Home Blog Page 3130

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी बारामतीतून घेतली नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती

0

बारामती -उपराष्‍ट्रपती  व्‍यंकय्या नायडू यांनी आज बारामती येथील शारदानगर शैक्षणिक  संकुलातील नावीन्‍यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन आनंद व्‍यक्‍त केला.

 

 

यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे,जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते, सुनंदा पवार, शुभांगी पवार, रोहित पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार, नीलेश नलावडे, डॉ. एस.पी. महामुनी, प्रा. संतोष कर्णेवार, प्रा. सोनाली सस्‍ते, तेजश्री गोरे, सुनील पवळ,  सूर्यकांत मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती

नीती आयोगाकडून शेतीशी निगडीत उद्योग उभारणीसाठी कृषि महाविद्यालयास मंजूर झालेल्‍या भारतातील दुस-या व महाराष्‍ट्रातील पहिल्‍या अटल इन्‍क्‍युबेशन सेंटर आणि अटल टिंकरिंग लॅबच्‍या विद्यार्थ्‍यांशी उपराष्‍ट्रपती  श्री. नायडू यांनी संवाद साधला. संस्‍थेच्‍या दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध उपकरणांची माहिती त्‍यांनी जाणून घेतली. टाकाऊतून खेळणी, पवनचक्‍की, अविष्‍कार स्‍वच्‍छता यंत्र, चरख्‍यातून वीजनिर्मिती, ऑब्‍स्‍टॅकल अॅव्‍हॉयडर, ऑटोमॅटीक रेन अलार्म सिस्‍टीम, थ्रीडी प्रिंटर, गॅस सुरक्षा यंत्र, कम्‍युनिकेशन ऑफ डिव्‍हाईसेस युझींग वायफाय, टच सेन्‍सर अशा विविध उपकरणांची उपराष्‍ट्रपतींनी पहाणी केली. याशिवाय  नेदरलँड एज्‍युकेशन प्रोग्राम, सीबीई बेस्‍ड एज्‍युकेशनल थिम्‍सची माहिती घेतली.  अॅग्रीकल्‍चरल डेव्‍हलपमेंट ट्रस्‍ट,  बारामती कृषी महाविद्यालयाच्‍या तसेच शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी जमीनीचा पोत सुधारण्‍यासाठी  तसेच पीक उत्‍पादकता वाढीसाठी तयार केलेल्‍या उत्‍पादनांची माहितीही उपराष्‍ट्रपतींनी घेतली. विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्‍ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे  उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी संजय अस्‍वले, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील,  हेही यावेळी उपस्थित होते.

पोलीस अधिकारी वैभव पवार यांचा सत्कार

0

पुणे-मिठगंज पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक  वैभव पवार यांना केंद्र शासनाचा “आंतरिक सुरक्षा सेवा पदक” हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल श्री.अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट २४०म.फुले पेठ यांचेतर्फे ट्रस्टचे संस्थापक कार्याध्यक्ष नगरसेवक अजित दरेकर यांच्या हस्ते  वैभव पवार यांचा स्वामींची प्रतिमा ,शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी  सदानंद चिल्लाळ,रघुराज दरेकर,राजू परदेशी-नाईक,अशपाक शेख रोहन परदेशी  संजय पवार व इतर माननीय हि ऊपस्थित होते.

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत अर्णव पापरकर ठरला महागडा खेळाडू

0

पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसीठी झालेल्या लिलावात आर्णव पापरकर हा सर्वात महागडा खेळाडू खरला असून रायझिंग इगल्स् संघाने त्याला विकत घेतला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 29 जूनपासून सुरू हाणार आहे. या लीगसाठी बीव्हीजी इंडियाचा पाठिंबा लाभला आहे. यामध्ये 6 संघांमध्ये 10, 12, 14 व 16 वयोगटाखालील एकुण 130 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.

10 वर्षालील गाटत अर्णव पापरकरने 2300 गुण मिळवत सर्वात महागड्या खेळाडूचा मान मिळवला. देवांशी प्रभुदेसाई, अस्मि अडकर, अर्जुन गोहड, निल जोगळेकर हे खेळाडूही लिलावमध्ये सर्वाधीक महाग विकले गेले.

शहरात कुमार खेळाडूंसाठी ही पहिलीच ज्युनियर टेनिस लीग स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या माध्यमातून या कुमार खेळाडूंना आपली गुणवत्ता व कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. सालसा अहेर, ऋतुजा चाफळकर, गार्गी पवार, वौष्णवी अडकर, मानस धामणे यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंना या लीग स्पर्धेचा फायदा झाला आहे. यामुळे त्यांना आपले खेळाचे कौशल्य सुधारण्याची संधी मिळाली. असे पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले.

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयुक्त कौस्तुभ शहा व पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, स्पर्धेमध्ये विविध टेनिस अकादमी व क्लब मधुन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. लिलावासाठी एकूण 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ज्यातून 6 संघांसाठी 130 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

लीगमध्ये 6 संघांसाठी 40 प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज् – सुशिल देशमुख, पीईएसबी रोअरिंग लायन्स्- विक्रम देशमुख, टॅस पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स- पार्थ चिवटे, पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स- नवनाथ शेटे, बाआयपीएल रायझिंग इगल्स्- समिर भांब्रे आणि मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स- आदित्य मडकेकर, कौफी यांचा सहभाग आहे.

स्पर्धेचे सह आयुक्त अश्विन गिरमे म्हणाले की, स्पर्धेत 10 वर्षाखालील गटाचा एकेरी सामना, 12 वर्षाखालील गटाचा एकेरी सामना. 14 वर्षाखालील मुले व मुली गटात एकेरी व ज्युनियर मिश्र दुहेरी(12 वर्षाखालील मुलगा व 14 वर्षाखालील मुलगी) 16 वर्षाखालील गटात मुले व मुलींचा एकेरी सामना आणि मिश्र दुहेरी सामना. सर्व सामने बेस्ट ऑफ 11 गेम(6 गेम मध्ये विजय) टायब्रेक 5 ऑल असे असणार आहेत. टायब्रेक विजेता संघ हा ज्या संघाने जास्तीत जास्त गेम जिंकल्या आहेत तो संघ विजेता घोषित करणार आहे.

बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे कार्यकारी सदस्य उमेश माने म्हणाले की, या स्पर्धेमुळे खेळाडूंमधील सर्वोत्तम गुण बाहेर येण्यास मदत होणार आहे. खेळाडूंना कमी वयात व्यावसायीक खेळाचा अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून घेता येणार आहे. तसेच खेळाडूंमध्ये आपला खेळ सुधारण्यासाठी अधिक कष्ट घेण्याची प्रेरणा निर्माण होईल. आशिवाय पुण्यातील टेनिस क्षेत्रात  कौटुंबिक भावना निर्माण होण्यासाठी मदत होईल. बीव्हीजी इंडियाने सातारा मोगा पार्क या नविन फुड प्रोडक्टची सुरूवात केली आहे. जे सर्व खेळातील खेळाडूंसाठी अत्यंत लाभदायक आहे. स्पर्धेच्या पाठिंब्याशीवाय स्पर्धकांना बीव्हीजी कडून या प्रोडक्टचे गुडी बॅग दण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी योनेक्सचा बॉल पार्टनर तर इनर्झलचा स्पोर्टस् ट्रींग पार्टनर म्हणुन पाठिंबा लाभला आहे.

स्पर्धेतील संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे

 स्ट्राईकिंग जॅगवार्स– सुर्या काकडे, देव तुराखिया, विरेन चौधरी, सिया प्रसादे, धृवी अद्यंथाया, राघव अमिन, साईराज साळुंखे, अमोद सबनिस, सोहम सदावर्ते, देवेन चौधरी, पुर्वा भुजबळ, श्रिया देशपांडे, नमित मिश्रा, अर्जुन अभ्यंकर, अनर्घ गांगुली, अन्या जेकब, मधुरीमा सावंत, संज्योत, मुदशिंगीकर, अझफर मधानी, इंद्रजीत बोराडे, मृण्मयी भागवत.

स्पीडिंग चिताज् आर्यन किर्तने, अर्चीत धुत, सक्षम भन्साळी, सुजय देशमुख, नमित हुड, देवांशी प्रभुदेसाई, रित्सा कोंडकर, पियुष जाधव, श्लोक गांधी, पार्थ देवरूखकर, अरूष मिश्रा, अदिती लाखे, आकांक्षा अग्निहोत्री, सुधांशू सावंत, अनमोल नागपुरे, जय पवार, श्रावणी खवले, वैष्णवी अडकर, आशी छाजेड, प्रसाद इंगळे, यशराज दळवी, स्नेहा रानडे.

रोअरिंग लायन्स् कार्तिक शेवाळे, अर्जुन परदेशी, अमन शहा, काव्या देशमुख, अस्मी टिळेकर, वेदांत काळे, आदित्य भाटेवारा, अनन्मय उपाध्याय, आर्यन सुतार, अस्मी अडकर, श्रावणी देशमुख, इशान गोडभरले, जय दिक्षित, जैष्णव शिंदे, सिया देशमुख, रुमा गायकैवारी, सोनल पाटील, अथर्व अमरूळे, सिद्धार्थ जाडली, आर्या पाटील

रायझिंग इगल्स् अभय नागराजन, निव कोठारी, अर्णव पापरकर, वैष्णवी सिंग, आहना कुलकर्णी, अदित्य राय, अव्दिक नाटेकर, केयुर म्हेत्रे, अर्णव बनसोडे, अलिना शेख, क्षिरीण वाकळकर, आर्यन देवकर, निशित रहाने, दक्ष अगरवाल, रिया वाशिमकर, माही शिंदे, गौतमी खैरे, पारितोष पवार, ओम काकडे, मोहिनी घुले.

रेजिंग्ज् बुल्स शार्दुल खवले, सनत काडले, अथर्व जोशी, प्रिशा शिंदे, मेहेक कपुर, अभिराम निलाखे, आर्यन शहा, तनय शहा, कृष्णा शिंगाडे, कौषिकी सामंता, चिन्मयी बागवे, शौर्य राडे, अर्णव कोकणे, अर्जुन गोहड, समिक्षा श्रोफ, रिजूल सिदनाळे, हरिता शंकरामन, सर्वेश बिरमाने, सेश्वर झंजोटे, हृदया शहा.

ग्रोवलिंग टायगर्स समिहन देशमुख, दक्ष पाटील, मनन अगरवाल, मृणाल शेळके, अरोही देशमुख, अर्यन घाडगे, अर्जुन किर्तने, अरव मिश्रा, सनय सहानी, निल जोगळेकर, जुई काळे, प्राप्ती पाटील, इशान जिगाली, क्रिस नासा, वेद पवार, सिध्दार्थ मराठे, एंजल भाटिया, खुषी शर्मा, रिया भोसले, रोहन फुले, ओमकार अग्निहोत्री, मृणाल कुर्लेकर

प्लास्टिक बंदीच्या सोबत; पण चुकीच्या कारवाईच्या विरोधात – पुणे रिटेल व्यापारी संघाची भूमिका

0

पुणे : राज्य सरकार व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती न करता प्लास्टिक बंदीचा कायदा उद्यापासून लागू करीत आहे. तरीही आम्ही प्लास्टिक बंदीच्या सोबतच आहोत. कायद्याची अंमलबजावणी करताना अनेकवेळा कायद्याचा विपर्यास करीत काही अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात. यावेळी जर अशा प्रकारे चुकीची कारवाई झाली तर, आम्ही त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असून, कोणताही किरकोळ व्यापारी दंडाची रक्कम रोख स्वरुपात न भरता न्यायालयाने जर दोषी ठरवले तर, तिथे भरु, अशी स्पष्ट भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या विभागीय बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

राज्य सरकारने 18 मार्च रोजी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केला. आणि तो उद्यापासून लागू होत आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने विभागीय बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी सचिन निवंगुणे, सारंग राडकर, नवनाथ सोमसे, संजय डांगी, विनोद गोयल, रविंद्र सारुक, विजय नरेला, पिराजी डफळ, रमेशकुमार, कैलास बिबवे आदी उपनगरीय रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये एकमताने प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात निर्णय झाला. मात्र, चुकीच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, चुकीच्या पद्धतीने कारवाई करून आकारला गेलेला दंड न्यायालयाने दोषी ठरविल्यावर भरण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

रिटेल व्यापारी संघाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे पहिल्यापासून स्वागत केले आहे. कायद्याप्रमाणे व्यवसाय करण्यास कुणाचीही हरकत नाही. परंतु, संबंधीत कायद्यांची माहिती असणे व त्याबाबत जनजागृती करणे हे शासनाचे काम आहे. संबंधीत शासकीय विभागांकडून जनजागृती करण्याचे दिखावे केले जातात. महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारची जनजागृती केली नाही. प्लास्टिकमुक्त कचरा करण्यात ते अपयशी ठरले आहेत, असेही निवंगुणे यांनी सांगितले.

प्लास्टिक संकलन केंद्र उभारणार; प्रक्रियानंतर उत्पादित वस्तुंचे वाटप करणार!

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने प्लास्टिकचे संकलन केंद्र उभारले जाणार आहे. जमा होणाऱ्या प्लास्टिकपासून कचरा कुंड्या व झाडांसाठी लागणाऱ्या कुंड्या तयार करून त्यांचे वाटप करण्यात येईल, असेही निवंगुणे म्हणाले.

शेतकरी आणि ग्राहक यांच्यात सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

0

पुणे : अनियमित मान्सून, बाजार भावांची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून यातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषीमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

येथील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित “कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर” या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, प्रो. अशोक गुलाटी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, शेती व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनविण्यासाठी बहुस्तरीय धोरण विकसित करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षात देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादन वाढीबरोबरच आपल्याला अन्नधान्याच्या कार्यक्षम वितरणाची व्यवस्था करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना पीक पध्दती, कापणी नंतरची प्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी सल्ला देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी अधिक लोकाभिमूकपणे काम करण्याची आवश्यकता आहे.

सैनिक, वैज्ञानिक आणि शेतकरी यांच्यामुळेच आपल्या देशाला जगभरात सन्मान मिळत आहे. त्यामुळे आपण जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या त्रिसुत्रीला कायम स्मरणात ठेवायला हवे. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून त्याचा सन्मान होण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायम स्वरूपी धोरण स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला म्हणाले, कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो, त्यात अनियमित मान्सूनचा मोठा वाटा आहे. विविध उपययोजनांमुळे देशातील शेती उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट दर मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू असणारी “स्वराज्य ते सुराज्य” ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी  सांगितले.

यावेळी आंध्र प्रदेशचे माजी मंत्री व्ही. एस. राव यांनी त्यांच्या गटातील केंद्र सरकारचे कृषी सचिव एस. के. पट्टनायक, प्रो. अशोक गुलाटी यांच्या साथीने “सक्षम धोरण मांडणी तयार करणे” या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकारचे कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी त्यांच्या गटातील अराबीन दास, डॉ. के. एच. पुजारी यांच्या साथीने “शेतीची गहनता, उच्च मूल्य शेतीसाठी वैविध्य आणि संबध्द कृतीव्दारा उत्पन्नाची पूरकता” या विषयावर सादरीकण केले. अशोक दलवाई यांनी “विपणन आणि कृषी वाहतूक” या विषयावर सादरीकरण केले. निती आयोगाचे सल्लागार जे. पी. मिश्रा यांनी त्यांच्या गटातील संजीव कुमार चढ्ढा, राजेश सिन्हा यांच्या साथीने “कृषी व्यापार धोरण” या विषयावर सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथ यांनी त्यांच्या गटातील डॉ. अशोक पातुरकर, डॉ. लखन सिंह यांच्या साथीने “प्रयोग शाळेतील तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविणे” या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकाच्या कृषी विभागाचे सह-आयुक्त दिनेश कुमार यांनी “कृषी पत आणि विमा” या विषयावर सादरीकरण केले.यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.

लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सई ताम्हणकरचा जलवा !

0

सई ताम्हणकरची फिल्म लव्ह सोनियाचा गुरूवारी लंडनला प्रिमीयर झाला. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून सईची लव्ह सोनिया सिलेक्ट झाली होती. फेस्टिव्हच्या ओपनिंग सेरेमनीला रेड कार्पेटवर झाराच्या आउटफिटमध्ये सई ताम्हणकर आली.

मराठी फिल्म इंडस्ट्रीतली सई ताम्हणकर पहली अभिनेत्री आहे, जिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक करायचा मान मिळाला. सईसोबत रिचा चड्ढा, राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज बाजपेयी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तबरेज नुरानी सुध्दा रेड कार्पेटवर दिसून आले.

यावेळी इंटरनॅशनल मीडियाशी बोलताना सई म्हणाली, “ माझ्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ-उतार आले. पण ह्याक्षणी मागे वळून पाहताना त्या चढ-उतारांचे चीज झाल्याचे दिसते आहे. ह्या सिनेमाने मला जास्त सतर्क आणि संवेदनशील बनवले. प्रत्येकाने ही फिल्म पहावी असं मला वाटतं. ह्या सिनेमातलं कथानक हृदयस्पर्शी आहे. या सुंदर इंडो-वेस्टर्न सिनेमाचा मी एक हिस्सा असल्याचा आणि हा चित्रपट लंडन इंडरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे बारामतीत स्वागत

0

बारामती –  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज बारामती येथील विमानतळावर आगमन झाले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,  खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील आदींची उपस्थिती होती.

‘अशी ही आशिकी’ साठी सचिन पिळगावकर स्वित्झर्लंडला

0

 

आपल्या साठाव्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचं आश्वासन देणाऱ्या सचिन पिळगांवकरांच्या “अशी ही आशिकी”चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून या चित्रपटाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला रवाना झाली आहेत.

सचिन पिळगांवकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून अभिनयसोबतचा सेल्फी शेअर करत “अशी ही आशिकी” च्या शूटिंग दरम्यान अभिनय चा एकंदर वावर लक्ष्याबरोबर घालवलेले ते “अशी ही बनवाबनवी” चे दिवस ताजे करून गेल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर ला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये दिसलेले सचिन पिळगांवकर आता आपल्याला संगीत दिग्दर्शकाच्या ही भूमिकेत दिसणार आहेत. दि कथा-पटकथा-संवाद ही सचिनचेच आहेत.सिलेक्ट मिडिया होल्डिंग्स आणि टी-सीरिज निर्मित अशी ही आशिकी चित्रपटाची सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर या चित्रपटाच्या निर्मात्यांची भूमिका पार पाडत आहेत.

 

 

सरकारी योजना राबविल्याबाबतचा अहवाल ८ दिवसात द्या -महाराष्ट्र बँकेला खासदार शिरोळेंचा अल्टीमेटम

0
पुणे-केंद्र सरकारच्या विविध योजना जसे कि जन धन, stand up इंडिया, मुद्रा योजना, जीवन ज्योती, अटल पेन्शन , सुरक्षा बिमा,  ह्या योजनांची पुणे लोकसभा मतदार संघात प्रभावी अंमल बजावणी होण्यासंबंधी खासदार अनिल शिरोळे यांनी ह्या योजनांसाठीची  लीड बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक  यु वी म्हस्केयांची भेट घेऊनया योजनांच्या आत्ता पर्यंत झालेल्या अंमलबजावणी चा विस्तृत अहवाल येत्या ८ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या योजनांच्या अंमल बजावणीच्या आढाव्या संबंधी १८ एप्रिल २०१८ रोजी खासदार अनिल शिरोळे ह्यांनी सर्व संबंधित बँक अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली होती. त्यात या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना संबंधी विस्तृत चर्चा झाली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून शिरोळे यांनी म्हस्के यांची भेट घेऊन पुणे शहरातील विधान सभा मतदार संघ नुसार अंमलबजावणी संबंधी एक  सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल सादर झाल्यानंतर , पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्या साठी परत एकदा सर्व बँक अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेणार असल्याचे देखील शिरोळे सांगितले.

‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा वाढविण्यासाठी महावितरणचे उपक्रम

0

पुणे : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील वीजग्राहकांनी ‘ऑनलाईन’द्वारे जास्तीतजास्त वीजबिलांचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून जागर सुरु करण्यात आला आहे. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याबाबतचे फायदे वीजग्राहकांना पटवून देण्यात येत आहेत. हा उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले असून ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी व त्यांच्या अत्याधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या घरगुती किंवा इतर वीजबिलांचा भरणा फक्त ‘ऑनलाईन’द्वारे भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तशा सूचनाही संबंधित कार्यालयप्रमुखांकडून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठविण्यात आल्या आहे. याशिवाय महावितरणचे सर्व ग्राहक सुविधा केंद्ग तसेत वीजबिल भरणा केंद्गात रांगेत असलेल्या वीजग्राहकांशी संवाद साधून मोबाईल अ‍ॅप, वेबसाईटद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याच्या प्रक्रियेची व त्याच्या फायद्याची माहिती देण्यात येणार आहे.

शहरी भागात धनादेशाद्वारे वीजबिल मोठ्या प्रमाणात भरण्यात येत आहेत. धनादेशाद्वारे वीजबिल भरणार्‍या वीजग्राहकांची प्रत्यक्ष भेट घेऊन वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाईन’द्वारे करण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. तसेच महावितरण ग्राहक संपर्क अभियानामार्फत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, इतर कार्यक्रम, आठवडी बाजार तसेच शहरी भागातील मोठमोठे घरगुती, व्यापारी संकुल आदी ठिकाणी महावितरण मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणे, अ‍ॅपद्वारे वीजबिल भरणा व इतर सेवांची माहिती देणे, मोबाईल क्रमांकाची नोंदणी याबाबत प्रात्यक्षिकांसह जनजागृती करण्यात येणार आहे.  शिवाय महावितरणचे सर्व उपविभाग व शाखा कार्यालय, वीजबिल भरणा केंद्ग, ग्राहक सुविधा केंद्ग आदी ठिकाणी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणाबाबत वीजग्राहकांना विशेषत्वाने माहिती देण्यात येणार आहे.

 ऑनलाईन वीजभरणा आता निःशुल्क

क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे. रांगेत उभे राहण्याऐवजी  आता कुठूनही वीजबिल भरणा करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसलेल्या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

महिंद्राने दाखल केली पूर्णतः नवी TUV300 PLUS

ऐसपैस 9-सीटर कॉन्फिगरेशन व प्रीमिअम इंटिरिअर्स

9.47 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) किंमत

मुंबई,- महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ऐसपैस अंतर्भाग व गाडी चालवण्याचा सुखद अनुभव देणारी अशी प्रीमिअम व ठसठशीत एसयूव्ही खरेदी करून जीवनशैली उंचवण्याची इच्छा असलेल्या चोखंदळ ग्राहकांसाठी विशेषतः TUV300 PLUS दाखल केल्याचे आज जाहीर केले.

9.47 लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) असलेली TUV300 PLUS भारतीय ऑटो क्षेत्रातील 10 लाख रुपयांखालील, समकालीन, शक्तिशाली व लवचिक 9-सीटर एसयूव्हीची कमतरता भरून काढणार आहे. TUV300 PLUS मध्ये 2.2 लिटर mHAWKD120 इंजिन बसवले असून त्याची क्षमता 88 kW (120 BHP) आहे. त्यामध्ये हायवेवर गाडी चालवण्याचा आनंद मिळण्यासाठी 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ठसठशीत डिझाइन व एसयूव्हीची ऐट यामुळे ही गाडी अतिशय स्टायलिश व शक्तिशाली दिसते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे TUV300 PLUS प्रीमिअम वाटते. त्यामध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग – ऑटोमोटिव्ह सेक्टर, प्रमुख वीजय राम नाकरा यांच्या मते, सप्टेंबर 2015 मध्ये दाखल केल्यापासून TUV300 अतिशय यशस्वी ठरली आहे आणि सध्या 80,000 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. आता, अधिक जागा व पॉवर असलेली एसयूव्ही खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आम्ही TUV300 PLUS दाखल करत आहोत. आकांक्षा व जीवनशैली यांना साजेशी एसयूव्ही हवी असलेल्या ग्राहकांना TUV300 PLUS निश्चितच आवडेल.”

 TUV300 PLUS विषयी

 पॉवरच्या बाबत प्लस  

TUV300 PLUS मध्ये सिद्ध झालेले व विश्वासार्ह mHAWKD120 इंजिन असून, ते शहरातील वाहतुकीत व हायवेवर 88 kW (120 BHP) पॉवर, 280 Nm टॉर्क व 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने गाडी चालवण्याचे बळ देते.

जागेच्या बाबतीत प्लस

TUV300 PLUS ऐसपैस व आरामदायी एसयूव्ही असून तिच्यामध्ये 9 जण बसू शकतात, तसेच मागच्या सीट बंद करून ठेवता येतात व त्यामुळे सामान ठेवण्यासाठी मोठी जागा मिळते.

 एसयूव्ही कोशंटच्या बाबतीत प्लस

TUV300 PLUS ठसठशीत रूप, मोठे टायर (लांबी 4400 मिमी, रुंदी 1835 मिमी व उंची 1812 मिमी) यामुळे शक्तिशाली व स्टायलिश दिसते आणि आक्रमक फ्रंट ग्रिल, लार्ज अलॉय व्हील्स (215/70 R16) व रिअर व्हील ड्राइव्हमुळे ती खऱ्या अर्थी एसयूव्ही दिसते.

 आरामदायीपणा व प्रीमिअमनेस प्लस

कुशन सस्पेन्शन टेक्नालॉजीचा वापर करणारी TUV300 PLUS सर्व प्रकारच्या रस्त्यावर उत्तम अनुभव देते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे TUV300 PLUS अधिक प्रीमिअम दिसते. गाडीमध्ये स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल, रिअर डीफॉगर व वॉश अँड वाइप, ड्रायव्हरची सीट उंच-खाली करण्याची सुविधा, पुढच्या रांगेसाठी आर्मरेस्ट, ड्रायव्हरच्या सीटखाली सोयीचा स्टोअरेज ट्रे आणि लीड-मी-टू-व्हेइकल व फॉलो-मी-होम-हेडलॅम्प आहेत.  

 तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्लस

TUV300 PLUS मध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि 4 स्पीकर्स + 2 ट्वीटर्स, ब्लुसेन्स अॅप, इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी, ब्रेक एनर्जी रीजनरेशन टेक्नालॉजी, इंटेलिपार्क रिव्हर्स असिस्ट, एसी इको मोड व ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम.

 सुरक्षेच्या बाबतीत प्लस

TUV300 PLUS मध्ये स्कॉर्पिओपासून केलेले चासिस व मजबूत, उच्च क्षमतेची स्टील बॉडी आहे. त्यामध्ये ड्युएल-एअरबॅग्स व इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह एबीएसही आहे. तसेच, पॅनिक ब्रेकिंगच्या वेळी हझार्ड लाइटही सुरू होतात.

आकर्षक आर्थिक पर्याय

TUV300 PLUS बरोबर ग्राहकांना साजेसा आर्थिक पर्यायही उपलब्ध होणार असून डाउनपेमेंट अगदी कमी असेल व ईएमआय 11,999 रुपये इतका कमी असेल.

 आकर्षक सर्व्हिस प्लान्स

TUV300 PLUS बरोबर कस्टमाइज्ड एएमसी पर्याय मिळणार असून, त्यांची सुरुवात 0.31/km रुपयांपासून आहे व पूर्णतः मनःशांती मिळण्यासाठी विस्तारित शिल्ड वॉरंटी (5 वर्षांपर्यंत) आहे.

 झटपट सर्व्हिस व टर्नअराउंड कालावधी

ग्राहकांच्या सोयीपेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. ग्राहकांना सुरळीत सर्व्हिस देण्यासाठी कार्यक्षम सर्व्हिसिंग टीम झटपट सेवा देते. ग्राहकांना पाच आकर्षक रंगांतून त्यांच्या पसंतीच्या रंगाची निवड करता येईल – बोल्ड ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर, डायनॅमो रेड, ग्लेशिअर व्हाइट व मोल्टन ऑरेंज आणि तीन प्रकार उपलब्ध आहेत – P4, P6 and P8.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतून योगदिन साजरा…

0

नवीन मराठी शाळेत योगदिन साजरा

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत जागतिक योगदिनानिमित्त योग अभ्यासिका उर्मिला सपकाळे यांचे व्या‘यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी योगासने व सूर्यनमस्कारांच्या प्रात्यक्षिकांचा सराव घेतला. जगभरात दोन अब्ज लोक योगाभ्यास करतात. योगोचे सकारात्मक परिणाम अनुभवण्यासाठी उर्वरित लोकांना प्रोत्साहित करायला हवे. विद्यार्थ्यांसाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. योगामुळे निरामय आरोग्य जगता येते. योगामुळे मन, वाणी आणि शरीराची शुध्दी घडते. स्वयंअभ्यास, स्वओळख व चिंतनासाठी योगासने उपयुक्त ठरतात असे मत उर्मिला सपकाळे यांनी व्यक्त केले. शाळेतील १२०० विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तनुजा तिकोने, मनिषा कदम, धनंजय तळपे, जयश्री खाडे यांनी कार्यक‘माचे संयोजन केले.

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात जागतिक योगदिनानिमित्त ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी योगासने केली. पद्मासन, चक्रासन, ताडासन, वृक्षासन, वज्रासन, उष्ट्रासन, भूजंगासन, शवासन आदी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रमरी, शीतली इत्यादी प्राणायमाचे प्रकार केले. मुख्याध्यापिका लीना तलाठी यांनी योगासनांचे दैनंदीन जीवनातील महत्व सांगितले. अभ्यास करताना एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम आणि योगासने महत्वाची असल्याचे मत लीना तलाठी यांनी व्यक्त केले.
गोळवलकर प्राथमिक शाळेत प्रात्यक्षिके
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात चौथा जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने क‘ीडाशिक्षिका मयुरी काळे व स्वाती राजगुरु यांनी निरोगी आयुष्यासाठी योगासनाचे महत्व या विषयावरील माहिती दिली. योगदिनाचे महत्व विषद केले व योगदिन सादर केले. क‘ीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ओमकार, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. मु‘याध्यापिका कल्पना धालेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक‘माचे संयोजन करण्यात आले होते.
 रानडे बालक मंंदिरात  प्रात्यक्षिके
 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदीरात जागतिक योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. योग अभ्यासक पूर्वा गोखले यांनी योग दिनाची माहिती दिली. व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकास होण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आयुष्यात योग अभ्यसासाठी वेळ दिला पाहिजे. असे मत पूर्वा गोखले यांनी व्यक्त केले. २४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापिका अमिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रध्दा खोले. मेधा मनोहर, वासंती आढाव, शिल्पा पराडकर, श्रध्दा ढवळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा

0
पुणे : २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना पुण्यातही स्किल डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निरोगी आरोग्य राहावे यासाठी सर्वांनी ‘योगाभ्यास’ हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावा, दिवसातून किमान अर्धा तास तरी आवर्जून वेळ काढून योगासने करावीत  असे आवाहन यावेळी  प्रसिद्ध योग प्रशिक्षक मनाली देव  यांनी व्यक्त केले. 
संस्थेच्या  शिवाजीनगर येथील हॉटेल मेनेजमेंट एन्ड केटरिंग स्किल सेंटर येथे ‘योग’ दिनानिमित्त प्राणायाम व विविध योगासनांची प्रात्याक्षिके करण्यात आली.
 
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक व अन्य कर्मचारी यांनीही आपला सहभाग नोंदवला.तसेच योग दिन आयोजनासाठी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले.
 

 

चेतन तुपेंची पब्लिसिटीसाठी राजकीय स्टंटबाजी – सभागृहनेते भिमाले (व्हिडीओ)

0

पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना राष्ट्रवादीच्या कोणत्याही नगरसेवकांना आणि विरोधी पक्षनेते यांना कोणीही अटकाव केलेला नाही ,उलट त्यांचा आंदोलनाचा इरादा दिसल्याने त्यांना पोलिसांनी रोखले असावे , यासंदर्भात तुपे करत असलेले आरोप धादांत खोटे आहेत .जोरदार पावसाने नव्या इमारतीत किरकोळ गळती झाली पण ती दुरुस्ती होईलच तो फार काही मोठा प्रकार नाही असे सांगत महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधी पक्षनेते हे निव्वळ प्रसिद्धीसाठी राजकीय स्टंटबाजी  करत असतात असा आरोप केला आहे . पहा आणि एका नेमके श्री भिमाले यांनी काय म्हटले आहे …..

डी एस के कडील थकबाकी रु.94.52 कोटी- पूर्णपणे संरक्षित – महाराष्ट्र बँकेच्या कार्यकारी संचालकांचा दावा

पुणे-महाराष्ट्र बँकेच्या सर्वसाधारण सभेत  डी एस के डेव्हलपर्स  यांना दिलेल्या कर्जा संबंधाने काही भागधारकांच्या प्रश्नांना उत्तर देतानाबँकेचे कार्यकारी संचालक श्री ए सी राऊत यांनी स्पष्ट केले की सध्या डी एस के समुहाची असलेली थकबाकी रु.94.52 कोटी असून ती पूर्णपणे संरक्षित आहे. या पूर्वीच,मे. डी एस के डेव्हलपर्स आणि त्यांचे प्रवर्तक यांना, बँकेने  विलफुल डिफाल्टर घोषित केले आहे. वसूलीसाठी “सरफासी” कायद्याखाली कार्यवाही बँकेने सुरू केली असून त्यांच्या काही मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

31 मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद आणि लाभ /हानी खात्यास मान्यता आणि स्वीकृती साठी, बँक ऑफ महाराष्ट्राची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 21 जून 2018 रोजी घेण्यात आली. 31 मार्च 2018 रोजीचा ताळेबंद स्वीकारतानाच सभेत उपस्थित भागधारकांनी बँकेवरील आणि बँकेच्या व्यवस्थापनावरील आपला विश्वास व्यक्त केला. भागधारकांनी बँकेच्या टीमची निर्दोष सेवा आणि बँकेची वेगाने नफ़याकडे वाटचाल होण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न यांची योग्य दखल घेतली.

15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना, बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए सी राऊत म्हणाले की, “ बँकेच्या टर्न अराउंड कार्यक्रमा अंतर्गत बोर्डाने हाती घेतलेले एन पी ए वसूली, नवीन पतपुरवठा, नवीन एन पी ए होण्यावर नियंत्रण आणि कामकाजामध्ये कुशलता या सारखे विविध उपक्रम योग्य दिशेने वाटचाल करत आहेत.” बँक पूर्व पदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, लवकरच बँकेला नक्की फायदा होईल अशी ग्वाही त्यांनी भागधारकांना दिली.

ते पुढे म्हणाले की,  निव्वल व्याज अंतर आणि उत्पन्नाचे खर्चाशी गुणोत्तर यासारख्या कार्यक्षमतेत सुधारणा दर्शवणा-या घटकां बरोबरच, 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या कार्यान्वयन नफ्यामधे गतवर्षीच्या तुलनेत 20% वृद्धि झाली आहे. तसेच बँकेचे कासा ठेवींचे प्रमाण आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 47.74 % झाले आहे. रिटर्न ऑफ खात्यांमध्ये तिप्पट वसूली करत असतानाच बँकेने एन पी ए खात्यांमध्ये विक्रमी रोख वसूली केली आहे.

भारत सरकारचे प्रतिनिधी, आणि बँकेचे प्रवर्तक, तसेच बँकेचे संचालक आणि ऑडिट समितीचे अध्यक्ष श्री दीनदयाल अग्रवाल हेही या सभेस उपस्थित होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी रु.3000 कोटींचे भागभांडवल,एफ पी ओ/राइट इश्यु/क्यू आय पी/प्रेफेरेंशियल शेअर ईत्यादी मार्गानी उभारण्यास संमती दिली.

मे. डी एस के डेव्हलपर्स  यांना दिलेल्या कर्जा संबंधाने काही भागधारकांनी चिंता व्यक्त केली. त्याला उत्तर देताना श्री राऊत यांनी स्पष्ट केले की सध्या डी एस के समुहाची असलेली थकबाकी रु.94.52 कोटी असून ती पूर्णपणे संरक्षित आहे. या पूर्वीच,मे. डी एस के डेव्हलपर्स आणि त्यांचे प्रवर्तक यांना, बँकेने  विलफुल डिफाल्टर घोषित केले आहे. वसूलीसाठी “सरफासी” कायद्याखाली कार्यवाही बँकेने सुरू केली असून त्यांच्या काही मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या सभेमध्ये श्री राऊत यांनी भागधारकांच्या अनेक शंकांचे समाधान केले आणि उच्चतम ग्राहकसेवेसह बँकेची वाटचाल शाश्वत वृद्धिकड़े चालू असल्याची खात्री दिली.

मे. डी एस के डेवलपर्स यांना दिलेल्या कर्जा संबंधात चौकशीसाठी म्हणून बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि इतर अधिका-यांना ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले त्यावर भागधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . त्यांनी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि बँकेचे बोर्ड यावरील आपला दृढ़ विश्वास व्यक्त केला.