पुणे-स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवडी भागातील सुरू असलेल्या कामांची शिरोळे ह्यांनी १५ दिवसांपूर्वी ह्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. त्या दरम्यान त्यांनी परिहार चौकातील रस्ता तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत बनविण्यात येणार्या बागेची पाहणी देखील केली होती. त्याचाच पुढील भाग म्हणून उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते. ह्या बैठकीला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ह्यांच्या समवेत एमएनजीएल, बीएसएनएल, महानगर पालिकेतील पाणीपुरवठा, वाहतूक अशा अन्य संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वेगवेगळ्या विभागांच्या कामाची माहिती तसेच त्याचे आगामी नियोजन ह्याबाबत शिरोळे ह्यांनी चर्चा करून आवश्यक त्या सूचना संबधित अधिकार्यांना दिल्या. तसेच आगामी कलावधीत होणार्या कामांचा साप्ताहिक मागोवा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी बैठकीचे निश्चित करण्यात आल्याचे सीईओ राजेंद्र जगताप ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
खा. अनिल शिरोळेंंनी घेतली ‘स्मार्ट सिटी’ आढावा बैठक
Date: