Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मधु पोतदार, सुजाता देशमुख, देविदास देशपांडे, यंदाच्या ‘मराठी रत्न’ पुरस्काराचे मानकरी

Date:

पुणे-विविध प्रकारच्या मराठी साहित्याच्या निर्मितीतून मराठी साहित्य सेवा करणार्‍या लेखक/पत्रकारांना मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्काराने सन्मानीत केले जाते. यंदा मधु पोतदार, सुजाता देशमुख आणि देविदास देशपांडे यांना‘मराठी रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महाकवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन जागतीक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुढील महिन्यात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. 5 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी सुधीर गाडगीळ, मुकुंद संगोराम, सुलभा तेरणीकर, प्रभाकर खोले, चारुहास पंडीत, प्रभाकर वाडेकर, सतिश कामत, प्रल्हाद सावंत, श्रीधर लोणी, अद्वैत मेहता, डॉ. शैलेश गुजर, मृणालिनी ढवळे, राजीव साबडे अशा अनेकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

         मधु पोतदार यांची 14 मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक दैनिके व नियतकालिकातून त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून नोकरी सांभाळत असतानाच काव्य, कथालेखन, प्रवासवर्णन,पत्रलेखन, इतिहासासंबंधी लेखन, चरित्रे, एकांकिका, आत्मचरित्रे (शब्दांकन) असे विविध प्रकारचे साहित्य त्यांचे प्रकाशित झाले आहे. चित्रपट व संगीत विषयक व्यक्तीरेखांचे जीवनचरित्र लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. गीतयात्री गदिमा, छिन्नी हातोड्याचा घाव (संगीतकार राम कदम यांचे आत्मकथन), विनोदवृक्ष (विनोदमूर्ती वसंत शिंदे यांचे आत्मकथन), वसंतवीणा (संगीतकार वसंत देसाई यांचे चरित्र), कुबेर (मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे चरित्र), वसंतलावण्य (संगीतकार वसंत पवार यांचे चरित्र), जनकवी पी. सावळाराम, मराठी चित्रपट संगीतकार कोश ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. ‘छिन्नी हातोड्याचा घाव’, ‘कुबेर’, ‘वसंतलावण्य’ या पुस्तकांना राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गीतकार जगदीश खेबूडकर, मराठी चित्रपट गीतकार कोश, मराठी चित्रगीते व भावगीते यांच्या आठवणी ही त्यांची आगामी प्रकाशने आहेत.

     सुजाता देशमुख या मेनका प्रकाशनामध्ये ग्रंथसंपादक आणि माहेर मासिकात कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी अनुवाद केलेल्या ‘गौहरजान म्हणतात मला’ या मराठी अनुवादित पुस्तकास साहित्य अकादमीचा 2017 चा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी राजहंस प्रकाशनमध्ये ग्रंथसंपादक, ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकात कार्यकारी संपादक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नालिझम येथे कोर्स को-ऑर्डिनेटर आणि व्याख्याती,युएनआय, इंडियन एक्सप्रेस, दिनमान, विशाल सह्याद्री, श्रमिक विचार आदी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केले आहे. याशिवाय आकाशवाणीवर मराठी बातम्या देणे, ई टीव्हीमध्ये ‘सखी’ कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. त्यांची आतापर्यंत 9 पुस्तके प्रकाशित झाली असून यातील 8 पुस्तके अनुवादीत आहेत. या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची नवीन अनुवादित पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.

      देवीदास देशपांडे हे तरुण पत्रकार असून महाराष्ट्र सरकारचा 2016 चा राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया पुरस्कार’ त्यांना नुकताच मिळाला आहे. मराठीत आरंभीच्या काळापासून ब्लॉगलेखन करणार्‍या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. बीबीसी व बीबीसी हिंदी सह अनेक मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले असून मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराती, फे्रंच, संस्कृत या भाषा त्यांना येतात. ‘फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग’ आणि ‘जागतिकीकरणाची बदलती भाषा’ ही त्यांची मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून ‘शनिवारवाडा’ हे अनुवादीत इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. सध्या ते ऑर्गनायझर साप्ताहिकासाठी पुण्यातून लेखन करतात तसेच केरळमधील ‘सम्प्रति वार्ताः’ या संस्कृत वृत्त पोर्टलसाठी लेखन करतात. इंडिया अब्रॉड, स्वदेश व पांचजन्य (हिंदी) या वृत्तपत्रांबरोबरच अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याच बरोबर याहू, जम्मूकाश्मीरनाऊ.कॉम (इंग्रजी), प्रवक्ता.कॉम (हिंदी), मॅगआयटी (फे्रंच), रिडीफ.कॉम, लोकसत्ता. कॉम (मराठी), आणि दिनमलर.कॉम (तमिळ) इत्यादी संकेतस्थळासाठी लेखन करतात. ’माझी भाषा – भविष्याची भाषा’ हे त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रचनात्मक कामावर भर दिला जातो. मराठीत सही करणे, दारावरील पाटी मराठीत करणे, मराठी शुभेच्छा पत्र पाठवणे, शक्य तेथे मराठीतच बोलणे, ‘माध्यम रत्न पुरस्कार’ ‘मराठी रत्न पुरस्कार’ असे विविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे गेली 17 वर्ष सुरू आहेत असे मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....