Home Blog Page 3244

पुणे परिमंडलात 90,500 कृषीपंपधारकांना वीजबिलातून थकबाकीमुक्तीची संधी;46 कोटी 62 लाखांचे व्याज व दंड माफ होणार

0

पुणे : पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील 90 हजार 517 कृषीपंपधारक शेतकर्‍यांना नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून  वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत दि. 31 मार्च 2017 पर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. यात हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील 90 हजार 517 कृषीपंपधारकांकडे 231 कोटी 65 लाख रुपयांची  एकूण थकबाकी आहे. यातील 185 कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा दिलेल्या हप्त्यांचा चालू वीजबिलांसह भरणा केल्यास त्याच प्रमाणात 44 कोटी 32 लाख रुपयांचे व्याज व 2 कोटी 30 लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा राज्य शासन विचार करणार आहे.

पुणे परिमंडलात 71 हजार 529 कृषीपंपधारकांकडे प्रत्येकी 30 हजार रुपयांपेक्षा कमी अशी एकूण 90 कोटी 42 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. त्यामुळे या कृषीपंपधारकांना प्रत्येक तीन महिन्यांच्या कालावधीत समान 5 हप्ते देण्यात येईल. त्यानुसार मूळ थकबाकीचा चालू वीजबिलांसह भरणा केल्यास व्याज व दंडाचे 18 कोटी 48 लाख रुपये माफ होऊ शकतील. तसेच प्रत्येकी 30 हजार रुपयांपेक्षा अधिक मूळ थकबाकी असणार्‍या 18 हजार 988 कृषीपंपधारकांकडे 94 कोटी 59 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी प्रत्येकी दीड महिन्यांच्या 10 समान हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास 28 कोटी 85 लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होऊ शकतील.

पुणे परिमंडलातील थकबाकीदार कृषीपंपधारकांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे तसेच माहिती घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन महावितरणने केले आहे. योजनेत सहभागी न झालेल्या कृषीपंपधारकांकडून नियमानुसार थकबाकी वसुली किंवा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.

योजनेचे विशेष वीजबिल

न मिळाल्यास संपर्क साधा

मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी थकबाकीदार कृषीपंपधारकांना विशेष वीजबिल देण्यात येत आहेत. यामध्ये संबंधीत ग्राहकांकडे असलेली एकूण थकबाकी, भरावयाची मूळ थकबाकी व त्यासाठी हप्त्यांची संख्या व रक्कम याबाबतची माहिती या विशेष वीजबिलात देण्यात आली आहे. वीजबिल वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. जून 2017 चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून 15 नोव्हेंबरपर्यंत या योजनेत सहभागी व्हावे लागणार असल्याने हे विशेष वीजबिल न मिळाल्यास थकबाकीदार कृषीपंपधारकांनी महावितरणच्या संबंधीत कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टेनिस स्पर्धेत भारताच्या झील देसाईचा मानांकीत खेळाडूवर सनसनाटी विजय कारमान कौर थंडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत एक तास दहा मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत मोन्टेनेग्रोच्या सहाव्या मानांकीत एना वेसेलीनोवीकचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने स्लोवाकीयाच्या आठव्या मानांकीत तेरेझा मिहालीकोवाचा 7-6(2), 6-2 असा टायब्रेकमध्ये पराभव केला.

दुहेरी गटात उपांत्य फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा या जोडीने भारतच्या झील देसाई व थायलंडच्या बुनयावी थामचायवात यांचा 3-6, 6-2, 10-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन व स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवा यांनी तुर्कीच्या बेरफु सेंग्झी व स्वित्झरलॅंडच्या करीन केनेल यांचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्यपुर्व फेरी

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2)  वि.वि तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) 7-6(2), 6-2

कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि  एना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) 6-2, 7-5

झील देसाई(भारत) वि.वि वालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) 6-3, 6-2

बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि  करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 6-2, 6-3

दुहेरी गट- उपांत्य फेरी

पी-ची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) वि.वि  झील देसाई(भारत)/ बुनयावी थामचायवात(थायलंड) 3-6, 6-2, 10-2

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि  बेरफु सेंग्झी(तुर्की)/ करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 6-0, 6-1

मुख्यमंत्री साहेब ……

0

देवेंद्रजी,

मटका बंद नाही झाला , अवैध दारूचे धंदे बंद नाही झाले आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनाही बंद नाही झाल्या … देवेंद्र आपले नाव .. नरेंद्र जींच्या अधिपत्याखाली, महाराष्ट्रातील सत्तेचे सारथ्य आपणाकडे ..कॉंगेस अगर या पूर्वीच्या राजवटीचे सोडा .. पण आपल्या राजवटीत तरी चांगली अपेक्षा जनतेने केली होती . महागाईचा अंत , भ्रष्टाचाराचा अंत  , सुस्थितीतील कायदा सुव्यवस्था , स्वच्छ शासन ,पारदर्शक शासन अशा सर्व गोष्टी आज ही सामान्य, किंवा गरीब  माणसाच्या दृष्टीने केवळ कागदावरच  आहेत . ‘बळी तो कानपिळी’  म्हणा किंवा ‘ज्याच्या हातात ससा तोच पारधी’  म्हणा या परिस्थितीत काही सुधारणा झाली असे म्हणायला वाव नाही .निव्वळ जाती पातीच्या दऱ्या वाढवून किंवा अन्य ‘बांडगुळे’ उभी करून या खऱ्या दुराव्स्थेकडील लक्ष विचलित करण्याचे काम आपली सत्ता असतानाही होत असेल तर …? सत्ता कोणाची ही असो , जनतेच्या व्यथेत मात्र फरक पडत नाही ..हे पुन्हा पुन्हा  सिद्ध होत राहते  .

     अर्थात सांगलीतील आपल्या पोलिसांच्या सैतानी कृत्याबद्दल  तुम्हालाच जाब विचारला जाणार आहे .असा प्रकार पूर्वीही होत होताच ,पण तो आपल्या कारकिर्दीत देखील थांबलेला नाही हे या आणि या आणि अशा काही घटनांनी सिद्ध झाले आहे .

खरे गुन्हेगार, गॅंगवॉरमधील दादा यांच्यासह  निष्पापांवर मस्तवाल अधिकाऱ्यांची दादागिरी आजही चालते आहे .हाणून मारून गुन्हे काबुल घेण्याचे सत्र पोलिसांकडून आज ही होते आहे हे देखील स्पष्ट होते आहे . अशा प्रकारे निष्पापांना गुन्हेगार बनविण्याचे षड्यंत्र राबविण्याऐवजी, चातुर्याने गुन्हेगार पकडणे गरजेचेच राहिलेले नाही. कारण गुन्हेगार हे पोलिसांना ठावूकच असतात असा दावा निरर्थक होणार नाही .बहुतेक ठिकाणी गुन्हेगार आणि पोलीस यांची हातमिळवणी झालेलीच असते . फक्त ‘बळीचे बकरे’ करण्यासाठी थर्ड डिग्रीचे वापर होत असतो असेही म्हणता येणार आहे . . नशीब विश्वास नांगरे पाटलांनी हे क्रोर्य बाहेर काढले आणि चव्हाट्यावर मांडले ..पण नांगरे पाटील एखादाच असतो .. हे देखील आपण ध्यानात घ्यायला हवे .
सांगलीतला प्रकार उघड झाला , म्हणजे अन्यत्र असे प्रकार उघड होत नाहीत असे कोणी समजू नये . सगळ्यांना आपापल्या परिसरातले दारूचे धंदे, मोकाट गुन्हेगार , मटक्याचे अड्डे ठावूक असतात . पण जिथे पोलिसांचीच हात मिळवणी असते, त्यांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगारी फोफावू शकत नाही हि सत्यता आपण नाकरू शकणार नाही .आणि मग  तिथे जनता भाबडी अत्याचारग्रस्त ठरते . त्यामुळे थर्ड डिग्री हा प्रकारच खरे तर तपास यंत्रणेला मान्यता न देणारा प्रकार आहे . आता यापुढेही जावून आपण चकमकी करतो .. भारताची घटना तशी मजबूत आहे . कोणताही गुन्हेगार त्यातून सुटून जावू शकत नाही , पण भ्रष्टाचार , दहशतवाद यामुळे  हा कायदा विलंब घेतो..वा निष्प्रभ ठरतो . आणि हि सत्य स्थिती आहे म्हणून शासन दरबारातली मंडळी थर्ड डिग्रीला , चकमकींना मूक मान्यता देण्यात धन्यता मानत आली आहे . हि खरे तर सत्यवादी घटनेची पायमल्ली आहे, जी आपल्या राज्यात आपल्याही कारकिर्दीत  होते आहे . आज आपण सत्ताधारी असून या परिस्थितीत बदल करू शकलेला नाही किंवा त्याबाबत काही प्रयत्न करू शकलेला नाहीत . त्यामुळे कदाचित उद्या विरोधक  म्हणून जरी महाराष्ट्रात आपण दिसलात तरीही अशा गोष्टींबाबत आक्षेप घेण्याचा आपल्याला नैतिक अधिकार उरणार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे . तेव्हा आता तरी या सांगलीतील घटनेची गंभीर दाखल घ्या , उज्वल निकम सारखा धडाकेबाज वकील द्या पण त्यांनाही सांगा माफीचा कोणी साक्षीदार न करता .. थेट लवकरात लवकर पोलिसातील अशा नराधम प्रवृत्तींना फाशी वर पोहोचवा .. एवढे करा ..म्हणजे किमान आपल्या मनाला तरी मानसिक समाधान राहील कि परिस्थिती बदल होवो किंवा न होवो पण अशा नराधमांना थेट त्यांची जागा दाखविली … अन्यथा आपल्या कारकीर्दीवर ही असे कलंक आपल्या आणि जनतेच्या मनाला कायमचे चिकटून राहतील .

सांगलीत पोलिस विभागाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोलिस कोठडीत पोलिसांनी दिलेल्या थर्ड डिग्रीत आरोपीचा मृत्यू झाला. इतकेच नाही तर आरोपी पळून गेल्याचा बनाव करत पोलिसांनीच आंबोली घाटात पेट्रोल ओतून जाळून तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनिकेत कोथळे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.

महापालिकेत नेमकी सत्ता कुणाची ?


पुणे- भारतीय जनता पार्टी चे पालिकेत ९८ नगरसेवक आहेत ,त्यांचे बहुमत आहे .. हे सारे खरे आहे . पण याच महापालिकेत सत्ताधारीच ओरडत आहेत कि प्रशासन ऐकत नाही .. आणि यंदाच्या अर्थसंकल्पाची ही वाट लागली आहे . सारखे वर्गीकरण , रखडलेली विकास कामे , निविदा( टेंडर ) निघण्यावर  होणारे वादंग या मध्ये महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे कि काय ? असे वाटण्या जोगी परिस्थिती आहे .इथून नौकरी उपलब्ध होणे तर सोडाच पण  आज पर्यंत च्या सत्ता कालावधीत शिक्षण मंडळ तसेच पालिका सुरक्षा रक्षा विभागातील अनेकांच्या रोजीरोटी वर गदा जोरदार पणे आपटली आहे .
एकीकडे स्थायी समिती अध्यक्ष हवालदिल झाल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत सभा तहकूब केली तर दुसरीकडे महिला बालकल्याण समितीने देखील हीच री ओढली . महापौरांचे तर मुख्य सभेतील नुसते आदेशच ऐकायचे आणि मिडिया ने त्यास प्रसिद्धी द्यायची .. यावर विषय थांबतात प्रत्यक्षात मात्र हि सारी बनवाबनवी असल्याचेच नंतर निष्पन्न होत आले आहे .
हे सारे आदेश , आश्वासने, घोषणा आजपर्यंत तरी ‘बनवाबनवी ‘चा खेळ ठरले आहेत . चालू अर्थसंकल्पावर देखील बोलण्यासारखे काही उरलेले नाही .
आता प्रश्न हा आहे कि नेमके महापालिका चालवतंया तरी कोण ?कुणाल कुमार ऐकत नाही, तुकाराम मुंडे ऐकत नाही ..अधिकारी उडवून लावतात … काय आहे खरा प्रकार . सत्ताधारी भाजपला महापालिका चालविता येत नाही कि आणखी काय या मागे दडले आहे ? गणेशोत्सवासाठी केलेली  2 कोटी ची तरतूद नेमकी कुठे जिरवीण्यात आली ? बोगस कर्मचाऱ्याचा पाठीराखा कोण होता ?सीएसआर घोटाळ्याचा अहवाल का दडपून ठेवण्यात येतो आहे ? का यावर कोणी सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाष्य करीत नाही ?मोठ्ठे गौडबंगाल आहे असे वाटावे असा कारभार नेमके कोण हाकीत आहे .
महापालिकेतील नगरसेवक हतबल असताना सर्वच नाही पण काही पदाधिकारी राजकारण करीत आहेत काय ? असा संशय यावा असा प्रकार येथे जाणवतो आहे .नेमके कोण कोणाला बनवीत आहे ? कोणी कोणी कोण कोणत्या खात्यात बोगस कर्मचारी नेमून आपापली तुंबडी भरण्याचे काम सुरु ठेवले आहे … याबाबत आता निव्वळ दबक्या आवाजात चर्चा होते आहे … पण दिवस नक्कीच बदलतात .. आज ना उद्या जुन्या जाणत्या गप्प राहिलेल्या नगरसेवकांना पालवी फुटेल …या सर्व गोष्टीचा पर्दाफाश  होईल या आशेवर प्रामाणिक पुणेकरांनी राहायला हरकत नाही .

नोट बंदी काळ्या धनाविरुद्ध..फायदे दिसतीलच – खासदार विनय सहस्त्रबुद्धे(व्हिडीओ)

0

पुणे  : भारतीय जनता पार्टी अर्थकारणात कधीही राजकारण आणत नाही. विमुद्रीकरणाच्या वेळीस सहकारी बँकांनी जमा केलेला पैसा काही काळ गोठवला गेला, मात्र असे का केले त्याचा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानेच करावा, नोटबंदी हि काळ्याधानाविरुद्ध च होती त्याचे फायदे हळू हळू दिसतील  असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज काळा दिवस पाळणाऱ्या कॉंग्रेस वर टीका केली .

विमुद्रीकरणाच्या (नोटाबंदी) निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला आहे. भाजपाच्या वतीने त्यांच्या विरोधात देशभरात काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे. शहर भाजपाने त्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करीत विरोधकांवर टीका केली. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा आमचा विचार नाही असे ते म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक फायदे झाले.देशाच्या अर्थनितीला कसलीही शिस्त नव्हती. ती शिस्त या निर्णयामुळे आली. डिजीटल व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या वापरावर निर्बंध आले. काश्मिरमधील दगडफेक थांबण्यापासून ते बनावट कंपन्या बंद करण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या आहेत. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. त्याला उत्तर द्यायचे म्हणून भाजपाने देशभर काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भाजपाला माघार घ्यावी लागली असा होत नाही असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

नोटाबंदी, त्यानंतर डिजीटल व्यवहार, रेरा कायदा यासारखे काही निर्णय घेण्याची गरजच होती. सुरूवातीच्या काळात त्याचा त्रास होणार हे दिसत असतानाही त्यामुळेच निर्णय घेण्यात आले. हे निर्णय वेगवेगळे पाहिले तर त्याचा एकसंध फायदा काय झाला ते दिसत नाही. मात्र आता तो दिसू लागला आहे. ज्यांना काळ्या पैशात, त्याची निर्मिती होण्यात रस आहे तेच अपप्रचार  करीत आहेत, मात्र जनतेला आता फायदा दिसू लागला आहे असा दावा सहस्त्रबुद्धे यांनी केला.

नोकर्‍या कमी झाल्या हाही अपप्रचार आहे. देशात किती रोजगार निर्माण झाला याची आकडेवारी तयार करणारी कंपनी आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार सर्व क्षेत्रात चांगला रोजगार निर्माण झाला आहे. खोटे उद्योग, करबुडवगिरीसाठी स्थापन केलेल्या कंपन्या बंद झाल्या याचा अर्थ रोजगार बंद झाला असा होत नाही. उलट स्टार्ट अप, मेक इन इंडिया यासारख्या योजनांमुळे उद्योजकतेला चालना मिळून रोजगारनिर्मिती होत आहे असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. यावेळी पक्षाचे खजिनदार प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या नोटाबंदीची वर्षपुर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार गांधी हत्येवर आधारित वेब सिरिज

0

फरारी की सवारी चित्रपटातून हिंदी तर व्हेंटिलेटर चित्रपटातून मराठी दिग्दर्शनात पदार्पण
करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर आता गांधी हत्येसंदर्भातील वेब
सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या वेब सिरिजमध्ये मनोहर मालगावकर लिखित
दि मेन हू किल्ड गांधी (The Men who killed Gandhi) या पुस्तकात उल्लेखलेल्या घटना आणि
गांधींच्या हत्येवेळी भारतातील परिस्थिती यांचं चित्रण असणार आहे.
याविषयी बोलताना लगे रहो मुन्नाभाई चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच गांधींजींच्या
विचारांचा प्रभाव आपल्यावर असल्याचं म्हणत, ही सिरिज दिग्दर्शित करण्यासाठी आपण
उत्सुक असल्याचंही राजेश मापुसकर म्हणाले.
केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर सहनिर्मितीची धुरा ही राजेश मापुसकर सांभाळणार आहेत. तर
या सिरिजची निर्मिती अबंडेंटिया एन्टरटेनमेंट करणार आहे.
एकंदर या प्रोजेक्टविषयी आपले विचार मांडताना राजेश मापुसकर म्हणाले,“ इतिहास मला
मोहिनी घालतो. लगे रहो मुन्नाभाईच्या चित्रिकरणावेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम
पाहताना गांधींजींच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडत होतो. आज 12 वर्षांनी, गांधीहत्येवर वेब
सिरिज बनवण्यासाठी विक्रम मल्होत्राने मला विचारणा केली आणि मी लगेचच होकार
कळवला. यानिमित्ताने दुसरी बाजू समजून घेण्याची संधी मिळाल्याचा मला नक्कीच आनंद
आहे. नाण्याची ही दुसरी बाजू मी योग्यरित्या प्रेक्षकांसमोर मांडू शकेन, अशी आशा आहे.”
व्हेंटिलेटर सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी
ठरलेले राजेश मापुसकर आता डिजीटल विश्वातही पाऊल टाकत आहेत.

 

बुनयावी थामचायवात, करीन केनेल यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय v कारमान कौर थंडी, झील देसाई यांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0

पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारतच्या तिस-या मानंकीत करमान कौर थंडीने सिंगापुरच्या स्टेफनी टान व झील देसाईने मिहिका यादवचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात दुस-या फेरीत तास सत्तावीस मिनिट चाललेल्या सामन्यात थायलंडच्या बिगर मानांकीत बुनयावी थामचायवातने ईस्त्राईलच्या अव्वल मानांकीत डेनिझ खाजान्युक 6-3, 6-1 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. तर स्वित्झरलॅंडच्या बिगर मानांकीत करीन केनेल हीने चायनीज तायपेच्या पाचव्या मानांकीत पी-ची ली चा 7-6(2), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.भारतच्या तिस-या मानंकीत कारमान कौर थंडीने सिंगापुरच्या बिगर मानांकीत स्टेफनी टानचा 6-3, 6-3 केला. तर झील देसाईने मिहिका यादवचा 7-5, 7-5 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

दुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांनी भारताच्या ऋतुजा भोसले व प्रांजला येडलापल्ली या जोडीचा 7-5, 7-5 असा तर ओमानच्या फातमा अल नभानी व करगिझस्थानच्या स्केनीया पालकीना यांनी तुर्कीच्या बेरफु सेंग्झी व स्वित्झरलॅंडच्या करीन केनेल यांचा 0-6, 6-4, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- दुसरी फेरी

बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि डेनिझ खाजान्युक(ईस्त्राईल,1) 6-3, 6-1

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2)  वि.वि ऋतुजा भोसले(भारत) 6-4, 6-4

कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि स्टेफनी टान (सिंगापुर) 6-3, 6-3

वालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) वि.वि साई संहिता चमर्थी (भारत) 6-3, 7-5

करीन केनेल(स्वित्झरलॅंड) वि.वि पीची ली(चायनीज तायपे, 5) 7-6(2), 6-1            

एना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) वि.वि फातमा अल नभानी(ओमान) 6-3, 6-3

तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) वि.वि महक जैन(भारत) 3-6, 6-3,6-1

झील देसाई(भारत) वि.वि मिहिका यादव(भारत) 7-5, 7-5

दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी

पी-ची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) वि.वि ऋतुजा भोसले(भारत)/प्रांजला येडलापल्ली(भारत) 7-5, 7-5

फातमा अल नभानी(ओमान)/ स्केनीया पालकीना(करगिझस्थान) वि.वि बेरफु सेंग्झी(तुर्की)/ करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 0-6, 6-4, 10-7

जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि स्टेफनी टान(सिंगापुर)/ धृती वेणुगोपाल(भारत) 1-6, 6-1, 10-5

झील देसाई(भारत)/ बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि प्रेरणा भांब्री(भारत)/निधी चीलुमुला(भारत) 4-6, 7-5, 10-2

Karman Kaur Thandi

शासकीय महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर

0

पुणे, दि. 8: राज्य शासकीय महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवार दि. 8 नोव्हेंबर, 2017 रोजी “लक्षवेध दिन” पाळला. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व महत्वाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने व्यक्तिगत लक्ष घालून, त्याबाबत संबंधित विभागांचे अभिप्राय प्राधान्याने घेऊन, येत्या “जागतिक महिला दिना” पुर्वी म्हणेज दि. 8 मार्च, 2018 पर्यंत याबाबत निर्णय घ्यावेत, यासाठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गा महिला मंचच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष (महिला) सि.च.सेवतकर, महिला सहसचिव सविता नलावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनातील महिला अधिकाऱ्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंच कार्यरत आहे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन-प्रशासन स्तरावर दखल घेण्यासाठी अधिकारी महासंघाच्या महिला पदाधिकारी व अन्य महिला कर्मचाऱ्यांची अधिकारी महासंघाच्या कार्यालयात बैठक झाली होती. यामध्ये महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत 12 प्रस्ताव संमत करण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत कार्यवाही होण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

यामध्ये बालसंगोपन रजा मंजूरी, वार्षिक वैद्यकीय तपासणी, ग्रॅच्युईटी गणना महागाई भत्ता धरुन करणे, प्रसूती रजेला जोडून बालसंगोपनासाठी घेतलेली असाधारण रजा अर्हताकारी सेवा म्हणून मान्य करणे, ताण व्यवस्थापन बाबत शिबिरांचे शासनस्तरावरुन आयोजन होणे, पाळणा घराची सुविधा शासकीय कार्यालयात तसेच जिल्ह्यातील/तालुक्यांतील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे अशा 12 विषयांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, पुणे जिल्हा समन्वय समितीने दिली.

बिझनेस आयकॉन मानसी किर्लोस्कर यांचे युके पार्लमेंटच्या द हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये भारत-युके व्यापारी संबंध या विषयावर विशेष भाषण

0

पुणे–किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांना युनायटेड किंग्डमच्या (युके) पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृहात नुकतेच विशेष भाषण करण्याची संधी मिळाली. १७ व्या वार्षिक लंडन ग्लोबल कन्व्हेन्शन ऑफ आयओडी (इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स, इंडिया) परिषदेच्या सन्माननीय पाहुण्या या नात्याने त्यांनी भारत-युके ट्रेड रिलेशन्स (भारत-युके व्यापारी संबंध) या विषयावर प्रभावी भाषण दिले.

या परिषदेला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे उद्योग, सरकारी अधिकारी प्रेक्षकांना संबोधित करण्यासाठी या एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

मानसी यांनी आपल्या  भाषणाने या  पाहुण्यांना प्रभावित केले आणि तितकाच जोरदार समारोपही केला. त्या म्हणाल्या, “समारोपादाखल मी म्हणते, की आमच्या दोन्ही राष्ट्रांतील आर्थिक संबंधांच्या भवितव्यात दोन्ही सरकारांची प्रबळ इच्छा हा निश्चितच निर्णायक घटक ठरणार असला तरी या इच्छेचा प्रामाणिकपणा आणि लोकसंबंधांची ताकदच सरकारांच्या निर्धाराला आकार देतील.”

परिणामकारक प्रशासन सुधारण्यासाठी कंपन्या सध्या मुकाबला करत असलेल्या काही सातत्यपूर्ण समस्या व आव्हानांवर चर्चा आणि मंथन करण्यासाठी या परिषदेने अनोखे व्यासपीठ मिळवून दिले.

तरुण आणि चैतन्यशील व्यवसाय नेतृत्व असलेल्या मानसी किर्लोस्कर यांना विविध विषयांवर भाषण देण्यासाठी आतापर्य़ंत अनेक प्रतिष्ठित मंचांकडून आमंत्रण आले आहे. उद्योजक घराण्याच्या एकुलत्या एक वारस म्हणून मानसी किर्लोस्कर यांना पेलावी लागणारी आव्हाने, कुटूंबाच्या व्यवसायाची दीडशे वर्ष जुनी परंपरा पुढे नेण्याबाबत त्यांचा ध्येय दृष्टीकोन, केअरिंग विथ कलर हा त्यांचा सामाजिक विना-नफा नवउद्योग, जपानशी संयुक्त सहयोगातून आणि जपानी पद्धतीने मिळालेल्या कठोर प्रशिक्षणातून शिकलेले धडे आदी विषयांचा त्यात समावेश आहे.

त्यांच्या नव-उद्योगाचे ध्येय शाळांमधील वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे रुप बदलण्याचे असून त्या दिशने पहिला चाचणी प्रकल्प चालू महिन्यात बंगळुरु येथे सुरु होत आहे.

इतकेच नव्हे, तर मानसी यांना गेल्या दोन वर्षांत व्यवसाय व उद्योजकीय स्थापनांमधील उत्कृष्टता व यशाबद्दल प्रतिष्ठित असे व्यवसाय व नेतृत्व पुरस्कार मिळाले आहेत.

मानसी किर्लोस्कर सध्या किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड व टोयोटा त्सुशो इन्शुरन्स ब्रोकर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालक, किर्लोस्कर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या संचालक असून जपानी कंपनीशी सहयोगादरम्यान मिळालेल्या कठोर प्रशिक्षणानंतर तेथे काम करत आहेत. त्यांनी रिअल इस्टेट कंपनी स्थापन करुन नवउद्योजक म्हणून एक मोठा निवासी प्रकल्प पूर्ण करुन दाखवला आहे.

कामाशी कटिबद्धतेबरोबरच मानसी चित्रकलेसाठीही वेळ काढतात. चित्रकला ही त्यांची उत्कट आकांक्षा आहे. त्या प्रशिक्षित अशा खोल-सागर पाणबुड्या असून त्यांना गिरीभ्रमण, प्रवास, तसेच जवळचा मित्रवर्ग व परिवारासमवेत संपर्कात राहायला आवडते.

????????????????????????????????????

नोटाबंदीचा हिशेब द्यावाच लागेल – विश्वंभर चौधरी (व्हिडीओ)

0

पुणे- १२० माणसांच्या मृत्यूचे सिलेब्रेशन करणारे हे सरकार असून या सरकारला नोटाबंदीचा हिशेब जनतेला द्यावाच  लागेल असे आज येथे सामाजीक  कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी सांगितले तर या सरकारने नोटा बंदीच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली आहे .असा आरोप अजित अभ्यंकर यांनी केला आहे .
केंद्र सरकारने जुन्या 1000 व 500 रुपयांच्या नोटारद्दबातल करण्याच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील लक्ष्मीरोडवर नागरिकांनी मानवी साखळी केली. यावेळी नोटबंदीच्या निर्णयाच निषेध करताना मोदी सरकार जवाब दो, अमित शहा जवाब दो असे नारे देण्यात आले.

या साखळीत डॉ. विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे, संदीप बर्वे, अजित अभ्यंकर ,आपचे सुभाष वारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, चंद्रकांत वानखेडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीला आज एक वर्षे पूर्ण होत आहे. नोटबंदी जाहीर केल्यानंतर सामान्य जनतेला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले होते. या काळात रांगेत उभे असताना 120 जणांचा मृत्यू झाला. शेतक-यांना त्यांचा माल कवडीमोल भावाने विकावा लागला, या सर्वाचा निषेध करत नोटबंदीनंतर किती पैसा जमा झाला त्याचा नागरिकांना किती फायदा झाला. किती काळा पैसा उघडकीस आला या विषयी नारे देऊन जवाब मागण्यात आला.याविषयी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी  सांगितले की, शेतक-यांना 3200 रुपये क्विंटलचा सोयाबीन 1400 रुपयांनी घ्यावा लागला. रांगेत उभे राहिलेल्या 120 नागरिकांचा मृत्यू झाला. हातावर पोट भरणा-या मजूरांच्या कुटुंबांना 3 ते 4 दिवस उपाशी जगावे लागले. या सर्व गोष्टींचा मोदी सरकारला जवाब द्यावा लागेल.

नोटाबंदीतून अर्थव्यवस्थेत मंदी आणि स्वायत्त संस्थांचा ऱ्हास पर्वास प्रारंभ : नागरी सभेतील आरोप

0

पुणे :

‘नोटाबंदी निषेध, पुणे’ आयोजित नागरी सभेला मंगळवारी सायंकाळी मोठा प्रतिसाद मिळाला.नोटा बंदीतून अर्थव्यवस्थेत मंदी आली आणि स्वायत्त संस्थांचा ऱ्हास पर्वास प्रारंभ झाला असा आरोप या नागरी सभेत केला गेला.

अर्थतज्ज्ञ अभय टिळक, अॅड. अजित अभ्यंकर, रत्नाकर महाजन, डॉ.विश्वंभर चौधरी या नागरी सभेत सहभागी झाले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.एस एम फाऊंडेशन येथे ही नागरी सभा झाली.

अॅड. असीम सरोदे म्हणाले, १९७८ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा तो प्रक्रिया पार पाडून रिझर्व बँकेने जाहीर केला होता. मोदींनी ही प्रक्रिया पाळली नाही. खोटे दावे करणे ही या सरकारची सवय झाली आहे. नोटा बंदीच्या अर्थ नीतीच्या मागे अनर्थ नीती आहे.

अभय टिळक म्हणाले, ‘काळा पैसा रोखीच्या स्वरूपात ठेवला जात नाही, हे मोदी सरकारला कळले नाही. सुगीच्या वेळेस नोटा बंदी झाल्याने शेतीचे कंबरडे मोडले गेले. नोटा बंदी, जीएसटीने विकासदरावर परिणाम झाला. क्रोनी कॅपिटालायजेशनचा नवा चेहरा दिसू लागला. रिझर्व बँकेच्या स्वायतत्तेचा संकोच झाला, ही ऱ्हास पर्वाची चुणूक आहे.

रत्नाकर महाजन म्हणाले, कोणत्याही आर्थिक निकषावर नोटा बंदीचा निर्णयाचे समर्थन करता येत नाही. उलट दोन हजाराच्या नोटांनी भ्रष्टाचार सोपा झाला. नोटा बंदी हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय आहे. तरी प्रधान प्रचारक आणि प्रचारकांची टोळी अहंगंड सोडायला तयार नाहीत.

अॅड. अजित अभ्यंकर म्हणाले, ‘ नोटा बंदी निर्णय फसला यात शंका नाही. मात्र,काळ्या पैशाची समस्या फक्त पंतप्रधानांच्या हाती देण्याइतकी किरकोळ नाही.जनतेने या बेकायदेशीर उत्पन्नाविरूध्द क्रांतीकारक लढाई केली पाहिजे. बँकांमध्ये आलेला पैसा काळा नाही, हे सरकारलाच सिद्ध करावे लागणार आहे. सोन्याची आयात या वर्षात दुप्पट झाली. सोने कोणी घेतले, बेनामी प्रॉपर्टी कोणी घेतल्या याची श्वेतपत्रिका आणा.म्हणून नोटा बंदी हा कावा होता असे म्हणावे लागते. नोटा मोजायला वेळ का लागला ? खोट्या नोटांची समस्या संपली नाही.बेहिशेबी पैशाच्या समस्येविरुद्ध लढण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘ नोटा बंदीच्या विरोधात सिव्हील सोसायटीच्या माध्यमातून देशभर कार्यक्रम होत आहेत. राजकीय पक्ष एकत्र आले, पुरोगामी संस्था एकत्र आले, हेही महत्वाचे झाले. नोटा बंदीच्या निर्णयानंतर किती ज्वेलर्स वर कारवाई झाली ? काळा पैसा पांढरा होताना कमिशन कोणाकडे गेले ? कोणत्या पक्षाने जमिनी खरेदी केल्या? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. रिझव्र्ह, बँकेने ज्या नोटा वाटल्या त्याची नोंद का ठेवली नाही. नोटा बंदीने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत निघाली. १२० माणसे जाऊनही उर्मटपणाने नोटा बंदीचा वर्धापनदिनाचा उत्सव केला जात आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. लोकशाही कशी चालणार हा प्रश्न आहे.

तुघलक शहाणा वाटावा अशी परिस्थिती आहे. लोकांची नजर आहे, असा जाब विचारला पाहिजे. पंतप्रधानपद हे हिरो गिरीचे पद नाही.जादूगाराचे पद नाही, हे जनतेने सांगीतले पाहिजे.

कार्यक्रमानंतर सेनापती बापट यांच्या पुतळ्यासमोर १२० मेणबत्त्या लावून नोटबंदी रांगांमध्ये मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
नरेश बोडके यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मी ला सप्तर्षी, अभय छाजेड, ९१ वर्षीय कम्युनिस्ट कार्यकर्त्य शांता रानडे, अन्वर राजन, आनंद करंदीकर, अशोक धिवरे, अप्पा अनारसे उपस्थित होते

अच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्यांनी नोटबंदी करून जनतेला काय मिळवून दिले ?

पुणे- वर्ष झाले नोट बंदी अमलात आणून , लोकांनी त्रास सहन केला , १२५ लोक रांगेत मरण पावले , अनेकांना आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी मोठे श्रम घ्यावे लागले, प्रत्येकाला आपले पैसे चोरीचे ,हरमाचे नाही कष्टाचे आहेत हे सांगण्यासाठी झगडावे लागले . सारे सहन करून आता वर्ष झाले  … पण या जनतेच्या पदरात नेमके नोट बंदीने काय पडले ?कोणता फायदा झाला जनतेला ? असा सवाल आज पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी येथे केला .

नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. टिळक रस्त्यावर एसपी कॉलेज ते वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून नोटबंदीचा निषेध नोंदवण्यात आला.पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरूवात नोटबंदीवर आधारित एका पथनाट्य सादरीकरणाने झाली. मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. फलकावर नोटबंदीमुळे जनता त्रस्त सरकार मस्त, नोटबंदीमुळे देश भोगत आहे अश्‍याप्रकारचे फलके दाखवत होते. मोर्चा कै. वसंतदादा पाटील पुतळा येथे आल्यावर नोटबंदीचे वर्षश्राध्द घालण्यात आले.
प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड,नगरसेवक अविनाश बागवे , कमल व्यवहारे, यांचीही भाषणे यावेळी झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, नोटबंदी हा एक आर्थिक भूकंप आहे. या निर्णयानंतर देशात सगळीकडे हाहाकार माजला. दुसऱ्या दिवशी पासून बॅंकांमध्ये पाचशे, हजारच्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांची रांग लागली. गृहिणी नेहमी आपल्या कुटूंबियांच्या भविष्यासाठी घरच्या कपाटामध्ये पैसे जमा करून ठेवतात. या निर्णयामुळे त्यांनासुध्दा आपले दैनंदिन कामकाज सोडून बॅंकेच्या रांगेत उभे रहावे लागले. ज्या कुटूंबामध्ये लग्न समारंभ होते, जे रूग्ण दवाखान्यात दाखल झाले होते त्यांची सुध्दा या निर्णयामुळे गैरसोय झाली. प्रत्येक नागरिकाला या नोटबंदीमुळे नाहक त्रास झाला आहे.
पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेताना असे सांगितले की या नोटबंदीमुळे देशातल्या काही नागरिकांकडे असलेला काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादाला आळा बसेल, भ्रष्टाचार दूर होईल, देशाचा कारभार पारदर्शकपणे होईल. परंतु वस्तूस्थिती वेगळी होती. नोटबंदीमुळे देशाच्या विकासदरामध्ये 2% ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2017 ते एप्रिल 2017 पर्यंत देशात 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत, शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आहे त्यामुळे उद्योगजक व व्यापारी नाराज आहेत. परकिय गुंतवणून सुध्दा घटली आहे आणि दैनंदिन मजूरी करून आपले पोट भरणाऱ्या मजूराला आज काम नाही. या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आर्थिक भुकंपाचे उत्तर देशाच्या जनतेला दिलेच पाहिजे. अर्थमंत्री अरूण जेठली वस्तूस्थितीचा विचार न करता नोटबंदीमुळे देशाची प्रगती झाली आहे असे ठामपणे सांगत आहेत हे हास्यास्पद आहे.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, गोपाळ तिवारी, रशिद शेख, नीता रजपूत, शानी नौशाद,सतीश पवार , पवार ,बुवा नलावडे, जयसिंगराव भोसले ,नगरसेवक रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, दत्तात्रय गायकवाड, जॉन पॉल, अनिल सोंडकर, विरेंद्र किराड, शेखर कपोते, सरचिटणीस रमेश अय्यर, काका धर्मावत, डॉ. सतिश देसाई,आबा बागुल , संजय बालगुडे ,सदानंद  शेट्टी,महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, सेवादलाचे रविंद्र म्हसकर, एन.एस.यु.आय. अध्यक्ष भुषण रानभरे, मिलिंद काची, मुकारी अलगुडे, नुरूद्दीन सोमजी, साहिल केदारी आदींसह कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा नोटबंदी निर्णय निषेध मोर्चा

0
पुणे :
दिनांक ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी ला आज बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे.  सरकारच्या या चुकीच्या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची खूप गैरसोय झाली असून, देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे  यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे संयोजन शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
या मोर्चामध्ये जालिंदर कामठे, संजोग वाघिरे, जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, अंकुश काकडे, चेतन तुपे, विश्वास देवकाते, रमेश थोरात, दीपक मानकर, प्रशांत जगताप, चंचला कोद्रे, वैशाली बनकर, नंदा लोणकर, रुपाली चाकणकर, राकेश कामठे, मनाली भिलारे, पंडित कांबळे, अशोक राठी, राजलक्ष्मी भोसले, कमल ढोले-पाटील, बापू पठारे, काका चव्हाण,  दत्तात्रय भरणे,  विलास लांडे, श्रीकांत पाटील, योगेश बहल, शशिकांत तापकिर, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर, स्वप्नील खडके, विवेक वळसे, अर्चना घारे, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी, आजी-माजी आमदार व महापौर, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.  
‘किमया चहाच्या किटलीची, हौस फिटली ‘अच्छे दिन’ची’, ‘अच्छे दिन का हो गया प्रचार, कौन सहेगा अत्याचार !’, ‘सबका साथ, सबका विकास,  उद्योगधंदे साफ, रोजगार भकास !’, ‘अन्न झाले महाग, मरण झाले स्वस्त, भाजपा सरकार झाले मदमस्त !’ अशा घोषणा मोर्चात देण्यात आल्या.
‘नोटबंदी निर्णयानंतरच्या अनियोजित अंमलबजावणीमुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली असून सामान्य नागरिकांना याचा अधिक त्रास झाला . आर्थिक आणीबाणीमुळे सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले .
मोर्चास सकाळी १०. ३० वाजता महात्मा फुले मंडई येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून मोर्च्यास सुरुवात झाली. नेहरू चौक,  बोहरी आळी, सोन्यामारुती चौक, दारूवालापूल, नरपतगिरी चौक अशा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष, खा. वंदना चव्हाण यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना केंद्र सरकार साठी तयार करण्यात आलेले निवेदन सादर केले. निवेदन सादर करताना आमदार जयदेव गायकवाड, राजलक्ष्मी भोसले, रमेश थोरात, रवींद्र माळवदकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘अर्थकारणाविषयीचे अज्ञान, भारतीय समाज विषयाचे अज्ञान आणि मनाला आला तो निर्णय घेण्याची प्रवृत्ती यातूनच नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. काळा पैसा बाहेर येण्यासाठी जनतेची दिशाभूल केली. नागरिकांचा नोटा बदलताना रांगेत मृत्यू झाला. विकासदर दोन टक्क्यांनी घटला. रोजगार बुडाले. सर्व नोटा चलनात परत आल्यामुळे काळा पैसा येण्याची घोषणा हवेत विरल्या. दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. काळा पैसावाले मजेत फिरत आहेत. मग काय मिळविले हा निर्णय घेऊन?  असा आमचा प्रश्न आहे.’, असे या निवेदनात नमूद केले आहे.

 

‘दशक्रिया’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल!

0

-दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील

कल्पना विलास कोठारी यांच्या रंगनील क्रिएशन्स निर्मित ‘दशक्रिया’ या चित्रपटाद्वारे नव्या दमाचे दिग्दर्शक संदीप पाटील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दशक्रिया हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्तानं संदीप पाटील यांच्याशी साधलेला संवाद

दशक्रिया हा चित्रपट करण्यापूर्वी तुम्हाला चित्रपट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव काय होता? दशक्रिया हाच चित्रपट का करावासा वाटला?

– चित्रपटसृष्टीत मी बरीच वर्षे कार्यरत आहे. गजेंद्र अहिरे यांच्यासह नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटापासून बऱ्याच चित्रपटांना सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. चित्रपटात अभिनयही केला. त्याशिवाय रूईया कॉलेजमधून मी नाट्यक्षेत्रातही काम करत होतो.  हेमंत प्रभू यांच्यासह मालिका केल्या. कळत नकळत या मालिकेसाठी एपिसोड दिग्दर्शक म्हणून काम केलं. अनेक जाहिरातींसाठीही काम केलं. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करावे या हेतूने मी आणि माझे मित्र राम कोंडीलकर यांनी एका चित्रपट कंपनीची स्थापना करून वेगळ्या चित्रपट निर्मितीसाठी दर्जेदार कथांच्या शोधात होतो. चित्रपटासाठी विषय शोधत असतानाच साहित्यिक बाबा भांड यांची दशक्रिया ही कादंबरी आमच्या वाचनात आली आणि आपला पहिला चित्रपट ह्याच कादंबरीवर करायचा हे निश्चित झाले. जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड आणि त्याच्या मृत्यूनंतरही होणारं मृत्यूचं व्यापारीकरण याचा उहापोह यात आहे. मला हा विषय अत्यंत महत्त्वाचा, प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा घटक वाटला आणि याच कादंबरीवर पहिला चित्रपट करायचं ठरवलं.

या चित्रपटासाठी चार वर्षं का लागली?

– २०१३ मध्ये दशक्रिया ही कादंबरी वाचल्यावर त्यातलं वास्तव डोळ्यापुढे यायला लागलं. मात्र, कादंबरीवर चित्रपट करण्यासाठी तितकीच दमदार पटकथा असणं आवश्यक होतं. संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे साहित्यकृतीवर चित्रपट करण्याचा मोठा अनुभव होता. पटकथा करण्यासाठी त्यांना राम कोंडीलकर आणि मी विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे वेळ नव्हता. मला त्यांनीच काम करायला हवं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी जवळपास एक वर्ष थांबलो. त्यानंतर पटकथेचे जवळपास आठ-नऊ खर्डे झाले. बाबा भांड यांच्याशी चर्चा करून पटकथेला अंतिम आकार दिला. त्यानंतर कलाकार निवड, त्यांच्या तारखा, चित्रपटाचं शेड्यूलिंग हे सगळं होईपर्यंत चार वर्षं गेली. कलाकार निवडीतली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कथेचा नायक भानुदास हा छोटा मुलगा आहे. आम्हाला यापूर्वी कोणत्याही चित्रपटात काम न केलेला मुलगा हवा होता. त्यासाठी आम्ही जवळपास दीडशे मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि आर्या आढाव या मुलाची निवड झाली.

चित्रपटासाठी बाबा भांड यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला? पटकथा लेखनासाठी संजय कृष्णाजी पाटील यांच नाव कसं पुढे आलं?

– कादंबरी वाचल्यानंतर चित्रपट करण्यासाठीच्या परवानगीसाठी राम कोंडिलकर यांच्यासह मी बाबांना भेटलो होतो. त्यावेळी चित्रपटाचे हक्क दुसऱ्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. हक्क देऊन १२ वर्षं झाली, तरी त्याचा चित्रपट होत नव्हता. मात्र, बाबांच्या पत्नी आशाताई यांनी आमची धडपड पाहून बाबांना आम्हाला संधी देण्याविषयी सांगितलं आणि एके दिवशी अचानक बाबांचा हक्क देत असल्याचा फोन आला. आमच्यासाठी तो सुखद धक्का होता. त्यानंतर आम्ही जोमानं कामाला लागलो. दशक्रियावर चित्रपट कसा करता येईल, याचा एक आराखडा आम्ही बाबांना सांगितला होता. तो त्यांना पसंत पडला होता. आता आम्हाला सकस पटकथा हवी होती. त्यासाठी संजय पाटील हेच योग्य नाव होतं. संजय पाटील यांच्याकडे साहित्यकृतींवर आधारित चित्रपट लिहिण्याचा मोठा अनुभव आहे. साहित्यकृतींवर बेतलेले जोगवा, पांगिरा, ७२ मैल असे उत्तम चित्रपट त्यांनी लिहिले आहेत. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही वर्षापूर्वी राम आणि मी व्हॅनिला कबड्डी हा चित्रपट करत होतो. तो दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. त्याच्या मराठी रूपांतराचं काम आम्ही संजय पाटील यांच्याकडे सोपवलं होतं. त्या चित्रपटच दिग्दर्शन करणार होतो. मात्र, काही कारणानं तो चित्रपट झाला नाही. त्या चित्रपटादरम्यान आमचे छान सूर जुळले होते. स्वाभाविकच, दशक्रियाच्या पटकथेसाठी संजय पाटील यांच्याशिवाय हा चित्रपट होऊ शकला नसता.

दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करताना काय आव्हान होतं?

– दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करणं हे मोठं आव्हान असतं. कारण, निर्माता मिळत नाही. त्यात आम्ही निवडला दशक्रियासारखा विषय… त्यामुळे अनेक निर्मात्यांना भेटूनही कुणी तयार होईना. अशात संजय पाटीलच आमच्या मदतीला आले. त्यांनी आमची भेट रंगनील क्रिएशन्सच्या कल्पना विलास कोठारी यांच्याशी घालून दिली. त्यांनी पटकथा ऐकली आणि लगेचच होकार दिला. दशक्रिया ही कादंबरी महत्त्वाची; मात्र, चित्रपट करण्यासाठी अवघड आहे. त्याचा पट मोठा आहे, अनेक व्यक्तिरेखा आहेत. हे सगळं जमवून आणणं नक्कीच आव्हानात्मक होतं.

एवढ्या मोठ्या टीमला कसं काय हाताळलंत?

–   दिग्दर्शक म्हणून दशक्रिया माझा पहिला चित्रपट असला, तरी मी या क्षेत्रात नवीन नाही. मात्र, पहिला चित्रपट करताना उत्तम टीम असावी, यावर माझा भर होता. चित्रपटाचं आम्ही स्टोरी बोर्डिंग करून घेतलं होतं. अनिल जाधव यांनी हे काम केलं. त्यामुळे चित्रपट कसा होईल, याचं चित्र स्पष्ट झालं. चांगल्या पटकथेला चांगल्या पद्धतीनं सादर करण्यासाठी चांगला सिनेमॅटोग्राफर असावा लागतो. बऱ्याच सिनेमॅटोग्राफर्समधून महेश अणे यांचं नाव निश्चित झालं. त्यांनीही चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली. तसंच चंद्रशेखर मोरे यांच्यासारखा अनुभवी प्रॉडक्शन डिझायनर सोबत असल्यानं आमचं काम सोपं झालं. तसंच दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, मिलिंद फाटक, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही सोबत होते.

पहिल्याच चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याविषयी काय सांगाल?

– चित्रपट करताना मनात कसलाच विचार नव्हता. आपल्याला उत्तम चित्रपट करायचा आहे, हे स्वप्न होतं. राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार असतो. तो माझ्या पहिल्याच चित्रपटाला मिळणं ही अत्यंत आनंददायी घटना आहे. या पुरस्कारानं मला नक्कीच प्रोत्साहन मिळालं आहे. आमच्या चित्रपटाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, कान महोत्सवासाठी चित्रपटाची निवड झाली, हे सगळं पहिल्या चित्रपटाच्या बाबतीत घडल्यानं विशेष आनंद झाला.

दशक्रिया हा चित्रपट प्रेक्षक कशा पद्धतीनं स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं ?

– दशक्रिया हा चित्रपट प्रेक्षक स्वीकारतील, याची मला खात्री आहे. कारण, मराठी प्रेक्षक सुजाण आहे. चांगल्या कथानकाला प्रेक्षकांनी कायमच स्वीकारलं आहे. त्याशिवाय २१व्या शतकात व्यापारीकरण किती खोलवर रूजलं आहे, याचं चित्रण हा चित्रपट करतो. एक सकस, विचार मांडणारं आणि मनोरंजक असं हे कथानक आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.

निर्मात्या कल्पना कोठारी यांचं सहकार्य कसं होतं?

– कल्पना कोठारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी मला कायमच सहकार्य केलं. पहिली निर्मिती करताना सरधोपट चित्रपटापेक्षा दशक्रियासारख्या चित्रपटाची निवड करणं, ही नक्कीच जोखीम होती. ती त्यांनी स्वीकारली. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आम्हाला चित्रीकरणासाठी नदीला पाणी असलेला घाट मिळत नव्हता. जवळपास चार महिने आम्ही घाट शोधत होतो. तो आम्हाला गारगोटीसारख्या ग्रामीण भागात मिळाला. चित्रीकरणावेळी एकदा पावसामुळे एक शेड्यूल रद्द करावं लागलं होतं. या सगळ्यात त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्यासह सर्व कलाकारांनी कायमच सहकार्य केलं. या सर्वांच्या पाठबळावरच दशक्रिया हा चित्रपट घडला.

कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये विद्यार्थी दिन साजरा

0

पुणे- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगतासाठी एक आदर्श असे  उच्चविद्याविभूषित विद्यार्थी व व्यक्तिमत्व होते, त्यांनी खडतर शिक्षणप्रवासातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवत त्यांच्यासारखेच विद्यार्जन करुन नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांनी संस्थेमार्फत साजऱ्या करण्यात आलेल्या विध्यार्थी दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.

महाराष्ट्र सरकारद्वारे यावर्षीपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम केलेल्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेबांचा  शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले होते त्यानिमित्ताने आज संस्थेमध्ये समाजकार्याचे विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थित हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ महेश ठाकूर हे होते तर प्रा. शर्मिला सहदेव व प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजकार्य प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रवीण गुंजाळ, दिपाली पवार, रोहित धायरकर, अजित मिसाळ व आकाश सावळकर यांनी मनोगते व्यक्त केली.

डॉ महेश ठाकूर, प्रा. शर्मिला सहदेव व प्रा. चेतन दिवाण यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मक़्बुल देशिंग यांनी केले तर आभार अभिजित काकडे यांनी मानले.