पुणे, 19 मे 2018: 150 व्या वर्धापनदिनानिमित्त रॉयल कनॉट बोट क्लब यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए मानांकन आरसीबीसी करंडक ब्राँझ सिरिज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात अलिना शेख, सिमरन छेत्री, अहाना अट्टावर, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
रॉयल कनॉट बोट क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित अलिना शेखने स्वरा खोलेचा 6-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. चौथ्या मानांकित सिमरन छेत्रीने डेलिशा रामगट्टाचा 6-3असा, तर तिसऱ्या मानांकित अहाना अट्टावरने अनन्या देशमुखचा 6-0असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित श्रावणी देशमुखने रितिका मोरेचे आव्हान 6-0असे मोडीत काढले.
मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित पार्थ देवरुखकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अमोघ दामलेचा 6-2असा पराभव केला. अवनीश चाफळे याने दहाव्या मानांकित मनन अगरवालचा 6-1असा तर, चौथ्या मानांकित श्लोक गांधीने देवेन चौधरीला 6-1असे नमविले. प्रणव इंगोळे याने साईराज साळुंखेचा टायब्रेकमध्ये 6-5(10-8)असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी: पार्थ देवरुखकर(1)वि.वि.अमोघ दामले 6-2;अवनीश चाफळे वि.वि.मनन अगरवाल (10) 6-1; श्लोक गांधी(4)वि.वि.देवेन चौधरी 6-1; अभिनीत शर्मा(11)वि.वि.उत्तीयो मजुमदार 6-4; वेदांग काळे(5)वि.वि.वल्लभ पवार 6-3; केयूर म्हेत्रे(2)वि.वि.स्वराज ढमढेरे(13)6-0; पियुष जाधव(3)वि.वि.ध्रुव लिगाडे 6-2; प्रणव इंगोळे वि.वि.साईराज साळुंखे 6-5(10-8);
12 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी: अलिना शेख(1)वि.वि.स्वरा खोले 6-0; सिमरन छेत्री(4)वि.वि.डेलिशा रामगट्टा 6-3; अहाना अट्टावर(3)वि.वि.अनन्या देशमुख 6-0; श्रावणी देशमुख(2)वि.वि.रितिका मोरे 6-0.