पुणे-बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनच्यावतीने श्री श्री श्यामा कालीपूजा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . पुणे कॅम्प भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला . यंदाच्या उत्सवाचे बाविसावे वर्ष होते . यावेळी देवीची महापूजा , महाआरती करण्यात येऊन प्रसादाचा भोग लावण्यात आला . त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यावेळी महाप्रसादाचा लाभ सर्वानी घेतला . दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . या उत्सवात बंगाली बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी बंगाली गोल्डस्मिथ कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष सुशांतो दास , उपाध्यक्ष तपन मंडल , बिस्वनाथ आदक , दिलीप समंतो , खोकोन पाखीरा , नीताई भट्टाचार्य , सचिव गोविंदो हालदार , हिरु मोंडोल , मिथुन राणा , प्रशांतो घोष , शामसुंदर कोलाय , गोविंदो माल , खजिनदार गौतम मन्ना , सहखजिनदार मिंटू गोलू , बिस्वनाथ मंडल , देबा परमाणिक , काली दुवारी , शामसुंदर बेरा ,हिशोबतपासणीस पनालाल पोलाय , सह हिशोबतपासणीस राजकुमार दास , अभिजित बेरा , सुशील सना , नंदो पंडित , श्यामल मंडल , तरुण दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते .