Home Blog Page 3145

‘गंगाजल ‘ वरून पुणे महापालिकेच्या सभागृहात दोन नेत्यांमध्ये रणकंदन (व्हिडीओ)

पुणे : महापालिका अधिकाऱ्याला मारहाण होणे ,त्याच अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे ,त्याच्यावर पैसे मागितल्याचे आरोप असणे यावरून  आज पुणे महापालिकेच्या  मुख्य सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गेटनेते अरविंद शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली .

 अतिक्रमण अधिकारी किशोर पाडळ यांना एक हॉटेलवर कारवाई केल्याच्या प्रकरणी महापालिकेत येवून मारहाण झाली होती. त्यावरून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह काही सभासदांनी सवाल उपस्थित केला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मतही काही सभासदांनी व्यक्त केले. ही चर्चा सुरु असताना  भिमाले यांनी पडाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून त्या अधिकाऱ्याची बाजू शिंदे का घेत आहेत,  असा प्रश्न उपस्थित करीतत्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.  हा एजंट आहे, हा गरिबांचे पैसे खातो, हा फ्रॉड माणूस आहे’या अशा शब्दात भिमाले यांनी आरोप केले. त्यावर अधिकाऱ्यांना केबिनमध्ये येऊन मारहाण करणे चुकीचे असून त्यांना संरक्षण मिळावे अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी घेतली..या  प्रकारामुळे मुख्य  सभेत चांगलाच गोंधळ माजला. अखेर महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांसह माजी अध्यक्षांनी तसेच अविनाश बागवे ,दीपक पोटे,राजेश येनपुरे,महेश वाबळे ,गोपाल चिंतल,प्रवीण चोरबोले ,शंकर पवार   आदी नगरसेवकांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. 

 

थकितकर असणाऱ्या वाहनांचा लिलाव

पुणे – मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रीज, पुणे येथे दिनांक 30 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे. ही वाहने परिवहन कार्यालय, संगमब्रीज, पुणे, पीएमपीएल डेपो कात्रज, शिंदेवाडी, स्वारगेट डेपो, भोर विभागीय कार्यशाळा येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.  जाहीर लिलावात एकुण 227 वाहने उपलब्ध आहेत. यात टॅक्सी, ट्रक, बस व स्क्रॅप रिक्षा या वाहनांचा समावेश आहे.

लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या सूचना फलकावर माहितीसाठी लावणयात आली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी नमूद केलेल्या स्थळी करता येईल.

जाहीर लिलावत सहभागी होण्यासाठी दिनांक 25, 28, 29  मे 2018 रोजी सकाळी  11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरटीओ पुणे या नावे 25 हजार रुपये अनामत रक्कमेचा डीमांड ड्राफ्टसह नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क करावा. लिलावाच्या अटी व नियम सोमवार दिनांक 25 मे 2018 पासून कार्यालयीन कामकाजा दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील नोटीस बोर्डवर सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. वाहनांची विक्री ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर करण्यात येईल, अशी माहिती कराधान अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजे – भीम आर्मी

पुणे- शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे १०००० पेक्षा जास्त नागरिकांना चावा भटक्या कुत्र्यांनी घेऊन गंभीर इजा केली आहे. याबाबत प्रशासन डोळ्यावर पट्टी  गप्प आहे .  काही दिवसांपूर्वी लेखिका मंगला गोडबोले यांना भटक्या कुत्र्यांनी जखमी केले होते. पाठीमागून आलेल्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. त्यांनी कुत्र्याला हाकलले असता आणखी काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने  या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली  पुणे महापालिकेच्या आवारात आज दुपारी  निदर्शने केली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या मोटारीसमोर तीव्र आंदोलन करून पुणेकर नागरिकांना भटक्या कुत्र्या पासून संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली .

यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.संजीव  वावरे याना निवेदन देण्यात आले . या आंदोलनात महिला प्रमुख निता अडसुळे , सीताराम गंगावणे , सुशिला सोनवणे , संदीप शेंडगे , मुकेश गायकवाड , राकेश साबळे , आप्पा आखाडे , बाळू गायकवाड , सचिन सावंत , अमोल धनावडे , दीपक बलाढे ,शरद घोडके , प्रकाश म्हस्के , ममता जोगदंड , अनिता चव्हाण , मीना गवळी , नीलम गायकवाड , राजश्री चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका – महावितरणचे आवाहन

पुणे पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 14 हजार 986 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी सिंगल फेजचे 25 हजार आणि 10-40 अ‍ॅम्पीअर थ्री फेजचे 5014 नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे 91 हजार 449 आणि थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअरचे 23 हजार 537 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यात (कंसात – थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअर) सिंगल फेजचे 51,291 (8977), सातारा जिल्ह्यात सिंगल फेजचे 8242 (3611), सोलापूर जिल्ह्यात 10636 (4704), कोल्हापूर जिल्ह्यात 6499 (3880) आणि सांगली जिल्ह्यात 14,781 (2365) नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या नवीन वीजमीटरची संख्या ही सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत अधिक आहे. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. नवीन मीटर लावल्यानंतर त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका! – महावितरणच्या ग्राहकसेवेच्या सर्व सुविधा सुटसुटीत व पारदर्शक असतानाही स्वयंघोषित एजंट म्हणून आर्थिक फटका देणार्‍या व्यक्तींना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. महावितरणची वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या शुल्काची माहिती उपलब्ध आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी थेट संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अथवा कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून द्यावी. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वंदना चव्हाण सूड उगवताहेत -नगरसेविकेची तक्रार (व्हिडीओ)

पुणे- राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सदस्य , खा. वंदना चव्हाण या, आपल्या पती च्या म्हणजे अजित बाबर यांच्या स्वर्गवासा नंतर  आता आपल्यावर सूड उगवित असल्याची तक्रार आज राष्ट्रवादीच्याच नगरसेविका अमृता बाबर यांनी केली आहे … त्यांनी हा मुद्दा प्रथम महापालिकेच्या सभागृहात आज उपस्थित केला तर .. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट वंदना चव्हाण यांचे नाव घेत आरोप केला .
नेमके पहा त्या काय म्हणाल्या .. त्यांच्याच शब्दात ….

कॅन्टोमेंट बोर्ड मधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार – खा. अनिल शिरोळे

पुणे -शहराच्या हद्दीतील कॅन्टोमेंट बोर्डातील रस्ते वापरावरील बंदीसंदर्भात नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार अनिल शिरोळे ह्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ह्यांचा कडे जून २०१६ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर देखील ह्याच विषयी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे,  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ह्यांचे कडे देखील पाठपुरावा चालू होता तसेच ह्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी देखील मनोहर पर्रीकर , सुभाष भामरे ह्यांच्या समवेत शिरोळे ह्यांनी केली होती. ह्याच संदर्भात मध्यंतरी देशभरातील कॉन्तेन्मेंट बोर्डाच्या विविध प्रश्नांसंबंधी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे देशातील ६३ बोर्डांच्या लोकप्रतिनिधी बरोबर दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांच्या अध्यक्षतेखाली  (4 मे २०१८) बैठक घेण्यात आली होती . ह्या बैठकीत पुणे शहरातील कॅन्टोमेंट बोर्डांच्या विविध प्रश्नांसंबंधी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी पुणे कॅन्तोंमेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी तसेच देहूरोड बोर्डाचे अभय सावंत ह्यांच्या समवेत दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीताराम ह्यांची भेट घेऊन बोर्डांच्या संबंधी विविध प्रश्नांवर चर्चा देखील केली होती. ह्या बैठकी नंतर संरक्षण मंत्रालयातील प्रशासकीय पातळीवर ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील टप्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी भेटीनंतर बोलताना दिली होती.

त्यानुसार झालेल्या विस्तृत आढाव्या नुसार कॅन्टोमेंट बोर्ड मधील रस्ते नागरिकांसाठी तातडीने उघडणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी मान्य केले असून यापुढील काळात रस्ते संबंधी सर्व स्थानिक प्रतिनिधी आणि संरक्षण मंत्रालाय्तील मार्गदर्शक तत्वे ह्यांचा आधार घेऊन पुढील काळात रस्ते वापर संबंधी कार्यवाही करण्याचेही निश्चित झाल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी कळविले आहे. तसेच मागील दोन वर्षांहून अधिक काल घेतलेल्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल शिरोळे ह्यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.

महापुरुषांचा इतिहास प्रेरणादायी : नितीन बानगुडे पाटील

पुणे : महापुरुषांनी नव्या पिढीला आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करून दिले आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालणे ही तुमची आमची  सर्वांची जबाबदारी आहे. इतिहासातील एक आदर्शवादी आणि तत्ववादी योद्धा म्हणून छत्रपती संभाजी राजेंचे नाव घ्यावे लागेल. असे प्रतिपादन प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी केले. काल रविंद्र चव्हाण युवा मंचा तर्फे  धर्मवीर संभाजीमहाराज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. शनिवार वाड्याच्या प्रांगणात पार पडलेल्या या जयंती उत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष होते. समाजात निरपेक्षपणे काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कौतुकाची थाप मिळणेआवश्यक असते. या कौतुकामुळे त्यांना नवी उमेद मिळते आणि त्याच प्रेरणेने समाजासाठी निरंतर काम करत राहतो. हाच उद्देश समोर ठेऊन प्रत्येकवर्षी संभाजी महाराज जयंती निमित्त समाजात उत्तम कार्य करणाऱ्या संस्थाचा सत्कार रवींद्र चव्हाण युवा मंचाच्या वतीने करण्यात येतो. यावर्षी  कसबा पेठेतील त्वांष्टा कासार महिला समाज संघ, लुई-ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, शिवतेज दहीहंडी संघ व भोईराज दहीहंडी संघ यांना प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना बानगुडे पाटील म्हणाले की, इतिहास हा अनेकांच्या अभ्यासाचा, व्यासंगाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा तसेच प्रेरणेचा विषय आहे. इतिहास हा विषय आपल्याला जागृत करणारा तसेच चिंतन करायला लावणारा विषय आहे. युगायुगातून युगप्रवर्तक माणसे निर्माण होत असतात जी तुम्हा आम्हाला वसा आणि वारसा देत असतात तो वसा जपणे आणि त्यांनी  दिलेल्या आदर्शांवर चालत राहणे तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे त्या व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. तर ते स्वराज्य टिकवण्याचे आणि संवर्धित करण्याचे काम छत्रपती संभाजी राजांनी केले. त्यांचे जीवनकार्य सर्वसामन्यांना स्फूर्ती देणारे आहे.महाराजांनी स्वराज्याला नवी प्रेरणा दिली. हे फक्त वाचनातून आत्मसाद करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेऊन  आपण सर्वांनी तो अंमलात आणला पाहिजे.यावेळी रविंद्र चव्हाण युवा मंचाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवी जावळे, प्रशांत बधे, राजेंद्रनाना शिंदे, बाळासाहेब मालुसरे, राजेश बरगुज़े आदि उपस्थित होते.

तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे यांना किन्नर सन्मान पुरस्कार

एक तृतीयपंथी ते माळशिरस सरपंच असा खडतर प्रवासची घेतली दखल

पुणे – एक तृतीयपंथी ते माळशिरस (अकलूज) येथील सरपंच असा प्रवास करणे सोपं नव्हतं, मात्र राजकारणात आल्यावर लोकांचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकांनी आपल्यात सामावून घेतलं त्यातून तृतीयपंथी समाजामध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याची भावना माऊली कंबळे यांनी व्यक्त केली. त्या बालगंधर्व रंगमंच येथे पार पडलेल्या किन्नर सन्मान सोहळ्यात बोलत होत्या.

रविवार (20 मे) ला पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, मनसे च्या माजी नगरसेविका रुपाली पाटील उपस्थित होते. यावेळी कला, चित्रपट, राजकारण, शिक्षण, समाजकार्य आशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा तृतीयपंथीयांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून आत्मविश्वासाच्या जोरावर आपण सरपंच पदापर्यंत पोहोचलो. समाज आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचा, लोक माझ्याकडे पाहून तोंड फिरवायचे, मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर राजकारणात प्रवेश केला. लोकांसाठी काम केले, त्यातून तळागाळापर्यंत पोहचण्यात यश आले. त्यातून समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यापुढे माझ्या समाजासाठी शासनस्तरावर जे काही करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचबरोबर गावाच्या विकासाचाही प्रयत्न असेल असेही माऊली यांनी यावेळी नमूद केलं.

यावेळी धेंडे म्हणाले, ” माऊलीला राजकारणात आल्यावर जनतेने स्वीकारले, त्याचप्रमाणे इतर तृतीयपंथीयनाही समाजाने सामावून घेण्याची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या बळकटीकरणासाठी पुणे महापालिका पुढाकार घेत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी पालिका घेईल. त्यांनी शिक्षण घेऊन पुढे आले पाहिजे तरच ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, त्याशिवाय प्रगती नाही. तसेच तुम्हाला ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सामाजिक, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यासंबंधी सूचना जरूर पालिकेला कळवा, त्यांचा पाठपुरावा करून योग्य त्या योजना आम्ही आपल्यापर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करू”

यावेळी मेघराज भोसले म्हणाले, “किन्नर समाजात अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत. समाजाकडून त्यांची दाखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्या कलेला दाद मिळावी, कामाला प्रोत्साहन मिळावे आणि पुढील वाटचालीसाठी उमेद मिळावी यासाठी चित्रपट महामंडळ त्यांच्या पाठीशी आहे. समाज बदलत असताना तृतीयपंथीयांकडे पाहायचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, या सन्मान सोहळ्याने त्याला बळकटी मिळेल”

आदिती लोखंडे, सुधीर पटवर्धन, अंजली पांगरे आणि विश्‍वजीत कांबळे पुणे आयडॉल गायन स्पर्धेचे विजेते

पुणे-सोमेश्‍वर ङ्गाउंडेशन आणि शिवाजीनगर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पंधराव्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेचे  तब्बल बारा तास बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या ५६७ स्पर्धकांतून अंतिम ङ्गेरीत पोहोचलेल्या ४६ स्पर्धकांत आदिती लोखंडे लिटल चॅम्प्स, सुधीर पटर्वन ओल्ड इज गोल्ड, अंजली पांगरे सर्वसाधारण आणि विश्‍वजीत कांबळे युवा हे पुणे आयडॉलचे विजेते ठरले. मुक्ता लिमये, काशिनाथ गायकवाड, निहार मयेकर, स्नेहा गायकवाड उपविजेते ठरले. यांना प्रत्येकी पंधरा व दहा हजार रुपये पारितोषिक व मानाचा मुगुट प्रदान करण्यात आला. लिटल चॅम्पसमधील तनिष वासुमलिक व युवा गटातील साहिल शेख यांना दहा व पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. संयोजक आमदार विनायक निम्हण यांनी सर्वांचे स्वागत केले. महादेव निम्हण, अशोक मानकर, राहूल कदम, रणजीत अभिनकर, सुनील काशिद, नगरसेवक विशाल धनवडे, मधुरा वाळंज, सनी निम्हण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. जीतेंद्र भुरूक, मेधा चांदवडकर, जयश्री ओक, गङ्गार मोमीन यांनी परिक्षण केले. महेश गायकवाड यांनी निवेदन केले. उमेश वाघ, अनिकेत कपोते, हेमंत डाबी, प्रविण डोंगरे, अशोक काकडे यांनी संयोजन केले.

साम,दाम,दंड वापरून लोकशाहीचा अनादर करू पहाणाऱ्या भाजपला दणका म्हणून आनंद -रुपाली पाटील

पुणे -कर्नाटकातील भाजपचा बहुमताचा कांगावा न्यायालयाच्या निर्णयामुळे उघड झाल्याने- मनसेच्या रुपाली पाटील, कॉंग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी बाजीराव रस्त्यावर फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला . यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी साखर वाटून ,पेढे वाटून, फटाके फोडून येथे मोदींविरोधात घोषणाबाजी करत , आनंदोत्सव साजरा केला.

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.आणि अखेर कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर पडदा पडला. याचे जोरदार सेलिब्रेशन पुण्यात कॉंग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी केलं .

हे सर्वपक्षीय सेलिब्रेशन करण्याचे कारण म्हणजे भाजपने हिटलरशाही पद्धतीने राजकारण खालच्या पातळीवर नेवून ठेवलेल्या राजकारणाला चपराक बसल्याने केल्याचे मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण त्यामुळे काळ सोकावत होता. भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून लोकशाहीला झुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना बसलेल्या दणक्याचे आम्ही एकत्रित सिलिब्रेशन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात काँग्रेसच्या कमल व्यवहारे, हृषीकेश बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रसचे अजय दराडे, संग्राम होनराव, शिवसेनेचे नितीन परदेशी, चंदन साळुंके, मनसेचे वसंत खुटवड, मनीषा कावेडिया आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बाबासाहेबांच्या संविधानाने ‘बहुमताचं ढोंग उघडं पाडलं'(कॉंग्रेस भवनातील आनंदोत्सव पहा -व्हिडीओ)

कुटील कारस्थानी राजकारणाचे डावपेच उधळून लावले

पुणे- संविधानाने दणका दिल्याने ‘अखेर झुठे का मुह काला’ झाला  -हा लोकशाहीचा विजय आहे, भारतीय संविधानाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया देत आज पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे आणि कॉंग्रेसच्या नेते ,कार्यकर्त्यांनी  फटाके फोडत ,लाडू,पेढे वाटत कॉंग्रेस भवनात आनंदोत्सव साजरा केला  कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसतानाही कुटील राजकारण करून सत्ता लाटण्यासाठी भाजपने रचलेले कुटील कारस्थानांचे मनसुबे हे न्यायालयाने जर आहे बहुमत तर ४८ तासात सिद्ध करा असे आदेश दिल्याने लबाड लांडगी उघडी पडली आणि याबाबत  जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले. 

येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर अखेर पडदा पडलाय. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. या घटनेमुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित सत्तेचा दावा करण्यास पात्र ठरले आहेत. याचे जोरदार सेलिब्रेशन पुणे शहर काँग्रेसने केल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले. यावेळी शहरातील ऐतिहासिक काँग्रेस भवनासमोर ढोल ताशा वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे,माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी ठेका धरला. कमल व्यवहारे,नीता रजपूत आदी  महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून या घटनेचा आनंद व्यक्त केला. शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच मोहन जोशी या वेळी काय म्हणाले … कॉंग्रेस भवनात कसा साजरा झाला आनंदोत्सव …पहा एक व्हिडीओ झलक …

इव्हीएम हटावो -बॅॅलेट पेपर लावो ; काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे-कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ‘EVM हटाव लोकशाही बचाव’ या मागणीसाठी आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष तथा खासदार वंदना चव्हाण व अखिल भारतीय कॉंग्रेस पुणे शहर कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश
बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व इतर प्रादेशिक निवडणूकींमध्ये EVM मशीनमध्ये व निवडणूक प्रक्रियेमध्येफेरफार होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. तसेच एकंदर मतदान प्रक्रियेमध्ये बरीच अनियमितता आढळून येत आहे. या EVM मशीनच्या सदोष प्रणालीमुळे लोक रस्त्यावर उतरून उपोषण आणि मोर्चे काढत आहे तर दुसरया बाजूला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहे आणि म्हणूनच सामान्य मतदारांच्या हक्कासाठी कॉंग्रेस व
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर ,अंकुश काकडे , दीपक मानकर ,मोहन जोशी, कमल व्यवहारे, , अरविंद शिंदे, चेतन तुपे,  रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, अविनाश बागवे, बाबुराव चांदेरे,योगेश ससाणे, दीप्ती चौधरी,बाळासाहेब अमराळे,रुपाली चाकणकर  आणि अनेक काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 कर्नाटकसह अनेक निवडणुकांमध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत तफावत आढळली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशिनचा फेरविचार व्हायला हवा. अनेक मोठ्या देशांमध्येही बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाते. त्यामुळे आपल्याकडेही सर्व निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश  बागवे यांनी केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शहराध्यक्ष तथा खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील मतदानाच्या अकड्यांची तफावत समोर मांडत भाजप सरकारच्या भेसळ कारभाराची पोलखोल केली. आपल्या भाषणात त्या बोलताना म्हटल्या, “ परिपक्व निवडणूक म्हणजे, अचूक
प्रक्रिया राबवत मतदारामध्ये विश्वास करणे होय आणि त्यासाठीची संपुर्ण जबाबदारी ही सत्ताधार्यांची आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या परिच्छेद क्र.२९ नुसार निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी EVM
मशीन VVPAT प्रणालीला जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे निपक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल. तसेच परिच्छेद क्र. ३१ नुसार VVPAT प्रणालीसाठी सरकारने आवश्यक आर्थिक निधी दिला पाहिजे असे असताना देखील याबाबत शिताफीने दुर्लक्ष हे सत्ताधारी करत” असल्याची टिका यावेळी चव्हाणांनी केली. पुढे
बोलताना त्या म्हणाल्या, “ सत्ताधारी भाजप पक्षाचे डॉ.सुब्रामन्याम स्वामी यांनी सुद्धा EVM मशीनबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
राज्यसभेत अल्प कालावधीसाठी चालू असलेल्या निवडणूक प्रक्रिया सुधारणा संबधित चर्चे दरम्यान मी देखील EVM मशीनसंदर्भातआणि निवडणूक प्रक्रियेविषयक अनेक प्रश्‍न उपस्थित केले होते. तसेच पुणे महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतील त्रुटींकडे देखील लक्ष वेधले होते.

डीएचएफएल एनसीडी विक्रीला 22 मे रोजी सुरुवात

  • 9.10% पर्यंत वार्षिक व्याजदरासह 3, 5, 7, 10 वर्षे कालावधीचे पर्याय
  • सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 एनसीडींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीच्या वेळी 1.00% पर्यंत अतिरिक्त एकरकमी इन्सेन्टिव्ह दिला जाणार
  • ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीच्या सबस्क्रिप्शनवर अतिरिक्त 0.10% व्याज
  • बदलता व्याजदर असलेल्या एनसीडीसाठी बेंचमार्क ओव्हरनाईट एमआयबीओआर

 

  • ट्रिपल ए रेटिंग : केअरकडून “केअर एएए” (ट्रिपल ए); “बीडब्लूआर एएए” आउटलूक (बीडब्लूआर ट्रिपल ए) : ब्रिकवर्ककडून स्टेबल
  • सर्व सीरिजसाठी मिळून किमान अर्जाचे प्रमाण 10,000 रुपये
  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार एनसीडी दिले जाणार[1]
  • गुंतवणूकदारांना डीमटेरिअलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील एनसीडींसाठी अर्ज करण्याची सुविधा
  • डिमॅट स्वरूपातील एनसीडींवर टीडीएस आकारला जाणार नाही
  • एनसीडींची नोंदणी बीएसई व एनएसई येथे करण्याचे प्रस्तावित

 

पुणेमे 19, 2018: दीवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (“डीएचएफएल” किंवा “कंपनी”) या नॅशनल हौसिंग बँकेकडे (एनएचबी) नोंदणीकृत असलेल्या भारतातील एका आघाडीच्या खासगी हौसिंग फायनान्स कंपनीने प्रत्येकी 1000 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3000 कोटी रुपयांच्या (“बेस इश्यू साइझ”) व 9000 कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्राइब करण्याचा पर्याय असलेल्या एकूण 12,000 कोटी रुपयांच्या (“ट्रॅंच 1 इश्यू लिमिट”) (“ट्रॅंच 1 इश्यू”) 12 कोटी सिक्युअर्ड रीडीमेबल नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (“एनसीडी”) खुल्या विक्रीला मे 22, 2018 रोजीपासून सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे आणि ही विक्री मे 14, 2018 रोजीच्या ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टसद्वारे केली जाणार असून त्यामध्ये या ट्रॅंच 1 इश्यूच्या (“ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टस”) अटी व शर्तींचा समावेश आहे व त्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र, मुंबई(“आरओसी”), स्टॉक एक्स्चेंजेस व सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) यांच्याकडे दाखल केलेल्या मे 14, 2018 रोजीच्या शेल्फ प्रॉस्पेक्टसबरोबर (“शेल्फ प्रॉस्पेक्टस”) विचारात घ्याव्यात. शेल्फ प्रॉस्पेक्टस व ट्रॅंच 1 प्रॉस्पेक्टस यांच्यापासून प्रॉस्पेक्टस(“प्रॉस्पेक्टस”) तयार झाला आहे.

हा इश्यू जून 4, 2018 रोजी बंद होणार असून, कंपनीचे संचालक मंडळ (“बोर्ड”) किंवा एनसीडी पब्लिक इश्यू कमिटीने यांनी घेतलेल्य निर्णयानुसार इश्यू लवकर बंद करण्याचा किंवा त्यास वाढीव मुदत देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

ट्रिपल एएए रेटिंग

विक्री करण्याचे प्रस्तावित असलेल्या एनसीडींना 15,000 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी केअर रेटिंग्ज लिमिटेडकडून (“केअर”) एप्रिल 27, 2018 रोजीच्या पत्राद्वारे ‘केअर एएए; स्टेबल (ट्रिपल ए; आउटलूक: स्टेबल)’ रेटिंग व ब्रिकवर्क रेटिंग्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून(“ब्रिकवर्क”) एप्रिल 27, 2018 रोजीच्या पत्राद्वारे (15,000 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी) ‘बीडब्लूआर एएए” (बीडब्लूआर ट्रिपल ए) आउटलूक: स्टेबल’ आउटलूक मिळाला आहे. केअर एएए रेटिंग; केअर व बीडब्लूआर एएए, आउटलूक: स्टेबल मिळाल्याचे विचारात घेता, असे रेटिंग मिळालेली साधने आर्थिक आश्वासने व जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित असल्याचे समजले जाते.

 डीएचएफएलचे ट्रेझरी हेड भारत पारीक यांनी सांगितले,

गेल्या काही वर्षांमध्ये, डीएचएफएल अतिशय स्पर्धेच्या स्थितीतही उल्लेखनीय प्रगती करत आहे. भारतात सर्वत्र आर्थिक समावेशकतेला चालना देण्यासाठी आणि 2022 पर्यंत सर्वांना घरे पुरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये योगदान देण्यासाठी कंपनी सक्रियपणे काम करत आहे. आम्ही प्रगतीच्या पुढील टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाढीच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये जाहीर केली जात असलेली ही तिसरी एनसीडी विक्री डीएचएफएलच्या भविष्यातील नियोजनाला मोठी चालना व बळ देणार आहे. यामुळे आमच्या बॉरोइंग पोर्टफोलिओमध्येही वैविध्य येणार आहे.

 आपल्या भागधारकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याच्या डीएचएफएलच्या प्रयत्नांना अनुसरून, कंपनीने बदलते व्याजदर असलेल्या एनसीडीची घोषणा केली असून त्यासाठी बेंचमार्क ओव्हरनाइट एमआयबीओआर आहे. एमआयबीओआरशी संबंधित एनसीडींसाठी व्याजदर एफबीआयएलने जाहीर केलेल्या व्याजदरावर आधारित असतील व ते वार्षिक पद्धतीने दिले जातील. आम्ही वार्षिक 9.10% पर्यंत आकर्षक व्याजदर, सुरुवातीच्या सबस्क्रिप्शनवर मुदतपूर्तीच्या वेळी 1.00% पर्यंत अतिरिक्त एकरकमी इन्सेन्टिव्ह व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त0.10% व्याज देणार आहोत. संबंधित घटकांचा प्रचंड विश्वास व परवडणारे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी बांधिलकी यामुळे डीएचएफएल प्रगतीच्या महत्त्वाकांक्षी योजना साकार करण्याच्या दृष्टीने आणखी एक एनसीडी विक्री यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास आहे.

 सर्व पर्यायांच्या एनसीडींसाठी अर्जाची किमान रक्कम 10,000 रुपये आहे व त्यानंतर एकच्या (1) पटीत अर्ज करता येईल. एनसीडी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार दिले जातील (ओव्हरसबस्क्रिप्शनची तारिख वगळता, सदर तारखेला अर्ज करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना विशिष्ट प्रमाणात एनसीडी दिले जातील). गुंतवणूकदारांना डीमटेरिअलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील एनसीडींसाठी अर्ज करण्याची सुविधा असेल.

 इश्यूची रचना:

  • सीरिज 1 मध्ये, कालावधी 3 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 यासाठी व्याजदर 8.90%; सर्व कॅटेगरींसाठी लागू असलेले उत्पन्न 8.90% असेल.

सीरिज 2 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%असेल.

सीरिज 3 मध्ये, कालावधी 7 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%असेल.

सीरिज 4 मध्ये, कालावधी 10 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता वार्षिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.90% आहे; कॅटेगरी 3 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.00% व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 9.10% आहे; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90% असेल; कॅटेगरी 3 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00% व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.10% असेल.

सीरिज 5 मध्ये, कालावधी 3 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता मासिक असेल; कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 यासाठी व्याजदर 8.56%; सर्व कॅटेगरींसाठी लागू असलेले उत्पन्न 8.90%.

सीरिज 6 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याज देण्याची वारंवारिता मासिक असेल; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.56%; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी व्याजदर 8.65%; कॅटेगरी 1 व कॅटेगरी 2 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 8.90%; कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 मधील गुंतवणूकदारांसाठी उत्पन्न 9.00%.

बदलते व्याजदर असलेले एनसीडी

सीरिज 7 मध्ये, कालावधी 5 वर्षे आहे व व्याजदर बेंचमार्क एमआयबीओआर अधिक 2.16% स्प्रेड. बेंचमार्क एमआयबीओआर म्हणजे एफबीआयएलने जाहीर केलेला, वार्षिक पद्धतीने मोजलेला व ओव्हरनाइट एमआयबीओआर बेंचमार्क दरानुसार वार्षिक पद्धतीने बदलला जाऊ शकणारा बेंचमार्क ओव्हरनाइट एमआयबीओआर असतो. पहिल्या वर्षाच्या अखेरीस दिला जाणारा बदलता व्याजदर संबंधित कॅल्क्युलेशन पिरिअड अधिक लागू असलेले 2.16% चे फिक्स्ड स्प्रेड यासाठी बेंचमार्क एमआयबीओआर असेल. उदाहरणार्थ, वार्षिक पद्धतीने मोजलेला6.01% ओव्हरनाइट एमआयबीओआर 6.19% असेल. व्याज देण्याच्या पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या तारखेसाठी संबंधित कॅल्क्युलेशन पिरिअडसाठी हा दर पुन्हा मोजला जाईल.

ज्येष्ठ नागिरकांसाठी लाभ

 डीम्ड डेट ऑफ अॅलॉटमेंटच्या दिवशी ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रस्तावित ट्रॅंच 1 इश्यूच्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांना दरवर्षी0.10% जास्तीचा व्याजदर दिला जाईल, मात्र त्यासाठी ट्रॅंच 1 इश्यूअंतर्गत देण्यात आलेले एनसीडी या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांनी संबंधित व्याजदर लागू होण्यासाठीच्या संबंधित रेकॉर्ड डेटपर्यंत कायम ठेवणे गरजेचे आहे. हा लाभ सुरुवातीच्या सबस्क्रिप्शन रकमेपेक्षा जास्त रकमेवर लागू असणार नाही.

अतिरिक्त लाभ

 डीम्ड डेट ऑफ अॅलॉटमेंटच्या दिवशी सुरुवातीला एनसीडी देण्यात आलेल्या, प्रस्तावित ट्रॅंच 1 इश्यूच्या कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांना सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 यासाठी अनुक्रमे 0.50%, 0.70%, 1.00% व 0.50% असा एकदा अतिरिक्त लाभ दिला जाईल व ही रक्कम व्याजाच्या रकमेबरोबर दिली जाईल, मात्र शेवटच्या व्याजासह सर्व व्याज दिले जाण्यासाठी कॅटेगरी 3 व कॅटेगरी 4 गुंतवणूकदारांनी सीरिज 2, सीरिज 3, सीरिज 4 व सीरिज 6 याअंतर्गतच्या एनसीडीतील गुंतवणूक संबंधित रेकॉर्ड तारखेपर्यंत कायम ठेवणे आवश्यक आहे. हा लाभ सुरुवातीच्या सबस्क्रिप्शन रकमेपेक्षा जास्त रकमेवर लागू असणार नाही.

[कॅटेगरी 4 गुंतवणूकदार (रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर) म्हणजे, एनसीडीच्या सर्व सीरिजसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी कार्टाद्वारे अर्ज करणाऱ्या निवासी भारतीय व्यक्ती व एचयूएफ. कॅटेगरी 3 गुंतवणूकदार (हाय नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स किंवा एचएनआय) म्हणजे, एनसीडीच्या सर्व सीरिजसाठी 10 लाख रुपयांपर्यंतहून अधिक रकमेसाठी कार्टाद्वारे अर्ज करणाऱ्या निवासी भारतीय व्यक्ती व एचयूएफ].

एनसीडीच्या खुल्या विक्रीतून मिळालेल्या निव्वळ रकमेपैकी किमान 75% रक्कम पुढील कर्जे, वित्तपुरवठा आणि कंपनीच्या सध्याच्या कर्जावरील व्याज व मुद्दलाची परतफेड/मुदतीपूर्वी फेड यासाठी वापरली जाणार आहे. जास्तीत जास्त 25% रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशाने वापरली जाईल.

या शेल्फ प्रॉस्पेक्टस ट्रँच 1 प्रॉस्पेक्टसद्वारे दिल्या जाणाऱ्या एनसीडीची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)व बीएसई लिमिटेड (“बीएसई”) येथे करण्याचे प्रस्तावित असून, बीएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.

एनसीडी इश्यूसाठी लीड मॅनेजर्स आहेत – येस सिक्युरिटीज (इंडिया) लि., एडलविस फिनान्शिअल सर्व्हिसेस लि., ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लि., अॅक्सिस बँक लिमिटेड, ग्रीन ब्रिज कॅपिटल अॅडव्हॉयजरी प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल होल्डिग्स लिमिटेड, इंडसइंड बँक लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड व ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हॉयजर्स प्रायव्हेट लिमिटेड.

डीएचएफएलविषयी

भारतातील निम-शहरी व ग्रामीण भागातील अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहक वर्गांना वित्तीय सेवा देण्याच्या उद्देशाने सन 1984 मध्ये दिवंगत श्री राजेश कुमार वधावन यांनी डीएचएफएलची स्थापना केली. आज, डीएचएफएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वधावन यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आज देशव्यापी जाळ्याद्वारे एलएमआय श्रेणीतील लाखो ग्राहकांना सेवा देत आहे. डीएचएफएलला केअर एएए (ट्रिपल ए) मानांकन मिळाले आहे व ब्रिकवर्क्स रेटिंगकडून बीडब्लूआर एएए मिळाले आहे.

गेली 34 वर्षे, डीएचएफएलने ग्राहकांना विविध प्रकारची गृहकर्जे उपलब्ध केली असून त्यामध्ये घरे, निवासी प्लॉट, बांधकाम यासाठी कर्जे, एलएपी किंवा मालमत्तेवर कर्जे, तसेच मॉर्गेज, बिगर-निवासी व प्रकल्प कर्जे यांचा समावेश आहे. कंपनीने इतक्या वर्षांत निर्माण केलेले विस्तृत जाळे, ग्राहकांच्या गरजांचे सखोल आकलन यामुळे डीएचएफएलला भारतातील लहान शहरांतील एलएमआय ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार आर्थिक सुविधा देणे शक्य होते. उद्योगाचा भक्कम पाया व या क्षेत्रातील कौशल्य यामुळे डीएचएफएल ही भारतातील एलएमआय ग्राहक श्रेणीतील ग्राहकांना घर घेणे शक्य करण्यासाठी प्रयत्न केंद्रित करणारी, अत्यंत प्रतिष्ठित व विश्वासार्ह वित्तीय सेवा कंपनी आहे. डीएचएफएलचे सीएसआर उपक्रम हा परिणामकारकरित्या राबवल्या जाणाऱ्या आणि आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, दुष्काळाचा सामना व अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन (ईसीसीई) यावर भर असलेला ग्रामीण विकास याद्वारे आर्थिक सबलीकरण करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे, या कंपनीच्या मूल्यांचा अविभाज्य भाग आहे. डीएचएफएलची प्रतिनिधी कार्यालये दुबई, लंडन व यूएई येथेही आहेत.

आरसीबीसी करंडक ब्राँझ सिरिज टेनिस स्पर्धेत अलिना शेख, सिमरन छेत्री, अहाना अट्टावर, श्रावणी देशमुख यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 19 मे 2018: 150 व्या वर्धापनदिनानिमित्त रॉयल कनॉट बोट क्लब यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए मानांकन आरसीबीसी करंडक ब्राँझ सिरिज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात   अलिना शेख, सिमरन छेत्री, अहाना अट्टावर, श्रावणी देशमुख   या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

रॉयल कनॉट बोट क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित अलिना शेखने स्वरा खोलेचा 6-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित सिमरन छेत्रीने डेलिशा रामगट्टाचा 6-3असा, तर तिसऱ्या मानांकित  अहाना अट्टावरने अनन्या देशमुखचा 6-0असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित श्रावणी देशमुखने रितिका मोरेचे आव्हान 6-0असे मोडीत काढले.

मुलांच्या गटात  उप-उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित पार्थ देवरुखकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अमोघ दामलेचा 6-2असा पराभव केला.  अवनीश चाफळे याने दहाव्या मानांकित मनन अगरवालचा 6-1असा तर,  चौथ्या मानांकित श्लोक गांधीने देवेन चौधरीला 6-1असे नमविले.  प्रणव इंगोळे याने साईराज साळुंखेचा टायब्रेकमध्ये 6-5(10-8)असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी: पार्थ देवरुखकर(1)वि.वि.अमोघ दामले 6-2;अवनीश चाफळे वि.वि.मनन अगरवाल (10) 6-1; श्लोक गांधी(4)वि.वि.देवेन चौधरी  6-1; अभिनीत शर्मा(11)वि.वि.उत्तीयो मजुमदार 6-4; वेदांग काळे(5)वि.वि.वल्लभ पवार  6-3; केयूर म्हेत्रे(2)वि.वि.स्वराज ढमढेरे(13)6-0; पियुष जाधव(3)वि.वि.ध्रुव लिगाडे 6-2; प्रणव इंगोळे वि.वि.साईराज साळुंखे 6-5(10-8);

12 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी: अलिना शेख(1)वि.वि.स्वरा खोले 6-0; सिमरन छेत्री(4)वि.वि.डेलिशा रामगट्टा  6-3; अहाना अट्टावर(3)वि.वि.अनन्या देशमुख 6-0; श्रावणी देशमुख(2)वि.वि.रितिका मोरे 6-0.

पुण्याच्या मानस धामणेला राष्ट्रीय विजेतेपद मुलींच्या गटात तेजस्वी दबस हिला विजेतेपद

0

दुहेरीत मुलांच्या गटात हर्ष फोगट व ऋषील खोसला यांना, तर मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांना विजेतेपद  

मुंबई, 19 मे, 2018 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात दिल्लीच्या तेजस्वी दबस यांनीतर  मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या  मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत मुलांच्या गटात  हर्ष फोगट व ऋषील खोसला यांना, तर मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांनी विजेतेपद पटकावले.  

जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित मानस धामणे याने पश्चिम बंगालच्या दहाव्या मानांकित रोहन अगरवालचा 6-2, 6-4असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना सुमारे तास मिनिटे चालला.  पहिल्या सेटमध्ये मानसने पहिल्याच गेममध्ये रोहनची सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये मानसने वर्चस्व कायम राखत पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा   6-2,असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 2-2 अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर मानस याने नेटजवळून आक्रमक खेळ करत रोहनची पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4असा जिंकून विजेतेपद मिळवले. दुहेरीत अंतिम फेरीत हर्ष फोगट व ऋषील खोसला या जोडीने मानस धामणे व प्रणव रेथीन यांचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 2-6, 10-4असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.  मानस धामणे हा एनसीएल येथे प्रशिक्षक संदीप कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो 

मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात दिल्लीच्या सहाव्या मानांकित तेजस्वी दबसने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या चांदणी श्रीनिवासनचा 6-0, 6-1 असा सनसनाटी पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना सुमारे दोन तास चालला. दुहेरीत मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु यांनी निराली पदनिया व सौम्या रोंडे यांचा 6-0, 6-1असा पराभव करून विजेतेपद मिळवले.  

स्पर्धेचे पारितोषिक वितरण जर्मनीचे राजदूत डॉ.युरजेन मोर्हाड आणि पेट्रा मोर्हाड, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ व्हाईट बॅच ऑफिशियल लीना नागेशकर आणि स्पर्धा संचालक मनोज वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल:  अंतिम फेरी: एकेरी गट:12वर्षाखालील  मुली: तेजस्वी दबस(दिल्ली)(6)वि.वि.चांदणी श्रीनिवासन (गुजरात)(3) 6-0, 6-1; 

12वर्षाखालील मुले:मानस धामणे (महा)(4)वि.वि.रोहन अगरवाल(पश्चिम बंगाल)(10) 6-2, 6-4;   

दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: हर्ष फोगट/ऋषील खोसला(1)वि.वि.मानस धामणे/प्रणव रेथीन 7-6(4), 2-6, 10-4

मुली: श्रुती अहलावाट/मलिष्का कुरामु वि.वि.निराली पदनिया/सौम्या रोंडे 6-0, 6-1.