अरिनी सिल्क सरिज ते कांजीवीराम रेशम साडी, आसाम मुगा फॅब्रिक्स, बनारसी सारीज सर्व प्रकारचे रेशीम उपलध
विवाह मुहूर्ताचे औचित्य साधून , हस्तशिल्पी ” सिल्क इंडिया – २०१७ ” घेऊन पुण्यात दाखल
महावितरण मुख्यालयातील ‘विशेष मदत कक्षा’चा ग्राहकांनी जास्तीत जास्त वापर करावा
श्री. संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण.
मुंबई: महावितरणच्या मुंबईस्थित प्रकाशगड मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘विशेष मदत कक्षा’मुळे ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने मिळत असून ग्राहकांच्या नावातील बदलही करून देण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आलेला असून या कक्षाचा ग्राहकांनी जास्तीत जास्त उपयोग करून त्यांच्या समस्यांचे निवारण या कक्षाद्वारे करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
एप्रिल 2017 पासून हा ‘विशेष मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे एप्रिल ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यन्त सुमारे 1,203 ग्राहकांनी संपर्क साधला असून यातील 371 ग्राहकांनी नवीन वीज जोडणीच्या संबंधात चौकशी केली. त्यापैकी 128 ग्राहकांना तत्परतेने नवीन वीजजोडणी देण्यात आलेली आहे. तसेच 832 ग्राहकांनी नावात बदल करण्याबाबत या विशेष कक्षाकडे मदत मागितली. त्यापैकी 54 ग्राहकांच्या नावात तातडीने बदल करून देण्यात आला आहे. याशिवाय या कक्षाद्वारे इतर ग्राहकांच्याही समस्या सोडविण्यात येत आहेत.
याच कक्षामार्फत ऑगस्ट 2017 पासून ‘कनेक्शन ऑन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेंतर्गत ज्या ग्राहकांनी वीजजोडणीसाठी या कक्षाला दूरध्वनी केला अशा ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजजोडणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या सेवेंतर्गत 83 ग्राहकांनी मदत कक्षाकडे संपर्क साधला. त्यातील 36 ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यात आली आहे.
नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी महावितरण मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.
आयटीटीएफ वर्ल्ड जुनिअर सर्किट इंडियन जुनिअर अँड कॅडेट ओपन टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुण्याच्या पृथा वर्टीकरची निवड
राष्ट्रीय एकता दिनी ‘एकता दौड’ कार्यक्रमात सर्व विभागांनी सहभागी व्हावे -रमेश काळे
पुणे, दि. 27 : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी म्हणजे दि. 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबरच सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिले.
राष्ट्रीय एकता दिन आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. बैठकीला संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित एकता दौड दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पुण्यातील विधानभवन येथे सुरु होवून पुन्हा याच ठिकाणी संपेल. साधारणपणे दोन किलोमीटर अंतराची ही दौड असेल. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी शाळांचे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटना व क्रीडा मंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. काळे यांनी केले आहे. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा तसेच परेड आयोजित करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक संस्थांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस शपथ देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या.
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल जाहिर
पुणे, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 7,8 आणि 10 ते 12 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आलेल्या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 26 ऑक्टोबर 2017 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आला आहे. तसेच हा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंटही घेता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांची मुळ प्रमाणपत्रे, गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्हयांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद व मुंबईसाठी शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, बालभवन, चर्नी रोड, मुंबई यांचे कार्यालयामार्फत संबंधीत टंकलेखन संस्थांना यशावकाश वितरीत करण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या टंकलेखन संस्थामधून कार्यालयीन वेळेत मिळतील.
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी परीक्षार्थ्यांनी आपल्या संस्थेतून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.100/- व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रु.400/- ऑनलाईन पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर 2017 पर्यंत भरावे. याबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत तसेच परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत असेही श्री. डेरे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
महापौर दालनात पहा घडले काय ? (जसेच्या तसे.. व्हिडीओ)
हडपसरच्या नव्या कचरा प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक संतप्त
हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आज महापौर मुक्ता टिळक यांना कचऱ्याची भेट देत हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध केला. हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसर मधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे.यापूर्वीचे कचरा प्रकल्प हडपसर मध्ये आहेतच .
त्यामुळे मंगळवारी पुणे महापालिकेच्या हद्दीतील हडपसर येथील रामटेकडी येथील रॉकेम प्रकल्पात पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून गाड्या परत पाठवून स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे आणि नागरिकांनी हडपसर येथे आंदोलन केले होते. महापौर दालनात या प्रश्नावरून नेमके काय घडले ते पहा जसेच्या तसे ….
राजश्री शाहू वसाहतीचा स्वच्छतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.
‘वेलकम होम’ या चित्रपटाचा मुहूर्ताचा ‘क्लॅप’ दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते
चित्रपट म्हणजे समाजमनाचा आरसा असतो या श्रद्धेने वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा समावेश होतो. दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही दिग्दर्शक द्वयी आता ‘वेलकम होम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाची कथा, पटकथा सुमित्रा भावे यांची असून नुकतीच या चित्रपटाच्या मुहूर्ताचा ‘क्लॅप’ सुप्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला. बाईचं घर नेमकं कोणतं? तिच्या आई-वडिलांचं, नवऱ्याचं की तिचं स्वतःचं? असा प्रश्न या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. घर या संकल्पनेभोवती गुंफलेल्या नात्यांचा शोध घेणाऱ्या या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, अभय कुलकर्णी, बालकलाकार प्रांजली कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे.
कट्यार काळजात घुसली, सावर रे, त्या रात्री पाऊस होता या व अशा अनेक आशयघन चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स निर्मित ‘वेलकम होम’ हा १५ वा मराठी चित्रपट आहे. विनय बेळे, अभिषेक सुनील फडतरे, दिपककुमार भगत, अर्पण भुकनवाला हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
एफसी पुणे संघाचा अर्जुन कपूर नवा सहमालक
सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचा धरार 29 ऑक्टोबरपासून स्पर्धेत 133 संघांचा सहभाग, एकूण 3 लाख रूपयांची रोख पारितोषिके
पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या 29 ऑक्टोबर ते 19 नेव्हेंबर 2017 या कालावधीत पुणे, पिपरी चिंचवड, बारामती, खेड या ठिकाणी रंगणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांनी सांगितले की, पुणे जिल्हातील सर्व तालुक्यांमधील 20 वर्षाखालील सुमारे दीड हजार कुमार मुले व मुली यांचा सहभाग असलेली स्पर्धा ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंसाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. प्रो-कबड्डीला जिल्हातून मिळालेला प्रतिसाद लक्षात घाता जिल्हा परिषद सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू व राज्य कबड्डी संघटनेचे केशाध्यक्ष शांताराम जाधव स्पर्धेचे तांत्रिक संचालक असणार आहेत. स्पर्धेला मॅक्स लींक यांचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेचे आयोजन एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक कौस्तुभ देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली केले जाईल.
स्पर्धेतील सामन्यांची 4 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून ग्रुप स्टेज बाद पध्दतीने खेळण्यात येणार आहे. यामध्ये खेड विभागातील खेड, जुन्नर, शुरूर व आंबेगाव तालुक्यांची स्पर्धा 29 ऑक्टोबरला खेड येथे होईल. राजगुरूनगर, पिंपरी-चिंचवड, मावळ व मुळशी तालुक्यांची स्पर्धा 4 नोव्हेंबरला निगडी येथे होईल. पुणे शहर, भोर व वेल्हे तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 5 नोव्हेंबरला पुण्यात होईल तर बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यातील खेळाडूंची स्पर्धा 11 नोव्हेंबरला बारामती येथे होणार आहे. या सर्व ठिकाणच्या स्पर्धा त्या त्या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार असल्याचे पवार यांनी मनुद केले.
स्पर्धेतील प्रत्येक विभागातील विजेता व उपविजेता संघात(मुले व मुली) 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी बारामती येथे सुपर प्लेऑफ सामने होणार आहेत. पहिल्या फेरीत सामने व्यावसायिक मॅट फिल्डवर लीग-कम-नॉक आऊट स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकुण 3 लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या संघाला 50 हजार रूपये, उपविजेत्या संघाला 35 हजार रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. यशिवाय उत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक पारितोषिते देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषीपंपासह थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचे आवाहन थकीत वीजबिल भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत महावितरणने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषीपंपधारक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी केले आहे.
पुणे परिमंडलात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील 6 लाख 84 हजार 567 वीजग्राहकांकडे 170 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात 5 लाख 81 हजार 340 घरगुती ग्राहकांकडे 107 कोटी 39 लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील 89 हजार 720 ग्राहकांकडे 43 कोटी 61 लाख तर 13 हजार 507 औद्योगिक ग्राहकांकडे 19 कोटी 15 लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.
याशिवाय पुणे परिमंडलातील 84 हजार 80 कृषीपंपधारकांकडे वीजबिलांपोटी 226 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार कृषीपंपधारकांनी एप्रिल 2017 पासूनच्या चालू वीजबिलांचा भरणा केला नसल्यास कृषीपंपाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.
पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 28) व रविवारी (ता. 29) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्ग त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन निर्धारित वेळेत अदा करावे महावितरणचे वित्त संचालक यांचे निर्देश
मुंबई: महावितरणमध्ये कार्यरत बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना मासिक वेतन निर्धारित वेळेत मिळावे यासाठी सर्व संबंधितांनी विविध अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महावितरणचे संचालक (वित्त) सुनिल पिंपळखुटे यांनी दिले असून या कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी (दि. 25 ऑक्टोबरला) महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना मासिक वेतन निर्धारित वेळेत मिळावे यासाठी या प्रक्रियेशी निगडीत सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. ही सर्व कामे ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच वेळेत पूर्ण करावीत. तसेच याकरिता प्रत्येक विभागाने करावयाच्या कामाची जबाबदारी निश्चित करून या प्रक्रियेत अधिक सूसत्रता व गती आणावी, असे निर्देश संचालक (वित्त) सुनिल पिंपळखुटे यांनी यावेळी दिले.
तब्बल 50 दशलक्ष भारतीय मुलांना इंग्रजी वाचन आणि आकलनातील अडचणी सोडवता येतील
मुंबई, 25 ऑक्टोबर : भारतातील मुलांमध्ये इंग्रजी भाषा वाचता येणे आणि तिचे पूर्ण आकलन यातील सुधारणा व्हावी, या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांपासून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक फायदे आपल्या देशातील तरुणांना मिळायला हवेत, परंतु यामध्ये तरुणांना इंग्रजी भाषा वाचता येण्यातील अडचणींमुळे अस्पष्टसे पेच निर्माण होतात, भारतीय अर्थव्यवस्था लोकसंख्येचे फायदे प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असताना, यासमोर तरुणांच्या क्षमतांचे हे आव्हान उभे राहते. 2016-17मध्ये इंग्लिशहेल्परटीएम द्वारे विविध शासकीय आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले, राइट टू रीड उपक्रमाअंतर्गत हे मूल्यांकन झाले. 3 ते 5च्या प्राथमिक स्तरावर या शैक्षणिक वर्षात ट्रीटमेंट ग्रूपमध्ये कंट्रोल ग्रूपपेक्षा इंग्रजी गुणांमध्ये 21 टक्क्यांची सुधारणा दिसली. तर, 6 व 7 इयत्तेतील ट्रीटमेंट ग्रूप कंट्रोल ग्रूपच्या तुलनेत 20 टक्क्यांनी अग्रेसर होता.
कंट्रोल आणि ट्रीटमेंटची रचना मिळणाऱ्या लाभांशांची तुलना करण्यात आली आहे. राइट टू रीड उपक्रमाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान प्रवण गोष्टींच्या माध्यमातून वाचण्याचा अनुभव घेतला, त्यांना ट्रीटमेंट ग्रूप म्हणून संबोधण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा अजिबातच वापर करू दिला गेला नाही, अशांना कंट्रोल ग्रूप म्हणून संबोधण्यात आले.
गेल्या दशकभरात, सरकारी शाळांमध्ये आयोजित केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून येते की, विद्यार्थ्यांमध्ये वाचणे आणि आकलन करणे यात सातत्याने आणि मोठी त्रुटी आढळून येत आहे.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि पंजाब राज्यांमध्ये 3 ते 5 इयत्तांमध्ये मूलभूत आधारावर तब्बल 70,000 चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीत, ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी कुठल्याही तंत्रज्ञानाची साहाय्यता उपलब्द करून दिली गेली नाही, अशा कंट्रोल ग्रूपमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचन आणि आकलनात सुधारणा होण्यास भरपूर वाव दिसून आला.
हा अहवाल सादर करताना इंग्लिश हेल्परचे एमडी आणि सीईओ श्री. संजय गुप्ता म्हणाले की, “अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या प्रश्नांमध्ये तातडीची आणि परिणामकारक सुधारणा होईल, यावर आमचा विश्वास आहे. या उपक्रमात आम्ही ठोस पावले टाकत आहोत, गेल्या दोन वर्षांमध्ये 20,000 विद्यार्थ्यांवरून आम्ही 1 दशलाख विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आहोत. आम्ही अगदी सहजपणे 50 पटींनी विकास करत आहोत आणि त्याच वेळेत तब्बल 50 दशलक्ष भारतीय मुलांपर्यंत पोचत आहोत. आमच्या सर्व कौशल्यांचे आम्ही सादरीकरण केलेले आहे. आता आपल्या देशाने या दृष्टीने एक मोठी झेप घेण्याची गरज आहे.’’
“तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचन करणे किंवा आकलन करणे हे पहिले आवश्यक पाऊल आहे. यामुळे आपण साक्षरतेसारख्या मुख्य प्रश्नाचे उत्तर शोधू शकू. परंतु या नव्या जगात सर्व प्रकारचे व्यापक तंत्रज्ञान आजच्या तरुणांना आत्मसात केले पाहिजे आणि कम्प्यूटरशी संबंधित साक्षर झाले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, मुलांच्या अध्यापन आणि जीवनावश्यक गरजांसाठी शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा लाभ घ्या आणि त्यांना तंत्रज्ञान सक्षम बनवा. भारत देशाने ही संधी घेतलीच पाहिजे आणि आपल्या देशाला एकाच वेळेस कौशल्यातील असमानता आणि गुणवत्तेचे प्रमाण यावर मात करून प्रमुख स्थानी नेले पाहिजे.’’ असे इंग्लिश हेल्परचे संस्थापक, मालिकाधिष्ठित उद्योजक, आकलनशास्त्रज्ञ, पीएचडीधारक डॉ. वेंकट श्रीनिवासन म्हणाले.
तंत्रज्ञान प्रवण वाचन विद्यार्थ्यांना प्रामुख्याने उपलब्ध करून दिले पाहिजे, आणि त्यांच्यातील सर्व स्तरावर होणारी सुधारणा कंट्रोल ग्रूपशी ताडून घेतली पाहिजे, त्यांच्यात सकारात्मक बदल घडत असल्याचे आणि त्यांच्या उच्चतम पातळीवर अस्खलिखित बदल होत असल्याचे दिसून येईल.
अभ्यासाचे तात्पर्य :
– सर्व इयत्तांमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचन उपलब्ध करून दिलेली मुले, अशा प्रकारची सुविधा उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करणारी ठरली.
– तंत्रज्ञान साहाय्य दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधील वाचनाची क्षमता, अशा प्रकारे सुविधा उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा सर्वोत्तम पातळीवर गेली.
– 2013-14 साली 20,000 विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा अभ्यास करण्यात आला होता, आणि यातील निकालांमध्ये सातत्य राहिले आहे. थोडक्यात, या उपक्रमाची 50 पटींनी वाढ करणे आणि याद्वारे 20,000 मुलांपासून आता 1 दशलक्ष मुलांपर्यंत पोचणे शक्य झाले आहे.
या उपक्रमातून प्रामुख्याने समोर आलेली गोष्ट म्हणजे, मल्टी-सेन्सरी तंत्रज्ञान प्रवण वाचनाने इंग्रजी वाचन आणि आकलनात सकारात्मक परिणाम दिसून येतो. रीड टू मीटीएम या क्लासअंतर्गत कार्यरत असेलल्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने उच्चतम गुणांकन प्राप्त झाल्याचे दिसून येते, हे गुणांकन इंग्रजी अध्यापनासाठी तंत्रज्ञान-प्रवण व्यासपीठ उपलब्ध करून न देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त आहे.
इंग्लिशहेल्परबद्दल
इंग्लिशहेल्परटीएमद्वारे सर्व वयोगटातील ग्रूपमधील इंग्रजी भाषा शिकणाऱ्यांसाठी मल्टी-सेन्सरी तंत्रज्ञानप्रवण वाचन आणि आकलन सुधारणा उपक्रम राबवले जातात. राइट टू रीड या उपक्रमातून इंग्लिशहेल्परटीएमने रीड टू मीटीएम हा उपक्रम सादर केला आहे – वाचन आणि आकलनाचे हे सॉफ्टवेअर आठ राज्यातील तबब्ल 6,000 शाळांमध्ये राबवण्यात येत आहे, आतापर्यंत 1.5 दशलक्ष विद्यार्थी आणि 12,000 पेक्षा जास्त शिक्षख यांच्यावर त्याचा परिणाम झालेला आहे.
पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिकेत संदिप कुलकर्णी
काही कलाकारांच्या उपस्थितीमुळेच चित्रपटाभोवती एक अनोखं वलय निर्माण होत असतं. प्रचंड मेहनतीने त्यांनी आजवर पडद्यावर सजीव केलेल्या व्यक्तिरेखांनी दिलेली ती जणू पोचपावतीच असते. त्यामुळे अशा कलाकारांपुढे इतर सर्व गोष्टी दुय्यम मनात रसिक मायबापही त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट ग्रहाकडे धाव घेतात. हिंदीसोबतच मराठी तसंच इतर भाषिक चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीवर असलेल्या या मराठी कलाकारांच्या यादीत संदिप कुलकर्णी हे नावही सामील आहे. याच कारणांमुळे संदिप कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या चित्रपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलतो आणि ते चित्रपट आपोआप चर्चेत येतात. संदिप सध्या ‘कृतांत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
कृतांत’ या चित्रपटाची निर्मिती निर्माते मिहीर शाह यांनी रेनरोज फिल्म्सच्या बेनरखाली केली आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात संदिप कुलकर्णी एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि निसर्गप्रेमी अशी ही भूमिका आहे. दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना संदिप म्हणाले की, तसं पाहिलं तर ‘कृतांत’ या शीर्षकावरून या चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावणं कठीण आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे. कथेबाबत जास्त काही सांगता येणार नाही, परंतु या चित्रपटाचा विषय आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनाशी अनायसे जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करणारा असल्याचं मात्र नक्की सांगेन. ‘कृतांत’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा शब्दांत सांगणं तसं कठीण असून इतक्यात ते सांगून त्यातील रहस्य उलगडणं ठीक नाही. भूमिका निवडताना मी नेहमीच चोखंदळ असतो. एका प्रकारच्या भूमिकेत मी पुन्हा कधीच दिसलो नाही. ‘कृतांत’ची ऑफर स्वीकारताना देखील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही. नातेसंबंध आणि आजचं जीवन हा या चित्रपटाचा गाभा असून तोच खरा या चित्रपटाचा नायक आहे असं माझं मत आहे. या चित्रपटाची कथा आजच्या काळातील असल्याने प्रत्येकाला ती आपलीशी वाटेल, प्रत्येकजण त्यातील व्यक्तिरेखेच्या जागी स्वतःला पाहिल आणि हेच या चित्रपटाचं यश असल असं मतही संदिपने व्यक्त केलं.
कृतांत’मधील ही दमदार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तितक्याच ताकदीचा नट मिळणं ही कथेच गरज असल्याचं सांगत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली एक ताकद, ऊर्जा, उंची आणि मर्यादा असते. जो कलाकार या सर्व गोष्टींची पूर्तता करीत व्यक्तिरेखा साकारतो ती प्रेक्षकांच्या मनाला भिडते. या व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची निवड करताना सर्वप्रथम संदिप कुलकर्णी यांचाच चेहरा डोळयांसमोर आला. तेच या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देऊ शकतील असं वाटलं. त्यांना जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा ते देखील आनंदाने तयार झाले. मराठीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा संदिप कुलकर्णी यांसारखा कलाकार जेव्हा चित्रपटात काम करायला तयार होतो तेव्हा संपूर्ण टिमलाही हुरूप येतो. त्यांच्यासोबत चित्रीकरण करतानाही एक वेगळाच अनुभव येत असल्याचं भंडारे म्हणाले.
संदिप कुलकर्णी यांच्यासोबत या चित्रपटात सुयोग गोरहे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय मिश्रा या चित्रपटाचे केमेरामन असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडीत आहेत.
टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 6 विकेट राखून दणदणीत विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी
कीवी टीमने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकांत 9 विकेट गमावून 230 धावा केल्या होत्या. विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य स्विकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 46 षटकांत 4 विकेट गमावून 232 धावा केल्या.
मालिकेतील तिसरा व अंतिम सामना 29 ऑक्टोबरला कानपूर येथील मैदानावर खेळण्यात येणार आहे.
न्यूझीलंडच्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने फलंदाजीला धडाकेबाज सुरुवात केली. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले होते. मात्र, रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली 29 धावांवर तंबूत परतला. भारताने 24 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 124 धावा केल्या आहेत.







