Home Blog Page 3225

मराठी आणि हिंदी हि केवळ ड्रायव्हर आणि नोकरांची भाषा आहे का?

0

मुंबई-दक्षिण मुंबईतील शाळामध्ये मराठी भाषेलाकमी लेखले जात असल्याचा आरोप करीत या दोन्ही भाषा काय केवळ ड्रायव्हर आणि नोकरांच्या आहेत काय ? असा जळजळीत सवाल हि त्यांनी केला .

शायना(एनसी, प्रवक्ता, भाजप )यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी एका पत्रकार परिषदेस संबोधित केले आणि मुंबईतीलखाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय शिकवली न जाण्याबददल खंत व्यक्त केली.
मुंबईत २००० हून अधिक खाजगी शाळा आणि आंतरराष्ट्रीय (international schools) शाळा आहेत. ८ वी पर्यंतचेबहुतेक सर्व खाजगी शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहे. परंतु, काही शाळा मराठी भाषेचा तास इतर विषयांसाठी
वापरतात. ८ व्या वर्गापासून पुढे मराठी पर्यायी विषय बनला आहे आणि पर्याय म्हणून फ्रेंच किंवा जर्मनची निवडकेली जाते. कोणत्याही स्थानिक भाषेची आणि राष्ट्रभाषेची तुलना परदेशी भाषाशी करता येईल का? इथे हेतू कोणत्याही
परदेशी भाषेचा निषेध करण्याबाबत किंवा शाळांमध्ये इंग्रजीचा वापर कमी करण्याबद्दल नाही परंतु मुद्दा दोन भाषांचेसह-अस्तित्वाचा आहे. आपल्या भावी पिढीच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी मराठी व हिंदी भाषेचे जतन करणे आवश्यक
आहे.
मराठी भाषेची परंपरा आणि वारसा समृद्ध आहे आणि तरीही यास खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये दुर्लक्षितकेले जाते. कोणतीही परदेशी भाषा शिकण्यास इच्छुक असलेली विद्यार्थी खासगीरित्या ही भाषा शिकू शकते. फ्रेंचकिंवा जर्मन भाषा विद्यार्थ्यांकडून दररोजच्या कामात वापरली जाणार नाही परंतु मुंबईत त्यांना रोजच्या रोज मराठी भाषेचा वापर करावा लागेल.
शायना एन.सी. म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्यात राहायचे, काम करायचे असेल तर मराठी यायलाच हवी. मराठी भाषेकडे शाळांमध्ये दुर्लक्ष केले जात आहे आणि या शाळेचा एकुण दृष्टिकोन मराठीला घेऊन अनुकूल नाही. मराठी
आणि हिंदी भाषा ड्रायव्हर आणि नोकरांची भाषा म्हणून दक्षिण मुंबईच्या लोकांमध्ये ओळखली जाते. शाळेत जाणाऱ्यादोन मुलांची आई या नात्याने, मला जाणवल की माझ्याच मुलांना ही भाषा शिकण्यास स्वारस्य नाही. या दिशेने एक
मजबूत पाऊल उचलण्याबद्दल संबंधित विभागांना मी पत्र देखील पाठविले आहे. कोणत्याही भाषेबद्दल प्रेम आणिआवड हे शालेय शिक्षणातून येते, हे विसरता कामा नये. आपल्याच राज्यात मराठी भाषेची होणारी गळचेपी ही गंभीर
बाब असून आम्ही या संदर्भात  शिक्षण मंत्री आणि  राज्यपाल यांना पत्र
पाठविले आहेत. आम्ही सर्व शाळांना या संदर्भात परिपत्रक जारी करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व खाजगी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये आठवीनंतर मराठी व हिंदी या दोन्ही भाषा पर्याय म्हणून ठेवावे असं सुचविले आहे’
माझ्या शाळेत मला मराठी शिकवली नाही गेली यामुळे मला स्पष्ट मराठी येत नाही असे शायना एन. सी. यांनी मान्य केले. आज मला मराठी येते, तसे प्रयत्न मी करतेय. सध्या आपण साने गुरूजीचे ‘श्यामची आई’ पुस्तक वाचत
असल्याचे सांगितले. ती एक उत्तम साहित्यकृति असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या शेवटी त्यांनी, जाहीर केले की त्या ‘बारायण’ नावाचा मराठी चित्रपट सादर करीत आहे. हा चित्रपट शिक्षणावर
भाष्य करणारा आहे आणि तो सामाजिक संदेश घेऊन येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माता दैवता पाटीलही परिषदेत उपस्थित होते.

14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत ऑल स्टेटस्, सनगार्ड एएस, केपीआयटी संघांचा विजय

0
पुणे– आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2017-18 स्पर्धेत  ऑल स्टेटस्, सनगार्ड एएस व  केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आगेकुच केली.

पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत असिफ शेखच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑल स्टेटस् संघाने गालाघर संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना तेजस कवडेच्या 44 धावांच्या बळावर गालाघर संघाने 19.4 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या. ऑल स्टेटस् संघाकडून असिफ शेखने 4 तर सुमित रावतने 3 गडी बाद केले. 119 धावांचे लक्ष ऑल स्टेटस् संघाने केवळ16.3 षटकात 5 बाद 121 धावांसह पुर्ण केले यात असिफ शेखने 32 तर रवी गोहरने नाबाद 27 धावा करून संघाला विजय  मिळवून दिला. असिफ शेख सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत कमलेश रावलानीच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सनगार्ड एएस संघाने ईक्यु टेक्नॉलॅजीक संघाचा सर्व 10 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कमलेश रावलानीच्या अफलातून गोलंदाजीपुढे ईक्यु टेक्नॉलॅजीक संघ केवळ15.4 षटकात सर्वबाद 80 धावांत गारद झाला. कमलेशने केल 13 धावात 5 बळी घेतले. तर  गित देसाईने 2 गडी बाद केले. 80 धावांचे लक्ष प्रशात पोळच्या नाबाद 37 तर  पवन आनंदच्या नाबाद 47 धावांसह सनगार्ड एएस संघाने केवळ 7.1 षटकात एकही गडी न गमावता 86 धावांसह सहज पुर्ण केले.  कमलेश रावलानी सामनावीर ठरला.

तिस-या लढतीत  तुषार वैगणकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर केपीआयटी संघाने मर्क्स सघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना मर्क्स संघाने 20 षटकात 6 बाद 128 धावा केल्या. यात राघव त्रिवेदीने 44 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 128 धावांचे लक्ष तुषार वैगणकरच्या 41 व सुशांत मुदलीयारच्या 48 धावांच्या बळावर केपीआयटी संघाने 16.4 षटकात 3 बाद 131 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. तुषार वैगणकर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

गालाघर- 19.4 षटकात सर्वबाद 119 धावा(तेजस कवडे 44, शुबेंदू पांडे 25, गोरव बाजपई 21, असिफ शेख 4-24, सुमित रावत 3-13) पराभूत वि ऑल स्टेटस्-16.3 षटकात 5 बाद 121 धावा(असिफ शेख 32, रवी गोहर नाबाद 27, शुबेंदू पांडे 3-27) सामनावीर- असिफ शेख

ऑल स्टेटस् संघाने 5 गडी राखून सामना जिंकला. 

ईक्यु टेक्नॉलॅजीक- 15.4 षटकात सर्वबाद 80 धावा(अभिजित अव्हाड 27, कमलेश रावलानी 5-13, गित देसाई 2-16) पराभूत वि सनगार्ड एएस- 7.1 षटकात 0 बाद 86 धावा(प्रशात पोळ नाबाद 37, पवन आनंद नाबाद 47) सामनावीर- कमलेश रावलानी

सनगार्ड एएस संघाने 10 गडी राखून सामना जिंकला. 

मर्क्स- 20 षटकात 6 बाद 128 धावा(राघव त्रिवेदी 44, वेंकटेश अय्यर 26, शुर्वा भादुरी 26, बुर्हानउद्दीन भार्मल 2-27, निरंजन फडणवीस 2-7) पराभूत वि केपीआयटी- 16.4 षटकात 3 बाद 131 धावा(तुषार वैगणकर 41, सुशांत मुदलीयार 48, राघव त्रिवेदी 2-23) सामनावीर- तुषार वैगणकर

केपीआयटी संघाने 7 गडी राखून सामना जिंकला. 

भारतातील मालमत्तांमध्ये गुंतवणूकीबद्दल यूएईतील अनिवासी भारतीय आशावादी

0

दुबईतील क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमध्ये क्रेडाई महाराष्ट्रला प्रचंड प्रतिसाद

पुणे  :- रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकतासमानता आणि सर्व भागधारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून यात अनिवासी भारतीयांचाही (एनआरआयसमावेश आहेया उत्साहाच्या वातावरणाला अनुसरून दुबई येथे  ते   डिसेंबर या कालावधीत क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळालाया प्रदर्शनात झालेल्या चौकशी आणि नोंदविलेले व्यवहार यातून उत्साहित भावनेचे प्रतिबिंब बघायला मिळतेमहाराष्ट्राला प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाल्यातर कर्नाटकतामिळनाडू आणि केरळलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्याचे पाहून आम्हाला खरोखर प्रोत्साहन मिळाले आहेशोच्या तीन दिवसातच हजारो प्रॉपर्टी खरेदीदारांनी प्रदर्शनात गर्दी केलीतसेच क्रेडाई महाराष्ट्रानेच विविध मालमत्तांच्या संदर्भांत मोठ्या संख्येने चौकशांची नोंदणी केली आहे,” असे  क्रेडाई नॅशनलचे कार्यकारी समिती सदस्य श्रीकपिल गांधी प्रचंड प्रतिसादाबद्दल भाष्य करताना म्हणाले.

भारतीय मालमत्तांच्या क्रेडाईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शना भारतातील २०० पेक्षा अधिक रेरा मान्यताप्राप्त प्रतिष्ठित बिल्डर्सचा समावेश होतायात राज्यवार १४ पॅव्हेलियन असून त्यात ६०  शहरांतील हजारो मालमत्तांचे प्रदर्शन दाखवण्यात आलेप्रदर्शनातील राज्यवार पॅव्हेलियनमध्ये गुजरातमहाराष्ट्रदिल्लीएनसीआरकर्नाटककेरळतमिळनाडूआंध्र प्रदेशतेलंगाणाउत्तर प्रदेशराजस्थानगुजरात, पश्चिम बंगालमध्य प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे.

खरेदीदारांना शिक्षित करणेमार्गदर्शन करणे आणि माहिती देणे हा या प्रदर्शनाचा हेतू असून यात भारतातील सध्याच्या मालमत्ताविषयक ट्रेंड या विषयावर मालमत्तातज्ञांचे विनामूल्य सेमिनार भारतातील स्थावरमालमत्तेच्या गुंतवणुकीच्या कायदेशीर बाबी तसेच वास्तु व इंटेरियर सेमीनार यांचाही समावेश होता.

या सर्वांमध्ये क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष श्रीशांतिलाल कटारिया यांच्या सेमिनार मध्ये  त्यांनी रेरामालमत्ता खरेदीदारांवर त्याचा परिणाममहत्त्वाच्या तरतुदी आणि ठळक वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राजे दुबई भूमी विभागाचे महासंचालक सुल्तान बट्टी बिन मजरेन, दुबईतील भारताचे वाणिज्य राजदूत विपुल,  एनआरआय फोरम कर्नाटकच्या उपाध्यक्षा डॉआरती कृष्णा आणि बॉलिवूड अभिनेता भारतीय प्रॉपर्टीचे ब्रँड अॅम्बेसेडर श्रीअरबाज खान यांनी केलेयावेळी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष श्रीजक्षय शाह,  क्रेडाई नॅशनलचे चेअरमन श्रीगीतांबर आनंद,   क्रेडाईचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन अध्यक्ष श्रीविपुल ठक्करक्रेडाई नॅशनलचे चिटणीस रोहित मोदीक्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष श्रीशांतिलाल कटारियाक्रेडाई नॅशनल युथ विंगचे संयोजक श्रीआदित्य जावडेकर आणि क्रेडाईचे अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.  

या प्रदर्शनादरम्यानक्रेडाईने स्मार्ट इंडिया रिएल्टी मीट आणि संयुक्त अरब अमिरात व भारतातील अग्रगण्य विकसक आणि शासकीय संस्थांना पुरस्कृत करण्यासाठी पुरस्कार सोहळा हेही आयोजित केले होतेपरिषदेत आणि पुरस्कार समारंभात एकत्र येऊन बँकादुबई भूमी विभाग आणि युएई चॅनल पार्टनरनी आपला पाठिंबा दर्शविलासंयुक्त अरब अमिरातीत स्थायिक झालेले शेकडो एनआरआय या कार्यक्रमात उपस्थित होते आणि भारतीय रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीत त्यांनी प्रचंड रस दाखविला.

एनआरआयना येणाऱ्या विविध मालमत्ताविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्रेडाईच्या इंडियन प्रॉपर्टी शोमधील ग्राहक तक्रार निवारण मंचही होता.या मंचाने अभ्यागतांना क्रेडाई सदस्य विकसकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले जेणेकरून कोणत्याही अनैतिक पद्धतींपासून ग्राहक हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण व्हावे.

सल्लागार कंपनी व काही ठेकेदारांचा पुणेकरांच्या तिजोरीवर ‘डल्ला’!-खासदार संजय काकडे आक्रमक

पुणेकरांचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही – खासदार काकडे

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार; प्रसंगी कॅग, सीबीसी व कोर्टात जाण्याची खासदार काकडेंची तयारी

पुणे : शहरातील समान पाणी वाटपाच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचे काम अत्यंत संशयास्पद व गंभीर आहे. या संपूर्ण प्रकाराची कल्पना आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. याप्रकरणी आपण कॅग, सीबीसी व न्यायालयातही वेळ पडल्यास जाऊ. परंतु, पुणेकरांचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी सल्लागार कंपनी व तिच्याशी संगनमत करून काम मिळवू पाहात असलेल्या काही ठेकेदारांना समान पाणी वाटपाच्या निविदातील गैरप्रकाराविषयी इशारा दिला आहे.

खासदार काकडे म्हणाले की, पहिल्या निविदा प्रक्रियेत असलेल्या सल्लागर कंपनीने चुकीचे काम केल्याचे ताशेरे प्रशासनानेच मारले आहेत. असे असताना महापालिका आयुक्तांनी त्या सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तिच्यावर मेहेरनजर दाखवित पुन्हा त्याच कंपनीच्या सल्लाने आता निविदा प्रक्रिया राबविली आहे. नव्याने होत असलेल्या निविदा प्रक्रियेत चांगल्या दर्जाच्या स्टील पाईपचे दर बाजारात 50 हजार रुपये प्रति टन असताना यांनी मात्र 80 हजार रुपये प्रति टन लावले आहेत. याबरोबरच, 4 हजार रुपये किमतीचा एक मीटर 9 हजार रुपयांना खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. मीटर उत्पादक कंपन्यांकडून खरेदीचे दर न मागविताच निविदात मीटरचे दर समाविष्ट केले आहेत. प्रथमदर्शनी आम्हास या दोन वस्तुंच्या बाजारातील किमतीत व निविदांमधील किमतीत मोठी तफावत आढळली आहे. संपूर्ण निविदा प्रक्रियेची आम्ही कसून तपासणी करीत आहोत. महापालिका आयुक्त चुकीचे काम करणाऱ्या सल्लागार कंपनीस का पाठिशी घालत आहे? आणि तिच्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस चुकीचे काम करणाऱ्या या सल्लागार कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकतील आणि नवीन सल्लागार कंपनी नेमून नव्याने पारदर्शकतेने निविदा प्रक्रिया राबवतील अशी मला आशा आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.

समान पाणी वाटप प्रकल्पाचे काम 1400 ते 1500 कोटी रुपयांत होऊ शकते. परंतु, सल्लागार कंपनीच्या चुकीच्या सल्ल्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेवेळीही सल्लागार कंपनीने चुकीचे काम केले होते. पहिल्यावेळची निविदा 2800 कोटी रुपयांची होती. ती 28 टक्क्यांनी वाढवून भरली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर त्यांनी या निविदा रद्द केल्या आणि पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक व खुल्या स्वरुपात पुन्हा निविदा काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. मात्र, आताच्या निविदा प्रक्रियेत सुरु असलेला प्रकार संशयास्पद आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेतील तीन कंपन्यांनाच यावेळीही निविदा भरता येतील अशा अनुकूल शर्थी व अटी तयार करण्यात आल्याने इतर कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. तसेच, भागिदारीत कंपन्या काम करु शकणार नाहीत अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

पहिल्या निविदा प्रक्रिया रद्द करताना पुणेकरांचे 800 ते 900 कोटी रुपये वाचविले होते. त्यामुळे हा प्रकल्प 2300 कोटीवर आला. आता ऑप्टिकल फाइबर डगचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत होत असल्याने 200 कोटी रुपये वाचतील व तो 2100 कोटीवर येईल. परंतु, मीटर व स्टील पाईपच्या दरातील तफावत पाहता चुकीच्या पद्धतीने अपारदर्शकतेने ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबविली जात असल्याचे स्पष्ट होते. हा पुणेकरांच्या पैशावर सल्लागार कंपनी काही ठेकेदारांशी संगनमत करून डल्ला मारत आहे. पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबविल्यास समान पाणी वाटपाचा प्रकल्प 1400 ते 1500 कोटी रुपयांतच पूर्ण होऊ शकतो. महापालिकेतर्फे दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी 400 ते 500 कोटी रुपयांची तरतूद केली जाते. तसेच, या प्रकल्पाचे काम पुढील 4 ते 5 वर्षे चालणार असल्याने महापालिका त्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करू शकते. त्यासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता नाही. कर्जाशिवाय हा प्रकल्प होऊ शकत असताना सल्लागार कंपनीच्या चुकीच्या सल्ल्यानुसार काम होत आहे. परंतु, कोणत्याही प्रसंगी पुणेकरांचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

युवा पिढीला मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याची गरज -आबा बागुल

0
पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ 
पुणे-
टेनिस बॉल क्रिकेटला सर्वाधिक पसंती असून  क्रिकेट असा खेळ आहे कि ,ज्यामुळे एकात्मता जोपासली जाते असे प्रतिपादन आबा बागुल यांनी येथे केले.
पुणे  शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेस कमीटी च्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले असून उद्घाटन उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते  झाले . यावेळी , स्पर्धेचे संयोजक व पुणे  शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल ,नंदकुमार बानगुडे , सागर आरोळे,महेश ढवळे ,,प्रकाश आरणे सागर बागुल  पप्पू देवकर योगेश बंगाले मनोज अवताड़े संतोष पवार सुयोग धाडवे सुरेश कांबळे राम रणपिसे , ,अभिषेक बागुल , धनंजय कांबळे ,समीर शिंदे ,इम्तियाज तांबोळी , आदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. आजच्या डिजिटलायजेशन मुळे त्याचे मैदानी खेळाकड़े दुर्लक्ष होत आहे. या माध्यमातून या युवाकाला खेळाकड़े आकर्षित करण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
संयोजक अमित बागुल म्हणाले , सशक्त तरुण भारताला महाशक्ति होण्याकडे वाटचाल करेल त्यामुळे  त्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा  प्रयत्न आहे.  पहिला सामना सुपर इलेवन  व अभिजीत क्रिकेट संघ यांच्यात रंगला. ही स्पर्धा 15 डिसेंबरपर्यंत होणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती अमित बागुल यांनी दिली.

झी युवावर येतोय प्रत्येकाच्या मनातला ‘ बापमाणूस ‘

0

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो, ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यातील स्थान एवढे महत्त्वाचे असते, की ज्यामुळे त्या माणसाबद्दलचा अभिमान उल्लेखनीय असतो. पण आपल्याला ते कोणाला कधीही सांगता येत नाही. त्यामुळेच अभिनेता सुयश टिळक याने #baapmanus हा हॅशटॅग वापरून प्रत्येकाच्या मनाला हात घालणारी एक चेन सोशल मीडिया वर काही दिवसांपूर्वी सुरु केली. यात त्याने आपल्या आयुष्यातील बापमाणूस सांगण्याबद्दल सोशल मीडियावर आवाहन केले आणि बघता बघता सुयशचे हे आवाहन लोकांच्या मनाला एवढं भिडलं की केवळ मराठी सृष्टीतील मोठमोठे सेलिब्रिटीजच नव्हे तर सुयश च्या असंख्य चाहत्यांनी आणि त्याशिवायही इतर अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाबद्दल सोशल मीडियावर अतिशय अभिमानाने फोटो अपलोड केले आणि मित्रपरिवारासमोर त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाला एक मानाचा मुजरा ही दिला. ही मोहीम खरं तर सुरु झालेली सुयश टिळक च्या, झी युवा वर येणाऱ्या ‘बापमाणूस ‘या नव्या मालिकेसाठीच.

दिवस रात्र न थकता, वादळ वाऱ्याची पर्वा न करता, प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा असणारा , आपल्या कुटुंबाचा रक्षणकर्ता , चंदनासारखा झिजून आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरणारा , कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना प्रसंगी ओठी कठोर पण पोटी अमाप माया असणाऱ्या, प्रत्येक कुटुंबातील ‘बापमाणसाची ‘ही गोष्ट आपली आवडती वाहिनी झी युवा रोज सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे . या मालिकेत बापमाणसाची मुख्य भूमिका साकारत आहेत आपल्या सर्वांचे आवडते आणि दिग्गज अभिनेते रवींद्र मंकणी. बापमाणूस या मालिकेद्वारे झी युवा कलाकारांची एक तगडी फौज घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मालिकेत रवींद्र मंकणी, सुयश टिळक यांच्या सोबत पूजा पवार, पल्लवी पाटील , संग्राम समेळ , संजय कुलकर्णी ,शिवराज वाळवेकर ,नम्रता आवटे अशी जबरदस्त स्टारकास्ट आणि त्याच्याबरोबरच अभिजित श्वेतचंद्र , ऐश्वर्या तुपे , अभिलाषा पाटील , आनंद प्रभू , श्रुती अत्रे, ज्योती पाटील, , अमोल देशमुख आणि बालकलाकार मैथिली पटवर्धन प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर झी युवाच्या अतिशय गाजलेल्या ‘रुद्रम” या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी या मालिकेच्या दिगदर्शनाची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे ही मालिका सुद्धा उत्कृष्ट दर्जाचीच असेल यात शंकाच नाही.

बापमाणूस या मालिकेची कथा कोल्हापूरच्या रांगड्या मातीत घडताना दिसणार आहे. या कथेत कोल्हापुरातील एका अशा साध्या माणसाचा प्रवास दाखवला आहे , जो त्याच्या कर्तृत्व आणि तत्त्वांमुळे त्याच्या कुटुंबाचाच नाही तर, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा बापमाणूस बनतो. कोल्हापुरातील त्याच्या स्थानाला मिळणारं महत्व आणि आदर त्याचबरोबर त्याची संपत्ती मिळवण्यासाठी त्याच्याच कुटुंबातील वाद आणि मतभेद यावर आधारित बापमाणूस ही मालिका आहे आणि ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

झी युवा आणि झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “प्रेक्षकांसाठी नवीन आणि उत्तमोत्तम विषय सादर करण्यासाठी झी युवा ही वाहिनी नेहमीच प्रयत्नशील आहे. बापमाणूस या मालिकेची निर्मिती करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक बापमाणूस असतो जो आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरून असतो , कुटुंबाला एकसंध ठेवण्यासाठी जीवाचं रान करत असतो. त्यामुळे ही मालिका जरी कोल्हापुरी बोलीभाषेतील असली तरीही त्यातील गोष्ट मात्र प्रत्येकाला अतिशय जवळची वाटेल. बापमाणूस या मालिकेची ही उत्कृष्ट गोष्ट, तेवढ्याच दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल अशी मी आशा करतो.”

शिबा रावडे यांना ‘मिस मेथडिस्ट २०१७’ किताब

0
पुणे : मेथडिस्ट मराठी चर्च’च्या वतीने पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चा रविवारी समारोप झाला. कॅरल गीते ,कॉयर ग्रुप्सचे सुरेल सादरीकरण, सौंदर्य स्पर्धा, खेळ आणि खवय्येगिरीची संधी असलेल्या या ३ दिवसीय कार्नीव्हलला पुणेकरांचा  चांगला प्रतिसाद मिळाला.  गोळीबार मैदान येथे हा कार्निव्हल ८ ते १० डिसेंबर या कालावधीत पार   पडला  समारोपप्रसंगी माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते शिबा रावडे यांना ‘मिस मेथडिस्ट २०१७’ किताब प्रदान करण्यात आला.
यावेळी युवा नेते तुषार भामरे, रेव्हरंड चंद्रशेखर जाधव, रेव्हरंड प्रमोद फ्रेझर, ‘मेथडिस्ट मराठी चर्च’ चे सचिव अ‍ॅड. मार्कस देशमुख, अ‍ॅड. सॅमसन अ‍ॅण्ड्रयुज, विल्सन अ‍ॅण्ड्रयुज, विनय माळगे, वैशाली छपानी, मधूकर सोनवणे, स्टॅन्ली मूर्ती, जॉयन कोरे, नितीन चव्हाण, अभिषेक त्रिभूवन आदी उपस्थित होते. यावेळी मेथडिस्ट मराठी चर्च पुणे जिल्हा व्यवस्थापक रेव्हरंड आर. ए. उदगीरकर आणि बिशप स्कूलचे प्राचार्य जॉएल एडविन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईशा निर्माण यांनी केले तर अ‍ॅड. मार्कस देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
दिनांक 8 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या कार्नीव्हलचे उद्घाटन पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन. यादव यांच्या हस्ते झाले. ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित हा कार्नीव्हल गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे येथे पार पडला.
‘भूतलावरील शांतता’ ही कार्नीव्हल ची थीम होती. ख्रिसमस एकत्रीत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी ह्या कार्नीव्हलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्नीव्हलमध्ये पुण्यातील हचिंग्स हायस्कूल, सेंट हेलेना स्कूल संस्था सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरातील प्रार्थना स्थळातील गायक-वादक मंडळीनी ख्रिसमस कॅरोल्स सादर केली. पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या वतीने आयोजित नाटिकेतून सर्वधर्मीय एकात्मतेचे दर्शन घडवले !
योग, फिटनेस, एरोबिक्स, झुम्बा च्या कार्यशाळा तसेच विविध खेळ, फूड स्टॉल चे कार्नीव्हलमध्ये आयोजन करण्यात आले होते, तर सौंदर्य स्पर्धा आणि ‘लेसर शो’ हे कार्नीव्हल चे विशेष आकर्षण ठरले.चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनीही कार्निव्हल ला भेट दिली

‘भूमिका’ एकांकिका आता नाटक रूपात रंगमंचावर..!

0

 वेल्थ प्लॅनेट (यु.के.) कडून मराठी रसिकांसाठी दुहेरी मनोरंजनाची मोफत पर्वणी..!

 १४ डिसेंबर रोजी बालगंधर्व येथे रात्री प्रयोग..!

 पुणे – मानाच्या पुरूषोत्तम एकांकिका करंडकासह विविध एकांकिका स्पर्धा गाजवलेल्या आणि रोटरी क्लब करंडक विजेती ‘भूमिका’ या एकांकिकेचे आता रंगमंचावर व्यावसायिक प्रयोग सादर होणार आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या उत्तरार्धात मान्यवर दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, अभिनेते यांची प्रकट मुलाखत, स.प.महाविद्यालयाचे विद्यार्थी घेणार आहेत.या आगळ्या वेगळ्या उपक्रमांतर्गत ‘भूमिका’चे प्रयोग रसिकांना विनाशुल्क पहाण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि या उपक्रमाचे सादरकर्ते प्रणित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 ‘भूमिका’ नाटकाची कार्यकारी निर्मिती संस्था ‘फोर्थ वॉल एंटरटेनमेंट’ असून ‘वेल्थ प्लॅनेट’ने या प्रयोगांना विशेष आर्थिक सहकार्य देऊन व्यावसायिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. या बद्दल अधिक माहिती देताना प्रणित कुलकर्णी म्हणाले, स. प. महाविद्यालय, पुणे कला मंडळातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग असलेल्या या एकांकिकेने अनेक स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या ‘भूमिका’ कथेवर आधारीत या एकांकीकेचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय पटवर्धन, गौरव बर्वे यांनी केले आहे. या विशेष उपक्रमाचा पहिला पयोग १४ डिसेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वा. पार पडणार आहे.

 या प्रसंगी नाटकाच्या उत्तरार्धात नुकत्याच गाजलेल्या ‘रुद्रम’ या मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांची मुलाखत होणार आहे.

 मराठी रंगभूमीवरील अभिनेत्याच्या जीवनातील  प्रत्यक्ष घालमेल,मानसिक स्थित्यंतरे या नाटकात रोमहर्षक पध्दतीने मांडण्यात आली आहेत. नाटकाचे नेपथ्य मुग्धा भालेराव, प्रकाश योजना शर्व सरज्योतिषी, पार्श्वसंगीत अमोघ इनामदार यांचे आहे. गौरव बर्वे, चिन्मय पटवर्धन, नाथ पुरंदरे, अभिषेक रानडे, शार्दूल गानू, आदित्य बीडकर आणि इतर कलाकारांच्या भूमिका  आहेत.

 मराठी भाषेतील उत्कृष्ठ कलाकृती आणि प्रतिभावंत कलाकारांना सादर करणारा हा ‘भूमिका-उपक्रमाचा’ शुभारंभाचा प्रयोग व इतर पुणे-मुंबईतील प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य होणार आहेत अशी माहिती वेल्थ-प्लॅनेट (यु.के.) चे सी.ई.ओ. आणि गुंतवणूक सल्लागार अभिजीत कुलकर्णी यांनी दिली.

‘पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड’ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

0

सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेत इंटरनॅशनल सक्सेस कोच सुनील पारेख यांचे एसआयएमएमसीच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 पुणे : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनतर्फे (एसआयएमएमसी) नुकतेच पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड या रंजक व माहितीपूर्ण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सूर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यशाळेचे संचालन इंटरनॅशनल सक्सेस कोच व मनोबल तज्ज्ञ सुनील पारेख यांनी केले. एमबीए प्रथम वर्ष, एमबीए द्वितीय वर्ष, पीजीडीएम या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सर्व शिक्षक असे १०० हून अधिक लोक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

 सुनील पारेख यांनी घेतलेले द माईंड पॉवर अनलिमिटेड हे सत्र उपस्थित श्रोतृवृंदाला मनाच्या शक्तीचा फायदा घेऊन आपल्या मेंदूंचे सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. याप्रसंगी सुनील पारेख म्हणाले, मानवी मेंदू हे अफाट ताकदवान यंत्र आहे, जे एखाद्या महासंगणकापेक्षाही उत्तम व वेगवान पद्धतीने प्रचंड व विखुरलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असते. पण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की मानव प्राणी आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर करत नाहीत आणि वय वाढेल तसे मेंदूच्या वापराची टक्केवारी कमी होत जाते. आपल्या घरगुती जीवनशैलीमुळे बहुतांशी हा परिणाम घडतो, कारण आपण मेंदूचे सुप्त सामर्थ्य शोधण्यासाठी क्वचितच इतरत्र जातो.

 या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना कल्पकतेला चालना देऊन समस्या हाताळण्याच्या विविध अभिनव पद्धती शिकायला मिळाल्या. अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच चर्चेसाठी आवश्यक विविध तंत्रे व अत्याधुनिक मन साधनांवर प्रभुत्व कसे मिळवावे, याचेही ज्ञान त्यांना झाले. लक्ष केंद्रित राहण्यासाठी, सुप्त मनाशी संर्पक ठेवण्यासाठी आणि ध्येय गाठण्यास सकारात्मक राहण्यासाठीची विविध साधने सहभागींना शिकता आली. एखाद्याने आपले ध्येय गाठण्यासाठी सुप्त मनाच्या ताकदीचा कसा वापर करावा, यावर भाषणाचा भर होता.

यासंदर्भात ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आमच्या संस्था विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक गोष्टी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा व प्रशस्त कॅम्पसच देत नसून त्यांच्या कल्याणकारी विकासासाकडेही आम्ही लक्ष पुरवतो.”

कंबोडियातील खडतर रॅलीत संजय टकले उपविजेता

0
पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने कंबोडीयातील आव्हानात्मक खमेर रॅली रेडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह उपविजेतेदाचा करंडक जिंकला. आशिया क्रॉस कंट्री रॅलीत पाच वेळा जिंकलेल्या नाथ्थाफोन आंग्रीथानोन याने ही रॅली जिंकली. 
 
कंबोडियाने मोटरस्पोर्टसच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी या रॅलीचे खास आयोजन केले होते. संजयने 2011 मध्ये देशबांधव मुसा शरीफ याच्या साथीत 2011 मध्ये टी2 गटात विजेतेपद मिळविले होते. आशिया क्रॉस कंट्री जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. माजी विजेता या नात्याने संजयला संयोजक कम्पुचिया ऑटोस्पोर्ट रेसिंग एजन्सीने संजयला खास आमंत्रण दिले होते. संजयने थायलंडच्या इसुझु कारटेक डेलो संघाची इसुझु डी-मॅक्स कार चालविली. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हीगेटर होता.
 
संजयने सांगितले की, रॅलीसाठी थायलंडहून कंबोडियात प्रवेश केल्यानंतर व्हिएतनाम सीमेलगत मोंदुलकिरी प्रांतात मोठा प्रवास करावा लागला. संयोजकांनी फार योजनाबद्ध आयोजन केले होते. पारंपरिक पुजेने सुरवात झाली.
 
संजयने पहिल्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये एक मिनिट 30 सेकंद वेळ नोंदविली. विचावत चोतीरावी याच्या साथीत तो संयुक्त दुसरा होता. यात नाथ्थाफोनची वेळ सरस होती. त्याची कार ऑस्ट्रेलियन स्पर्धकांनी चीनमधील सिल्कवे रॅलीत चालविली होती. डकार रॅलीच्या तांत्रिक निकषांनुसार ही कार बनविण्यात आली असून तिचे टेस्टींगही बरेच झाले होते.
 
दुसऱ्या सुपर स्पेशल स्टेजसाठी संजयला तिसऱ्या क्रमांकावरून सुरवात करावी लागली. विचावतने आशिया क्रॉस कंट्री रॅलीत सरस कामगिरी केल्यामुळे त्याला दुसरी स्टार्ट मिळाली. विचावतने दोन वेळा दुसरा, तर दोन वेळा तिसरा क्रमांक मिळविला आहे. संजयने एक विजेतेपद व एक उपविजेतेपद अशी कामगिरी केली आहे. 34 किलोमीटरच्या या स्टेजमध्ये संजयने कौशल्याच्या जोडीला सावधगिरी बाळगली. त्याने 28 मिनिटे 10 सेकंदांत ही स्टेज पूर्ण केली. विचावतची वेळ 29.09 सेकंद होती. संजयने त्यामुळे दुसरा क्रमांक गाठला.
 
ही  स्टेज खडतर होती. 26 किलोमीटर 77 मीटरच्या टप्यास गवत सुमारे 15 ते 20 फुट उंचीचे होते. त्यातून मार्ग कसाबसा दिसत होता. त्याशिवाय मार्ग सपाट नव्हता. त्यामुळे संजयची कार भरकटली, पण सुदैवाने त्यांना पुढील टप्पा लगेच मिळाला. त्यात सुमारे 50 ते 55 सेकंद वाया जाऊनही संजयने संयम ढळू दिला नाही. या मार्गात वेगवान सेक्शननंतर अचानक गुडघ्याइतके खोल खड्डे होते. काही ठिकाणी वाळुमुळे मार्ग निसरडा होता. त्यामुळे टायरना ग्रीप मिळत नव्हती. कहाही ठिकाणी रेलींग नसलेले लाकडी पुल होते. अशावेळी थान्याफातने संजयला वेळोवेळी सूचना दिल्या.
संजयने सांगितले की, थान्याफात फार नम्र आणि शांत स्वभावाचा आहे. त्याला क्रॉसकंट्रीचा अनुभव आहे. पश्चिम कंबोडियाच्या तुलनेत हा मार्ग वेगळा होता. त्याने अनुभवामुळे धोकादायक मार्गावर सावध केले.
तिसऱ्या स्टेजमध्ये वेगळेच अडथळे होते. त्यात पाणथळ जागा, खड्डे होते. 44 किलोमीटर 87 मीटरच्या या स्टेजमध्ये संजयसमोर नाथ्थाफोनचे आव्हान होते. नाथ्थाफोन ट्रकचे सुद्धा टेस्टींग करतो. तसेच त्याला क्रॉस कंट्रीचा बराच अनुभव आहे. अशावेळी संजयने खडतर स्टेजमध्ये धोका न पत्करता दुसरा क्रमांक कायम राखण्यास प्राधान्य दिले. काही ठिकाणी तीव्र उतार होते. नाथ्थापोनच्या  इसुझु डी-मॅक्सला चार किंग्ज शॉकअॅब्सॉर्बर्स होते. संजयच्या कारला थायलंडमध्ये बनविण्यात आलेले दोन सस्पेन्शन्स होती. या स्टेजचा परिसर व्हिएतनाम सीमेला लागून होता.
 
संजयने सांगितले की, रॅलीचे संयोजन चांगले झाले. 18 कार, 27 बाईक आणि आठ मोटो क्वाड््सचा सहभाग होता. नेदरलँड््स, न्यूझीलंड, इस्राईल, ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धकांनी भाग घेतला. काही स्पर्धकांच्या टोयोटा लँडक्रुझरला 4600 सीसी इंजिन होते. माझ्या इसुझुला 3000 सीसी इंजिन होते. त्यामुळे ही कामगिरी महत्त्वाची ठरली.
 
सविस्तर निकाल ः 1) नाथ्थाफोन आंग्रीथानोन-पीरापोंग सोमबुतवोंग (दोघे थायलंड-इसुझु डी-मॅक्स-एक तास सात मिनिटे 35 सेकंद), 2) संजय टकले-मिनील थान्याफात (भारत-थायलंड-इसुझु डीमॅक्स-1ः14.50), 3) पिट्टीफोन प्रोमचोटीकुल-प्रकोर्ब चावथाले (दोघे थायलंड-टोयोटा रिव्हो-1ः22.31), 4) सॅन डॅरीथ-रॉस रतानाक (दोघे कंबोडिया-टोयोटा लँडक्रुझर-1ः25.30), 5) ओरान-हेंग सोथीयालुक्ष (दोघे कंबोडिया-पोलॅरीस आरझेडआर-1ः25.44)

पुण्यात येत्या १७ डिसेंबरला प्राणी दत्तक शिबिर

0

पुणे- एकीकडे भटके कुत्रे व मांजरांची मोठ्या पैदास वाढवली जाते त्याचबरोबर अशा प्राण्यांना त्रास देण्याच्या किंवा विष घालून मारुन टाकण्याच्या घटना घडतात. या दोन्ही समस्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंसेवी संघटना व प्राणी चळवळ गट कुटुंबांना भटके कुत्रे व मांजरे दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामागे या भटक्या प्राण्यांचे जीवन सुधारणे आणि अशा प्राण्यांची बेकायदा पैदास करण्याची प्रथा कमी करणे, हे दोन हेतू आहेत. प्राण्यांच्या सुखासाठी मदत करण्यातून आरोग्यासाठी किती मुबलक फायदे होतात, हे विसरता येणार नाही.

 हाच विचार मनात ठेऊन पुण्यातील निमल डॉप्शन अँड रेस्क्यु टीमने (एएआरटी) येत्या १७ डिसेंबरला येथे प्राणी दत्तक शिबिराचे आयोजन केले आहे. कोथरुड येथील कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ७५ हून अधिक भटक्या कुत्र्यांची व मांजरांची पिले दत्तक घेण्यासाठी आणली जाणे अपेक्षित आहे. याकामी रस असणारी कुटूंबे आणि पाळीव प्राणीप्रेमींनी शिबिराला भेट देऊन त्यांच्या पसंतीनुसार ही पिले दत्तक घ्यावीत, असे आवाहन एएआरटीने केले आहे.

 याआधीच्या अशाच शिबिरातही ७० हून अधिक भटक्या कुत्र्यांची व मांजरांची पिले दत्तक घेण्यात आली होती. एएआरटीच्या संस्थापक भारती तांबे म्हणाल्या, शिबिरात दत्तक देण्यासाठी येणारी भटक्या कुत्र्यांची आणि मांजरांची पिले रस्त्यावरुन सुटका करुन आणलेली असतात. ती इतकी लहान व दुबळी असतात, की त्यांना रस्त्यावर आपले पोटही भरता येत नाही. अशा पिलांचे संगोपन आमच्या कार्यकर्त्यांकडून केले जाते आणि ती निरोगी व गुटगुटीत झाल्यावर मगच त्यांना दत्तक दिले जाते.

 पुण्यात आतापर्यंत झालेल्या १२० प्राणी दत्तक शिबिरांपैकी ११ हून अधिक शिबिरे एएआरटीने आयोजित केली आहेत. जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या काळात संयोजकांच्या प्रयत्नांतून २६० हून अधिक भटक्या कुत्र्यांची व १७० मांजरांची पिले, सहा भटकी कुत्री व तीन ससे असे प्राणी दत्तक देण्यात आले आहेत.

 या आगामी प्राणी दत्तक शिबिरात येणाऱ्या सर्व पाळीव प्राण्यांची प्रथम नोंदणी करुन त्यांना नंबर टॅग लावले जातील आणि नंतर पशुवैद्याकडून तपासणी केली जाईल. त्यानंतरच इच्छुकांना त्यांच्या पसंतीनुसार पिलू दत्तक घेण्याची मुभा असेल. ही निवड केल्यानंतर पालकांना एएआरटीच्या संघाकडून सल्ला-मार्गदर्शन पुरवले जाईल. दत्तक प्रक्रियेचे निकष पूर्ण केल्यावर मगच त्यासंबंधीच्या अर्जांवर सह्या होतील. संस्थेतर्फे नंतरच्या नियमित देखरेखीसाठी पिलू दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या निवासाच्या पुराव्याची प्रत व छायाचित्र अर्जासोबत ठेऊन घेतले जाईल.असे आयोजक भारती तांबे, मोबाईल : ९९२२६१७१७८ किंवा ९८८१४६७८९५ यांनी कळविले आहे .

विनय आकांशाचे होणार शुभमंगल सावधान !!

0

झी युवावर सोमवार ते शनिवार रोज रात्री ८:३० वाजता येणाऱ्या लव्ह लग्न लोचा या मालिकेला वर्ष होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा काही संपत नाही आहे . प्रेक्षकांच्या दृष्टीने लव्ह लग्न लोचा ही एक मस्त जमून आलेली मालिका आहे . प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा आणि प्रत्येक कलाकाराचा (प्रचंड)अवाका अोळखून रचलेले प्रसंग , आणि कलाकारांनी त्यावर केलेली मेहनत पाहून लेखक,दिगर्शकालाही चेव येणं साहजीकच आहे . या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता अनेकांच्या घरातील एक सदस्य झालेला आहे . यातील राघव , विनय , अभिमान , शाल्मली , काव्या , आकांशा , श्रीकांत आणि आता नवीन आलेले पण या लव्ह लग्न लोचा च्या कुटुंबात पूर्णपणे मुरलेले ऋता आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देतात  यात घडणारे सगळेच लोचे आता सर्वांनाच स्वतःचे आपले वाटतात. मग राघवच नक्की प्रेम कोणावर ? काव्य आणि ऋता चा वाद संपणार का  , गावावरून आलेला राजा या कुटुंबात एकरूप होईल का ?  अभिमानान शाल्मली च बाळ नक्की कोणावर जाणार , श्रीकांत खरंच चांगलं वागतोय कि नाटक करतोय आणि सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे विनय आणि आकांशा यांचे लग्न होणार कि नाही ??  … या सर्व प्रश्नांची उत्तरे हि मालिका पाहता पाहता प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळूवून ठेवत आहेतच पण आता यातील  विनय आणि आकांक्षांच्या लग्नाचा प्रश्न मात्र छानप्रकारे सुटला आहे . सध्या मालिकेत सगळी मंडळी विनय आणि आकांशाच्या लग्नाची तयारी करत आहेत .  त्यात आता बॅचलर पार्टी होणार आहे

मानवी हक्क व अधिकाराचा पाया मुल्यात्मक आहे- श्रीपाल सबनीस

0
पुणे-जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने जनजागृती पदयात्रा महात्मा ज्योतीबा फुले वाड्यातुन  करण्यात आली.या पदयात्रेत एस पी कॉलेजच्या विद्यालयाने पथनाट्याव्दारे जनजागृती केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत मानवी हक्क संस्कृती व शिक्षण वृद्धीसाठी मानवी हक्क संरक्षण व संवर्धन या विषयावर वत्कृत्व स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच समाजात सामाजिक क्षेत्रातुन अरुण पवार पत्रकारीता क्षेत्रातील गोविंद वाकडे ,न्युज १८लोकमत, साहित्य क्षेत्रातील डॉ.अविनाश सांगोलेकर , कला क्षेत्रातील आनिल दिक्षीत , उद्योग क्षेत्रातील जितेंद्र जोशी, प्रशासकीय सेवा शैक्षणिक क्षेत्रातील राजीव मिस्रा तर सांस्कृतिक कला क्षेत्रातील सुभाष यादव यांना   श्रीपाल सबनीस  , आमदार मेधा कुलकर्णी , बालहक्क आयोग सदस्य आसमा शेख, सामाजिक कार्यकर्ते मौलना काजमी , नगरसेविका आरती कोंढरे, संस्था अध्यक्ष विकास कुचेकर , संचालक आण्णा जोगदंड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश लालबिगे , मुंबई -ठाणे पालघर विभाग प्रमुख शकील शेख यांच्या हस्ते ” मानव अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना संविधान हाच राष्ट्र गंथ आहे संविधान हे एका जातीचे,एका धर्माचे नाही.महात्म्याला महामानवाला जात धर्माचे दरवाजे बंद करुशकत नाहीत.मानव अधिकाराचा पाय मुल्यात्मक आहे.असे मत प्राचार्य माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
      यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मानवी हक्क ,अधिकार हा विषय खुप व्यापक आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय बुद्धीच्या आधारे सांविधान बनविले आहे.त्याची वेळोवेळी पायमल्ली होत आहे. यासाठी शासन स्थरावर प्रयत्न अजून व्यापक व्होयाला हवेत. हक्क व अधिकाराशिवाय कर्तव्याची जाणीव मानसाला उपजत नाही.तथ्याशी तडजोड करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य होवू शकत नाही असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन मोरे, अरुन मुसळे, विकास शाहाणे , कपिल लांबे , प्रकाश बोदाडे आनिल अँब्राल  सर्व सभासद पदाधिकारी यांनी केले.आभार संचालक आनिल कदम यांनी मानले तर सुत्र संचालन मोनीका जोशी यांनी केले.

नागरिकांना समस्या नसेल तो दिवस लोकप्रतिनिधींसाठी दिवाळी चा -भिमाले(व्हिडीओ)

0

पुणे -महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र 28 सॅलिसबरी पार्क महर्षीनगर मधील इंदिरा नगर,औद्योगिक,मीनाताई ठाकरे वसाहत येथे सुमारे 2कोटी रू. च्या विविध विकास कामांचा शुभारंभ “एक घर एक नळ” समान पाणी पुरवठा योजनेचे तसेच ड्रेनेज लाइन टाकणे,विद्युत पोल बसवून प्रकाश व्यवस्था करणे.व दिशा दर्शक फलक बसविण्यात आले या सर्व कामांचा आज शुभारंभ पुणे महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व मा.नगरसेविका सौ. वंदनाताई भिमाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शासकीय योजना आपल्यादारी मध्ये विकलांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व कृत्रिम अवयव घेण्यासाठी अर्थ साहाय्य करण्यात येणार आहेत. कृत्रिम अवयव व सायकल
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मोफत पी.एम.पी.एल.बस पास.तसेच सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींना प्रोत्साहन व भविष्यात त्यांना मदत मिळावी. व पुणे महापालिका वैद्यकिय सहाय्य योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रभागातिल नगरसेविका सौ. कविताताई वैरागे. नगरसेविका राजश्रीताई शिळीमकर.नगरसेवक.प्रवीण चोरबेले. डाॅ.भरत वैरागे. अविनाश शिळीमकर. रमेश बिबवे. बाळासाहेब शेलार. गणेश शेरला. विकास मोरे.बाबा साळवे. भा.ज.पा.कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

नागरी हक्क सुरक्षा समितीचा जुन्नर मध्ये मूक माेर्चा

0

जुन्नर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जुन्नर येथील
शिवनेरी किल्लयावर कार्यक्रमास जात असताना, काही गुडांनी
त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मात्र, याप्रकरणी
पाेलीसांनी सदर गुंडावर तात्काळ एफअायअार दाखल करुन
घेण्यास टाळाटाळ केली असून हल्लेखाेर गुंडाना पाठीशी
घालण्याचे काम पाेलीस प्रशासनाने केले अाहे. याप्रकरणाच्या
निषेधार्थ नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने जुन्नर येथील
शिव छत्रपती प्रवेशद्वार, जुने बसस्थानका जवळून सकाळी
अकरा वाजण्याच्या सुमारास पाच हजार नागरिकांच्या भव्य
मूक माेर्चास सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
पुणे विभागाचे संघचालक श्री.अप्पा गवारे यांनी शिवप्रतिमेस
पुष्पहार अर्पण केला.
संघ कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्लयानंतर,
पाेलीसांनी मारहाण केलेल्या गुंडाच्या दबावाला बळी पडून
विनाकारण त्यांची विराेधात तक्रार नाेंदवून घेतली. सदरची
घटना ही सामान्य नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण
निर्माण करणारी असून पाेलीस व प्रशासनाला काळीमा
फासणारी अाहे. या परिस्थिती करिता जबाबदार असणारे
जुन्नर पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक कैलास घाेडके, ,
एपीअाय पदमभुषण गायकवाड व पीएसअाय साेमनाथ दिवटे
या अकार्यक्षम पाेलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन

करण्यात यावे, जुन्नर शहर व परिसरात धुडगुस घालणाऱ्या
धर्मांध गुंडावर कारवार्इ करावी, महिला व मुलींचे
संरक्षणासाठी जुन्नर शहरात ‘निर्भया पथकाची’ स्थापना
करावी, गाेवंश रक्षणसाठी स्वतंत्र पाेलीस अधिकाऱ्याची
नेमणूक करण्यात यावी, जुन्नर शहरातील अतीसंवेदनशील
भागांमध्ये छाेटया पाेलीस चाैक्या उभारुन गस्त पथकाची
नेमणूक करण्यात यावी, साेशल मिडियावर सातत्याने
महापुरुष व देवीदेवतांचे हाेणारे विटंबन राेखण्यासाठी
चाैकशी हाेवून संबंधीतांवर कडक कायदेशीर करण्यात यावी
अशाप्रकारचे निवेदन जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना
नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात अाले. नागरी
सुरक्षा समितीचा माेर्चाचे संयाेजन शामराव धुमाळ, संदेश
भेगडे यांनी केले.