पुणे- ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित ट्रिनिटी चॅम्पियन्स करंडक 2017 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लब संघाने हडपसर जिमखाना संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
के.जे इन्स्टिटयूट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मयुर बागुलच्या 86 धावांच्या बळावर युनियन क्रिकेट क्लब संघाने हडपसर जिमखाना संघाचा 1 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अजिंक्य थोटे व संकेत जेवरे यांच्या भेदक गोलंदाजीपुढे हडपसर जिमखाना संघाने 39.1 षटकात सर्वबाद 182 धावा केल्या. 182 धावांचे आव्हान युनियन क्रिकेट क्लब संघाने 37 षटकात 9 बाद 183 धावांसह पुर्ण करत विजय मिळवला. मयुर बागुल सामनावीर ठरला.