Home Blog Page 3224

नेमके काय घडले महापौर बंगल्यावर ? (व्हिडीओ)

पुणेकरांच्या ३२० कोटीच्या चुराड्यासाठीबहुमताची ब्रिगेड वापरून घेणारा नेता आहे तरी कोण ?
पुणे- एकीकडे २४ तास पाण्याच्या योजनेच्या नावाने , ती राबविण्यापुर्वीच शेकडो कोटी हिसकावण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच असताना , आता एक तथाकथित नेता पुणेकरांच्या ३२० कोटीच्या चुराड्यासाठी बहुमताची ब्रिगेड यशस्वीपणे वापरून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे . यासाठी पुण्याच्या महापौर बंगल्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची ,नगरसेवकांची एक बैठक(शाळा )घेण्यात आली . ज्यास आयुक्तांची प्रमुख उपस्थिती होती . मात्र या बैठकीची माहिती अन्य पक्षाच्या नगरसेवकांना किंवा माध्यमांना देण्यात आली नव्हती .आणि बैठकीस उपस्थित असलेल्या काही नगरसेवकांनी आम्हास बाहेर काही बोलू नका अशी तंबी देण्यात आल्याचे सांगितल्याने  या बैठकीत नेमके काय घडले ? याबाबत औत्सुक्य निर्माण झाले होते .
ज्या शहरात बाईक असल्याशिवाय नौकरी मिळत नाही , बाईक ही प्रत्येकाची गरज झाली आहे . ज्या शहराने टांगा सोडून रिक्षा आणली .आणि सायकलीचे शहर म्हणून ज्याची कधी काळी गणना झाली होती . ते शहर आता बाईक चे शहर म्हणून ओळखले जात असताना ते पुन्हा सायकलींचे शहर करण्याच्या अव्यवहार्य आणि अशक्यप्राय अशा गोष्टीसाठी एकदा १२० कोटीचा चुराडा केल्यानंतर पुन्हा एकदा ३२० कोटीच्या चुराड्यासाठी सामोरे जात आहे . महापालिकेच्या मुख्य सभेत गुरुवारी या चुराड्याला संमती देण्यासाठी बुधवारी रात्री पुण्याच्या महापौर बंगल्यावर बहुमताची ब्रिगेड सज्ज करण्यात आली आहे .
अलिशान मोटारींमध्ये ..कधी विमानांतून फिरणारे १०० नगरसेवक ,आयुक्त,महापौर ,पदाधिकारी ,नेते आणि ठेकेदार,नाईलाजास्तव का होईनात पण सायकल शेअर योजना शहरावर लादण्यासाठी पुणेकरांच्या ३२० कोटीची उधळण करणार आहेत . हि योजना आणि रक्कम पुणेकरांच्या संख्येच्या हिशेबाने पाहिली तर प्रत्येकाच्या घरातून ३ हजार २०० रुपये हिसकावून नेणारी ठरणार आहे .
पूर्वी पुण्यात एका बड्या वृत्तपत्रसमुहाने ‘सायकलचालवा’अभियान राबविले होते, जे केवळ त्यांच्याच वृत्तपत्राचे असंख्य पाने भरू शकले . आणि प्रत्यक्षात हे अभियान केवळ प्रसिद्धी चा रंगीत झरोका ठरले . जे पुणेकरांना व्यवहारात शक्य नाही ,ते पुणेकरांना करायला लावणारा हा अट्टाहास पूर्वी पुणेकरांचेच १२० कोटी रुपये गिळंकृत करून बसला आहे . पूर्वीच्या सायकल मार्गावरून कोणत्याही नेत्याने ,कमिशनराने,अभियंत्याने किंवा पुणेकरांनी सायकलीचा वापर दैनंदिन जीवनात आचरणात आणणे अव्यवहार्य ठरविले .आणि वापरले तर नाहीतच पण ते अस्तित्वात असलेल्या वाहतुकीला अडथळे मात्र ठरू लागले . त्यामुळे अनेक ठिकाणी त्यावरून इमर्जन्सी म्हणून काहींनी बाईक चालविणे पत्करले तर अनेक ठिकाणी काहींनी त्याचे पार्किंग लॉट बनले अखेर असंख्य सायकल मार्ग हळू हळू गायब होत गेले. आता महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि भाजपा मधील एक बडी हस्ती यांनी पुण्यावर पुन्हा सायकल मार्गांची आणि सायकल शेअरिंग नावाची योजना लादून पुणेकरांच्याच ३२० कोटीच्या चुराड्यासाठी बाह्या मागे केल्या आहेत.
हि योजना महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर व्हावी यासाठी आज संध्याकाळी महापौर बंगल्यावर बहुमत असलेल्या सत्ताधारी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली . यावेळी नगरसेवकांची मते विचारात घेण्या ऐवजी कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे . असा सूर आवळण्यात आला . आणि याबाबत बाहेर कुठेही काहीही बोलू नका अशी ताकीद हि देण्यात आली .असे वृत्त आहे .महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे शहराध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.सुमारे 3 तास हि बैठक चालली . अनेकांनी आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला . परंतु अंतिम निर्णय मात्र ,हा प्रस्ताव मंजुरीचाच राहिला . अखेर पक्षाचा व्हीप काढण्यात आल्याचे हि सांगण्यात आले .
दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले ,’ असे काही नाही , आम्ही या प्रस्तावाबाबत आमच्या पक्षातील नगरसेवकांना सविस्तर माहिती दिली . जी त्यांना देणे आवश्यक होते.
एकीकडे हा सायकल योजनेचा प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी आयुक्त कुणालकुमार का प्रयत्नशील आहेत हे मात्र समजू शकले नाही . व्यायाम , योगा आरोग्यासाठी सायकल वगैरे सारे ठीक आहे. या साठी ज्यांना वेळ देता येवू शकतो ते हे करतात देखील . . पण जिथे दैनंदिन व्यवहारात पीएमपीएमएल ची बस परवडत नाही , अव्यवहार्य ठरते , आणि बाईक च उपयुक्त ठरते ,तिथे अशा सायकल योजना माथ्यावर मारण्याचे प्रयत्न का होतात ? हा साधा प्रश्न आहे .हेच ३२० कोटी पीएमपीएमएलला देवून बस सेवा सदृढ करता येणार नाही काय ?असे ३२० कोटी अशा योजनेला खर्च करणे म्हणजे प्रत्येक घरातून ३२०० रुपये काढणे कितपत योग्य आहे . असे सारे प्रश्न असताना त्यंना बगल देत बहुमताची ब्रिगेड हि योजना मान्य करवून घेण्यासाठी वापरून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे .

७ वे इंडिया सुपरबाईक फेस्टिवल पुण्यात लवकरच

0
पुणे: भारतातील सर्वात मोठा आणि ज्यासाठी सर्व बाईकप्रेमी  उत्सुक असतात असा फेस्टिवल म्हणजेच इंडिया सुपरबाईक फेस्टिवल (आएसएफ) आपल्या  ७ व्या आवृत्तीसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आयएसएफ हा सर्वात लोकप्रिय सुपरबाइक फेस्टीवल आहे जो अमनोरा पार्क टाऊन, ओपन ग्राउंड, पुणे येथे होणार आहे. शनिवार दिनांक १६ डिसेंबरला दुपारी ३ ते रात्री १० आणि रविवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत  हा महोत्सव सुरू राहील. कार्यक्रमाचे आयोजक आणि सुपर बाईकर अमोल तळपदे यांनी आज ही माहिती  जाहीर केली.
“आयएसएफ हा 600 सीसी आणि  त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक प्रस्तृत करणारा भारतातील पहिला सुपरबाइक फेस्टीवल आहे.  सुपरबाईकचे मालक येथे आपल्या वैविध्यपूर्ण आणि खास बाईक आणतात. ह्या प्रदर्शनात बाईकप्रेमींद्वारा बाईकमध्ये केलेल विविध प्रयोग, संपूर्ण भारतातुण आलेल्या अनोख्या बाईक आणि बाईकमध्ये केलेले विभिन्न आविष्कार पहावयास मिळतात.
या प्रसंगी बोलताना  आयोजक तळपदे यांनी सुपरबाईक मालकांच्या सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “आपल्याला सुपरबाईकची योग्य काळजी घेणे व सुरक्षिततेसह चालवणे आवश्यक आहे कारण राइडर आणि त्याच्या सभोवतालचे लोक हे अतिशय धोकादायक असू शकतात.”
आयएसएफच्या ७ व्या आवृत्तीमध्ये भारतीय सुपरबाईकर्स, बाइकिंग क्लब आणि क्लब्स भाग घेतील यात सर्वोत्कृष्ट ऍक्सेसराइझ्ड मोटरसायकल, किंग ऑफ बर्नआऊट, लाऊडेस्ट मोटरसायकल अशा वेगवेगळ्या श्रेणींच्या बाईक सहभागी होणार आहेत जसे की 600 सीसी ते 800 सीसी, 800 सीसी ते 1000 सीसी आणि 1000 सीसीपेक्षा जास्त. वर्ष 2017 चे सुपरबाईकरचे शीर्षके जिंकण्यासाठी सर्व सुपर बाईकर्स मध्ये कठीण लढत होऊ शकते.
२०१२ मध्ये सुरु झाल्यापासूनच हा फेस्टीवल भारतातील सुपरबाइक आणि सुपरकार मालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला होता. गेल्या काही वर्षांमध्ये तो पेट्रोलपंपांवरली  मेक्का बनला आहे आणि आज मोठ्या संख्येने बाइकिंग प्रेक्षकांना आकर्षित करते . हा कार्यक्रम भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटो शो म्हणून ओळखला गेला आहे.
ह्या इव्हेंटमध्ये आपल्या पाहुण्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर देखील विशेष लक्ष दिले जाईल आणि एफ एंड बी आणि फूड ट्रकची सर्व व्यवस्था करण्यात येईल.
 तारीख: – शनिवार 16 डिसेंबर – दुपारी 3 ते 10
               रविवार  17 डिसेंबर – सकाळी 11 ते रात्री 10
     स्थळ-अमनोरा टाऊन सेंटर मॉल – ओपन ग्राउंड, मगरपट्टा, पुणे

बागा सुस्थितीत राखणे शहराच्या आरोग्यासाठी महत्वाचे – शौनक अभिषेकी.

0
पुणे-शहरातील सर्व बाग सुस्थितीत राखणे व त्यांची उत्तम निगा राखणे हे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे  प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांनी म्हटले आहे…नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या बजेट तरतुदीनुसार शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात स्प्रिंकलर बसविणे व अन्य विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,मी ह्या बागेच्या उदघाटन समारंभास ही हजर होतो आणि आज यातील अनेक विकास कामांचे व स्प्रिंकलर बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद वाटतो,आता सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन माझ्या वडिलांच्या (पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा) नावावर असलेले उद्यान खुले करावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केलीयावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” बाग ह्या शहराची फुफ्फुसे असून त्यांच्यामुळे शहराचे सौंदर्य ही खुलते,बागांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा वावर असतो व येथे योगक्रिया,हास्यक्लब,व्यायाम यासह फिरायला ही नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात,या बागेत येणारे नागरिक विविध सूचना करत असतात ,या सूचनांनुसारच मी बजेट मध्ये तरतुदी टाकल्या असून नागरिकांनी सुचविलेल्या कामाचेच भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे असे ही त्या म्हणाल्या.ह्या बागेचे उदघाटन महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या हस्ते झाले होते आणि आज त्यांच्या जयंतीदिनी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माझ्या विकासनिधीतून होत आहे याचा मला अभिमान वाटतो असे ही त्या म्हणाल्या.मुंडे साहेब नेहमी म्हणायचे कि लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यावर भर द्यावा,त्यामुळेच मी प्रभागातील मोठ्या प्रकल्प/योजना यांच्या आधी नागरिकांनी सुचविलेली छोटी छोटी कामे करण्यावर भर दिला असल्याचे ही सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी महानगर संघचालक बापू घाटपांडे,भैय्यासाहेब रुईकर,ताथवडे गार्डन ग्रुप चे पांडुरंग तावरे,सुनील नखाते,सौ वनिता ताथवडे ,नगरसेवक दीपक पोटे,जयंत भावे,प्रशांत हरसुले,बापूसाहेब मेंगडे,बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,राज तांबोळी,सुयश गोडबोले,सुवर्ण काकडे,सुलभ जगताप,माणिकताई दीक्षित,एड प्राची बगाटे,सुधीर फाटक,सुशीला साठे,सतीश मोहिते,निलेश गरुडकर,नारायण वायदंडे,छाया सोनावणे,जगदीश डिंगरे इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले ” आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुक करा पण चुकले तर कान धरायचा अधिकार ही पुणेकरांचा आहे ,पुणेकरांनी आम्हाला जे भरभरून बहुमत दिले आहे त्याचा मान राखून शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ही ते म्हणाले.बापूसाहेब घाटपांडे व भैय्यासाहेब रुईकर यांनी प्रभागातील चार ही नगरसेवक उत्तम समन्वय राखत चांगले काम करत असल्याचे सांगितले.गार्डन ग्रुप च्या वतीने सुनील नखाते यांनी नागरिकांच्या विविध कामांच्या अपेक्षांबद्दल ची माहिती दिली व ही सर्व कामे मंजुश्री खर्डेकर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यान ही लवकरच नागरिकांसाठी खुले होईल असे वचन नगरसेवक जयंत भावे,दीपक पोटे व मंजुश्री खर्डेकर यांनी उपस्थितांना दिले,
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस राज तांबोळी यांनी सूत्र संचालन तर प्रभागाचे सरचिटणीस राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा -डॉ. अरूण निगवेकर

0
पुणे :“ देशात प्रत्येक नवजात बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळायला पाहिजे. त्यासाठी संबंधित कायद्यांची प्रामाणिक अंमलबजावणी झाली पाहिजे.,”असे प्रतिपादन  विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर यांनी केले.
बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे आणि एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापनाचे माजी प्राध्यापक डॉ. अरविंद अ. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या सप्तरंग, आपले व्यवस्थापन आपल्या हाती आणि अध्यात्म चिंतन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निगवेकर बोलत होते. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ प्रा.डॉ.प्र.चिं. शेजवलकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. रामभाऊ जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे व बुकमार्क पब्लिकेशनचे श्री.पराग पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. अरूण निगवेकर म्हणाले,“२१ व्या शतकात शिक्षण पद्धतीची खर्‍या अर्थाने उकल करून चर्चा होत नाही. भारतातील राज्या-राज्यातील शिक्षणपद्धतीत मोठ्या प्रमाणात फरक आहे. तरी सुद्धा तेथील शिक्षक वर्ग विद्यार्थांना ज्ञान देण्याचे कार्य उत्तम पद्धतीने करीत आहेत. आपल्या देशातील युवकांसमोर सर्व प्रकारच्या नवनिर्मितीचे आह्वान आहे. पण त्यांनी माणुसकी मात्र विसरता कामा नये. मानवा-मानवाला एकत्रित कसे करता येईल, यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन होणे गरजेचे आहे.”
“जग बदलत आहे आम्ही २००१ ते १० या एका दशकाद्वारे २१ व्या शतकामध्ये प्रवेश केला आहे. केवळ स्वातंत्र्य मिळवून देणार्‍यांविषयी कृतज्ञतेला चिकटून बसणे हे योग्य नाही. त्यामुळे २१ व्या शतकातील पिढीने आधुनिक शिक्षणाचा ध्यास घेऊन माणुसकीसुद्धा जपली पाहिजे.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ दासबोध हा व्यवस्थापनावरील सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे. त्यात व्यवहार आणि जीवन कसे जगावे याचे सुद्धा सखोल ज्ञान रामदास स्वामींनी नमूद केले आहे. ज्याचा उपयोग आजच्या युगात सुद्धा होत आहे. त्यामुळेच २१ व्या शतकात विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय करण्याचे ज्ञान नव्या पिढीला द्यावे लागेल. प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये याचे सार समाविष्ट झालेले आहे.”
डॉ. अरविंद कुलकर्णी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,“ तीन पुस्तकांचे प्रकाशन एकाच वेळी होणे हा माझ्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या ५० वर्षांच्या कालखंडामध्ये आलेल्या अनुभवातून या पुस्तकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. मोजकेच वाचावे, त्याचे मनन करावे, त्यानंतर त्याचे चिंतन करावे या पद्धतीने जीवन जगतांना त्याचे कसे व्यवस्थापन करावे इ. गोष्टींचा समावेश यात सामवलेला आहे.”
डॉ.शेजवलकर म्हणाले,“ आपण अमेकिन, जपानी इ. व्यवस्थापन पद्धतींचे अध्यापन करतो. पण भारतीय व्यवस्थापन पद्धती देशातील प्रत्येक विद्यापीठामध्ये शिकविली गेली पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांनी जीवनाचे खरे व्यवस्थापन आपल्या ग्रंथांतून मांडले आहे. त्यामुळे नव्य पिढीला शिक्षण देतांना त्यात अध्यात्माचाही समावेश करावा. शहरी, ग्रामीण, कृषी, एकंदरीत सर्व क्षेत्रात व्यवस्थापन कसे असते, हे लेखकांनी आपल्या अनुभवातून त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.”
डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले,“ प्रा. अरविंद कुलकर्णी यांनी अध्यात्मावर पुस्तक लिहिले आहे. हा अतिशय बोजड समजला जाणारा विषय त्यात अगदी सोप्या पद्धतीने सांगितला आहे.”
रामभाऊ जोशी म्हणाले,“ अध्ययन, मनन आणि चिंतन करून लेखकांने या तीन पुस्तकांची निर्मिती केली आहे. यात मानवी स्वभाव आणि उच्च विचारांचे दर्शन घडते.
यावेळी अस्मिता साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
  श्री. पराग पिंंगळे यांनी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या पाठीमागील भूमिका स्पष्ट केली.
प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अपर्णा दीक्षित यांनी आभार मानले.

खा. अनिल शिरोळेंंनी घेतली ‘स्मार्ट सिटी’ आढावा बैठक

0

पुणे-स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवडी भागातील सुरू असलेल्या कामांची शिरोळे ह्यांनी १५ दिवसांपूर्वी ह्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. त्या दरम्यान त्यांनी परिहार चौकातील रस्ता तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत बनविण्यात येणार्‍या बागेची पाहणी देखील केली होती. त्याचाच पुढील भाग म्हणून उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते. ह्या बैठकीला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ह्यांच्या समवेत एमएनजीएल, बीएसएनएल, महानगर पालिकेतील पाणीपुरवठा, वाहतूक अशा अन्य संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वेगवेगळ्या विभागांच्या कामाची माहिती तसेच त्याचे आगामी नियोजन ह्याबाबत शिरोळे ह्यांनी चर्चा करून आवश्यक त्या सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच आगामी कलावधीत होणार्‍या कामांचा साप्ताहिक मागोवा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी बैठकीचे निश्चित करण्यात आल्याचे सीईओ राजेंद्र जगताप ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

स्टीवन स्पीलबर्ग की ‘द पोस्ट’ को गोल्डन ग्लोब अवार्ड में मिले 6 नामांकन!

0

खबर यह है कि टॉम हैंक्स और मेरिल स्ट्रिप अभिनीत ‘द पोस्ट’ ने गोल्डन ग्लोब अवार्ड में 6  नामांकन प्राप्त किए हैं।

टॉम हैंक्स को सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार के लिए नामित किया गया है। मेरिल स्ट्रीप को भी सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार के लिए नामित किया गया है। फिल्म को भी सर्वश्रेष्ठ चित्र नाटक के लिए नामांकन मिला है। वही स्टीवन स्पीलबर्ग को सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार के लिए नामित किया गया है। इसके अलावा फिल्म को सर्वश्रेष्ठ ओरिजनल स्कोर और सर्वश्रेष्ठ पटकथा के लिए भी नामित किया गया है।

“द पोस्ट” कैथरीन ग्राहम (स्ट्रीप) की असंगत भागीदारी के बारे में एक रोमांचकारी ड्रामा है, वाशिंगटन पोस्ट की पहली महिला प्रकाशक, और इसके चालित संपादक बेन ब्रैडली (हेंकस), जो न्यू यॉर्क टाइम्स के साथ अपनी पकड़ बनाने के लिए दौड़ लगाते है ताकि सरकारी रहस्यों का विशाल कवर-अप का पर्दाफाश कर सके जो तीन दशक और चार यू.एस. के राष्ट्रपतियों तक फैल गया है।

इस फिल्म में एलिसन ब्री, कैरी कॉन, डेविड क्रॉस, ब्रूस ग्रीनवुड, ट्रेसी लेट्स, बॉब ओडेनर्क, सारा पॉलसन, जेसी पिल्मोन्स, मैथ्यू रिशे, माइकल स्टुल्बर्ग, ब्रैडली व्हिटफोर्ड और ज़ैच वुड्स जैसे बहुप्रशंसित कलाकारों की टोली शामिल है। अपनी रिलीज के करीब “द पोस्ट” बिल्कुल सही दिशा में अपने कदम बढ़ा रही है।

रिलायंस एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत, द पोस्ट स्टीवन स्पीलबर्ग द्वारा निर्देशित है। दिग्गज फिल्म निर्माता एमी पास्कल और क्रिस्टी मैकस्को क्रेगर के साथ भी फिल्म का निर्माण करेंगे। यह फिल्म 12 जनवरी 2018 को भारत में अपनी नाटकीय रिलीज के लिए तैयार है।

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – पुणे जिल्‍ह्यातील 99 हजार 800 शेतक-यांना 311.73 कोटी रक्कमेचा लाभ

0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत या योजनेच्या मार्गदर्शक सुचनानुसार पुणे जिल्ह्यातील  शेतकयांना तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  सभासद शेतकयांसाठी  311.73 कोटी रुपये  रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रक्कमेपैकी  थकबाकीदार शेतकयांना रक्कम  207.47 कोटी रुपये वेळेवर कर्जपरत करणाया सभासद शेतकयांना प्रोत्साहनपर लाभासाठीची  रक्कम  104.25  कोटी रुपये इतकी रक्कम  शेतकयांच्या खाती वर्ग करण्याचे कामकाज चालू आहे. यापैकी आज अखेर पर्यंत एकूण 38 हजार 915  थकबाकीदार शेतकयांना  रक्कम  207.47 कोटी  रुपये   60 हजार 885 शेतकऱ्यांना  प्रोत्साहनपर लाभाची रक्कम  104.25 कोटी रुपये इतकी रक्कम संबंधित शेतकयांच्या खात्यावर वर्ग करण्यांत आलेली आहे. तसेच या व्यतिरिक्त पुनर्गठन केलेल्या 1,031 शेतकरी सभासदांना  4.21 कोटी  रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्‍हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.

पुणे जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीयीकृत बँकांच्‍या कर्जदार शेतकयांची या योजनेबाबतची माहिती प्राप्‍त करुन घेण्‍याचे कामकाज सुरु आहे, असेही ते म्‍हणाले.

            शेती हा आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे.  शेतात राबणारा बळी राजा आनंदी रहावा, यासाठी शासन प्रयत्‍न करीत असते. तो संकटात असेल तर त्‍याला उभारी येण्‍यासाठी मदतीचा हात शासन देत असते. या प्रयत्‍नांचाच एक भाग म्‍हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना म्‍हणजे ऐतिहासिक महाकर्जमाफी  देण्‍याचा शासनाने निर्णय घेतला. कर्जमाफी हा शेवटचा उपाय नसून शेतक-यांच्‍या विकासासाठी शेतीमध्‍ये गुंतवणूक वाढवण्‍याचेही धोरण शासनाने अवलंबिले आहे. राज्‍य शासनाने घेतलेला  हा देशातील सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय होता. यापूर्वी  पंजाब राज्‍य शासनाने 10 हजार कोटी रुपये, आंध्र प्रदेश राज्‍य शासनाने 15 हजार कोटी रुपये, कर्नाटक राज्‍य  शासनाने 8 हजार कोटी रुपये आणि तेलंगणा राज्‍य शासनाने 10 हजार कोटी रुपये कर्जमाफ केले होते. त्‍या तुलनेत महाराष्‍ट्र शासनाने सुमारे 34 हजार कोटी रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोणतीही अट न ठेवेता सरसकट कर्जमाफीची ही योजना असून यामध्‍ये दीड लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ झाले.

पुणे जिल्‍ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 99 हजार 800 सभासद

शेतकयांना  311.73 कोटी रुपये इतक्या रक्कमेचा लाभ या योजने अंतर्गत देण्यात आलेला आहे.

.क्र.

तालुका

कर्जमाफी मिळालेले

प्रोत्साहनपर लाभ मिळालेले

शेतकरी संख्या

रक्कम

शेतकरी संख्या

रक्कम

1

आंबेगाव

1,341

5,90,52,660.57

5,630

9,19,22,815.79

2

बारामती

5,934

35,71,38,062.50

6,012

11,27,82,404.00

3

भोर

2,857

14,07,94,258.70

4,681

7,99,55,367.50

4

दौंड

8,544

50,05,70,470.63

3,578

7,36,25,441.00

5

हवेली

1,182

6,57,18,799.00

1,760

3,09,42,053.00

6

इंदापूर

7267

34,97,72,621.79

3,613

7,44,47,201.45

7

जुन्नर

925

4,68,10,030.28

7,007

11,69,29,365.92

8

खेड

1,971

8,36,54,830.49

12,407

17,69,38,656.30

9

मावळ

2,655

14,45,28,924.45

2,596

4,38,01,393.59

10

मुळशी

781

2,57,78,969.72

1,209

1,91,02,838.50

11

पुरंदर

1,442

7,70,11,992.86

4,337

7,60,34,892.00

12

शिरुर

3,306

19,53,64,379.90

7,285

13,42,09,060.35

13

वेल्हा

710

2,85,82,319.53

770

1,19,04,626.00

एकूण

38,915

207,47,78,320.42

60,885

104,25,96,115.40

या योजनेत  पीक कर्जाबरोबरच शेती संलग्‍न पुनर्गठित कर्जाचा देखील समावेश करण्‍यात आला.  कर्जमाफी देतांना शेतक-याचा आधार क्रमांक बँक खात्‍याशी संलग्‍न करुन खात्‍यांची पडताळणी करण्‍यात आली. सर्वाधिक गरजूंना अधिक मदत देण्‍यात तत्‍व कर्जमाफीसाठी वापरण्‍यात आले.असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .

शिवसेना गटनेत्यांनी केला रामराज्याचा संकल्प (व्हिडीओ)

0

पुणे- शिवसेनेचे महापालीकेतील गट नेते आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज येरवडा -रामनगर परिसरात आनंदमेळा संपन्न झाला . १२ डिसेंबर रोजी भोसले यांचा वाढदिवस असतो. या दिवशी त्यांनी येथे रामराज्य (सुराज्य ) आणण्याचा संकल्प केला . या परिसरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छ्या द्यायला गर्दी केली होती . तसेच लहान मुलांसाठी येथे यात्रेत असणाऱ्या सर्व खेळण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या ..पहा एक व्हिडीओ रिपोर्ट …

संगीता शेट्ये याना ‘वॉव ‘ अवॉर्ड

0

पुणे :

रेकी तज्ज्ञ संगीता राजेश शेट्ये यांना रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल अलीकडेच ‘वॉव अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले .

ब्लिस पब्लिकेशन्स ने मुंबईत आयोजित समारंभात अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . रेकी हीलिंग आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्या २ दशके कार्यरत आहेत. ‘तणावमुक्तीसाठी सकारात्मकता वाढवा ‘,’रिलेटिंग इमोशन्स एन्ड डिसीज ‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत . या विषयावर त्यांनी व्याख्याने देऊन जनजागृती केली आहे,आणि विपुल लेखन केले आहे .

यावेळी पारुल बिन्दाल ,संदीप सोपारकर ,आशय वाघोलीकर ,राल्फ भास्करन ,रिदम वाघोलीकर उपस्थित होते

प्रा. चेतन दिवाण यांना मानवाधिकार पुरस्कार प्रदान

0

पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवाण यांना मानसिक आरोग्य क्षेत्र तसेच संशोधन व अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानवाधिकार- प्रखर शोध मोहीम सोसायटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशेष मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले.

१० डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून राज्यमंत्री मधुकर कांबळे, येरवडा पुणे काराग्रहाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, निवृत्त ब्रिगेडीअर विजय अरोरा, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक प्रसाद अक्कानौरू, पुणे दहशतवाद विरोधी पथकचे स.पो.आयुक्त भानुप्रताप बर्गे, पुणे महानगरपलीकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व मानवाधिकार-प्रखर शोध मोहीम सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू गवळी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभाग्रहामध्ये हा पुरस्कार सोहळा  संपन्न झाला.

मानवाधिकार- प्रखर शोध मोहीम सोसायटी ही देशपातळीवर मानवी हक्क व अधिकारांवर काम करणारी राष्ट्रीय संस्था असून संस्थेमार्फत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी मानवाधिकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो. यापूर्वी २००९ पासून जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अन्ना पठारे, कामगार नेते भाई वैद्य, पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, सिने अभिनेते श्रीराम लागू, माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील आदींना मानवाधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले असून यावर्षी प्रा. चेतन दिवाण यांनी देशभरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाच्या पुनर्वसनासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये तसेच त्यासंदर्भातील संशोधन व अध्यापन क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेने त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. चेतन दिवाण यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, चेअरमन सदानंद देशपांडे, सचिव एम. शिवकुमार, संचालक डॉ. दीपक वलोकर, मानद संचालक डॉ महेश ठाकूर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 12 : योग्य व उत्तम कायदे तयार करण्याचे काम विधीमंडळामार्फत करण्यात येत असून महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या 47 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे उपस्थित होते.

            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाने माहिती अधिकार, सेवाहमी कायदा, जादूटोणा विरोधी कायदा, जात पंचायती विरोधी कायदा असे महत्वाचे कायदे तयार केले आहेत. अस्तित्वात असलेल्या कायद्यात आवश्यकतेनुसार विधीमंडळात चर्चा करुन सुधारणा करण्यात येते. संविधानाने लोकशाही ही उत्तम व्यवस्था  दिली आहे. या व्यवस्थेत माणसं बदलतात, व्यवस्था बदलत नाही. नवीन येणारे प्रतिनिधी सुद्धा या व्यवस्थेप्रमाणे कामकाज करतात. कुठल्याही विचाराचे सरकार आले तरी त्यांना शेवटच्या व्यक्तीचा विचार करावा लागतो. संविधानाने समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. लोकप्रतिनीधीच्या माध्यमातून तो विधानमंडळात मांडला जातो. लोकशाही त्रिस्तरीय पद्धती आहेत. थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी माध्यमे चौथा स्तंभ आहे. अर्थसंकल्प पारीत करणे हे महत्वाचे काम विधानमंडळामार्फत केले जाते. कुठलाही खर्च करताना सरकारला विधीमंडळाची मान्यता घ्यावी लागते. सरकार हे  विधीमंडळाला उत्तरदायित्व आहे. जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धातास चर्चा अशी विविध आयुधे वापरुन प्रश्न सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. विधीमंडळाचे कामकाज कसे चालते ते प्रत्यक्षात बघता यावे यासाठी संसदीय अभ्यास वर्गाची चांगली प्रक्रिया सुरु केली आहे. लोकशाही कागदावर न राहता प्रत्यक्ष पाहता यावी, यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. आजच्या अभ्यास वर्गाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून अनुभव संपन्न व्हावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या.                                                                                                         विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, नवीन धोरणे कोणाच्याही मनाचा कोंडमारा होऊ न देता ठरविली जातात. डिसेंट (सुसंस्कृतपणे) विरोध करण्याची संधी ही लोकशाहीची जादू आहे. आपल्या देशात विविध भाषा, जाती धर्म असूनही सर्वांना एकसंघ बांधण्याचे काम लोकशाहीमुळे झाले आहे. 

            प्रास्ताविक करताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, संसदीय मंडळाचे कामकाज घटनेप्रमाणे चालते. हे कामकाज कसे चालते पाहण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांनी आपण जे शिकतो ते पूर्ण समजून घेऊन शिकले पाहिजे. अर्धवट घेतलेले ज्ञान लक्षात राहात नाही. उज्ज्वल भविष्यासाठी आपण जे शिकतो ते आपल्या लक्षात राहणे अतिशय महत्वाचे असल्याचे  त्यांनी सांगितले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार ॲड.आशिष शेलार यांनी केले. राज्यातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचा पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी सरपंचांनो थोडे राजकारणी व्हा पोपटराव पवार यांचा सरपंचांना सल्ला; पहिल्या सरपंच संसदेचा समारोप

0

पुणे:“ गाव व समाजाच्या विकासासाठी सरपंचांनो, थोड्या फार प्रमाणात चांगले राजकारणी बना. त्याच प्रमाणे आपले गाव हे दलाल मुक्त करा.” असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे मॉडेल व्हिलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पहिल्या सरपंच संसदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नैसर्गिक शेतीचे प्रणेते व सुप्रसिध्द कृषीतज्ञ पद्यश्री श्री. सुभाष पाळेकर हे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भूगर्भ जल सर्वेक्षण आणि विकास समितीचे संचालक शेखर गायकवाड, नेदरलॅड येथील मारगॉट ट्रिबेल्स हे सन्माननीय अतिथी म्हणून उपिस्थत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड , डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील, कुलसचिव प्रा. डी.पी.आपटे व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे ही उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले,“ भविष्यात पंचायतीचे कार्य हे कॉर्पोरेट क्षेत्राच्या हातात जाईल की काय, अशी भीती वाटते. त्यामुळे सरपंचांनी विरोधकांना ऑडिटर म्हणून पहावे व विकास कार्यवर जोर द्यावा. त्यासाठी निर्व्यसनी बना, उत्तम आरोग्य ठेवा आणि गावाची मानसिकता तपासून कार्य करा. कार्य केले नाही, तर सरपंचांच्या हातातून सर्व अधिकार काढले जातील. त्यामुळे सरकारी पैसा आणि लोकसहभागातून चांगले कार्य करावे. आपल्या गावाला भरपूर पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती बरोबरच शाश्‍वत आनंद देणारे बनवावे. विकास करतांना बदल स्वीकारा आणि जुन्याचा समन्वय साधा. ”
“राज्यात ८२ टक्के शेतकरी हा पावसावर अवलंबून आहे. अशा वेळेस आपल्या येथे जलसंधारणाची कामे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण त्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे आम्हाला दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. चांगले कार्य करतांना संघर्ष होतात, हे सदैव लक्षात ठेवा. सरपंचांनी असे कार्य करावे की गावात चावडीचे मंदीर व्हावे.”
शेखर गायकवाड म्हणाले,“आर्थिक स्त्रोत वाढवून सरपंचांनी गावाचा विकास करावा. काम करताना शक्यतो चूक होऊ देऊ नये. २१व्या शतकात आधुनिक विचारांच्या सरपंचांची गरज आहे. त्या माध्यमातून त्यांने गावाची संकल्पना बदलून सुंदर व प्रगत गाव पुढच्या पिढीला दयावे. आपले गावं हे ब्रॅड एम्बेसिडेर होण्याच्या दृष्टीने कार्य करावे.”
मधुकर भावे म्हणाले,“ अजूनही गावा-गावात भारतीय संस्कृती टिकली आहे. त्याचा र्‍हास होवू देऊ नये. त्याच प्रमाणे सरपंचांनी प्रत्येक कार्य करतांना सकारात्मक विचारधारणा ठेऊन कार्य केल्यास ते यशस्वी होते. गोंदिया ते गुहागर येथील सरपंचांनी सामाजिक कार्यासाठी समरसून काम करावे.”
पद्मश्री सुभाष पाळेकर म्हणाले,“ज्या दिवशी गावतला पैसा गावातच राहील, त्या दिवशीच शंभर टक्के ग्राम स्वराज्य निर्माण झाले, असे होईल. ग्रामविकासासाठी प्रत्येक गाव हे आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हावयास हवे. ग्रामविकासाची संकल्पना बदलण्यासाठी सरपंचांच्या खांद्यावर मोठी जवाबदारी आहे. विकास माणसाला सुखी करीत नाही. त्यामुळे विकासाच्या मागे न लागता शेतीला समृद्ध करा. त्यासाठी देशी गाय आणि नैसर्गिक शेती करावी. वृद्धाश्रमात आईला पाठवू नका आणि काळी आई म्हणजे आपल्या शेतीचा र्‍हास करू नका. आई, काळी आई आणि गाय यांचा सन्मान करा.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ सामाजिक कार्यात पदोपदी तुम्हाला अपमान होईल. ते सहन केल्यावरच विकासाला नवी दिशा मिळते. भारतीय संस्कृतीचे दर्शन परंपरा आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून दिसते. आम्हाला सद्गुणांची पूजा करायची आहे. माणसा माणसातील संवाद वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवा. मानवजातीच्या कल्याणसाठी विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय होणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदानी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारतमाता ही ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ संपूर्ण राज्यातून आलेल्या सरपंचांच्या उपस्थितीमुळे ही संसद यशस्वी झाली आहे. पुढील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात व अधिक चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सरपंच संसद भरविली जाईल. त्यातील वक्ते सुद्धा अधिक योग्यतेचे असतील. पण येथून जातांना या सरपंचांमध्ये गुणात्मक फरक झालेला असावा व त्यांनी येथील शिदोरीचा उपयोग ग्रामविकासासाठी करावा.”
पहिल्या सरपंच संसद मध्ये संपूर्ण राज्यातील उपस्थित १२०० सरपंचांनी यावेळेस विकास कार्याची शपथ घेतली. या संसदेत मांडलेल्या ठरावांना राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या संसदेत पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, नागपूर विभाग, अमरावती विभाग, कोकण क्षेत्रातील निवडक सरपंचांनी भाग घेतला होता.
यावेळेस सतीश कुमार व मारगॉट ट्रिबेल्स आपले विचार मांडले.
हभप श्री.ज्ञानेश्‍वर एकनाथ महाजन व श्रीमती भाग्यश्री शांताराम नलावडे या सरपंच प्रतिनिधींनी आपले अनुभव कथन केले.
श्री. योगेश पाटील यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. हरिदास यांनी आभार मानले.

२४ तास पाण्याच्या नावाने महापालिकेत शेकडो कोटीचा झोल करण्याचा वारंवार प्रयत्न (व्हिडीओ)

0

पुणे – २४ तास पाणी योजनेच्या नावाने शेकडो कोटीचा झोल करण्याचा प्रयत्न टेंडर प्रक्रिया राबवितानाच महापालिकेत वारंवार होत असल्याचे खासदार संजय काकडे यांनी निदर्शनास आणून दिले असून , महापालिकेवर पालकमंत्री बापट यांचाच  अंकुश आहे, आम्ही कार्यकर्ते आहोत , हा नेतृत्वाचा  प्रश्न नाही तर पुणेकरांच्या पैशाचा हा प्रश्न आहे ,पुणेकरांचा एक ही पैसा अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने वाया जावू देणार नाही , आणि बापट हे देखील आपल्या भूमिकेशी सहमत आहेत असे स्पष्ट करत   खासदार संजय काकडे यांनी आयुक्त कुणालकुमार यांच्या भुमिकेप्रकरणी संशय व्यक्त होईल अशी विधाने केलीत . याप्रकरणी   आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे आणि ते यात निश्चित लक्ष घालतील असा विश्वास हि व्यक्त केला .

अरुण साने मेमोरियल हौशी लीग टेनिस स्पर्धेत गोल्डन बॉयज् , एमडब्ल्यूटीए, पीसीएमसी, टोपाझ संघांची आगेकुच

0

पुणे पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी लीग टेनिस स्पर्धेत गोल्डन बॉयज् , एमडब्ल्यूटीए, पीसीएमसी व टोपाझ  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गोल्डन बॉयज् संघाने एमराल्ड संघावर 18-1 असा एकतर्फी विजय मिळवला. संतोष जयभाय , प्रशांत गोसावी, डॉ.चारू साठे, सुनिता रावळ, मुकुंद जोशी, अमित पाटणकर आदित्य खतोड व सुरेश घुले यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर गोल्डन बॉयज् संघाने सर्व टाय जिंकत एमराल्ड संघाचा पराभव केला.

दुस-या लढतीत एमडब्ल्यूटीए संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 18 – 6 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. विजयी संघाकडून राजेश मानकोनी, सुनिल लुल्ला,प्रविण पांचाल, निलेश ओसवाल, अशिष मनियार व एस.अभिषेक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

अन्य लढतीत पीसीएमसी संघाने बेसलाईन बॅंबर्स संघाचा 15 – 14 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला. तर टोपाझ संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 17 – 8 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

गोल्डन बॉयज् वि.वि एमराल्ड 18-1(टाय १: ८०अधिक गट: संतोष जयभाय/प्रशांत गोसावी वि.वि डॉ.चारू साठे/सुनिता रावळ 6-0; टाय 2ः मुकुंद जोशी/अमित पाटणकर वि.वि रवी रावळ/ पराग टेपन  6 – 0; टाय 3ः आदित्य खतोड/सुरेश घुले वि.वि सौरभ चिंचणकर/ कौशिक कृष्णन 6-1)

एमडब्ल्यूटीए वि.वि डेक्कन जिमखाना 18 – 6(टाय १: ८०अधिक गट: राजेश मानकोनी/सुनिल लुल्ला वि.वि योगेश नातू/संजय पाटील 6 – 1; टाय 2ः प्रविण पांचाल/निलेश ओसवाल वि.वि पंकज यादव/पुष्कर पेशवे 6 – 3; टाय 3ः अशिष मनियार/ एस.अभिषेक वि.वि नितिन खैरे/श्रीनिवास रामदुर्ग 6-2)

पीसीएमसी वि.वि बेसलाईन बॅंबर्स 15 – 14(टाय १: ८०अधिक गट: प्रविण घोडे/कुरियन थांचाकन पराभूत वि निर्मल वाधवानी/उमेश माने  4 – 6; टाय 2ः राजेश मित्तल/कल्पेश मकानी वि.वि मनु एन/समिर भांबरे 6 – 2; टाय 3ः रवी जौकनी/गिरिश कुलकर्णी पराभूत वि अनंत गुप्ता/गौतम सोपान 5 – 6 (6-8))

टोपाझ वि.वि महाराष्ट्र मंडळ 17 – 8(टाय १: ८०अधिक गट: योगेश पंतसचिव/डॉ.जेम्स वि.वि अर्पित श्रॉफ/कमलेश शहा 6 – 1; टाय 2ः अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि संजय शेट्टी/रवी अज्जामपुडी 6 – 1; टाय 3ः अमित लाटे/राजू कांगो पराभूत वि अभिषेक चौहान/ विक्रम श्रीश्रीमल 5 – 6 (5-7))

कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित करणारा ‘स्पंदन’ १५ डिसेंबरला चित्रपटगृहात

0

नात्यावर भाष्य करणाऱ्या अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आजवर झाली आहे. कौटुंबिक मूल्यांना अधोरेखित करत हरवलेला संवाद पुन्हा साधणारा स्पंदनव्हॉट इज रिलेशनशिपहा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्रह्मचैतन्य एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मीती शैलेश कुलकर्णी, दत्तात्रय नलावडे आणि फडतरे ग्रुप यांनी तर लेखनदिग्दर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले आहे. माणसामाणसांतला विसंवाद वाढलाय हे आपण ऐकतो, पाहतो आहोत. त्याचे परिणामही जाणवत असतात. हे लक्षात घेऊनच स्पंदनची कथा सुचल्याचं शैलेश कुलकर्णी सांगतात.

सोशल नेट्वर्किंगच्या वाढलेल्या प्रस्थामुळे आज कुटुंबातील आपसातील संवाद हरवलेला आणि त्यातून नात्यामधील आत्मीयता, ओलावा कमी होत चालला आहे. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून स्पंदनचे कथानक लिहिण्यात आले आहे. नात्यातील विसंवाद, त्यावर काढलेला मार्ग, कधी डोळ्याच्या कडा ओलावणारा तर कधी हास्य फुलवणारा असल्याचे दिग्दर्शक शैलेश कुलकर्णी सांगतात. कुटुंबातल्या प्रत्येकाचा एकमेकांशी असलेल्या नात्याचे वेगवेगळे पदर दाखवताना तीन पिढ्यांची गोष्ट स्पंदन मध्ये दाखवली आहे.

मोहन जोशी, अविनाश नारकर, सागर कारंडे या कलाकारांसोबत प्रसन्न पवार, वैशाली शहा आणि शैलेश कुलकर्णी या नवोदित कलाकारांच्या भूमिका ‘स्पंदन’ चित्रपटात आहेत. पाहुणे कलाकार म्हणून कवी संदीप खरे यांनी विशेष भूमिका केली आहे. या चित्रपटाचे छायांकन प्रशांत सोनावणे, निशांत भागवत, तर संकलन अजित बेर्डे यांचे आहे. सहदिग्दर्शन प्रसाद शिंदे व राज चव्हाण यांनी केले आहे. कास्टिंग स्वाती कडू यांनी केलं आहे. यातील वेगवेगळ्या जॉनरच्या गीतांना सचिन पिळगावकर, बेला शेंडे, जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर व बॉलीवूडचे गायक नीरज श्रीधर व के.के यांचा स्वरसाज लाभला आहे. संतोष खाटमोडे, अनामिक चौहान यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. झी म्युझिकने या चित्रपटातील गीते प्रकाशित केली आहेत.

१५ डिसेंबरला स्पंदन प्रदर्शित होणार आहे.