पुणे-
पैसे कमी असल्याचे कारण पुढे करून विकास कामांना कात्री लावण्याचा प्रकार सुरू असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 337.50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 21 प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांना प्रशासनानेच फसवले असून, ही महापालिका एक सर्कस, बनली असून सत्ताधारी नगरसेवक जोकर आणि आयुक्त रिंगमास्तर बाले आहेट. या नगरसेवकाचे हेडमास्तर यांचाही अभ्यास कमी पडतो आहे . पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे मुर्खांचा बाजार झाल्याची जहरी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केली आहे .
25 कोटी रुपये नाहीत, म्हणून गरीबांच्या योजनांना कात्री लावली जाते. दुजाभाव करत विरोधकांना कमी तरतूद दिली गेली. कायमच पैसे कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. अशावेळी 337.50 कोटी रुपयांची गुंतवणूक महापालिका करत आहे. महापालिकेकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे असताना त्यांनी 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे का काढले? असा प्रश्नही तुपे यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या बुद्धीची कीव येत असून, ते सुधारण्याला तयार नाहीत, तर आम्हांलाच आता यांची लाज वाटत आहे, अशी टीकाही तुपे यांनी केली. 337 कोटी रुपयांचा वापर अनेक ठिकाणी करता आला असता, अंदाजपत्रकाला कात्री लावण्याची गरजच पडली नसती. सत्ताधाऱ्यांनी विकासाचा नवा फंडा काढला असून, सावकरी धंदा करताना कर्ज काढून गुंतवणूक केली जात आहे. या मूर्खपणाला ते शाश्वत विकास म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे, असेही तुपे म्हणाले.
सत्ताधारी हे गोंधळलेले आणि भांबावलेले आहेत. ही महापालिका आहे, की सर्कस सुरू आहे तेच कळत नाही. सत्ताधारी हे सर्कशीतील जोकर वाटत आहेत. भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी 100 कोटी रुपये पीएमपीएमला देण्याविषयी बोलले होते. त्यामुळे त्यांनी हे 300 कोटी रुपये आता पीएमपीएमएलसाठी वापरावेत, असेही तुपे यांनी सूचवले आहे. याबाबत गोगावलेंचा अभ्यास कमी पडत असेल तर त्यांनी विरोधकांचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोमणाही तुपे यांनी मारला आहे. त्यामुळे कोणालाही निवडून द्या परंतु या मुर्खांना नको, असे आवाहनही तुपे यांनी पुणेकर नागरिकांना केले आहे.
नेमके पहा आणि ऐका ..तुपे पाटील यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ……