शेतकरी वाचवा देश वाचवा अन्न दाता गुढी
फर्ग्युसन महाविद्यालयाचा पदवीग्रहण समारंभ संपन्न
टिळक अभिरुप न्यायालय स्पर्धेत आयएलएस विजयी
पुणे, ता. १९ ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस श्री. नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक अभिरुप न्यायालय स्पर्धेत आयएलएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. अनहिता के, समर्थ सक्सेना, आयुष अभिनव यांनी प्रतिनिधित्व केले. चौदा महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
बेंगलोरच्या स्कूल ऑफ लॉ, ख्रिस्ट यूनिव्हर्सिटीने दुसरा क्रमांक मिळविला. लुईस उन्नी, प्रियांका देशमुख, अंकिता होरो यांनी प्रतिनिधित्व केले. आयएलएसच्या समर्थ सक्सेनाला बेस्ट ऍडव्होकेट आणि केईएस लॉ कॉलेज, मुंबईच्या स्वेजत दाहो, राहुल मिश्रा, किंजल यांना बेस्ट मेमोरियलने गौरविण्यात आले.
न्यायमूर्ती हॉसबेट सुरेश यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विधी क्षेत्रात करिअर करण्यासाठी कायद्याचे सखोल ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची क्षमता आवश्यक असल्याचे मत ऍड. कर्णिक यांनी व्यक्त केले. प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रताप साळुंके, स्वरुप वाघमारे, पलटक अरोरा, रोहन निकजे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पुण्यात प्रथमच दंतोपचारासाठी नेव्हीडेंट-‘नेव्हीगेशन इंप्लांटोलॉजी’ तंत्र
पुणे: नवीन दात बसविण्यासाठी अचूक नेव्हीगेशन करून डॉक्टरांना मदत करणारे ‘नेव्हीगेशन इंप्लांटोलॉजी’ (नेव्हीडेंट) तंत्र प्रथमच पुण्यात आल्याची माहिती डॉ. संजय जैन (दंत चिकित्सक, पीरियोडोंटिस्ट आणि इम्प्लॉँटोलॉजीस्ट) यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
जुन्या पद्धतीनुसार दंत चिकित्सक दात बसविताना डॉक्टरांचे कौशल्य आणि अंदाज महत्वाचा ठरत असतो. प्रत्येक रुग्णाच्या जबड्याचा, दातांचा आकार, ठेवण, खोली, कोन वेगळी असते. त्याप्रमाणे नवे दात बसवावे लागतात. त्यात काही प्रमाणात माप आणि जागेच्या चुका होऊ शकतात.
मात्र, ‘रियल टाईम डायनॅमिक नेव्हीगेशन’ तंत्राने इंप्लांट बसविताना दात अचूकपणे बसवता येतो.
तपासणीसाठी तोंडात ‘थर्मोप्लास्टिक स्टेंट’ टाकून तपासणी केली जाते. त्यामुळे जबडा, दात या बद्दलच्या सर्व गोष्टी सिटी स्कॅन केल्याप्रमाणे संगणकावर दिसतात.
या तंत्राद्वारे इंप्लांट उपचार करताना प्रथम तपासणी केली जाते. त्याठी रुग्णाच्या जबड्यात ‘नेव्हीस्टेंट’ बसवला जातो. त्याद्वारे सीटी स्कॅन होते, आणि जबड्याची रचना, दात, ठेवण यांचे अचूक मोजमाप उपलब्ध होते. ही माहिती संगणकावर दिसते आणि उपलब्ध होते. त्या माहितीनुसार नवे दात करणे, बसवणे सुलभ होते.
हे तंत्र आणि नेव्हीगेशन मशिन भारतात प्रथमच पुण्यात आणले असून, डॉ. संजय जैन त्याद्वारे उपचार करीत आहेत. तसेच डेंटल इंप्लांट शस्त्रक्रियेत सॅटेलाईट आणि जीपीआरएस (GPRS) ची मदत होणार आहे, त्यामुळे कोणतेही रेडिएशन आणि एक्स रे काढावा लागणार नाही.
आत्तापर्यंत या नेव्हीगेशन तंत्राने त्यांनी 25 रुग्णांवर इंप्लांट उपचार केले आहेत. या क्रांतीकारक तंत्राने ’इंप्लांट डेन्टीस्ट्री’ ही उपचारपद्धती पूर्णपणे बदलणार असल्याची माहिती डॉ. संजय जैन यांनी दिली.
या तंत्राचे उपचार तुलनेने महाग नाहीत. वेळेतही बचत होते, असे त्यांनी सांगितले. ‘क्लॅरॅनॉव’ कंपनीचेे हे नेव्हीगेशन मशिन आहे. ‘नेव्हीडेंट’ असे या मशिनचे नाव आहे.
हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे पाचपीर दर्गाह ४३८ वा उरूस
पुणे- लष्कर भागातील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद शाह रहे पाचपीर दर्गाह ४३८ वा उरूस सर्वधर्मियांनी एकत्रित येउन उत्साहात साजरा करण्यात आला . या उरुसामध्ये संदल शरीफ , उर्स शरीफ , जियारत आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले . यावेळी शाहिद अजमेरी व मेहमूद निजामी यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला . त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला . यावेळी शेरा चढविण्यास भाविकांनी गर्दी केली होती .
या उरुसाचे आयोजन करण्यासाठी दर्गाहचे खादिम जयकुमार राघवाचारी , योगेश चव्हाण , अमर शेख पुणेकर , गणेश राघवाचारी , रोहित चिंडालिया , नासिर शेख , निजाम शेख , विजयन जोजफ , रविंद्र वाल्मिकी , सुरेश वर्मा , सोमेश खरात , महेश मोरे , हुसेन शेख , निलेश जाधव , स्वप्नील सकट आदींनी केले होते.
या उरुसामध्ये प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रशांत जगताप , नगरसेवक अविनाश बागवे , शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट विभागप्रमुख अमोल देवळेकर , अर्शद अक्कलकोटकर , प्रकाश बहिरट , पोपट गायकवाड , मन्नू कागडा , पप्पू सलुजा , तुषार त्रिवेदी , कैलाशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपा नगरसेवकांचा ,खरा सामना प्रशासनाशी ..
आणि यातच त्यांची आमची भेट झाली ..
……… बालवडकरांची हि एकट्याची व्यथा निश्चित नाही , पण एकीकडे अधिकाऱ्यांना धमकावून , त्यांना लाथा घालून कामे करवून घेणारे च नाही तर बेकायदा कामांवर कारवाई करू नये म्हणून धाक ठेवणारे काही महाभाग नगरसेवक ही याच महापालिकेत आहेत … मग या सर्वांनी असेच महाभाग बनण्याची वाट प्रशासनातील कदाचित काही धेंडं पाहत असावीत असेच अशा घटनांनी दिसून येते .
वर्षपूर्ती होत असताना वचननाम्यातील बहुतांश कामांची पूर्तता -महापौर मुक्ता टिळक
रस्तारुंदीकरणसाठी खा. शिरोळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट
पुणे-जुन्या पुणे मुंबई मार्गावरील “पुणे मेट्रो आणि बीआरटी” मार्गाच्या निर्मितीसाठी प्रस्तावित विस्तारीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी संरक्षण खात्याच्या जमिनीवरील कामास (संपादन आणि विस्तारीकरण) तातडीने मंजुरी मिळावी याकरिता केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच संरक्षण सचिव बरून मित्रा ह्यांची आज दिल्लीत संसदीय अधिवेशन दरम्यान भेट घेऊन ह्यासंबंधी विनंती करणारे पत्र दिल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. ” शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपयुक्त अशा पुणे मेट्रो आणि बीआरटी ह्या कामांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शहरी विकास विभागाकडून ह्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाकडेवाडी ते हरीस पूल ह्या मार्गावरील एकूण ५.७ किलोमीटर अंतरामधील २.२ किलोमीटर अंतर हे संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीत येत आहे. त्यामुळे ह्या कामाची पूर्तता लवकरात लवकर होण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना आज भेटून पत्रासाहित विनंती केली असल्याचे शिरोळे ह्याप्रसंगी बोलताना म्हणाले.
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाजवळ ‘गंगाजल ‘ पुण्यात निवडणूक उधळली (व्हिडीओ)
पुणे-जिल्हाधिकारी, आणि पोलीस आयुक्तालय अगदी हाकेच्या अंतरावर , सीआयडी , विधान भवन अशी नामांकीत कार्यालये जवळ जवळ असताना … येथील सहकार भवन मध्ये होणारी राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची अवघ्या २१ संचालकांमध्ये होणारी निवडणूक चक्क कायदा सुव्यवस्थेचे कारण देत आज स्थगित कार्यात आली . सहकार संघाचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी हि निवडणूक कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे . बहुमत भाजपकडे नव्हते म्हणून 2 आमदारांसह काहींनी या ठिकाणी धुमाकूळ घालवून हि निवडणूक पराक्रीया उधळवून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे .अजय देवगण याच्या गंगाजल चित्रपटात ठेका सुंदर यादव ला मिळविण्यासाठी फार मोठी हाणामारी करावी लागते असे कथानक आहे . पण येथे केवळ खुर्च्या उचलून फेकल्या , टेबल आडवे तिडवे केले कि दहशत पसरते आणि अधिकारी ,पोलीस गाशा गुंडाळतात कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती झाल्याचे समजते आहे .
(दरम्यान निवडणूक प्रक्रिया दरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने निवडणुकीस गालबोट लागले आहे. या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले यांनी रिव्हॉल्व्हर दाखवण्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील, तसेच विद्यमान संचालिका सुनीता माळी यांनी आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला, असा आरोप पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्याठिकाणी खुर्च्या आणि टेबल तोडण्यात आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि संजीव कुसाळकर यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात निवडणूक झाली होती. दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनेलने आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला. )
तर राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज (सोमवारी) निवडणूक होती. मात्र, निवडणूक सुरु झाल्यावर आमदार दरेकर, लाड तसेच नलावडे यांनी मतपेट्या फेकत खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. बहुमत नसल्याने निवडणूक हरल्याच्या भीतीने निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आज कॉंग्रेस भवन मध्ये आलेल्या 11 सदस्यांनी केला.आमच्याकडे 11 सदस्य होते तर आमदारांच्या कडे १० सदस्य होते. आता निवडणूक उधळून लावून आमच्या वर दबाव आणून आमचे संख्याबळ कमी करण्यासाठी हे डावपेच करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलिसांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष मोडतोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर निवडणूक अधिकारी यांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत हि निवडणूक स्थगित करून पोबारा केला . असे हि त्यांनी सांगितले …पहा कॉंग्रेस भवनात येवून या 11 जणांनी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या समवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय सांगितले …
मिलिंद एकबोटेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणा-यास अटक
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलींद एकबोटे यांना पुणे कोर्टाच्या परिसरात काळे फासण्याच्या प्रयत्न करणा-या तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. संजय हरिदास वाघमारे (रा.अप्पर इंदिरा नगर) असे त्याचे नाव असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरक्षिततेची..स्वयंशिस्तीची,सतर्कतेची,नियमांची..गुढी
संकेत देशपांडे, पुण्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जर तरुणाईने पुढाकार घेतला, तर निश्चितच मोठा बदल दिसू शकतो. त्यामुळे तरुणाईला सोबत घेऊन सुरक्षित वाहतुकीची गुढी उभारण्यात आली आहे. मैत्र युवा फाऊंडेशनच्या २७ शाखा पुण्यात आहेत. या शाखेतील मुले-मुली प्रत्येक शनिवार आणि रविवार २ तास वाहतूक पोलिसांसोबत काम करुन त्यांना वाहतूक नियंत्रणाकरीता मदत करतील, असेही त्यांनी सांगितले.
फिनीक्स मॉल मध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला- राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आंदोलनानंतर मॉल व्यवस्थापनाने मागितली माफी
रक्तदानाने गुढी पाडव्याला नव वर्षाचे स्वागत !
चंदुभाई शहा यांना जीवनगौरव देणार
अॅड. एस. के. जैन, प्रमिला साकला, इंदर जैन व विशाल चोरडिया यांना पुरस्कार जाहीर
पुणे : जीतो पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार चंदुभाई शहा यांना देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अॅड. एस. के. जैन, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रमिला साकला, उद्योग क्षेत्रातील उल्लेखणीय कार्याबद्दल इंदर जैन व तरुण उद्योजक म्हणून विशाल चोरडिया यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी व मुख्य सचिव नरेंद्र छाजेड यांनी याविषयी माहिती दिली. येत्या 29 मार्चला (गुरुवार) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा समारंभ सायंकाळी 6 वाजता होणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून कार्यक्रमास आमदार माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नवीन पिढीला आपली परंपरा व आपले संस्कार माहिती व्हावेत यादृष्टीकोनातून शास्त्राला अनुसरुन असलेला राहुल कपूर यांचा चरण स्पर्श कार्यक्रम यावेळी होणार आहे. तसेच, समाजाने समाजासाठी उभारत असलेल्या जीतो नगर प्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ यावेळी होणार आहे, असेही विजय भंडारी व नरेंद्र छाजेड यांनी सांगितले.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे मुर्खांचा बाजार – चेतन तुपे पाटील
पुणे-
पैसे कमी असल्याचे कारण पुढे करून विकास कामांना कात्री लावण्याचा प्रकार सुरू असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 337.50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 21 प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांना प्रशासनानेच फसवले असून, ही महापालिका एक सर्कस, बनली असून सत्ताधारी नगरसेवक जोकर आणि आयुक्त रिंगमास्तर बाले आहेट. या नगरसेवकाचे हेडमास्तर यांचाही अभ्यास कमी पडतो आहे . पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे मुर्खांचा बाजार झाल्याची जहरी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केली आहे .
25 कोटी रुपये नाहीत, म्हणून गरीबांच्या योजनांना कात्री लावली जाते. दुजाभाव करत विरोधकांना कमी तरतूद दिली गेली. कायमच पैसे कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. अशावेळी 337.50 कोटी रुपयांची गुंतवणूक महापालिका करत आहे. महापालिकेकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे असताना त्यांनी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे का काढले? असा प्रश्नही तुपे यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असून, ते सुधारण्याला तयार नाहीत, तर आम्हांलाच आता यांची लाज वाटत आहे, अशी टीकाही तुपे यांनी केली. 337 कोटी रुपयांचा वापर अनेक ठिकाणी करता आला असता, अंदाजपत्रकाला कात्री लावण्याची गरजच पडली नसती. सत्ताधाऱ्यांनी विकासाचा नवा फंडा काढला असून, सावकरी धंदा करताना कर्ज काढून गुंतवणूक केली जात आहे. या मूर्खपणाला ते शाश्वत विकास म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे, असेही तुपे म्हणाले.
सत्ताधारी हे गोंधळलेले आणि भांबावलेले आहेत. ही महापालिका आहे, की सर्कस सुरू आहे तेच कळत नाही. सत्ताधारी हे सर्कशीतील जोकर वाटत आहेत. भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी 100 कोटी रुपये पीएमपीएमला देण्याविषयी बोलले होते. त्यामुळे त्यांनी हे 300 कोटी रुपये आता पीएमपीएमएलसाठी वापरावेत, असेही तुपे यांनी सूचवले आहे. याबाबत गोगावलेंचा अभ्यास कमी पडत असेल तर त्यांनी विरोधकांचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोमणाही तुपे यांनी मारला आहे. त्यामुळे कोणालाही निवडून द्या परंतु या मुर्खांना नको, असे आवाहनही तुपे यांनी पुणेकर नागरिकांना केले आहे.
नेमके पहा आणि ऐका ..तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ……


