Home Blog Page 3155

महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप, डिव्हाईन स्टार्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे:डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप, डिव्हाईन स्टार्स या संघांनी अनुक्रमे रिग्रीन व मेटा स्कुल या संघांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सूरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सोनिया डबीर हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने रिग्रीन संघाचा 9 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. सामन्यात  शेलार ग्रुपच्या अचूक गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे रिग्रीन संघाचा डाव गडगडला. त्यांचे फलंदाज झटपट बाद होत गेल्याने रिग्रीन संघाला 20षटकात 8बाद 66धावाच करता आल्या. भक्ती शास्त्रीच्या 17धावा व तेजल हसबनीसच्या 12धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळेने 4धावांत 4गडी बाद केले. वैष्णवीला सोनिया डबीर(1-14), श्वेता खटाळ(1-14), कृतिका पोफल्ली(1-19)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. शेलार ग्रुप संघाने हे आव्हान 10.5षटकात 1बाद 67धावा करू। पूर्ण केले. यात सोनिया डबीरने 41 चेंडूत नाबाद 45धावा, कृतिका पोफल्लीने 20 चेंडूत नाबाद 11धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याची मानकरी सोनिया डबीर ठरली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारती फुलमाळीच्या उपयुक्त 39धावांच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने मेटा स्कुल संघाचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना मेटा स्कुल संघाचा डाव 18.4षटकात 71धावावर कोसळला. यात उत्कर्षा पवारने 19धावा, पूनम खेमनारने 15धावा केल्या. डिव्हाईन स्टार्सकडून निकिता भोर(3-7), प्रिया सिंग(2-14), साक्षी वाघमोडे(1-10), गौतमी नाईक(1-10), आदिती गायकवाड(1-16) यांनी अफलातून गोलंदाजी करत मेटा स्कुल संघाला 71धावांवर रोखले. 71 धावांचे आव्हान डिव्हाईन स्टार्स संघाने 14.2षटकात 3गड्यांच्या बदल्यात 74धावा काढून पूर्ण केले. यात भारती फुलमाळीने 39चेंडूत 4चौकारांसह 39धावांची संयमपूर्ण खेळी केली. क्रतिका टेकाडेने 16धावा, वैष्णवी रावलीयाने 10धावा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सामन्याची मानकरी भारती फुलमाळी ठरली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
रिग्रीन: 20षटकात 8बाद 66धावा
(भक्ती शास्त्री 17(27,2×4), तेजल हसबनीस 12(17,1×4), वैष्णवी काळे 4-4, सोनिया डबीर 1-14, श्वेता खटाळ 1-14, कृतिका पोफल्ली 1-19)पराभूत वि.शेलार ग्रुप: 10.5षटकात 1बाद 67धावा(सोनिया डबीर नाबाद 45(41,7×4), कृतिका पोफल्ली नाबाद 11(20,1×4), श्रद्धा पाखरकर 1-15);सामनावीर-सोनिया डबीर;

मेटा स्कुल: 18.4षटकात सर्वबाद 71धावा(उत्कर्षा पवार 19(28,1×4), पूनम खेमनार 15(31), निकिता भोर 3-7, प्रिया सिंग 2-14, साक्षी वाघमोडे 1-10, गौतमी नाईक 1-10, आदिती गायकवाड 1-16) पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 14.2षटकात 3बाद 74धावा(भारती फुलमाळी 39(39,4×4), क्रतिका टेकाडे 16(20,2×4), वैष्णवी रावलीया 10(21,2×4), कल्याणी चावरकर 1-7, श्रुती महाबळेश्वर 1-9, सोनाली शिंदे 1-15);सामनावीर- भारती फुलमाळी.

‘इनोसंट‘ टाईम्स चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन

0
पुणे ः ‘इनोसंट टाईम्स चाईल्ड केअर‘ या प्री-स्कूल एज्युकेशन-चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन बालविकास तज्ज्ञ डॉ. अर्चना कदम यांच्या हस्तेरोजी झाले.
जागतिक ऑटिझम महिन्याचे औचित्य साधून गतीमंद, ऑटिझम झालेल्या आणि अध्ययनात गती कमी असणार्‍या बालकांसाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. सकाळनगर, बाणेर रस्ता येथे हे सेंटरचे उद्घाटन पार पडले.
या सेंटरला डॉ. चंचल आगरवाल, डॉ. संयोगिता नाडकर्णी, डॉ. अंकीता संघवी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘गतीमंद, ऑटीझम झालेल्या आणि अध्ययनात कमी असणार्‍या बालकांना लहानपणापासून सेंटरमध्ये मार्गदर्शन मानसोपचार मिळाले की त्यांच्या बुद्धयांक वाढतो, संवाद वाढतो आणि भाषेची समज वाढते. बाणेर भागातील हे पहिलेच प्री स्कूल चाईल्ड केअर सेंटर आहे,‘ अशी माहिती डॉ. अंकिता संघवी यांनी दिली. 
या बालकांसाठी विशेष खेळ, उपकरणे खेळणी सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यात ‘बोलस्टर‘, स्विंग, प्लॅटफॉर्म, स्विंग, क्लायंबिंग लॅडर, रोप, टायर, स्विंग, टनेल, सॅण्ड पीट, साऊंड वॉल, वॉटर झोन, बॉल पूल एरिया यांचा समावेश आहे.
ऑक्युपेशल थेरपी स्पीच, लँग्वेज पॅथॉलॉजी, प्ले थेरपी, रिनिडिएशन, अ‍ॅक्वा थेरपी, क्लिनिकल अ‍ॅसेसमेंट या तंत्रांचाही सेंटरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अर्न्स्ट अँड यंग, सेल २ वर्ल्ड, युनियन बँक ऑफ इंडिया, महानगर बँक संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

0

पुणे: स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्पर्धेत अर्न्स्ट अँड यंग, सेल २ वर्ल्ड, युनियन बँक ऑफ इंडिया,  महानगर बँक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत निकेश कुमारच्या 43 धावांच्या बळावर अर्न्स्ट अँड यंग संघाने सारस्वत बॅंक संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निलेश गोरीवालेच्या 27 तर सचिन गाडेच्या 29 धावांसह सारस्वत बॅंक संघाने 9 षटकात 5 बाद 70 धावा केल्या. 70 धावांचे लक्ष अर्न्स्ट अँड यंग संघाने केवळ 8 षटकात 3 बाद 71 धावांसह पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. निकेश कुमार सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत विशाल सोनटक्केच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 11 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना विशाल सोनटक्केच्या 36 व वैभव शिंदेच्या 24 धावांसह युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 9 षटकात 3 बाद 70 धावा केल्या. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एम्प्टोरीज संघ 9 षटकात 4 बाद 59 धावात गारद झाला. योगेश मोहिते व विशाल सोनटक्के यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत राज पन्वरच्या 35 धावांच्या बळावर सेल २ वर्ल्ड संघाने टीआरडीडीसी संघाचा 5 गडी राखून तर स्वप्निल बोर्डेच्या दमदार 48 धावांच्या जोरावर  महानगर बँक संघाने गालाघर संघाचा 37 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपुर्व फेरी

सारस्वत बॅंक- 9 षटकात 5 बाद 70 धावा(निलेश गोरीवाले 27, सचिन गाडे 29, सुधिर साळुंखे 20, विश्वनाथ जगताप 2-24, किरण शेट्टी 2-13) पराभूत वि अर्न्स्ट अँड यंग – 8 षटकात 3 बाद 71 धावा(निकेश कुमार 43, निलेश पवार 2-19) सामनावीर- निकेश कुमार

अर्न्स्ट अँड यंग संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.

युनियन बँक ऑफ इंडिया- 9 षटकात 3 बाद 70 धावा(विशाल सोनटक्के 36, वैभव शिंदे 24, प्रविण पाटील 2-21) वि.वि एम्प्टोरीज- 9 षटकात 4 बाद 59 धावा(प्रविण पाटील 38, योगेश मोहिते 21, विशाल सोनटक्के 2-21) सामनावीर- विशाल सोनटक्के

युनियन बँक ऑफ इंडिया संघाने 11 धावांनी सामना जिंकला.

टीआरडीडीसी – 9 षटकात 2 बाद 51 धावा(अराम भट्टाचार्य 25, हर्षद शेख 2-19) पराभूत वि सेल २ वर्ल्ड- 7.2 षटकात 3 बाद 53 धावा(राज पन्वर 35, क्रिश्तम शेट्टी 2-18) सामनावीर- राज पन्वर

सेल २ वर्ल्ड संघाने 5 गडी राखून सामना जिंकाला.

महानगर बँक – 9 षटकात 3 बाद 97 धावा(स्वप्निल बोर्डे 48, रोशन कदम 2-43) वि.वि गालाघर – 9 षटकात 4 बाद 60 धावा(सुभेंदू पांडे 29, राहूल लंके 2-20) सामनावीर- स्वप्निल बोर्डे महानगर बँक संघाने 37 धावांनी सामना जिंकला.

ऊर्जा संवर्धनासाठी पुरस्कार देणे हे प्रबोधनाचेच माध्यम – पालकमंत्री

0

पुणे- उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्त्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. हा गौरव सोहळा म्हणजे ऊर्जा संवर्धना बाबत प्रोत्साहन आणि प्रबोधन करण्याचेच एक माध्यम आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.

येथील महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेतर्फे आयोजित बाराव्या उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण समरंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मेधा कुलकर्णी, बि. इ. इ चे महासंचालक अभय बाकरे, महाऊर्जाचे महासंचालक विपीन शर्मा, अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव, पुरस्कार निवड समितीचे सदस्य व्ही. व्ही कानेटकर, पी. जी. चव्हाण, बि. पी. भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, वाहतूक, पाणी टंचाई, ऊर्जा संवर्धन अशा अनेक समस्या आज समोर आहेत, या सर्व समस्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. एका चांगल्या कामाचा गौरव केल्याने एका चांगल्या विचाराचा गौरव होतो. उर्जा संवर्धनासाठी शालेय स्तरापासून प्रबोधन करायला हवे. मोठ्या शहरांमध्ये आज पाण्याचा अतिरीक्त वापर केला जातो तो टाळायला हवा. आज देशातील 38 कोटी लोकांनी नव्याने बँक खाती उघडली आहेत. प्रयत्न केले की अनेक गोष्टी सहज शक्य होतात याचेच हे उदाहरण आहे. देशात ऊर्जा बचतीबाबत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे हि आनंदाची बाब.

श्री बावनकुळे म्हणाले, ऊर्जा क्षेत्रात काम करणारे देशच जागतीक पातळीवर श्रीमंत देश आहेत. आपल्या देशात देखील ऊर्जा संवर्धनासाठी तसेच प्रत्येक घरा पर्यंत वीज पोहचवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दुर्गम भागात प्रत्येक घरात आज वीज पोहचविण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. या क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या सर्व संस्थांना लागणारी मदत तसेच सुविधा देखील पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करु. सन 2025 पर्यंत शेतकरी सौर उर्जेचा वापर करतील असा विश्वास आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. शर्मा यांनी केले. प्रादेशिक महाव्यवस्थापक आवाड यांनी आभार मानले. उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील सुमारे 63 संस्थांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायमच कटीबद्ध – बापट

0

पुणे. :-लोकांना भासणाऱ्या वैद्यकीय समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास करू आणि सर्वसामान्य लोकांना अद्यावत हॉस्पिटल आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायमच कटीबद्ध असू अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ससून जनरल हॉस्पिटल आणि कमला नेहरू व गाडीखाना हॉस्पिटल यांना प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी होणारे अर्भक मृत्यू टाळण्यासाठी न्यूनॉटल रेप्सरेटर या जिल्हा वार्षिक योजनेतुन  अॅप्रोटेक निओनेटल रेस्पिरेटर’ हे वैद्यकीय उपकरण आणि स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका दिल्या. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

ससून जनरल हॉस्पिटल आणि गाडीखाना येथे हे वैद्यकीय उपकरण तर कमला नेहरू हॉस्पिटलला फिरता दवाखाना व रुग्णवाहिका देण्यात आली. या एका उपकरणाच्या माध्यमातून २ बालकांना प्राणवायू पुरवला जाऊ शकतो.

ते पुढे म्हणाले कि, बालमृत्यूची वाढणारी संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय यंत्रणेला

अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करता यावे त्याचबरोबर त्यांच्या कामाची वेग वाढवा आणि एकही बालक दगावले जावू नये हा संदेश सर्वांपर्यंत जावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या येणाऱ्या पिढीसाठी गर्भवती महिलांना सकस आहार,आवश्यक औषधे हि योग्य वेळेत मिळून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असू. असेही ते म्हणाले  त्याचबरोबर अशा कामांसाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत केली पहिजे. यामुळे अशी वैद्यकीय उपकरणे शहराबरोबरच जिल्ह्यातील व इतर अनेक रुग्णालयांना उपलब्ध करून देता येतील आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल.

महापौर मुक्ता टिळक,महापालिका आरोग्य अधिकारी साबणे,नगरसेवक हेमंत रासने, महेश लडकत, राजेश येनपुरे,गायत्री खडके,आरती कोंढरे याप्रसंगी उपस्थित होते.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने लोणावळ्यात नवीन हॉटेलसाठी केला करार, महाराष्ट्रातील हे आयएचसीएलचे १७वे हॉटेल

मुंबई: इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात आयएचसीएलला आपल्या अॅस्पिरेशन २०२२ या ध्येयपूर्तीच्या प्रवासात लोणावळ्यातील प्रवेशाची घोषणा करण्यात खूप आनंद होत आहे. कंपनीने काकडे समूहाचा भाग असलेल्या वाइल्ड्स अॅण्ड वॉटर डेव्हलपर्ससोबत व्यवस्थापन कंत्राटाच्या माध्यमातून ताजचे नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी करार केला आहे. भारतामध्ये सर्वाधिक आरामदायी हॉटेल्स चालवणारी कंपनी हे आयएचसीएलचे स्थान या घोषणेमुळे आणखी भक्कम झाले आहे.

आयएचसीएलच्या रिअल इस्टेट आणि विकास विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष सुमा वेंकटेश यावेळी म्हणाल्या, “आमचे नवीन आरामदायी (लीझर) हॉटेल लोणावळ्यात आणण्यासाठी काकडे समूहासोबत भागीदारी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आरामदायी हॉटेलिंगच्या क्षेत्रातील स्थान अधिक बळकट करण्यावर आमचा कायम भर राहिला आहे आणि मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांतील तसेच भोवतालच्या भागांतील पर्यटकांसाठी लोणावळा हे मोक्याचे ठिकाण असल्याने ही आमच्यासाठी मोठी संधी आहे.”

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ताज ब्रॅण्डेड रिसॉर्ट उभे राहणार आहे. पवना तलावातील नितळ पाण्याच्या सान्निध्यात, निसर्गरम्य डोंगरांच्या पार्श्वभूमीवर ३० एकर भूभागावर हे रिसॉर्ट बांधले जाणार असून, यामध्ये १५० खोल्या, दिवसभर खुले राहणारे रेस्तराँ, स्पेशालिटी रेस्टोरंट आणि बार या सुविधा असतील.

काकडे समूहाचे श्री. विक्रम काकडे म्हणाले, “प्रतिष्ठेच्या ताज ब्रॅण्डसोबत भागीदारी करण्याची तसेच त्यांचे सुप्रसिद्ध आदरातिथ्य लोणावळ्यात आणण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. या भागीदारीच्या माध्यमातून (आमचे विकसन भागीदार श्री. डेव्हिड लाझारस यांच्यासह) महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे ताज रिसॉर्ट उभारण्याचे आणि ग्राहकांना एक आगळा अनुभव देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे.”

लोणावळा हे छोटेसे शांत गाव महाराष्ट्रातील आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून गेली अनेक वर्षे मुंबई व पुण्यातील पर्यटकांची पसंती लोणावळ्याला आहे.

काकडे समूहाविषयी

काकडे समूह हा महाराष्ट्रातील आघाडीच्या बांधकाम आणि विकसन समूहांपैकी एक असून कंपनीकडे बांधकाम आणि विकासकामांचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. आतिथ्य आस्थापने, मॉल्स, गृहनिर्माण तसेच टाउनशिप विकासाच्या असंख्य आगामी प्रकल्पांमध्ये काकडे समूहाचा सहभाग आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडविषयी

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात आयएचसीएल आणि तिच्या उपकंपन्या असा अनेक ब्रॅण्ड्स व व्यवसायांचा समूह भारतीय आतिथ्यशीलता व जागतिक दर्जाची सेवा यांचा मिलाफ साधून काम करत आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने आपले पहिले हॉटेल ताजमहाल पॅलेस मुंबईत १९०३ साली सुरू केले आणि आज जगातील चार खंडांत, ११ देशांमधील ७२ ठिकाणी कंपनीची १४५ हॉटेल्स आहेत.

बाजारपेठेतील भांडवलाचा विचार करता, इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) ही दक्षिण आशियातील सर्वांत मोठी भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. बीएसई व एनएसईच्या प्राथमिक सूचींमध्ये कंपनीचा समावेश आहे.

रामभाऊ जाधव यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

0
पिंपरी, प्रतिनिधी :

सांगवी येथील रामभाऊ जाधव यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

          आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राज्य अध्यक्ष डेव्हिड राज आणि जनरल सेक्रेटरी अरविंद भगदगिरी यांनी जाधव यांना निवडीबद्दलचे प्रमाणपत्र दिले. जाधव यांच्या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे, सचिन गवांडे पाटील, गणेश सोनवणे, गणेश कांबळे, सुमित टुमलाईट, भीम भिसे, संजू भंडारी, सोनम जाधव आदींनी अभिनंदन केले.
           आपल्या निवडीबाबत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव म्हणाले, समाजातील कामगार, तसेच अन्य घटकांवर अन्याय होऊ न देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. अन्यायाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन संघटना अधिक बळकट करणार असून, या माध्यमातून  संघटित व असंघटित कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.

वर्ल्ड डान्स डे इव्हेंट-7000 नर्तक व 400 कोरीग्राफर आणि नृत्याची झलक दाखवणार

0

पुणे- डान्स युनियनच्या बॅनरखाली देश, राज्य आणि शहरातील अग्रगण्य नर्तक नृत्य जगतातील इतिहास घडविणार आहेतयेत्या 29 एप्रिल रोजी बीईजी मुख्यालयाजवळ डेक्कन कॉलेज मैदान,येरवडा येथे नृत्याचे प्रदर्शन घडविणार आहेतया कार्यक्रमात तब्बल 7000नर्तक, 400 कोरिओग्राफर्स असतील आणि यावेळी 5000 प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहेएक व्यवसाय म्हणून नृत्याला आदर दर्शविण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार नागरिकांनी निरोगी राहण्याचे आवाहन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे समन्वयक आणि आयोजक संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेकी हा कार्यक्रम एप्रिल 29 (रविवारी) 5 ते या वेळेत होणार आहेपुणे डान्स युनियनने एप्रिल 2016 मध्ये आपल्या नृत्य संघटनेची स्थापना केलीया कार्यक्रमात बॉलीवूडमधील रियालिटी शोचे नर्तकही भाग घेणार आहेतया कार्यक्रमादरम्यान इंदापूरवाघोलीवडगावशेरीडूअरस्टेपदापोलीतील सरस्वती अनाथाश्रम येथील विविध सामाजिक संस्थांमधील अनाथ मुलामुलींनाही व्यासपीठ देण्यात येईलकौसर खानकरिश्मा चव्हाण,कृती महेशसिद्धेशपुणेकर डॅनी डान्सवालाविक्की आल्हाट आणि जीत सिंग हे नर्तक– नृत्यांगना हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहेतया कार्यक्रमात ते 50 वर्षांपर्यंत वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतीलयामध्ये फुलवा खमकरशेरा गुरमीत सिंग (सलमान खानचा बॉडीगार्ड), खालिद आझमीसबीना खानसरूप छोटू लोहार इउपस्थित असतील.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार यातील नृत्ये हे नृत्यफिटनेसच्या थीमवर आधारीत आहेतत्यात युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर विशेष भर देण्यात आला आहेपुणे डान्स युनियनचे सदस्य असलेले संजय सावंत म्हणाले, 29 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने नागरिकांना फिटनेसबद्दल जागरुक करण्याच्या उद्देशाने नृत्य दिन आयोजित करण्यात आला आहेयाअंतर्गत आमच्या लव्ह दि डान्स” या आमच्या मोफत कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे.

“या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनापासून सहभागी होण्याचे आवाहन आम्ही पुणेकरांना करतोयातून नागरिकांपर्यंत निरोगी व स्वस्थ राहाहा संदेश जाईलहा विनामूल्य कार्यक्रम असून आम्ही घडविणार असलेल्या इतिहासाचा भाग होण्यासाठी नागरीकांनी यात सहभागी होणे आवश्यक आहेअसे त्यांनी सांगितले.

कपिल मुथा व्हेंचर्सचे कपिल मुथा यांनी सांगितले कीदिव्यांग लोकांसाठी या कार्यक्रमात विशेष स्पर्धा असेलत्यांचे मनोबल वाढविण्याकरिता आणि जीवनातील भावी आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिले जातील.

या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या अन्य प्रमुख व्यक्तींमध्ये आरके अकादमीचे राहुल कोसंदकरकपिल मुथा व्हेंचर्सचे कपिल मुथाप्रदीप गायकवाडकृष्णकुमार गोयलयुवराज ढमालेदीपक जावळकरनवजित सिंगसोनिग्रा आणि अनिल वाधवा यांचा समावेश आहेया कार्यक्रमात अहमदनगरनागपूरसांगलीमुंबई आणि औरंगाबादचे प्रतिभागी सहभागी होणार आहेत.

वानवडीमध्ये मोफत पॅनकार्ड अभियान मोहीम

0

पुणे-वानवडीमधील जांभुळकर चौकामध्ये प्रफुल्ल जांभुळकर मित्र परिवाराच्यावतीने मोफत पॅनकार्ड अभियान मोहीम राबविण्यात आले . या अभियानाचे उदघाटन एकता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल जांभुळकर यांच्याहस्ते करण्यात आले . या अभियानामध्ये ५०० पॅनकार्ड काढून देण्यात आले .

यावेळी नगरसेविका रत्नप्रभा जगताप , सन्मित्र सहकारी बँकेचे संचालक सुदाम जांभुळकर , बबलू परदेशी , किसन सातव , पोपट चौघुले , सुरेश गव्हाणे , शिवराम जांभुळकर , गणेश जांभुळकर, प्रतोष निंबाळकर व एकता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक वर्ग व वानवडी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या अभियानामध्ये वानवडी , केदारीनगर , साळुंके विहार , आझादनगर , शांतीनगर , विकासनगर , फातिमानगर , होले वस्ती , चौघुले मळा आदी भागातील नागरिकांनी सहभाग घेतला .

या कार्यक्रमाचे आयोजन  प्रफुल्ल जांभुळकर मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले .

कात्रज मधील पहिल्या डायलिसिस सेंटरचे उदघाटन

0
डायलिसिस सेंटर हा रुग्णांचा आधार : डॉ. गणेश राक
पुणे :साई स्नेह हॉस्पिटल,  मधील डायलिसिस सेंटरचा  उद्धाटन समारंभ डॉ.  शिवाजीराव पवार ( सहायक पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग)यांच्या हस्ते आणि डाॅ.गणेश राक (असिस्टंट कमिशनर इनकम टॅक्स) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी १​१​वाजता  झाला.
कात्रज परिसरातील  हे पहिलेच सुसज्ज डायलिसिस सेंटर आहे.
यावेळी   नगरसेवक वसंत मोरे,नगरसेविका अमृता बाबर, नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम, नाना जगताप, डॉ. संभाजी कारंडे उपस्थित होते.
वैदेही देवळेकर यांनी स्वागत केले. हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले.​साईप्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले . ​राजकुमार क्षीरसागर यांनी आभार मानले.
डॉ. शिवाजी पवार म्हणाले, ‘ शरीराची रक्त शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली की पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते.डायलिसिसचे उपचार अशा रुग्णांना वरदान ठरते. ही महत्वाची सुविधा कात्रज भागात उपलब्ध झाली , त्याचा उपयोग रुग्णांना होईल.
डॉ. गणेश राक म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमुळे, आहारातील बदल, प्रदूषण, हार्मोन मधील बदल, मधूमेह अशा अनेक कारणाने मूत्रपिंड ( किडनी ) वर ताण पडतो आणि ते नादुरुस्त झाले की डाय’लीसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे , हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायालीसिस सेंटर हा आधार असतो.
साई स्नेह हॉस्पिटलने ३ दशके कात्रज ची रुग्णसेवा केली आणि उपचार सुविधामधील प्रत्येक आधुनिक गोष्ट उपलब्ध केली ‘ अशा शब्दात नगरसेवक वसंत मोरे यांनी गौरव केला.
साई स्नेह हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप, संचालक डॉ. सुमीत जगताप यांनी स्वागत केले.राजकुमार क्षीरसागर यांनी आभार मानले.

एमआयटीतर्फे सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

0

पुणे- “शाळा आणि घर ही शिक्षणाची दोन प्रमुख केंद्रे आहेत. औपचारीक शिक्षण हे शाळेत तर अनौपचारिक शिक्षण घरामध्ये मिळते. या दोन्ही ठिकाणाहून मिळणार्‍या संस्कारातूनच समाजात चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस निर्माण होतो.”असे उद्गार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर जी. चांदेकर यांनी काढले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या “वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०१८” या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी माजी प्राचार्य व पुणे जिल्हा पातळीवरील अधिकारी नानासाहेब निंबाळकर, व्ही. एस. सातव हायस्कूलचे प्राचार्य किसन जाधव हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, परीक्षेचे प्रमुख समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण व जयंत पाठक हेही उपस्थित होते.
डॉ.चांदेकर म्हणाले, “संयुक्त कुटुंबपद्धतीत मुलांमध्ये संस्कार रूजविले जात असत. येथे आजीच्या गोष्टींच्या माध्यमातून मुले व अंतिमतः समाज घडविला जात असे. पण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे सर्व अस्ताव्यस्त झाले आहे. वर्तमानकाळात संस्कार देणारे शिक्षण नसल्यामुळे याचा सर्वांनीच विचर केला पाहिजे. विश्‍वशांती केंद्राने आयोजित केलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त शिक्षण मिळत आहे. याचा फायदा आर्थिक उन्नतीसाठी होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण आंतरिक व्यक्तिमत्वाला जो आकार मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण आयुष्याची गुणवत्ता वाढणार आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण देणार्‍या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला आकार येतो. त्यामुळे पुढील काळात संपूर्ण राज्यात या परीक्षेचा प्रसार झाला पाहिजे.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, सबंध विश्‍वाला अशांतता आणि हिंसाचाराने ग्रासले आहे. हजार वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आमच्या देशाने आपली अस्मिता गमाविली आहे. ब्रिटीश लोकांनी तिच्यावर जाणीवपूर्वक आघात केले आहेत. पण या सर्व प्रश्‍नांवरची उत्तरे शेकडो वर्षांपूर्वींच आमच्या संतांनी दिली आहेत. त्यांच्या मार्गाने आपण गेलो, तर येणार्‍या काळात आपण सर्व जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकू.
नानासाहेब निंबाळकर म्हणाले, भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी ही परीक्षा सर्वत्र व्हावी. समाजात चांगली व्यक्ती घडविण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे. समाजात सकरात्मक बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य या अभ्यासक्रमात आहे.
किसन जाधव म्हणाले, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी समाजाला अशा परीक्षांची आवश्यकता आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होत आहे. अशा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व उमलून येण्यास मदत मिळेल.
डॉ. एस.एन.पठाण यांनी या परिक्षेच्या उपक्रमामागची व विद्यार्थ्यांना सत्कारपूर्वक पारितोषिके देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या पुढील काळात राज्यातील सर्वं शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी या प्रयत्नामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
या वेळी आकांक्षा सातव, ओंकार चौधरी व निकिता तांबडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जयंत पाठक यांनी सूत्रसंचालन केले. सौ. देवयानी पालवे यांनी आभार मानले.

सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यर्थ्यांचा सन्मान-
यावेळी कु. आकांक्षा गणेश सातव, व्ही. एस. सातव हायस्कूल, पुणे व कु. प्रतीक्षा रमेश सूर्यवंशी, मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, नांदगाव, जि. लातूर या विद्यार्थ्यांनी राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान प्राप्त केला. त्यांना सुवर्णपदक, रु. ११,०००/- रोख बक्षीस, स्मृतिचिह्न व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितिय क्रमांक मिळविणारे कु. ओंकार अशोक चौधरी, व्ही. एस. सातव हायस्कूल, पुणे याला रौप्यपदक व रोख रु. ९,०००/- रक्कम, कु. निकिता कल्याण तांबडे, संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालय, पुणे, कु. नेहा नथाजी भोकरे, श्री शिवाजी हायस्कूल, अकोट, जि. अकोला यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक व रु. ७०००/- रोख रक्कम दिले. तसेच कु. खुशिया किशोर पाचाडे, कु. अपेक्षा दिगंबर गायकवाड, कु. किरण राजेंद्र गायकवाड, कु. सिद्धी रोहिदास जाधवराव व कु. वैष्णवी पद्माकर बन यांनी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर यश प्राप्त केले. त्यांना अनुक्रमे रु. ५०००/- व रु. ३०००/- रोख बक्षीसे देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

आर्य वैश्य (कोमटी)समाजाच्यावतीने श्री नगरेश्वर देवालयमध्ये वासवी माता जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे-आर्य वैश्य (कोमटी)समाजाच्यावतीने पुणे लष्कर भागातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील श्री नगरेश्वर देवालयमध्ये वासवी माता जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला . त्यानिमित्ताने लष्कर भागात वासवी मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . तसेच यंदाचे वासवी पुरस्कार नांदेड येथील दत्तात्रय देवडवार व पुणे येथील नंदकिशोर पारसेवार यांना देण्यात आला .

यावेळी प्रमुख पाहुणे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक अतुल गायकवाड , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक विनोद मथुरावाला ,आर्य वैश्य (कोमटी) समाजाचे ऑल इंडियाचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भागाचे संघ चालक ऍड. प्रशांत यादव आदी मान्यवर व आर्य वैश्य (कोमटी)समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी आर्य वैश्य (कोमटी)समाजाचे पुणे शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले , विश्वस्त जी. एल. निलावार , सचिव संजय पेकम , उपाध्यक्ष प्रविण गुंडेवार , कोषाध्यक्ष प्रशांत कोतुर , प्रसिद्धीप्रमुख डॉ. अभिजित बंडेवार , सदस्य सुरेश खजेपवार , राजेश केशटवार , प्रदीप महाजन , अशोक मामीडवार , मुकुंद जवाजीवार , सुनिल पेकम , सल्लागार नंदकुमार गादेवार , अनिल महाजन व महिला कार्यकारिणी मंडळ उपस्थित होते .

फर्जंद चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

0

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेल्या फर्जंद या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूडचे ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. फर्जंद चे पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी ची प्रस्तुती असणारा फर्जंद१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फर्जंद चित्रपटातून एक शिवकालीन लढाई आपल्या समोर येणार आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर कशी यशस्वी चढाई केली होती? याचा रोमांचकारी इतिहास फर्जंद या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.

या चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाची तांत्रिक मान्यता

0

ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते आदेशपत्र संस्थानला सुपूर्द

पुणे : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाने तांत्रिक मान्यता दिली असून या तांत्रिक मान्यतेचे आदेशपत्र राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री  श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे आज संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांना सुपूर्द केले. याप्रसंगी आमदार स्मिता कोल्हे उपस्थित होत्या.

या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानने मे. मिटकॉन कन्सल्टंसी अ‍ॅण्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस पुणे यांना सल्लागार म्हणून नेमले आहे. या कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पासाठी लागणार्‍या 40 एकर जागेची निवड करण्यात आली असून प्रकल्पाची अंदाजित किंमत 40 कोटी आहे. हा प्रकल्प आस्थापित केल्यानंतर अंदाजे 4 वर्षात खर्चाचा परतावा मिळेल. या प्रकल्पातून दरवर्षी 197.04 लक्ष युनिटची निर्मिती होणार आहे.

राज्याचे सहा माजी मुख्यमंत्री जागवणार स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी

0
देशातील पहिल्या  थ्रीडी तारांगणाचे १ मे रोजी
माजी केंद्रीय कृषीमंत्री  शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन 
पुणे(प्रतिनिधी) 
विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उदबोधक  तथ्यांची माहिती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील  स्व . राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमध्ये साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन   डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित  स्व. विलासरावजी देशमुख थ्रीडी तारांगणाचे येत्या १ मे रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती माजी उपमहापौर श्री. आबा  बागुल यांनी दिली. 
 याबाबत माहिती देताना आबा बागुल म्हणाले कि,  आपल्या कारकिर्दीत विज्ञान, तंत्रज्ञानाबाबत विशेष सजग असलेले दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला देण्यात आले आहे. दि. १ मे रोजी दुपारी १.३० वाजता प्रभाग क्रमांक ३५ मधील राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथे उदघाटन समारंभ होणार आहे. या समारंभास 

महाराष्ट्राच्या विकासामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत  बहुमूल्य योगदान देणारे सर्वश्री   मनोहर जोशी,  . शिवाजीराव निलंगेकर पाटील ,सुशीलकुमार शिंदे ,  पृथ्वीराज चव्हाण ,नारायण राणे ,  अशोक चव्हाण  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  यांच्या पत्नी शश्रीमती वैशाली विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख , सिनेअभिनेते रितेश देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील , माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पालकमंत्री ,खासदार , आमदार , स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे सहा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवणार आहेत.  


तारांगणाविषयी … 

 
हे  तारांगण संपूर्ण वातानुकूलित आहे. तारांगणाच्या डोम व्यास सुमारे ९. ५० मीटर असून तो ‘एफ. आर. पी . ‘मध्ये तयार करण्यात आला असून  १५ अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्वात   असल्याची अनुभूती मिळते.  अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक  ४ के रेझ्यूलेशनचे ३   व्हिज्युलायझेशन   डिजीटल तंत्रज्ञानाचा आणि १०. १  क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
अवकाशात असलेल्या ग्रहताऱ्यांची रचना, त्यात घडणाऱ्या ग्रहणांसारख्या घटना याबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत त्रोटक माहिती उपलब्ध होते. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे जिज्ञासूंसमोर मांडण्यासाठी या तारांगणाची उभारणी करण्यात आली  आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद उपळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे   ३ डी तंत्रज्ञानाचा  चष्म्याविरहित वापर करण्यात आला आहे. ५२ आसन क्षमता या तारांगणाची असून खुर्च्या आवश्यक त्या कोनात पुढे -मागे होणाऱ्या असून स्लीपिंग चेअर पद्धतीच्या आहेत. जगात प्रसिद्ध असलेल्या आणि फुलडोम पद्धतीचे थ्री डी फिल्म्स ,शो करणाऱ्या   फुलडोम प्रो या रशियन  उत्पादक कंपनीने सर्व्हर आणि सॉफ्टवेअर पुरविले आहे. हायडेफिनेशनचे आठ प्रोजेक्टर उच्चक्षमतेची आधुनिक ध्वनी यंत्रणा आहे. सद्यस्थितीत कंपनीने  इंग्रजी  माध्यमातील २० फिल्म्स उपलब्ध करून दिल्या असून मराठी आणि हिंदी माध्यमातूनही फिल्म्स दाखविणे सहजशक्य आहे. देशात मोजकीच तारांगणे उपलब्ध असून  पुण्यातील हे  तारांगण अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे .