पुणे-“सर्व मानवजातीला एकत्रित आणण्यासाठी भविष्यात संत ज्ञानेश्वर घुमटाचे कार्य महान असून सर्व धर्मातील लोकांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य या माध्यमातून होईल. भव्य असा घुमट पाहिल्यावर येथूनच संपूर्ण विश्वात भव्य असा शांतीचा संदेश दिला जाईल.,”असा विश्वास जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणेतर्फे लोणीकाळभोर राजबाग येथे उभारण्यात आलेल्या घुमटाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केला.
यावेळी सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ. एडीसन सामराज, डॉ. जब्बार पटेल, डॉ. शरद देशपांडे, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट,डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, , एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय, आदिनाथ मंगेशकर हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“एकीकडे थ्रीडी प्रिटिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून येथील वास्तू मानव निर्मित असून अद्वितीय आहे. जगभरात माणसाची जागा मशीनने घेतली आहे. पण, येथे मशीनची जागा माणसाने घेतली आहे. सर्वांना एकत्रित कसे आणता येईल, याचे हे उत्तम उदाहरणच म्हणता येईल. भव्य वास्तूची निर्मिती झाल्यावर संपूर्ण जगात पुण्याची ओळख ही या वास्तूच्या माध्यमातूनच होईल.
“जागतिक प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन एमआयटीने मानवी घटकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. याची निर्मिती झाल्यावर जगभरातील पर्यटक ही वास्तू पहावयास येतील. आध्यात्मिक भारतभूमीचा जगापुढे कोणता संदेश दयावयाचा आहे, हे ठरवून योग्य ती टॅग लाईन देण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“२१व्या शतकातील ही सर्वात भव्य दिव्य अशी वास्तू आहे. त्यामुळे जगभरात भारताची एक वेगळी ओळख निर्माण होईल. येथील अद्वितिय वास्तूची विशेषता ही आहे, की मशीनचा वापर कमी असून मानवी घटकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारत मातेच्या चरणी अर्पित अशा या वास्तूची सुरूवात १२ वर्षांपूर्वी झाली. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी निर्मित अशी या वास्तूची निर्मिती झालेली आहे. या वास्तूचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, तसेच २ ऑक्टोबर २०१८ रोजी उद्घाटन करण्याचा मानस आहे. येथे निर्मित वर्ल्ड पीस लायब्रेरी व वर्ल्ड पीस प्रेयर हॉल जगाला शांतीचा संदेश देईल.”
संत ज्ञानेश्वर घुमटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचेल शांतीचा संदेश
नाशिकहून ग्रीन कॉरीडोर द्वारे आणलेल्या यकृतामुळे मिळाले पुण्यातील व्यक्तीला जीवनदान
पुणे-एका ब्रेन डेड रुग्णांचे यकृत आज नाशिक येथून ग्रीन कॉरीडोर चा उपयोग करून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलची टीम हे यकृत नाशिकहून घेउन दु ४ वाजून १८ मिनिटांनी निघाली व ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. ग्रीन कॉरीडोर हे नाशिक पासून पुण्यापर्यंत तयार करण्यात आले होते. या ग्रीन कॉरीडोर मार्फत यकृत केवळ ३ तासात पुण्यात पोहोचले. सर्व सामान्यपणे या प्रवासासाठी ६ तास लागतात.
नाशिक येथील व्यक्तीला रोड ट्राफिक अपघातात मरण पावल्याने ऋषीकेश हॉस्पिटल नाशिक येथे २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले परंतु रुग्णांने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी रुग्णास ब्रेन डेड घोषित केले ऋषीकेश हॉस्पिटल नाशिक च्या मेडिकल टीमने ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे अवयव दाना संदर्भात समुपदेशन केले व त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.
ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथील यकृत तज्ञांनी त्वरित नाशिक येथे जाऊन ऑर्गन रिट्रीव्हलची प्रक्रिया आज दुपारीच पूर्ण केली. पुणे व नाशिक येथील वाहतूक पोलीसाच्या सहकार्यामुळे ग्रीन कॉरीडोर द्वारा नाशिक पासून पुण्या पर्यंत यकृत केवळ ३ तासात आणता आले.याविषयी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ डॉ गौरव चौबळ म्हणाले, कुटुंबाने अवयव दान करण्यासाठी एक उत्कृष्ट निर्णय घेतला ज्यायोगे या प्रक्रियेचा लाभ घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या जीवनाचे जतन करण्यात मदत झाली आहे. डॉक्टर आणि रुग्ण कुटुंब याबद्दल कृतज्ञ आहेत
ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत तज्ञ सोमनाथ चटोपाध्याय म्हणाले की, “ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाच्या यकृत दानाचा घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अवयव दानाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नवे जीवन देऊ शकते. एक व्यक्तीच्या अवयव दानमुळे जवळपास नऊ लोकांचे प्राण वाचू शकतात. अवयव दाना बाबतीत जनजागृकता वाढवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटल प्रयत्न करीत आहे.”
खबरदार ,पुण्याचं पर्यावरण नष्ट कराल तर …एम्प्रेस गार्डन साठी कॉंग्रेसचे आंदोलन
पुणे-“एम्प्रेस गार्डन’च्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थानासाठी इमारती बांधण्याचा घाट सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली . ऍग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, एम्प्रेस गार्डन चे मंद सचिव सुरेश पिंगळे यांना यावेळी अक्षरशः घेरी (चक्कर )आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुगणालयात पाठविण्यात आले .
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,आबा बागुल,मनीष आनंद,मोहन जोशी, अभय छाजेड , सोनाली मारणे, संदीप मोकाटे, प्रा. जगताप,रमेश अय्यर,संगीता तिवारी,सतीश पवार, चंद्रशेखर कपोते आदी मान्यवर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते
ब्रिटिशकालीत ५५ एकरातील एम्प्रेस गार्डन सध्या सदतीस एकर झाले आहे.त्यातील तब्बल साडेदहा एकर जागेवर इमारती बांधण्याची योजना सरकारने आखली आहे. या जागेवर तीन शासकीय इमारती बांधण्यात येणार असून, त्यामध्ये सरकारी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी; तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थान म्हणून त्यांचा वापर करण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रियाही करण्यात आली असून, त्यासाठी चार कोटी 85 लाख रुपये खर्च येणार आहे.
एम्प्रेस गार्डन हा शहराचा श्वास आहे त्याच्या झाडाचा पालापाचोळा हि तोडू देणार नाही, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वाट्टेल ती किंमत आम्ही मोजू असा निर्धार यावेळी रमेश बागवे यांनी व्यक्त केला. पहा आणि ऐका ..या आंदोलनाची एक हलकीशी झलक ..
कै.संजय बिरू दुधभाते प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हास्तरीय मुष्टीयोद्ध स्पर्धा संपन्न
अॅटमचा शिक्षण आणि रिटेल क्षेत्रातील डिजिटल देयकांसाठी पुण्यात प्रवेश
पुणे-डिजिटल देयकांचा भारतातील प्रमुख शहरे तसेच लहान शहरांमध्येही उत्तम स्वीकार होत आहे. पुणेही याला अपवाद नाही. अॅटम टेक्नोलॉजीज, या शिक्षण आणि रिटेल या दोन प्रमुख क्षेत्रात सेवा देणाऱ्या अग्रेसर डिजिटल देयकांच्या कंपनीने, पुण्यात डिजिटल देयकांचा पुढील टप्पा गाठला आहे.
कंपनीने आतापर्यंत पुण्यातील 100 शैक्षणिक संस्थांबरोबर काम केले आहे, यासाठी साधारणपणे 20-30 लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवहारही झालेला आहे. कंपनीने पुणेस्थित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डिजिटल देयकांच्या पद्धती स्वीकारल्या जाव्यात, शुल्क भरणे, कँटीनची शुल्क भरणे आदींसाठी त्याचा स्वीकार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. डिजिटल देयकांच्या व्यवहारांच्या वाढीमुळे अधिकाधिक पालकही आता डिजिटल मार्गाने देयके पाठवण्याला पसंती देत आहेत. अॅटमने शहरांमध्ये आपली चांगली उपस्थिती दर्शवली आहे आणि पुढील एका वर्षात 1000 शैक्षणिक संस्थांपर्यंत पोचण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये डिजिटल माध्यमांतून देयके दिली जातील, आणि यामुळे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार होतील अशी कंपनीची अपेक्षा आहे.
डिजिटल देयकांच्या पर्यायात विविध पद्धती आहेत, त्या अलिकडेच सादर करण्यात आल्या आहेत आणि रिटेल क्षेत्रातही खास करून असंघटिक र्टेल क्षेत्रात डिजिटल देयकांना जास्त स्वीकृती देण्याची सर्वोच्च क्षमता असल्याचे, दिसून येत आहे, अॅटम एमगल्ला सादर करण्यासाठी पूर्ण सज्ज आहे, ही एक अमर्यादित देयकांची सेवा आहे, भारत क्यूआर, एमपीओएस, भीमयूपीआय, लिंकवर आधारित देयकांचे गेटवे, आधार देयके आणि एका सिंगल अॅपद्वारे रोख रकमा देणे आदी एमगल्लाची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय रिटेलरना जीएसटीसह जोडण्यासाठीही याची मदत होते. एमगल्लाने आतापर्यंत अॅटमसाठी चांगलेच यश प्राप्त केले आहे, उद्घाटन झाल्यापासूनच्या काही महिन्यांमध्येच 50,000 व्यापाऱ्यांनी एमगल्ला हे त्यांचे प्राधान्यक्रम व्यासपीठ बनवले आहे. कंपनीला पुण्यातही हेच यश प्राप्त करायचे आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी कंपनीने पुण्यातील 10000 व्यापाऱ्यांवा जोडण्याचे ध्येय ठेवले आहे.
एकूणात अॅटम 800 ते 1000 व्यापाऱ्यांसह पुण्यात इ-कॉमर्स, रिटेल आणि शिक्षण या क्षेत्राशी संलग्नित झाली आहे. कंपनी शहरातील तब्बल 200 कोटी रुपयांचे अर्ध दशलक्ष व्यवहार साधारणपणे महिन्याभरात घडवून आणते.
अॅटम टेक्नोलॉजीजच्या उत्तम उपाययोजना देणाऱ्या डिजिटल देयकांमधील कंपनी, भारतातील या क्षेत्रातील पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे. आज पीओएस, आयव्हीआर आणि देशाच्या इंटरनेट प्रकारातील सर्वात मोठी प्लेयर आहे. प्रशासनाद्वारे प्रेरणा दिली जाणारी, तसेच स्वतःला योग्य प्रकारे सिद्ध केलेली अॅटम 18 महिन्यांत अनेक पटींनी विकसित झाली आहे. हाच विकासदर कायम राखत अॅटमने मेट्रो आणि लहान शहरांपर्यंत पोचण्याचे आणि आपल्या देशाला कॅशलेस समाज बनवण्याचे ध्येय हाती घेतले आहे.
कुसुमाग्रजांचे धरून बोट, एकेक पाठ गिरवू लाग… ऐक छकुल्या, तुझ्या घरी ने अक्षरबाग… अक्षरबाग…!
पुणे-प्रभाग क्रमांक ३५ मधील अरण्येश्वर भागात पुणे महानगरपालिकेच्या कै. शंकरराव कावरे उद्यानात नगरसेविका सौ. अश्विनी नितीन कदम यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अक्षरबागेची निर्मिती करण्यात आली आहे. बागेत येणाऱ्या सर्वांमध्ये खास करून लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, भाषा सहज व लवकर अवगत व्हावी आणि भाषा संवर्धन हा यामागील मुख्य हेतू असून ह्या बागेची आकर्षक वैशिष्ठ्ये म्हणजे मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षरे (स्वर व व्यंजने) बागेतील सर्व झाडांवरती, मोकळी हिरवळ व जॉगिंग ट्रॅकच्या चारही बाजूने अक्षरांच्या प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शित केली आहेत. बागेतील झुळझूळ वाहणारा धबधबा हा दगड कामातून निर्माण केलेल्या “धबधबा” अक्षरातूनच वाहतो व सर्वांचे लक्ष वेधून घेतो. लहान मुलांना लपाछपी खेळण्यासाठी ‘अ ‘ ह्या अक्षराची मोठी प्रतिकृती तयार केली असून त्याच्या मागील बाजूस सुंदर रंगकाम करून मराठी मुळाक्षरे (स्वर व व्यंजने) लिहिली आहेत. लहान मुलांना प्राण्यांची ओळख व्हावी या उद्देशानं वाघ, हत्ती, सिंह व अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या स्वरूपातील प्रतिकृतीतील खुर्च्या तयार करण्यात आल्या आहेत व तसेच मराठी भाषा साहित्यिक कट्ट्याचे नियोजनही करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो व ह्या दिवशी आपल्या लहान मुलांसमवेत ह्या अक्षरबागेला आवर्जून भेट द्यावी.असे आवाहन अश्विनी कदम यांनी केले आहे .
लोकांच्या पैशावर बाबूगिरी करणाऱ्या एसपीव्ही ने आजपर्यंत दिले काय ?
पुणे- लोकांच्या पैशावरील हक्क स्वतः कडे घेवून प्रकल्प चालविण्यास येणाऱ्या एसपीव्ही नावाच्या कंपनी राज ने आतापर्यंत या शहराला , लोकांना कोणते दिवास्वप्ने दाखविली आणि प्रत्यक्षात दिले काय ? असा सवाल करीत कॉंग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुळा मुठा नदी संवर्धनासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यास कडाडून विरोध केला .नद्यांचे पावित्र्य राखले जावे, त्यांचे सुशोभीकरण व्हावे हि आपली भूमिका आहे पण हे काम जर लोकांच्याच पैशातून होणार आहे तर मग अधिकारशाही राबविणारे कंपनीराज का आणता ?सामान्य लोकांचे आणि त्यांच्या सामान्य प्रतिनिधींचे हक्क डावलून आणलेल्या एसपी व्ही ने आज वर काय दिले ? 3 वर्षासाठी पीएमपीएमएल एसपीव्ही ला प्रायोगित तत्वावर देण्यात आली होती ..आता पीएमपीएमएल च्या सेवेत काही फरक पडला नाही ,ती बरखास्त करा पुन्हा पीएमटी आणि पीसीएम टी वेगवेगळे करा असे सांगूनही तिथे एसपीव्ही तळ ठोकून आहे . स्मार्ट सिटी एसपीव्ही मार्फत राबविली जाते आहे .. त्यातूनही अजून काही निष्पन्न होऊ शकलेले नाही . मग २६१९ कोटीचा हा एवढा मोठा शहरावर दूरगामी परिणाम करणारा प्रकल्पासाठी एसपीव्ही कशाला आणता ? महापालिकेने तो स्वतः राबवावा . असेही बागवे यांनी म्हटले आहे … पहा आणि ऐका काल महापालिकेच्या मुख्य सभेत एसपीव्ही कंपनी करताना कॉंग्रेसच्या अविनाश बागवे यांनी नेमके काय म्हटले आहे .
23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत संघाला ओएनजीसी संघाला विजेतेपद
पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी संघाने बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत आक्रमक लढतीत ओएनजीसी संघाने सुरूवातीपासून आक्रमक खेळ करत बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. सामन्याच्या पहिल्या सत्रात संघर्षपुर्ण लढतीत 8-9 असे गुण असताना बीपीसीएलच्या निलेश शिंदेने खोल चढाई करत दोन गुण मिळवेले व सामना 9-9 असा बरोबरीत आणला. मध्यंतरापुर्वी ओएनजीसी संघाने बीपीसीएलचा पुर्ण संघ बाद करून लोन चढवले व बीपीसीएल संघाचे मनोबल खच्ची करत मध्यंतरापुर्वी 15-9 अशी आघाडी घेतली. बीपीसीएल संघाचे रिशांक देवाडीगा व गिरिष एर्नाक दुखापतीमुळे त्यांचा खेळ दाखवता आला नाही. त्यामुळे संपुर्ण स्पर्धेत न खेळलेल्या नितिन मदनेला सामन्याच्या उत्तरार्धात रेडर म्हणुन मौदानात उतरावे लागले.
सामन्याच्या दुस-या सत्रात ओएनजीसी संघाच्या राजेश नरवालला पिवळे कार्ड देण्यात आले. काशिलींग अडकेने खोल चढाया करून संघाचे गुण वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओएनीजीसी संघाने घेतलेली आघाडी कायम राखत बीपीसीएल संघाचा 36-28 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
तिस-या क्रमांकाच्या लढतीत एमआरपीएल संघाने सीपीसीएल संघाचा 31-12 असा एकतर्फी पराभव केला. स्टिवन व सुकेश यांच्या खेल चढायांच्या बळावर एमआरपीएल संघाने मोठा विजय संपादन केला. सुकेशने 9 चढायांमध्ये 7 गुण मिळवले तर स्टिवनने 10 चढायांमध्ये 8 गुण मिळवले. मनोजने कौशल्यपुर्ण पकडी करून सीपीसीएल संघाचे मनोबल खच्ची करत 4 गुण मिळवले व संघाला मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलचे(मनुष्यबळ विभाग)कार्यकारी संचालक आर.आर. नायर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी, पीएसपीबी चे सचिव हाल्डर, पुण्याचे क्सटम कमिशनर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- तिसरा क्रमांकासाठी लढत
एमआरपीएल वि.वि सीपीसीएल 31-12(19-8 मध्यांतरापुर्वी)
अंतिम फेरी- ओएनजीसी वि.वि बीपीसीएल 36-28(15-9 मध्यांतरापुर्वी)
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट रेडर- दिपक नरवाल(बीपीसीएल)
सर्वोत्कृष्ट कॅचर – गिरिष एरनार(ओएनजीसी)
सर्वोत्कृष्ट खेळाडू- जोगिंदर (ओएनजीसा)
संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालय प्रथम
पुणे- येथील फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा.ना.दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स.प.महाविद्यालयाच्या ‘उमारङ्गः’ या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय तीन वैयक्तिक पारितोषिकेही विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. अभिनय प्रथम- आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे, दिग्दर्शन प्रथम – सुधर्म दामले. “संगीत जय जय गौरीशंकर” या विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद व रंगावृत्ती संस्कृत विभागाने सादर केली व याकरिता विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांचे मोलाचे सहकार्य आणि महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या डॉ.भारती बालटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, उपप्राचार्य डॉ.अशोक चासकर, उप संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात करण्यात आले.
वारकऱ्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवल्याबद्दल अरुण पवार यांचा सन्मान
तोपर्यंत पुण्याची पूर्व तहानलेली राहील ..पाणीपुरवठाप्रमुखांची स्पष्टोक्ती
पुणे- फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच पुण्यातील पूर्व भागाला पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागली आहे . भरपूर पाऊस झालाय चिंता करायची गरज नाही .. अशा समजूती ला काल मुख्य सभेत झालेल्या पाण्यासाठी च्या आरडा ओरड्याने धक्का बसला आहे . तर त्याहून मोठा धक्का काल मुख्य सभेत पाणीपुरवठा प्रमुख व्ही जी कुलकर्णी यांनी दिलेल्या कबुलीने बसला आहे . जोपर्यंत भामा आसखेड ची योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हडपसर आणि पूर्वेचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही असेच त्यांनी स्पष्ट केले आहे .
तर नाना भानगिरे , योगेश ससाणे , सुभाष जगताप ,चेतन तुपे पाटील यांनी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले .. पण उपाय मात्र निघाला नाही .. पहा नेमके काय झाले …
पुणेकरांच्या १० कोटीवर खुलेआम डल्ला .. विरोधक हतबल
पुणे :कात्रज च्या जवळील काही गावांच्या राजकारणावरून महापालिकेच्या मुख्य सभेत पुणेकरांच्या पैशातून राजकीय डावपेच खेळण्याचे कारभार सुरु असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम म्हणून पुणेकरांच्या तिजोरीतून काल १० कोटीचा डल्ला मारण्यात आला .दरम्यान सुभाष जगताप यांनी तर यास मुख्य सभेतच हा दरोडा असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे .दरम्यान खरे तर हद्दीबाहेरच्या गावांमधील बेकायदा बांधकामे करणाऱ्यांसाठी हे १० कोटी वापरले जाणार आहेत. तेथील बांधकामांना या पैशातून ड्रेनेज लाईन फुकटात मिळवून दिली जाणार आहे . यामुळे येथील बांधकामांचे दर हि वाढणार आहेत . पण हे सारे केवळ राष्ट्रवादी आणि मनसे च्या नगरसेवकांना बदनाम करून पुढील निवडणुकीच्या दृष्टीने मतांचे राजकारण करण्यासाठी होते आहे हे दुदैव आहे . अर्थात याबाबत राजकीय दृष्टीने न राष्ट्रवादी आणि मनसे यांनी प्रस्तावाला पाठिंबाच दिला आहे .
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतगेल्या काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतींना दहा कोटी रुपये देण्याचा भाजपचा प्रस्ताव बहुमत असतानाही गुंडाळला गेला होता . अर्थात त्यावेळी नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला नव्हता . पण काल मात्र मुस्कटदाबी सहन करीत भाजप सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून तो संमत केला .
हा प्रस्ताव शुक्रवारी पुन्हा सभेत आणण्यात आला, विषयाला फारसा विरोध न करता मोरे यांनी उपसूचना मांडत, कदम यांच्या प्रस्तावातील दहा कोटींमूधन दोन कोटी रुपये कात्रज तलावाच्या कामासाठी मागितले. तेव्हा `हा प्रस्ताव लोकांच्या मागणीनुसार मांडला आहे. मात्र, काही मंडळी राजकीय द्वेषापोटी कामात खोडा घालत आहेत. कामे अडविण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न ते करीत आहेत. ते योग्य नाही,’ अशा शब्दांत नगरसेविका मनिषा कदम यांनी मोरेंवर हल्ला केला. त्यानंतर मोरे यांनी आपली बाजू मांडली आणि कदम यांचे आरोप खोडून काढले. “विकामसकामात राजकारण केले नाही, करणार नाही. तरीही, माझी बदनामी होत असेल तर, वसंत मोरे यांची दोस्ती बघितली आता, दुश्मनी बघाल’ असा दमच मोरे यांनी भरला.
यावेळी मोरे यांनी केले भाषण पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात ….
‘हॅन्ड्स ऑफ इंडिया’ प्रदर्शन पुण्यात २ मार्चपासून
बाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार सचिन-स्वप्नील
सचिन पिळगांवकर – स्वप्नील जोशी : ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच
आवडीची… मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य
गाजवलं… पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला
वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नील ला मुलासारखं वागवणारे
सचिन पिळगांवकर… पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे
नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.
2008 मध्ये आलेल्या आम्ही सातपुते या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर
झळकली आणि यांचं अनोखं बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले. त्यानंतर आलेल्या काही
गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधल्या प्रेमळ नात्याची
पोचपावती प्रेक्षकांना दिली.
आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे आणि त्यात
विशेष म्हणजे मानसपितापुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय
घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला
पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.
महावितरणची अतुलनीय कामगिरी, घारापुरी बेट प्रकाशमान
मुंबई
महावितरणच्या अतुलनीय कामगिरीतून 70 वर्षांनंतर प्रकाशमान झालेल्या घारापुरी (एलीफंटा) बेटाच्या विद्युतीकरणाचे लोकार्पण पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी, मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन मंत्री ना. श्री. जयकुमार रावल, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, सरपंच श्री. बळीराम ठाकूर, उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश बालदी इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बेटाच्या विद्युतीकरणामुळे येथील नागरिकांना नव्याने स्वातंत्र्य अनुभवयाला मिळणार आहे, असे सांगितले. तसेच यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व महावितरणच्या अभियंत्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतूक केले. विद्युतीकरणामुळे निर्माण झालेला झगमगाट अंतरंगातही निर्माण व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे, असे सांगून बेटावरील विद्युतीकरणासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान शोधून काढले. देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब 7.5 कि.मी. केबल टाकण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे महावितरणच्या अभियंत्यांनी ज्या अथक परिश्रमाने घारापुरी बेटावर वीज आणली ते कौतुकास्पद आहे, असे गौरोद्वगार मुख्यमंत्र्यांनी काढले. या विद्युतीकरणामुळे घारापुरी बेटावरील पर्यटनाचा विकास होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील. घारापुरीच्या विकासासाठी राज्यशासनातर्फे संपूर्ण अर्थसहाय्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेटाच्या विद्युतीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या भरीव सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. राज्यात कुठेही भारनियमन नाही तसेच सौभाग्य योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2018 पर्यन्त महाराष्ट्रातील एकही गाव विजेशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली. या बेटाच्या सभोवताली दोन कोटी रुपये खर्च करून लवकरच एलईडीद्वारे संपूर्ण झगमगाट करण्यात येईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक करताना सध्या येथे आवश्यक क्षमतेपेक्षा चारपट अधिक वीजपुरवठा करण्याची यंत्रणा महावितरणने कार्यान्वित केली आहे, असे सांगितले तसेच विद्युतीकरणाचे काम अत्यंत अवघड होते, परंतु महावितरणच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी ते उत्तमप्रकारे पूर्ण केले, असे श्री. संजीव कुमार म्हणाले. यावेळी घारापुरी बेटावरील पाच ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात वीजमीटर वाटप प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. अरविंद सिंह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त श्री. यु.पी.एस. मदान, रायगडचे जिल्हाधिकारी श्री. विजय सुर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कोंकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे यांचा सत्कार करण्यात आला.






