Home Blog Page 3230

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत अॅटॉस्‌, सायबेज, सिमेंस संघांची आगेकुच

0

पुणे,– आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत अॅटॉस्‌, सायबेज व सिमेंस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चिन्मय मालवणकरच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अॅटॉस्‌ संघाने आय-प्लेस संघाचा 74 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅटॉस्‌ संघाने 20 षटकात 6 बाद 188 धावा केल्या. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हर्षद तिडके, शौर्य शर्मा व वैभव पेडणेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे आय-प्लेस संघ केवळ 16.5 षटकात सर्वबाद 114 धावांत गोरद झाला. हर्षद तिडकेने 31 धावात 3 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. चिन्मय मालवणकर सामनावीर ठरला. 

दुस-या सामन्यात प्रतीक पंडीतच्या अफलातून दोलंदाजीच्या जोरावर सायबेज संघाने टॅलेंटीका संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहूल पांडे, निखिल गिराडे व प्रतीक पंडीत यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीका संघ केवळ 18.4 षटकात सर्वबेद 89 धावांत दारद झाला. 89 धावांचे लक्ष आदित्य सोनीच्या नाबाद 27 व सौरभ रावळच्या 37 धावांसह सायबेज संघाने अवघ्या 11.2 षटकात 1 गडी गमावत 90 धावा करून सहज पुर्ण केले. प्रतीक पंडीत सामनावीर ठरला. 

तिस-या लढतीत राहूल गायकवाडच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सिमेंस संघाने विप्रो संघाचा 7 गडी राखून पराभव केला. विप्रो संघाने विशाल हिरगुडेच्या 45 धावांसह 20 षटकात 9 बाद 130 धावा केल्या. सिमेंस संघाकडून राहूल गायकवाडने 3 तर लतीश जामदार व संजय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 130 धावांचे लक्ष विशाल रैनाच्या नाबाद 46 धावांसह सिमेंस संघाने 18 षटकात 3 बाद 131 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. राहूल गायकवाड सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

अॅटॉस्‌- 20 षटकात 6 बाद 188 धावा(चिन्मय मालवणकर नाबाद 57, वैभव पेडणेकर 22, निखिल पाटील 24, महेश भोसले 30, विघ्नेश मोहन नाबाद 23, आकाश कनोजीया 2-32, झिशान अन्सारी 2-27) वि.वि आय-प्लेस- 16.5 षटकात सर्वबाद 114 धावा(श्रिकांत शेवाळे 23, आकाश कनोजीया नाबाद 21, हर्षद तिडके 3-31, शौर्य शर्मा 2-6, वैभव पेडणेकर 2-16) सामनावीर- चिन्मय मालवणकर  

अॅटॉस्‌ संघाने 74 धावांनी सामना जिंकला. 

टॅलेंटीका- 18.4 षटकात सर्वबेद 89 धावा(वसीफ काझमी 21, राहूल कुलकर्णी 31, राहूल पांडे 2-13, निखिल गिराडे 2-12, प्रतीक पंडीत 3-13) पराभूत वि सायबेज- 11.2 षटकात 1 बाद 90 धावा(आदित्य सोनी नाबाद 27, सौरभ रावळ 37) सामनावीर- प्रतीक पंडीत

सायबेज संघाने 9 गडी राखून सामना जिंकला. 

विप्रो- 20 षटकात 9 बाद 130 धावा(रवीकिरण बायड 21, विशाल हिरगुडे 45, राहूल गायकवाड 3-17, लतीश जामदार 2-27, संजय पाटील 2-27) पराभूत वी सिमेंस- 18 षटकात 3 बाद 131 धावा(तुषार अत्तर्डे 21, अतूल पवार 39, विशाल रैना नाबाद 46, अरविंद वर्मा 2-15) सामनावीर- राहूल गायकवाड 

सिमेंस संघाने 7 गडी राखून सामना जिंकला. 

पुण्याच्या आरुष फायर सिस्टिम्स ला फास्टेस्ट ग्रोविंग कंपनीचा सन्मान.

0
पुणे  :  पुणे स्थित सुरक्षा उपकरणांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरुष फायर सिस्टिम्स कंपनीला  ऑल इंडिया  अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ‘फास्टेस्ट ग्रोविंग  इंडियन कंपनी एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्काराने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कंपनीच्या वतीने संस्थापक अर्जुन जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला.  याशिवाय आरुष फायर सिस्टिम्सचे युवा संचालक  राहुल जाधव यांनाही  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते  ‘इंडियन लिडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट’  या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात देशातील विविध राज्यांमधून  आलेले अनेकविध उद्योग क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ‘राष्ट्रीय आर्थिक विकास आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन  करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व तामिळनाडूचे माजी राज्यपाल डॉ. भीष्म नरेन सिंग,  सिक्कीमचे माजी राज्यपाल बी. पी. सिंग,  निवृत्त मेजर वेद प्रकाश,ऑल इंडिया  अचिव्हर्स फाऊंडेशनचे महासचिव  के.व्ही. सिंग  यांच्यासह इतर मान्यवर उपिस्थत होते.
हा पुरस्कार मिळाल्याने औद्योगिक  सुरक्षा क्षेत्रात आम्ही करीत असलेले काम योग्य पद्धतीने होत असल्याची जणू पोचपावतीच म्हणावी लागेल, असे सांगत यापुढेही अशाचप्रकारे कामाची वाटचाल आणखी वेगाने करणार असल्याचा विश्वास आरुष फायर सिस्टिम्सचे संचालक  राहुल जाधव यांनी व्यक्त केला.

अमिन झाकीर कुरेशी विशेष नैपुण्य व प्रामाणिकपणाबद्दल ” बेस्ट कँडेटस ” ने सन्मानित

0

पुणे-राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयाच्यावतीने सेंट व्हिन्सेंट शाळेमधील विद्यार्थी अमिन झाकीर कुरेशी यांना विशेष नैपुण्य व प्रामाणिकपणाबद्दल ” बेस्ट कॅडेटस ” ने सन्मानित करण्यात आले . राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर सुनिल बोधे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले .

सेनापती बापट रोडवरील  सिम्बायोसीसजवळील राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला . अमिन झाकीर कुरेशी हा सेंट व्हिन्सेंट शाळेमध्ये नववीमध्ये शिकत आहे . त्याला खेळाची देखील आवड असून तो फुटबॉल खेळाडू देखील आहे . अमिनला देशसेवेसाठी काम करायचे असून त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आय. ए. एस. ऑफिसर्स म्हणून काम करायचे आहे .

अमिन झाकीर कुरेशी यांना सेंट व्हिन्सेंट शाळेचे प्रिन्सिपल फादर पाटेकर व राष्ट्रीय छात्र सेनाचे अधिकारी व ट व्हिन्सेंट शाळेचे क्रीडा शिक्षक अविनाश देवणे आदी मान्यवर उपस्थित होते . सामाजिक कार्यकर्ते झाकीर कुरेशी यांचा तो मुलगा आहे .

मला गर्व आहे कि मला आज  ” बेस्ट कॅडेटस ” ने सन्मानित करण्यात आले . हे सर्व आई वडिल व शिक्षकांचे श्रेय आहे . पुढे एन. सी सी. साठी काम करणार आहे .भारत देशाच्या विकासासाठी आपण कार्य करणार असल्याचे  अमिन झाकीर कुरेशी यांनी सांगितले .

सव्वालाख थकबाकीदारांची वीज खंडित

0

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीदारांविरोधात महावितरणने सुरु केलेल्या धडक मोहिमेत गेल्या महिन्याभरात पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 1 लाख 14 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा 69 कोटी 20 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

थकबाकीदार वीजग्राहकांविरुद्ध सुरु असलेली ‘शून्य थकबाकी’ मोहीम या महिन्यातही सुरुच राहणार असून येत्या 10 दिवसांत आणखी तीव्रपणे राबविण्यात येणार आहे. वारंवार आवाहन करूनही तसेच दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने नोव्हेंबरमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरोधात ‘शून्य थकबाकी’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या महिन्याभरात पुणे शहरातील 66098 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा 28 कोटी 34 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर पिंपरी चिंचवड शहरातील 16,882 थकबाकीदारांचा 14 कोटी 15 लाख तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 31,879 ग्राहकांचा 26 कोटी 71 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून थकबाकीदारांना वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यापूर्वींच थकीत बिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. थकबाकीमुळे तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे घरबसल्या वीजबिल भरण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

कुरेशी समाजाचा राज्यस्तरीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

0

पुणे-जमेतुल कुरेश पुणे शहरच्यावतीने कुरेशी समाजाचा राज्यस्तरीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प भागातील सेंटर स्ट्रीटवरील कुरेशी नगरमध्ये हा १६ वा  सामुदायिक विवाह सोहळा झाला . मौलाना हाफिज गुलाम अहमद , हाफिज मुबरशीर कुरेशी , हाफिज इद्रिस , हाफिज इत्तेशाह , मौलाना नियाज अहमद आदींनी हा सामुदायिक विवाह सोहळा लावला .

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक विनोद मथुरावाला , माजी आमदार मिलिंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन ऑल इंडिया जमेतुल कुरेशी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक इसाक कुरेशी , पुणे शहराध्यक्ष अनिस अहमद कुरेशी , पुणे कॅम्प अध्यक्ष  अबरार कुरेशी , एजाज कुरेशी , ऍड . शकील कुरेशी , खजिनदार अरिफ बशीर कुरेशी , सरफराज कुरेशी , मोहम्मदअली अब्बास कुरेशी , मोहम्मदसाहब मुश्ताक कुरेशी , अजीम गुडाकूवाला , हसन अब्बास कुरेशी , अबू अब्बास कुरेशी , रफिक अब्बास कुरेशी , हाजी युसूफ कुरेशी आदींनी केले होते .

सीएम च काय पीएम पुढे देखील गाऱ्हाणी मांडू शकता – मंत्री बापट यांचा टोला (व्हिडीओ)

0

पुणे : भाजप नगरसेवकांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार .. या खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे जुने जाणते नेते,आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी ,कोणीही… मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधानांच्या कानावरही गाऱ्हाणी घालू शकतो.. असे सांगत  , आमच्या पक्षात लोकशाही आहे, तुम्हालाही काही गाऱ्हाणी घालायची असतील तर ती घालू शकता असे उत्तर आज महापालिकेत पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना दिले .

खासदार संजय काकडे यांनी ,महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचा इशारा देताच ,  त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज आपली पावले महापालिकेकडे वळविली. खासदार काकडे यांनी आपल्याकडे नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर ,महापालिका आयुक्त आणि एकंदरीत कारभाराबाबत नगरसेवकांची गाऱ्हाणी असल्याचे म्हटले होते . आणि …तर मला महापालिकेत लक्ष घालावे लागेल असा इशारा जाहीरपणे दिला होता .यानंतर आपण महापालिकेत जातो आहे ,या दृष्टीने येणाऱ्या प्रश्नांचा सामोरा करण्याच्या तयारीनेच आज बापट पालिकेत आले.प्रथम त्यांनी उपमहापौर यांच्या कार्यालयात धावती भेट दिली . त्यानंतर पालिकेतील भाजपच्या पक्ष कार्यालयात ते गेले. बापट येणार म्हणून काकडे यांचे समर्थक पावणेपाच पासूनच इथे हजर होते . बापट आणि काकडे अशा दोहोंच्या समर्थकांची इथे गर्दी होती . मात्र यावेळी कोणत्याही नगरसेवकाने बापट यांच्यापुढे गाऱ्हाणी सांगितली नाही .बापट यांनीच आपण तुमच्या कामावर समाधानी असल्याचे सांगत ,आपण नगरसेवक असताना काय पद्धती होती हे सांगितले आणि दोन कार्यक्रम एकत्रित रित्या आता स्थायी समिती सभागृहात होणार आहे. त्यासाठी आल्याचे स्पष्ट करीत यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे यावेळी नगरसेवकांपुढे सांगितले.

 “विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे पुढील तीन आठवडे वेळ मिळणार नाही; म्हणून आलो  असे सांगायलाही बापट विसरले नाहीत.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पहा आणि ऐका बापट काय म्हणाले …

थॉमस कुक इंडियातर्फे पुण्याच्या लहान पण उच्च क्षमतेच्या कॅचमेंट एरियातील जोमदार विकासावर लक्ष केंद्रीत

0

मुंबई : थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड, या भाराततील  प्रवास आणि प्रवासासंबंधित वित्तीय सेवा देणाऱ्या आघाडीच्या कंपनीने, पुण्यात आपली उपस्थिती अधिक बळकट करण्यासाठी, दोन नव्या फ्रँचाइजी “गोल्ड सर्कल पार्टनर”ला सुरुवात केली आहे, विमान नगर आणि कोथरुड येथील फ्रँचाइजींचे थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडच्या लेझर ट्रॅव्हलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. रोमील पंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे थॉमस कुक इंडियाच्या वितरणात वाढ होणार आहे आणि पुण्यातील 6 ग्राहक केंद्रांपर्यंत पोहोच वाढणार आहे : यात 2 स्वमालकीच्या शाखा आणि 4 गोल्ड सर्कल पार्टनर (फ्रँचाइजी) आउटलेटचा समावेश आहे.

थॉमस कुक इंडियाच्या माहितीत, पुण्यातील उच्चतम क्षमता असेलल्या स्रोत बाजारांसह लहान कॅचमेंट एरिया सहलींच्या व्यवसायासाठी अधोरेखित करण्यात आला आहे. संधी घेण्यासाठी कंपनीने विमाननगर आणि कोथरूड येथे गोल्ड सर्कल पार्टनर फ्रँचाइजी आउटलेट सादर करण्यात/निवडण्यात आले आहेत.

थॉमस कुक गोल्ड सर्कल पार्टनर उपक्रम हा विशेष फ्रँचाइजी पार्टनर उपक्रम असून, देशभरातील ब्रँडची उपस्थिती वाढावी, यासाठी सादर करण्यात आलेला आहे, यामुळे कंपनीची उत्पादने आणि सेवा प्रमुख शहरे/निमशहरांतील ग्राहकांपर्यंत पोचवता येणार आहेत आणि द्वितीय व तृतीय श्रेणीतील बाजारपेठांमध्येही त्याचा विस्तार करता येणार आहे. गोल्ड सर्कल पार्टनरचे लाभ. भारतातील अग्रणीच्या प्रवासी कंपनीबरोबर संलग्नित राहिल्याने मिळणार आहेत, याबरोबरच पर्यटन व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांकडून अनुभवांची देवाण-घेणाण करता येणार आहे, व प्रशिक्षणही मिळणार आहे. याशिवाय गोल्ड सर्कल पार्टनरला विक्री आणि मार्केटिंग पाठिंबाही मिळत आहे, यामुळे नवीन व्यवसायाचा विकास आणि संपादन व जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शक्य होणार आहे.

विमाननगर आणि कोथरूडमधील नवीन गोल्ड सर्कल पार्टनर आउटलेट ग्राहकांसाठी पर्यटनाच्या उपाययोजना सादर करते, यामध्ये पर्यटनाचे विविध पर्याय आणि पर्यटनाशी संबंधित वित्तीय सेवा पुढील प्रमाणे आहेत:

  • आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सहली (ग्रूप प्रवास, एफआयटी वैयक्तिक सहली, क्रूज, रेल…)
  • प्रवास विमा
  • परकीय चलन, प्री-पेड फोरेक्स कार्ड, रेमिटन्स सेवा

अस्वच्छता व प्रदूषणाबाबत मोहिमेसाठी गणेशमंडळांनी पुढाकार घ्यावा डॉ.पी.डी.पाटील

0
१२५ वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान सोहळा
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह
पुणे : गणेशोत्सव हा प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करणारा सण आहे. समाजासाठी प्रेमाने आणि मनाने मंडळांचे कार्यकर्ते पुणेकरांना अभिमान वाटेल असे काम वर्षभर करीत असतात. सेवा, कर्तव्य, त्याग या भावनेने काम करुन समाजापासून आलेला पैसा समाजिक कार्यासाठी मंडळे देत आहेत. अस्वच्छता आणि प्रदूषण या प्रश्नांबाबत मंडळांनी काम करायला हवे. तरच ती लोकचळवळ होऊन मोठी समस्या दूर होईल, असे मत डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात १२५ वर्षे गणेशोत्सवाची कार्यकर्त्यांवरील विश्वासाची या कार्यक्रमांतर्गत १२५ वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळे व विधायक कार्य करणा-या ढोल-ताशा पथकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, अशोक गोडसे, चंद्रशेखर कपोते, समीर गांधी, शशांक पाटील, उमेश काची, प्रशांत वेलणकर, सुरेश पवार आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, उपरणे, पुस्तक देऊन मंडळांचा गौरव करण्यात आला.
अरुण खोरे म्हणाले, सध्या इतिहासाची मोडतोड आणि विद्रुपीकरण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, लोकांसमोर योग्य इतिहास जायला हवा. त्यामुळे गणेशोत्सवाचा १२५ वर्षांचा इतिहास नव्या पिढीला समजण्याकरीता १२५  वर्षे पूर्ण झालेल्या मंडळांनी आपापल्या मंडळांच्या इतिहासावर काम करायला हवे. त्यामुळे त्यापद्धतीने कार्यकर्त्यांनी त्वरीत जोमाने कामाला लागायला हवे.
अशोक गोडसे म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयार झालेले कार्यकर्ते देशाच्या राजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार, खासदार, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांना वेळोवेळी अनेकदा अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करीत सजावटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी नेहमीच सामाजिक प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे उत्सवाची वाटचाल मंडळापुरती मर्यादित न राहता लोकाभिमुख झाली.
मोहन जोशी म्हणाले, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या चळवळीला पुण्यातून सुरुवात झाली. हळूहळू या उत्सवाला विधायक वळण आले. मंडळाचे कार्यकर्ते केवळ उत्सवातील १० दिवस नाही, तर वर्षभर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. भोला वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता तिवारी यांनी आभार मानले.
* १२५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळांचा सन्मान 
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, हत्ती गणपती मंडळ, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ, अखिल गणेशपेठ पांगुळआळी गणेशोत्सव मंडळ, शनिवार वीर मारुती मंडळ, नागनाथ पार गणपती मंडळ, शनिपार गणेशोत्सव मंडळ, अखिल बढाई समाज गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी आपला सन्मान स्विकारला. याशिवाय शिवगर्जना, नादब्रह्म, रमणबाग, रणवाद्य, गजर या ढोल-ताशा पथकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शहजाद पुनावाला सुर्याजी पिसाळची औलाद-अजित दरेकर आणि रमेश अय्यर यांची टीका

0

पुणे-शहजाद पुनावाला या व्यक्तीला त्याच्या घराच्या आसपासही कुणी ओळखत नाही. पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आजपर्यंत पक्षाच्या कामासाठी ते कधीही फिरकले नाहीत, दिल्लीत चमचेगिरी करून करून ते आपले स्वतःचे महत्व वाढविण्याचे काम करत होते. पुण्याची काँग्रेस शहजाद पुनावाला नाही तर जेधे, गाडगीळ, मोरे यांच्या योगदानामुळे उभी आहे. मोघलांना साथ देणा-या सुर्याजी पिसाळला ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्याची जागा दाखवून दिली, त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते शहजाद पुनावाला याला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, या भाषेत पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते रमेश अय्यर आणि नगरसेवक अजित दरेकर यांनी टीका केली. 
महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव असलेल्या शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. ते इलेक्टेड नव्हे तर सिलेक्टेड अध्यक्ष होणार आहेत. अध्यक्षपदाची मॅच आधीच फिक्स आहे, असा आरोप शहजाद यांनी केला. शिवाय पक्षात घराणेशाहीने मूळ धरल्याचेही त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, शहजाद पुनावाला यांच्या टीकेनंतर तहसीन यांनी भाऊ शहजादसोबतचे नाते तोडले असून तहसीन पुनावाला यांनी शहजाद यांच्यावर तोफ डागली. राहुल यांच्यावर केलेली टीका अत्यंत खेदजनक प्रकार आहे, त्यामुळे आपण व्यथित झाल्याचे तहसीन यांनी म्हटले आहे. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेले नाते तोडत असल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केले. तहसीन पुनावाला काँग्रेसचे  समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणे आहेत.
दरम्यान राहुल गांधी यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांचाच अर्ज पक्षाच्या मुख्य निवडणूक अधिका-याकडे आलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड निश्चित आहे.

शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन

0

मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत. शशी कपूर यांना 2014ला फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत राहिली.शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते.
948मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर काहीसे एकटे एकटेच राहायला लागले होते. त्याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. आजारपणामुळे शशी कपूर हे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिले. 2011मध्ये शशी कपूर यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 2015मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. कपूर परिवारातील ते असे तिसरे व्यक्ती होते की ज्यांनी एवढे पुरस्कार मिळवले होते.

शशी कपूर यांचा अल्पपरिचय…
शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. 1948 साली आलेल्या ‘आग’ आणि 1951 साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या.
हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले.
तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली.
1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशी कपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून 116 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ‘जब जब फूल खिले’ या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत.

जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.
त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.
दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं.
शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले.
शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमँटिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत.
> हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले.
>अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग 36 चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली.
हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे.
आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली.
शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.
सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014 साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
160 चित्रपटांत त्यांनी काम केले असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

शशि कपूर नव्हते खरे नाव…

शशि कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कूपर होते. पृथ्वीराज कपूर यांच्या घरात जन्मलेल्या शशि यांनी अभिनयचाचे धडे नसते गिरवले तरच नवल. वडील आणि भावांप्रमाणे शशि यांचे देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. 40च्या दशकात त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले.
– मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शशि कपूर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या सुटीच्या काळात वडील पृथ्वीराज त्यांना स्टेजवर अॅक्टिंग करण्यासाठी प्रोत्साहित करायचे.
– पुढे मोठे बंधू राज कपूर यांनी त्यांची फिल्म आग (1948) मध्ये शशि यांना रोल दिला. यानंतर 1951 मध्ये राज कपूर यांच्याच ‘आवारा’मध्ये शशि दिसले होते.
आवारामध्ये त्यांनी राज कपूर यांच्या बालपणाचा रोल केला होता.
– वडिलांच्या सल्ल्याने शशि यांनी गोद्फ्रे कँडल यांचा थिएटर ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपसोबत जगभर भ्रमंती करतानाच गोद्फ्रे यांची मुलगी जेनिफरच्या ते प्रेमात पडले. अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी जेनिफरसोबत लग्न केले होते.

– हिंदी चित्रपटांबरोबरच शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.

शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राजकपूर आणि शम्मी कपूर फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिध्द कलाकार होते. मात्र शशी यांना सिनेमांपेक्षा थिएटरमध्ये अधिक रुची होती आणि हेच जेनिफर भेटण्याचे कारण ठरले. पृथ्वी थिएटरमध्ये पन्नास रुपये मासिक वेतनावर काम करून शशी यांनी स्टेजवर काम करण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यावेळी भारत दौ-यावर आलेल्या ‘शेक्सपिएराना’ या नाटक टीममध्ये ते  सामील झाले. यादरम्यान या नाटक टीमचे संचालक मिस्टर कँडल यांची मुलगी जेनिफरसोबत त्यांनी अनेक नाटकांत काम केले. शेक्सपिअरचे मुख्य नाटक ‘द टेम्पस्ट’मध्ये मिरांडाची भूमिका साकारताना जेनिफर आणि शशी यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1957मध्ये शशी यांनी जेनिफर थिएटर ग्रुपसोबत जाऊन सिंगापूरला नाटक सादर केले. यावेळी दोघांची जवळीक आणखीच वाढली. यादरम्यान शशी यांनी जेनिफर समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ऊटीमध्ये एका नाटकावेळी शशी यांची वहीणी गीता बाली यांनी जेनिफरला आपली पसंती दर्शवली आणि 1958मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्यावेळी शशी 20 वर्षांचे तर जेनिफर 25 वर्षांच्या होत्या .

1978 मध्ये जेनिफर यांच्या मदतीने शशी कपूर यांनी आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची पुर्नउभारणी केली.  त्यानंतर सहा वर्षांनी जेनिफर यांचे निधन झाले. यावेळी शशी अगदी एकटे पडले होते. अखेरच्या काळात ते व्हिलचेअरवर होते

 

जातीभेदाची दरी दूर करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज – उपमहापौर

0

पुणे – -जातीभेदाची दरी संपुष्टात आणून आपण सामाजिक प्रगती केली पाहिजे . यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी एका मेळाव्यात केले .
वडार समाज संघ , महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी मालधक्का चौकातील डॉक्टर आंबेडकर भवनात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु -वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याचे उदघाटन डॉक्टर धेंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे , वडार समाज संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, माजी नगरसेविका शारदा ओरसे , संघाचे कार्याध्यक्ष भाऊलाल पवार ,जेष्ठ उपाध्यक्ष जगन्नाथ फुलारे , महादेव कुसाळकर , सिताराम शिंदे , सरचिटणीस दिलीप गुंजाळ , अशोक कुलाल , माजी अध्यक्ष डॉक्टर श्रावण रॅपनवाड, लक्ष्मण बामणे , रमेश जेठे, आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात राज्यभरातून ६०० हुन अधिक उपस्थित होते,
डॉक्टर धेंडे म्हणाले कि, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे . पुणे स्मार्ट सिटी होत चालले आहे. पुण्यात पंचतारांकित विद्यापीठे झाली आहेत. एकीकडे हि प्रगती होत असताना या प्रगती मध्ये वडार समाजाचे स्थान कुठे आहे. याबद्दल अभ्यास होण्याची गरज आहे. . हा समाज चांगलाच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय याची सर्वानी दखल घेण्याची गरज आहे .आज भारतात जातीभेद दूर होण्याबद्दल सर्वचजण बोलतात . यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.
सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले कि , वडार समाजाने देशांच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलला आहे .
प्रदेशाध्यक्ष राकेश विटकर म्हणाले की , जाती -पोटजातीच्या जोखडातून सर्वानी बाहेर पडण्याची गरज आहे. तरच आपली सामाजिक प्रगती होईल .

फ़िल्म “बधाई हो” में सान्या मल्होत्रा निभाएंगी आयुष्मान की प्रेमिका की भूमिका!

आयुष्मान खुराना अभिनीत जंगली पिक्चर्स में सान्या मल्होत्रा मुख्य भूमिका में नज़र आएंगी। 2017 में स्लीपर हिट ‘बरेली की बर्फी’ देने के बाद, अब जंगली पिक्चर्स ‘बधाई हो’ के जरिये आयुष्मान खुराना के साथ एक बार फिर मिलकर काम करने के लिए तैयार हैं। इस मज़ेदार कहानी में दंगल गर्ल सान्या मल्होत्रा भी दिखाई देंगी।
इस खबर की पुष्टि करते हुए अभिनेत्री सान्या मल्होत्रा ने कहा,”मैं बधाई हो पर काम शुरू करने के लिए उत्साहित हूँ। मुझे याद है मैं स्क्रिप्ट के पहले वर्णन के दौरान खूब हँसी थी और मैंने तुरन्त फैसला कर लिया था कि मुझे इस फिल्म का हिस्सा बनना है। यह एक अलग ही कहानी है जिसमें मैं एक चुलबुली लड़की की भूमिका निभा रही हूँ जो आयुष्मान की प्रेमिका है।”
अभिनेत्री ने जंगली पिक्चर्स के ट्वीट उत्तर देते हुए कहा,”#बधाई हो @ayushmannk
यह मज़ेदार फ़िल्म अमित शर्मा द्वारा निर्देशित होगी, जो अब तक 1000 ऐड फिल्में संचालित कर चुके हैं, जिनमें से एक गूगल रीयूनियन और कश्मीर पर्यटन के लिए बनाई गई एक छोटी फिल्म शामिल है।
आमिर खान की सीक्रेट सुपरस्टार के लिए कोरियोग्राफर बन चुकी सान्या मल्होत्रा “दंगल” के बाद पहली बार बड़े पर्दे पर नज़र आएगी। अपनी इस खुशी को साझा करते हुए अभिनेत्री ने कहा,”मैं वास्तव में एक अभिनेत्री बनने के लिए खुश हूं। जब भी कुछ दिलचस्प आता है, मैं उसे आज़माने की कोशिश करती हूं और उन किरदारों को निभाना चाहती हु जो मुझे खुशी देते है।” उन्होंने आगे कहा, “यह दंगल की तरह कठोर नहीं होगा। शुक्र है, मैं इस में कुश्ती नहीं कर रही हूं।”
दंगल अभिनेत्री जो आयुष्मान के भाई अपराक्षित खुराना के साथ अपनी पहली फिल्म में स्क्रीन स्पेस साझा कर चुकी है, उन्होंने अभिनेता के साथ अपने समीकरण के बारे में बात करते हुए कहा,”अपराक्षित मेरे लिए एक भाई की तरह है। मैं वास्तव में आयुष्मान के साथ काम करने के लिए उत्सुक हूं। आगे बात करते हुए सान्या ने कहा कि इससे पहले वह एक ऐड फिल्म में आयुष के साथ काम कर चुकी है। “लेकिन उस ऐड में मैं बैकग्राउंड में थी।”
तीन महीने के शेड्यूल वाली “बधाई हो” की शुरुवात जनवरी में होगी। दिल्ली से वाकिफ़ रखने वाली अभिनत्री ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि,”मैं कुछ समय से मुम्बई में ही रह रही हूँ इसिलए दिल्ली की नई जगहों के बारे ज़्यादा नही जानती लेकिन मैं उन्हें मेरे घर ले कर जाऊँगी। दंगल की शूटिंग के दैरान, छोले भटूरे खाने के लिए मैं उन्हें घर ले जाया करती थी।”
जंगली पिक्चर्स के बैनर के तहत बनने वाली यह फ़िल्म विनीत जैन द्वारा निर्मित और प्रीति शहानी द्वारा सह-निर्मित होगी। अमित शर्मा द्वारा निर्देशित “बधाई हो” की शूटिंग जनवरी के अंत तक शुरू होगी।

विद्युत जामवाल को मिला एक अनोखा सह-कलाकार!

हाल ही में “जंगली” के पहले शेड्यूल के लिए थाईलैंड रवाना हुए विद्युत एक थेरेपी हाथियों के साथ स्क्रीन स्पेस साझा कर रहे हैं।

जंगली उड़ीसा में स्थापित है और एक आदमी और एक हाथी के बीच अद्वितीय दोस्ती के आसपास घूमती है। 36 वर्षीय अभिनेता एक पशु-प्रेमी पशु चिकित्सक की भूमिका निभा रहे है जो एक शिकार रैकेट का पर्दाफाश करता है।

सह-निर्माता प्रीती शहानी ने कहा,”शूट 5 दिसंबर से शुरू होने वाली है, लेकिन विद्युत समय से पहले ही वहाँ पहुँच गए है। थाईलैंड सरकार इस परियोजना में अपना पूरा सहयोग प्रधान कर रही है जिस वजह से हमारी शूटिंग आसान हो जाएगी। साथ ही प्रीति ने कहा कि फिल्म में नज़र आने वाले चार हाथियों का चयन करने के लिए हमारी टीम ने भारत और श्रीलंका का दौरा किया।

अब, यूनिट सभी पशु-संबंधी सीन के लिए लोकल लाइन प्रोड्यूसर और थाई चालक दल के सदस्यों के साथ मिल कर काम करेगी। जंगली पिक्चर्स के अध्यक्ष ने बताया,” हम एक स्वस्थ और सुंदर हाथी चाहते थे। सौ से अधिक हाथियों की तस्वीरों की तुलना करने के बाद, हम यह बता सकते हैं कि चियांग माई में रहने वाले सबसे खुश थे।

फिल्म में, यून नामक एक महिला थेरेपी हाथी अन्य हाथी के साथ विद्युत के संग एक प्रमुख भूमिका निभाएगी। प्रीति ने वादा करते हुए कहा कि,”यून एक बेहद ही सौम्य महिला है जो थाईलैंड में ऑटिस्टिक और मानसिक रूप से विकलांग बच्चों के साथ काम करती है। उसके साथ एक बार की गई बातचीत इन विशाल जानवरो की तरफ देखने का आप सबका नज़रिया पूरी तरह से बदल जाएगा।”

अपने इस शेड्यूल के दौरान कलाकार यून और अन्य हाथियों के साथ एक गीत भी फिल्माएंगे। सह-निर्माता प्रीती शहानी ने जाते जाते कहा कि,” संगीत फिल्म की कहानी का एक आंतरिक और कार्बनिक हिस्सा है। विद्युत और हाथियों के बीच होने वाली बातचीत को संगीत के जरिये ही उजागर किया जाएगा।”

जंगली पिक्चर्स के बैनर के तहत बनने वाली यह फ़िल्म हॉलीवुड फिल्म निर्माता चक रसेल द्वारा निर्देशित है और प्रीती शहानी द्वारा सह-निर्मित है। फ़िल्म 19 अक्टूबर 2018 में देशभर में रिलीज होगी।

 

महर्षी वाल्मिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी

0

पुणे-वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याच्यावतीने जगत गुरु महर्षी वाल्मिकी स्वामी जयंतीनिमित्त  वाल्मिकी समाज बांधवांचा भव्य मेळावा संपन्न झाला . टिम्बर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाची सुरुवात जगत गुरु महर्षी वाल्मिकी स्वामी  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या मेळाव्यास वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मन्नू कागडा , पुणे शहराध्यक्ष पप्पू उज्जेनवाल , नगरसेविका मनिषा लडकत , तुषार पाटील , नरोत्तम चव्हाण , भिकाचंद मेमजादे , मोतीलाल निनारिया , मिलिंद अहिरे , कविराज संघेलिया , मेघराज पवार , गणपत दगडे , विनोद निनारिया आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्यामध्ये  वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मन्नू कागडा यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , महर्षी वाल्मिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी वाल्मिकी समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली . तसेच जातीचा दाखला काढताना पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा देण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली . भगवान वीर गोगादेव उत्सवामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली .

यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजगौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . या मेळाव्याचे संयोजन अशोक चौधरी , नरेश वाल्मिकी , विशाल पिवाल , रामेर कागडा , बलवान डूमडा , भरत भुबक , शक्ती चावेरिया , ब्रिजपाल वाल्मिकी , महेश पारचा यांनी केले होते .

‘ऑनलाईन’ वीजबिल भरणाऱ्या ग्राहकसंख्येत 60 हजारांनी वाढ

0

पुणे : महावितरणच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी वीजग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात गेल्या तीन महिन्यांत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणारे 60 हजार 607 वीजग्राहक वाढले असून नोव्हेंबरमध्ये एकूण 7 लाख 23 हजार 409 वीजग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 129 कोटी 44 लाख रुपयांचा घरबसल्या वीजबिल भरणा केला आहे.

वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध झाली आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढत असल्याची स्थिती आहे. महावितरणकडून ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यासाठी विविध उपक्रमांतून ग्राहकांना सातत्याने माहिती देण्यात येत आहे. पुणे परिमंडलात एप्रिल ते ऑगस्ट 2017 पर्यंत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणार्‍या ग्राहकांची संख्या सुमारे 38 हजारांनी वाढली होती. ऑगस्टमध्ये एकूण 6 लाख 62 हजार वीजग्राहकांनी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत नोव्हेंबरपर्यंत या संख्येत 60,607 वीजग्राहकांची भर पडली आहे.

पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात तब्बल 7 लाख 23 हजार वीजग्राहकांनी 129 कोटी 44 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यात पुणे शहरातील 4 लाख 43 हजार वीजग्राहकांनी 76 कोटी 69 लाख तर पिंपरी चिंचवड शहरातील 2 लाख 2 हजार ग्राहकांनी 35 कोटी 97 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यातील 78 हजार ग्राहकांनी 16 कोटी 76 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केलेला आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.