पुणे-महाराष्ट्रातील मातीमधून अधिकारी निर्माण करण्यासाठी शिवविद्या प्रबोधनी व बाळासाहेब ठाकरे आय ए एस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षेसाठी पूर्व प्रवेश प्रवेश चाचणी घेण्यात आली . नाना पेठमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातफे चाचणी घेण्यात आली . या चाचणीमध्ये ११० युवक युवती परीक्षा दिली .सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेदरम्यान हि चाचणी परीक्षा घेण्यात आली .
यावेळी शिवसेनेचे पुणे शहर संपर्कप्रमुख अजय भोसले , शहर प्रमुख संजय मोरे , युवा सेनेचे पुणे कॅन्टोन्मेंट प्रमुख सनी गवते , डॉ. अमोल देवळेकर , विशाल शेवाळे , आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी सर्व परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले .
या पूर्व प्रवेश प्रवेश चाचणीसाठी शंकर साठे , सुवर्णा माने , ऍड. धनश्री बोराडे , स्मिता रांजणे , राहुल गव्हाणे , महेश परदेशी , आदेश ढमाले , अक्षय फुलसौंदर , अरविंद निंबाळकर , मोहन यादव , राजेश पुरम आदींनी विशेष परिश्रम घेतले . पुण्यामध्ये पाच केंद्रामध्ये या पूर्व प्रवेश प्रवेश चाचणी घेण्यात आली . या चाचणीचा निकाल २७ जुलै रोजी लागणार आहे . अशी माहिती शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली .