेवण्यात आली आहे. दरवर्षी त्याने कर जमा केला की लगेचच त्याच्या नावाचा विमा उतरवला जाईल. यासाठीचा सर्व खर्च महापालिका करणार आहे व महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या तुलनेत तो अत्यंत कमी असाच आहे असे मोहोळ म्हणाले. या योजनेमुळे महापालिकेच्या मिळकर कर भरण्यात चांगली वाढ होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला .महापालिकेचे एकूण ८ लाख २५ हजार करदाते आहेत. त्याशिवाय झोपडपट्टीतील रहिवाशांकडून महापालिका सेवाशुल्क घेत असते. त्यांची संख्या साधारण २ लाखांच्या आसपास आहे. यातील कर जमा करणाऱ्याच्या कुटुंबप्रमुखाला एखादा अपघात झाला व त्यात दुर्दैवाने त्याचे काही बरेवाईट झाले तर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा काही मार्ग शोधावाच लागतो. त्यात बराच वेळ जातो. त्या दरम्यानच्या काळात जगण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे काहीच राहात नाही. अशा वेळी ही योजना उपयोगी पडेल असेही ते म्हणाले .

 

खेडमधील महिंद्रा लॉजिस्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

0

पुणे : खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. 7 हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या गोडाऊनमधून स्थानिक कंपन्यांना स्पेअर पार्ट्स पुरवले जातात

पुणे ते काजीपेट सुपरफास्ट एक्स्प्रेस चा प्रारंभ खासदार शिरोळेंच्या हस्ते …

0

पुणे-मध्य रेल्वे तर्फे पुणे ते (तेलंगणा मधील) काजीपेट ह्या अतिजलद रेल्वे गाडीची सुरवात करण्यात आली असून पुण्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ९.४५ वा पुणे रेल्वे स्थानकवरून ह्या गाडीला मार्गस्थ केले. ही गाडी (क्र. २२१५१) प्रत्येक शुक्रवारी पुण्यावरून संध्याकाळी ९.४५ निघून दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपुर, बालरशाह, सिरपुर, रामगुंडम आणि पेडपल्ली ह्या स्टेशनवर थांबून शनिवारी संध्याकाळी ६.३५ ला काजीपेट येथे पोचेल. तसेच रविवार काजीपेट येथून ही गाडी (क्र. २२१५२) दुपारी १.३५ ला निघून सोमवारी सकाळी ११.०५ मिनिटांनी पुणे येथे पोचेल. ह्या गाडी मध्ये एसी – २ टियर व ३ टियर चे प्रत्येकी एक, स्लीपर व द्वितीय श्रेणीचे प्रत्येकी चार डबे व सामान्य श्रेणीचे दोन डबे असतील.

श्री श्री श्यामा कालीपूजा महोत्सव उत्साहात साजरा

0

पुणे-बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनच्यावतीने श्री श्री श्यामा कालीपूजा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . पुणे कॅम्प भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला . यंदाच्या उत्सवाचे बाविसावे वर्ष होते . यावेळी देवीची महापूजा , महाआरती करण्यात येऊन प्रसादाचा भोग लावण्यात आला . त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी महाप्रसादाचा लाभ सर्वानी घेतला . दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . या उत्सवात बंगाली बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते .

 यावेळी बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष सुशांतो दास ,  उपाध्यक्ष तपन मंडल , बिस्वनाथ आदक , दिलीप समंतो , खोकोन पाखीरा , नीताई भट्टाचार्य , सचिव गोविंदो हालदार , हिरु मोंडोल , मिथुन राणा , प्रशांतो घोष , शामसुंदर कोलाय , गोविंदो माल , खजिनदार गौतम मन्ना , सहखजिनदार मिंटू गोलू , बिस्वनाथ मंडल , देबा परमाणिक , काली दुवारी , शामसुंदर बेरा ,हिशोबतपासणीस पनालाल पोलाय , सह हिशोबतपासणीस राजकुमार दास , अभिजित बेरा , सुशील सना , नंदो पंडित , श्यामल मंडल , तरुण दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते . 

हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर दीपोत्सव

0

पुणे -लष्कर भागातील सोलापूर रोडवरील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद साहब पाचपीर दर्गाहवर सर्व धर्मीय बांधवानी एकत्रित येऊन पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला . या दीपोत्सव कार्यक्रमात पुणे लष्कर भागातील हिंदू – मुस्लिम – ख्रिचन बांधवानी एकत्रित येऊन  हा दीपोत्सव साजरा केला . दर्गाहमध्ये स्वस्तिक आणि ओम आकारामध्ये पणत्या ठेवण्यात आल्या होत्या . यावेळी सर्व बांधवाना दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी यांच्याहस्ते मिठाईवाटप करण्यात आली .

या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये राजा बडसल , ज्योती राघवाचारी , मधू राजा बडसल , गीता राघवाचारी ,   युगंधर बडसल ,  तन्वीर सय्यद व सुरज राघवाचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी यांनी सांगितले कि , पुणे लष्कर परिसरात   सर्व धर्मीय बांधव गुण्या गोविंदाने राहतात , त्यासाठी यंदाची दिवाळी आम्ही सर्वानी एकत्रित येऊन दर्गाहमध्ये दीपोत्सव साजरा केला . यावेळी आम्ही मिठाई वाटप करून दिवाळी आनंदाने साजरी केली .