पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत या योजनेच्या मार्गदर्शक सुचनानुसार पुणे जिल्ह्यातील शेतक–यांना तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद शेतक–यांसाठी 311.73 कोटी रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रक्कमेपैकी थकबाकीदार शेतक–यांना रक्कम 207.47 कोटी रुपये व वेळेवर कर्जपरत करणा–या सभासद शेतक–यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची रक्कम 104.25 कोटी रुपये इतकी रक्कम शेतक–यांच्या खाती वर्ग करण्याचे कामकाज चालू आहे. यापैकी आज अखेर पर्यंत एकूण 38 हजार 915 थकबाकीदार शेतक–यांना रक्कम 207.47 कोटी रुपये व 60 हजार 885 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कम 104.25 कोटी रुपये इतकी रक्कम संबंधित शेतक–यांच्या खात्यावर वर्ग करण्यांत आलेली आहे. तसेच या व्यतिरिक्त पुनर्गठन केलेल्या 1,031 शेतकरी सभासदांना 4.21 कोटी रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतक–यांची या योजनेबाबतची माहिती प्राप्त करुन घेण्याचे कामकाज सुरु आहे, असेही ते म्हणाले.
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतात राबणारा बळी राजा आनंदी रहावा, यासाठी शासन प्रयत्न करीत असते. तो संकटात असेल तर त्याला उभारी येण्यासाठी मदतीचा हात शासन देत असते. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे ऐतिहासिक महाकर्जमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला. कर्जमाफी हा शेवटचा उपाय नसून शेतक-यांच्या विकासासाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचेही धोरण शासनाने अवलंबिले आहे. राज्य शासनाने घेतलेला हा देशातील सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय होता. यापूर्वी पंजाब राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपये, आंध्र प्रदेश राज्य शासनाने 15 हजार कोटी रुपये, कर्नाटक राज्य शासनाने 8 हजार कोटी रुपये आणि तेलंगणा राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपये कर्जमाफ केले होते. त्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने सुमारे 34 हजार कोटी रुपये कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोणतीही अट न ठेवेता सरसकट कर्जमाफीची ही योजना असून यामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ झाले.
पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 99 हजार 800 सभासद
शेतक–यांना 311.73 कोटी रुपये इतक्या रक्कमेचा लाभ या योजने अंतर्गत देण्यात आलेला आहे.
अ.क्र. |
तालुका |
कर्जमाफी मिळालेले |
प्रोत्साहनपर लाभ मिळालेले |
||
शेतकरी संख्या |
रक्कम |
शेतकरी संख्या |
रक्कम |
||
1 |
आंबेगाव |
1,341 |
5,90,52,660.57 |
5,630 |
9,19,22,815.79 |
2 |
बारामती |
5,934 |
35,71,38,062.50 |
6,012 |
11,27,82,404.00 |
3 |
भोर |
2,857 |
14,07,94,258.70 |
4,681 |
7,99,55,367.50 |
4 |
दौंड |
8,544 |
50,05,70,470.63 |
3,578 |
7,36,25,441.00 |
5 |
हवेली |
1,182 |
6,57,18,799.00 |
1,760 |
3,09,42,053.00 |
6 |
इंदापूर |
7267 |
34,97,72,621.79 |
3,613 |
7,44,47,201.45 |
7 |
जुन्नर |
925 |
4,68,10,030.28 |
7,007 |
11,69,29,365.92 |
8 |
खेड |
1,971 |
8,36,54,830.49 |
12,407 |
17,69,38,656.30 |
9 |
मावळ |
2,655 |
14,45,28,924.45 |
2,596 |
4,38,01,393.59 |
10 |
मुळशी |
781 |
2,57,78,969.72 |
1,209 |
1,91,02,838.50 |
11 |
पुरंदर |
1,442 |
7,70,11,992.86 |
4,337 |
7,60,34,892.00 |
12 |
शिरुर |
3,306 |
19,53,64,379.90 |
7,285 |
13,42,09,060.35 |
13 |
वेल्हा |
710 |
2,85,82,319.53 |
770 |
1,19,04,626.00 |
एकूण |
38,915 |
207,47,78,320.42 |
60,885 |
104,25,96,115.40 |
या योजनेत पीक कर्जाबरोबरच शेती संलग्न पुनर्गठित कर्जाचा देखील समावेश करण्यात आला. कर्जमाफी देतांना शेतक-याचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुन खात्यांची पडताळणी करण्यात आली. सर्वाधिक गरजूंना अधिक मदत देण्यात तत्व कर्जमाफीसाठी वापरण्यात आले.असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .