Home Blog Page 3213

सावित्रीमाई फुले यांना १८७ वी जयंती निमित्त अभिवादन

0
पुणे —

महात्मा फुले मंडळाच्या वतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देवून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . या प्रसंगही महात्मा फुले मंडळ चे अध्यक्ष मधुकर राऊत, कार्याध्यक्ष सुरेश बोराटे, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, सौ. रेखा आखाडे, श्रीमती  उषा भगत इत्यादी उपस्थित होते.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

शिक्षणमंडळ माजी अध्यक्ष वासंती काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी मनिषा भोसले, सुरेश पवार, दत्ता एकबोटे, सुरेश खाटपे, किरण रानडे, अविनाश वेल्हाळ, राजेश शहा, योगेश वराडे, संजय गायकवाड, वैभव जाधव, संजय गाडे, घनश्याम खलाटे, बाळासाहेब ढमाले, हेमंत येवलेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डीईएसच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल, नवीन मराठी शाळा, डी ई एस सेकण्डरी स्कूल आणि मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले होते.
अहिल्यादेवीच्या मु‘याध्यापिका सुलभा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सई आपटे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट भाषणातून उलगडला. सावित्री बाईंच्या आम्ही लेकी हे समूहगीत सादर करून सावित्रीबाईंचा वसा पुढे चालविण्याचा निर्धार केला. शिक्षिका अद्वैता उमराणीकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली, शिक्षिका अनिता जाधवर यांनी कविता सादर केली. पर्यवेक्षिका अनघा डांगे, स्मिता करंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन मराठी शाळेत शाला समितीचे अध्यक्ष सुनील भंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. गर्भातील सावित्रीची हत्या चालूच आहे हा स्त्री भ‘ूणहत्येवरील एकपात्री प्रयोग अनुपमा हिंगणे या विद्यार्थिनीने सादर केला. सानिया भंडारे हिने सावित्रीबाईंचे मनोगत व्यक्त केले. मु‘याध्यापिका कल्पना वाघ, तनुजा तिकोने, स्वप्नील सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात मु‘याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोरमा करंबेळकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांसमोर आत्मकथन केले. डी ई एस सेकण्डरी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका सुजाता नायडू व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांनी पूजन केले.

11 ते 4 तणावाखाली -पुणे बंद यशस्वी (व्हिडीओ रिपोर्ट)

0

पुणे : भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघासह अन्य संघटनांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे परिसरातील विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी मोर्चे काढत रास्तारोको केला. पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात काही भागात तुरळक तोडफोडीच्या घटना वगळता बंद  शांततेत पार पडला.सकाळी 11 ते 4 या वेळेत काही भागात  तणावपूर्ण शांतता होती .सायंकाळी 5 नंतर बंद  चा तणाव पूर्णपणे निवळला होता . आणि जनजीवन सुरळीत झाले .
दरम्यान तणावाच्या अनेक ठिकाणी पोलिसांनी संयमी भूमिका घेतली .आणि बडे नेते कोणी रस्त्यावर उतरल्याचे  दिसले नाहीत .सुदैवाने बंद तणावाखाली असूनही  गालबोट लागले नाही .
ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ”पुणे शहरातील परिस्थिती शांततापूर्ण आहे. . शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये”, असे आवाहन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.
कोरेगाव भिमा येथील झालेल्या  घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पुण्यातही खबरदारी म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत शुक्ला यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
शहरात दिवसभरात १८ बसगाड्या वर दगडफेक, एकूण ७० छोटे-मोठे मोर्चे निघाले. तर भीमा कोरेगावच्या घटनेस कारणीभूत असणाऱ्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी काल केली होती. या प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर भागातील मिलिंद एकबोटे यांच्या घराभोवती पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला होता .
भारिप बहुजन महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा देत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला. काही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.  पीएमपीच्या सरासरी ५० ते ५५ बसेसचे नुकसान झाल्याचे समजते. रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, २१ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर येथील परिसर संवेदनशील असल्याने बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. स्वत: शुक्ला यांनी सकाळी शहरात फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी १० च्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. एक-दोन बस वर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येणे थांबविले.
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला हडपसर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरूजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच सरकारचा जाहिर निषेध केला. या घटनेची चौकशी करून आंदोलन घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी निवेदन स्वीकारले.
दरम्यान सोलापूर रस्त्यावर दोन पीएमपी बसेसवर दगडफेक तसेच भेकराईनगर येथील एका दुकानावर दगडफेक झाल्याच्या किरकोळ घटना वगळता बंद शांतते पार पडला. पोलिस तत्काळ पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
खासगी शाळा, महाविद्यालयां सोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर रामटेकडी चौकात देखील रामटेकडी येथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले व मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, वानवडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’स्किमर मेकिंग आणि ‘जेट टॉय मेकिंग’स्पर्धेत मदर तेरेसा हायस्कूल (खराडी) विजयी

0

पुणे :

‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ मध्ये झालेल्या ‘स्किमर मेकिंग’ आणि ‘जेट टॉय मेकिंग’ स्पर्धेमध्ये मदर तेरेसा हायस्कूल, खराडी विजयी झाले. डॉ. दिलीप मालखेडे (सल्लागार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

‘एसएई इंडिया’ (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘जॉन डियर’, ‘अल्टिर’ आणि आणि व्हिजीए डिजीटल प्रिंटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याची ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’चे आयोजन करण्यात आले होते.

पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया), रमेश पसारिज, विनय दामोदरे, रोहित सादलगे, डॉ. िंव्ह.ए.पंखावाला, ट्रॉयडेन डीक्रूझ, विद्या पीलाई, गजेंद्र जगताप, एन.पी.वाघ, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक 2017’ एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल रहाटणी, पिंपरी चिंचवड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 16 शाळांमधून 42 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या स्किमर मेकिंग स्पर्धेमध्ये एनबीपी वर्ल्ड स्कूल ने उपविजेते पद पटकाविले. स्पर्धेच्या इतर विविध प्रकारांमध्ये डिस्टंस -एनबीपी वर्ल्ड स्कूल, वेट -रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय (दिघी), अक्युरसी-जय मल्हार हायस्कूल (जांबूत), स्पीड टेस्ट- पंडित आगाशे स्कूल (लॉ कॉलेज रोड), टर्न अ‍ॅबिलिटी – मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर (पुणे) तर प्रेझेंटेशन मध्ये एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (रहाटणी), डिसिप्लीन-झेड पी एच स्कूल(लोहगाव), क्लिन्लीनेससाठी न्यू इंग्लिश स्कूल (ससाणेनगर) यांना पारितोषिक मिळाले.

इयत्ता सहावीसाठी घेण्यात आलेल्या जेट टॉय मेकिंग स्पर्धेमध्ये ‘पंडितराव आगाशे स्कूल’ ला उपविजेतेपद मिळाले, डिस्टंन्स-मदर तेरेसा हायस्कूल, (खराडी) आणि न्यू इंग्लिश स्कूल (ससाणेनगर), वेट – मदर तेरेसा हायस्कूल, (खराडी), अ‍ॅक्यूरसी-श्रीराम विद्या मंदीर (भोसरी) आणि मोलदिना स्कूल, स्पीड – एस बी पाटील पब्लिक स्कूल (रावेत), मॅक्झिमम टाईम ट्रॅव्हल-पंडितराव आगाशे स्कूल यांना पारितोषिक देण्यात आले.

पुणे ऑलिंपिक स्पर्धेतील विजेते अ वर्ल्ड इन मोशन राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. ही स्पर्धा जानेवारी महिन्यात 20 ते 22 रोजी बाालेवाडी, पुणे येथे होणार आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीचे एकेरीतील आव्हान संपुष्टात

0
  •  नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रांसच्या बेनॉय पैरे यांची आगेकूच 

पुणे: टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत  भारताच्या युकी भांब्रीला फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टकडून 6-4, 3-6, 4-6 असा पराभवाचा सामना पत्करावा लागल्यामुळे त्याचे स्पर्धेतील एकेरी गटांतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर, नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रांसच्या बेनॉय पैरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 81व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट याने जागतिक क्रमवारीत 118व्या स्थानावर असलेल्या भारताच्या युकी भांब्रीचा 4-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या व 1तास 50मिनिटे चाललेल्या या सामन्यात युकीने पहिल्याच गेममध्ये पिएरेची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये युकीने 40-40असे गुण झाले असताना युकीने दोन अफलातून फटके परतावून लावत हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिएरेने अधिक भक्कम सुरुवात केली. या सेटमध्ये पिएरेने युकीची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये, तर युकीने पिएरेची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण सामन्यात 5-3 अशा फरकाने आघाडीवर असताना 9व्या गेममध्ये पिएरेने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट युकीविरुद्ध 6-3 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये  पिएरेने वेगवान व चतुराईने खेळ केला. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट युकीविरुद्ध 6-4 अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.  यावेळी पिएरे म्हणाला की, पहिल्या सेटमध्ये मला हवी तशी सर्व्हिस करता आली नाही कारण मला सूर गवसला नव्हता. हुकमी सर्व्हिस हे माझे प्रमुख अस्त्र आहे. परंतु तेच निष्प्रभ ठरल्यामुळे पहिला सेट युकीला जिंकता आला. परंतु सर्व्हिस हेच माझं गुण मिळविण्याचे मुख्य साधन असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आणि दुसऱ्या सेटमध्ये यश मिळाले. त्यामुळे दुसरा सेट जिंकून सामन्यात मला 1-1 अशी बरोबरी साधता आली. तरीही सामना जिंकण्याकरिता आणखी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे मला जाणवत होते. त्यामुळे तिसऱ्या सेटमध्ये मी माझी सर्व्हिस राखण्यावर भर दिला. कारण माझी खेळण्याची तिच शैली आहे. त्यातच युकीची सर्व्हिस अत्यंत मोक्याच्या क्षणी भेदण्यात मला यश मिळाले त्यामुळे मला हा सामना जिंकता आला. युकीने या संपूर्ण सामन्यात चांगली झुंज दिली. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करावा लागला.

जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हासी याने जागतिक क्रमवारीत 113व्या स्थानावर असलेल्या चिलीच्या निकोलस जेरीचा टायब्रेकमध्ये  3-6, 7-6(5), 7-5  असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 2तास 10मिनिटे चालला. जागतिक क्र.41 असलेल्या फ्रांसच्या बेनॉय पैरेयाने जागतिक क्र.85 असलेल्याहंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स याचा 6-4, 6-7(4), 7-6(6)असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना 3तास 2मिनिटे चालला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: एकेरी:  

पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रांस)(8)वि.वि.युकी भांब्री(भारत)4-6, 6-3, 6-4; 

बेनॉय पैरे(फ्रांस)(4)वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स(हंगेरी)6-4, 6-7(4), 7-6(6);

रॉबिन हासी(नेदरलँड)(5)वि.वि.निकोलस जेरी(चिली)3-6, 7-6(5), 7-5;

याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा-प्रकाश आंबेडकर

0

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्र बंद मागे घेत असून राज्यातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. तसेच, आजचा संप फक्त दलित बांधवाचा नव्हता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. याचबरोबर,भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी त्याठिकाणी अनुयायी गेले होते. दरम्यान, भीमा कोरेगावमधील कार्यक्रम ही सभा नव्हती. काही जण विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नावे घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांना यावेळी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्र बंद दरम्यान काही हिंसक घटना घडल्या, त्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, जोपर्यंत माझ्या हातात होते तोपर्यंत मी आंदोलन शांत ठेवण्याचे काम केले. महाराष्ट्र बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आता यापुढे सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.

दरम्यान, पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने झाली. मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आज दुपारी आंदोलकांनी मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. दुसरीकडे, कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असला तरी या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्तेही समर्थनार्थ उतरले आणि रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. तथापि आंदोलकांचा संताप अनावर झालेला होता. दरम्यान, राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

पुण्यात उद्या निघणार जातीयवादाची अंत्ययात्रा

0

पुणे-

चलो अलका चौक
विषय : जातीयवादाची अंत्ययात्रा
दिनांक ४/१/२०१८
ठिकाण : अलका चौक
वेळ : सायंकाळी ५ वाजता

एकीकडे जग अंतराळात गणित विज्ञानाच्या बळावर भराऱ्या मारत असताना दुसरीकडे आपण इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडत आहोत. हे अत्यंत दुर्दैवी असून आपल्या सर्व जातीय, प्रांतीय, भाषिक अस्मिता बाजूला ठेवून एक ‘ भारतीय ‘ म्हणून आता सर्व समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या उद्देशाने उद्या, गुरुवारी (दि. ४) सायंकाळी पाच वाजता पुण्यात जातीयवादाचे अंतयात्रा काढण्यात येणार आहे. अलका चौक ते वैंकुठ स्मशानभूमीपर्यंत ही ‘जातीयवादाची अंत्ययात्रा’आयोजित केली आहे.

आपल्या भारतात महाराष्ट्रात मात्र इतिहास, भाषा, प्रांत यावरुन एकमेकांची डोकी फोडण्याच्या घटना घडत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज , लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , पंडीत नेहरु, बाबासाहेब आंबेडकर, सुखदेव, भगतसिंग अशी कितीतरी मंडळी आपला राष्ट्रीय ठेवा व प्रेरणास्थाने आहेत. त्यांच्यावर प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्यांना जातीपातीची लेबलं लावणे हा करंटेपणा आहे. दुर्दैवाने सध्या ते वारंवार घडताना दिसत आहे.

आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या वर्तमान व भविष्याचा विचार न करता भुतकाळातील मुडदे उकरुन आपापसात वादविवाद व प्रसंगी मारामारी करण्याचे वाढते वेड हा होय. इतिहास हा फक्त वर्तमानात वावरताना चुका टाळणे व स्फुर्तीदायी घटनांपासून प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी वापरायचा असतो. पण आपण सगळेच त्या दृष्टिकोनातुन इतिहासाचा वापर करतोय का यावर शांतपणे बसून विचार करायची वेळ आली आहे.

आपल्या सर्व जातीय, प्रांतीय, भाषीक अस्मिता बाजूला ठेऊन एक ‘ भारतीय ‘ म्हणून आता सर्व समाजापुढे आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठीच जातीयवादाची अंत्ययात्रा आयोजित केली आहे. या अंत्ययात्रेला सर्वानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

भीमा कोरेगाव घटनेबाबत अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाईचा इशारा

0

पुणे-भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजभावना भडकवणाऱ्या पोस्ट्स, अफवा सोशल मीडियावर आणि व्हाट्सऍप सारख्या इतर अँप द्वारे पसरवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

अशा पद्धतीच्या पोस्ट, ऑडिओ, विडिओ मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या त्वरित डिलिट कराव्यात. तसेच अशा पोस्टबद्दल काही माहिती मिळाल्यास ती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन, पोलीस कंट्रोल रूम, अथवा सायबर सेल, पुणे याना कळवावी असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद

0

मुंबई-भीमा कोरेगाव येथील दगडफेक आणि हिंसात्मक घटनेचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी या घटनेसाठी पोलीस आणि हिंदुत्त्ववादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे हे सूत्रधार असल्याचा आरोप हि त्यांनी केला आहे…. पहा आणि ऐका आंबेडकर यांची पूर्ण पत्रकार परिषद

भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी, दोषींवर कठोर कारवाई करू- फडणवीस

0

मुंबई-भीमा कोरेगाव  येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी फर्मावले. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील घटनास्थळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत पुण्याचे पोलिस अधिक्षक सुवेझ हक उपस्थित होते. त्यांनीही दोषींवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.

भीमा कोरेगावच्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळे या तरूणाच्या कुटुंबियांना दहा लाख रूपये देण्याची घोषणा फडणवीस व केसरकर यांनी केली. तसेच जखमींनाही मदत करण्याचे जाहीर केले. ज्यांच्या गाड्यांचे, मालमत्तेचे व दुकानाचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत केली जाईल असे केसरकर यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले. नुकसानीचा आढावा घेतला जाईल त्यानुसार कार्यवाही होईल असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील वढू ब्रुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झाल्यानंतर विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर काल (सोमवारी) सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. दोन गटात वाद झाल्याने घोषणाबाजी होऊन वाद चिघळला आणि त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने जाळणे व मालमत्तेचे नुकसान करण्यात झाले. यावेळी पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापूरी या भागात अनेक वाहनांची व दुकानांची नासधूस व तोडफोड करण्यात आली. या घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. सायंकाळनंतर हा तेथील तणाव नियत्रंणात आला. राहुल फटांगळे (२८) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

वढू बुद्रूक येथे शुक्रवारी नामफलक लावण्यावरून निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद सोमवारी पेरणेफाटा (ता. हवेली) येथे उमटले. पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव- भीमा, सणसवाडी, शिक्रापूर कोंढापुरी येथे संतप्त जमावाने दगडफेक करुन ३५ वाहनांचे नुकसान केले. या तणावपूर्ण वातावरणामुळे नगर पुण्याकडे जाणारी वाहने दाेन्ही बाजूला थांबविण्यात अाली हाेती. त्यामुळे अनेक प्रवाशी वाहनातच अडकून पडले. पाेलिसांनी वेळीच बंदाेबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात अाणली. या घटनेनंतर राज्यभर अफवांचे पीक पसरले. त्याचे पडसाद अाैरंगाबाद, माजलगाव, परभणी, साेलापूर अादी शहरातही उमटले. अाैरंगाबादेतील उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, टाऊन हॉलसह अनेक भागात जमावाने दुकाने बंद केली. काही वाहनांवर दगडफेकही केली. पाेलिसांनी बंदाेबस्तात वाढ केल्याने शहरात रात्री तणावपूर्ण शांतता हाेती.

भीमा कोरेगावची घटना ही संघ व भाजपा दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण- राहुल गांधी

0

नवी दिल्ली-भीमा कोरेगावच्या घटनेने संघ आणि भाजपा दलितविरोधी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राज्यभरात सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही या सगळ्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून भीमा कोरेगावच्या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला जबाबदार धरले.

समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजेत, हा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य गाभा आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यावरून संघ आणि भाजपाच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाल्याची टीका राहुल यांनी केली.

‘सूर्य मीलन – ग्रँड ॲल्युम्नी मीट २०१७’ हा महामेळावा उत्साहात

0

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या माजी विद्यार्थ्यांचा सूर्य मीलन – ग्रँड ल्युम्नी मीट २०१७ हा महामेळावा नुकताच संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या महोत्सवाने माजी विद्यार्थ्यांतील सहकार्य समृद्ध करत त्यांच्यात भक्कम भावबंध विणले. सूर्य मीलन या वार्षिक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष होते. या महोत्सवात शिक्षकांबरोबरच सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे ३०० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. काहीजण तर पत्नी व मुलांसमवेत मेळाव्यासाठी आले होते.

 सूर्यदत्ताचे माजी विद्यार्थी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करत आहेत. त्यामध्ये इन्फोसिस, नेस्ले इंडिया, व्होडाफोन, डॉइश बँक, फुजित्सू कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ईक्लर्क्स, श्रीराम जनरल इन्शुरन्स, बँक ऑफ न्यू यॉर्क मेलॉन, एअरटेल, मर्स्क लाईन, कोटक महिंद्र बँक, क्सिस बँक, फेरेरो इंडिया, सन गार्ड, फिलिप्स लायटिंग इंडिया लिमिटेड, टाइम्स ऑफ इंडिया, क्सेंच्युअर सॉफ्टवेअर, जस्ट डायल, क्रेडिट स्विस, बर्जर, कॅप्स्टन, रेनॉल्ड इन्फोटेक, झी मीडिया कॉर्पोरेशन, एक्साईड इंडस्ट्रीज आदि नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थी उद्योजक बनले असून त्यांच्या कंपन्यांत पियूष्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, फिटनेस ट्रेनर, ऑटो कॉप, चौधरी डेव्हलपर्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स आदींचा समावेश आहे.

 मेळाव्यात बोलताना सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, आमचे २२०००हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क असून हे विद्यार्थी भारताच्या विविध भागांत, तर काहीजण परदेशांतही कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी हे संस्थेचे ब्रँड म्बॅसेडर असून त्यांचे कंपनी जगतातील कार्यच संस्थेविषयी सविस्तर समजण्याइतके पुरेसे बोलके आहे. प्रा. डॉ. चोरडिया यांनी आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, याचे कानमंत्र विद्यार्थ्यांना दिले. उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सुस्पष्ट ध्येय-दृष्टीकोन असावा आणि सातत्यपूर्ण कृती करावी, ज्यायोगे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. जीवनात उद्दिष्ट्य बाळगणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येकाने पहिले ध्येय गाठून दुसऱ्या ध्येयाकडे वाटचाल करताना गुणवत्तेची पातळी उंचवावीच, असे सांगून त्यांनी निष्ठेच्या चलनाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली, तसेच झपाट्याने विस्तारणाऱ्या जगात स्पर्धात्मक राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानांचा अंगीकार करावा, यावरही त्यांनी भाषणात भर दिला.

 डॉ. चोरडिया यांनी माजी विद्यार्थ्यांना दरवर्षी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या सूर्यदत्ता स्थापना दिनाला, ५ सप्टेंबरला होणाऱ्या शिक्षक दिनाला व डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.

 माजी विद्यार्थी पुष्कर लिंघारकर याने आपण सूर्यदत्तामधील रम्य विद्यार्थी जीवनाला मुकल्याचा भावनात्मक अनुभव सांगितला आणि या संस्थेत आयोजित विविध कार्यक्रमातून आत्मविश्वास कसा मिळाला, हेही विशद केले. त्याने सूर्यदत्ताचे वर्णन एका वाक्यात घरापासून दूरचे दुसरे घर असे केले.

 काही माजी विद्यार्थ्यांनी आपण जीवनात जे काही मिळवले आहे, ती सूर्यदत्ताची देणगी असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी एकमताने कबूल केले, की त्यांचा कल्याणकारी विकास हा सूर्यदत्ताने पुरवलेल्या साचातूनच शक्य झाला. हा मेळावा असे व्यासपीठ ठरला, जेथे दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दक्षिण भारत-उत्तर भारत, महाराष्ट्र आणि देशभरातील विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातील क्षणांना उजाळा दिला.

 सूर्यदत्ताचे माजी विद्यार्थी सूर्यन्स नावाने ओळखले जातात. ते आठवड्याला अथवा महिन्याला किमान दोन तास वेळ नव्या, तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आणि आपला कामाचा अनुभव विशद करण्यासाठी देणार आहेत. या सूर्यन्सना त्यासाठी मानधन व प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रा. संजय चोरडिया यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश माजी विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन क्षेत्राविषयी रस निर्माण करणे व प्रशिक्षित उद्योग अनुभवी व्यक्तींद्वारे शिक्षण क्षेत्राची गरज भागवणे, हा आहे.

 संस्थेचे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सौ. सुषमा चोरडिया, तसेच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कर्मचारी वर्गाने या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांसमवेत केक कापला. मेळाव्याचा समारोप डीजे रजनी व भोजनाने झाला.

ट्रिनिटी चॅम्पियन्स करंडक 2017 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघांची आगेकुच

0

पुणे- ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ट्रिनिटी चॅम्पियन्स करंडक 2017 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाने हडपसर जिमखाना संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

 के.जे इन्स्टिटयूट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मयुर बागुलच्या 86 धावांच्या बळावर युनियन क्रिकेट क्लब संघाने हडपसर जिमखाना संघाचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अजिंक्य थोटे व संकेत जेवरे यांच्या भेदक गोलंदाजीपुढे हडपसर जिमखाना संघाने 39.1 षटकात सर्वबाद 182 धावा केल्या. 182 धावांचे आव्हान युनियन क्रिकेट क्लब संघाने 37 षटकात 9 बाद 183 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. मयुर बागुल सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
हडपसर जिमखाना- 39.1 षटकात सर्वबाद 182 धावा(ऋषी पिसे 28, अक्षय मुरमुरे 30, कौस्तुभ भाटे 26, प्रतीक खेडेकर 22, अजिंक्य थोटे 4-42, संकेत जेवरे 4-36, गिरिष होटवानी 2-39) पराभूत वि युनियन क्रिकेट क्लब- 37 षटकात 9 बाद 183 धावा(मयुर बागुल 86(116), अमन यादव 16, अजय न्हवले 6-48, कौस्तूभ भाटे 2-29, अक्षय मुरमुरे 1-26) सामनावीर- मयुर बागुल
युनियन क्रिकेट क्लब संघाने 1 गडी राखून सामना जिंकला. 

फिरत्या अन्न विक्रेत्यांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत वागा : मंत्री गिरीश बापट

0

अन्न व औषध विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत अधिकाऱ्यांना सूचना

 पुणे :  राज्यात रस्त्यावरील अन्न पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या बहुसंख्य आहे. त्यामुळे अशा लोकांना सुरक्षित अन्न खायला मिळावे यासाठी रस्त्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागातर्फ़े चालवण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. हातगाडी विक्रेत्यांना मित्रत्वाच्या व मार्गदर्शकाच्या  नात्याने सांगितल्यास त्यांच्याकडून ही पूर्ण सहकार्य मिळते त्यामुळे त्यांच्याशी अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे अशी सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन ,पुणे विभाग तसेच कोका कोला इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने  टिळक वाडा येथे रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे तसेच विक्रेत्यांना प्रशिक्षित करणाऱ्या क्लासरूम ऑन व्हीलया बसचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. स्वच्छतेसंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टरचे अनावरण ही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या कार्यशाळेस ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,प्रभाग समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे,नगरसेवक महेश लडकत कोका कोला इंडियाचे बोराळकर यांच्यासह अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्त श्री नारागुडे, देशमुख, शिंदे,भुजबळ, श्रीमती भोईटे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न पदार्थ विक्रेते उपस्थित होते.

 कोकाकोला इंडियाच्या क्लासरूम ऑन व्हील्सया बसमधून  १  ते १५ जानेवारी या कालावधी मध्ये शहरातील ४७ ठिकाणी फिरत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षित करण्यात येणार आहे. 

 यावेळी बोलताना श्री बापट म्हणाले, पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील हातगाडीवर खाणाऱ्या विद्यार्थांची तसेच सर्वसामान्यांची संख्या अधिक आहे. अशा लोकांना सुरक्षित अन्न मिळते का हे पाहण्याची अन्न व औषध विभागाची जबाबदारी आहे.  याकरिता प्रशासनांने त्यांना मित्र आणि मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केल्यास ते ही सहकार्याची भूमिका घेतील, कारण लोकांना चांगल्या प्रतीचे अन्न पदार्थ द्यावेत ही त्यांचीही इच्छा असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन  विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे समाजानेही यात पुढाकार घेऊन अन्न विक्रेत्यांना मदतीचा दृष्टीकोन ठेवल्यास विक्रेत्यांना स्वछतेची सवय लागेल. असे ही ते म्हणाले.

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ते म्हणाले, लोकांना चांगल्या प्रतीचे आणि चवीचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास आणि स्वच्छता राखल्यास जाहिरात न करता लोक तुमच्याकडे खाण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खाद्य पदार्थ विक्रेत्यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित अन्न पदार्थ द्यावेत, यासाठी हे प्रशिक्षण दिले जात आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे यांनी राज्यात अन्न व औषध विभागामार्फत लोकांना सुरक्षित अन्न देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाची माहिती दिली. तसेच अन्न पदार्थ विक्री व्यवसायकानी त्यांच्या उलाढालीनुसार परवाने किंवा नोंदणी घ्यावी व अधिकाऱ्यांनी  या अभियानात विशेष प्रयत्न करावेत. अशा सूचना केल्या.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव यांनी स्वच्छते बरोबर लोकांना सकस अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याबाबतही अन्न औषध विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी त्यांच्या पथारी संघटने मार्फत  सहकार्य करण्याचे मान्य केले.कार्यक्रमाचे

प्रास्ताविक पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले.

मृणाल कुलकर्णी यांचा पुत्र विराजस कुलकर्णीचे ‘हॉस्टेल डेज’ द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण

0

प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अगदी लहानपणापासूनच चित्रपट जगला आहे. सुरुवातीपासूनच तो चित्रपटाच्या वातावरणात वावरला आहे. रंगभूमी आणि चित्रपटामध्ये पदवी घेतलेल्या विराजस कुलकर्णीसाठी मोठा झाल्यावर याच क्षेत्रात करियर करणे मग स्वभाविकच होते. प्रख्यात दिग्दर्शक अजय नाईक यांच्या हॉस्टेल डेजमध्ये तो अभिनयात पदार्पण करत आहे. चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, अक्षय टाकसाळे आणि संजय जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

संहिता लेखन आणि पडदा लेखनामध्ये विराजस कुलकर्णी प्रशिक्षण घेतले असून या दोन्ही बाबतीत तो नवीन प्रकल्प स्वीकारताना काळजी घेतो. त्याचे असे म्हणणे आहे की, अजय नाईक यांचा चित्रपटाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे त्यामुळे त्याने त्यांच्या चित्रपटात पदार्पण करण्याचे ठरवले. अजय हे मनाने एक संगीतकार आहेत आणि त्यामुळे ते चित्रपटाकडे त्याच पद्धतीने पाहतात. ते चित्रपटाकडे एका गाण्याप्रमाणे बघतात. त्याचा पाया तयार करतात आणि त्यावर मग थर रचत जातात. ही सर्व प्रक्रिया मला खूपच रंजक वाटते, असेही विराजस म्हणतो.

१९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगमकुमार सानूशंकर महादेवनशानकुणाल गांजावालाअवधूत गुप्ते, बेला शेंडे  त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वेआनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.

२२ वर्षांच्या विराजसने अभिनयाचा वारसा आपल्या आईकडून घेतला आहे. तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करतो. रमा माधवया मृणाल कुलकर्णी यांच्या दिग्दर्शकिय पदार्पणात त्याने आपल्या आईला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. मृणाल कुलकर्णी अभिमानाने म्हणतात, “तांत्रिकदृष्ट्या पहिले तर तो माझ्याआधीच स्वतंत्र दिग्दर्शक झाला होता. मी रमा माधवबनविण्यापुर्वीच त्याने अनाथेमाया त्याच्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यात अभिनयही केला होता. मला आनंद आहे की त्याने त्याच्या कारकीर्दीचा निर्णय स्वतः घेतला. त्याने यात यश मिळवावे अशी मनोमन इच्छा आहे.

विराजस आपल्या कामाबद्दल आपल्या आईबरोबर चर्चा करतो. चित्रपट स्वीकारल्यानंतर त्याबद्दल मी माझ्या आईशी चर्चा केली. तिने मला काही महत्वाच्या गोष्टींचा कानमंत्र दिला. तिचा अनुभव आणि सिनेमाविषयी असलेले तिचे ज्ञान यांच्या आधारे निर्णय घेतल्याने आता मी चूक करू शकत नाही, असेही तो म्हणतो.