पुणे-मध्य रेल्वे तर्फे पुणे ते (तेलंगणा मधील) काजीपेट ह्या अतिजलद रेल्वे गाडीची सुरवात करण्यात आली असून पुण्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ९.४५ वा पुणे रेल्वे स्थानकवरून ह्या गाडीला मार्गस्थ केले. ही गाडी (क्र. २२१५१) प्रत्येक शुक्रवारी पुण्यावरून संध्याकाळी ९.४५ निघून दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपुर, बालरशाह, सिरपुर, रामगुंडम आणि पेडपल्ली ह्या स्टेशनवर थांबून शनिवारी संध्याकाळी ६.३५ ला काजीपेट येथे पोचेल. तसेच रविवार काजीपेट येथून ही गाडी (क्र. २२१५२) दुपारी १.३५ ला निघून सोमवारी सकाळी ११.०५ मिनिटांनी पुणे येथे पोचेल. ह्या गाडी मध्ये एसी – २ टियर व ३ टियर चे प्रत्येकी एक, स्लीपर व द्वितीय श्रेणीचे प्रत्येकी चार डबे व सामान्य श्रेणीचे दोन डबे असतील.
