पुणे-प्रभाग क्रमांक ३५ मधील अरण्येश्वर भागात पुणे महानगरपालिकेच्या कै. शंकरराव कावरे उद्यानात नगरसेविका सौ. अश्विनी नितीन कदम यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून अक्षरबागेची निर्मिती करण्यात आली आहे. बागेत येणाऱ्या सर्वांमध्ये खास करून लहान मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, भाषा सहज व लवकर अवगत व्हावी आणि भाषा संवर्धन हा यामागील मुख्य हेतू असून ह्या बागेची आकर्षक वैशिष्ठ्ये म्हणजे मराठी भाषेतील वर्णमाला व मुळाक्षरे (स्वर व व्यंजने) बागेतील सर्व झाडांवरती, मोकळी हिरवळ व जॉगिंग ट्रॅकच्या चारही बाजूने अक्षरांच्या प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शित केली आहेत. बागेतील झुळझूळ वाहणारा धबधबा हा दगड कामातून निर्माण केलेल्या “धबधबा” अक्षरातूनच वाहतो व सर्वांचे लक्ष वेधून घेतो. लहान मुलांना लपाछपी खेळण्यासाठी ‘अ ‘ ह्या अक्षराची मोठी प्रतिकृती तयार केली असून त्याच्या मागील बाजूस सुंदर रंगकाम करून मराठी मुळाक्षरे (स्वर व व्यंजने) लिहिली आहेत. लहान मुलांना प्राण्यांची ओळख व्हावी या उद्देशानं वाघ, हत्ती, सिंह व अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या स्वरूपातील प्रतिकृतीतील खुर्च्या तयार करण्यात आल्या आहेत व तसेच मराठी भाषा साहित्यिक कट्ट्याचे नियोजनही करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो व ह्या दिवशी आपल्या लहान मुलांसमवेत ह्या अक्षरबागेला आवर्जून भेट द्यावी.असे आवाहन अश्विनी कदम यांनी केले आहे .
कुसुमाग्रजांचे धरून बोट, एकेक पाठ गिरवू लाग… ऐक छकुल्या, तुझ्या घरी ने अक्षरबाग… अक्षरबाग…!
Date: