Home Blog Page 3131

आम्हाला अटक केली पण अखेर पावसाने पोलखोल केलीच कि – चेतन तुपे पाटील (व्हिडीओ)

पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना कदाचित आम्ही उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांना इमारतीच्या अपुऱ्या अधुऱ्या कामाची माहिती देवू असे वाटल्याने अक्षरशः मोकळ्या मनाने स्वागत करायला उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी अटक करविली ,कार्यक्रम स्थळी येण्यास पासेस देवूनही  अटकाव केला पण शेवटी नव्या इमारतीच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल पावसाने केलीच असा आरोप करत आज महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली … पहा ऐका नेमके चेतन तुपे पाटील काय म्हणाले …आणि सभागृह कसे गळाले…

सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण काम व्हावे -उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू

0

पुणे :  पुणे शहराला  ऐतिहासिक वारसा लाभलेला असून देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे. महानगरपालिकेने सुंदर सभागृह बांधले असून या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावे आणि  सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे, असे प्रतिपादन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्‍या नवीन विस्‍तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू यांच्‍या हस्‍ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमास  केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्‍याचे अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्‍याचे सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा व जलसंधारण राज्‍यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मनपा आयुक्त सौरभ राव आ‍दि उपस्थित होते.

आपण अनेक ठिकाणी जावून आलो पण असे सुंदर आणि देखणे सभागृह कुठेही पाहायला मिळाले नाही, असे गौरवोद्गार काढून उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू पुढे म्हणाले, या शहराविषयी नेहमीच मनात आदर व आकर्षण राहिले आहे. या शहराने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहे. मुंबईनंतर देशात पुण्याची  ओळख आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या या पुणे शहराने केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर निर्माण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे. नागरिकांना कालचे पुणे, आजचे पुणे आणि उद्याचे पुणे याबाबत समजावून सांगितल्यास त्यांचाही सहभाग याकामी लाभू शकतो. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करुन देतांनाच ऑनलाईन सुविधा पुरविण्याच्या प्रयत्न केला जावा. रस्ते तसेच नद्यांवरील अतिक्रमणे दूर व्हावीत, नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जावू नये. यासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शारीरिक श्रम नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे नमूद करुन त्यांनी सायकल ट्रॅक्सची आवश्यकता प्रतिपादन केली. आरोग्य हीच संपत्ती या उक्तीचा उल्लेख करुन ते म्हणाले, धनसंपत्ती असूनही मधूमेह, हायपर टेन्सन या सारखे रोग असतील तर त्या संपत्तीचा काय उपयोग ? महापालिकेने नागरिंकाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी आपल्या प्रमुख भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपराष्ट्रपती या कार्यक्रमासाठी आले, याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. पुणे महानगरपालिकेने सुंदर आणि देखणे सभागृह बांधले आहे. या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याने अधिक महत्व वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार व आचार अंमलांत आणून या सभागृहातून कामकाज चालावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कार्याने ही भूमी पुनित झालेली आहे.

सांस्कृतिक बरोबरच ज्ञाननगरी म्हणून पुण्याचा देशभर नावलौकिक आहे.        21  व्या शतकात मुंबईनंतर पुणे हे विकासाचे इंजिन म्हणून काम करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर व्हावे, यासाठी विविध विकासाची कामे आपण राबवित आहोत. पुणे महामेट्रो, रिंगरोड हे विकासाचे मॉडेल ठरणार आहे. पुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नदीचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याशिवाय स्वारगेट येथे ट्रान्सपोर्ट हब होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे स्मार्ट सिटीचे उद्घाटन झाले होते. त्यांच्या स्वप्नातले हे शहर आदर्श, सुंदर व देखणे होण्यासाठी राज्यशासनाचे पाठबळ असणार आहे.

पुण्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा यापुढेही अधिक जोमाने सुरु राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करुन  मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे. या सभागृहातून चांगले निर्णय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, हे सभागृह देखणे झाले आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करावे.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आपल्या मनोगतात म्हणाले, पुण्याचा डीपी मंजूर झाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या. सामान्यांना केंद्रबिंदू मानून पुण्याचा विकास सुरु आहे. शहराच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पुणे शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करतांना शहराने केलेल्या विकास कामाची व होऊ घातलेल्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमहापौर सिध्दार्थ धेंडे यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

ठळक वैशिष्ट्ये

  • पुणे महानगरपालिकेचे सध्याचे क्षेत्रफळ सुमारे 250 चौ. कि.मी असून नव्याने समाविष्ट 11 गावांसहीत क्षेत्र सुमारे 331 चौ. किमी. इतके झाले आहे. सध्याची लोकसंख्या सुमारे 40 लक्ष  इतकी असून 167 नगरसेवक आहेत. वाढत्या लोकसंख्येचा कारभार त्या त्या भागातून चालण्याच्या दृष्टीने क्षेत्रिय स्तरावरील 15 क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत.
  • पुणे मनपाचा वाढलेला विस्तार विचारात घेऊन अस्तित्वातील इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात एका नवीन विस्तारीत इमारतीचे दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरूपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे अंदाजे 14 हजार चौ.मी. क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
  • या मध्ये तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित असे नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, बँक ए.टी.एम, पीएमपीएमएल पास केंद्र इ. सुविधा करण्यात आल्या आहेत.
  • पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुस-या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्ष यांची दालने तसेच स्थायी समिती सभागृह इतर समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.
  • तिस-या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहाचे व महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभागृहासाठी, लोखंडी फ्रेम व जी.आर.सी. (ग्लास रिनर्फोर्स्ड कॉन्क्रीट) मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची तळापासून सुमारे 60 फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये 224 सभासदांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये 180 नागरिकांकरीता आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस 50 अधिकारी व त्या मजल्यावर सुमारे 50 पत्रकारांसाठी कक्षाची रचना केली आहे.
  • इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, 6 उद्वाहने व वीजेची बचत होणारी एल.ई.डी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीचे बांधकाम हे पर्यावरण पुरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे.
  • आजपर्यंत या कामासाठी सुमारे 48.75 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.       या इमारतीचे बांधकाम सुमारे सव्वातीन वर्षात पूर्ण करण्यात आले असून यामुळे पुणे महानगरपालिकेस नवीन सुसज्ज वास्तू उपलब्ध झाली आहे.

शहरातील प्रलंबित प्रकल्पांसाठी शहर अभियंता बरोबर खासदार शिरोळेंची आढावा बैठक

0
पुणे– शहरातील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी शहर अभियंता श्रीनिवास बोनाला ह्यांच्या समवेत नुकतीच एक बैठक घेतली. ह्या मध्ये शहरातील लुल्लानगर फ्लाय ओवर, कमांड हॉस्पिटल येथील अंडरपास, घोरपडी येथील ओव्हर ब्रिज, रिव्हर फ्रंट विकास, पार्किंग साठी राखीव असलेल्या मिळकती विकसित करणे तसेच चांदणी चौक येथील कामे आदींचा  विस्तृत आढावा खासदार अनिल शिरोळे ह्यांनी घेतला. ह्या बैठकीला नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे , सत्यजित थोरात, जय जोशी आदि उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लुल्लानगर फ्लाय ओवर चे काम पूर्णत्वास असून सप्टेंबर अखेरपर्यंत तो खुला होणार आहे. कमांड हॉस्पिटल जवळील अंडर पास साठी खासदार निधीतून १ कोटी देण्यात आले आहेत. उरलेल्या ३.९ कोटींसाठी बजेट करण्या संबंधी चर्चा झाली. घोरपडी येथील अतिक्रमण हटविण्याचे काम सध्या सुरु असून लवकरच तेथील कामास सुरवात होणार आहे. चांदणी चौकातील कामाचे भूसंपादन लवकर पूर्ण होणाच्या दृष्टीने बैठकीत विचार झाला.
दरम्यान National Waterways Project अंतर्गत समाविष्ट झालेल्या  मुळा मुठा नदींच्या मार्गात महानगर पालिकेने केलेल्या सर्वे नुसार एकूण ४४ किलोमीटर पैकी ३३ किलोमीटर च्या नदी पट्ट्यात हि योजना राबविणे शक्य असल्याचे ह्या सर्वेतून निष्पन्न झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आगामी काळात SPV च्या माध्यमातून हा प्रकल्प कार्यान्वयित करण्याचे नियोजन असल्याचे शिरोळे ह्यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

पुण्यातील छोट्या व मध्यम उद्योगांना आता टाटा टेलीच्या स्मार्टऑफिस सोल्यूशनच्या माध्यमातून ‘डू बिग’ शक्य होणार

स्मार्टऑफिस हा एक असा स्टार्टअप बॉक्स, ज्यायोगे एक नवीन कार्यालय उभे केले जाऊ शकेल आणि व्हॉइस, डेटा, स्टोअरेज व अॅप्लिकेशन्ससह चालवले जाऊ शकेल

पुणे : टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) या भारतातील व्यवसायांना कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्युशन्स देणाऱ्या अग्रगण्य कंपनीने पुण्यातील छोट्या व मध्यम उद्योगांसाठी स्मार्टऑफिस सोल्यूशन आणले आहे. स्मार्टऑफिस हे व्यवसायांच्या माहिती व संवाद तंत्रज्ञानविषयक (आयसीटी) सर्व गरजांची पूर्तता करणारे एक कल्पक सिंगल बॉक्स सोल्यूशन आहे. व्हॉइस, डेटा, स्टोअरेज आणि अॅप्लिकेशन्स हे सर्व एकत्रित देणारे हे एक शक्तिशाली सोल्यूशन आहे. स्मार्ट ऑफिस परवडण्याजोगे, भरवशाचे, बसवण्यास सोपे असून नवीन कार्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. टीटीबीएसच्या पुण्यातील प्रमुख कार्यक्रम डू बिग फोरमदरम्यान या उत्पादनाचे लाँचिंग करण्यात आले. तेथे छोट्या व मध्यम उद्योगक्षेत्रांतील २५० प्रतिनिधींना हे नवीन युगाचे उपकरण/सोल्यूशन पुण्यात प्रथमच बघण्याची संधी मिळाली.

छोटे व मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्ससाठी अनेकविध तंत्रज्ञाने व उपकरणांचे व्यवस्थापन करणे, कॅपेक्स आणि ऑपेक्स (भांडवली खर्च) करणे आणि अनेक व्हेंडर्स व भागीदारांना हाताळणे हे मोठे आव्हान आहे. टीटीबीएसचे स्मार्टऑफिस या सर्व समस्यांवर उत्तर असून, याद्वारे एक दमदार, भविष्यकाळासाठी सज्ज तसेच किफायतशीर आयसीटी सोल्यूशन पुरवले जाते. आयपीपीबीएक्स, डेटा रूटर, वायफाय रूटर, फायरवॉल, डीएचसीपी सर्व्हर आदी एका उद्योगाला दूरसंचार पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी आवश्यक अनेकविध उपकरणांची कार्यात्मकता हे सोल्यूशन एका बॉक्सद्वारे पुरवते. बेसिक रेट इंटरफेसेस, प्रायमरी रेट इंटरफेसेस, स्थानिक पीएसटीएन गेटवेज आदी व्हॉइस आणि डेटासाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा स्थापन करण्याची गरजच या सोल्यूशनने संपवली असून, यामुळे माहितीसंवाद तंत्रज्ञानावर होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.

या उत्पादनाच्या लाँचिंगच्या वेळी टीटीबीएसच्या पश्चिम विभागाचे एसएमई ऑपरेशन्स प्रमुख श्री. मन्नु सिंग म्हणाले, छोट्या व मध्यम उद्योगांना कमी खर्चाची तसेच कल्पक आयसीटी सोल्यूशन्स पुरवण्यासाठी टीटीबीएस कायमच प्रयत्नशील राहिली आहे. पुण्यातील छोट्या व मध्यम उद्योगांना स्मार्टऑफिस सोल्यूशन हा दूरसंचार सेवांसाठी आवश्यक ऑलइनवन बॉक्स उपलब्ध करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. व्यवसायांना, विशेषत: स्टार्टअप्सना, दूरसंचार पायाभूत सुविधांवर पुन्हापुन्हा भांडवली खर्च करावा लागू नये याची काळजी घेऊन आम्ही हा बॉक्स तयार केला आहे.”   

टीटीबीएस दरवर्षी डू इट बिग फोरम्सचे आयोजन करते. हा एक अनेक शहरांमध्ये घेतला जाणारा ग्राहक संवाद तसेच शिक्षण उपक्रम असून यामध्ये सर्व उद्योगक्षेत्रांतील दिग्गजांना निमंत्रित केले जाते. लक्ष्यवेधी उत्पादन व सेवांच्या निर्मितीसाठी, ग्राहकांसोबत वेगाने जोडून घेण्यासाठी आणि पैशाचा पुरेपूर वापर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होत आहे, यावर या दिग्गजांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. हे ग्राहकांशी संवाद साधण्याचे एक व्यासपीठ असून याद्वारे छोट्या व मध्यम उद्योगांपुढील आव्हाने समजून घेण्याचा व त्यांना योग्य ती डिजिटल सोल्यूशन्स पुरवण्याचा प्रयत्न टीटीबीएस सातत्याने करत असते.

टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसविषयी

टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) ही प्रतिष्ठित टाटा समूहातील कंपनी असून, व्यवसायांना कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्यूशन्स पुरवणारी अग्रगण्य कंपनी आहे. या सेवांमध्ये कनेक्टिव्हिटी, सहयोग, क्लाउड, सुरक्षा, आयओटी आणि मार्केटिंग सोल्यूशन्सचा समावेश होतो. टीटीबीएस भारतातील उद्योगांना आयसीटी सेवांची सर्वांत विस्तृत श्रेणी पुरवते. याशिवाय, १२५,००० किलोमीटरचे फायबर ऑप्टिक नेटवर्क, ६०हून अधिक शहरांमध्ये विस्तारलेले कार्यक्षेत्र, १०००हून अधिक भागीदार आणि २०००हून अधिक कर्मचाऱ्यांची सर्वांत मोठी टीम यांच्यासह भारतातील छोट्या, मध्यम व मोठ्या उद्योगांना सेवा देण्यास टीटीबीएस सज्ज आहे. ग्राहककेंद्री दृष्टिकोन व नवकल्पनांवर भर दिल्यामुळे टीटीबीएसला ग्राहकांकडून आणि अन्य व्यवसायांकडून सारखीच मान्यता मिळवण्यात मदत झाली आहे. कंपनीला अलीकडील काळात मिळालेले काही पुरस्कार म्हणजेसीआयआय अॅवॉर्ड फॉर कस्टमर ऑब्सेशन, ईटी टेलिकॉम अवॉर्ड फॉर सेफ्टी अॅप, वर्ल्ड क्वालिटी काँग्रेस अवॉर्ड फॉर एलओएलए (कमी प्रलंबित) सर्व्हिसेस आणि आमच्या वैचारिक नेतृत्व व्यासपीठालाडू बिग सिंपोसिअमला मिळालेले सीएमओ आशिया अवॉर्ड. व्यवसायांना नेहमीच सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सेवा देण्यासाठी टीटीबीएस प्रयत्नशील असते, जेणेकरून व्यवसाय त्यांच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतील, ग्राहकांपर्यंत अधिक प्रभावीरित्या पोहोचू शकतील, मनुष्यबळाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करू शकतील आणि काहीतरी मोठे साध्य करू शकतील (डू बिग).

एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल बनली औषधी गोळ्यांसाठी संपूर्ण पॅकेजिंग सोल्युशन पुरविणारी आरोग्यसेवा क्षेत्रातील भारताची पहिली कंपनी

३०,००० टनांहून अधिक सामग्रीचे उत्पादनामुळे भारतातील

फार्मा श्रेणीच्या पॅकेजिंग उत्पादक कंपन्यांमध्ये एसीजीची गणना

 

 पुणे- : शिरवळ येथे अत्याधुनिक अशी लॅमिनेशन प्रकल्प उभारल्यानंतर एसीजी ही भारतातील आरोग्य गोळ्यांसाठी एकाच ठिकाणी संपूर्ण पॅकेजिंग सोल्युशन पुरविणारी आरोग्य क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे. मूलभूत कच्च्या मालापासून (राळ) तयार फिल्मस् तसेच कच्च्या अॅल्युमिनियम फॉइलपासून पूर्ण लॅमिनेटपर्यंतचे प्राथमिक पॅकेजिंग सामग्रीचे उत्पादन करणारी एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

युरोपीयन तंत्रज्ञानावर आधारित मशिनचा वापर करण्यात येत असून त्याद्वारे कोल्ड फॉर्म लॅमिनेशनस, ब्लिस्टर लिड फॉइल्स आणि विस्तृत अशा वैशिष्ट्यपूर्ण अॅल्युमिनयम लॅमिनेट्ससाठी लेपण, लॅमिनेशन आणि दोन्ही प्रक्रिया करता येतात. या मशीनद्वारे उत्पादित करण्यात आलेल्या लॅमिनेटचा वापर गोळ्या तसेच कॅप्सुलचे पॅकेजिंग तसेच संरक्षण करण्यासाठी औषधनिर्मिती कंपन्यांकडून करण्यात येतो. याशिवाय, एसीजी फिल्म्स अॅण्ड फॉइल्सच्या उत्पादनांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावरील डीएमएफ- यूएसएफडीए, युरोपीयन फार्माकोपिया, कॅनडा –डीएमएफ, आयएसओ प्रमाणपत्र यासारखा आहे.

या प्रसंगी एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. शिवशंकर म्हणाले, `आमच्या शिरवळ येथील प्रकल्पामुळे औषधनिर्मिती कंपन्यांना कॅप्सुल्स आणि गोळ्यांच्या पॅकेजिंग मटेरिअल एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या नव्या प्रकल्पामुळे आमच्या कंपनीची उत्पादनक्षमता आणखी मजबूत झाली आहे. पॅकेजिंगचे काम करण्याच्या दृष्टीने सुरक्षा, संरक्षण, अनुकूलता, दर्जावर नियंत्रण आणि पॅकेजिंग सामग्रीची उपलब्धता यासारख्या गरजांचे नियमनही करण्यात येत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांशी पूर्णपणे बांधिलकी ठेवली असून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या प्रत्येक सामग्री ही दर्जेदार आणि संपूर्ण तपशीलासह पुरविण्यात येते.`

एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्सचे भारत आणि ब्राझील अशा दोन ठिकाणी उत्पादन प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून जगभरातील औषधनिर्मिती आणि त्याच्याशी संलग्न उद्योगांना सेवा पुरविण्यात येते. औषध कंपन्या, मेडिकल डिव्हाईस आणि आरोग्यसेवा उद्योगासाठी विविध प्रकारच्या आणि उच्च दर्जाच्या सुरक्षित पॅकेजिंग फिल्मचे उत्पादन ते करतात. उच्च दर्जाच्या सुरक्षित सामग्रीमुळे गोळ्या किंवा कॅप्सुलच्या पॅकेजमधून किंवा पॅकेजमध्ये पाणी, ऑक्सिजन, प्रकाश आणि गॅस आत-बाहेर जाण्यापासून प्रतिबंध केला जातो.
एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्सची जगभरात विक्री कार्यालये, स्लेटिंग युनिट्स आणि वेअरहाऊसेस आहेत.

एसीजीबद्दल माहिती

एसीजी समूह हा औषधनिर्मिती उद्योगाला एकत्रित अशी मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स उपलब्ध करून देणारी जगातील एकमेव पुरवठादार करणारा समूह आहे. आंतरराष्ट्रीय नियमनांच्या अधिन राहून कंपनी कॅप्सुल्स, फिल्मस् अॅण्ड फॉइल्स, अभियांत्रिकी अशी विविध आणि तपासणी प्रणाली आदी विविध प्रकारचे उत्पादन करते. कॅप्सुल आणि गोळ्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची सामग्री उपलब्ध करून देणे हे एकमेव उद्दीष्ट एसीजीचे आहे. पाच दशकांचा अनुभव असलेल्या एसीजीचा सुमारे १०० देशांमध्ये विस्तार असून जगभरात कंपनीचे सुमारे ४,५०० कर्मचारी आहेत. ग्राहकाभिमुख भूमिकेमुळे अनेक प्रामाणिक, समाधानी ग्राहक आणि भागीदार आम्ही मिळवू शकलो. त्यांच्याशी आम्ही प्रतिष्ठेचे आणि पारदर्शक नाते राखले आहे.

एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्स

पॅकेजिंग क्षेत्रातील एसीजी फिल्मस् अॅण्ड फॉइल्स या कंपनीची जगभरातील उद्योगांना सेवा पुरवणारी कंपनी म्हणून निर्विवाद ओळख आहे. औषध कंपन्या, मेडिकल डिव्हाईस आणि आरोग्यसेवा उद्योगासाठी विविध प्रकारच्या आणि उच्च दर्जाच्या सुरक्षित पॅकेजिंग फिल्मच्या उत्पादनाबद्दल एसीजीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. फार्मास्युटिकल श्रेणीच्या तसेच अॅल्युमिनियम आधारित फॉइल्स, स्पेशॅलिटी पॅकेजिंग फिल्मस्, अत्यंत प्रतिबंधात्मक, बनवाटपणा रोखणारी आणि पॉलिमर फिल्मस् अशी कॅमेरा-इन्स्पेक्टेड विविध उत्पादने एसीजीची आहेत. सर्व उत्पादने डीएमएफ टाईप ३ म्हणून नोंदवण्यात आली असून युरोपीयन फर्माकोपिया आणि सीएफडीएच्या नियमांनुसार आहेत.

​ जेट एयरवेजला बोईंगकडून मिळाले आपले पहिले ७३७ मॅक्स

मुंबई – जेट एयरवेज या भारतातील उच्चभ्रू आंतरराष्ट्रीय एयरलाइन कंपनीला काल बोईंगकडून ७३७ मॅक्स विमान मिळाले. यामुळे कंपनी हे नवीन आणि अत्याधुनिक विमान वापरणारी पहिली कंपनी ठरली आहे. हे विमान दोन आकडी इंधनक्षमता आणि ग्राहकांसाठी अधिक चांगला आरामदायीपणा पुरवणारे आहे.

 नवे ७३७ मॅक्स भविष्यातील आमच्या विकास धोरणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे नवे विमान ग्राहकांना उपलब्ध करून देणारे भारतातील आम्ही पहिलेच आहोत, असे जेट एयरवेजचे अध्यक्ष, नरेश गोयल म्हणाले. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून ७३७ आमच्या ताफ्याचा कणा ठरलेले असून नव्या ७३७ मॅक्समुळे त्फ्यात आणखी चांगल्या क्षमतेचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. सुधारित अर्थकारण आणि इंधनक्षमता तसेच ग्राहकांसाठीचा आरामदायीपणा ही मॅक्सची वैशिष्ट्ये भारतातील उच्चभ्रू एयरलाइन्सचे आमचे स्थान अधिक बळकट करतील.’

जेट एयरवेज ही भारतातील दुसरी सर्वात मोठी विमानकंपनी असून तिच्या ताफ्यात आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि इतरत्र ठिकाणच्या १५ देशांतील ६५ देशांना सेवा देणाऱ्या ११९ विमानांचा समावेश आहे. यात जेट एयरवेजने बोईंगला दिलेल्या पहिल्या १५० ७३७ मॅक्स विमानांचा तसेच २०१५ च्या सुरुवातीला ७५ जेट्सच्या दोन स्वतंत्र कंत्रांटाचा आणि या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या कंत्राटाचा समावेश आहे.

जेट एयरवेज

जेट एयरवेज ही भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे, जी भारत व परदेशातील ६५ ठिकाणी विमानसेवा देते. जेट एयरवेजचे मजबूत नेटवर्क भारतात सर्वत्र पसरले असून त्याअंतर्गत महानगरे, राज्यांची राजधानी शहरे आणि उदयोन्मुख ठिकाणे यांचा समावेश आहे. भारताशिवाय जेट एयरवेज महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणीही सेवा देते. त्यामध्ये दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया, मध्य पूर्व, युरोप आणि उत्तर अमेरिका यांचा समावेश आहे. जेट एयरवेज समूह सध्या ११९ विमानांचा ताफा हाताळत असून त्यात बोईंग ७७७-३०० ईआरएस, एयरबस ए३३०-२००/३००, आधुनिक बोईंग ७३७ आणि एटीआर ७२- ५००/६०० यांचा समावेश आहे.

शेतीच्या शाश्वत विकासासाठी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

0

पुणे  : शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रांना बळकट करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कृषी उत्पादनाच्या विपणन व्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्याकडील तंत्रज्ञानात भर घालण्यासाठी सर्वांना  शेतकऱ्यांसोबत काम करावे लागेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज व्यक्त केले.

येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्येआयोजित “कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर” बनविण्याविषयी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी तज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, एस. के. पट्टनायक, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, आंध्रप्रदेशचे माजी कृषीमंत्री व्ही.  राव, अशोक गुलाटी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत  बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी उत्पादनात आपण मोठी प्रगती केली असून  अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र यापुढे आपल्याला रासायनिक खते व औषधांच्या वापरावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.तरच आपण शाश्वत शेतीकडे जावू शकतो. शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळत नसल्याने अनेक जण शेतीपासून तुटत आहेत. विविध उपाययोजनांचा अवलंब करून आपल्याला शेतीला शाश्वत केले पाहिजे. तरुणांना शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकताआहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

फळे, भाजीपाला, मसाले, डाळी, आणि ऊस यांसारख्या उच्च मूल्यांच्या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची गरज आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दती, कापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमूकपणे काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला शेती क्षेत्र सुधारण्यासाठी काही अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय शोधून सध्याच्या धोरण व कार्यक्रमांचे सुसूत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील ५० ते ५५ टक्के जनता आजही कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. मात्र राष्ट्रीय सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा केवळ १० टक्के आहे.  यासाठी कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुतंवणूक होण्याची आवश्यकता आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातूनच कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास शक्य आहे. त्यासाठी राज्य शासन कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो, त्यात मान्सूनचा मोठा वाटा आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे कृषी क्षेत्रावर मोठा ताण येतो. जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून या समस्येवर मात करता येते. महाराष्ट्रात “जलयुक्त शिवार” अभियानाच्या माध्यमातून यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जलयुक्त शिवार’ अभियान हे शास्त्रशुद्ध प्रक्रीया असणारी चळवळ आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक खेडी जलस्वयंपूर्ण झाली आहेत. शेकडो गावे पाणीदार झाली असून त्याठिकाणी संरक्षीत  सिंचन शेतीसाठी उपलब्ध झाले आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या ८० टक्के पाऊस होऊनही शेती उत्पादन ११० टक्के झाले, हे योग्य प्रकारे जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनामुळेच शक्य झाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जलसंधारणाच्या विविध उपययोजनांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याने कृषी मालाच्या दरा विषयी अडचण निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य दर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठया प्रमाणावर कृषिमाल खरेदी केला आहे. शाश्वत शेतीसाठी शेती आणि शेतकऱ्यांसमोर मार्केट लिंकेज हे सगळ्यात मोठे संकट आहे.  शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर छोटी जमीनधारणा ही सुध्दा शाश्वत शेतीसमोरील मोठी समस्या आहे. यासाठी शासन गट शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गट शेतीला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना आखण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ते सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात तंत्रज्ञान आणणे आवश्यक असून यासाठी शासन प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्यामाध्यमातून सुरू असणारी “स्वराज्य ते सुराज्य” ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची आहे. या माध्यमातून देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात भारत हा कृषीमाल निर्यातदार देश झाला आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांच्या कौशल्य विकास, व्यापार कौशल्य आणि कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे चर्चासत्र उपयुक्त आहे.

यावेळी  डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी “ग्रीन टू एव्हरग्रीन फॉरेव्हर” या विषयावर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी आपल्या देशातील शेतीसमोर असणाऱ्या विविध आव्हानांचा आढावा घेतला. शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.

योगाच्या माध्यमातून जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश मिळेल -गोविंद गाडगीळ

0
पुणे:“योगामुळे आध्यात्मिक प्रगती साधली जाते. योगसाधना हा आध्यात्मिक उन्नतीचाच मार्ग आहे. नित्य नियमाने योगाचा अभ्यास केल्यास मनाला शांतता मिळेल. योगामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे कार्य केले जात आहे त्यामुळे लोकांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होईल.”असे विचार पतंजली योग समिती (पुणे पश्चिमचे प्रमुख) योग शिक्षक गोविंद गाडगीळ यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेतर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणात योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यावेळी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना गोविंद गाडगीळ बोलत होते.
याप्रसंगी पतंजली योग समितीचे (पुणे पश्चिमचे सदस्य) हेमंत पांचाळ, चित्रा मोहोड, सोनाली चिंचवडे व रूपाली यांनी योगाचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. आय.के.भट, उपकुलगुरू डॉ. मृगानंद, डॉ. जय गोरे, कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर यांच्यासह माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी या योगासन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शांती व उत्तम आरोग्य ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
गोविंद गाडगीळ यांनी योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. गाडगीळ म्हणाले“ ज्ञान योग, कर्म योग, भक्ती योग व योगाभ्यास याला आधुनिक युगात विज्ञानाची जोड दिली आहे. त्याला समजून हा योगाभ्यास केल्यास प्रत्येक मनुष्याला ते संस्काराक्षम बनविण्यास परिपूर्ण आहे. शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. या साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती, परंपरा आणि योगाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने आंतरिक समाधान लाभते. जात, धर्म आणि देशा देशातील अंतरमोडून योग हा संपूर्ण सृष्टीवर पसरला आहे. योग पद्धत ही निसर्गाशी जोडलेली आहे. भारत हा योगाच्या माध्यमातून विज्ञान आणि धर्माला जोडण्याचे कार्य करेल. मन, बुद्धि आणि शरीर याला जोडण्याचे काम योगाच्या माध्यमातून केले जाते. योग हा भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. २१व्या शतकात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याचे दायित्व भारताचे असेल. भारतामध्ये ऋषींनी योगाची रुजवण केली. तीच परंपरा शेलारमामा आणि रामदेवबाबा यांनी पुढे चालू ठेवली.”
डॉ. आय.के.भट म्हणाले,“ वैदिक परंपरेनुसार योगा चालत आलेला आहे. आज त्याला जागतिक योगा डे च्या स्वरूपात साजरा केला जात आहे. हा योगाभ्यास शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक आहे. नियमित याचा अभ्यास केल्यास मानवाला अध्यात्माच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. आदी शंकराचार्य यांनी सुद्धा सांगितले की हे माध्यम बौद्धिक व अध्यात्माच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. डब्ल्यूपीयू ने हा दिवस साजरा करून महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच येथील अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्यामुळे समाजात चांगले व्यक्ति निर्माण करण्यास महत्वाची भूमिका बजावतील.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

पुणे-मुंबई २५ मिनिटांचा जादुई प्रवास -जवळ पोहोचलेले हाइपर स्वप्न (पहा व्हिडीओ)

वर्जिन हाइपरलूप वनच्या सुविधा चाचणीला मुख्यमंत्र्यांची भेट
उत्तर लास वेगास, नेवाडा,-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे अधिकारी यांनी राज्य सरकारच्या प्रतिनिधींनींसह व्हर्जिन हायपरलूपच्या नेवाडातील वाळवंटात असलेल्या पूर्ण-प्रमाणातील हायपरलूप चाचणी साइटला नुकतीच भेट दिली. – भारतातील पहिले हायपरलूप तयार करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात ऐतिहासिक फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी झालेली आहे . वर्जिन हाइपरलूप वनच्या संचालक मंडळाचे प्रतिनिधित्व करणारे जस्टिन फिशनर-वॉल्फसन आणि निक फॉक्स उपस्थित होते. पुणे-मुंबई हाइपरलूप प्रकल्प सध्या उन्हाळ्यातील व्यवहार्यता अभ्यासाच्या मध्यबिंदूपर्यंत पोहचला आहे. “ही अतिशय फलदायी चर्चा होती आणि आम्ही हा प्रकल्प फार लवकर सुरू करण्यास सक्षम व्हायला हवे”, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले

वर्जिन हाइपरलूप वन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यात नोव्हेंबर 2017 मध्ये स्वाक्षरी झालेल्या पूर्व-व्यवहार्यता अभ्यासाच्या निष्कर्षावर व्यवहार्यता अभ्यास तयार केला जातो आहे हाइपरलूप मार्ग मध्य पुणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई 25 मिनिटांत जोडेल. उच्च क्षमतेचा प्रवासी आणि कार्गो हाइपरलूप मार्ग वर्षात 150 दशलक्ष प्रवाशांना पर्यटनास मदत करेल, 90 लाख तासांपेक्षा अधिक प्रवास वेळ वाचवून नागरिकांना अधिक संधी आणि सामाजिक व आर्थिक गतिशीलता प्रदान करेल. हायपरलूप सिस्टममध्ये मुंबई बंदर आणि पुणे यांच्या दरम्यान कमी वजनाच्या माल वाहतुकीची जलद हालचाल करण्याची आणि डिमांड डिलीव्हरीज, पुरवठा श्रृंखला आणि पुढील-पिढीतील लॉजिस्टिक्ससाठी एक मजबूत आधार बनवण्याची क्षमता आहे.” जसजसे ते विस्तृत नियोजन सुरु करत आहेत तसतसा मी पुणे-मुंबई हाइपरलूप प्रोजेक्टला व्हिजनपासून वास्तवाकडे जाताना पाहून खूप उत्सुक झालो आहे. असे सांगून श्री. रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले की, 26 दशलक्ष लोकांना स्वस्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी आहे. “महाराष्ट्र राज्य आणि त्याचे मुख्य भागधारक यांच्यासोबत काम करणे हा एक सन्मान आहे, केवळ त्यांची वाहतुकीबद्दलची दृष्टीच नव्हे तर समाजांत व्यापक परिवर्तन करण्याची दृष्टीही शेअर करणे यात आनंद आहे.”

वर्जिन हाइपरलूप वन द्वारा केलेल्या पूर्ण व्यवहार्यता अभ्यासानुसार पुणे-मुंबई मार्गामुळे 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत सामाजिक-आर्थिक फायदे (वेळ बचत, उत्सर्जन आणि कमी अपघात, परिचालन खर्च बचत, इत्यादी) यासह $ 55 अब्ज (INR 350,000 कोटी) बचत होऊ शकते. 100% इलेक्ट्रिक, कार्यक्षम हायपरलूप सिस्टम एक्सप्रेसवेचा जास्तीचा ताण कमी करेल आणि दरवर्षी 150,000 टन्सपर्यंत ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करू शकेल”परंपरेने, वाहतूक खूपच अनुलंब एकीकृत आहे; व्हर्जिन हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब लॉयड यांनी सांगितले की, भारतात प्रतिभावान आणि तांत्रिक कौशल्य असलेले खूप लोक आहेत. अशा लोकांचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक पुरवठादारांचा आम्ही शोध घेत आहोत. “महाराष्ट्र राज्याने नव्या जागतिक पुरवठा साखळीच्या केंद्रस्थानी आपले स्थान निश्चित केले आहे.”

वर्जिन हाइपरलूप वन बद्दल-

व्हर्जिन हायपरलूप एक ही संपूर्ण जगातली एकमेव कंपनी आहे जिने संपूर्ण संचालन हायपरलूप प्रणाली तयार केली आहे. आमचा कार्यसंघ अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वाहतूक प्रकल्पाच्या प्रस्तुतीमधील जागतिक अग्रगण्य तज्ञ आहे, आता जागतिक भागीदार आणि गुंतवणूकदारांच्या बरोबरीने काम करून हायपरलूप प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत आहे. Virgin Hyperloop oneला डीपी वर्ल्ड, कॅस्पियन व्हीसी पार्टनर्स, व्हर्जिन ग्रुप, शेरपा कॅपिटल, अबू धाबी कॅपिटल ग्रुप, एसएनसीएफ, जीई व्हेंचर्स, फॉर्मेशन 8, 137 व्हेंचर्स, डब्ल्यूटीआय आणि इतर प्रमुख गुंतवणूकदारांनी सहकार्य केले आहे.

आझम कॅम्पसमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ निमित्त योग प्रात्यक्षिके

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे गुरुवार, दिनांक २१ जून रोजी सकाळी ८वाजता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ चे आयोजन करण्यात आले .
एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, क्रीडा उपसंचालक अनील चोरमले, शिक्षण विस्तार अधिकारी सहदेव आव्हाड, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ. गणपतराव मोरे, आझम स्पोर्ट अॅकॅडमीचे गुलजार शेख, माजिद सय्यद, प्रा. शैला बुटवाला, मुख्याध्यापक परवीन शेख, आयेशा शेख, रबाब खान उपस्थित होते.
योग प्रशिक्षक शबनम पीरझादे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले.

आषाढी पालखी सोहळा तयारीचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा

0

पुणे:- पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. आषाढी पालखी सोहळयासाठी पुणे जिल्हयातून जाण्याऱ्या दिंडया आणि वारकऱ्यांना विविध विभागाकडून  पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या तयारीचा आढावा आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी, ॲड.विकास ढगे पाटील, संत सोपान महाराज संस्थानचे विश्वस्त गोपाळ गोसावी, निर्मल वारी सेवा सहयोग प्रतिष्ठानचे नरेंद्र वैशंपायन, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, उपजिल्हधिकारी तथा समन्वय कक्ष प्रमुख उदय भोसले उपस्थित होते.

या बैठकीत  पालखी मार्गावरील अतिक्रमणे दूर करणे, पालखी मार्गावरील अडथळे काढून टाकणे, पालखी सोहळयादरम्यान लावण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, पालखी मार्गावरील राडा-रोडा उचलणे, पालखी मार्गावरील विहीरींचे अधिग्रहण करणे, वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा पुरविणे, वारकऱ्यांना रॉकेल, गॅसचा पुरवठा करणे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाणी पुरवठा, अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, आरोग्यविषयक सेवा पुरविणे, पालखीमध्ये सहभागी झालेल्या वाहनांची तपासणी करणे, आपत्ती निवारण पथकाची नियुक्ती करणे, पाण्याच्या टँकरचा पुरवठा आदि कामांच्या तयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. यावेळी संबधित विभागांनी पालखी सोहळयानिमित्त केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. दिंडीच्या विश्वस्तांनी बैठकीत उपस्थित केलेल्या विविध सूचनांची दखल घेऊन, अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

प्लॅस्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन

शासनाने प्लॅस्टीक बंदी लागू केली असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पालखीसोहळयादरम्यान वारकऱ्यांना करण्यात येणाऱ्या अन्नदानामध्ये प्लॅस्टीकच्या वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. या बैठकीस संबधित तहसीलदार, पोलीस अधिकारी,आरेाग्य विभाग, महावितरण, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शरद पवारांसह चेतन तुपेंचा फोटो वगळला -तांबे म्हणाले ‘हे कसले राजकारण ‘(व्हिडीओ)

0
पुणे- माता रमाई पुतळा अनावरण प्रसंगी राष्ट्रपतींच्या राजशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी करत , आज शहरात महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील प्रमुख पाहुणे असताना महापालिकेने कार्यक्रमाच्या संदर्भात शहरात होर्डिंग लावले आणि त्यातून जाणून बुजून शरद पवार आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचा हि फोटो वगळला . हे भाजपचे राजकारण योग्य नाही असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी आज पालिकेच्या मुख्य सभेत केला .
 याबाबत खुलासा करताना महापौरांनी केलेल्या निवेदनानुसार अशा प्रकारचा राजशिष्टाचार भंगाचा प्रकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे मानले जाते . नेमके यावेळी काय म्हणाले विशाल तांबे आणि महापौर मुक्ता टिळक ..पहा आणि ऐका ….

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पीपीएस आक्रमक (व्हिडिओ)

0

पुणे-भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावरून पतित पावन संघटनेने महापालिकेमध्ये महापौर दालनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त तसेच आरोग्य विभागविरोधात जोरदार 
घोषणाबाजी करण्यात आली.
शहरात भटक्या कुत्र्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींवर अशा कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत या भटक्या कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करूनही त्यांच्या संख्येवर निर्बंध येत नाही. त्यामुळे कुत्र्याचा बंदोबस्त करण्यावरून पालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करुन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पतित पावन संघटनेने यावेळी केली.
याबाबतचे निवेदन महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आले. त्यावर आठवडाभरात ठोस उपाययोजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. तसेच पालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेकांना त्या मिळत नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे त्या परिसरात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात भटकत असतात. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर आठवडाभरात शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आयुक्तांच्या कार्यालयात 25 भटकी कुत्री सोडून यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.-

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत फिनआयक्यु, कॅपजेमिनी, टेक महिंद्रा संघांचा मोठा विजय

0

पुणे- राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे    नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी)  संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत  साखळी  फेरीत   फिनआयक्यु संघाने  बारक्लेज संघाचा 5-0 असा कॅपजेमिनी संघाने  सनगार्ड एएस संघाचा 4-0 असा तर  टेक महिंद्रा संघाने  अमेझॅन संघाचा 4-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  प्रकाश टी याच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर  फिनआयक्यु संघाने  बारक्लेज संघाचा 5-0 असा पराभव केला. यात  श्रिकांत मोलंगिरी याने दोन गोल करत संघाचा डाव भक्कम केला.  सिमेंटेक संघाने एसीएन संघाचा 3-1 असा तर केपीआयटी सघआने वोडाफोन व कॉग्निझंट संघाने युबीसॉफ्ट संघाचा प्रत्येकी 2-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

फिनआयक्यु – 5(प्रकाश टी 5, 8, 12मी, श्रिकांत मोलंगिरी 14, 17 मी) वि.वि बारक्लेज- 0

सिमेंटेक- 3(नविन सिंग 6मी, शानुप नायर 9मी, रोहित ठाकुर 15मी) वि.वि एसीएन – 1(पार्थ कैल 12मी)

 केपीआयटी- 2(अल्बी अब्राहीम 10मी, अंगद सिंग 14मी) वि.वि वोडाफोन- 0

 कॉग्निझंट– 2(सौरभ मुळीक 8मी, अपुर्व टोपो 16मी) वि.वि युबीसॉफ्ट- 0

 कॅपजेमिनी – 4(रामनाथ व्ही 4, 10मी, श्रेयश धवले 12मी, दिबेंदू मंडल 14मी) वि.वि सनगार्ड एएस- 0

 टेक महिंद्रा – 4(आकाश डब्ल्यु 5मी, प्रतिक सालोसकर 8मी, स्मितेश भट 11मी, विक्टर एग्रे 17मी) वि.वि अमेझॅन- 0

नासाने प्रेक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीत पुणेकर विद्यार्थ्याचा सहभाग

0

पुणे -नासाने प्रेक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीत पुणेकर असलेल्या आनंद लालवाणी या  विद्यार्थ्याने यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्याचे कौतुक  होत आहे
आज या २२ वर्षीय आनंद ललवाणी याचा आहे. आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदअभय छाजेड यांनी घेतली.


या प्रसंगी डॉ वासुदेव गाडे यांनी आनंद ललवाणी याचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत केले. या प्रसंगी अभय छाजेड, आनंद ललवाणी याची आई संगीत ललवाणी, वडील विकास ललवाणी उपस्थित होते.
आनंद ललवाणी आपले अनुभव सांगताना .. सदर उपग्रहाची निर्मिती करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र त्यावर मात करून आमच्या विद्यार्थ्यांच्या गटाने या उपग्रहाची येशस्वी निर्मिती  केली याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे अनेक गोष्टींचा पुनर्वापर आम्ही या वेळी या उपग्रहाची निर्मिती करताना केला आहे असे आनंद ललवाणी यांनी नमूद केले. आम्ही तयार केलेल्या या उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे सौरऊर्जेवर चालणारे एलईडी बसविण्यात आले असून अवकाशातून हा उपग्रह पाहणे व त्याची जागा निश्चित करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना जागा निश्चित करण्यासाठी होऊ शकेल.
” इक्कीसेंट ” या प्रकल्पासाठी एकूण ५ गट कार्यरत होते ज्यापैकी १७ विध्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व हे आनंद ललवाणी यांच्या कडे होते. त्यांच्या टीमने मुख्यतः सोलर पॉवर आणि बॅटरी निर्मितेचे काम पहिले. सध्या आनंद इंजिनीरिंग रिसर्च असिस्टंट म्हणून ब्राउन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असून भविष्यात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठातून सोलर एनर्जी या विषयात पीएचडी चे शिक्षण घ्यायचे आहे.