पुणे- डान्स युनियनच्या बॅनरखाली देश, राज्य आणि शहरातील अग्रगण्य नर्तक नृत्य जगतातील इतिहास घडविणार आहेत. येत्या 29 एप्रिल रोजी बीईजी मुख्यालयाजवळ डेक्कन कॉलेज मैदान,येरवडा येथे नृत्याचे प्रदर्शन घडविणार आहेत. या कार्यक्रमात तब्बल 7000नर्तक, 400 कोरिओग्राफर्स असतील आणि यावेळी 5000 प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. एक व्यवसाय म्हणून नृत्याला आदर दर्शविण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार नागरिकांनी निरोगी राहण्याचे आवाहन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक आणि आयोजक संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की हा कार्यक्रम एप्रिल 29 (रविवारी) 5 ते 8 या वेळेत होणार आहे. पुणे डान्स युनियनने एप्रिल 2016 मध्ये आपल्या नृत्य संघटनेची स्थापना केली. या कार्यक्रमात बॉलीवूडमधील रियालिटी शोचे नर्तकही भाग घेणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान इंदापूर, वाघोली, वडगावशेरी, डू
आयोजकांच्या म्हणण्यानुसार यातील नृत्ये हे नृत्य–फिटनेसच्या थीमवर आधारीत आहेत. त्यात युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांवर विशेष भर देण्यात आला आहे. पुणे डान्स युनियनचे सदस्य असलेले संजय सावंत म्हणाले, 29 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने नागरिकांना फिटनेसबद्दल जागरुक करण्याच्या उद्देशाने नृत्य दिन आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत आमच्या “लव्ह दि डान्स” या आमच्या मोफत कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे.
“या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनापासून सहभागी होण्याचे आवाहन आम्ही पुणेकरांना करतो. यातून नागरिकांपर्यंत निरोगी व स्वस्थ राहा, हा संदेश जाईल. हा विनामूल्य कार्यक्रम असून आम्ही घडविणार असलेल्या इतिहासाचा भाग होण्यासाठी नागरीकांनी यात सहभागी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कपिल मुथा व्हेंचर्सचे कपिल मुथा यांनी सांगितले की, दिव्यांग लोकांसाठी या कार्यक्रमात विशेष स्पर्धा असेल. त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता आणि जीवनातील भावी आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिले जातील.
या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या अन्य प्रमुख व्यक्तींमध्ये आरके अकादमीचे राहुल कोसंदकर, कपिल मुथा व्हेंचर्सचे कपिल मुथा, प्रदीप गायकवाड, कृष्णकुमार गोयल, युवराज ढमाले, दीपक जावळकर, नवजित सिंग, सोनिग्रा आणि अनिल वाधवा यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात अहमदनगर, नागपूर, सांगली, मुंबई आणि औरंगाबादचे प्रतिभागी सहभागी होणार आहेत.