Home Blog Page 3115

शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता – शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

नागपूर, दि. 16 : शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयक शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता दिलेली असून काही शिक्षकांच्या नियुक्त्या नियमाप्रमाणे केल्या नसल्याने चौकशी सुरु असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत शासनाने विविध आदेश काढून निर्बंधातील अटी शिथील केल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक व अल्पभाषिक शाळांमधील पदांच्या मान्यतेबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

भूगोल पुस्तकांची सदोष छपाई करणाऱ्या मुद्रणालयावर कारवाई करणार

इयत्ता सहावीच्या भूगोल विषयाच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात काही पाने गुजराती लागल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुद्रणालयाकडून झालेल्या चुकीबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. पुस्तकांची सदोष बांधणी करणाऱ्या मुद्रणालयावर निविदेच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत दिली.

श्री. तावडे यांनी निवेदनात सांगितले, सदोष बांधणी असलेली पुस्तके ज्यांना मिळाली असतील त्यांना ती पुस्तके तातडीने बदलून देण्याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारे, मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते यांना सूचना दिल्या आहेत. सदोष पुस्तके बदलून देण्याची कार्यवाही पाठ्यपुस्तक मंडळातर्फे तत्काळ करण्यात येत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) तर्फे मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तेलुगू व सिंधी या आठ भाषामध्ये दरवर्षी सुमारे 21 कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचा मोफत पुरवठा केला जातो. यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय स्तरावर जाहीर निविदा मागविण्यात येतात. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या निविदाधारकास पाठ्यपुस्तकांच्या छपाईची कामे सोपविली जातात. शैक्षणिक वर्ष सन 2018-19 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 114 मुद्रकांनी एकूण छपाईच्या 92 टक्के आणि परराज्यातील 28 मुद्रकांनी 8 टक्के छपाईची कामे केली आहेत.

शैक्षणिक वर्ष सन 2018-19 करिता इयत्ता 6 वीच्या भूगोल पुस्तकाच्या एकूण 11 लाख 50 हजार  प्रतींची छपाई करण्यात येऊन ती संपूर्ण राज्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरवठा करण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या छपाईचे काम एकूण 11 मुद्रणालयांकडे सोपविण्यात आले होते. मेसर्स श्लोक प्रिंट सिटी अहमदाबाद, या मुद्रकाकडे भूगोल पुस्तकांच्या एकूण प्रतीपैकी एक लाख प्रतींची छपाई व बांधणीचे काम सोपविण्यात आले होते. मुद्रकाच्या भगिनी संस्थेकडे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी छपाई करावयाच्या गुजराती माध्यमांच्या कमी प्रती संख्या असलेली पुस्तके छपाई व बांधणीसाठी सोपविण्यात आली होती. मुद्रकांकडून या पुस्तकाची बांधणी करताना मराठी भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती पुस्तकाची पृष्ठे लागली असल्याची शक्यता आहे. संबंधित संस्थेकडून खुलासा मागविण्यात आला असून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

राखीव प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई – शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

नागपूर, दि. 16 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव प्रवेश खासगी शिक्षण संस्थानी नाकारल्यास अशा शाळांवर कारवाई करणार असल्याचे, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

खासगी शिक्षण संस्थेच्या शाळेत राखीव प्रवेश नाकारत असल्याचा प्रश्न सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, शिक्षणापासून कुणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही. ज्या शाळा प्रवेश नाकारतील त्यांच्यावर शिक्षण हक्क कायद्यानुसार नोटीसा बजावण्यात येतील.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, हेमंत टकले, डॉ. नीलम गोऱ्हे आदींनी भाग घेतला.

विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रश्नावर

चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक – विनोद तावडे

 राज्यातील कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढण्याबाबत लवकरच बैठक घेवून चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य श्री.विक्रम काळे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. श्री.तावडे म्हणाले, सन 2001 पूर्वीच्या काही कायम विना अनुदानित तत्वावरील विधी शाखेच्या महाविद्यालयात 1995-96 तर पारंपरिक महाविद्यालयांना1997-98 पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. राज्यामध्ये 2001 पूर्वी कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या महाविद्यालयांची संख्या 63 असून त्यांना अनुदान देण्याची बाब तुर्त विचाराधीन नाही, असे श्री. तावडे म्हणाले.

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्यांची

रिक्त पदे भरण्याचे आदेश

 राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याबाबतचे आदेश दिल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य दत्तात्रय सावंत यांनी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.तावडे म्हणाले, अधिव्याख्यात्यांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शैक्षणिक काम पूर्ण करण्यासाठी तासिका तत्वावरील अभ्यागत अधिव्याख्याता नियुक्तीची तरतूद आहे. त्यानुसार तासिका तत्वावर अधिव्याख्याता नियुक्ती करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच वित्त विभागाच्या प्रचलित धोरणानुसार पदांचा आढावा आणि आकृतीबंधास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी कार्यवाही चालू आहे.

पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी 20 हजार घरांचा आराखडा तयार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 16 : राज्यातील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी सध्या 20 हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून ज्या भागात घरे मोडकळीस आली आहे, अशा ठिकाणी तो प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. मोडकळीस आलेल्या वसाहतींमध्ये नवीन घरे बांधण्यात येतील. पोलीस कर्मचाऱ्यांना गृहकर्जासाठी 208 कोटी रुपये देण्यात आले असून त्याचे व्याज राज्य शासन अदा करत आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पोलीसांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींबाबतचा प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थानांची पाहणी करण्यात येते व आवश्यक तेव्हा दुरुस्तीची कार्यवाही केली जाते. मुंबईसह राज्यात ज्या भागात पोलीस वसाहती मोडकळीस आलेल्या आहेत तेथे नवीन वसाहत तयार करण्याबाबत आराखडा तयार केला आहे. पोलिसांना गृहकर्ज देताना त्याचे व्याज शासन अदा करत आहे. पोलिसांना स्वत:चे घर बांधण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या घरासाठी जमीन आणि वाढीव चटई क्षेत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेतील उपप्रश्नाना उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले, मुंबईत सुमारे 93 ते 95 वर्षांपूर्वीच्या जुन्या वसाहती आहेत. वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडामार्फत आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील माहिम, ठाणे शहर, वर्तकनगर, येथील सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास म्हाडा व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

या सदनिकांचे पुनर्विकास करताना त्यामध्ये राहणारे आणि कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घर देण्यासाठी प्राधान्य असून जे सेवा निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना पुनर्विकसित वसाहतीत घर देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांना मिळाणाऱ्या गृहकर्जाच्या दराप्रमाणेच पोलीसांनाही कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या दोन्ही दरातील तफावत राज्य शासन अदा करणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील पोलीस वसाहतींबाबत एकत्रित बैठक येत्या 15 दिवसांत घेण्याबाबत सांगतानाच सध्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत आतापर्यंत 3 हजार 698 सदनिकांचे काम सुरु आहे. 5 हजार 821 निवासस्थानांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशाचप्रकारे सुमारे 20 हजार 282 पोलीस निवासस्थानांचे काम प्रगतीपथावर असून 2019 पर्यंत ते पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कालिदास कोळंबकर, योगेश सागर, सुनील देशमुख, जयप्रकाश मुंदडा, पृथ्वीराज चव्हाण, अतुल भातखळकर, सुनील प्रभू, मंदा म्हात्रे, शशिकांत शिंदे, संध्यादेवी कुपेकर यांनी भाग घेतला.

​’​पै कॉलेज ऑफ वेदा’ तर्फे ​’​आय.टी. ऑलिंपियाड​’​ चे आयोजन

0
पुणे :​’​पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्टस डिझाईन अँड आर्ट’ (VEDA) तर्फे ‘आय.टी. ऑलिंपियाड -2018’ चे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे हे ८ वे वर्ष आहे.
आयटीशी संबंधित आपले कौशल्य आणि ज्ञान संपादित करण्यासाठी विद्यार्थ्यांना आय.टी. ऑलिंपियाड हे उत्तम व्यासपीठ ठरू शकते, अशी माहिती  ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ चे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी १२ सप्टेबर २०१८ पर्यत करायची आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये आय.टी. ऑलिंपियाड होईल. ५ डिसेंबरला पारितोषिक वितरण होईल.
ऑलिंपियाडची औपचारिक घोषणा आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी   डॉ. पी. ए. इनामदार , पै. आय सी टी अकॅडमी च्या संचालक मुमताझ सय्यद,  ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ चे प्राचार्य ऋषी आचार्य, आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्य आयेशा शेख, स्वतंत्र जैन उपस्थित होते.

र्‍हिदम वाघोलीकर, रचना शाह ‘वॉव अॅवार्ड’ ने सन्मानित

0
पुणे : ‘ब्लिस इक्विटी प्रकाशन’च्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱयांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना ‘आयकॉनिक मोस्ट सेलिब्रेटेड बुक ऑफ द इयर’ (वॉव अॅवार्ड) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल ऑडिटोरियम’ येथे हा कार्यक्रम रविवारी, १५ जुलै रोजी झाला. 
खासदार वंदना चव्हाण, मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आणि दारसिंग खुराना यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ब्लिस इक्विटी प्रकाशन’च्या अध्यक्ष शोभा आर्य होत्या. 
यामध्ये आशय वाघोलीकर, प्रतीक रोकडे, डॉ.सोनाली जाधव, गीता सिंग, संदीप सोपारकर, फ्रेडी दारुवाला, संगीता शेट्ये, अर्चना भिडे, अविनाश गवई, शर्वरी जमीनीस, अनुराधा करमरकर आदींना सन्मानित करण्यात आले. 

शतक महोत्सवी सोबतीचा करार चा कैवल्य सोहळा रंगला….एक गायक,एक संगीतकार

0
पुणे:सोबतीचा करार मध्ये एकच कवी अर्थात कवी/गीतकार वैभव जोशी,एकच गायक दत्तप्रसाद रानडे,एकच संगीतकार आशिष मुजुमदार अशी ओळख असणारा कार्यक्रम म्हणजे सोबतीचा करार.  एकाच कवी च्या मराठी,हिंदी,कविता,गझल चा कार्यक्रम सोबतीचा करार चा शतकमहोत्सवी ५ तासांचा कैवल्यसोहळा प्रयोग  बालशिक्षण मंदिर येथे संपन्न झाला.. कार्यक्रमाची प्रस्तुती रसिक साहित्य आणि रसिक एंटरटेन्टमेंट यांनी केली असून  मनोरंजनातून साहित्य प्रसार व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवून सोबतीचा करार ची प्रस्तुत करत असल्याचे रसिक साहित्य ते संचालक शैलेश नांदुरकर ह्यांनी  सांगितलें.
 ग्रंथ मैत्री सर्वोत्तम मैत्री असे ब्रीद असणारे रसिक साहित्य ने साहित्य प्रसार आणि प्रचारार्थ औरंगाबाद,नागपूर,अमरावती,लातूर,कोल्हापूर,मुंबई सारख्या अनेक शहर,गावांतून सर्वत्र महाराष्ट्रातून ९९ प्रयोगांचे आयोजन केलेले असून शंभरावा प्रयोग पुण्यात विनामूल्य करत आहोत असेही नांदुरकरांनी नमूद केले.
    सोबतीचा करार बरोबरच रसिक साहित्य ने कवी वैभव जोशी ह्यांचा पहिला कवितासंग्रह मी वगैरे नावाने प्रकाशित करून आजवर सर्वत्र मिळून जवळपास ३००० प्रतींची विक्रमी विक्री केली आहे. एखादा नवा कवितांना दर्जा असेल,रसिक मान्यता मिळत असेल तर
तर वाचकांपर्संत कविता पोहचविण्यासाठी सोबतीचा करार हे महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे.. मी वगैरे ह्या पुस्तकाचे माध्यमांतर अर्थातच सोबतीचा करार हे नक्कीच ठरले आहे.
    ह्याच शतकमहोत्सवी प्रयोगा निमित्त रसिक आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव सोबतीचा करार ची लाईव्ह कार्यक्रमाची ध्वनिमुद्रिका देखील प्रयोगातच प्रकाशित केली आहे.सोबतीचा करार ची धव्निमुद्रिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होत असून
कवि वैभव जोशी ह्यांच्या प्रेम,नाते,वैचारिक अश्या विविध विषयांवर आधारीत मराठी,हिंदी कविता,गझल असणार आहेत.
नुकताच मुरांबा ह्या चित्रपटासाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त असणारे कवी/गीतकार वैभव जोशी ह्यांनी आंधळी कोशिंबीर,हायवे,प्यारवाली लव्हस्टोरी,अश्या अनेक ४० हून अधिक चित्रपटांसांठी गीतलेखन केलेले असून आगामी होम स्वीट होम अभिनेत्री रीमा लागू ह्यांच्या शेवटचा ठरलेला चित्रपटासाठी देखील गीतलेखन केले आहे टि व्ही वाहिनी वरील  सूर नवा ध्यास नवा चे संहिता लेखन देखील करणारे वैभव जोशी ह्यांच्या सोबतीचा कारार मधील कवितांना अप्रतिम, ठेका धरायला लावणारे संगीतकार आशिष मुजुमदार एका प्रमुख काॅलेज मध्ये संगीत विषयाचे प्राध्यापक आहेत. गायक शंकर महादेवन ह्यांच्या आयुष्यातली पहिली गझल चे संगीत देणारे,तसेच राहुल देशपांडे,अश्या एक ना अनेक गायकांसाठी संगीतकार म्हणून काम पाहणारे आशिष मुजुमदारांचे संगीत ऐकायला मिळते.देशविदेशाता ख्याती प्राप्त असणारे,जेष्ठ गझल गायक उस्ताद मेहंदी हसन खाॅं चे शिष्य गझलसरा दत्तप्रसाद रानडे ह्याच्या वैयक्तिक मराठी,हिंदी,उर्दु भाषेतील गझल च्या हजारो मैफिली झालेल्या असून उत्कृष्ट शब्दफेक,स्पष्टोच्चार,ही त्यांची विशेष ओळख आहे.
सोबतीचा करार ची ध्वनिमुद्रकाचे ध्वनिमुद्रण स्व:त च्या मॅजिक नोट स्टुडिओ ची ओळख,आणि तौफिक कुरेशी ह्यांचे सोबत अनेक कार्यक्रमातून साथसंगत करणारे आमोद कुलकर्णी कार्यक्रमात तबला साथसंगत करत आहेत.पुण्यातील नामवंत प्रभात बॅंड चे संचालक,आणि अनेक नव रचनांसाठी संगीतकार,संगीतसंयोजन चे अनेक कार्यक्रमातून तरूण पिढीत स्थान निर्माण करणारे निनाद सोलापूरकर हे सोबतीचा करार मधून सिंथसाजेयर आणि सहगायन केले आहे.

खडकवासला तुडुंब …..अन अवतरली मुठामाई (व्हिडीओ)

0

१४ हजार क्युसेक पाणी मुठेला ……
पुणे- खडकवासला फुल्ल भरल्याने , धरणाचे सकाळी २ + २ = ४ दरवाजे उघडले अन मुठा नदी वाहती झाली दुपारी आणखी दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्यात आले . मुठेला नदीचा सन्मान प्राप्त झाला ..मुठामाई अवतरली ..संध्याकाळी 5 वाजेपर्यंत १४ हजार क्युसेक एवढे पाणी खडकवासल्यातून मुठा नदीत सोडण्यात येत होते .
आज सोमवारी (16 जुलै) सकाळी ८ वाजता मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली .प्रथम २ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले. नंतर आणखी दोन दरवाजे दहा वाजता उघडण्यात आले तेव्हा धरणातून ३ हजार ४३४ क्युसेस पाणी सोडण्यात येत होते. . दुपारी १ वाजता पुन्हा दरवाजे उघडण्यात येणार होते आणि आणखी पाण्याचा विसर्ग होणार होता ..एकंदरीत मुठामाई बहरणार आज .. दोन्ही रस्ते आणि नदीवरचे छोटे पूल हे काही काळा पुरते का होईनात दक्षता म्हणून बंद करावे लागणार असे चित्र होते .

सकाळपर्यंत खडकवासला धरणात २७, पानशेत ९०, वरसगाव ८९, टेमघर १०७ मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या खडकवासला धरण १०० टक्के भरले असून पानशेत ७३ टक्के, वरसगाव ४६ टक्के, टेमघर ४६ टक्के भरले आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु राहिल्यास व धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यास नदीत पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून ८ हजार क्युसेस पाणी सोडल्यास नांदेड गावाजवळील पुल पाण्याखाली जातो. तर २० हजार क्युसेस पाणी सोडल्यास डेक्कन जिमखान्यावरील भिडे पुल पाणी खाली जातो.पहा यासंदर्भात प्रत्यक्ष धरणावरील व्हिडीओ रिपोर्ट पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या अधिकृत मुलाखतीसह …

धरणाचे उघडले २ दरवाजे अन २ जीवांची झाली घालमेल (व्हिडीओ)

पुणे- खडकवासला धरणातून मुठा नदीत आज पाणी सोडण्यात आले तेव्हा २ जीव या पाण्याच्या घेऱ्यात सापडले. होय एक मांजर आणि आणि कुत्रा देखील आहे . सुरुवातील ८ वाजता धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आणि या मुक्या प्राण्यांची घालमेल झाली . इकडे जावं कि तिकडे जावं.. या अवस्थेत ..झालेली हि मुकी कोलाहल … पहा 

खडकवासला भरले

0

उद्या मुठा नदीत पाणी सोडणार
पुणे : खडकवासला धरण 91टक्के भरले असून उद्या सकाळी (सोमवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोड्‌ण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
दरम्यान खडकवासला धरणसखळीतील पाणीसाठा 16.29 टीएमसी (55 .89 टक्‍के) झाला आहे. शहराला पुढील वर्षभर पुरेल एवढे हे पाणी आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतील धरणांचा पाणी साठा रविवारी सकाळी 15.47 टीएमसी (53.10) टक्के होता. या साठयात वाढ होऊन सायंकाळी 5 वाजता हा साठा 16.29 टीएमसी (55.89 टक्के ) झाला आहे. त्यात खडकवासला धरण 91 टक्के भरले असून या धरणात 1.80 टीमसी पाणीसाठा आहे. या धरणाची साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे. खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ होत आहे. या धरणातही रविवारी सायंकाळी 7.52 टीएमसी ( 71 टक्के) पाणीसाठा झाला आहे. तर वरसगाव धरणातील पाणीसाठा 5.37 टीएमसी ( 42 टक्के) झाला असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 1.60 ( 43 टक्के) झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणांचा पाणीसाठा सुमारे 10.06 टीएमसी होता, या साठयाच्या तुलनेत यंदा जुलै मध्येच 6 टीएमसी अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते.
(टीप -येथे देण्यात आलेला व्हिडीओ १२ जुलै २०१६ चा -संग्रही असलेला आहे )

कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ‘ सडक से संसद ‘ लडाई

0
इंटक ‘ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांची पत्रकार परिषदेत घोषणा
पुणे :कामगार, मजूर वर्गाच्या मागण्यांसाठी ‘ सडक से संसद ‘ लढा दिला जाणार असल्याची घोषणा ( राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस )  ‘इंटक ‘ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र प्रदेश इंटक ची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात  झाली. त्यानंतर आगामी कृती कार्यक्रमाची माहिती पत्रकार संघात देण्यात आली.
डॉ. अशोक चौधरी म्हणाले, ‘ कामगारांना न्याय देण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बेरोजगारी वाढली आहे. कारखाने बंद होऊन कामगारांना गावी जाऊन मजुरी करावी लागत आहे, त्यामुळेच मनरेगा मध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे.
कामगारांच्या मागण्यासाठी इंटक सडक से संसद ‘ लढा देणार आहे. त्याचा भाग म्हणून आगस्टमध्ये मुंबईत कामगार अधिवेशन आयोजित केली जाणार आहे.
मोदी सरकारला कामगार विषयक ४४ कायदे कमी करून त्यांची संख्या ४ वर आणायची आहे. त्यामुळे कामगारांचा आवाज दाबला जाणार आहे. याला आमचा विरोध आहे. मजूराला प्रतिदिन किमान ५०० रुपये मजूरी दिली जावी अशी आमची मागणी आहे. कामगार, मजुरांचे काम कायमस्वरूपी व्हावे, असंघटित कामगार क्षेत्राला ५ हजार प्रतिमहिना पेन्शन मिळावी, संघटीत क्षेत्रातील कामगारांना प्रतिमहिना २ हजार रुपये पेन्शन मिळावी, अशी आमची मागणी आहे. काम करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क व्हावा यासाठी आम्ही लढू. तसेच केंद्राच्या निर्गुतवणूक धोरणास आमचा विरोध राहील.असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मेडिकल कार्ड मिळावे, अशीही मागणी आहे.
१९४७  मध्ये स्थापन झालेल्या इंटकचे देशभरात ५ कोटी सदस्य झाले असून संजीव रेड्डी यांच्यासारखे काही जण त्यांचीच इंटक अधिकृत असल्याचे सांगतात. मात्र,खरी इंटक आमची असून ती म. गांधी,वल्लभभाई पटेल यांनी स्थापन केली आहे. २००७ ला यांच नावाची संघटना स्थापन करुन संजीव रेड्डी हे गृहस्थ त्यांची इंटक अधिकृत असल्याचे सांगत फिरत आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. रेडडी यांना इंटक नाव वापरण्यास श्रम मंत्रालयाने मज्जाव केला आहे.या पत्रकार परिषदेला प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे,  प्रदेश सरचिटणीस पराग आठवले ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तेजंदरसिंग अहलूवालिया,  उपस्थित होते

जेष्ठांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

0
पुणे कँम्पःहिंद तरुण मंडळातर्फे घरातील जेष्ठांच्या स्मृती वृक्षारोपण करुन जतन करण्याच्या अभियानास आज प्रारंभ करण्यात आला. केदारी रस्त्यावरील जैन मंदिराजवळ मंडळाच्या जेष्ठ सदस्या स्व.अंजनीबाई रत्नाकर भोज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पारीजाताच्या रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर, संदीप भोसले,महेंद्र भोज,इश्वर मांजरेकर, माधुरी गिरमकर, गणेश भोज,विकास भांबुरे, दीपक कु-हाडे,राजू भगत,जयेश भोज,अतिश कु-हाडे,बलदेव ठाकूर,सौरभ परदेशी, अमोल भोज आदी उपस्थित होते.
  प्रत्येकाने आपल्या घरातील दिवंगत जेष्ठांच्या स्मृती वृक्षारोपणाच्या माध्यमातून जतन केल्यास पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल व जेष्ठांच्या स्मृतीही जपता येतील असे मत यावेळी नगरसेवक दिलीप गिरमकर यांनी व्यक्त केले.
विकास भांबुरे यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश भोज यांनी आभार व्यक्त केले.

महिला बचत गटातील महिला कागदी व कापडी पिशव्यांच्या उत्पादनाकडे

0

 पुणे-प्लास्टिकला पर्याय म्हणून पुणे कॅम्प भागातील महिला बचत गटातील महिलांनी  कागदी व कापडी पिशव्या तयार करत आहेत . पुणे कॅम्प भागातील ताबूत स्ट्रीटवरील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात या पिशव्या तयार करण्यात येत आहेत .

याबाबत  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांनी सांगितले कि , शासनाने प्लास्टिक बंदी निर्णय घेतल्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात महिला बचत गटातील महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कागदी व कापडी पिशव्या तयार करीत आहेत . यामध्ये सुमारे १०० महिलांनी सहभागी होऊन दररोज पिशव्या टतयार करीत आहेत . या पिशव्या आम्ही पुणे कॅम्प भागातील व्यापारी बांधवाना काही पिशव्या मोफत देणार आहोत . त्यानंतर व्यापाऱ्यांना पिशव्या पसंत पडल्यानंतर आम्ही या पिशव्यां व्यापाऱ्यांना देणार आहोत . यामधून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करणार आहोत . महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता महिला पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर त्यांच्या मालासाठी विक्रीचे दालन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे आपण उभारणार आहोत . दररोज मोठ्या प्रमाणावर कागदी व कापडी पिशव्या तयार होत आहेत . प्लास्टिकला पर्याय म्हणून या पिशव्या उपयुक्त आहेत . महिला बचत गटांना अनुदान उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे   पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांनी सांगितले

शिवविद्या प्रबोधनी व बाळासाहेब ठाकरे आय ए एस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षेसाठी पूर्व प्रवेश प्रवेश चाचणी संपन्न

0

   पुणे-महाराष्ट्रातील मातीमधून अधिकारी निर्माण करण्यासाठी शिवविद्या प्रबोधनी व बाळासाहेब ठाकरे आय ए एस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा  परिक्षेसाठी पूर्व प्रवेश प्रवेश चाचणी घेण्यात आली . नाना पेठमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातफे चाचणी घेण्यात आली . या चाचणीमध्ये ११० युवक युवती परीक्षा दिली .सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेदरम्यान हि चाचणी परीक्षा घेण्यात आली .

    यावेळी शिवसेनेचे पुणे शहर संपर्कप्रमुख अजय भोसले ,  शहर प्रमुख संजय मोरे , युवा सेनेचे पुणे कॅन्टोन्मेंट प्रमुख सनी गवते , डॉ. अमोल देवळेकर , विशाल शेवाळे , आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सर्व परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले .

     या पूर्व प्रवेश प्रवेश चाचणीसाठी शंकर साठे , सुवर्णा माने , ऍड. धनश्री बोराडे , स्मिता रांजणे , राहुल गव्हाणे , महेश परदेशी , आदेश ढमाले , अक्षय फुलसौंदर , अरविंद निंबाळकर , मोहन यादव , राजेश पुरम आदींनी विशेष परिश्रम घेतले . पुण्यामध्ये पाच केंद्रामध्ये या पूर्व प्रवेश प्रवेश चाचणी घेण्यात आली . या चाचणीचा निकाल २७ जुलै रोजी लागणार आहे . अशी माहिती शिवसेनेचे पुणे शहर  प्रमुख  संजय मोरे यांनी दिली .

कॅन्टोन्मेंट बोर्डांना स्थानिक महानगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा लष्कराच्या प्रस्तावाचे स्वागत

0

  पुणे-देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नजीकच्या स्थानिक महानगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा भारतीय लष्कराचा प्रस्ताव स्वागतार्थ असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट भागातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांनी केले .

        यामुळे कॅन्टोन्मेंट विभागातील हुशार व गरजू शालेय मुलांना फायदा होईल . या सर्व शालेय विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळेल . तसेच , महिला बचत गटांना महापालिकेकडून मिळणाऱ्या सर्व योजनेचा फायदा महिला बचत गटांना होईल . त्याच बरोबर आर्थिक दृष्टया कुमकुवत रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अनुदान महापालिका दिले जाते . अशा अनेक सुख सुविधा कॅन्टोन्मेंट वासियांना मिळतील . ज्या आज कॅन्टोन्मेंटमध्ये मिळत नाही .

     सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा महापालिकेमध्ये मी,मान सन्मान दिला जातो त्यांना काम करण्याची संधी महापालिकेत  मिळते . सध्या कॅन्टोन्मेंट विभागातील कार्यकर्त्यांना या सर्वापासून वंचित आहेत .

    कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या काही संकोचित सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला तर त्या ठिकाणी जनमत चाचणी प्रशासनाने द्यावी . कॅन्टोन्मेंट विलानीकरण नजीकच्या महापालिकेमध्ये व्हावे यामध्ये फक्त बिल्डरांचा फायदा नसून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे . व प्रशासकीय कामकाजामध्ये सुलभता येईल .शहरच्या मुख्य प्रवाहामध्ये हा संपूर्ण परिसर येईल व संरक्षण खात्याच्या मोठ्या आर्थिक खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन संरक्षणाच्या दृष्टीने लष्कराला अधिक क्षमता मिळेल .  आज देखील पाणी पुरवठा , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , वीज आदी सुविधा या इतर संस्था कडून मिळतात मग कॅन्टोन्मेंट विभागातील नागरी वस्तीचे विलानीकरण नजीकच्या महापालिकेत व्हावे हा प्रस्ताव निश्चितच स्वागतार्थ आहे .

कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना उद्योजकतेची संधी – यशवंत मानखेडकर

0
जागतिक  कौशल्य  दिनानिमित्त  ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने  अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंचे   प्रदर्शन  संपन्न. 
 पुणे  :  कौशल्य  विकास  प्रशिक्षणामुळे  विद्यार्थ्यांमधील नाविन्याची  व सृजनात्मकतेची  वाढ होते.  हजारो  युवकांच्या  हाताला  काम  देण्याचे  सामर्थ्य कौशल्य  विकास  प्रशिक्षणामध्ये आहे. अनेकविध  प्रकारच्या  कौशल्य  अभ्यासक्रमांमुळे युवकांना  उद्योजकतेची  संधी  उपलब्ध   होत आहे, असं  मत  केंद्रीय  युवक  कल्याण  व क्रीडा  मंत्रालयाच्या  नेहरू  युवा केंद्राचे  पुणे जिल्हा  समन्वयक यशवंत  मानखेडकर  यांनी  व्यक्त  केले. 
जागतिक  कौशल्य  दिनानिमित्त  ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने  आयोजित करण्यात  आलेल्या  अभियांत्रिकी व हस्तकौशल्य वस्तूंच्या प्रदर्शनाचे  उद्घाटन  करताना  ते  बोलत  होते. 
यावेळी पुढे बोलताना  ते म्हणाले की, आजच्या  या प्रदर्शनात मांडण्यात  आलेल्या  विद्यार्थ्यांनी  तयार  केलेल्या  अभियांत्रिकी व हस्तकौशल्याच्या  वस्तू या खरोखर समाजाला उपयुक्त  अशा  असून या वस्तूंचा  व्यावसायिक  वापर  केल्यास  त्यातून  नक्कीच  उद्योजकतेची  संधी  निर्माण  होऊ  शकते  असा  विश्वास  व्यक्त केला. तसेच  संस्थेनेही  या प्रकल्प  वस्तुंच्या  निर्मितीचे पेटंट मिळ्वण्याबाबतही  प्रयत्न करावेत असे  सांगितले. 
या  अभियांत्रिकी  व हस्तकौशल्य वस्तूंच्या  प्रदर्शनात यशस्वी  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिका  व कमवा  योजनेतील विद्यार्थी, राष्ट्रीय  माध्यमिक  शिक्षा  अभियानातील  विद्यार्थी  व कौशल्य सेतू अभियानातील   विद्यार्थ्यांनी  तयार केलेल्या वस्तूंचा  सहभाग  होता. 
यामध्ये सोलर  ऑपरेटेड  एअर कुलर, इलेक्ट्रिसिटी  जनरेशन युजिंग  स्पीड  ब्रेकर, ऑटोमॅटिक  फर्टीलायझर स्प्रेडींग मशीन, सोलर  ट्रेन   या व अशा  एकूण २२ प्रकल्प वस्तूंचा  समावेश  होता. 
विशेष  उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रदर्शनात  औरंगाबाद  जिल्ह्यातून  आलेल्या  जिल्हा परिषद  शाळेतील   विद्यार्थ्यांनी तयार  केलेल्या   इलेक्ट्रिक  हायड्रॉलिक  लिफ्ट, मोबाईलमधील  वायफाय  कनेक्शनवर चालणारे  रॉड रोलर मॉडेल व सोलार  कार  या  प्रकल्प वस्तू  मांडण्यात  आल्या होत्या. 
याप्रसंगी  उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या  विद्यार्थ्यांना सुवर्णपदक  व प्रशस्तिपत्रक  देऊन  गौरविण्यात  आले. 
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  संस्थेचे  रजिस्टार  डॉ. विजय  कुलकर्णी यांनी  सूत्रसंचालन  योगेश  रांगणेकर  यांनी  तर आभार  प्रदर्शन  प्रा. राम  सोमण  यांनी  केले.               
या कार्यक्रमाच्या  संयोजनासाठी   प्रा. सुनीता  पाटील,  प्रा. स्वाती पाटील, गंगाधर डुकरे, निखिल चव्हाण, बापूराव  आटपाडकर, सतीश  माळी, अश्विनी लांडगे, पवन शर्मा, भारती भालेराव, संगीता  म्हात्रे, शाम  वायचळ, प्रथमेश  पाटील, श्रीकांत  तिकोने, सचिन कुंभारकर आदींनी सहकार्य  केले.