पुणे- भारतीय जनता पार्टी चे पालिकेत ९८ नगरसेवक आहेत ,त्यांचे बहुमत आहे .. हे सारे खरे आहे . पण याच महापालिकेत सत्ताधारीच ओरडत आहेत कि प्रशासन ऐकत नाही .. आणि यंदाच्या अर्थसंकल्पाची ही वाट लागली आहे . सारखे वर्गीकरण , रखडलेली विकास कामे , निविदा( टेंडर ) निघण्यावर होणारे वादंग या मध्ये महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे कि काय ? असे वाटण्या जोगी परिस्थिती आहे .इथून नौकरी उपलब्ध होणे तर सोडाच पण आज पर्यंत च्या सत्ता कालावधीत शिक्षण मंडळ तसेच पालिका सुरक्षा रक्षा विभागातील अनेकांच्या रोजीरोटी वर गदा जोरदार पणे आपटली आहे .
एकीकडे स्थायी समिती अध्यक्ष हवालदिल झाल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत सभा तहकूब केली तर दुसरीकडे महिला बालकल्याण समितीने देखील हीच री ओढली . महापौरांचे तर मुख्य सभेतील नुसते आदेशच ऐकायचे आणि मिडिया ने त्यास प्रसिद्धी द्यायची .. यावर विषय थांबतात प्रत्यक्षात मात्र हि सारी बनवाबनवी असल्याचेच नंतर निष्पन्न होत आले आहे .
हे सारे आदेश , आश्वासने, घोषणा आजपर्यंत तरी ‘बनवाबनवी ‘चा खेळ ठरले आहेत . चालू अर्थसंकल्पावर देखील बोलण्यासारखे काही उरलेले नाही .
आता प्रश्न हा आहे कि नेमके महापालिका चालवतंया तरी कोण ?कुणाल कुमार ऐकत नाही, तुकाराम मुंडे ऐकत नाही ..अधिकारी उडवून लावतात … काय आहे खरा प्रकार . सत्ताधारी भाजपला महापालिका चालविता येत नाही कि आणखी काय या मागे दडले आहे ? गणेशोत्सवासाठी केलेली 2 कोटी ची तरतूद नेमकी कुठे जिरवीण्यात आली ? बोगस कर्मचाऱ्याचा पाठीराखा कोण होता ?सीएसआर घोटाळ्याचा अहवाल का दडपून ठेवण्यात येतो आहे ? का यावर कोणी सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाष्य करीत नाही ?मोठ्ठे गौडबंगाल आहे असे वाटावे असा कारभार नेमके कोण हाकीत आहे .
महापालिकेतील नगरसेवक हतबल असताना सर्वच नाही पण काही पदाधिकारी राजकारण करीत आहेत काय ? असा संशय यावा असा प्रकार येथे जाणवतो आहे .नेमके कोण कोणाला बनवीत आहे ? कोणी कोणी कोण कोणत्या खात्यात बोगस कर्मचारी नेमून आपापली तुंबडी भरण्याचे काम सुरु ठेवले आहे … याबाबत आता निव्वळ दबक्या आवाजात चर्चा होते आहे … पण दिवस नक्कीच बदलतात .. आज ना उद्या जुन्या जाणत्या गप्प राहिलेल्या नगरसेवकांना पालवी फुटेल …या सर्व गोष्टीचा पर्दाफाश होईल या आशेवर प्रामाणिक पुणेकरांनी राहायला हरकत नाही .
महापालिकेत नेमकी सत्ता कुणाची ?
Date: