पुणे- डेक्कन जिमखाना तर्फे आयोजित अनिल. जी. रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत हॉग्स, वाडेश्वर विझार्डस या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत साकेत गोडबोले(22धावा व 1-12)यांनी केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाडेश्वर विझार्डस संघाने एम जे वुल्वस्चा 29धावांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना वाडेश्वर विझार्डस संघाने 7षटकात 7बाद 78धावा केल्या. यात साकेत गोडबोले 22, आशिष पाटणकर 12यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना एम जे वुल्वस् संघाला 7षटकात 7बाद 49धावाच करता आल्या. यात मयुर जुन्नरकर 16, अजिंक्य मेहता 13यांनी थोडासा प्रतिकार केला. वाडेश्वर विझार्डसकडून रोहन राजापुरकर 2-2, जय बेडेकर 2-6, आशिष पाटणकर 1-6, साकेत गोडबोले 1-12, सागर कुलकर्णी 1-14)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी साकेत गोडबोले ठरला.
दुसऱ्या चुरशीच्या झालेल्या लढतीत हॉग्स संघाने मोटिव्हेटर्स संघाचा सुपरओव्हरमध्ये 9 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना हर्षल गंद्रेच्या 26 चेंडूत नाबाद 56 धावांच्या खेळीच्या जोरावर हॉग्स संघाने 7 षटकात 1 बाद 83 धावा केल्या. मोटीवेटर्स संघाने 7 षटकात 2 बाद 83 धावा करून सामना बरोबरीत सोडविला. यात साहिल गोवित्रीकर 30(16), रोहन बर्वे नाबाद 26यांनी धावा करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये मोटीवेटर्स संघाला 0.4 षटकात 4 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल हॉग्स संघाने 0.2 षटकात एकही गडी न गमवता 5 धावा करून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत नॉर्थ वेस्ट टायगर्स संघाने स्पार्टन्सचा सुपर ओव्हरमध्ये 14धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
वाडेश्वर विझार्डस: 7षटकात 7बाद 78धावा(साकेत गोडबोले 22(14), आशिष पाटणकर 12(12), नंदन कामत 2-17, निरंजन गोडबोले 1-7, निरंजन दीक्षित 1-12)वि.वि.एम जे वुल्वस्: 7षटकात 7बाद 49धावा( मयुर जुन्नरकर 16(11), अजिंक्य मेहता 13, रोहन राजापुरकर 2-2, जय बेडेकर 2-6, आशिष पाटणकर 1-6, साकेत गोडबोले 1-12, सागर कुलकर्णी 1-14); सामनावीर- साकेत गोडबोले
स्पार्टन्स- 7 षटकात 5 बाद 70 धावा(रोहन मोने 26(13), नचिकोत जोशी 22(14), अमित परांजपे 15(11), नंदन डोंग्रे 1-9, परेश पुंगलीया 1-10, अभिषेक तम्हाणे 1-11) विरूध्द नॉर्थ वेस्ट टायगर्स- 7 षटकात 7 बाद 70 धावा(सचिन आराध्ये 32(12), रोहन मोने 2-10, नचिकेत जोशी 1-6);
नॉर्थ वेस्ट टायगर्स- 1 षटकात 0 बाद 22 धावा ( सचिन आराध्ये नाबाद 22(6)) वि.वि स्पार्टन्स- 1 षटकात 1 बाद 8 धावा( यश परांजपे नाबाद 6, रोहन मोने नाबाद 2) सामनावीर- सचिन आराध्ये आणि रोहन मोने
हॉग्स- 7 षटकात 1 बाद 83 धावा(हर्षल गंद्रे नाबाद 56(26, 4×4,4×6), साहिल मदन 13, हर्षद बर्वे 1-21) विरूध्द मोटीवेटर्स- 7 षटकात 2 बाद 83 धावा(साहिल गोवित्रीकर 30(16), रोहन बर्वे नाबाद 26(12), हर्षल गंद्रे 1-13, विशाल सराफ 1-16);
मोटीवेटर्स- 0.4 षटकात सर्वबाद 4 धावा( हर्षद बर्वे 4, हर्षल गंद्रे 1-4) पराभूत वि हॉग्स – 0.2 षटकात 0 बाद 5 धावा(साहिल मदन नाबाद 4) सामनावीर- हर्षल गंद्रे