Home Blog Page 3156

अध्यक्षपदी अमृता सुरेश गडगे

0

पुणे-श्री संत संत सावतामाळी युवक महाराष्ट्र राज्य संघाच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षपदी अमृता सुरेश गडगे यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र श्री संत संत सावतामाळी युवक महाराष्ट्र राज्य संघाच्या पुणे शहर महिला आघाडी संपर्क प्रमुख अनुराधा गणपत गडगे यांनी दिले .

          अमृता सुरेश गडगे या शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी येथे राहत असून त्या सावित्री फोरम या सामाजिक संस्थेत काम केले आहे . तसेच अनेक सामाजिक संस्थेत त्या कार्यरत आहेत . श्री संत संत सावतामाळी युवक महाराष्ट्र राज्य संघाच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष या पदाच्या माध्यमातून आपण समाजासाठी कार्य करणार असल्याचे अमृता सुरेश गडगे यांनी आपल्या नियुक्तीनंतर सांगितले .

पश्चिम भारतातील उत्तम बी स्कूल्सच्या यादीमध्ये सुर्यदत्त इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट पहिल्या ४ क्रमांकात

0

दिल्ली-

 विद्यार्थ्याना  उच्च शिक्षण देण्यामागे उत्तम माणुस व आदर्श नागरिक   तसेच जागरुक समाज बनविणे  हे प्राथमिक  उद्दिष्ट आहे.शिक्षणाचा हेतू आणि गेली अनेक वर्षे त्या मध्ये झालेले  सकारात्मक बदल  या विषयावर प्रसिध्द  कलावंत शेखर सुमन यांनी आपले मत मांडले. नुकत्यात दिल्ली येथै झालेल्या एका समारंभात जागरण डॉट कॉम आणि कन्टार टी एन स या जागतिक  संशोधन संस्थेने  पुण्यातील सुर्यदत्त इन्स्टीट्यूट ऍाफ मॅनेजमेंटला  पश्चिम भारतातील उत्तम  बी स्कूल्सच्या यादीमध्ये पहिल्या चार मध्ये स्थान   मिळाल्याबद्दल प्रसिध्द अभिनेते,  निर्माते व दिग्दर्शक  शेखर सुमन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार जागरण जोसचे कार्यकारी संचालक भरत गुप्ता यांच्या  उपस्थितीमध्ये  प्रमाणपत्र व  स्मृतीचिन्ह या स्वरुपात देण्यात आला. हा पुरस्कार सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे  संस्थापक व अध्यक्ष प्रा.संजय चोरडिया यांनी स्विकारला.

 हा पुरस्कार स्विकारल्यावर डॉ.संजय चोरडीया म्हणाले  सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट  ही नेहमीच दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासावर भर    देऊन शिक्षण  देणारी पध्दती अमलात आणत असते.  आता जगभरात व्यवस्थापन हे शिक्षणप्रवाह आणि प्रशिक्षण  हे उत्तेजन   देणारे  मोजमाप म्हणून मानले जाते.सुर्यदत्त ग्रुप ही    चांगली उदयास आलेली व  नावाजलेला उत्तम ब्रॅन्ड  ,दर्जेदार व्यवस्थापन शिक्षण देणारी  व औद्योगिक  नेतृत्व असलेली शैक्षणिक संस्था आहे. नवकल्पना असलेले अभ्यासक्रम,सामाजिक ,भौगोालिक  व बहुभाषिय हायब्रीड ग्रुपचे फायदे  देऊन महत्वाकांक्षी व आकाशात उंच भरारी घ्यावयाची आहे अशा  विद्यार्थ्यांना कॅार्पोरेट जगताकडे चढाई  करण्यास प्रोत्साहित करणारी आहे.

 विद्यार्थ्यांच्या  सर्वागीण विकासासाठी  माफक  दरात    दर्जेदार शिक्षण देणे व स्वयम सारख्या  सरकारने सुरु केलेल्या आधुनि कतंत्रज्ञानाचे  महत्व या विषयी  माहिती डॉ.सजय चारेडीया यांनी दिली.सुषमा चोरडीया यांनी सुर्यदत्तला   प्राप्त झालेल्या उत्तम श्रेणीबद्दल सर्व  प्राध्यापक व कर्मचार्‍यांचे   अभिनंदन केले.

नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे दि. 25- नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे अश्वासन महसूल, मदत व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे, नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहसचिव शामसुंदर पाटील, सह नोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे, अप्पर मुद्रांक नियंत्रक सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या विकासासाठी राज्याचे आर्थिक उत्पन्न महत्वाचे असते. नोंदणी व मुद्रांक विभागाने 2017-18 या वर्षात विक्रमी 26 हजार 494 कोटी रुपयांचा महसूल जमा करुन गौरवास्पद काम केले आहे. त्याबद्ल नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन ही श्री पाटील यांनी यावेळी केले.

श्री पाटील पुढे म्हणाले, या विभागात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे दिलेल्या उद्दीष्टा पेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजर्षी शाहु महाराजांच्या काळात जनतेच्या गरजा व समस्या ते सहज ओळखत असत. नागरिकांच्या गरजा आणि समस्या तसेच अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासन प्रसत्नशील आहे.

यावेळी श्री कवडे यांनी मुदांक व नोंदणी शुल्क विभागाच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्रीमती बोंदार्डे यांनी केले.

नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक सोन्नाप्पा यमगर, सह दुय्यम निबंधक तानाजी गंगावणे, सह जिल्हा निबंधक अनुक्रमे विजय भालेराव ,गोविंद कराड, अनिल पारखे, नगर रचना सहसंचालक सुधाकर नांगनुरे, यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

मुंद्रांक विभागाचे सर्व विभागीय तसेच जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल यादव यांनी केले तसेच आभार नोंदणी उपमहानिरीक्षक सुप्रिया करमरकर यांनी मानले.

अहंकार बाळगाल, तर सत्ता गमवाल; शत्रुघ्न सिन्हा यांचा इशारा

0

पुणे : भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी असं चित्र दिसत असल्याचं सांगत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. बदल होणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व बाळगाल तर उद्ध्वस्त व्हाल, असा  इशाराही त्यांनी दिला. तर कॉंग्रेसचे  खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला. रिझर्व्ह बँक, नोटाबंदीचा निर्णय, रघुराम राजन यांचा राजीनामा या सर्वच मुद्यांवरुन त्यांनी मोदींवर तोफ डागली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अवमूल्यन केलं. त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन हेराफेरी केली,’ असा थेट आरोप त्यांनी केला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणउपस्थित होते.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले ,’मी भारतीय जनता पक्षाआधी भारतीय जनतेचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चांगले लोक राजकारणात यायला तयार नसतील तर त्यांना वाईट प्रशासनाच्या राज्यात जगावं लागतं. त्यामुळेच मी राजकारणात आलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपने आधीच नोटबंदी करून लोकांना कडुनिंबाची चव चाखायला लावली आता तर त्यावर कारले चढवून जीएसटीसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीची भेट दिला उच्चार त्यांनी केला.लोक पंतप्रधानांना भेटू शकत नसले तरी आम्हाला मात्र निवडणुकीची आश्वासने कुठे गेली असा प्रश्न विचारत असल्याचा अनुभव सांगितला.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले, इथे हमीभाव मिळत नाही तर अधिक दर तर लांब आहेत असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या राजीनाम्यावरुन केतकर यांनी यावेळी मोदींवर तोंडसुख घेतलं. ‘ज्या रघुराम राजन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्यास भाग पाडलं ते आता बँक ऑफ इंग्लडचे प्रमुख होऊ शकतात,’ असा दाखला केतकर यांनी दिला. ‘मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील. त्यांच्यात आणि संघात दहशतीची स्पर्धा सुरू आहे,’ असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पानं पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये, असंही केतकर यांनी म्हटलं.

आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

0

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत सनसनाटी निकालाची नोंद केली.

 

आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या  फेरीत 8वर्षाखालील मिश्र गटात अव्वल मानांकित नामिश हूडने पृथ्वीराज दुधानेचा 5-3असा पराभव केला. आदित्य योगीने सहाव्या मानांकित आयुश पाटीलचा टायब्रेकमध्ये 5-4(6)असा पराभव केला. रिशिता पाटीलने तिसऱ्या मानांकित नीरज जोर्वेकरचा 5-3असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.

10 वर्षाखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग व रित्सा कोंडकर यांनी अनुक्रमे अनिष्का सुंदराम व नैशा कपूर यांचा 5-2अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदेने इरा कुंभारचे आव्हान 5-1असे मोडीत काढले.  10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत  तेज ओक याने दुसऱ्या मानांकित अर्चित धूतचा 5-1असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नामिश हूड(1)वि.वि.पृथ्वीराज दुधाने 5-3; रित्सा कोंडकर(4)पुढे चाल वि.स्वस्ती अगरवाल; विहान पटनी वि.वि.राम मगदूम 5-4(5); आदित्य योगी वि.वि.आयुश पाटील(6) 5-4(6); अमीन क्षितिज(7)वि.वि.श्रेय भूतरा 5-2; रिशिता पाटील वि.वि.नीरज जोर्वेकर(3) 5-3; सुजय देशमुख(5)वि.वि.प्रज्ञेश शेळके 5-4(4); आर्यन कीर्तने(2)वि.वि.मिहीर काळे 1-0सामना सोडून दिला;

10वर्षाखालील मुली: वैष्णवी सिंग वि.वि.अनिष्का सुंदराम 5-2; रित्सा कोंडकर(4)वि.वि.नैशा कपूर 5-2; प्रेक्षा प्रांजल वि.वि.साची मुंदडा 5-1; काम्या चोपडा वि.वि.सैशा शिंदे 5-0; काव्या देशमुख वि.वि.ईश्वरी पंडित 5-2; प्रिशा शिंदे(2)वि.वि.इरा कुंभार 5-1;

10वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी(1)वि.वि.वर्धन पोतदार 5-0; नील केळकर वि.वि.मल्हार देशपांडे 5-0; अनुज भागवत वि.वि.शुभांकर सिन्हा 5-3; नमिश हूड(7)वि.वि.वेद मोघे 5-3; अवनिश चाफळे(3)वि.वि.प्रज्ञेश शेळके 5-0; रोहन बजाज वि.वि.आरिन गद्रे 5-3;शिवांश कुमार वि.वि.वैष्णव दानावडे 5-0; समिहन देशमुख(5)वि.वि.आदित्य कामत 5-3; अमन शहा वि.वि.विश्वजीत सणस 5-; विहान तिवारी वि.वि.रियान माळी 5-2; पृथ्वीराज हिरेमठ(4)वि.वि.पृथ्वीराज दुधाने 5-2; कार्तिक शेवाळे(6)वि.वि.सुजय देशमुख 5-0; सनत कडाळे वि.वि.शौनक रणपिसे 5-0; श्रीराम जोशी वि.वि.ओंकार किंकर 5-1;तेज ओक वि.वि.अर्चित धूत (2) 5-1.

टाटा स्काय आणि नेटफ्लिक्सची हातमिळवणी

टाटा स्काय आणि नेटफ्लिक्स यांनी आज धोरणात्मक भागीदारी स्वीकारली आहे. भारतात करण्यात आलेल्या या भागीदारीमुळे, येत्या काही महिन्यांत, टाटा स्काय आणि नेटफ्लिक्स अशा दोन्हींच्या सबस्क्रिप्शनमुळे टाटा स्कायच्या व्यासपीठावरून जागतिक स्तरावरील संहिता आपल्यासाठी सुलभपणे उपलब्ध होणार आहे.

टाटा स्कायच्या सबस्क्राइबर्सना नेटफ्लिक्सची संपूर्ण सेवा, टीव्हीवरील कार्यक्रम, सिनेमे, माहितीपट, स्टँड अप कॉमेडी आणि लहान मुलांसाठीचे कार्यक्रम अशा सर्वच संहिता अगदी सहजपणे ब्राउज करता येणार आहेत. नेटफ्लिक्स सेवेत हजार तासांपेक्षा अधिकअल्ट्रा एचडी संहिता समाविष्ट आहे, टाटा स्कायच्या विस्तारीत उत्तम दर्जाच्या कार्यक्रमांसाठी हे पूरकच आहे.

या नव्या भागीदारीविषयी टाटा स्काय लिमिटेडचे एमडी आणि सीईओ, हरीत नागपाल म्हणाले की, “आमच्या सबस्क्राइबरसाठी आम्ही त्यांच्या मागणीनुसार जागतिक स्तरावरील संहिता सादर करतो, आमच्या या सेवेमध्ये नेटफ्लिक्सबरोबरच्या भागीदारीमुळे भरच पडणार आहे. सर्वप्रथम नावीन्यपूर्ण सेवा देण्याचे आमचे वचनही राखले जाणार आहे. या भागीदारीमुळे अन्य कुठल्या सेवा दिल्या जातील, हे आम्ही लवकरच जाहीर करू. आमच्या कुटुंबात नेटफ्लिक्सचा समावेश झाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, आमच्या सर्व सबस्क्राइबरना यापुढेही एक्स्ट्राऑर्डिनरी करमणुकीचा अनुभव देण्याकडे आमचे लक्ष राहील.’’

नेटफ्लिक्सच्या व्यवसाय विकासाचे जागतिक स्तरावरील प्रमुख बिल होम्स म्हणाले की, “एकाच छत्राखाली उत्तम संहिता देता यावी, यासाठी टाटा स्कायबरोबर भागीदारी केल्याचा आम्हांला आनंदच आहे. नेटफ्लिक्सबरोबरच्या या नव्या भागीदारीमुळे आणि त्यांच्या जगभरातील मूळ संहितांमुळे, टाटा स्कायच्या ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्वोत्तम करमणुकीचा आनंद अमर्यादितपणे घेता येणार आहे.’’

एस. व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत केलेली शेरेबाजी आक्षेपार्ह : खासदार वंदना चव्हाण

0

पुणे : भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडूतील नेते एस. व्ही. शेखर यांनी महिला पत्रकारांबाबत नुकतीच केलेली शेरेबाजी आक्षेपार्ह आहे. त्यातून भाजपच्या नेत्यांची महिलांबद्दल मानसिकता कशी आहे, हे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याचा तीव्र निषेध करीत आहे. अशी प्रतिक्रिया प्रसिध्द केलेल्या पत्रकात शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी दिली .

पत्रकार हा लोकशाहीतील चौथा महत्त्वाचा स्तंभ आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी झालेल्या जनजागरणात वृत्तपत्रांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे निकोप लोकशाहीसाठी सजग पत्रकार हा घटक महत्त्वाचा आहे, या वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विश्‍वास आहे.

महिलांच्या कर्तृत्त्वाला वाव मिळावा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली. विधानसभा आणि लोकसभेतही महिलांचा टक्का वाढला आहे. समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात महिला आज मागे नाहीत.

कर्तृत्त्वाची नवी नवी शिखरे त्या पादाक्रांत करीत आहेत. त्यात महिला पत्रकारांचाही मोठा सहभाग आहे. स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या वार्तांकनामुळे अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय मिळाला आहे. याची जाणीव राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाणीव आहे. त्यामुळेच महिला पत्रकारांबाबत भाजप नेते एस. व्ही. शेखर यांनी केलेल्या टीपण्णीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस तीव्र शब्दात निषेध करीत आहे. तसेच महिलांबाबत वक्तव्ये करण्याबाबत भाजपने आपल्या नेत्यांना समज द्यावी, असे आवाहनही यावेळी या प्रसिध्द केलेल्या पत्रकात शहराध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मद्वारे ट्रॅव्हलएक्सपी युकेच्या मुख्य बाजारपेठेत उतरणार, 91 दशलक्ष घरांत पोहोचणार

    जगातील आघाडीचे पर्यटनविषयक ट्रॅव्हलएक्सपी चॅनेल सोमवार ३० एप्रिल २०१८ पासून फ्रीव्ह्यू युके प्लॅटफॉर्मवर (चॅनेल #98) उपलब्ध होणार, १६ दशलक्ष टीव्ही फ्रीव्ह्यू घरांत पोहोचणार;  इंग्लंडमधील प्रमुख प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे ट्रॅव्हलएक्सपी हे पहिले भारतीय टीव्ही चॅनेल;इंग्लंडमधील स्थानिक कार्यालयाद्वारे इंग्लंडसाठी स्थानिक कंटेंटची निर्मिती करणार, डेस्टिनेशन, खाद्यपदार्थ, संस्कृती, निसर्ग, वारसा, जीवनशैली आणि इतर विविध लोकप्रिय विषयांवर कंटेंटची केली जाणार निर्मिती; इंग्लंडसाठीच्या आक्रमक विपणन योजनेमध्ये प्रमुख प्रवाहातील टीव्ही चॅनेल्स, इंग्लंडमधील बसेस, भुयारी मार्गावर डिजिटल बिलबोर्ड्स आणि सोशल मीडिया यांचा समावेश

 मुंबई – जगातील आघाडीचे पर्यटन विषयक आणि ७५ दशलक्ष घरांत पोहोचलेले चॅनेल तसेच प्रमुख प्रवाहातील प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण संस्कृतींवर आधारित कंटेट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्रॅव्हलएक्सपी चॅनेलने आणखी एका प्रमुख आंतरराष्ट्रीय टीव्हीबाजारपेठेत प्रवेश केला आहे.

प्रशांत चोथानी, मुख्य कार्यकारी अधिकारी – ट्रॅव्हलएक्सपी म्हणाले, सोमवार ३० एप्रिल २०१८ पासून ट्रॅव्हलएक्सपी फ्रीव्ह्यू डिजिटल टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजी (डीटीटी) प्लॅटफॉर्मद्वारे इंग्लंडमध्ये लाँच केले जाणार असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. इंग्लंडमध्ये बाजारपेठेतील हिश्श्याच्या बाबतीत व्यासपीठाला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेली आहे. आम्हाला खात्री आहे, की आमचे लोकप्रिय, उच्चभ्रू प्रवासविषयक मनोरंजक आणि माहिती- मनोरंजनावर आधारित कार्यक्रम किमान १६ दशलक्ष फ्रीव्ह्यू नोंदणीदारांना जोडेल. फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मशी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांच्यामुळे आम्हाला इंग्लंडमधील प्रेक्षकवर्गासाठी लाँच करण्यात आलेले पहिले भारतीय टीव्ही चॅनेल बनणे शक्य झाले. त्यांच्याबरोबर दीर्घकालीन परस्पर फायद्याची भागिदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

इंग्लंडमधील ९९ टक्के घरांत असलेल्या उपलब्ध असलेल्या फ्रीव्ह्यू प्लॅटफॉर्मवर ट्रॅव्हलएक्सपी लाँच झाल्याने जगभरात ट्रॅव्हलएक्सपी उपलब्ध असलेल्या घरांची ७५ दशलक्ष संख्येत १६ दशलक्षांची वाढ होणार आहे. २००८ नंतर इंग्लंडमध्ये तयार झालेल्या प्रत्येक टीव्हीमध्ये फ्रीव्ह्यूची ट्यूनरची सोय आहे, ज्यामुळे फ्रीव्ह्यूचे चॅनेल्स दाखवणे शक्य होते. याचे कामकाज डीटीव्ही सर्व्हिसेस लि. कडून हाताळले जाते. ही कंपनी बीबीसी, आयटीव्ही, चॅनेल फोर,स्काय आणि ट्रान्समिटर ऑपरेटर अरक्विवा यांच्यातील संयुक्त भागिदारी आहे.

ट्रॅव्हलएक्सपीद्वारे इंग्लंडच्या प्रेक्षकांसाठीही स्थानिक कंटेट तयार केला जाणार आहे. त्याचे नेतृत्व सुमंत बहल, व्यवस्थापकीय संचालक – युरोप, ट्रॅव्हलएक्सपी यांच्याद्वारे केले जाणार असून ते ग्रेटर लंडन कार्यालयातून ट्रॅव्हलएक्सपी, युकेची आघाडीही सांभाळतात.

 बहल म्हणाले, सर्व प्रकारच्या कंटेंट निर्मितीसाठी आम्ही ओळखले जातो. आमचा भर कायमच संपूर्ण प्रेक्षकवर्गावर असतो. आम्ही कधीच आमच्या व्याप्तीला मर्यादा पडतील अशाप्रकारे केवळ एखाद्या विशिष्ट समाजासाठी कंटेंट निर्मिती करत नाही. इंग्लंडमधील प्रेक्षकांसाठी आम्ही आमच्या १००० तासांच्या संग्रहालयातून जागतिक दर्जाचा सर्वप्यापी कंटेंट उपलब्ध करणार आहोतच, शिवाय इंग्लंडमध्येच तितक्याच आकर्षक कंटेंटची निर्मिती करणार आहोत. तेथील प्रेक्षकांसाठी डेस्टिनेशन, खाद्यपदार्थ, संस्कृती, निसर्ग, वारसा, जीवनशैली आणि इतर बऱ्याच प्रकारचा कंटेंटतयार केला जाणार आहे. अशाप्रकारे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेला कंटेंट इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या आवडीचा असेलच शिवाय आमच्या सातत्याने विकसित होणाऱ्या संग्रहालयातही त्यामुळे मोलाची भर पडेल.

 इंग्लंड विपणन योजना

आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर पर्यटनविषयक कंटेंटसाठी ट्रॅव्हलएक्सपीने आक्रमक विपणन योजना आखली असून त्याद्वारे इंग्लंडमधील प्रमुख प्रेक्षकवर्गावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या योजनेमध्ये प्रमुखप्रकारच्या टीव्हीवर टीव्ही कॅम्पेन्स आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये बसेस, भुयारी मार्गावर बिलबोर्ड्स, सोशल मीडिया या व इतर उपक्रमांचा समावेश असेल.

 पर्यटनविषयक कंटेंटची निर्मिती करणारा जगभरातील सर्वात मोठा एकमेव निर्माता

असामान्य पर्यटनविषयक कंटेंट आणि प्रसारण दर्जा असलेल्या ट्रॅव्हलएक्सपीचे प्रसारण व नेतृत्व प्रशांत चोथांनी सीएमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारीव व निशा चोथानी, संचालक व कंटेंटप्रमुख यांच्यातर्फे केले जाते. दोघांकडे मीडिया क्षेत्राचा ५५ वर्षांचा एकत्रित अनुभव आहे, ज्यामुळे २०११ मध्ये लाँच झाल्यापासून केवळ सात वर्षांच्या कालावधीत ट्रॅव्हलएक्सपी जगातील आघाडीचे पर्यटनविषयक चॅनेल बनले आहे.

ट्रॅव्हलएक्सपी विविध देशांत इंग्रजी, जर्मनी, झेक, स्लोव्हेनियन, सर्बेयन, क्रोएशियन आणि बल्गेरियन अशा स्थानिक भाषांतही उपलब्ध असून इतर बऱ्याच भाषांत सुरू केले जाणार आहे. भारतीय भाषांपैकी ते हिंदी, तमिळ व बंगालीमध्ये उपलब्ध असून जवळच्या भविष्यात इतर विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

कंपनकडे संपूर्णपणे स्वतःच्या मालकीच्या तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा आणि सर्वोत्तम दर्जाची उपकरणे असून त्याच्या सहाय्याने ट्रॅव्हलएक्सपीचा कुशल कर्मचारी वर्ग अतिशय दर्जेदार प्रोग्रॅमिंग तयार करतो आणि नवे जागतिक मापदंड प्रस्थापित करतो. गेल्याच आठवड्यात त्यांनी दोन नवे शो लाँच करत असल्याची घोषणा केली. त्यात थाली- द ग्रेट इंडियन मील आणि सिटी ब्रेक्स उझबेकिस्तान मालिका यांचा समावेश असून त्या सात जागतिक व तीन भारतीय भाषांत तयार केल्या जाणार आहेत.

ट्रॅव्हलएक्सपी हे फोरके एचडीआर तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक आघाडीवर असून चॅनेलवरील सर्व शोज कंपनीअंतर्गत तयार केलेले व जागतिक प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे असतात. इंग्लंडमध्ये फ्रीव्ह्यूवर लाँच होणे हे पर्यटन प्रेमींना पर्यटन आणि जीवनशैली क्षेत्रातील सर्वोत्तम देण्याचे आमचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून त्याद्वारे त्यांना घरहाबाहेर पडण्यासाठी आणि स्वतःहून जगाचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, असे चोथानी म्हणाले.

महाराष्ट्राची महती सांगणार “माझा महाराष्ट्र” हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे “माझा महाराष्ट्र” हे गीत होय. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. ज्यात साधना सरगम, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध साउंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते असून शांतनू रोडे यांनी या गीताचे दिग्दर्शन केले आहे. या गीताचे छायांकन आशुतोष आपटे यांचे आहे, तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले आहे. टाइम्स गृप हे गाणं प्रसिद्ध करत असून यशराज स्टुडिओ मध्ये हे गाणे तयार करण्यात आले आहे.

मूळचे नागपूरचे असलेले अभिजीत जोशी यांनी याआधी अनेक मराठी सिनेमांसाठी गीतकार- संगीतकार म्हणून काम केले आहे. यामध्ये “हरी ओम विठ्ठला”, “अगडबंब”, “कामापुरता विमा”, “सुपारी पालखी”, “जयजयकार”, “लक्ष्मी येई घरा”,  “हर हर महादेव” या चित्रपटांचा समावेश आहे. शंभरहुन अधिक अल्बम्स, जिंगल्स आणि चित्रपट मिळून तीनशेहुन अधिक गाणी अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे. सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांबरोबर अभिजीत यांनी काम केले आहे. शासनाच्या अनेक योजनांवर आधारित गाणीही अभिजीत यांच्या नावावर आहे. मा. मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अमृता फडणवीस यांचा समावेश असलेले “रिव्हर मार्च” हे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले गाणेदेखील अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे.

पिरामल हाउसिंग फायनान्सचा पुण्यामध्ये प्रवेश

~ 120 हून अधिक प्रकल्पांद्वारे व्यवसाय सुरू करणार ~

  • पुण्यातील सध्याच्या आघाडीच्या विकसकांशी असलेल्या घाऊक अर्थपुरवठा सहयोगाचा लाभ घेणार
  • विकसकांसाठी अगोदरच 3,250 कोटी रुपयांहून अधिक रकमेची घाऊक कर्जे मंजूर

पुणे: पिरामल हाउसिंग फायनान्स या पिरामल फायनान्सच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यामध्ये प्रवेश केल्याची घोषणा आज केली. पिरामल फायनान्स आपल्या घाऊक व्यवसायाद्वारे सन 2014 पासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. घाऊक व्यवसायाने विकसकांसाठी अगोदरच 3,250 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हाउसिंग फायनान्स व्यवसायाद्वारे कंपनी आता पुण्यातील विकसकांना गृहकर्जे, मालमत्तेवर कर्ज व बांधकामासाठी लहान प्रमाणात अन्य कर्जे उपलब्ध करून देणार आहेत.

घाऊक व्यवसायाचा आकार, प्रमाण व संबंध यांचा लाभ घेत, पिरामल फायनान्सने सध्याच्या घाऊक बिझनेसला पूरक ठरण्यासाठी किरकोळ (रिटेल) सेवा दाखल केली असून यामुळे आता रिअल इस्टेटमधील सर्व प्रकारची वित्तीय उत्पादने उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.

पिरामल हाउसिंग फायनान्स विशिष्ट गरजांनुसार उत्पादने तयार करून पुण्यातील घर ग्राहकांवर (पगारदार व स्वयंरोजगार असलेले असे दोन्ही ग्राहक) लक्ष केंद्रित करण्यासाठी डेव्हलपमेंट पार्टनरना मदत करणार आहे. हाउसिंग फायनान्स व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनीने विशिष्ट धोरण आखले असून हे धोरण म्हणजे विविध घटकांची योग्य सांगड आहे: खास बिझनेस मॉडेल – B2B2C – (बिझनेस टू डेव्हलपर टू कस्टमर) कंपनीचे वेगळेपण अधोरेखित करते, सध्याच्या पसंतीच्या डेव्हलपमेंट पार्टनरबरोबरचा सहयोग व नावीन्यपूर्ण उत्पादने यांची सांगड घातली जाते व उत्तमोत्तम वित्तीय पर्याय उपलब्ध केले जातात.

पिरामल फायनान्स पिरामल हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक खुशरू जिजिना म्हणाले, “पुण्यामध्ये आमचा हाउसिंग फायनान्स व्यवसाय सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इक्विटी, डेट् व आता हाउसिंग फायनान्स अशा संपूर्ण उत्पादनांसंबंधीच्या अत्यंत अनुभवी टीमच्या मदतीने आम्ही दीर्घ काळ या क्षेत्रात कार्यरत आहोत. हाउसिंग फायनान्स दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर, पुण्यामध्ये हाउसिंग फायनान्स व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही आणखी 50 स्थानिक व्यक्तींची नियुक्ती केली आहे. मुंबई, दिल्ली व बेंगळुरू येथून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाप्रमाणेच पुण्यातही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही महाराष्ट्रातील व्यवसाय जास्तीत जास्त वाढवणार असून, नाशिकमध्येही प्रवेश करणार आहोत.”

हाउसिंग फायनान्सने अलीकडेच एक नावीन्यपूर्ण उत्पादन दाखल केले आहे  – ‘सुपर’ लोन. ‘सुपर’ लोनमध्ये रिटेल कर्जासाठी क्रेडिटविषयक निकषांचे मूल्यमापन करण्याबरोबरच भविष्यातील उत्पन्नाची क्षमता विचारात घेतली जाते व त्यामुळे ग्राहकाला आदर्श घर घेणे शक्य होते. या कर्जामुळे व्यक्तींना त्यांचे पहिले घर फार तरुण वयात (पहिल्यांदा घर घेण्यासाठीच्या पूर्वीच्या सरासरी 35 या वयाच्या तुलनेत आता 28 वर्षे) खरेदी करता येते.

याबरोबरच, पिरामल फायनान्सकडील ‘ब्रिकेक्स’ या विशेष विक्री व संशोधन कार्यामुळे नावीन्यपूर्ण मार्केटिंग धोरणे ओळखण्यासाठी व राबवण्यासाठी आणि नव्या वितरण व चॅनेल पार्टनरबरोबर प्राथमिक विक्रीला चालना देणे, यासाठी मदत होणार आहे.

स्वारगेट ते कात्रज रस्त्याच्या कामावरून महापौर खवळल्या ..

0

पुणे- स्वारगेट ते कात्रज रस्त्याचे आणि बीआरटी चे रेंगाळत चाललेल्या कामावरून आज काहेरीस महापौर मुक्त टिळक खवळल्या , आणि थेट त्यांनी या रस्त्यावरील भारती विद्यापीठ ते पद्मावती पर्यंतच्या कामाची फिरून पाहणी केली . डिसेंबर पर्यंत होणार असलेले काम एवढ्या दिवस का रेंगाळले म्हणून त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना फैलावर घेतले ..अखेरीस ३१ में पर्यंत शेवटची मुदत देते, नागरिकांचे हाल होत आहेत हे लक्षात घ्या असे सुनावले . याबाबत आज त्यांनी महापालिकेत पहा आणि ऐका पत्रकारांशी बोलताना काय सांगितले ….

पुणेकरांच्या दिमतीला येणार ई टाॅयलेट..(व्हिडीओ)

0

पुणे- बाहेर पडल्यावर पुणेकरांची ‘दैना ‘ होते अनेकदा .. ठाऊक आहेच सर्वांना … आणि सोय सापडली तरी .. घाण आणि दुर्गंध .. यांचा मारा सहन करत सुस्कारा टाकावा लागतो .. पण आता पुढे अत्याधुनिक सोय होणार आहे …अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून ‘ ई  टाॅयलेट.. येणार आहेत ..
अर्थात अनेकांनी  असे’ ई  टाॅयलेट.. ”अद्याप  बघितलेले नाहीत .. पण लवकरच ते पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील असे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले .. पहा आणि ऐका नेमके पत्रकार परिषदेत या दोघांनी काय सांगितले …

कोरेगाव भीमा प्रकरण- नांगरे पाटील व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर माजी खासदारांचा आक्षेप – (व्हिडीओ)

0

पुणे – पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर कोरेगाव भीमा प्रकरण घडले नसते. पोलीस खात्याने कोरेगाव भीमा प्रकरणात नांगरे पाटील, सुएझ हाक एसपी यांच्यासह अधिकाऱ्याने गृहखाते आणि मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली आहे.  त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी असे येथे  खासदार प्रदीप रावत यांनी म्हटले आहे .कोरेगाव भीमा प्रकरणी सत्यशोधन समिती चां अहवाल  पत्रकार परिषदेत सदर करण्यात आला यावेळी ते बोलत होते . सत्यशोधन अहवाल समितीचे सदस्य कॅप्टन स्मिता गायकवाड, सागर शिंदे, सुभाष खिलारे, दत्ता शिर्के, प्रदीप पवार आणि अॅड.सत्यजित तुपे उपस्थित होते.
कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा  यामध्ये काहीही संबंध नाही, असा अहवाल  पत्रकार परिषदेत सादर केला आहे. या हिंसाचारामागील सूत्रधार अनुषंगाने 31 डिसेंबरला शनिवरवाड्यावरील एल्गार परिषद आयोजक असलेल्या कबीर कला मंच,रिपब्लिकन पँथर या संशयित गटाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एटीएसने जानेवारी महिन्यात अटक केलेल्या संशयित माओवादी कोरेगाव भीमा गेले असल्याचे व एल्गार परिषडेचे काही  आयोजक  याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एल्गार परिषद व कोरेगाव हिंसाचाराचे लागेबांधे आहेत त्यांची चौकशी करावी, असा मुद्दा समितीने उपस्थित केला. वादग्रस्त व खोटा इतिहास सांगणारा फलक लावण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस यांची चौकशी करून कारवाई करावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

 

महापालिकेच्या मुख्य सभेत कसे गुंडाळले जातात विषय (व्हिडीओ)

0

पुणे- गेल्या सभेत तावातावाने विषय महिनाभर पुढे ढकलला जातो, पण तोच विषय महिन्यानंतर पुन्हा सभेत येतो तेव्हा शांतपणे चिडीचूपपणे अवघ्या काही सेकंदात पास होतो अशा अनेक गोष्टी पालिकेच्या मुख्य सभेत घडतात . हे सोडा .. पण जेव्हा आरोग्य सेवेवर विविध आरोप होत असतात आणि जेव्हा आरोग्य प्रमुखांकडून रिक्त जागांची माहिती घेतली जाते तेव्हा मात्र हा विषय कसा टोलविला जातो ते कालच्या मुख्य सभेत दिसले . एवढेच नव्हे तर गेल्या १९ एप्रिल च्या मुख्य सभेत असिफा आणि महिला अत्याचारावर केंद्र आणि राज्य सरकारला पुण्याच्या वतीने पत्र  पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला , एवढ्या संवेदनशील विषयावर 4 दिवसात तरी पत्र पाठविले कि नाही ? असा प्रश्न जेव्हा २३ एप्रिल ला उपस्थित झाला , तेव्हा ..म्हणजे  महिला अत्याचारावर , महिला नगरसेविकेच्या प्रश्नावर , महिला महापौरांचे मिळालेले उत्तर पहा …

कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणातील तरुणीचा संशयास्पद मृत्यू

0
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार असलेल्या पुजा सकट या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून कोरेगाव-भीमापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडा गावातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. शनिवारी पूजाच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात पूजाच घर जाळण्यात आलं होतं. त्या हिंसाचाराच्या पूजा साक्षीदार होती. त्या घटनेनंतर पूजाचे कुटुंबिय वाडा नावाच्या गावात राहायला गेले होते. परंतू ज्या वाडा गावात पुजाचे कुटुंबिय राहत होतं, तिथल्या मालकाने ते घर सोडण्यासाठी संकट कुटुंबियांच्या मागे तगादा लावला होता.
 दरम्यान शनिवारी पूजा घरातून नाहीशी झाली. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला. पूजाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नऊ जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पूजा सकटने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.