पुणे-जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने जनजागृती पदयात्रा महात्मा ज्योतीबा फुले वाड्यातुन करण्यात आली.या पदयात्रेत एस पी कॉलेजच्या विद्यालयाने पथनाट्याव्दारे जनजागृती केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत मानवी हक्क संस्कृती व शिक्षण वृद्धीसाठी मानवी हक्क संरक्षण व संवर्धन या विषयावर वत्कृत्व स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच समाजात सामाजिक क्षेत्रातुन अरुण पवार पत्रकारीता क्षेत्रातील गोविंद वाकडे ,न्युज १८लोकमत, साहित्य क्षेत्रातील डॉ.अविनाश सांगोलेकर , कला क्षेत्रातील आनिल दिक्षीत , उद्योग क्षेत्रातील जितेंद्र जोशी, प्रशासकीय सेवा शैक्षणिक क्षेत्रातील राजीव मिस्रा तर सांस्कृतिक कला क्षेत्रातील सुभाष यादव यांना श्रीपाल सबनीस , आमदार मेधा कुलकर्णी , बालहक्क आयोग सदस्य आसमा शेख, सामाजिक कार्यकर्ते मौलना काजमी , नगरसेविका आरती कोंढरे, संस्था अध्यक्ष विकास कुचेकर , संचालक आण्णा जोगदंड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश लालबिगे , मुंबई -ठाणे पालघर विभाग प्रमुख शकील शेख यांच्या हस्ते ” मानव अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना संविधान हाच राष्ट्र गंथ आहे संविधान हे एका जातीचे,एका धर्माचे नाही.महात्म्याला महामानवाला जात धर्माचे दरवाजे बंद करुशकत नाहीत.मानव अधिकाराचा पाय मुल्यात्मक आहे.असे मत प्राचार्य माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मानवी हक्क ,अधिकार हा विषय खुप व्यापक आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय बुद्धीच्या आधारे सांविधान बनविले आहे.त्याची वेळोवेळी पायमल्ली होत आहे. यासाठी शासन स्थरावर प्रयत्न अजून व्यापक व्होयाला हवेत. हक्क व अधिकाराशिवाय कर्तव्याची जाणीव मानसाला उपजत नाही.तथ्याशी तडजोड करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य होवू शकत नाही असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन मोरे, अरुन मुसळे, विकास शाहाणे , कपिल लांबे , प्रकाश बोदाडे आनिल अँब्राल सर्व सभासद पदाधिकारी यांनी केले.आभार संचालक आनिल कदम यांनी मानले तर सुत्र संचालन मोनीका जोशी यांनी केले.