पुणे- शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे १०००० पेक्षा जास्त नागरिकांना चावा भटक्या कुत्र्यांनी घेऊन गंभीर इजा केली आहे. याबाबत प्रशासन डोळ्यावर पट्टी गप्प आहे . काही दिवसांपूर्वी लेखिका मंगला गोडबोले यांना भटक्या कुत्र्यांनी जखमी केले होते. पाठीमागून आलेल्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. त्यांनी कुत्र्याला हाकलले असता आणखी काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली पुणे महापालिकेच्या आवारात आज दुपारी निदर्शने केली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या मोटारीसमोर तीव्र आंदोलन करून पुणेकर नागरिकांना भटक्या कुत्र्या पासून संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली .
यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे याना निवेदन देण्यात आले . या आंदोलनात महिला प्रमुख निता अडसुळे , सीताराम गंगावणे , सुशिला सोनवणे , संदीप शेंडगे , मुकेश गायकवाड , राकेश साबळे , आप्पा आखाडे , बाळू गायकवाड , सचिन सावंत , अमोल धनावडे , दीपक बलाढे ,शरद घोडके , प्रकाश म्हस्के , ममता जोगदंड , अनिता चव्हाण , मीना गवळी , नीलम गायकवाड , राजश्री चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .