Home Blog Page 3191

विकास प्रक्रियेत शिक्षकांचे महत्व कळण्यासाठी दिशदर्शक साहित्य संमेलन – डॉ. शां. ब. मुजुमदार

0

कवीवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरी (पुणे) – शिक्षक आणि आईचे स्थान समान आहे. कारण आई जसं आपल्या मुलाला घडवते तसेच शिक्षक व्य्कती समाज घडवण्याचं काम करतात. या शिक्षकाना जेव्हा विकास प्रकियेत सहभागी करून घेतल्यानंतरच खरा विकास होईल. यासाठी शिक्षकांचे महत्व शासनाला कळण्याच्या दृष्टीने दिशा दर्शक असे हे शिक्षक साहित्य संमेलन आहे असे प्रतिपादन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आज येथे केले.

बालगंधर्व रंगमंदिरातील कविवर्य ग. दि. माडगूळकर साहित्य नगरीत भरलेल्या पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. मुजुमदार बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. साहित्यिक डॉ. न. म. जोशी, स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे, मन:शक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी दिपक माळी, माजी आमदार बबनराव साळुंके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सिंम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सरस्वतीचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे उदघाटन केले. यावेळी शिक्षक कवी मदन व्हावळ यांच्या शब्दगुंजन या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. मुजुमदार म्हणाले, उत्तमातील उत्तम साहित्य निर्मिती ही सानेगुरूजी, ना. सि. फडके, श्री. म. माटे, वि. स. खांडेकर यांच्यासारख्या मूळचे शिक्षक असलेल्यांनीच केली आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता प्रतिभावान शिक्षकांच्यातच असते हे पहिले राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन, सानेगुरूजी यासारख्यांनी करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांच्यात विषयाची आवड निर्माण होऊन त्यावर त्याचं प्रेम बसावं, पुढे त्यानं त्यातच अध्ययन करून संशोधन करावं अशी प्रेरणा निर्माण करणारा खरा महान शिक्षक होय.

आज कामाच्या व्यापात शिक्षकांना त्यांच्यातील सर्जनशीलता जपता येत नाही अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, ही सर्जनशीलता कमी होत असल्यानेच शिक्षकांची साहित्य निर्मितीचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्या जागी आता डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ साहित्य निर्मिती करताना दिसतात. असे असले तरी शिक्षकांनी आपण केवळ शिक्षकच आहोत म्हणून स्वत:ला कमी लेखू नका कारण व्यक्ती, समाज घडवण्याचे फक्त शिक्षकच करू शकतात. त्यामुळे जेव्हा विकास प्रक्रियेत शिक्षकांना स्थान मिळाल्यानंतरच खरा विकास होईल. त्यासाठी शासनाला शिक्षकांचे महत्व पटणे आवश्यक असून त्यासाठी हे शिक्षक साहित्य संमेलन दिशदर्शक ठरेल. यावेळी त्यांनी अठराव्या वर्षी नोबोल पुरस्कार मिळवणा-या मलालाची गोष्टही सांगितली.

अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले, शिक्षक असणं महत्वाच असून हे व्रत असलेला पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आचरणातून घडवायचं असतं. आज तंत्रज्ञानाच्या युगात अभ्यासक्रमापासून सर्वकाही एका क्लीकवर मिळू शकेल पण आचरण कसं असावं हे ते तंत्रज्ञान शिकवू शकत नाही. ते शिकवण्यासाठी साठी समोर शिक्षकच असावा लागतो. संतांचे वर्णन करताना संत तुकारांमांनीही लिहिले आहे की, अर्भकाचे साठी पंते धरली हाती पाटी / तैसे संत क्रिया करूनी दाखविती जगा

बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, हे सगळेच शिक्षकच होते असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना शिकवता यावे यासाठी शिक्षकी पेशा सोडून ते लोकशिक्षक झाले.आपलं सत्व अबाधित ठेवून पत्रकार, साहित्यिक, राजकीय नेते, सामाजसेवक घडवण्याचे काम शिक्षकांनीच करून दाखवले आहे. ही परंपरा पुढे सुरू राखण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही शिक्षक साहित्य संमेलनाचा उपक्रम आहे.

सध्या पर्यावरणाच्या प्रश्नची चर्चा जशी होते तशीच चर्चा भाषिक पर्यावऱणाची होणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, आपल्या भोवतीच्या निसर्ग निर्मित गोष्टी म्हणजे पर्यावरण असे आपण मानतो. आता हे पर्यावऱण कमी होऊन प्रदूषण वाढत आहे त्यामुळे त्याची चर्चा जास्त आहे. आपल्या भोवती आणखी एक पर्यावऱण आहे ते म्हणजे भाषिक पर्यावरण. आपण घरीदारी सर्वत्र बोलतो हे बोलणे म्हणजे काय तर भाषाच होय. भाषा हे खर तर शिक्षकांच माध्यम आहे. आपल्याला विद्यार्थी दशेत साहित्यबद्दल गोडी निर्माण करून शिक्षकच कळत न कळत भाषाच घडवत असतात.भाषेच चांगला वापर कसा करायचा हे शिक्षकच शिकवतात. कारण आपण भाषेतच रहातो. पण सध्या महाराष्ट्रात भाषेबद्दल बराच गोंधळ आहे. हा गोंधळ दूर कऱणारे शिक्षक होणे खरे गरजेचे आहे.

स्वागताध्यक्ष आमदार विजय काळे म्हणाले, सर्वांपेक्षा वेगळा विचार फक्त शिक्षकच करू शकतो आणि जो वेगळा विचार करतो तोच खरा शिक्षक. वाचण्यासाठी साहित्य तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळू शकतं पण आपण काय वाचावं त्यातून काय घ्यावं हे सागण्यासाठी समोर शिक्षकच असावा लागतो. कारण खरं शिक्षण हे संवादातून, हृदयातून होत असतं. शिक्षक विचार समाजात रूजवतात आणि समाज ते पुढे नेतो. असे समाज घडवण्याची क्षमता असलेले शिक्षक पुन्हा तयार व्हावेत यासाठीच हा साहित्य संमेलनाचा उपक्रम आहे. त्यामुळे या सर्वच गोष्टी शिक्षकांनीच केलेल्या असल्याने ख-या अर्थाने शिक्षकानी शिक्षकांसाठी भरवलेले हे शिक्षक साहित्य संमेलन आहे.

शिक्षणाधिकारी डॉ. गणपती मोरे यानी स्वागतपर प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी दिपक माळी यांनी आभार मानले. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन मदन व्हावळ यांनी केले. या उदघाटन सोहळ्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी चित्रकलेच्या शिक्षकांनी काढलेल्या चित्रांच्या आणि शिल्पकलेच्या शिक्षकांच्या शिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उदघाटन केले. मन:शक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे यांच्या शिक्षकांसाठी आरोग्यपर मार्गदर्शक व्याख्यानाने संमेलनातील कार्यक्रमांची सुरूवात झाली.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या विरोधात शहरभर निदर्शने

0

पुणे :’पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’ च्या वतीने ‘ पंजाब नॅशनल बँके’ च्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलनाद्वारे जाहिर निषेध करण्यात आला.

पक्षाच्या वतीने आज शहरातील विविध भागात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळच्या सत्रातील हे आंदोलन शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण व माजी उपमहापौर दीपक मानकर  यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने कर्वे पुतळा, पर्वती विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे सातारा रोड, कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने नाना पेठ, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथील पंजाब नॅशनल शाखे समोर सकाळच्या सत्रात आंदोलन झाले.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी उपमहापौर दीपक मानकर, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत तापकीर ,माजी स्थायी समिती अध्यक्षा नगरसेवक अश्विनी कदम, कमल ढोले -पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, , नंदा लोणकर, वासंती काकडे, अशोक राठी, रजनी पांचगे, कलिंदि गोडांबे, रूपाली चाकणकर (शहराध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस), भोलासिंग अरोरा, भगवानराव वैराट, अनिस सुंडके, चद्रकांत कवडे, जनार्दन जगताप, मुनीर सयद, नरेश जाधव, राहुल तांबे, कुलदीपसिंग दुटेजा, विशाल मोरे ,मंगेश मोरे, विशाल नाटेकर, नितीन रोकडे झेंडे, श्वेता होनराव-कामठे (कार्यअध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस), फारूकभाई इनामदार, नारायण लोणकर, सागरराजे भोसले, भानुदास शिंदे, अतुल तरवडे, विक्रम जाधव, शंतनू जगदाळे, करण कोकणे,तुकाराम शिंदे,कलेश्वर घुले, सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाच्या सायंकाळच्या सत्रात खडकवासला, वडगाव बुद्रुक पूल येथील शाखेसमोर ५. ३० वाजता निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होतेे.

केंद्र शासनाच्या योजनांना अधिक गती देण्यासाठी महावितरणच्या मुख्यालयात कंत्राटदारांची आढावा बैठक

0

मुंबई : महावितरणच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत होणाऱ्या कामांना अधिक गती देण्यासाठी कंत्राटदारांची आढावा बैठक महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रत्यक्ष कंत्राटदारांकडून कामाच्या प्रगतीविषयी माहिती व अडचणी समजावून घेतल्या व महत्वपूर्ण निर्देश दिले.

या बैठकीत कंत्राटदारांच्या कामाच्या प्रगतीचे विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले. कंत्राटदाराच्या कामाची प्रगती आणि त्याबाबतची इतर तांत्रिक माहिती संचालक (प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक सर्वश्री. चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे यांनी बैठकीत दिली. यावेळी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश  कंत्राटदारांना देण्यात आले. तसेच कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी यावेळी दिला.

 बैठकीला मुख्यालयातील संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, संबंधित मंडल कार्यालयातील पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता, मुख्यालयातील संबंधित अभियंते व अधिकारी तसेच राज्यातील दिनदयाळ ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये काम करणारे कंत्राटदार उपस्थित होते. 

अवयवदानामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील गोर-गरीब जनता अग्रेसर : आरती गोखले

0

पुणे: एका व्यक्तीचे अवयवदान हे अनेक लोकांच्या अवयव प्रत्यारोपनासाठी उपयुक्त ठरत असल्याने भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये वर्षानुवर्षे अवयव प्रत्यारोपनासाठी वाट पाहत असलेल्या रुग्णांच्या “वेटिंग लिस्ट” मध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून अवयवदानासंबंधी समाजामध्ये जागृती आवश्यक असल्याचे तसेच अवयव दानामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग अग्रेसर असल्याने विशेषतः शहरी भागाची याबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र शासनाच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या मुख्य समन्वयक आरती गोखले यांनी व्यक्त केले.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या वैद्यकीय-मनोवैद्यकीय सामाजिक विभाग तसेच समुपदेशन विभागाच्या वतीने अवयवदान व अवयव प्रत्यारोपण संबंधी आयोजित एक दिवशीय कार्यशाळेमध्ये आरती गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर हे होते तर डॉ अनुराधा पाटील, प्रा. दादा दडस व प्रा. चेतन दिवाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरती गोखले यांनी वैद्यकीय-मनोवैद्यकीय सामाजिक विभाग, समुपदेशन विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विद्यार्थ्यांना अवयवदान व अवयव प्रत्यारोपनासंबंधी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना यावेळी “ब्रेन डेड” आणि “ग्रीन कोरिडोअर” या काय संकल्पना आहेत तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना कोण-कोणत्या अवयव दानासंबंधी व कशापद्धतीने समुपदेशन केले जाते यासंबंधी उदाहरणासहीत मार्गदर्शन केले.

भारतामध्ये अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्य हे गतवर्षी ५९ अवयवदान करणारे तामिळनाडू पाठोपाठ दुसरे आघाडीचे राज्य ठरले असून जनजागृतीमध्ये पुणे जिल्हा हा अग्रेसर असल्याचे मत देखील गोखले यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेमध्ये सहभागी असणाऱ्या २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी अवयवदानासंबंधी स्वेच्छेने नोंदणी केली.

डॉ वलोकर, डॉ अनुराधा पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. दादा दडस यांनी प्रास्ताविक केले

प्रज्ञा थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. चेतन दिवाण यांनी आभार मानले

कुटुंबाला संपवून युवकाची आत्महत्या….

0

पुणे-माणसाचं जीवन दिवसेंदिवस खडतर बनत चाललं आहे ,एकीकडे हजारो कोटीचे घोटाळे करून पलायन करून परदेशात मौजमजा करणारी काही मंडळी दिसतात ,एकीकडे हजारो कोटी रुपयांच्या कंपन्यांचे मालक जे ‘आम्ही  कठोर परिश्रमातून यशस्वी उद्योजक झालोत ‘ असे सांगत ..त्यातील काही कारागृहात खितपत पडलीत ..तर दुसरीकडे … कायम स्वरूपी नौकरी नाही, व्यवसायात फारशी झेप घेता येत नाही म्हणून चिंताग्रस्त बनत चाललेला समाज हि वारंवार आपलं भयाण रूप दाखवितो आहे ….असेच भयाण रूप पुन्हा एकदा पुण्याला दिसलं…

कर्जबाजारीपणामुळे पुण्यातील शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नीलेश सुरेश चौधरी (वय-38), असे आत्महत्या करणार्‍या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी पत्नी निलम चौधरी (वय-33) मुली श्रेया चौधरी (वय-7) आणि श्रावणी चौधरी (वय-9) यांची हत्या केली. निलेश चौधरी याच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या उल्लेख त्यात आहे

‘फक्त एकच खंत आहे, माझ्या दोन्ही मुली, ज्या माझ्यावर जिवापाड प्रेम करत होत्या, देखण्या व अभ्यासात अतिशय हुशार. त्यांची आमच्या नंतर फरफट होऊ नये यासाठी त्यांनाही बरोबर नेत आहोत….. ‘ हे शब्द आहेत कर्जबाजारीपणामुळे आपल्या पत्नी आणि दोन मुलींचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नीलेश चौधरी यांचे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

त्यामध्ये चौधरी यांनी लिहून ठेवले आहे की-

‘मी निलेश सुरेश चौधरी आज रोजी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सहमतीने व्यवसायातील अपयशामुळे जीवन संपवत आहे. यासाठी कोणासही जबाबदार धरू नये. माझ्या व्यावसायातील आर्थिक व्यवहाराचा माझ्या आई-वडीलांशी आणि इतर नातेवाईक मित्रमंडळींशी काहीही संबंध नाही. तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास पोलिसांनी सहकार्य करावे. आमची शेवटची इच्छा म्हणून अवयवदान करण्यात यावे ही नम्र विनंती’

‘आम्ही या परिस्थितीतून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला, गेली चार वर्षापासून पण आम्हाला कुठलाही मार्ग दिसत नव्हता. आम्ही खूप विचार करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. काही लोकांनी माझे जगणे मुश्कील करून टाकले होते. त्यांची नावे घेऊन मी मरताना कुणाला अडचणीत आणू इच्छित नाही.मला कुणाचेही नुकसान करायचे नव्हते, पण या चक्रव्युहातून बाहेर पडू शकणार नाही’ त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत वाडेश्वर विझार्डस, हॉग्स, स्पार्टन्स, सिटी प्राईड सुपरस्टार्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत हॉग्स, वाडेश्वर विझार्डस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.  

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत साकेत गोडबोले(22धावा व 1-12)यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्डस संघाने एम जे  वुल्वस्‌चा 29धावांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना वाडेश्वर विझार्डस संघाने 7षटकात 7बाद 78धावा केल्या. यात साकेत गोडबोले 22, आशिष पाटणकर 12यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना एम जे  वुल्वस्‌ संघाला 7षटकात 7बाद 49धावाच करता आल्या. यात मयुर जुन्नरकर 16, अजिंक्य मेहता 13यांनी थोडासा प्रतिकार केला. वाडेश्वर विझार्डसकडून रोहन राजापुरकर 2-2, जय बेडेकर 2-6, आशिष पाटणकर 1-6, साकेत गोडबोले 1-12, सागर कुलकर्णी  1-14)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी साकेत गोडबोले ठरला.

दुसऱ्या चुरशीच्या झालेल्या लढतीत हॉग्स संघाने मोटिव्हेटर्स संघाचा सुपरओव्हरमध्ये 9 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना हर्षल गंद्रेच्या 26 चेंडूत नाबाद 56 धावांच्या खेळीच्या जोरावर हॉग्स संघाने 7 षटकात 1 बाद 83 धावा केल्या. मोटीवेटर्स संघाने 7 षटकात 2 बाद 83 धावा करून सामना बरोबरीत सोडविला. यात साहिल गोवित्रीकर 30(16), रोहन बर्वे नाबाद 26यांनी धावा करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये मोटीवेटर्स संघाला 0.4 षटकात 4 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल हॉग्स संघाने 0.2 षटकात एकही गडी न गमवता 5 धावा करून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत नॉर्थ वेस्ट टायगर्स संघाने स्पार्टन्सचा सुपर ओव्हरमध्ये 14धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
वाडेश्वर विझार्डस: 7षटकात 7बाद 78धावा(साकेत गोडबोले 22(14), आशिष पाटणकर 12(12), नंदन कामत 2-17, निरंजन गोडबोले 1-7, निरंजन दीक्षित 1-12)वि.वि.एम जे  वुल्वस्‌: 7षटकात 7बाद 49धावा( मयुर जुन्नरकर 16(11), अजिंक्य मेहता 13, रोहन राजापुरकर 2-2, जय बेडेकर 2-6, आशिष पाटणकर 1-6, साकेत गोडबोले 1-12, सागर कुलकर्णी  1-14); सामनावीर- साकेत गोडबोले

स्पार्टन्स- 7 षटकात 5 बाद 70 धावा(रोहन मोने 26(13), नचिकोत जोशी 22(14), अमित परांजपे 15(11), नंदन डोंग्रे 1-9, परेश पुंगलीया 1-10, अभिषेक तम्हाणे 1-11) विरूध्द नॉर्थ वेस्ट टायगर्स- 7 षटकात 7 बाद 70 धावा(सचिन आराध्ये 32(12), रोहन मोने 2-10, नचिकेत जोशी 1-6);
नॉर्थ वेस्ट टायगर्स- 1 षटकात 0 बाद 22 धावा ( सचिन आराध्ये  नाबाद 22(6)) वि.वि  स्पार्टन्स- 1 षटकात 1 बाद 8 धावा( यश परांजपे नाबाद 6, रोहन मोने नाबाद 2) सामनावीर-  सचिन आराध्ये   आणि रोहन मोने

हॉग्स- 7 षटकात 1 बाद 83 धावा(हर्षल गंद्रे नाबाद 56(26, 4×4,4×6), साहिल मदन 13, हर्षद बर्वे 1-21) विरूध्द मोटीवेटर्स- 7 षटकात 2 बाद 83 धावा(साहिल गोवित्रीकर 30(16), रोहन बर्वे नाबाद 26(12), हर्षल गंद्रे 1-13, विशाल सराफ 1-16);
मोटीवेटर्स- 0.4 षटकात सर्वबाद 4 धावा( हर्षद बर्वे  4,  हर्षल गंद्रे  1-4) पराभूत वि  हॉग्स – 0.2 षटकात 0 बाद 5 धावा(साहिल मदन नाबाद 4) सामनावीर-   हर्षल गंद्रे

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आर्यन घाटगे, पार्थ चाफळे, केयूर म्हेत्रे यांची आगेकुच

0

 

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत   आर्यन घाटगे,  पार्थ चाफळे,  केयूर म्हेत्रे,  अर्जुन कीर्तने,  आदित्य आयंगर,  मानस गुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 12वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकित आर्यन घाटगेने आर्यन परबचा 6-0असा तर, आठव्या मानांकित अर्जुन कीर्तनेने सर्वेश इजंटकरचा 6-0असा पराभव करून आगेकूच केली. बाराव्या मानांकित आदित्य आयंगरने तनिष्क सोनारचा 6-2असा सहज पराभव केला. अव्वल मानांकित पार्थ देवरूखकरने पार्थ मानपाठकचा 6-1असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 12वर्षाखालील मुले:
आर्यन घाटगे(4)वि.वि.आर्यन परब 6-0;
अर्जुन कीर्तने(8)वि.वि.सर्वेश इजंटकर6-0;
आदित्य आयंगर(12)वि.वि.तनिष्क सोनार 6-2;
पार्थ चाफळे(6)वि.वि.लव्य बलदोटा 6-2;
पार्थ देवरूखकर(1)वि.वि.पार्थ मानपाठक 6-1;
पियुष जाधव(5)वि.वि.अर्जुन कलाटे6-3;
केयूर म्हेत्रे(3)वि.वि.वेदांत चव्हाण 6-0;
अर्चित धूत(10)वि.वि.दिपित वर्तक 6-4;
सूर्या काकडे(13)वि.वि.श्रीधर जलवादीमथ 6-4;
मानस गुप्ता(7)वि.वि.आर्यन रायजादे 6-2;
अर्णव बनसोडे(11)वि.वि.तन्मय सिसोडे 6-0.

नस्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

पुणे  नस्या महाराष्ट्र तर्फे नस्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  स्पर्धेचे अनावरण  17 फेब्रुवारी 2018 रोजी डेक्कन रन्डेवझ हॉटेल येथे राजेश पांडे व एमसीआयएमचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता  यांच्या उपस्थितीत होणार आहे.

ही स्पर्धा 22 ते 25 मार्च दरम्यान भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय, वाघोली येथे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयांसाठी भरवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत 35 महाविद्यालयांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

अधिक माहिती देताना  नस्या महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. सुकुमार सरदेशमुख  म्हणाले की, नस्या महाराष्ट्र ही संस्था आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत आहे. याशिवाय आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत 500हुन अधिक विद्यार्थी आणि वैद्य सहभागी होणार आहेत तसेच 1000हून अधिक विद्यार्थी आणि वैद्य प्रेक्षक येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेला एमयुएचएस आणि एमसीआयएम यांचा पाठिंबा मिळाला आहे.

स्पर्धेत अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, पीडीइएस सीएआरसी, आकुर्डी, एसएसएएम हडपसर, भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज, बीएसडीटीएएम वाघोली, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, अण्णासाहेब डांगे, राजाराम बापू पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, एसव्हीएनएच आयुर्वेद महाविद्यालय राहुरी, संगमसेवा भावी ट्रस्टआयुर्वेद महाविद्यालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय शेगांवनगर, सिद्धकला  आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर, आश्विनी रूरल आयुर्वेद कॉलेज, पोद्दार आयुर्वेद कॉलेज, एसएमटीकेजे मित्तल आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद प्रसारक मंडल्स  आयुर्वेद महाविद्यालय सायन, श्री एनकेडी ट्रस्ट नालासोपारा आयुर्वेदिक महाविद्यालय, वायएमटी  आयुर्वेद महाविद्यालय खारघर, एचएसपीएम आयुर्वेद मेडिकल कॉलेज पेठ वडगांव, यशवंत  आयुर्वेद महाविद्यालय कडोळी, एलकेआर  आयुर्वेद महाविद्यालय गढहिंग्लज, डॉ जेजे मकदूम  आयुर्वेद महाविद्यालय जयसिंगपूर, बीएसपीएम धन्वंतरी  आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर, आर्यांग्ला वैद्यक महाविद्यालय, रूरल इन्स्टिटयूट ऑफ आयुर्वेद मायनी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, एसइएस  आयुर्वेद महाविद्यालय पंचवटी, एसएमबीटी सेवाधारी ट्रस्ट इगतपुरी, जगदंब आयुर्वेद सोसायटी कॉलेज येवला, सीएसएमएस आयुर्वेद   महाविद्यालय कांचनवाडी, शिवा ट्रस्ट यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक कॉलेज  हे पुणे, सांगली, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सातारा, उस्मानाबाद, नाशिक येथून 35 महाविद्यालयांच्या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

स्पर्धेतील  विजेत्या संघाला 31,000 आणि उपविजेत्या संघाला 21,000  अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

महावितरणच्या पवन व सौर ऊर्जेच्या वीज खरेदीला मुदतवाढ

0

मुंबई – महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी 500 मे.वॅ. पवन ऊर्जा व 1000 मे.वॅ. सौर ऊर्जा दीर्घकालिन  निविदाद्वारे महावितरण खरेदी करणार आहे. या खरेदीच्या प्रकियेला मुदतवाढ देण्यात आली असून यात राज्यातील पवन व सौर ऊर्जा प्रकल्पांनी सहभागी होऊन याचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केलेले आहे.

या वीज खरेदीसाठी निविदापूर्व बैठकीतील प्रश्नांची उत्तरे महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यात काही नियम व अटी यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  अंतिम निवडीसाठी विनंती (RFS) व वीज खरेदी करार (PPA) टीसीआयएलचे संकेतस्थळ https://www.tcil-india-electronictender.com यावर उपलब्ध्‍ करून देण्यात आली आहे.  पवन ऊर्जा व सौर ऊर्जा वीज खरेदीसाठीच्या तांत्रिक व आर्थिक निविदा भरण्याची शेवटची तारीख अनुक्रमे दि. 22.02.2018 व 23.02.2018 पर्यन्त वाढविण्यात आली आहे.  या संदर्भात इच्छूकांनी टीसीआयएलचे संकेतस्थळ https://www.tcil-india-electronictender.com किंवा महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in ला भेट द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

प्रवाशांनी आपल्या अधिकारांबाबत जागृत असावे – न्यायाधीश मोडक​​​​

0

पुणे  – रेल्वे प्रवाशांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत राहून न्याय व्यवस्था व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. मोडक यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लोहमार्ग न्यायालय, पुणे मंडळ रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय, जिल्हा लोहमार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर रेल्वे प्रवाशांच्या अधिकार व हक्कांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर. अष्टुरकर, रेल्वे कोर्टाचे न्यायाधीश संजय सहारे, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त डी. विकास, रेल्वे पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, रेल्वे वाणिज्य प्रबंधक एस.के. दास आदी उच्च अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी विभागीय रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक श्री. मिलींद देऊस्कर आपल्या भाषणात म्हणाले की, रेल्वेच्या गेटला बरेच वाहन चालक धडक देतात. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान रेल्वेला सोसावे लागते. म्हणून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केली.
प्रवाशांनी घ्यावयाची दक्षता यावर गुन्हे गुप्त विभागाचे निरिक्षक सुनिल चाटे बोलले.  रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर रेल्वे स्थानक निर्देशक ए.के. पाठक यांनी मार्गदर्शन केले.  प्रवाशांच्या अधिकारांची माहिती के.एस. दास यांनी दिली तर लोकअदालतीवर अॅड. व्ही.व्ही. बारभाई यांचे भाषण झाले. भारतीय रेल्वे कायद्यातील तरतुदींची डि. विकास यांनी माहिती दिली. रेल्वे अपघात व त्यांना मिळणारी मदत यावर डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी मार्गदर्शन केले. आरोपींचे अधिकार व न्यायालयीन प्रक्रिया यावर रेल्वे न्यायधीश संजय सहारे यांनी भाषण केले. कायदेशीर मदत व मध्यस्थी यावर पी.आर. अष्टुरकर यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधान प्रास्ताविकेच्या कोनशिलेचे अनावरण प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोडक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी लोकअदालतीचे महत्व सांगणाया फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना रेल्वे न्यायाधीश संजय सहारे यांनी केली तर सुत्रसंचालन न्यायाधीश स्वप्नील थोडगे यांनी केले. आभार प्रदर्शन वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक डॉ. अतुल झेंडे यांनी केले.

कला ही मानवाला जगायला शिकविते – प्रतीक्षा लोणकर

0

पुणे- कोणतीही कला ही मानवाला जगायला शिकविते. त्यामुळे विद्यार्थीदशेत असताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला जोपासावी. मानवी जीवनात चढ-उतार येत असतातच. तसेच तणाव सुद्धा येत असतात. अशा वेळेस आपण जोपासलेली कला किंवा छंद या स्थितीतून तुम्हाला बाहेर काढू शकतो. असे विचार प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी मांडले.
एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या लिबरल आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या वतीने आयोजित प्रिझम-२०१८ या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभात त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी चाणक्य मंडळचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या लिबरल ऑर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्सचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. महेश आबाळे व विद्यार्थी प्रतिनिधी श्‍वेता फडणीस हे उपस्थित होते.
प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या, सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा आयक्यू- इंटेलिजन्स कोशंट बराच चांगला आहे. पण त्याबरोबरच त्यांनी ईक्यू -इमोशनल कोशंट वाढवावा. २१व्या शतकात माणूस म्हणून जगा. कुटुंब, नातेवाईक या सर्वांना सोबत घेऊन चला. त्यामुळे समाज निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांनी यशासाठी शॉर्टकटचा फॉर्मुला वापरू नये. कठोर मेहनत हेच यशाचे गमक आहे. विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचा सदैव फायदा उचलावा. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या छंदामध्येसुद्धा विद्यार्थी स्वतःचे करियर घडवू शकतात.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, तुमच्या सामोर येणार्‍या प्रत्येक समस्यांचा सामना स्वतःच्या हिंमतीवर करा. परीक्षेतील मार्क हे शैक्षणिक गुणवत्ता दाखवितात. परंतू व्यवहारात वावरतांना तुम्हाला स्वतःचे तारतम्य वापरावे लागते. त्यासाठी खूप मेहनत घेणार्‍यांसाठी संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर कधीही अहंकाराचा वारा अंगात शिरू देऊ नका.
डी.पी. आपटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी शिस्त बाणवली, तर जीवनात त्याचा खूप मोठा उपयोग होतो. हीच शिस्त तुम्हाला घरात, कामाच्या ठिकाणी आणि एकंदरितच समाजात शांती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी अध्ययनाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर अधिक लक्ष द्यावे.
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, तरूण पिढीबद्दल नेहमी निराशावादी टीका केली जाते. परंतू, आजचे कार्यक्रम पाहिल्यानंतर मात्र त्यांच्याबद्दल आशा वाटू लागली आहे.
प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी कॉलेजच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाची माहिती दिली.
जनरल सेक्रेटरी श्‍वेता फडणीस हिने आपले विचार मांडले.
प्रिझम- २०१८ स्नेह सम्मेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध एकांकिका, गायन, मिमिक्री व नृत्याचा समावेश होता. तसेच, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, खेळ, विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी मोती यांनी आभार मानले.

गुरु – शिष्यांच्या अनोख्या सांगीतिक आविष्कारातून उलगडली ‘विरासत’

0

– लुई बॅंक्स – जिनो बॅंक्स, विद्वान विक्कू विनायकराम – सेल्वा गणेश, गणेश राजगोपालन – कुमरेश राजगोपालन आणि तौफिक कुरेशी – उस्ताद झाकीर हुसेन यांच्या एकत्रित सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध

– पहिल्यांदाच नात्यातील चार गुरु शिष्यांचे एकत्रित सादारीकरण

पुणे – हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची गुरु शिष्य परंपरा जपत, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत चार गुरु – शिष्यांच्या जोडीने पहिल्यांदाच एकत्रित सादर केलेल्या अनोख्या सांगीतिक कलाविष्कारातून भारतीय संगीताची ‘विरासत’ पुणेकरांसमोर उलगडली. निमित्त होते, ‘मिराज क्रिएशन्स’ निर्मित आणि राहुल रानडे प्रस्तुत रक्ताच्या नात्यातील गुरु शिष्यांच्या ‘विरासत’ या संगीत मैफलीचे.

महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे आयोजित या अनोख्या संगीत मैफलीची सुरुवात सुप्रसिद्ध दक्षिणात्य व्हायोनील वादक गणेश आणि कुमरेश यांच्या जुगलबंदीने झाली. त्यांनी ‘अधुभूत’ ही पल्लवी सादर केली. अत्यंत सुमधुर मुद्रेतील हा राग ऐकून प्रेक्षक भारावून गेले. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांचे बंधू तालवादक तौफिक कुरेशी यांच्या साथीने आपल्या कलात्मक अविष्कारातून श्रोत्यांना संगीताची नादमय प्रचीती घडवून आणली.

जेष्ठ घटम वादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण विक्कू विनायकराम यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना टाळ्यांच्या सहाय्याने वादनात समाविष्ट करवून घेतले. विक्कुजींनी आपले सुपुत्र सेल्वा गणेश यांच्या सोबत खास कर्नाटक शैलीत तालवादन सादर केले. सेल्वा गणेश यांचे एकल वादनही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले.

त्यानंतर मैफलीत प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश राजगोपालन आणि कुमरेश राजगोपालन यांनी चारुकेशी रागाचे सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली. तौफिक कुरेशी, उस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी रसिकांना भावली. पारंपारीकते बरोबरच लुई बँक्स आणि जीनो बँक्स यांसारखी पिता पुत्राची आधुनिक संगीताची साधना असणारी जोडी देखील होती. लुई बँक्स यांनी पियानो वरील कसब आणि जीनो यांची ड्रम वरील तालाची विविधता प्रेक्षकांना वेड लाऊन गेली. जीनो बँक्स, झाकीर हुसेन आणि तौफिक कुरेशी यांचे पाश्चिमात्य शैलीतील सादरीकरण मैफलीचे विशेष आकर्षण ठरले.

पुण्याच्या ‘विरासत’ मधे मानाचं स्थान असलेले पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती व त्यांची धुरा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र डॉ. पराग संचेती आणि कन्या सौ. मनीषा संचेती-संघवी यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ या पिता – पुत्राच्या जोडीने केले. या मैफलीला प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, आनंद भाटे, अभिनेते सचिन खेडेकर, सुनील बर्वे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मैफलीच्या समारोपाला सर्व कलाकारांनी मिळून ‘पीस कॉल’ या पारंपरिक आणि पाश्चिमात्य संगीताचे मिश्रण असलेल्या कलाप्रकाराचे सादरीकरण केले.

या मैफलीच्या व्यवस्थापनात श्याम भूतकर यांनी रंगमंच, हर्षवर्धन पाठक यांनी लाईट्स, मुजीब दादरकर यांनी ध्वनी संयोजन, सचिन नाईक यांनी ध्वनीयंत्रणा, तर जाहिरात डिझाईन मिलिंद मटकर यांनी केले. मैफलीचे इव्हेंट मेँनेजमेंट ‘ए – फील्ड प्रा. ली.’ तर पी.आर. ‘लीड मिडिया’ यांनी सांभाळले. ‘विरासत’ या भव्य कार्यक्रमाचे प्रायोजक स्टेट बँक ऑफ इंडिया, आय.आर.बी, विलास जावडेकर असोसिएट्स असून विविध पार्टनर्स पू. ना. गाडगीळ (नळ स्टॉप शोरूम), केसरी टूर्स, गिरिकंद हॉलिडेज, धीरेंद्र आऊटडोअर मीडिया सर्व्हिसेस व रेडिओ सिटी होते.

4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आयएमई फायरबर्डस्, डीएसके पॅलाडीन्स, एमपी ग्रुप मावेरीक्स, एसएस रॉय वायकिंग्स संघांचा विजय

0
पुणे-  ग्रीन बॉक्स्  यांच्या तर्फे आयोजीत  4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आयएमई फायरबर्डस्,  डीएसके पॅलाडीन्स,  एमपी ग्रुप मावेरीक्स,  एसएस रॉय वायकिंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. 
 
कॅसल रॉयल  , एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरज थापाच्या धडाकेबाज 3 गोलच्या जोरावर चेताज नाईट्स संघाने गोयल गंगा लॉन्सर्स संघाचा 3-0 असा सहज पराभव करत आगेकूच केली.
यश चव्हाण , अझर खान व येलसन नाईगम  यांच्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर केएसएच बोल्टस् संघाने  रावेतकर ग्लॅडीअटर्स संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. एमपी ग्रुप मावेरीक्स संघाने रोहन बिल्डर्स(इंडीया)प्रा.लीमीटोड बायसन्स संघाचा 4-1 असा पराभव केला. 
 
एसएस रॉय वायकिंग्स संघाने 

माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स संघाचा 2-1 असा, 
आयएमई फायरबर्डस् संघाने
परांजपे स्पार्टन्स् संघाचा 2-0 असा पराभव केला.
डीएसके पॅलाडीन्स संघाने
नेओट्रीक फिनोलेक्स्(सीपी) -रोझोरबॅक्स संघाचा तर
युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाने 
अभिराज शिरोळे अॅन्ड असोसीएट्स समिराईज् संघाचा अनुक्रमे 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

चेताज नाईट्स- 3(सुरज थापा 2,7,14मी) वि.वि गोयल गंगा लॉन्सर्स- 0
 
केएसएच बोल्टस्- 3(यश चव्हाण 2मी, अझर खान 12मी, येलसन नाईगम 15मी) वि.वि  रावेतकर ग्लॅडीअटर्स- 0
 
एसएस रॉय वायकिंग्स- 2(साहिल भोकरे 8मी, ओमकार यादव 16मी) वि.वि माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स- 1(नील संघवी 2मी)
आयएमई फायरबर्डस्- 2(तन्मय शिरोडकर 5मी, गितेश मुलचंदानी 14मी) वि.वि परांजपे स्पार्टन्स्- 0

डीएसके पॅलाडीन्स- 1(निखिल माळी 5मी) वि.वि   नेओट्रीक फिनोलेक्स्(सीपी) -रोझोरबॅक्स- 0
एमपी ग्रुप मावेरीक्स- 4(शवन अर्लांड 3मी, अदित्य अय्यर 10मी, यश जैन 12मी) वि.वि  रोहन बिल्डर्स(इंडीया)प्रा.लीमीटोड बायसन्स- 1(हितेश लुल्ला 9मी)
एबीआयएल  अॅझटेक्स- 2(सुनिल गुप्ता 6मी, कौस्तूभ सुर्यवंशी 10मी) बरोबरी वि हिल्योज् सेंच्यूरियन्स- 2(फ्रॅंकी डेविड 4मी, जीवन नागले 18मी)
 युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स- 1(निशिथ हेगडे 8मी) वि.वि अभिराज शिरोळे अॅन्ड असोसीएट्स समिराईज्- 0

आर.आर.पाटील यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन

0

पुणे :

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आर. आर. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या हिराबाग चौक येथील कार्यालयात आबा लोंढे ( सरचिटणीस, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग ) यांच्या हस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण ,संजय गायकवाड, शंकर शिंदे, नीलेश वरे, वैभव जाधव, अमर जाधव, अविनाश वेल्हाळ, प्रकाश बहादपूरे, शांतीलाल मिसाळ उपस्थित होते.

पुणेकरांनी राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 16- राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी हे केंद्र सरकारच्या हातमागासाठी असलेल्या विपणना संबंधीच्या योजनांपैकी एक असून हे प्रदर्शन उच्च दर्जाचे आहे. या प्रदर्शनाचे आयोजन सात वर्षानंतर पुणे शहरात ए.आय.एस. एस.एम.एस. कॉलेज ग्राऊंड, रेल्वे स्टेशन मागे, आर.टी.ओ ऑफिसजवळ करण्यात आले आहे. या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनीचे आयोजन विकास आयुक्त (हातमाग), नवी दिल्ली, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळास देण्यात आलेली आहे.

हातमागावर उत्पादित मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे. विविध राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये गरीब विणकरांद्वारे उत्पादित वाजवी हातमाग कापड ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणे. हातमाग क्षेत्रामध्ये उत्पादित कापडाची व वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्सची ग्राहकांना ओळख पटवून देणे. हातमाग विणकरांमध्ये व ग्राहकांमध्ये नविनतम आधुनिक डिझाइन्स तयार केल्या जाऊ शकतात व मार्केट विषयी पडताळणी आदी बाबत माहिती उपलब्ध करून देणे, हे या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे प्रमुख उद्देश आहेत. या प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी 2018 ते 4 मार्च 2018 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये एकुन 14 राज्यांचे स्टॉल असून या प्रदर्शनाचे बांधकाम 45 चौ. फुट मध्ये असून केंद्र शासनाच्या थीम पॅव्हेलियन 2500 चौ. फुटाचे आहे. थीम पॅव्हेलियन मध्ये विणकाम कसे करण्यात येते, कापडावर प्रिंटींग कशी करण्यात येते याची ओळख नागरीकांना होण्याकरीता प्रात्येक्षिक दाखविण्यात येत.  प्रदर्शनास प्रवेश व पार्किंग निशुल्क आहे.

महाराष्ट्र राज्यातील उत्पादीत कापड, साडी, ड्रेस मटेरिअल, पैठणी साडी, उत्तरप्रदेशची बनारसी साडी, तनचुई सिल्क साडी, सितापूर दरी, लखनवी चिकन वर्क, जम्मु काश्मिरची कश्मिना शॉल, जामा वर्क साडी, ओरिसाची संऊलपूरी टाय आणि डाय साडी, हारियानाची सिल्क बेड कव्हर, कुशन कव्हर, राज्यस्थानची जयपूरी प्रिंटेड बेडशिट, रजाई, बंधेज सूट, टॉप, दिल्लीची बेडशिट, कर्टन, बॅग्ज, पश्चिम बंगालची जमदानी साडी, मध्यप्रदेशची चंदेरी सुटपीस, बटीक साडी, माहेश्वरी साड, बाघ प्रिंट साडी, बीहारची टसर ड्रेस मटेरिअल, मुगा मटका सिल्क साडी, मधुबनी साडी, झारखंडची एम्ब्रायडी बेडशिट, टॉप, सुट, तेलंगणाची इकत साडी, मंगलगौरी साडी, कोचमपट्टी, तामीळनाडूची मदुराई, कोईमतूर,कोरा, कॉटन व सिल्क साडी, गुजरातची पटोला साडी, संस्कृती साडी, बेडशीट, टॉप्स इत्यादी विविध स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुणेकरांनी राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनीस भेट देऊन कलाकुसर विणकाम करणाऱ्या विणकारांचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे यांनी केले आहे.