Home Blog Page 3185

लाव्हा झेड50 या पहिल्या अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) स्मार्टफोनची घोषणा

0
  • अधिक क्षमतेचा मोफत रॅम व अप्लिकेशन्सचा कमी केलेला आकार यामुळे या किमतीच्या अन्य स्मार्टफोनच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत जलद काम करण्याची क्षमता
  • यूट्युब गोसारख्या गुगल अप्सचा अगोदर समावेश केल्याने ग्राहकांना डेटा वापरावर नियंत्रण ठेवत, व्हीडिओ डाउनलोड करणे, पाहणे व शेअर करणे शक्य
  • रिअर व फ्रंट कॅमेऱ्यामध्ये बोकेह मोड
  • दणकट व ओरखड्यांपासून सुरक्षित कॉर्निंग गोरिला ग्लास
  • 2 वर्षांची वॉरंटी

 

नवी दिल्ली: लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेड या मोबाइल हँडसेट क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने अँड्रॉइड ओरिओवर चालणाऱ्या पहिल्या काही स्मार्टफोनपैकी लाव्हा झेड50 दाखल केल्याची घोषणा आज केली (गो एडिशन). प्रामुख्याने पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांना उत्तम अनुभव मिळावा या दृष्टीने झेड50 तयार केला आहे. हा स्मार्टफोन मार्च 2018च्या मध्यापासून अंदाजे 100,000 रिटेल स्टोअर्समध्ये ब्लॅक व गोल्ड या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

 डिझाइन ते उत्पादन अशा संपूर्ण साखळीवर कंपनीचे पूर्णतः नियंत्रण असून त्यातूनच लाव्हा 2 सीरिजमध्ये उठून दिसणाऱ्या झेड50ची निर्मिती झाली आहे. पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे व त्याला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ आहे. ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी लाव्हा झेड50 सुसज्ज आहे – डाउनलोड करण्यासाठी व अप्लिकेशन स्टोअर करण्यासाठी कमी जागा, मोबाइल अप्लिकेशन उघडण्यासाठी अधिक वेळ लागणे, युजर इंटरफेस व कंटेट स्थानिक भाषेत नसणे, हार्डवेअरची गुणवत्ता चांगली नसणे व थर्ड पार्टी अप्लिकेशन्सचे प्रमाण अधिक असणे.

लाव्हा इंटरनॅशनलचे उत्पादन विभागाचे प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले, “लाव्हा झेड50ला अँड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन) पाठबळ असून, आम्ही पहिल्यांदाच नॉन-अँड्रॉइड ओरिओ (गो एडिशन) फोन्सशी तुलना करता, वेगाने प्रोसेसिंग, अधिक मेमरी असलेले, तसेच युजर्सना डेटा नियंत्रित करणे शक्य होण्यासाठी यूट्युब गो यामार्फत हवा तो कंटेंट मिळण्याची संधी देणारे स्मार्टफोन देत आहोत. कॅमऱ्यामध्ये ड्युएल बोकेह अनुभव व रात्रीच्या वेळी व्हीडिओ कॉलिंग करण्यासाठी एलईडी फ्लॅशचा समावेश आहे. ग्राहक व ब्रँड या दोन्हींसाठी ही निश्चितच उत्तम संधी आहे”.

अँड्रॉइडचे उत्पादन विभागाचे प्रमुख सागर कामदार यांनी सांगितले, “प्रत्येकाला गणनक्षमता देणे हे अँड्रॉइडचे नेहमी उद्दिष्ट राहिले आहे आणि विविध उपकरणे वापरताना चांगला अनुभव देणे हा त्याचा भाग आहे. मर्यादित मेमरी व प्रोसेसिंग क्षमता असलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल व अँड्रॉइड यांची वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याच्या हेतूने अँड्रॉइड ओरिओची निर्मिती केली आहे. लाव्हा झेड50 दाखल करून हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी लाव्हाबरोबर सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

डिस्प्ले स्क्रीन दणकट व ओरखडेमुक्त असण्यासाठी लाव्हा झेड50मध्ये 2.5डी कर्व्ह्ड कॉर्निंग गोरिला ग्लाससह 4.5 इंची डिस्प्ले आहे. त्यास 1.1 जीएचझेड क्वाड-कोअरसह मीडियाटेक प्रोसेसरचे (MT6737m) बळ आहे व त्यामध्ये 8जीबी इंटर्नल स्पेस, 1जीबी रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 5.5जीबी वाढीव स्टोअरेज स्पेसही आहे (या तुलनेत, 8जीबी आरओएम उपकरणांमध्ये ती 3 जीबी असते). त्यामुळे उपकरणाची काम करण्याची क्षमता 50% पर्यंत वाढण्यास मदत होते व त्यामुळे अप्लिकेशन उघडण्यासाठी तुलनेने अतिशय कमी वेळ लागतो.

लाव्हा झेड50 मध्ये 5 मेगापिक्सल रिअर व फ्रंट कॅमेरा असून त्यामध्ये फ्लॅश असल्याने इमेजेस सुस्पष्ट व ठळक येतात. स्मार्टफोनच्या फ्रंट व रिअर या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये बोकेह मोड असल्याने क्षण अचूक टिपले जातात व जे टिपायचे आहे ते स्पष्टपणे उठून दिसते.

भारतातील मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तींच्या गरजा विचारात घेऊन, या स्मार्टफोनमध्ये भारतातील 10 प्रमुख भाषांचा (हिंदीसह) समावेश करण्यात आला आहे. तसेच, यामध्ये इमेजेस, हवामान शोधता येते.

स्मार्टफोनला 2 वर्षांची वॉरंटी असून त्यामुळे संशोधन व विकास आणि उत्पादनाची निर्मिती यामध्ये मोठी गुंतवणूक करून कंपनी उत्पादनाच्या गुणवत्तेवर व विश्वासार्हतेवर किती भर देते ते स्पष्ट होते. याचबरोबर, स्मार्टफोनवर एअरटेलतर्फे 2000 रुपयांची आकर्षक कॅशबॅक ऑफरही आहे.

लाव्हा झेड50 दाखल करत असताना, खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत स्क्रीन फुटल्यास ती एकदा मोफत बदलून देण्याची सवलत जाहीर करण्यात आली आहे.

पुण्याचे 5 हजार 870 कोटीचे अंदाजपत्रक मुख्यसभेला सादर …(व्हिडीओ)

0

पुणे -महापालिकेच्या 2018/ 19 या वर्षाचे स्थायी समितीचे पाच हजार 870 कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी आज मुख्य सभेला सादर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे अंदाजपत्रक 42 कोटींनी कमी करून ते वास्तववादी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहात स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी हे मुख्य सभेसमोर सादर केले त्यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धर्थ धेंडे, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले ,काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह स्थायी समिती सदस्य आणि महापालिका पदाधिकारी आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त कुणाल कुमार यांनी पाच हजार 397 कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात 473 कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर मागच्या वर्षी स्थायी समितीचे अंदाजपत्रक हे 5 हजार 912 कोटीचे होते त्यात 42 कोटी यंदाच्या अंदाजपत्रकात कमी करण्यात आले आहे .
अंदाजपत्रका मधील महत्वाचे मुद्दे
24×7 समान पाणीपुरवठा योजना
संपूर्ण शहरास २४ तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण 2000 कोटी रुपयांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. पुणे शहराच्या ‘२४×७ पाणीपुरवठा योजने’साठी फेरनिविदा काढल्यानंतर एक हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. ही योजना पुणेकर नागरिकांसाठी निश्‍चितपणे एक वरदान ठरेल. पाण्याची अनावश्यक साठवणूक व अपव्यय थांबेल, पाण्याचे ऑडिट करता येईल, वाया जाणार्‍या पाण्याचे अचूक प्रमाण ठरविणे शक्य होईल, जादा पाणी वापरावर नियंत्रण राखता येईल. या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजपत्रकात ३२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शिवसृष्टी
पुण्यात मेट्रो प्रकल्प सुरू होत असतानाच कोथरूड भागात शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव होता. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध होण्याविषयी साशंकता होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन चांदणी चौकाजवळची ५० एकर जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली. अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकास साजेसा प्रकल्प उभा राहावा, यासाठी अंदाजपत्रकात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सायकलींचे शहर

पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. आरोग्यासाठी अनुकूल, प्रदूषणविरहित शहर ही पुण्याची ख्याती होण्यामागे सर्वात मोठे योगदान सायकलींचे होते. उत्तम आरोग्य, स्वच्छ हवा, सार्वजनिक वाहतुकीला भक्कम सहयोग आणि खासगी स्वयंचलित वाहनांना उत्तम पर्याय या चारही दृष्टींनी सायकल चालविण्याची संस्कृती पुन्हा रुजविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. या दृष्टीने ‘सायकल धोरण’ अंगीकारण्यात आलेले आहे. खासगी संस्थांच्या सहकार्यातून पुण्यासाठी एक लाखांहून अधिक सायकली उपलब्ध होणार आहेत. या सायकली चालविण्यासाठी सुलभता राहावी या दृष्टीने उत्तम सायकल ट्रॅक तयार करणे, रस्त्यावर स्वतंत्र सायकल लेन्स आखणे, सायकल पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, यासाठी महानगरपालिकेचे भक्कम पाठबळ राहील. सायकलसाठीच्या पूरक पायाभूत सुविधांसाठी या अंदाजपत्रकात ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन
कचर्‍याचे नियोजन आणि विल्हेवाट यासाठी जनजागृती, तंत्रज्ञानाचा वापर आणि कचर्‍याला ऊर्जेचा स्रोत म्हणून विकसित करणे, ही भूमिका ठेवावी लागेल. याच भूमिकेतून घनकचरा व्यवस्थापनाचा विषय हाताळला जातो आहे. या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापनासाठी अंदाजपत्रकात ४७८ कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे.
• कचर्‍यापासून वीजनिर्मिती : रामटेकडी येथे ७५० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेऊन काम सुरू करण्यात झाले आहे. या प्रकल्पातून ११ मेगावॅट विजेची निर्मिती होईल.
• समाविष्ट गावांसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प -पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांसाठी संबंधित गावांमध्येच कचर्‍यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.

• बायो वेस्ट, ई-वेस्ट आणि प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
मेट्रो
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या दोन्ही मार्गांचे काम सध्या पूर्वनियोजनानुसार अत्यंत वेगात सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील स्वारगेट येथील काही जागा मेट्रो स्टेशन आणि मल्टीमोडल हब या संयुक्त प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी पाच वर्षांत होणार असल्याने प्रत्येक आर्थिक वर्षात होणार्‍या खर्चाचा विभागणी तक्ता ‘महाराष्ट्र मेट्रोे रेल कॉर्पोरेशन’ यांनी महानगरपालिकेला सादर केल्यानंतर या खर्चास पुणे महानगरपालिकेच्या मा. मुख्यसभेची मान्यता घेऊन हा निधी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.
स्मार्ट सिटी
‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारकडून 196 कोटी रुपये, राज्य सरकारकडून 98 कोटी रुपये आणि पुणे महानगरपालिकेकडून गेल्या दोन वर्षांत १०१ कोटी रुपये असा एकूण ३९५ कोटी रुपयांचा निधी ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ला मिळालेला आहे. सद्यःस्थितीला 174.61 कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झालेली आहेत. आतापर्यंत ‘स्मार्ट सिटी’ योजनेतील एकूण चार प्रकल्प पूर्ण झाले आहेत, 15 प्रकल्प प्रगतिपथावर आहेत, 11 विकासकामांचे डीपीआर सुरू आहेत, तर चार कामे निविदा प्रक्रियेत आहेत. महानगरपालिकेच्या हिश्शाची आर्थिक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे.

माहिती तंत्रज्ञान

डिजिटल इंडिया म्हणजे देशातील प्रत्येक गावात, शहरात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाला सुप्रशासनाचा लाभ मिळवून देणे. त्या दृष्टीने महापालिकेने वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एकूण ३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

१. डीबीटी : पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ घेणार्‍या नागरिकांना तो विनाविलंब, कोणताही पाठपुरावा न करता उपलब्ध व्हावा, तसेच भ्रष्टाचाराला पायबंद बसावा, या दृष्टीने लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, यासाठी ‘डीबीटी’ योजना राबविण्यात येत आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता रुजण्यासाठी या योजनेचा निश्चित लाभ होईल. ‘डीबीटी’च्या माध्यमातून शिक्षण विभागासाठी १६ कोटी रुपये, नागरी योजनांसाठी १० कोटी रुपये आणि पुणे महानगरपालिका कर्मचार्‍यांसाठी ६.६० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत.
२. डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर : पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांची माहिती, प्रकल्पांची माहिती नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर’ची निर्मिती करण्यात येणार आहे.
३. नगर सचिव विभागाकडील जुनी कागदपत्रे आणि महत्त्वाचे रेकॉर्ड स्कॅनिंग करून जतन करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे.
४. डिजिटल लिटरसी सेंटर्स : नागरिकांना संगणक साक्षर करण्यासाठी डिजिटल लिटरसी सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आणखी दोन ‘लाईट हाऊस प्रकल्प’ कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
५. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर : पुणे महानगरपालिकेची मुख्य इमारत, क्षेत्रीय कार्यालये आणि संपर्क कार्यालयांमधील नेटवर्कचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे.
६. आरोग्यविषयक योजना एका क्लिकवर : ‘शहरी गरीब योजने’सह आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे नियोजन आहे.
७. एम गव्हर्नन्स : महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील अधिकाधिक सेवा-सुविधा आणि माहिती नागरिकांना मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ‘एम गव्हर्नन्स’चा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
८. ऑनलाईन करभरणा : जानेवारी २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने कर भरणार्‍या नागरिकांची संख्या तीन लाखांवर पोचली असून, शहरात ११ ठिकाणी यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
९. डिसेंबर २०१७ अखेर महानगरपालिकेस वेगवेगळ्या करांपोटी प्राप्त होणार्‍या एकूण उत्पन्नापैकी ४८ टक्के उत्पन्न ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शनद्वारे प्राप्त झाले आहे.
१०. सायबर सिक्युरिटी सेंटर ः आयटी क्षेत्राची शहरात झपाट्याने होणारी वाढ आणि महानगरपालिका प्रशासनातील वाढते डिजिटलायझेशन या पार्श्वभूमीवर डेटा आणि इंटरनेट सिक्युरिटी हे कळीचे मुद्दे बनले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका ‘सायबर सिक्युरिटी सेंटर’ उभे करण्यासाठी सहकार्य करणार असून, त्यासाठीची तरतूदही या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे.
नदीसुधार प्रकल्प
पुण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला ‘नदीसुधार’ प्रकल्प ‘राष्ट्रीय नदीसंवर्धन योजने’अंतर्गत राबविण्यात येणार आहे. पुण्याची नदी स्वच्छ होणे, म्हणजेच पुण्याची जीवनरेखा तयार करणे, हा या प्रकल्पाचा अर्थ आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती झाली असून, या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात ९९० कोटी रुपयांची तरतूद करून प्रकल्प प्रगतिपथावर जाईल, याची दक्षता घेतली आहे. पुणे शहरात ७४४ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढे मैलापाणी निर्माण होते. त्या अनुषंगाने ५६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेली आहेत. ही योजना राबविण्यासाठी ८५ टक्के रक्कम केंद्र सरकारकडून अनुदान स्वरूपात पुणे महानगरपालिकेला प्राप्त होणार असून, उर्वरित १५ टक्के रक्कम पुणे महानगरपालितर्फे उभारण्यात येईल. केंद्राच्या एकूण अनुदानापैकी २५.९९ कोटी रक्कम केंद्राकडून महाराष्ट्र सरकारकडे, तर राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेस वर्ग करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून १६ जानेवारी २०१८ रोजी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून, बाणेर-बालेवाडी भागांत या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
मुळा-मुठा नदीकाठ विकसन व संवर्धन
पुण्याच्या भौगोलिक रचनेत आणि इतिहासातही मुळा आणि मुठा या नद्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळा-मुठा नद्यांची एकूण लांबी सुमारे ४४ किमी असून, या दोन्ही नदीकाठांचा एकत्रित विचार करून शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या जलप्रवाहाचे संरक्षण, संवर्धन आणि विकासासंदर्भात एकात्मिक आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा अपेक्षित खर्च २,६०० कोटी रुपये इतका असून, अंदाजपत्रकात यासाठी प्राथमिक स्वरूपाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत
• ‘स्वच्छता हाच परमेश्‍वर’ ही आपली संस्कृती आणि शिकवण आहे, हे लक्षात घेता स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्याचा विषय बनविणे आवश्यक आहे. ‘स्वच्छ भारत’ ही आता चळवळ बनलेली आहे आणि स्वच्छता ही या देशाची ओळख बनण्याच्या दिशेने आपण प्रवास करतो आहोत. ‘स्वच्छ भारत योजने’अंतर्गत अनेक पावले उचलली जात आहेत.
• स्वच्छ पुणे, निर्मळ पुणे : स्वच्छतेची एक चळवळ या देशात गेल्या तीन वर्षांत उभी राहिलेली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांतील स्वच्छता हा या मोहिमेतील एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्याला पेलावेच लागेल. त्या दृष्टीने ठोस पाऊल आपण उचलत आहोत. शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे दिवसातून दोनदा स्वच्छ करण्यासाठी अंदाजपत्रकात ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
• शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करणे हे अधिक व्यवहार्य आहे. धुळीचा श्‍वसनाच्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. सर्वाधिक वाहने येणार्‍या प्रमुख रस्त्यांवरची स्वच्छता त्यामुळेच वेगवान आणि चोख होण्याच्या दृष्टीने यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
• केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमांतर्गत शहरपातळीवर ‘स्वच्छ प्रभाग योजने’चे २०१८-१९ मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छता ही अंगात भिनावी लागेल. त्याचा संस्कार प्रत्येकात रुजवावा लागेल आणि त्यासाठी सहभागाला पर्याय नाही. नागरिकांच्या सहभागाशिवाय स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाही. या दृष्टीनेच ‘स्वच्छ प्रभाग स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. यासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा
• पाणीपुरवठा योग्य दाबाने व समान व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. शहराची पुढील ५० वर्षांची वाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर पुरेशा क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या उभारणीवरही भर देण्यात आला आहे. यासाठी ५१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• ‘भामा-आसखेड प्रकल्पा’तून शहरातील पूर्वेकडील उपनगरांना पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान २,२०० मिमी व्यासाची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
• पर्वती येथे ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
• शहराची भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान ३,००० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून आज ११ लाख नागरिकांना सार्वजनिक बससेवेचा लाभ मिळत आहे. येत्या काळात ४० लाख नागरिकांपर्यंत बससेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, ‘पीएमपीएमएल’ने आपल्या ताफ्यात एक हजार नवीन बसेस घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये २०० मिडी बसेस, तर ८०० बीआरटी बसेसचा समावेश असेल. या नवीन बसेसच्या खरेदीसाठी ७३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच ५५० एसी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी सवलत शुल्क, अंध-दिव्यांग नागरिकांसाठी मोफत बस पास आणि विविध सवलतींचे पासेस यासाठी ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय १२२.३४ कोटी रुपयांची संचलन तूट आणि ‘पीएमपीएमएल’चे डेपो विकसित करण्यासाठी ८ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. एकूण तरतूद २४६ कोटींची आहे.
शहरातील नवीन उड्डाणपूल/ ग्रेड सेपरेटर/ भुयारी मार्ग/ वाहनतळ :
शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुनियोजित होणे यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने वाहनतळ, पादचारी मार्ग, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल यांच्या उभारणीवर भर देण्यात आला आहे. नागरिकांना विनासायास, जलदपणे शहरात वावरता येण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात एकूण २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
एचसीएमटीआर
पुणे शहराच्या वाहतूक नियोजनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेल्या ’एचसीएमटीआर’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. सुधारित मंजूर विकास आराखड्यानुसार सल्लागारांनी निश्‍चित केलेल्या तांत्रिक आराखड्यास शहर सुधारणा समितीने व महानगरपालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. अंदाजे ७,५०० कोटी रुपयांच्या एचसीएमटीआर प्रकल्पाचा आर्थिक सुधारित अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा
सिंहगड रस्ता आणि सहकारनगर, पद्मावती, पर्वती ही उपनगरे थेट जोडण्याच्या दृष्टीने तळजाई टेकडीतून सिंहगड रस्त्याला जोडणारा बोगदा विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

चांदणी चौक उड्डाणपूल
चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याकरिता ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने मदतीचा हात पुढे केला आहे. या पुलाचे काम वेगाने व्हावे, या दृष्टीने अडथळा ठरणार्‍या जागा ताब्यात घेणे आवश्यक होते. या परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ८१ कोटी रुपये यापूर्वीच देण्यात आले असून, या वर्षीच्या अंदाजपत्रकातही या प्रकल्पातील पुढील नियोजित कामांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
बालभारती-पौड फाटा रस्ता
सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या रस्त्याच्या विकासासंदर्भात वाहतूक सर्वेक्षण आणि एन्व्हॉर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट स्टडी रिपोर्ट तयार करण्यासाठी जाहीर प्रस्ताव मागविण्यात आले होते. आतापर्यंत सात सल्लागारांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, हा रिपोर्ट उच्च न्यायालयास सादर करून त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी या वर्षीही अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
सिंहगड रस्ता उड्डाण पूल
सिंहगड रस्त्यावर लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली आणि येथील रस्ता वाहनांसाठी आणि पादचार्‍यांसाठी अपुरा पडू लागला. या रस्त्यावर उड्डाणपूल करण्याची गरज लक्षात घेऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे. राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत हा उड्डाणपूल साकारला जाईल. या पुलासाठी अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास
पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकुटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने नुकतीच सुवर्णमहोत्सवी मजल गाठलेली आहे. शहरात वाढलेले सांस्कृतिक वैविध्य, शहराला आलेले आंतरराष्ट्रीय महत्त्व, सांस्कृतिक उपक्रमांची झालेली जोमदार वाढ, या सार्‍या गोष्टी लक्षात घेतल्यास बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी विविध आकारांची आणि वैशिष्ट्यांची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किंग, मनोरंजनाच्या सार्‍या सुविधा यांचा समावेश होऊन ‘बालगंधर्व’ हे पुण्याचेच नव्हे, तर देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होण्याच्या उद्देशाने पुनर्विकासाची भूमिका आहे. यासाठी अशा केंद्रांची उभारणी करण्यासाठीचा अनुभव असणार्‍या मान्यताप्राप्त तज्ज्ञांचा समावेश असणारी समिती नियुक्त करून, तिला सविस्तर अहवाल करण्यास सांगण्यात येईल. या दृष्टीने अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
नव्याने समाविष्ट गावांचा विकास
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांतील रस्त्यांचे जाळे विकसित करणे, हा महानगरपालिकेचा अग्रक्रमाचा विषय आहे. या गावांसाठीचा विकास आराखडा तयार करण्यात येईलच, पण तत्पूर्वी येथील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारणे, फूटपाथसह रस्ते विकसित करणे, तेथील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, तसेच नागरिकांना महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये एकूण ९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सांस्कृतिक केंद्रे/नाट्यगृहे
पुणे हे सांस्कृतिक माहेरघरही मानले जाते. म्हणूनच शहराची एकूण सांस्कृतिक, कला, साहित्याची गरज लक्षात घेता विस्तारत गेलेल्या पुण्यात सध्या बहुसंख्येने नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे उभी राहत आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, पं. भीमसेन जोशी कलामंदिर, पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, श्री गणेश कला-क्रीडा मंच, मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या सर्व ठिकाणी नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही सर्व केंद्रे उत्कृष्ट सोयी-सुविधांसह अद्ययावत असण्याच्या दृष्टिकोनातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी अंदाजपत्रकात २७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उद्यानांचा विकास
शहरवासीयांचे आरोग्य, शहरातील पर्यावरण आणि शहराचे सौंदर्य वाढवणे या दृष्टीने उद्याने विकसित होणे अपेक्षित असते. पुणे शहर हे अलीकडच्या काळात उद्यानांचे शहर म्हणून नावारूपास येत आहे. विविध थीमवर आधारित ही उद्याने विकसित होत आहेत. ही उद्याने शहरातील नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी ताण व्यवस्थापनाचे काम करतात. शहरातील विविध उद्यानांच्या यापुढील विकासाच्या अनुषंगाने भांडवली, महसुली तसेच प्रस्तावित नवीन कामांसाठी अंदाजपत्रकात १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन अग्निशमन केंद्रे
शहरात कोथरूडमध्ये चांदणी चौक, हडपसरमध्ये काळेपडळ, कळस-धानोरी आणि खराडी या उपनगरांमध्ये अद्ययावत प्रशिक्षण केंद्रासह चार नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याशिवाय अग्निशमन विभागाच्या ताफ्यात पाच नवीन टाईप बी प्रकारची अत्याधुनिक वाहने घेण्यात येणार आहेत. यासाठी एकूण ९.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सोलर यंत्रणा
अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, तसेच पर्यावरणाभिमुख ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या सर्व इमारतींवर सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत ८२५ किलोवॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असून, यासाठी ६.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोफत सॅनिटरी नॅपकीन/व्हेंडिंग मशीन्सची उपलब्धता
महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीनची सुविधा येत्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार असून, सध्या २३ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन्स बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी रुपये १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मनपा शाळा इमारतींचे नूतनीकरण
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आजच्या काळाशी सुसंगत पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच सुसंगत शिक्षणाची गुणवत्ताही उच्च दर्जाची राहावी, विद्यार्थ्यांची मानसिकता व मनोबल वाढावे, यासाठी पावले उचलली जात आहेत. खासगी आणि महानगरपालिका शाळांत कोणतीही तफावत राहू नये, या उद्देशाने सर्व शाळांचे नूतनीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुलींसाठी अभ्यासिका व ग्रंथालय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत. त्यांच्या स्मारकाच्या आवारात मुलींसाठी अभ्यासिका व ग्रंथालय उभे करणे अत्यंत औचित्याचे ठरेल. शहरात अभ्यासिका मोठ्या प्रमाणात असल्या, तरी केवळ मुलींसाठी असलेली अभ्यासिका आवश्यक आहे. तसेच अभ्यासिकेतच ग्रंथालय असल्यास संदर्भासाठी त्याचा वापर होऊ शकतो. या दृष्टीने स्मारकाच्या आवारात मुलींसाठी अभ्यासिका व ग्रंथालय उभे करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
खेळाडू अपघात विमा योजना
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविणार्‍या आणि शहरात वास्तव्यास असणार्‍या सर्व क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा अपघात विमा उतरविण्याची योजना आहे. यामध्ये दुर्दैवाने एखाद्या खेळाडूस कायमचे अपंगत्व आले, तर त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी या योजनेद्वारे उचलण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
ट्रॅफिक एज्युकेशन पार्क
शालेय वयातच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने शहरातील चित्तरंजन वाटिका येथे ‘ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’ विकसित करण्यात येणार आहे. येथे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असून, या योजनेसाठी अंदाजपत्रकात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन
शहरातील कोणत्याही उपनगरात आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास घटनास्थळी त्वरित पोहोचून मदतकार्य सुरू करण्याच्या दृष्टीने ‘क्विक रिस्पॉन्स व्हेईकल’ आणि कौशल्यपूर्ण टीम महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुरविण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेमध्ये संकटात अडकलेल्या नागरिकांचा शोध आणि सुटका (सर्च अँड रेस्क्यू), अद्ययावत संपर्कयंत्रणा आणि प्रथमोपचार यंत्रणा उपलब्ध असणार आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, इमारत कोसळणे, आग यांसारख्या आपत्तींमध्ये कळीची भूमिका बजावू शकेल.
ज्येष्ठ नागरिक सुविधा कक्ष
ज्येष्ठ नागरिकांना अनेक कामांसाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांत यावे लागते. ती कामे ‘एक खिडकी’च्या माध्यमातून करून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.
सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी अनुदान
२००५ पूर्वी पुण्यात झालेल्या अनेक सहकारी सोसायट्यांत रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अंगीकार केला गेलेला नाही. पुणे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाण्याचे संवर्धन, साठवण सोसायटीस्तरावर होणे, ही काळाची गरज आहे. बांधकाम नियमावलीतील बदलांनंतर उभ्या राहिलेल्या इमारतींत रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा आहे, परंतु त्या पूर्वीच्या इमारतींमध्ये या सुविधेचा अभाव आहे. या सोसायट्यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे, या दृष्टीने त्यांना सशर्त अनुदान देण्यासाठी महानगरपालिका उत्सुक आहे. यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना
‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत पुणे महानगरपालिकेने अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी सदनिका बांधण्याकरिता हडपसर, खराडी, वडगाव (खुर्द) या परिसरातील एकूण आठ सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. या प्रकल्पांतून येत्या काळात एकूण ६,२६४ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या आठपैकी चार प्रकल्पांच्या प्रस्तावास ‘सेंट्रल स्टिअरिंग अँड मॉनिटरिंग कमिटी’ने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यता दिली असून, याद्वारे ३,०४५ सदनिकांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठ प्रकल्पांचा एकूण खर्च ७०० कोटी रुपये असून, महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी २९.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत सन २०२२ पर्यंत पुणे शहर परिसरात एकूण १ लाख २२ हजार घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम

‘केंद्रीय रस्ते व दळणवळण विकास विभागा’ने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ (रोड सेफ्टी ऑडिट) हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला असून, शहरस्तरावर असे सर्वेक्षण करणारे पुणे हे पहिले शहर आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील प्रमुख २०० किमी लांबीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणानुसार शहरासाठी रोड सेफ्टी इम्प्रूव्हमेंट प्लॅन करण्यात आला असून, तो केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या सुरक्षेचा विचार करताना वाहनस्वारांबरोबरच पादचारी आणि सायकलस्वारांचे हित विचारात घेत येत्या काळात धोरणे राबविण्यात येणार आहेत.
नद्यांवरील पुलांचे सुशोभीकरण
पुण्याचा इतिहास पाहिलेल्या आणि शहराच्या वाढीबरोबर विस्तारत गेलेल्या नद्यांवरील पुलांचे सुशोभीकरण वैभवात भर टाकेल. या अनुषंगाने विशेष कृती कार्यक्रम आराखडा आखण्यात आला आहे. म्हणूनच एकूण १५ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन
पुणे शहराच्या गौरवशाली इतिहासात मानाचे स्थान असलेल्या लाल महाल, शनिवारवाडा, नानावाडा, भिडेवाडा, विश्रामबागवाडा आणि महात्मा फुले मंडई या वास्तूंच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रकात एकूण २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहीद सौरभ फराटे स्मारक
डिसेंबर २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुण्यातील जवान सौरभ फराटे यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मरणार्थ हडपसरमध्ये स्मारक उभारण्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
प्रेरणास्थळांचे नूतनीकरण
सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, यासाठी २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक
आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळावर स्मारक करण्यासाठी संगमवाडी येथे जागा आरक्षित होती. हे आरक्षण राज्य सरकारने कायम केल्याने त्या जागेवर स्मारक उभारणीसाठी १.५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या योजनांसाठी तरतूद
गतवर्षीच्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पश्‍चिम भागात नवीन हॉस्पिटल उभारणे, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी योजना, महिला व किशोरवयीन मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी योजना, राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना, स्वामी विवेकानंद मध्यवर्ती सुसज्ज ग्रंथालय व ई लायब्ररी, पाण्याच्या संदर्भात जनजागृतीसाठी कायमस्वरूपी माहिती केंद्र व प्रदर्शनी उभारणे, समुद्री जैवविविधता केंद्र उभारणे, ज्येष्ठ नागरिक भवन, प्रायोगिक रंगभूमी नाट्यगृह, वैभवशाली पुणे इत्यादी योजना पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.
श्‍वान संगोपन केंद्र
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही शहरवासीयांची मोठी समस्या आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे यावर भर दिला जातो. या भटक्या कुत्र्यांसाठी श्‍वान संगोपन केंद्र संयुक्तरीत्या सुरू करण्यात येत आहे. ‘मिशन इंपॉसिबल’ या संस्थेबरोबर वडगाव येथील जागेत हा संयुक्त प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी असलेल्या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी १५ नवीन वाहने पथकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक वाहन उपलब्ध होईल. कुत्री पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षित कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात येत आहे. या दृष्टीने अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्यात आली आहे.

कुमार प्रॉपर्टीजला एशियास ग्रेटेस्ट ब्रांड इन रियल इस्टेट सेक्टर अवॉर्ड

0
पुणे-सिंगापूर येथील मरीना बे सँड्स येथे नुकताच इंडो-सिंगापूर बिझनेस आणि “एशियाज ग्रेटेस्ट ब्रांडस अँड लीडर्स” हा अवॉर्ड सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. युक्रेनचे राजदूत आणि मंत्री, सिंगापुरमधील कझाकस्तान दूतावासाचे कॉन्सुलर फैझराखान कॅसेंनोव्ह आणि अनेक मातब्बर मंडळी ह्या सोहळ्याला उपस्थित होत्या.
“एशियाज ग्रेटेस्ट ब्रांडस इन रियल इस्टेट सेक्टर” हा अवॉर्ड कुमार प्रॉपर्टीजच्या प्रीव्ही रेसिडेन्सेस या ब्रांडला देण्यात आला. प्रीव्ही रेसिडेन्सेस हा ब्रांड श्री. राजस विमलकुमार जैन, एम. डी, कुमार प्रॉपर्टीज आणि वैशाखी फडके, ए. जी. एम मार्केटींग यांच्या नेतृत्वातून साकार झाला आहे.
 कुमार प्रॉपर्टीज गेली ५० वर्षे भारतात  रियल इस्टेट क्षेत्रात काम करत असून  आंतरराष्ट्रीय स्थरावर ओळख मिळणे ही आमच्यासाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे वक्तव्य श्री. राजस जैन ह्यांनी अवॉर्ड स्वीकारताना केले. आमच्या ५० वर्षाच्या अथक परिश्रमांना व समर्पणाला मिळालेली ही कौतुकाची थाप असून त्याचा परिणाम म्हणून प्रीव्ही रेसिडेन्सेस ला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे असे बोलून त्यांनी आपला आनंद ह्याप्रसंगी व्यक्त केला.

संगीत खुर्ची खेळत महिलांनी दिला स्वच्छतेचा संदेश

0
स्वच्छता न राखल्याने सतत ड्रेनेज तुंबण्याची समस्या व त्यासाठी निधी खर्च होत असल्याने अन्य विकास कामे मागे पडतात – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर….
पुणे-गोसावी वस्तीत सातत्याने ड्रेनेज तुंबल्याच्या तक्रारी येतात व प्रशासनाला आठवड्यातून एकदा तरी कुठ्ल्यान कुठल्या गल्लीत ड्रेनेज सफाईसाठी धाव घ्यावी लागते,तसेच दर वर्षी येथे ड्रेनेज लाईन साठी लाखो रुपये खर्च करावे लागतात व अन्य विकास कामांसाठी निधीच शिल्लक राहात नाही,पण तुम्ही जर स्वच्छता ठेवली तर ड्रेनेज ला घुशी पोखरणारी नाहीत व वस्ती ही सुंदर राहील असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.आता वस्तीत ५० लाख रुपयांची कामे ही फक्त ड्रेनेजची सुरु आहेत असे ही त्यांनी स्पष्ट केले.”नगरसेविका आपल्या भेटीला” या उपक्रमाअंतर्गत गोसावी वस्तीत स्वच्छता जनजागृती,कचरा बकेट वाटप व नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता,यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी संगीत खुर्ची खेळत ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबतचा निर्धार केला.ज्या भगिनी खुर्ची पटकावीत होत्या त्यांना ओल्या कचऱ्यासाठी हिरवी बकेट तर बाद होणाऱ्या भगिनींना सुक्या कचऱ्यासाठी निळी बकेट देण्यात येत होती.या सर्व कार्यक्रमाचे संयोजन कोथरूड मंडल भाजप चिटणीस रमेश चव्हाण,गणेश चव्हाण आणि कविताताई सदाशिवे यांनी केले.यावेळी भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,महिला आघाडीच्या सुवर्णाताई काकडे,सुलभाताई जगताप,तसेच वस्तीतील बचत गटाच्या भगिनी लता चव्हाण,मनीषा घाडगे,यमुना पवार,उपस्थित होत्या.
आम्ही आजचा संदेश स्मरणात ठेवू व कोणत्याही परिस्थितीत ओला व सुका कचरा वेगळा करूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांना देऊ तसेच ड्रेनेज लाईन मध्ये अन्नपदार्थांचे खरकटे टाकणार नाही असा निर्धार महिलांनी केला आहे असे रमेश चव्हाण व गणेश चव्हाण यांनी सांगित

मराठी भाषेचा अधिकाधिक वापर दररोजच्या जीवनात व्हावा : डॉ. वसंत देशपांडे

0
पुणे :
‘मराठी भाषेचा अधिकाधिक वापर दररोजच्या जीवनात व्हावा यासाठी मराठी तंत्रज्ञान  उपयोगी पडते,’ असे मत डॉ. वसंत सी. देशपांडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिक्षण विभाग, माजी अधिष्ठाता) यांनी मांडले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘मराठी संभाषण अकादमी’ वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम’ प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. हा कार्यक्रम आज मंगळवारी डॉ. ए आर शेख असेम्ब्ली हॉल सकाळी झाला.
दिनांक १ ते १५ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुणे डॉ. वसंत सी. देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ‘मराठी संभाषण अकादमी’ च्या प्रमुख नूरजहाँ शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अमिता डंबीर यांनी केला. शेहनाझ शेख यांनी आभार मानले.
 याप्रसंगी  एम. सी. ई. सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, प्रा. शैला बूटवाला (आबेदा इनामदार सिनियर कॉलेज), शिक्षिका तेजस्वनी पवार, शहनाझ शेख, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. वसंत सी. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरचक्र ऍप’ डाउनलोड करून विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ऍप द्वारे मराठी भाषा लिहिता व शिकता येते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री विनोद तावडे यांना या ऍप द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ४५ टक्के वाढ’ : डॉ. योगी गोस्वामी यांची माहिती

0
पुणे :
‘सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) निर्मितीच्या उद्योगात गेल्या पाच वर्षात झपाट्याने वाढ होत असून, ती सुमारे ४५  टक्के प्रतिवर्ष इतक्या वेगाने वाढत आहे’, असे मत डॉ. योगी गोस्वामी (अमेरिकन संशोधक, उद्योजक लेखक आणि ‘क्लीन एनर्जी रिसर्च सेंटर ऑफ युनिव्हर्सिटी साऊथ फ्लोरीडा’ चे संचालक) यांनी व्यक्त केले.
‘इनो-सोलर एनर्जी प्रा.लि. आणि ‘ऊन्पा इंजिनिअरिंग’ च्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ‘विनबील्ड’ , ‘ऐम्पोरेस’ व ‘ईन्डीयन सोलरहब’ या अमेरिकेतील कंपन्यानी भाग घेतला.
‘सोलर हायब्रिड इनव्हर्टर आणि पॉवर ऑप्टीमायझर होम एनर्जी सेव्हर युनिट’
या अमेरिकेमध्ये संशोधित व संपुर्ण पणे  ‘मेड इन इंडिया युनिट’चे उद्घाटन आबासाहेब शिंदे (राजश्री शाहू बँकेचे अध्यक्ष) यांच्या हस्ते झाले.
यावेळी निलेश ढमढेरे (पुणे अर्बन बँकेचे अध्यक्ष), संजीव पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी , श्री सिद्धीविनायक गणपती ट्रस्ट, मुंबई), लोगेश जनार्दन (संचालक, ‘इम्पोरेस’, अमेरिका), अश्‍विनी जगताप (संचालक, ‘उन्पा इंजिनिअरिंग’ ), आणि उन्मेश जगताप (‘इनो सोलर एनर्जी प्रा.लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ), बिपीन शहा (सल्लागार, यू एस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी) उपस्थित होते.
‘इतर कोणत्याही उद्योग धंद्यात इतकी झपाट्याने वाढ होताना दिसत नसून, सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात नव उद्योजकांना मोठी संधी असल्याचे’ मत डॉ. योगी यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, ‘सौर ऊर्जेमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील घरगुती वीज व शेतीच्या कामासही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. यामुळे देशाची प्रगती होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.’
‘रहिवासी इमारती तसेच व्यावसायिक इमारतींच्या टेरेसवरील सौरऊर्जा निर्मितीस सरकार देखील प्रोत्साहन देत असून, पुढील काळात सौर ऊर्जा निर्मितीचा वेग प्रचंड वाढेल’ अशी अपेक्षा व आशा उन्मेश जगताप यांनी व्यक्त केली. तसेच ‘इंडियन सोलर हब’ तर्फे संचालित ‘सोलर प्लॅंट’ देखभालीच्या उपक्रमांत दिव्यांग तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
बिपीन शहा यांनी शहा ‘यू एस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी’ मध्ये संशोधित बिल्डिंगमधील उर्जा वापर कमी करण्यासाठीच्या अनेक तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले.
‘सौर उर्जा निर्मितीचे प्रमाण जसजसे वाढेल तसतसे त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होऊन ती सर्व सामान्यांच्या आवाक्यात लवकरच येईल,’ असे लोगेश जनार्दन यांनी सांगितले. .

‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’, PNB प्रकरणी शत्रूचा टोला…

0

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार कोटींच्या घोटाळ्याचे खापर लेखापरीक्षकांवर (ऑडिटर्स) आणि नियंत्रकांवर फोडणाऱ्या केंद्र सरकारला खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर आपल्याकडील काही सुशिक्षित लोकांनी यासाठी नेहरूंच्या काळापासून काँग्रेसच्या राजवटीतील गैर कारभार कारणीभूत असल्याची टीका करून झाल्यानंतर ऑडिटर्सना दोषी ठरवले. नशीब त्यांनी याप्रकरणी एखाद्या शिपायाला पकडले नाही. शत्रुघ्न सिन्हा यांच्या या विधानाचा रोख केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे होता. जेटली यांनी काही दिवसांपूर्वी या घोटाळ्यासाठी बँकेच्या बहुस्तरीय लेखापरीक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले होते.

मात्र, हे आरोप करण्यापूर्वी सरकारने चार वर्षांमध्ये काय केले, हा मूळ प्रश्न आहे. ही सरकारी मालकीची बँक आहे. त्यामुळे घोटाळा सहा वर्षांच्या कालावधीत घडला हे गृहीत धरले तरी चार वर्ष बँकेचे नियंत्रण सरकारकडे होते. मध्यंतरी जेटलींनी , ‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’, असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला.

टाटा टेक्नोलॉजीज आता इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या श्रेणीसाठी एनआयओच्या पसंतीचा इंजिनीअरिंग पार्टनर

0

शांघाय – टाटा टेक्नोलॉजीज ही जागतिक स्तरावर इंजिनीअरिंग सेवा देणारी कंपनी, इलेक्ट्रॉनिक वाहन श्रेणी विकसित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत, अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक कार्सचे उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी एनआयओ चीनसोबत काम करणार आहे. टाटा टेक्नोलॉजीजने या संबंधाची घोषणा आज केली. या दोन कंपन्यांमधील सहयोग सुरू झाला तो एनआयओच्या पहिल्या पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून तयार झालेल्या ईएस-एट या वाहनासाठी इंजिनीअरिंग विकसित केले तेव्हापासून. ईएस-एट हे चीनच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आणलेले आपले पहिले उत्पादन असावे, हा एनआयओचा उद्देश आहे.

या संबंधाबद्दल टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वॉरन हॅरिस म्हणाले, “ईएस-एट हा वाहन उद्योगातील महत्त्वाचा टप्पा आहे. सात आसनांचे हे उच्च कामगिरी करणारे एसयूव्ही म्हणजे चाकांवरील घरच आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण उत्पादनासाठी एनआयओसोबत काम करता आले हा टाटा टेक्नोलॉजीजसाठी मोठा सन्मान आहे.  लाइटवेटिंग (कमी वजनाची वाहने तयार करणे), कनेक्टेड (परस्परपूरक) वाहने आणि उत्पादनाच्या जीवनचक्राचे व्यवस्थापन (पीएलएम) या क्षेत्रात एनआयओसोबत आम्ही बारकाईने केलेले काम हे भविष्यकाळात वाहतूक परिसंस्था निश्चित करणाऱ्या भागीदारी कशा असाव्यात याचे उत्तम उदाहरण आहे. शिवाय, आमच्या चीन, भारत, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेतील कार्यात्मक आस्थापनांच्या माध्यमातून आम्ही एनआयओला सेवा देऊ शकत आहोत, ही जागतिक स्तरावर आस्थापने विकसित करण्यासाठी आम्ही केलेल्या गुंतवणुकीला मिळालेली पोचपावती आहे. एनआयओसोबत आणखी मोठ्या प्रमाणात भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

एनआयओच्या वाहन इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष श्री. रॉजर माल्कसन टाटा टेक्नोलॉजीजच्या योगदानाची दखल घेत म्हणाले, “जागतिक स्तरावर नवीन मापदंड प्रस्थापित करेल असा पहिल्या दर्जाचा अनुभव वापरकर्त्यांना देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आमच्यापुढे आहे आणि हे गाठण्यात आम्हाला मदत करण्यासाठी भागीदार म्हणून टाटा टेक्नोलॉजीजला आमची पसंती आहे. सुरक्षितता आणि सफाई हे दोन्ही निकष सर्वोच्च पातळीवर पूर्ण करणारे एक अंतिम उत्पादन देण्यासाठी त्यांनी चीन, भारत, ग्रेट ब्रिटन आणि रोमानिया येथील आपले तज्ज्ञ आणि पथके एकत्र आणली व एनआयओसोबत काम केले. तयार झालेले पहिले उत्पादन म्हणजे पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून तयार झालेली ईएस-एट ही एसयूव्ही आहे. या वाहनाने कमी वजनाच्या गाड्यांच्या विभागात नवीन मापदंड स्थापन केला असून अगदी कोऱ्या कागदापासून ते चाचणीसाठी सज्ज असलेले वाहन यांच्यातील प्रवासाच्या जागतिक मान्यताप्राप्त वेगाच्या तुलनेत विक्रमी वेगाने हे पूर्ण झाले आहे.”

दोन्ही कंपन्यांनी २०१५ सालच्या मध्यात एकत्र कामाला सुरुवात केली. अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक वाहने तयार करणारी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप म्हणून एनआयओची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच कंपनीने टाटा टेक्नॉलॉजीजसोबत काम सुरू केले. तेव्हापासून ईएस-एटमधील इंजिनीअरिंगच्या बाजूवर टाटा टेक्नोलॉजीज काम करत आहे. यामध्ये गाडीची रचना, दरवाजे आणि बाह्यरचना, अद्ययावत उत्पादन इंजिनीअरिंग, पीएलएम आणि ऑफ-कार कनेक्टिव्हिटी आदी घटकांवर टाटा टेक्नोलॉजीजने काम केले आहे. एनआयओसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण भागीदारीमध्ये काम करताना टाटा टेक्नॉलॉजीजने आपले जगभर वितरित झालेले कामाचे प्रारूप वापरले आणि चाकोरीबाह्य इंजिनीअरिंग प्रक्रियांमधील आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले.

उद्योगात मापदंड स्थापन करेल अशी उत्पादन विकास प्रक्रिया तयार करण्याच्या उद्देशासह काम करत असताना एनआयओ आणि टाटा टेक्नोलॉजीजने अत्याधुनिक साधनांचा वापर करून गाडीच्या वजनाचा उत्तम वापर करून घेण्यासाठी अनेक संकल्पनांवर काम केले आहे. चीनमध्ये अद्ययावत सामुग्रीवर आधारित वाहनांचा प्रसार करण्यात मूलगामी ठरेल अशी प्रक्रिया तयार करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. या कौशल्याचे उपयोजन केल्याचे फळ म्हणून ईएस-एटने साध्य केलेला वजन व कार्यक्षमतेचा तोल युरोकारबॉडी परिषदेमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम ठरलेल्या गुणोत्तराहूनही अधिक चांगला आहे.

पीएमएम क्षेत्रातही या भागीदारीमुळे अनेक महत्त्वाचे तंत्रज्ञानात्मक टप्पे गाठले गेले आहेत. टीमने 3DEXPERIENCE ® 2016x (Dassault Systèmes) ही सुविधा यशस्वीरित्या अमलात आणली आहे. टाटा टेक्नोलॉजीजच्या जागतिक स्तरावरील प्रतिभावंतांनी हे प्रत्यक्षात आणले असून अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या मूळ उपकरण उत्पादनाच्या (ओईएम) क्षेत्रातही अशाच प्रकारचे यश प्राप्त केले आहे. यामुळे उत्पादन विकासाच्या जीवनचक्राला सहकालिक (कॉन्करण्ट) इंजिनीअरिंगच्या माध्यमातून वेग देणे इंजिनीअर्सना शक्य होत आहे.

इलेक्ट्रॉनिक वाहने आणि त्याला जोडलेले कार उद्योग आता बुद्धिमत्तेवर आधारित वाहतुकीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. अंगभूत इन्फोटेनमेंट प्रणाली, बुद्धिमत्तेवर आधारित वाहतूक आदी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झालेल्या घटकांना असलेली मागणी जागतिक स्तरावर वाढत आहे. स्मार्टकार्सच्या विकासासाठी तसेच उत्पादनासाठी दक्षिण व पूर्व आशियातील बाजारपेठा सर्वोत्तम समजल्या जात आहेत.

टाटा टेक्नोलॉजीजविषयी:

जगातील अग्रगण्य उत्पादकांसाठी भविष्यकालीन उत्पादनांची रचना, इंजिनीयरिंग आणि पडताळणी करून देऊन टाटा टेक्नोलॉजीज उत्पादन विकासातील स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे काम करते. ८५०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जगभरातील ग्राहकांना सेवा पुरवणारी टाटा टेक्नोलॉजीज ही अतिप्रगत इंजिनीअरिंग, संशोधन व विकास, उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन सल्ला व सॉफ्टवेअर आणि संलग्न आयटी उपाययोजना पुरवणारी उत्पादन क्षेत्रातील भागीदार कंपनी आहे.

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ उत्साहात साजरा

0
पुणे : ‘यशस्वी’ संस्था व विभागीय माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विधी महाविद्यालय रस्त्यावरील ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर चौकात त्यांच्या प्रतिमेला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच याच चौकातील  वाहतूक बेटावर उभारण्यात आलेल्या ग्रंथ शिल्पालाही पुष्पमाला अर्पण करण्यात आली व ‘यशस्वी’ संस्थेच्या कार्यालयात  मराठी भाषेचा गौरव सांगणाऱ्या  कवी सुरेश भट यांच्या प्रसिद्ध ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या कवितेचे जाहीर वाचन करण्यात आले आणि उपस्थितांना   राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ‘मराठी’ भाषेच्या विशेषांकाच्या प्रती वितरित करण्यात आल्या. 

विशेष बाब म्हणजे या मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर चौकात   संत ज्ञानेश्वर, कुसुमाग्रज,  बहिणाबाई चौधरी,  विंदा करंदीकर, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, ना. सी. फडके, मंगेश पाडगावकर, ग्रेस, पु. ल. देशपांडे, ना. धो. महानोर अशा विविध साहित्यिकांच्या प्रतिमा व त्यांच्या साहित्यकृतीमधील काही ओळींचे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत. 
         
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे संचालक सुनील रामदासी, प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका आदिती वाकलकर, मार्केटींग हेड प्रशांत कुलकर्णी, अमृता तेंडुलकर,   अजय कुलकर्णी,जे.के.सहस्त्रबुद्धे व यशस्वी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाम वायचळ, श्रीकांत तिकोने, अभिजित चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीदेवी ! हवा हव्वाई…!!

0

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला दाक्षिणात्य अभिनेत्रींची फार मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. या परंपरेत दर दशकाला एक नव्या दाक्षिणात्य तारकांची भर पडत गेल्याचे दिसून येईल.अगदी खूप मागे जरी गेलो तरी यात फरक आढळून येत नाही. आणि त्यातही विशेष म्हणजे दाक्षिणात्य नायकांपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या अंगीभूत गुणांच्या व अप्रतिम दाक्षिणात्य अभिजात सौंदर्याच्या, नृत्यकौशल्याच्या बळावर आघाडीच्या सिनेतारका बनलेल्या दिसून येतात. दाक्षिणात्य नायक मात्र तुलनेने अपवाद स्वरुपातच हिंदी सिनेमात व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरल्याचे दिसून येईल. अगदी कमल हसन, रजनीकांत शिवाजी गणेशन सारख्या दक्षिणेकडील महानायकांनाही हिंदी सिनेमात अत्यंत मर्यादित यश मिळाल्याचे दिसून येईल. या उलट दाक्षिणात्य नायिका मात्र त्यांच्या शामल वर्णी सौंदर्य व नृत्यनिपुणतेच्या जोरावर पदार्पणातच हिंदी पडदा काबीज करण्यात नंबर वन ठरल्या आहेत. मग ती वैजयंतीमाला असेल, हेमामालिनी असेल, रेखा असेल अगर पद्मिनी, रागिणी, त्रावणकोर भगिनी वा जयप्रदा, बी सरोजादेवी, जमुना, असेल. या दाक्षिणात्य नायिकांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदी सिनेमात नायिका म्हणून पदार्पण केलेल्या श्रीदेवीनेही आपल्या पदार्पणातील 1978च्या ’सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे जाणकार, अभ्यासू रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी श्रीदेवीने 1975 साली ’ज्य्ाुली-’ चित्रपटात लक्ष्मी (ज्य्ाुली)च्या धाकट्या बहिणीच्या रुपात बालकलाकार म्हणून हिंदी सिनेरसिकांना आपली निसटती झलक दाखवली होती. ज्य्ाुलीनंतर या चित्रपटाच्या नायक-नायिका अल्पावधीतच विस्मृतीच्या धुक्यात दिसेनाशा झाल्या.

पण 1975 मध्ये बालकलाकार म्हणून हिंदी सिनेमात आलेल्या त्याच श्रीदेवीचा 1978चा ’सोलवा सावन’ हाच नायिका म्हणून पदार्पणातील पहिलाच यशस्वी, दखलपात्र सिनेमा समजायला हवा.

हा चित्रपट कमल हसन पेक्षा श्रीदेवीच्या आगळ्यावेगळ्या अशा अभिव्यक्तीने रसिकांना मनापासून आवडला. तिची ’सोलवा सावन वा सदमा’ या चित्रपटातील देहबोली, अभिव्यक्ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेली.

श्रीेदेवी ने हिंदी सिनेमात पदार्पण केले ते ऐंशी (1980) चे दशक तेंव्हा रेखा, हेमा मालिनी आपल्या अभिनय कौशल्याने गाजवत होत्या. शर्मिला टागोर, मुमताज, राखी, झिनत अमान, सारख्या बिगरदाक्षिणात्य नायिकांना हेमा मालिनी व रेखा भारी पडत होत्या. थोडक्यात ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य नायिका हिंदी सिनेमा रुपेरी पडदा गाजवत असतानाच श्रीदेवीचे ’सोलवा सावन’ आणि ’सदमा’ सारख्या चित्रपटाव्दारे नायिका म्हणून झालेले आगमन अनेकांना ’चमकवून’ गेले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले कर्तृत्व यथोचित सिध्द केलेली श्री देवी जेव्हा हिंदी सिनेमात आपले नशिब आजमावण्यासाठी आली तेव्हा हिंदी सिनेसृष्टीतील अनेकांच्या उंचावल्या.

हेमा मालिनी, रेखा, शर्मिला, मुमताज, मालासिन्हा, आशा पारेख, वहिदा रेहमान सारख्या बड्या बड्या आघाडीच्या नायिकांसमोर या चिमुरड्या आवाजाच्या श्रीदेवीची डाळ शिजणार का असाच प्रश्न बहुतेकांच्या मनात तेव्हा होता.

श्रीदेवीचा नायिका म्हणून दक्षिणेकडील विजय अनेकांना तोपर्यंत अपरिचितच होता. पण अनेकांना ठाऊक नव्हते की श्रीदेवी तेव्हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची लोकप्रिय, यशस्वी नायिका होती.

श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये शिवकाशीला अय्यपन घराण्यात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती बालकलाकार म्हणून दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होती. ’थुनाआवन’ या पहिल्या चित्रपटात तिने 1967ला राजा मुरुगाची भूमिका केली होती. त्यानंतर तिने तामिळ, तेलगू अशा अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून आपला ठसा उमटवला. ज्यात 1971 च्या ’पुम्पट्टा’ चित्रपटासाठी तिला केरळ राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. कंदन करुनाई, प्रार्थनाई, नामनाडू, वसंत मालिगई, बाबु, हे तिचे बालकलाकार म्हणून उल्लेखनीय चित्रपट होत. असो. दाक्षिणात्य चित्रपटात श्रीदेवीची नायिका म्हणून फर्स्ट ईनिंग 1976 मधील  ’मून्द्रू मुडीचू’या तामिळ चित्रपटाव्दारे झाली. या काळात तिने दक्षिणेकडील कमल हसन, रजनीकांत सारख्या बड्या आघाडीच्या नायकांबरोबरही काही चित्रपट केले.

हिंदी सिनेमात चमकण्यापूर्वी 1976 ते  1979 या काळात तिने …”16-वयथिनईल, ’पदाहरील्ला,’ सिंगाप्पुरोजक्कल,’एस.पी.मुथ्थुरमनस प्रिया, ’कार्तिकदिपम,’जॉनी,’ अकाली राज्यम,..इत्यादि. अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. 1981 आणि 1982 मध्ये तिला अनुमे ”मीन्दम कोकिला” आणि ”मून्द्रम पिराआ” या तामिळ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअरचा  (तामिळ विभागात) आणि तामिळनाडू राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, हिंदी सिनेमात त्यावेळी ती अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असतानाच तिला हे दाक्षिणात्य चित्रपटांसाठीचे पुरस्कार मिळाले होते. श्रीदेवी एकाच वेळी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिकेत चौफेर कर्तृत्व गाजवणारी एकमेव कलाकार असावी. कारण निदान त्यावेळी तरी दोन्हीकडे आघाडीची नायिका म्हणून ती वाटचाल करत होती. हा तिचा दोन्ही कडील करियर ग्राफ विस्मयचकित करणारच म्हणावा लागेल. कारण 1992 मध्ये हिंदीत ती सुपरस्टार असतानाच तिने ’क्षण-क्षणम’ या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित तेलगु चित्रपटात साकारलेल्या अविस्मरणीय भिूमकेसाठी तिला फिल्मफेअरचा अन् आंध्र राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार एकाच वर्षी  मिळाला. तिचे ”कोंण्डा वीटम सिंहम, सरदार पापाराय्ाुदी, बोबिली, पुली, प्रेमाभिषेकम, गोविंदा-गोविंदा, एस.पी. परसुराम, कलावरी संसारम, प्रेमाकनुका, बंगारुकनुका, इत्यादी श्रीदेवीचे उल्लेखनीय गाजलेले  तेलगू चित्रपट समजले जातात.

एकाच वेळी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अप्रतिम नृत्यनैपुण्य, व चित्तवेधक देहबोलीने दोन्हीकडील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्‍या श्रीदेवीची चौफेर फलंदाजी दखल घ्यावी अशीच आहे.

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर श्रीदेवीचे सुरवातीचे सोलवा सावन काय किंवा सदमा काय हे जणू तिचे हिंदी सिनेमातील आगामी कार्यकर्तृत्वाचे ट्रेलर होते. कारण त्यानंतर 1983 पर्यंत ती मुंबापुरीतून जणू गायबच झाली होती. या दोन्ही सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवीला स्वत:मधील उणिवा जाणवल्या. भाषेचा प्रॉब्लेम सुटल्याशिवाय आपण इथे टॉपला जाऊ शकत नाही हे तिने ओळखले. सोलवा सावन व सदमाच्या वेळेस तिला मातृभाषेशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती. बंबय्या हिंदी, बंगाली किंवा पंजाबी बोलणं तिच्या डोक्यावरुन जाई.दाक्षिणात्य भाषेमुळे आपसात संवाद घडत नसे. तेव्हा त्यावर मात केल्याशिवाय आपली बॉलीवूडमध्ये डाळ शिजणार नाही हे ओळखून तिने परत आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला.

पण याच काळात जितेंद्रने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला. दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेक चित्रपटांच्या ऑफर स्विकारु लागला. अन् हिंदी सिनेमा पूर्ण तयारनिशी काबीज करण्यासाठी दाक्षिणात्य निर्मातेही श्रीदेवी (नंतर जयाप्रदा,तब्बु,इ तारकांना घेऊन)गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा (डंबिंग न करता) हिंदी रिमेक बनवू लागले. अशा प्रकारे श्रीदेवी अन् जिंतेंद्र ही जोडी दक्षिणेकडील चित्रपटांच्या रिमेकमध्ये गाजू लागली. (अल्पावधीतच श्रीदेवीच्या जोडीला जितेंद्रला जयप्रदा ही नायिकाही ’लाभली’.)

हिम्मतवाला या पहिल्याच चित्रपटाने श्रीदेवी-जितेंद्र जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली. अन् याच चित्रपटापासून श्रीदेवी गाजू लागली.

1983 मध्ये आलेल्या जितेंद्र समावेतच्या ’हिम्मतवाला’ने सर्वत्र एकच धुमाकूळ घातला. संपूर्ण दाक्षिणात्य सेटअपमध्ये बनलेला पुर्णपणे दाक्षिणात्य वळणाच्या हिम्मतवालामध्ये तिचा नायक जितेंद्र तेवढा मुंबईचा होता. शक्तीकपूर, अमजदखान, ही जोडगोळी आणि दाक्षिणात्य वळणाची भडक, बटबटीत पटकथा असलेला दक्षिण भारतातील हिरवागार निसर्ग टिपणारा हिम्मतवालाने एक वेगळाच ट्रेण्ड हिंदी फिल्म इंडस्ट्रीत रुढ केला. भप्पी लहरीचे संगीतही जितेंद्रला साथ देऊ लागले. हिम्मतवालाच्या पावलावर पाऊल टाकत श्रीदेवीचे मवाली, मकसद, जस्टीस चोैधरी चित्रपटांनी अल्पावधीतच श्रीदेवी-जितेंद्र जोडीला सुपरहिट पेअरचा दर्जा मिळाला. त्यावर कळस चढवला 1984च्या ’तोहफा’ने. जयाप्रदा श्रीदेवी अन् जितेंद्र हा जणू रुपेरी पडद्यावरील लोगोच ठरला. या चित्रपटाने त्यावर्षी लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. या जोडीच्या संगीत आणि नृत्यगीतांची पंचपक्वानांची मेजवानी असलेल्या तोहफा सारख्या चित्रपटांची नंतर रांगच लागली.

श्रीदेवी-जितेंद्र या जोडीने एकूण 16 चित्रपटात एकत्र काम केले ज्यापैकी 11 चित्रपट सुपरहिट ठरले. श्रीदेवी काय किंवा जितेंद्र काय या दोघांनीही नृत्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नसूनही या जोडीची मवाली, हिम्मतवाला, तोहफा, मकसद आदि चित्रपटातील पदन्यास,नृत्यातील उस्फूर्तता जाणकारांनाही चकित करुन गेली.

हिंदीत आतापर्यंत आलेेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या पार्श्वभूमीवर श्रीदेवीचे जाणवणारे सर्वात महत्वाचे ठळक वैशिष्ठये म्हणजे श्रीदेवी तिच्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रसृष्टीत त्याकाळातील सुरवातीपासून अखेरपर्यंत दोन्हीकडे सर्वाधिक व्यस्त तारका होती. हिंदीत नाव कमावले म्हणून तिने दाक्षिणात्य चित्रसृष्टीकडे अजिबात दुर्लक्ष केलेले आढळत नाही. दोन्हीकडे एकाच वेळी तिला मुबलक ऑफर येत होत्या. अन् ती दोन्हीकडील चित्रपटांना समान न्याय देत होती. त्यामुळे ती दोन्हीकडे सर्वाधिक लोकप्रिय सुपरसम्राज्ञी होती. दक्षिणेकडे तिच्या चाहत्यांनी तिची पूजा बांधली तर नवल नाही कारण तिकडे  सितार्‍यांची व्यक्तीपूजा आम बात आहे. पण बंबय्या सिनेमाच्या गल्लोगलीतील  तिच्या चाहत्या तरुणी स्वत:ला श्रीदेवी समजू लागल्या यातच काय ते समजा. तिची वेषभूषा (विशेषत: चांदनी फेम) तिची केशभूषा नावाजली जाऊ लागली.

याच दरम्यान हिंदी सिनेमात इच्छाधारी नागिणीच्या सूडकथा पकड घेऊ लागल्या होत्या. नगिना या चित्रपटातील श्रीदेवीची इच्छाधारी नागिण अनेकांना घायाळ करुन गेली. नगिना हा त्यावर्षीचा सर्वाधिक सुपरडुपरहिट चित्रपट जाहिर झाला तो केवळ श्रीदेवीच्या नृत्यकौशल्याने. या चित्रपटातील तिचे वादातीत नृत्यकौशल्य अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेले. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत होऊन गेलेल्या सर्वाधिक गाजलेल्या सर्पचित्रपटात नगिनाचा बराच वरचा क्रमांक लागतो. त्याचे श्रेय केवळ श्रीेदेवी अन् अमरीश पुरी यांनाच द्यावे लागेल. जानबांज आणि कर्मा हे श्रीदेवीचे याच काळातील चित्रपट होत.

शेखर कपूरचा ’मिस्टर इंडिया’ श्रीदेवीचा महत्वाचा गाजलेला चित्रपट. यात तिने चार्लीचॅपलिनची केलेली नक्कलही दाद देऊन गेली. अन् यातील अनिल कपूर श्रीदेवी आणि बच्चे लोकांवर चित्रित ’पॅरिडी साँग’ ही भलतेच सुपरहिट ठरले. अर्थात सगळयात जास्त भाव घेऊन गेला तो अमरिश पुरीचा ’मोगॅम्बो’…

असाच श्रीदेवीचा डबल रोल असलेला गाजलेला चित्रपट म्हणजे पंकज परशर दिग्दर्शित ’चालबाज’.. यातील तिने सिता और गीता मधील हेमामालिनीची कॉपी न करता दखलपात्र अभिनय केला. यातीलही सर्व गाणी सुपरहिट ठरली. ज्यात मिस्टर इंडिया मधील ”हवा हव्वाई’…आणि ”कांटे ना कटे..” ने तर कहरच केला. चालबाज या चित्रपटातील तिचे गाजलेले वर्षानृत्यगीत…” ना जाने कहाँ से आयी है..’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्यावेळी तिच्या अंगात 103 डिग्रीपर्यन्त ताप असूनही तिने ते गाणे अशा झोकात केले की आजही त्या नृत्यगीताचे कौतुक होते.

चालबाज, मिस्टर इंडिया या चित्रपटांच्या यशामुळे तिने तत्कालीन तिच्या स्पर्धक जयाप्रदा अन् मिनाक्षी शेषाद्रि यांना तिने केव्हाच मागे टाकले. सनी देवल अन् रजनीकांत सारख्या आघाडीच्या नायकांनाही तिने आपल्या आकर्षक सादरीकरण, आणि कॉमिक रोलमुळे निष्प्रभ करुन टाकले.

चालबाज प्रमाणेच श्रीदेवीचा आणखी एक ब्लॉकबस्टर म्हणजे ”चांदनी’. यश चोप्रांच्या चांदनीच्या उदंड अमाप व्यावसायिक यशाने जणू श्रीदेवीच्या कारकिर्दीत चारचांद लागले. चालबाज आणि चांदनी मधील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे 1989चे नॉमिनेशन मिळाले तर चांदनी चित्रपटाला त्यावर्षीचा सर्वाधिक लोकप्रिय व्यावसायिक चित्रपटाचा नॅशनल फिल्मअ‍ॅवॉर्ड जाहिर झाला. या चित्रपटातील -’मेरे हांथोमे नौ नौ चुडियां हेै..” या गाण्याने तर त्यावर्षी अक्षरश: कहर केला. तरुणींनी हातात हातभर रंगीबेरंगी बांगड्या घालण्याच्या नव्या फॅशनने नव्या संस्कृतीला जन्म दिला.

यश चोप्रा यांचा लम्हे हा चांदनी नंतरचा श्रीदेवीचा तिकिटाच्या बारीवर फसलेला पण चित्रपटसमिक्षक व जाणकारांनी नावाजलेला क्लासिक चित्रपट होय. यातील श्रीदेवीचा आई व मुलीचा (पल्लवी आणि पूजाचा) डबलरोल अविस्मरणीयच. या चित्रपटाला फिल्मफेअरचे पाच पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा श्रीदेवीचा पुरस्कारही सामील आहे. पण सर्वसामान्य प्रेक्षकांनी अव्हेरलेला एक अतिशय धाडसी विषय असेच त्याचे वर्णन योग्य ठरेल. अनिल कपूर अन् श्रीदेवीचा एक सर्वस्वी वेगळ्या मॅच्य्ाुरड भूमिका असलेला ‘लम्हे’ यश चोप्राच्या कारकिर्दीतील एक क्लासिकच होता.

यानंतर चा अमिताभ बच्चनचा ’खुदागवाह’ वेगळया अफगाणीस्तान, (नेपाळ) काबुलच्या संमिश्र पार्श्वभूमीवरील चित्रपटातही श्रीदेवीच्या सर्वस्वी दोन रुपे (बेनझिर आणि मेहंदी) प्रेक्षकांना चकित करुन गेली. डबल रोल करणे हा त्या काळातील कलाकारांचा प्रेस्टिज इश्य्ाू असे.श्रीदेवीने डबलरोल केले तरीही त्यात वैविध्य होते. एकसाची डबलरोल नव्हते.

श्रीदेवीच्या प्रत्येक हिंदी सिनेमाचा संपूर्ण विश्लेषणात्मक आढावा घेणे जागे अभावी शक्य नाही.परंतु त्यातल्या त्यात महत्वाच्या चित्रपटांचा येथे केवळ नामोलेखही पुरेसा आहे. त्यादृष्टीने श्रीदेवीचे गाजलेले आणि क्लासिक निवडक चित्रपट म्हणजे… सोलवा सावन, सदमा, लम्हे, खुदागवाह, जुदाई, हिम्मतवाला, तोहफा, मकसद, वक्त की आवाज, जस्टीस चौधरी, नगिना, मिस्टर इंडिया, चांदनी, चालबाज, लाडला, इंग्लिश-विंग्लीश.

बॉनी कपूरशी लग्न झाल्यानंतर 1997 साली आलेला ”जुदाई” हा श्रीदेवीच्या पहिल्या इनिंगमधील शेवटचा सुपरहिट फॅमिली ड्रामा होय. ज्यातील तिची पैशासाठी वाटेल त्या टोकाला जाणार्‍या पत्नीची भूमिका तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नॉमिनेशन देऊन गेली. प्रेक्षकप्रिय अशा या ’जुदाई’ नंतर श्रीदेवीने रुपेरी पडद्यापासून जी फारकत घेतली ती पंधरा वर्षाच्या ”बड्या ब्रेक नंतर’ एकदम 2012 मध्येच तीने ’इंग्लिश-विंग्लीश’ द्वारा पुनरागमन केले. तिचा हा दुसर्‍या फेरीतील ’इंग्लिश-विंग्लीश’ तिला अमाप यश, अफाट कौतुक आणि भरघोस वेलकम विश देऊन गेला. यातील तिची भूमिका वेगळ्या धाटणीची अन् जबरदस्त आव्हानात्मक असूनही तिने ती भूमिका ज्या सहजतेने साकारली अन् आधुनिक एकविसाव्या शतकातील समर्थ स्त्री-शक्तीचे आत्मविश्वासाचे अभिनयातून दर्शन घडवले त्यामुळे समस्त रसिक (विशेषत: महिलावर्ग) तिच्यावर अक्षरश: लट्टू  झालेे. मातृभाषेशिवाय अन्य अत्याधुनिक, विचारसरणी वा राहणीमानाचा वाराही न लागलेली गृहिणी एकविसाव्या शतकातील स्वतंत्र प्रगत विचाराची, इंग्रजी भाषेवर प्रयत्नपूर्वक हुकमत मिळवणारी नायिका चित्रपटसमिक्षक, जाणकारासह सर्वसामान्य प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.

दरम्यानच्या तिने काही वाहिन्यांवरील काही कार्यक्रमातूनही दर्शन दिले, जसे की, ’मालिनी अय्यर’, ‘जिना इसिका नाम है’ इ.इ.

या चित्रपटाआधी 2008 पासून  2013 पर्यंत तिने फॅशन विश्व आपल्या अफलातून सौंदर्य आविष्काराने आकर्षक वेषभूषेमुळे संमोहित केलेले होते.

“इंग्लिश-विंग्लीश”च्या मुहतोड लाजबाब यशानंतरा तिने आपल्या ’मॉम’ चित्रपटातून आपल्या तरुण पिढीला म्हणजे थोरली मुलगी जान्हवीला प्रेक्षकपसंतीसाठी पेश केले.

आजही तिची ओळख तिच्या अभिजात, अफलातून नृत्यातूनच होत होती. तो तिचा बालेकिल्लाच म्हणायला हवा. नृत्य आणि अभिनय  जिच्या रोमारोमात भिनला आहे त्या श्रीदेवीने बॉलिवूडवर आपल्या कर्तृत्वाची जी अवीट मोहोर उठवली आहे. ती पुसणे अशक्य आहे. वयाच्या अवघ्या 54व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुबईत तिचे आकस्मात निधन झाले. त्याचे दुःख पती बोनी, कन्या जान्हवी व खुशी यांच्या प्रमाणेच सार्‍या चित्रपट रसिकांना झाले, तिची एक्झीट जीवाला चटका लावून गेली.

वाळिंबे वृत्तसेवा, पुणे.

मधु पोतदार, सुजाता देशमुख, देविदास देशपांडे, यंदाच्या ‘मराठी रत्न’ पुरस्काराचे मानकरी

0

पुणे-विविध प्रकारच्या मराठी साहित्याच्या निर्मितीतून मराठी साहित्य सेवा करणार्‍या लेखक/पत्रकारांना मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्काराने सन्मानीत केले जाते. यंदा मधु पोतदार, सुजाता देशमुख आणि देविदास देशपांडे यांना‘मराठी रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाकवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन जागतीक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. 5 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी सुधीर गाडगीळ, मुकुंद संगोराम, सुलभा तेरणीकर, प्रभाकर खोले, चारुहास पंडीत, प्रभाकर वाडेकर, सतिश कामत, प्रल्हाद सावंत, श्रीधर लोणी, अद्वैत मेहता, डॉ. शैलेश गुजर, मृणालिनी ढवळे, राजीव साबडे अशा अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

         मधु पोतदार यांची 14 मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक दैनिके व नियतकालिकातून त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून नोकरी सांभाळत असतानाच काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) असे विविध प्रकारचे साहित्य त्यांचे प्रकाशित झाले आहे. चित्रपट व संगीत विषयक व्यक्तीरेखांचे जीवनचरित्र लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. गीतयात्री गदिमा, छिन्नी हातोड्याचा घाव (संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन), विनोदवृक्ष (विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन), वसंतवीणा (संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र), कुबेर (मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र), वसंतलावण्य (संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र), जनकवी पी. सावळाराम, मराठी चित्रपट संगीतकार कोश ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. ‘छिन्नी हातोड्याचा घाव’, ‘कुबेर’, ‘वसंतलावण्य’ या पुस्तकांना राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गीतकार जगदीश खेबूडकर, मराठी चित्रपट गीतकार कोश, मराठी चित्रगीते व भावगीते यांच्या आठवणी ही त्यांची आगामी प्रकाशने आहेत.

     सुजाता देशमुख या मेनका प्रकाशनामध्ये ग्रंथसंपादक आणि माहेर मासिकात कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी अनुवाद केलेल्या ‘गौहरजान म्हणतात मला’ या मराठी अनुवादित पुस्तकास साहित्य अकादमीचा 2017 चा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी राजहंस प्रकाशनमध्ये ग्रंथसंपादक, ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकात कार्यकारी संपादक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नालिझम येथे कोर्स को-ऑर्डिनेटर आणि व्याख्याती,युएनआय, इंडियन एक्सप्रेस, दिनमान, विशाल सह्याद्री, श्रमिक विचार आदी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केले आहे. याशिवाय आकाशवाणीवर मराठी बातम्या देणे, ई टीव्हीमध्ये ‘सखी’ कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. त्यांची आतापर्यंत 9 पुस्तके प्रकाशित झाली असून यातील 8 पुस्तके अनुवादीत आहेत. या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची नवीन अनुवादित पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.

      देवीदास देशपांडे हे तरुण पत्रकार असून महाराष्ट्र सरकारचा 2016 चा राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया पुरस्कार’ त्यांना नुकताच मिळाला आहे. मराठीत आरंभीच्या काळापासून ब्लॉगलेखन करणार्‍या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. बीबीसी व बीबीसी हिंदी सह अनेक मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले असून मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराती, फे्रंच, संस्कृत या भाषा त्यांना येतात. ‘फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग’ आणि ‘जागतिकीकरणाची बदलती भाषा’ ही त्यांची मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून ‘शनिवारवाडा’ हे अनुवादीत इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. सध्या ते ऑर्गनायझर साप्ताहिकासाठी पुण्यातून लेखन करतात तसेच केरळमधील ‘सम्प्रति वार्ताः’ या संस्कृत वृत्त पोर्टलसाठी लेखन करतात. इंडिया अब्रॉड, स्वदेश व पांचजन्य (हिंदी) या वृत्तपत्रांबरोबरच अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याच बरोबर याहू, जम्मूकाश्मीरनाऊ.कॉम (इंग्रजी), प्रवक्ता.कॉम (हिंदी), मॅगआयटी (फे्रंच), रिडीफ.कॉम, लोकसत्ता. कॉम (मराठी), आणि दिनमलर.कॉम (तमिळ) इत्यादी संकेतस्थळासाठी लेखन करतात. ’माझी भाषा – भविष्याची भाषा’ हे त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रचनात्मक कामावर भर दिला जातो. मराठीत सही करणे, दारावरील पाटी मराठीत करणे, मराठी शुभेच्छा पत्र पाठवणे, शक्य तेथे मराठीतच बोलणे, ‘माध्यम रत्न पुरस्कार’ ‘मराठी रत्न पुरस्कार’ असे विविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे गेली 17 वर्ष सुरू आहेत असे मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.

एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च च्या ‘बुक रिव्ह्यू ‘ स्पर्धेस चांगला प्रतिसाद

0
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘आंतर महाविद्यालयीन बुक रिव्ह्यूू’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेस विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रचिका सक्सेना (संचालक,कॉनरड, मानव संसाधन विभाग) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ही स्पर्धा नुकतीच हायटेक हॉल, आझम कॅम्पस येथे पार पडली.
श्रेयस धनंजय करंजकर (अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज) विद्यार्थ्याने विजेत्या पदाचे पारितोषिक पटकाविले. तर नजाला नवाब (‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’) हीने उपविजेतेपदाचे पारितोषिक मिळविले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार आणि प्राचार्य अनिता फ्रांत्झ (एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर’च्या प्राचार्य) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. समीर दिवाणजी (मलाका स्पाईस चे शिक्षण व्यवस्थापक), डॉ. विद्या कदम (सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
 कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी केले.

कामगारांना सरकारी योजनांचा लाभ होण्यासाठी गोयल गंगातर्फे नोंदणी

0

पुणे  :- महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या विशेष नोंदणी अभियानाचा लाभ कामगारांना घेता यावा यासाठी गोयल गंगा डेव्हलपर्सतर्फे मार्केटयार्ड येथील गंगा धाम टॉवर्स या प्रकल्पस्थळी नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी अनेक कामगारांची नोंदणी करण्यात आली. सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते कामगार नोंदणी कार्डचे वाटप करण्यात आले.

या विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत शासनाने २५ लाख कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले असून यासाठी कामगारांना काही कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा फायदा घेता येणार आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांना घेता येणार असल्याने आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे गोयल गंगा डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांनी यावेळी सांगितले.  यामार्फत आर्थिक, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विषयक सुरक्षा दिली जाणार आहे.

राऊत म्हणाले की, कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या कल्याणकारी  योजनांचा लाभ घेता येणार आहे. विविध योजनांचा लाभ मिळविताना नोंदणी फी ठरविण्यात आली असून ती २५ रुपये इतकी आहे. तर दरमहा वर्गणी १ रुपया आणि ६० रुपये पाच वर्षांसाठी आहे.तसेच नोंदणीसाठी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करणे हि आवश्यक असणार आहे.

याशिवाय बावधन मधील गंगा लेजंड आणि उंड्री मधील गंगा ग्लिट्झ येथे ही या आठवड्यात संबंधित मोहिमेंतर्गत नोंदणी केल्या जाणार आहेत. अशी माहिती गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल यांनी दिली.

दुबईत रंगला ‘भय’ चित्रपटाचा शानदार प्रिमिअर

0

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवार २३ फेब्रुवारीला दुबईच्या रॉक्सी थिएटर मध्ये संपन्न झालेल्या या शो ला दुबईच्या स्थानिक कलाकारांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती. ५ जी इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली असून दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.

एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे  आभार निर्माते सचिन कटारनवरे व कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केले. हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.

भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय  होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे…भय’.

अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भय’या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

येत्या शुक्रवारी २ मार्चला भय प्रदर्शित होणार आहे.

गिअर बिघडूनही जिगरबाज संजयकडून रॅली पूर्ण थायलंडमधील मालिकेत एकूण क्रमवारीत तिसरा क्रमांक

0

पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याच्यासाठी नव्या मोसमाची सुरवात यशाच्या निकषावर लक्षवेधी झाली, तसेच संघभावनेच्या दृष्टिने त्याने खुप काही कमावले. थायलंडमधील राष्ट्रीय रॅली मालिकेच्या पूर्वतारीसाठी होणाऱ्या प्री-रॅली मालिकेतील अखेरच्या फेरीत हायड्रॉलीक क्लच पंप बिघडल्यानंतरही तीन स्टेज एकाच गिअरमध्ये चालवित त्याने रॅली पूर्ण केली. याबरोबच तो एकुण क्रमवारीत तिसरा, तर थायलंडचा नॅव्हीगेटर मिनील थान्याफात एकुण क्रमवारीत पहिला आला.

रविवारी थायलंडमधील चांताबुरी प्रातंमधील पाँग नाम रॉन येथे ही रॅली झाली. गेल्या मोसमातील अखेरची चौथी फेरी यंदा झाली. त्यात सहाव्या स्टेजला संजयच्या इसुझी डीमॅक्स युटीलीटी कारचा क्लच पंप बिघडला. त्यामुळे त्यांना 38 किलोमीटर अंतर दुसऱ्या गिअरमध्येच कार चालवावी लागली. त्यामुळे त्यांची दीड मिनिटे वाया गेली. ती स्टेज पूर्ण केल्यानंतर सर्व्हिसिंगमध्ये बिघाड दुरुस्त करून त्यांनी सातवी स्टेज सुरु केली. त्यात त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची वेळ नोंदविली. आठव्या स्टेजला आत्मविश्वासाने सुरवात केल्यानंतर इंजिन माऊंट एका बाजूला कलल्यामुळे हाड्रॉलीक क्लच पंप तुटला. ही स्टेज त्यांना तिसऱ्या गिअरमध्ये चालवावी लागली. नववी स्टेजही त्यांना अशाच प्रकारे चालवावी लागली. त्यात स्टेजपूर्वी त्यांना कार पुश स्टार्ट म्हणजे ढकलून सुरु करावी लागेली.

संजयने फॉरेन ओपन फोर बाय फोर गटात सातवे स्थान मिळविले. मालिकेतील तीन फेऱ्या पूर्ण केल्यामुळे संजयला एकूण क्रमवारीसाटी पात्र ठरला आले. त्याच्यापेक्षा पुढे असलेल्या इतर स्पर्धकांनी दोनच फेऱ्या केल्या होत्या.

रेकीपूर्वीच रॅली

संजयसाठी मोसमाची सुरवात नाट्यमय झाली. आईसलँडहून परतल्यानंतर संजयला जेमतेम दोन दिवसांचा ब्रेक मिळाला. मुंबईहून बँकॉकला शनिवारी मध्यरात्री दोन वाजता सुटणारे विमान दीड तास उशीरा निघाले. दरम्यान, त्याने मिनीलशी संपर्क साधला होता. बँकॉकमध्ये सकाळी सव्वा नऊ वाजता लँडींग झाल्यानंतर व्हीसाची प्रक्रिया पूर्ण करून तो बाहेर आला. मिनील रॅली एसयुव्ही फोर बाय फोर घेऊन सज्ज होता. सकाळी दहा वाजता मिनीलने चांताबुरीसाठी स्टार्टर मारला. 290 किलोमीटर अंतर त्यांनी तीन तासांत पार केले. दुपारी एक वाजता ते पोचले. रेकीची वेळ सकाळी 11 ते दोन अशी होती. तेथे विचाई वात्ताहाविशुथ तेथे रोड बुक घेऊन उपस्थित होते. ते घेऊन संजयने रेकी सुरु केली. तिन्ही स्टेजमधून एकदा जात मिनीलने पेस नोट्स घेतल्या. त्यांना दुसरी फेरी पूर्ण करण्याइतका वेळ मिळाला नाही. तीन तासांची रेकी एका तासात पूर्ण करीत ते दुपारी दोन वाजता होणाऱ्या स्पर्धकांच्या बैठकीच्या ठिकाणी जायला निघाले. त्यांना दहा मिनिटे उशीर झाला.

या बैठकीनंतर सायंकाळी चार वाजता रॅलीचे औपचारीक उद्घाटन झाले. ते सायंकाळी साडेपाच वाजता पूर्ण झाले. त्यानंतर हॉटेलवर जात संजयने अखेर भोजन केले. रविवरी सकाळी सात वाजता रॅल सुरु होणार होती. तिन्ही स्टेज प्रत्येकी तीन वेळा पूर्ण करायच्या होत्या. एकूण नऊ स्टेज होत्या.

रॅलीनंतरही कसोटी

ही रॅली झाल्यानंतर संजय सोमवारी भारतात परतणार होता, पण कार दुरुस्त झाली नव्हती. त्यामुळे तो संघाच्या मदतीसाठी थांबला. त्यासाठी त्याने विमान तिकीटाची तारीख बदलली.

संजय म्हणाला की, विचाई वात्ताहाविशुथ यांचा संघ माझ्यासाठी बरीच मेहनत घेतो. त्यामुळे कार बिघडली असताना त्यांना असे मध्येच सोडून परत येणे मला योग्य वाटले नाही.

मागील वर्षी झालेल्या दोन फे-या त्याला तांत्रिक बिघाडामुळे पुर्ण करता आल्या नव्हत्या.