Home Blog Page 3203

विक्रम गोखले आणि सुहास जोशी यांचे ‘वचन’ गुलमोहर मालिकेतील पुढील कथा

0

एखाद्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणे सोपे नसते. मात्र काळासोबत जोडीदारात होणारे बदल सांभाळून, हे बदल स्वीकारून जोडीदाराची साथ देणारे प्रेमाची खरी परिभाषा सांगतात. एकमेकांना दिलेल वचन पूर्ण करण्यासाठी ते जोडीदार बांधील असतात. याच विचारावर आधारित एक उत्कृष्ट कथा झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. दिनांक २९ जानेवारी आणि ३० जानेवारी ला रात्री ९:३० वाजता अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी गुलमोहर या मालिकेतील पुढील कथा ‘वचन ‘ द्वारे झी युवा आपल्या प्रेक्षकांना देत आहे.  मराठी हिंदी मनोरंजन सृष्टीतील दोन दिग्गज नावे विक्रम गोखले आणि सुहास जोशी या कथेत मुख्य भूमिका साकारत आहेत.

आपल्या ओळखीत अशी अनेक जोडपी असतात जी एकमेकांच्या साथीने वर्षोनुवर्षे प्रेमाचा संसार करतात.आयुष्यातील चढ उतारातही त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास एवढे दृढ असते की त्यांना इतर कोणाचीच गरज भासत नाही. गुलमोहर या मालिकेत पुढील येणारी ‘वचन’ कथा अशाच एका वृद्ध प्रेमळ जोडप्याने एकमेकांना दिलेल्या वचनाची आहे. गोदावरी आणि चिंतामणरावांनी स्वतःला मुलं नसण्याची खंत कधीच बाळगली नाही, अनेक अनाथ मुलांना मायेचं छप्पर देऊन त्यांना आपलंसं केलं. या कथेत गोदावरी आणि चिंतामणरावांनी वयाचा साठावा वाढदिवस साजरा करताना, आयुष्यातील अनेक घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरीराने वृद्ध पण मनाने युवा असलेल्या या जोडप्यातील दृढ नाते, प्रेम , विश्वास किती कणखर आहे याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला अनुभवायला मिळेल . आणि एवढ्या सर्व आठवणीं जागवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे घडणारे प्रसंग तेवढेच अनपेक्षित आहेत. ‘वचन’ ही कथा आहे एका जोडप्याच्या प्रेमाची, आठवणींची, त्यांच्यातील घट्ट नात्याची आणि या नात्यावर येणाऱ्या संकटाची.  झी युवावरील ही कथा आपल्याला निशब्द करून सोडेल यात काहीच शंका नाही.

विक्रम गोखले या मालिकेबद्दल बोलताना म्हणाले ” महिनोंमहिने चालणाऱ्या मालिका करण्यापेक्षा केवळ दोन दिवस दाखवली जाणारी एक उत्तम कथा करणे कधीही चांगल असतं. झी युवावरील ‘गुलमोहर’या मालिकेतील ‘वचन’ही कथा केवळ यासाठीच मी निवडली. या कथेत मी सुहास जोशीं सारख्या एक उत्तम अभिनेत्री बरोबर काम करीत आहे. गेली ३५ वर्षे आम्ही कलावंत म्हणून या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत. आम्हाला एकमेकांबरोबर अभिनय करावा लागतंच नाही कारण एकमेकांचे कलाकार म्हणून जडलेले नाते आमच्याकडून काम करून घेते. ही कथा करताना मुख्य गोष्ट ही जाणवली की मंदार जोग सारख्या एका चांगल्या लेखकाने लिहिलेली उत्तम कथा, मंदार देवस्थळी सारखा उत्तम दिग्दर्शक आणखीन खुलवतो. मंदार देवस्थळी हा माझा चांगला तरुण मित्र असून तो एक ‘थिंकर दिग्दर्शक’ आहे. त्याला नीट माहित आहे की प्रेक्षकांना काय हवे आहे आणि त्यासाठी त्याला नक्की काय करायचे आहे. एका उत्तम टीम बरोबर काम करताना काम केल्याचे समाधान नक्कीच जाणवते. गुलमोहरमधील ‘वचन’या कथेत दाखवले गेलेले प्रेम एका वेगळ्या दर्जाचे आहे. सध्या सगळ्याच गोष्टी इतक्या इन्स्टंट झाल्या आहेत की, शुक्रवारी लोक प्रेम करतात, शनिवारी लग्न करतात , रविवारी मधुचंद्राला जातात आणि सोमवारी त्यांच्यात घटस्फोट होतो . अशा समाजात, आमच्या कथेत दाखवले गेलेले प्रेम बरंच काही सांगून जाईल आणि तुम्हालाही आत्मपरीक्षण करायला लावेल.

संक्रांतीचे आगळे वेगळे वाण – हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या भगिनींना लोहाच्या गोळ्या भेट…

0

पुणे-धर्मसभा संस्थेने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर ,जनकल्याण रक्तपेढी व भारत विकास परिषदेच्या सहकार्याने एरंडवण्यातील सात चाळ परिसरात महिलांच्या हिमोग्लोबिन तपासणीचे शिबीर आयोजित केले होते.यावेळी केलेल्या तपासणीत २२ भगिनींचे हिमोग्लोबिन कमी असल्याचे आढळून आले.या सर्व महिलांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या वतीने संक्रांतीचे वाण म्हणून तीन महिने पुरतील एवढ्या लोहाच्या गोळ्या भेट देण्यात आल्या.या वेळी बोलताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” वस्ती विभागातील भगिनी आपले घर सावरताना स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे त्यांचे दुखणे वाढते,त्या सर्व आजार अंगावर काढतात,हे भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही,त्यामुळे वस्तीतील महिलांच्या नियमित आरोग्य तपासणी साठी मी योजना आखत आहे,तसेच आज ही काही महिला रक्ततपासणी साठी डॉक्टर ने सुई हातात घेतली तर निघून गेल्या,असे करू नका,या छोट्या तपासणीतूनच तुमचा मोठ्या आजारापासून बचाव होऊ शकेल असे ही त्या म्हणाल्या.या तपासणीत ज्या २२ महिलांना हिमोग्लोबिन कमी असल्याचे निष्पन्न झाले अश्या भगिनींना संक्रांतीचे वाण म्हणून लोहाच्या गोळ्या भेट देण्याचा आगळा वेगळा हळदीकुंकू समारंभ मंजुश्री खर्डेकर यांनी आयोजित केला होता.यावेळी धर्मसभेच्या मीनल मनमाडकर,तसेच संगीताताई आदवडे,अपर्णा लोणारे,सुवर्णा काकडे,सुनीता मोरे,माणिकताई दीक्षित,सुनीता पाठारे,इ मान्यवर उपस्थित होते,

राजधानी दिल्लीत होणार थाटात “शिवजयंती” साजरी

0

पुरंदर तालुक्यातून शेकडो शिवभक्त दिल्लीतील शिवजयंती उत्सवात सामील होणार

जेजुरी ( प्रतिनिधी )  – विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा राष्ट्रोत्सव करण्याच्या उद्धेशाने खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती  प्रयत्नशील आहेत, येणारी शिवजयंती अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने  मोठ्या स्वरूपामध्ये राजधानी दिल्लीत साजरी होणार असून पुरंदर तालुक्यातून सुद्धा शेकडो शिवभक्त दिल्लीतील शिवजयंती उत्सवात सामील होणार असल्याची माहिती दिल्ली शिवजयंती उत्सव समिती प्रमुख अजयसिंह सावंत यांनी दिली.

दिल्ली येथे असणाऱ्या मराठी, कुर्मी, जाट, पटेल तसेच पानीपत हरियाना भागातील रोड मराठा समाजाचा या उत्सवामध्ये मोठा सहभाग असणार आहे , दरवर्षी 6 जुनला रायगडावर अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन खूप थाटामाटात  साजरा केला जातो , तसेच यंदा समितीने प्रथमच शिवजयंती उत्सववाला राष्ट्रीय स्तरावर मोठे स्वरूप  देण्यासाठी १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली समिती आतापासूनच दिल्लीत तयारीला लागली असून , या शिवजयंती उत्सव सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती रामनाथजी कोविंद, देशभरतील विविध राज्याचे मुख्यमंत्री , खासदार यांच्यासोबतच  राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत, दिल्ली येथील राजपथ  जवळील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सच्या विस्तीर्ण मैदानावर यावेळी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या काळात छत्रपती शिवाजी महाराजांवरील महानाट्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे , तसेच शिवजयंती दिवशी दिल्लीत रेली सुद्धा काढण्यात येणार असून या रेलीत ढोलताशा पथक , लेझीम पथक , वारकरी पथक सामील होणार आहेत, दिल्ली येथील शिवजयंती उत्सवाचे संपूर्ण संयोजन करण्याचा मान  अजयसिंह सावंत यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला मिळाला असल्याने पुरंदरमधील जास्तीत जास्त शिवभक्त  या सोहळ्यात सामील होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली , यावेळी मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त संदीप जगताप ,शिवव्याख्याते निलेश जगताप , संतोष हगवणे , कैलास केंजळे , सचिन हंबीर , अजय जगताप ,वासिम मणेर ,गौरव जगताप ,आनंद जंगम, विक्रम शिंदे , संतोष बयास ,रत्नसिंह सावंत, अभीजित भंडारी  आणि इतर सदस्य उपस्थित होते.

सॅमसंगचे सॉलिड स्टेट ड्राइव्ह्ज 860प्रो आणि 860इवोचे भारतात उद्घाटन

0

नवी दिल्ली – सॅमसंग इंडिया, या भारतातील ग्राहकांच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक ब्रँडने, 860प्रो आणि 860इव्हो सॉलिड ड्राइव्ह्ज (एसएसडी)चे आज उद्घाटन केले आहे, ही कंपनीच्या सेटा (SATA) इंटरफेस लाइनअपसाठीचे सर्वात अत्याधुनिक सेवा आहे.

860प्रो आणि 860इव्हो यांच्यामुळे ग्राहकांना विविध अॅप्लिकेशन्समधून सर्वात जलद, विश्वासार्ह कामगिरी मिळावे, हे या उद्घाटनामागचे ध्येय आहे, प्रत्येक दिवशी अतिरिक्त कार्यभार आणि ग्राफिक इंटेन्सिव प्रक्रिया यशस्वीपणे उभारण्यासाठी 860प्रो आणि 860इव्होचे – या व्हर्टिकल-एनएएनडी तंत्रज्ञान असलेल्या उद्योगक्षेत्रातील पहिल्या ग्राहक एसएसडीचे उद्घाटन करण्यात आले आहे -860प्रो आणि 860इव्हो उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी सेटा एसएसडीसाठी प्राप्त करण्यात आली आहे, यामुळे जलद, विश्वासार्हता, पूरकता आणि क्षमता यांचा विस्तार देण्यात येणार आहे.

“या उत्पादनामुळे अमर्यादित सॉलिड स्टेट फ्लॅश स्टोरेजचा अनुभव दोन्ही प्रकारे मिळणार आहे, म्हणजे ग्राहकांना आणि व्यावसायिकांनाही तो लाभदायी असणार आहे. 860प्रो आणि 860इव्होची जलद कामगिरी ही खासकरून निर्मितीशील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, यात आयटी प्रोफेशनल्स आणि वर्कस्टेशन्सचा वापर करणारे गेमर्स, एनएएस किंवा हाय एंड कम्प्यूटिंग करणारे येतात. 860 इव्होमुळे प्रतिदिनी कम्प्यूटिंग अतिशय वेगात, सहनशील आणि कुठल्याही त्रासाशिवायचा विश्वासार्ह अतिशय उत्तम मेनस्ट्रीम पीसी आणि लॅपटॉपसाठीचा अनुभव आहे. या अत्याधुनिक एसएसडी ऑफरिंगमुळे आमची इतर सर्व वचनबद्धता एसएसडी स्पेस आणि विकासाला चालना देणाऱ्या नावीन्यपूर्णतेसाठी आहे, तसेच अनेक वर्षांपासून उद्योगक्षेत्रासाठी आम्ही ती राबवत आहोत, हे सिद्ध झाले आहे, असे सॅमसंग इंडियाच्या आयटी आणि मोबाइल एंटरप्राइज व्यवसायाचे उपाध्यक्ष श्री. सुकेश जैन म्हणाले.

आताशा सर्वोच्च रेझ्योल्यूशनमधील फोटो आणि 4के व्हिडिओज यामुळे फाइलची साइज वाढतीच आहे, यामुळे हा डेटा अतिशय जलद गतीने हस्तांतरीत व्हावा आणि त्याची कामगिरी शाश्वत व उच्चतम असावी, वापरकर्त्यांना ती दीर्घकाळ मिळावी, हे गरजेचे आहे. ही गरज ओळखून, सॅमसंगच्या 860प्रो आणि 860 इव्होचा 560 एमबी/एस रेड आणि 530 एमबी/एस व्हाइट1 स्पीड आणि ऑफऱ अशी विश्वासार्ह निर्मिती अत्याधुनिक 5 वर्षांच्या मर्यादित वॉरंटी2 सह करण्यात आली आहे,  860 प्रो साठी किंवा 4800 टेराबाइट्स लिखित (टीबीडब्ल्यू)3 आणि 860 इव्होसाठी 2400 टीबीडब्ल्यू4ची निर्मिती करण्यात आली आहे. नव्या एमजेएक्स कंट्रोलरमुळे यंत्रणेबरोबर अधिक चांगली कामगिरी करता येते. यासाठी कंट्रोलर आवश्यक त्या प्रमाणात पॉवरफुल आहे, याद्वारे वर्कस्टेशनचे स्टोरेज हाताळले जाते, तसेच लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमही पूरकतेने सुधारली जाते.

860प्रो 256जीबी, 512जीबीस 1टीबी, 2टीबी आणि 4टीबी5 क्षमतेमध्ये उपलब्ध आहे, यातील 4टीबी मेमरी स्टोरेज 114 तास चालू शकते आणि 4के अल्ट्रा अल्ट्रा एचडी व्हिडिओ घेऊ शकते. 860प्रो 2.5 इंचाच्या फॉर्म फॅक्टरमध्ये विस्तारीत पूरकतेसह उपलब्ध आहे, यामुळेच तो पीसी, लॅपटॉप, वर्कस्टेशन आणि एनएएसला पूरक आहे.

860इव्हो 250जीबी, 500जीबी, 1टीबी, 2टीबी आणि 4टीबी6 क्षमतांसह उपलब्ध आहे, 2.5 इंचाचे हे उत्पादन पीसी आणि लॅपटॉप तसेच एमसेटा तसेच एम.2 फॉर्म फॅक्टर्स अल्ट्रा स्लिम कम्प्यूटिंग अॅप्लिकेशन्सनी पूरक आहे. 860इव्होमध्ये सहापटीने अधिक शाश्वत कामगिरी देण्याची क्षमता आहे, कारण यात विस्तारीत इंटेलिजन्ट टर्बोराइट7 तंत्रज्ञान, 550एमबी/एस आणि 520 एमबी/एस8 अनुक्रमे रेड आणि राइड स्पीडमध्ये उपलब्ध आहे.

860प्रो आणि 860इव्हो एसएसडी या महिन्यापासून उपलब्ध आहे, उत्पादकांची रिटेल किंमत 12,000 आणि 8,750 रुपयांपासून सुरू आहे.

ठळक वैशिष्ट्ये

Category 860 PRO 860 EVO
Interface SATA 6GBps
Form Factor 2.5-inch 2.5-inch, mSATA, M.2
Storage Memory Samsung V-NAND 2bit MLC Samsung V-NAND 3bit MLC
Controller Samsung MJX Controller
Cache Memory 4GB LPDDR4 (4TB)

2GB LPDDR4 (2TB)

1GB LPDDR4 (1TB)

512MB LPDDR4 (256/512GB)

4GB LPDDR4 (4TB)

2GB LPDDR4 (2TB)

1GB LPDDR4 (1TB)

512MB LPDDR4 (250/500GB)

Capacity 4TB, 2TB, 1TB, 512GB, 256GB [2.5-inch] 4TB,2TB,1TB,500GB,250GB

[M.2] 2TB, 1TB, 500GB, 250GB [mSATA] 1TB, 500GB, 250GB

Seq.Read/Write Speed Up to 560/530 MB/s Up to 550/520 MB/s
Ran.Read/Write Speed (QD32) Max. 100K IOPS / 90K IOPS Max. 98K IOPS / 90K IOPS
Device Sleep 2.5 mW for 1TB

(Up to 7 mW for 4TB)

2.6 mW for 1TB

(Up to 8 mW for 4TB)

Management SW Magician Software for SSD management
Total Byte Written 4TB: 4,800TB

2TB: 2,400TB

1TB: 1,200TB

512GB: 600TB

256GB: 300TB

4TB: 2,400TB

2TB: 1,200TB

1TB: 600TB

500GB: 300TB

250GB: 150TB

Warranty 5 years or up to 4,800 TBW[1] 5 years or up to 2,400 TBW

पुण्यात नवीन चार वाहन टेस्ट ट्रॅकला मंजुरी -गिरीष बापट

0
मुंबई ; पुण्यात वाहन नोंदणी करताना वापराव्या लागणा-या चार नवीन टेस्ट ट्रॅकला मंजूरी देण्यात आली आहे. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथील ट्रॅकवर टेस्टींग  करण्यात येईल तर अवजड वाहनांची दिवे घाटातील ट्रॅक वर टेस्टींग करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर समाधान शोधण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीला पुणे शहरातील विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.
          पुणे शहराच्या वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तसेच पुणे परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट तपासणी ट्रॅक तयार करण्यासंबधी चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बैठकीतील महत्वाच्या मुद्यांविषयी माध्यम प्रतिनिधींना श्री. बापट यांनी माहिती दिली.
श्री. बापट पुढे म्हणाले, दिवे घाटातील टेस्टींग ट्रॅकसाठीच्या प्रस्ताव मार्गी लागला असून त्यासाठी लागणारा 1.20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन तयार करण्यात येणा-या टेस्ट ट्रॅकसाठी योग्य जागांचा शोध घेऊन त्यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येणार आहे.
          स्कूल बस आणि महाराष्ट्र परिवहनच्या बस यांच्या नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी या वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष वेळ राखिव ठेवण्यात येणार आहे.
          रिक्षा चालक आणि मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असून अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या मागणीला  चालना देण्यात येणार आहे.
            पुण्यात रोज नवीन 500 ते 700 वाहने येत असतात याचा यंत्रणेवर येणारा ताण दूर करण्यासाठी दहा अधिकारी सहा महिन्यांसाठी पुणे परिवहन विभागात देण्यात येणार असून, सर्व प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यात येणार आहेत.
वाहनांच्या आनलाईन नोंदणी संदर्भात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील वाहतुकी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही श्री. बापट यांनी सांगितले.

‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांना सहाव्या ‘एन्व्हॉयर्नमेंट थिएटर फेस्टिव्हल’मध्ये ‘फर्स्ट रनर अप’ पारितोषिक

0

सूर्यदत्ता नॅशनल स्कूलला अन्य अनेक शाळांसमवेत नुकतेच सहाव्या एन्व्हॉर्यनमेंट थिएटर फेस्टिव्हलमध्ये (इटीएफ) सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. औंधमधील पंडित भीमसेन जोशी सभागृहात झालेला हा महोत्सव कमिन्स इंडिया फाऊंडेशनने सहोदयच्या सहकार्याने प्रायोजित केला होता. इटीएफ हा आंतर-शालेय जागृती महोत्सव असून पुण्याचा अशा स्वरुपाचा एकमेव हरित महोत्सव आहे, जो शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती बांधीलकीचे संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे. हा महोत्सव केवळ पर्यावरण समस्यांबाबत जागृती वाढवत नसून तो विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून आपल्या कल्पना व विचार मांडण्याचीही संधी देतो.

 यंदाच्या इटीएफ महोत्सवाची संकल्पना पाण्याचा प्रवास व पाण्याचे महत्त्व (जर्नी ऑफ वॉटर अँड इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर) ही होती. विषयाची निवड करण्याची मुभा शाळांना होती. पाणी व त्याचे महत्त्व याबाबत कोणतीही उपकल्पना घेऊन विषय निवडायचा होता. सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते आठवीसाठी असलेल्या माध्यमिक शालेय श्रेणीत भाग घेतला. या शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकासह कार्यक्रमासाठी सादरीकरण केले. त्यासाठी मूकाभिनय (माइम) ही शैली निवडण्यात आली, कारण गोंगाटाने भरलेल्या जगात शब्दांपेक्षा आपण शांतता व हावभावांच्या मदतीने अधिक चांगला संपर्क ठेऊ शकतो. शांतता हा मूकाभिनयाचा पाया असल्याने या कलाकारांनी प्राचीन सत्ये प्रतिकात्मक भाषेत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नवे मार्ग शोधून काढले.  यासंदर्भात सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष डॉ. प्रा. संजय चोरडिया म्हणाले, महोत्सवाची संकल्पना, कामगिरी आणि संहितेशी सुसंगती राखत या नाट्याचे नाव सार्थपणे जीवनधारा ठेवण्यात आले होते. पाण्याचे आपल्या जीवनातील महत्त्व, तसेच पाणी जतनाचे व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व त्यातून ठळकपणे मांडले गेले.या स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या ११ जानेवारीला झाली. त्यात माध्यमिक शाळा श्रेणीमध्ये एकूण १७ शाळा सहभागी झाल्या होत्या. ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमान कलाविष्कारामुळे तो संघ अंतिम फेरीत पोचला. १९ जानेवारीला झालेल्या अंतिम फेरीतही या विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय आविष्कार दाखवत ‘ओव्हरऑल परफॉर्मन्स’ श्रेणीत, तसेच ‘बेस्ट स्क्रिप्ट’ श्रेणीत ‘फर्स्ट रनर अप’ पारितोषिक पटकावले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी संपूर्ण शाळेची मान अभिमानाने उंचावणारी ठरली आहे.

महालक्ष्मी , सरस्वती , महाकाली व श्री विष्णू देवतांच्या उत्सवमूर्तींची धान्यतुला

0

पुणे-सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात ब्रम्होत्सवानिमित्त काल मंगळवारी महालक्ष्मी , महाकाली , सरस्वती व विष्णु या देवतांच्या उत्सवमूर्तींची धान्यतुला करून सुमारे ५०० किलो धान्य कोथरूड येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेस भेट (देणगी) देण्यात आले. त्याचबरोबर या संस्थेतील विद्यार्थ्यांची संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांना रोलँड कंपनीचा इलेक्ट्रॉनिक कि बोर्ड (इलेक्ट्रॉनिक वाद्य )हि भेट दिले.
महालक्ष्मी मंदिराच्या ब्रम्होत्सवानिमित्त सोमवार दिनांक २२ जानेवारीपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. काल मंगळवारी रात्री महालक्ष्मी , महाकाली , सरस्वती व विष्णू या देवतांच्या उत्सवमूर्तींची प्रथम धार्मिक पूजा करण्यात आली . राधा गोविंद … हरी बोलो गोविंद जय , जय गोपाळ चा जयघोष करत या देवतांच्या उत्सवमूर्तींच्या धान्यतुलेस प्रारंभ झाला. धान्यतुलें नंतर देवतांवर सुवर्ण व रजत कमळ पुष्पांची उधळण करून देवांचा जयघोष करण्यात आला . याप्रसंगी राजस्थानमधील डीडवाना येथील झालरीया पीठाचे महंत श्री घनश्यामचार्यजी महाराज व स्वामीजी श्री भूदेवाचार्यजी महाराज, मंदिराचे प्रमुख विश्वस्त राजकुमार अगरवाल, सौ अमिता अगरवाल, विश्वस्त भरत अगरवाल, सौ तृप्ती अगरवाल, प्रसिद्ध वकील प्रताप परदेशी बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला , रमेश पाटोडीया, हेमंत अर्नाळकर आदी मान्यवर उपस्थित होते .

व्‍यंगचित्र संमेलनात राजेंद्र सरग यांचा शि.द. फडणीस यांच्‍या हस्‍ते सत्‍कार

0

पुणे- सन 2017 मध्‍ये व्‍यंगचित्र क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कामगिरी केल्‍याबद्दल व्‍यंगचित्रकार तथा जिल्‍हा माहिती अधिकारी  राजेंद्र सरग यांचा ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्‍या हस्‍ते शाल आणि सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरव करण्‍यात आला. सरग यांना देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार आणि दिवाळी अंकांच्‍या संपादकांचा ‘दिवा पुरस्‍कार’ गेल्‍या वर्षी प्राप्‍त झाला. तसेच 2017 मध्‍ये 100 हून अधिक नामांकित दिवाळी अंकांमध्‍ये त्‍यांनी रेखाटलेली व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली. याची दखल घेऊन  ठाण्‍यामध्‍ये झालेल्या अखिल भारतीय मराठी व्‍यंगचित्रकार संमेलनात हा गौरव करण्‍यात आला. यावेळी व्‍यंगचित्रकार महेंद्र भावसार, ठाणे महापालिकेचे परिवहन समितीचे राजेश मोरे, कार्टूनिस्‍ट्स कंबाईनचे अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे आदी उपस्थित होते. राजेंद्र सरग यांचे रवींद्र बाळापुरे, अरविंद गाडेकर, चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, गणेश जोशी, बाबू गंजेवार,  विश्‍वास सूर्यवंशी आदी व्‍यंगचित्रकारांनी अभिनंदन केले.

 

नळस्टॉप ते फ्लॉयओव्हर एकेरी वाहतूक….कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदलानंतर १० दिवसांत वाहतूकीतील बदलाची अमलबजावणी….

0
पुणे-कर्वे रस्त्यावर फ्लायओव्हर ते नळस्टॉप या दरम्यान मेट्रो पिलर चे काम सुरु होत आहे.त्यामुळे या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.हा वाहतूक बदल कसा असेल याची आज पाहणी करुन,त्याचा सर्व बाजूने विचार करुन आज या बाबतचा निर्णय घेण्यात आला.
या पाहणीसाठी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुढाकार घेतला व नागरिकांच्या सूचनांचा विचार करुन प्रत्यक्ष जागेवरील पाहणीतून वाह्तुकीतील बदल अमलात आणावा असे संबंधित यंत्रणांना सांगितले.त्यानुसार आज पोलिस उपायुक्त वाहतूक अशोक मोराळे,सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,मनपा चे ट्रॅफिक प्लॅनर श्रीनिवास बोनाला व महामेट्रो चे रितेश गर्ग,एन सी सी चे नामदेव गव्हाणे,इतर अधिकारी,तसेच स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,माधुरीताई सहस्त्रबुद्धे,दिलीप वेडे पाटील,जयंत भावे,मा छायाताई मारणे,मा वासंतीताई जाधव,मा हर्षालीताई माथवड,अल्पनाताई वर्पे यांच्या सह स्थानिक नागरिक संदीप मोकाटे,निलेश घोडके,लक्ष्मीकांत नातू,जयंत जोशी,राजेंद्र येडे,जनार्दन क्षीरसागर इ उपस्थित होते.
यावेळी मेट्रो च्या अधिकारयानी वाहतूक पोलिसांशी सल्ला मसलत करुन वाहतूकीत केल्या जाणाऱ्या बदलांची माहिती दिली.त्यानुसार कोथरूड कडुन येणारी वाहतूक एस एन डी टी शेजारील कॅनाल रस्त्यावर वळविली जाणार असून सदर वाहतूक आठवले चौकातून नळस्टॉप चौकाकडे जाईल.नळस्टॉप ते पौडफाटा उड्डाण पुलापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येणार असुन या रस्त्याचा ९ मीटर चा भाग हा मेट्रो पिलर उभारणी साठी वापरला जाणार आहे.
मात्र हा वाहतूक बदल अमलात आणण्यापूर्वी कर्वे रस्त्यावरील आवश्यक बदल तातडीने पूर्ण करावेत अशी सूचना वाहतूक पोलिस सहाय्यक आयुक्त प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी केली.तर यापूर्वी ठरल्याप्रमाणे संपूर्ण कर्वे रस्ता नो पार्किंग नो हॉल्टिंग झोन करण्याबाबतचे फलक अद्याप लावले नाहीत तसेच पदपथ छोटा करणे,हलविलेल्या बसस्टॉपबाबतचे माहिती फलक उभारले नसल्याबद्दल संदीप खर्डेकर व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी नाराजी व्यक्त केली.तसेच नवीन बदलाच्या रस्त्यावर ही असे फलक लावणे प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक वार्डन नेमणे या सूचनांची अमलबजावणी येत्या १० दिवसांत पूर्ण केल्यानंतरच हा वाहतूक बदल केला जावा असे सर्वच लोकप्रतिनिधींनी सांगितले.तसेच कॅनाल रस्त्यावरील पदपथ लहान करणे,आठवले चौकातील डिव्हायडर काढून तेथील व नळस्टॉप चौकातील सिग्नल च्या वेळा बदलणे इ सुधारणा केल्या जाव्यात अशी सूचना मुरलीधर मोहोळ यांनी केली.
मेट्रो चे काम वेगाने पूर्ण करत असताना नागरिकांची सुरक्षितता याला आम्ही प्राधान्य देणार असून वाहतूक कोंडी कमीतकमी व्हावी यासाठी दक्षता घेतली आहे असे मुरलीधर मोहोळ व संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थसंकल्पाकडून एमएलएलची अपेक्षा

0

पिरोजशा सरकारी,

मुख्य कार्यकारी अधिकारी, महिंद्रा लॉजिस्टिक्स लि.


‘देशात जीडीपीच्या १३ टक्के हा लॉजिस्टिक्सचा खर्च विकसित देशांतील ९ ते १० टक्के खर्चापेक्षा अधिक आहे. यासाठीचे एक मुख्य कारण म्हणजे,
विविध ठिकाणी वस्तूंच्या टर्नअराउंडसाठीचा अधिक कालावधी. हा खर्च कमी करणे व टर्नअराउंड कालावधी कमी करणे ही काळाची गरज आहे,
असे महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मत आहे. हे साध्य करण्यासाठी, सरकारने पुढील उपाय करणे गरजेचे आहे:
३पीएल कंपन्यांसाठी

 सध्या वाहतूक उत्पन्नावर २ टक्के टीडीएस द्यावा लागतो. आज करापेक्षाही टीडीएस अधिक वाटत असल्याने यामुळे रोख
रकमेवर मोठा ताण येतो. कराचा दर कमी करण्यासाठी तरतुदी असल्या तरी त्यासाठी बराच वेळ लागतो व त्यासाठी
प्रशासकीय ताणही येतो. दरवर्षी महिंद्रा लॉजिस्टिक्ससारख्या ३पीएल कंपन्या आरओआय भरतात व त्यामध्ये मोठ्या
प्रमाणात कर परतावा समाविष्ट असतो.
 जीएसटी नियमन – सध्या उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार, वाहतूकदाराला सेवा स्वीकारणाऱ्या अंतिम घटकाला जीएसटी
भरावा लागतो त्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम) अंतर्गत किंवा फॉरवर्ड चार्ज मेकॅनिझम (एफसीएम) या अंतर्गत
जीएसटी भरता येतो. एफसीएमचा स्वीकार करणे सेवा देणाऱ्याला फायद्याचे ठरते (कारण त्यास भरलेल्या सर्व करासाठी
इनपुट टॅक्स क्रेडिट मागता येते), परंतु एकदा ही पद्धत स्वीकारली की ती सर्व ग्राहकांसाठी स्वीकारावी लागते. सर्व
ग्राहकांना एफसीएम पद्धत चालेलच असे नाही, त्यामुळे ती ग्राहकानुसार निवडावी लागते. ग्राहकाशी जुळवून घेणे
वाहतूकदारासाठी आव्हानात्मक ठरते.
 ई-वे बिल्सच्या प्रस्तावित अंमलबजावणीच्या बाबतीत, वस्तू पोहोच केल्यानंतर कन्साइनीकडून क्लोजिंग मेकॅनिझम केली
जाणे आवश्यक आहे. यामुळे वस्तू पोहोचल्याची कागदी पावती द्यावी लागणार नाही व वाहतूक सेवा देणाऱ्याचा मोठा
प्रशासकीय ताण कमी होईल.
 उत्पादनाच्या सुविधेसह, रेल्वे, रस्ते व बंदर पायाभूत सुविधा यांचा मेळ घालणाऱ्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स अँड
मॅन्युफॅक्चरिंग झोन्सची (आयएलएमझेड) सुविधा उपलब्ध करावी.

एकंदर कॉर्पोरेट इंडियासाठी
 नियमांतर्गतची आवश्यकता म्हणून, कंपन्यांनी मनुष्यबळाच्या खर्चामध्ये ईएसओपी खर्च समाविष्ट करावा. यानुसार कराची तरतूद करता
येऊ शकते व त्यामुळे काही अकाउंटिंग चार्जवर कर वजावट मिळू शकेल.
 सध्याच्या महत्त्वाच्या नियमांतर्गत, कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातील काही टक्के भाग सीएसआरसाठी खर्च करणे अपेक्षित आहे – हा उपाय
अतिशय चांगला आहे – पण सीएसआरवरील या खर्चावर करातून वजावट मिळू शकेल का?
यामुळे भारतात तयार झालेली उत्पादने व सेवा भारतात सर्वत्र जाण्यासाठी मदत होईल.’

श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वारा​च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0
पुणे : श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वारा च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृतसरमधील कीर्तनकारांद्वारे गुरुद्वारामध्ये नुकतेच २३ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती
विद्यमान विश्वस्त प्रितपालसिंह खंडुजा रणजितसिंह अजमानी, जगजीतसिंह जुनेजा यांनी पत्रकार भवन येथे अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वाराच्या नवीन विश्वस्त मंडळाने अलीकडेच अबाल वृद्धांकरीता अमृतसर येथील मार्गदर्शक आणि कीर्तनकार यांचे कीर्तन, लंगर (कम्युनिटी किचन) आणि कथांचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये त्यांना धर्माची आणि समाजात कसे वागावे याबाबत शिकवणूक दिली जाते.

अशा कार्यक्रमांचे दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी देखील आयोजन केले जाते,

असे

जगजीतसिंह जुनेजा यांनी सांगितले .

श्री गुरुसिंग सभा गणेश पेठ गुरूद्वारा

च्या वतीने वर्षातून एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच दर रविवारी होमिओपॅथी डॉक्टर यांच्याद्वारे मोफत तपासणी करण्यात येते, असे

रणजितसिंह अजमानी यांनी सांगितले.

गोयल गंगा डेव्हलपर्सला मोठा दिलासा -प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द

0

पुणे : गोयल गंगा डेव्हलपर्स कंपनीला मोठा दिलासा देत बांधकाम व्यावसायिक व सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याचा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश सत्र न्यायालयाने रद्द केला आहे.  राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशाचा भंग करून वडगाव बुद्रुक येथे आपल्या प्रकल्पात बांधकाम सुरू ठेवण्याची तक्रार गोयल गंगाच्या विरोधात करण्यात आली होती.न्यायाधीश एस. एम. मोडक यांच्या सत्र न्यायालयाने सोमवारी, २२ जानेवारी रोजी हा आदेश दिला.

“प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी दिलेला फौजदारी दंड प्रक्रिया (इश्यू प्रोसेस) सुरू करण्याचा तसेच गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लि. यांच्याविरोधातील तानाजी बाळासाहेब गंभीरे यांनी दाखल केलेली बेकायदा बांधकाम आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याची फौजदारी तक्रार फेटाळण्याचा आदेश हे न्यायालय देत आहे,” असे न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गेल्या वर्षी २५ जुलै रोजी गंभीरे यांच्या याचिकेवर निकाल दिला होता. एनजीटीने २३.१२.२०१५  रोजी दिलेल्या आदेशाचे गोयल गंगा डेव्हलपर्सने उल्लंघन केले असून गंगा भाग्योदय या प्रकल्पात बांधकाम सुरूच ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी महापालिका व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनाही प्रतिवादी केले होते. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशावर कंपनीने सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

एनजीटीच्या आदेशानंतरही गोयल गंगा डेव्हलपर्सने बांधकाम सुरू ठेवले असल्याचे सिद्ध करण्यात तक्रारदार अयशस्वी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.या संपूर्ण प्रकरणाची तपशीलवार चर्चा करून न्यायाधीशांनी म्हटले, की “अशा प्रकारे तक्रारदार अर्जदारांवर खटला चालविण्यात यशस्वी होऊ शकत नाही. (एनजीटीच्या) अंतरिम आदेशाचे पालन न करता २३ डिसेंबर २०१५ नंतरही बांधकाम झाल्याबद्दल तक्रारदार माझे समाधान करू शकलेले नाहीत. म्हणूनच अर्जदार क्र. २ ते ४ यांना तुरुंगात पाठविण्याबाबत त्यांना यश मिळणार नाही आणि २३ डिसेंबर २०१५ नंतर बांधकाम करण्यात आल्याचे मला कोणीही दाखवून दिलेले नाही. तक्रारदार फक्त त्यानंतरच यशस्वी होऊ शकतो,” असे न्यायालयाने नमूद केले.

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ उपाययोजनांची कराव्या -अपर जिल्हाधिकारी रमेश काळे

0

पुणे- उद्योगांना चालना देण्यासाठी व उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी
तात्काळ उपाययोजन कराव्या, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली. जिल्हा उद्योगमित्र
समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना
केली.
श्री. काळे म्हणाले, चाकण औद्योगिक परिसरातील वाढत्या लोकसंख्येची गरज व गुन्हेगारी लक्षात
घेवून कामगारांच्या सूरक्षेसाठी या परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती होण्यासाठी पाठपूरावा करावा.
कामगारांसाठी आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक ठिकाणी इ.एस.आय रुग्णालय बांधण्याबाबत कार्यवाही
करावी. कामगारांच्या सोयीसाठी पिंपरी- चिंचवड औद्योगिक वसाहती अंतर्गत कंपन्यांच्या शिफ्ट सुरु व बंद
होण्याच्या वेळी पी. एम. पी. एम. एल. च्या बसची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर
या मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी या रस्त्याचा विकास त्वरीत करावा असे सांगून
राज्य कामगार विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व पोलीस यंत्रणा यांनी माथाडी कायद्याचा
गैरवापर करणाऱ्यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, असे निर्देशही श्री. काळे यांनी दिले.
यावेळी हिंजवडी औद्योगिक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये
आग्निशमन केंद्र उभारणे, औद्योगिक वसाहतींमध्ये ट्रक-टेम्पो टार्मिनल उभारणे, पार्किंग व्यवस्था, सांडपाणी
व्यवस्थापन, कर आकारणी या बाबींवर तसेच अन्य पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. या बैठकीला पोलीस,
कामगार विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महानगरपालिका व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी व अशासकीय
सदस्य उपस्थित होते.

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा-आकाश राजभोर व नई चौधरी प्रथम क्रमांकाचे मानकरी

0
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मोपाॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’(मुंबई) यांच्या संयुक्तविद्यमाने ‘फार्मा व्हिजन 2017-18’ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागातून 30 संघ सहभागी झाले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी दिली.
डॉ. व्ही. एम. मोहितकर (संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’ मुंबई) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘फार्मसी संस्थांनी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला जे आवडते तेच कार्य करा तरच तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल.’
तसेच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरही आपले विचार मांडले.
यावेळी डॉ. एम. आर. चितलंगे (उपसचिव एम.एस.बी.टी.आर.ओ, पुणे), लतिफ मगदूम (एमसीई सोसायटीचे सचिव), प्रा. इरफान शेख (एमसीई सोसायटीचे सहसचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी स्वागत केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) हे भारतातील प्रथम डिप्लोमा फार्मसी इन्स्टिट्यूट आहे ज्याने ‘नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडीटेशन’ला अर्ज करून परिक्षण झालेले आहे, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
 डॉ. एम. आर. चितलंगे यांनी ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली व उत्तम नियोजनाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे आभार मानले.
 या स्पर्धेचे मोहन बांदीवडेकर (माजी प्राचार्य के. डी. सी. ए. चे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ए. के. आपटे (उपप्राचार्य, डॉ. जे. झे. मगदूम फॉर्मसी कॉलेज, जयसिंगपूर) आणि अमोल शहा (सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर) हे परीक्षक होते
 या स्पर्धेतील विजेत्यांनामोहन बांदीवडेकर (माजी प्राचार्य के. डी. सी. ए. चे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोल्हापूर) यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आकाश राजभोर, नई मुद्दीन चौधरी (एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) बांद्रा, मुंबई) यांनी पटकाविले. पारितोषिकाचे स्वरूप रुपये 7500 व प्रशस्तीपत्रक होते.
 द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रणिता खारतोडे, साजिद पठाण (दत्तकला शिक्षण संस्थेचे, अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी(डिप्लोमा) दौंड पुणे) यांनी जिंकले. रुपये 5000 व प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते
 तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 2500 व प्रशस्तीपत्रक मानसी देशमुख आणि नम्रता लोखंडे (व्ही. जे. एस. एम. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन जुन्नर) यांना मिळाले
 महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य देखिल उपस्थित होते.
 स्पर्धेचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी केले. किर्ती सपारे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले.

५५ वर्षापूर्वी‍ ताब्यात घेतलेली अडीच एकर जागा मूळ जमीन मालकाला परत देण्याचा प्रस्ताव-प्रशासनाचा अभिप्राय मागविला

0

पुणे- महापालिकेने ५५ वर्षापूर्वी‍ ताब्यात घेतलेली अडीच एकर जागा मूळ जमीन मालकाला परत देण्याचा घाट पालिकेतील काही सभासदांनी घातला आहे. स्थायी समितीत हा प्रस्ताव गुपचूप मान्य केला. मात्र, स्थायी समिती सदस्य अविनाश बागवे, नाना भानगिरे यांनी या प्रस्तावाला फेरविचार देत याबाबत प्रशासनाचा अभिप्राय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यास काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पुणे पेठ पर्वती सर्वे नंबर १२० अ, १२० ब येथील २७ एकर १३ गुंठे ही जागा नगररचना (टीपी स्किम) योजनेनुसार वीटभट्टीसाठी पालिकेच्या ताब्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असताच मूळ जागा मालकांनी पालिकेच्या ताब्यात असलेले पाच प्लॉट परत मिळावेत, असा विनंती अर्ज केला आहे. या जागेचा टिडीआर देण्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याचवेळी या याचिकेबाबत उच्च न्यायालयाने २६ मार्च २०१५ रोजी अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने शासनस्तरावर विधी आणि न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले होते. त्यावर पालिकेचा अभिप्रायही प्राप्त करून घेण्यात आलेले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने १४ जुलै २०१७ रोजी आदेश दिले आहेत.

या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली पुर्नविलोकन याचिका आणि विधी व न्याय विभागाने दिलेले अभिप्राय विचारात घेऊन पालिकेने पुढील कार्यवाही करावी, असे पत्र राज्यसरकारचे अवर सचिव रा.म.पवार यांनी ९ डिसेंबर २०१२ रोजी पाठविले आहे. त्यावर पालिकेने यातील चार फ्लॉट मूळ जागा मालकाला परत द्यावेत, विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवून त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला आहे. त्याला शिवसेना आणि काँग्रेसने फेरविचाराचा प्रस्ताव दिला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.