Home Blog Page 3105

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बीआयपीएल रायजिंग ईगल्सची आगेकुच

0
पुणे, 2 ऑगस्ट 2018- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाने आपली विजयी मालिका कायम राखत स्पर्धेत आगेकुच केली.
 
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाने  मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स संघाचा 44-38 असा पराभव करत आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखले.  वैष्णवी सिंग,  अभय नागराजन,  अर्णव पापरकर ,  दक्ष अगरवाल व  मोहिनी घुले यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:   
बीआयपीएल रायजिंग ईगल्स वि.वि. मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स 44-38( 10वर्षाखालील मुली:  वैष्णवी सिंग वि.वि मृणाल शेळके 4-1,  10वर्षाखालील मुले:  अभय नागराजन वि.वि समिहन देशमुख 4-1,  12वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि प्राप्ती पाटील 5-6,  12वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर वि.वि सनय सहानी 6-0, 14 वर्षाखालील मुली: माही शिंदे पराभूत वि खुशी शर्मा 1-6, 14वर्षाखालील मुले: निशित शहाने पराभूत वि सिध्दार्थ मराठे 5-6,  16वर्षाखालील मुली: मोहिनी घुले पराभूत वि रिया भोसले 2-6,  16वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल वि.वि रोहन फुले 6-1, मिश्र दुहेरी- अव्दिक नाटेकर/रिया वाशिमकर पराभूत वि जुई काळे/अर्जुन किर्तने 5-6, मिश्र दुहेरी- दक्ष अगरवाल/मोहिनी घुले वि.वि रिया भोसले/ओमकार अग्निहोत्री 6-5)

आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंटबाजी ; भाजप आमदार मेधा कुलकर्णींचं

0

पुणेः आमदारांच्या घरासमोर बसून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असेल, तर त्यांनी आमच्या घरापुढे बसावं. पण आमच्या  घरासमोर केले जाणारे ठिय्या आंदोलन म्हणजे केवळ ‘स्टंट’ असल्याचं वक्तव्य भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

शुक्रवार (दि.3) रोजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरासमोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यावर त्यांना विचारलं असता मेधा कुलकर्णी यांनी हे  विधान केलं आहे.

शासन आपल्या पातळीवर आरक्षण देण्याचा योग्य प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून काय फायदा, असा प्रश्न यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, हे सर्व मुद्दे बौद्धिक पातळीवर आणि कायद्याच्या चौकटीत सोडवायला हवेत, आमच्या दारासमोर आंदोलन करून त्यांना आरक्षण मिळणार असेल तर त्यांनी ते करावं. मात्र, मराठा आंदोलक केवळ वेळ वाया घालवत स्टंट करत असल्याची प्रतिक्रिया आ मेधा कुलकर्णी यांनी यावेळी दिली आहे.

 

पालकमंत्री बापट यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

0

या आंदोलनाचा भाग म्हणून पुण्यात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा येथील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलांनी ठिय्या मांडत आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. दरम्यान, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या आमदारांची मुंबई येथे बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला गिरीश बापट जाणे अपेक्षित आहे मात्र आज आपण मला भेटायला येणार हा निरोप मिळाल्यावर मी तुमची भेट घेण्यासाठी पुण्यातच थांबलो अस गिरीश बापट हे आंदोलकांशी चर्चा करताना म्हणाले.

बापट पुढे म्हणाले, आंदोलनात गुन्हे असणाऱ्या तरुणांची यादी दिल्यास जे तरुण हिंसक आंदोलनात नसतील त्यांची यादी मी पोलीस आयुक्तांना देईन. मात्र फक्त एकच हात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा असे आवाहन देखील बापट यांनी आंदोलकांना केले.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले, जे अद्याप सुरुच आहे.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50 टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.

राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.

आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

पश्चिम महाराष्ट्रात नवीन थ्री फेजचे वीजमीटर पुरेश्या प्रमाणात उपलब्ध

0

पुणे, पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत थ्री फेजचे पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. या वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी पुरेसे थ्री फेजचे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २० कि व्हो पेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठीही पुरेसे  सीटी ऑपरेटेड टीओडी वीजमिटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. नवीन मीटर लावल्यानंतर त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. महावितरणची वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या शुल्काची माहिती उपलब्ध आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी थेट संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अथवा कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून द्यावी. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नवा मोबाईल-लाव्हा झेड ६१चे लॉन्चिंग

पुणे : लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेडने आज लाव्हा झेड६१ लॉन्च करीत असल्याची घोषणा केली. स्टाईलिश डिझाईन आणि वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा असलेला झेड६१ हा लाव्हाच्या झेड स्मार्टफोनच्या श्रृखंलेतील स्मार्टफोन आहे. नव्या झेड६१मध्ये `शार्प क्लिक` तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्याला बारीक तपशील कॅमेरात कैद करून फोटोग्राफीचा अभूतपूर्व आनंद मिळविता येतो. ८ एमपी ऑटोफोकस मागील कॅमेरा, ५ एमपी पुढचा कॅमेरा (स्क्रीन आणि एलईडी फ्लॅशसह) आणि सुधारित बोकेन मोड असलेल्या झेड६१ स्मार्टफोनमुळे त्याच्या मालकाला अत्याधुनिक कॅमेराचा अनुभव प्रदान करतो.

मुख्यत: परिपूर्ण स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना डोळ्यापुढे ठेवून १८:९ फूल-स्क्रीन आणि उत्कृष्ट डिझाईनचा झेड६१ हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. यामध्ये १ जीबी रॅम, १६ जीबी रोम, ३००० एमएएच बॅटरी असून त्याची किंमत ५७५० रुपये आहे. हा स्मार्टफोन ८० हजारांहून अधिक आऊटलेटमध्ये काळ्या (ब्लॅक) आणि सोनेरी (गोल्ड) रंगात उपलब्ध असेल. २ जीबी रॅम असलेला दुसऱ्या प्रकारचा झेड६१ हा स्मार्टफोन ऑगस्ट २०१८मध्ये लॉन्च करण्यात येईल.

स्मार्टफोनच्या या लॉन्चिंगबद्दल लाव्हा इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष श्री. दीपक महाजन म्हणाले, `छोट्या-छोट्या गोष्टी देखील खूप वेगळेपण दाखवू शकतात, असे आम्ही मानतो आणि आमच्या झेड श्रृंखलेत नुकताच दाखल झालेला झेड६१ हा त्याचे प्रतीक आहे. आमचा हा नवा स्मार्टफोन कॅमेराचा अतुलनीय अनुभव देण्याबरोबरच सुंदर डिझाईन आणि निर्दोष कार्यक्षमता असलेला देखील आहे. याच्या शार्प क्लिक तंत्रज्ञानामुळे अतिशय आकर्षक आणि हाय-डेफिनेशन छायाचित्रे काढता येतात. तसेच एचडी+ स्क्रीनमुळे वापरकर्त्याला उत्कृष्टपणे व्हिडीओ पाहण्याचा आनंद मिळतो. यशस्वी ठरलेल्या लाव्हाच्या झेड श्रंखलेतील हा नवा स्मार्टफोन सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा आम्हाला विश्वास आहे.`

झेड६१चे डिझाईन आणि तंत्रज्ञान यामुळे स्मार्टफोन वापरण्याचा आनंद द्विगुणित करतो. २.५डी कर्व्हवरील कॉर्निंग गोरिला ग्लाससह पूर्ण लॅमिनेशनचा ५.४५” एचडी+ स्क्रीन हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आहेत. ८.६५ मिमी जाडी असलेला हा स्मार्टफोन अतिशय स्लीकेस्ट स्मार्टफोन्सच्या श्रेणीतील एक फोन आहे. स्मार्टफोनच्या लेसर फिनिश डिझाईनमुळे तो स्लीम दिसतो आणि त्याच्या प्रीमियम स्टाईलमध्ये त्यामुळे अधिक भर पडली आहे.

१ जीबीसाठी अॅण्ड्रॉइड™ ओरिओ™ (गो एडिशन)चे तर, २जीबीसाठी अॅण्ड्रॉइड™८.१. ओरिओ™चा सपोर्ट असलेला झेड६१ हा अत्युच्च अनुभव देतो. ३००० एमएएचची बॅटरी कार्यक्षमता वाढवते आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती दीड दिवस चालते. याशिवाय, ही बॅटरी एआय तंत्रज्ञानावर आधारीत असून हे तंत्रज्ञान केवळ फोनच्या बॅटरीच्यावापरावरच केवळ देखऱेख ठेवत नाही तर, वापरकर्त्याने जरासुद्धा हात न लावलेले बॅकग्राऊंडला सुरू असलेले अॅपही बंद करते.

या डिव्हाईसमध्ये १.५ गिगाहर्ट्झ क्वॉड कोअर प्रोसेसर असून, १जीबी/ २जीबी रॅम आणि १६ जीबी रोममुळे ग्राहकाला संगीत, व्हिडीओ, फोटो, अॅप्लिकेशन्स आणि अन्य डाटा ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. लाव्हा झेड६१च्या होमस्क्रीनवर भाषेचा (लँग्वेज) शॉर्टकट देण्यात आला आहे. ज्याद्वारे वापरकर्त्याला सिस्टीमसाठी अतिशय सुलभरित्या आपल्याला पाहिजे असलेली भाषा निवडून संवाद साधता येऊ शकतो. याशिवाय, आपल्या स्वत:च्या भाषेत एसएमएस वाचविण्याचा पर्याय देखील वापरकर्त्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनसाठी ग्राहकाला एकदा स्क्रीन बदलून देण्याची विशेष लॉन्चिंग ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर ३० सप्टेंबर २०१८पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या लाव्हा झेड६१साठी लागू आहे.

सर्व श्रेणीच्या ४जी स्मार्टफोन्सवर विशेष कॅशबॅक ऑफरसाठी लाव्हाने जागतिक दर्जाचे सर्व आयपी ४जी एलटीई नेटवर्क आणि जगातील सर्वात मोठे मोबाईल डाटा नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओबरोबर सुद्धा भागीदारी केली आहे. जिओ सिमकार्डसमवेत नवीन झेड६१ वापरणाऱ्या ग्राहकाला २,२०० रुपयांचा ताबडतोब परतावा देण्यात येणार आहे. या ऑफरअंतर्गत झेड६१च्या सर्व वापरकर्त्यांना प्रत्येकी ५० रुपयांची ४४ कॅशबॅक व्हाऊचर्स देण्यात येतील. १९८ रुपयांच्या किंवा २९९ रुपयांच्या पहिल्या रिचार्जवर ग्राहकांना ते दिले जातील. हे व्हाऊचर्स `मायजिओ` अॅपमध्ये उपलब्ध असतील. ही ऑफर जिओच्या विद्यमान तसेच नव्या ग्राहकांना लागू असेल. या ऑफरअंतर्गत ग्राहक पुढीलप्रमाणे लाभ घेऊ शकतील:

 

­

प्लॅन १९८ रु. २९९ रु.
प्लॅनचे लाभ मोफत अमर्यादित कॉलl, मोफत रोमिंग कॉल्स, अमर्यादित डाटा, अमर्यादित एसएमएस (१००/प्रतिदिन), व्हिडीओ कॉल्स,

कॉम्प्लिमेन्ट्री जिओ अॅप सबस्क्रिप्शन

प्लॅनची वैधता २८ दिवस २८ दिवस
एकूण प्लॅन ४जी डाटा ५६ जीबी (२ जीबी/प्रतीदिन) ८४ जीबी (३ जीबी/प्रतीदिन)
मायजिओमध्ये त्वरित कॅशबॅक २२०० रुपये

(५५ रुपयांचे ४४ व्हाऊचर्स)

२२०० रुपये

(५५ रुपयांचे ४४ व्हाऊचर्स))

प्लॅनची प्रभावित किंमत १४८ रुपये २४९ रुपये

 

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. शाळेमध्ये बाल सभेचे आयोजन करण्यात आले .या सभेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनीच पार पडले. अध्यक्ष म्हणून इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील कु.सानिया भंडारे ,लोकमान्यांच्या वेशभूषेत चि.गणेश पासलकर व अण्णा भाऊ साठे यांच्या वेशभूषेत कु.गौरी पुंडे हे विद्यार्थी आले होते.

बाल सभेचे औचित्य साधून शाळेत चालू असलेल्या स्वस्तिक पथकातील बालव्यवस्थापकांचा शपथविधी आज घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ , कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांनी केले . विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचे दहा गुण बाईंनी सांगितले .शाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती चि. हर्षवर्धन मुळीक याने सांगितली. त्यानंतर लोकमान्य टिळक व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याविषयी भाषणे  विद्यार्थ्यांनी केली .लोकमान्यांच्या वेशभूषेतील चि.गणेश पासलकर  याने अवांतर वाचन व व्यायामातून शरीर व मन बळकट करा असा संदेश दिला .अध्यक्ष भाषणात लो.टिळक व अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार मांडले.इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक स्तवन सादर केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ.तनुजा तिकोने यांनी बालसभा आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाबासकी दिली.

लोकमान्य टिळकांची अधिक माहिती मिळवण्यासाठी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी नारायण पेठेतील केसरीवाड्यास भेट दिली .यावेळी तेथे माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ व ज्येष्ठ शिक्षक  सौ तनुजा तिकोने, सौ.जयश्री खाडे, व धनंजय तळपे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला .

या बालसभेचे सूत्रसंचालन  चि.गंधार दांडेकर,पाहुण्यांचा परिचय चि.अन्वय जोगळेकर,आभार  कु अनन्या बर्वे या विद्यार्थ्यांनी केले .विशेष म्हणजे सभेसाठी फलक लेखन कार्यक्रम पत्रिका बैठक व्यवस्था रांगोळ्या इत्यादी सर्व सभेची तयारी विद्यार्थ्यांनीच केली होती .अशा प्रकारे शाळेत बाल सभेचे आयोजन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

रुग्‍ण कल्याण समित्‍यांचा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आढावा

0

पुणे- राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान  तसेच राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत रुग्‍ण कल्‍याण नियामक समित्‍यांची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घेतली. रुग्‍णांच्‍या उपचारासाठी येणारा निधी आरोग्‍य शिबीर आणि अत्‍यावश्‍यक औषध खरेदीसाठी वापरावा, अशा सूचना त्यांनी दिल्‍या. बैठकीस जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री,  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी दिलीप माने, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी संजय दराडे, डॉ. एन.जी. ढवळे आदींसह इतर सदस्‍य उपस्थित होते.

प्रारंभी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी गेल्‍या आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला. या वर्षातील नियोजनाप्रमाणे खर्च करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले. उरो रुग्‍णालय, प्रादेशिक मनोरुग्‍णालय, कुष्‍ठरोग रुग्णालय यांच्‍या खर्चाचा आढावा घेण्‍यात आला.  राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रम, नियमित लसीकरण, आशा योजना, महत्‍त्वाचे आजार नियंत्रण कार्यक्रम याशिवाय माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला.

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने यांनी जिल्‍ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्रे, 13 आयुर्वेदीक दवाखाने, 26 ग्रामीण रुग्णालये, 3 तरंगते दवाखाने, 11 आरोग्य पथके कार्यरत असल्‍याचे सांगितले. जिल्‍ह्यात 125 रुग्ण कल्‍याण समित्‍या असून त्‍यांच्‍या नियमित बैठका होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पुणे जिल्‍हा राज्‍यात दुस-या क्रमांकावर असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

 

चाकण एमआयडीसी, परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

0

पुणे, दि. 02 : महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही व 132 केव्ही अशा दोन वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण शहर, परिसर तसेच चाकण एमआयडीसीमध्ये काल मध्यरात्री एक ते अडीच तास वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान महापारेषणच्या दुरुस्ती कामामुळे चाकण एमआयडीसीमधील चार 22 केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. 2) दिवसभर बंद ठेवावा लागला.

याबाबत माहिती अशी, की बुधवारी (दि. 1) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास महापारेषणच्या चाकण उपकेंद्रातून जाणाऱ्या 400 केव्ही वीजवाहिनीमध्ये दोन ठिकाणी बिघाड झाला. त्यामुळे चाकण शहर, परिसर, कुरळी गाव तसेच चाकण एमआयडीसीमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. मात्र भार व्यवस्थापन शक्य न झाल्यामुळे चाकण एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या सारा सिटी, कुरुळी आणि खलुंब्रे या 22 केव्ही वीजवाहिन्यांवर नाईलाजाने प्रत्येकी दोन तासांचे भारनियमन करावे लागले.

दरम्यान दुरुस्तीसाठी याच 400 केव्ही वीजवाहिनीच्या मनोऱ्याखाली असलेल्या महावितरणच्या वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीमधील कल्याणी, एमआयडीसी, सारा सिटी व अहमदनगर फोर्जींग या 22 केव्हीच्या चार वीजवाहिन्यांवरील सुमारे 3500 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुद्धा नाईलाजाने आज दिवसभर बंद ठेवावा लागला.

याशिवाय बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास महापारेषण कंपनीची चाकण-चिंचवड या 132 केव्ही वीजवाहिनीत बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या 33 केव्ही क्षमतेच्या एकूण 7 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी राजगुरुनगर शहर, पाईट व वाडा या गावांसह भोसरी, तळवडे एमआयडीसी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या 4 वीजवाहिन्यांना 132 केव्ही नारायणगाव वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने उर्वरित ह्युंदाई, इशा व कल्याणी या 3 वीजवाहिन्यांवर सुमारे 3 तासांचे भारनियमन करावे लागले.तसेच महापारेषणच्या वीजवाहिन्यांतील या बिघाडामुळे ग्राहकांना नाहक त्रास सोसावा लागला व आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

रोटरीच्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार

0

पुणे :रोटरी क्लब च्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (‘ आयएमईडी’) सहभागी होणार आहे.रोटरी क्लबने ९ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेबद्दल विद्यार्थी, प्राध्यापकांना गुरुवारी आयएमईडी येथे माहिती दिली. अध्यक्षस्थानी ‘ आयएमईडी ‘ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर होते.रोटरीचे गिरीश देशपांडे, उदय कुलकर्णी, सायली भालेराव, मानसी भालेराव हे पदाधिकारी , प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते

पियुष भगवानराव साळुंखे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत महाराष्ट्रात पाचवा

0
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फीरोदीया विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष महाराष्ट्रात पाचव्या तर देशात ६३ व्या स्थानावर आहे. त्याची आय.ए.एस.च्या केडरसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशानिमित्त त्याचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांशी संवाद याचे सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांशी संवाद याचे आयोजन महाविद्यालयाच्या कुंदनमल फीरोदिया सभागृहात करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. नितिन कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी प्रास्ताविक केले. अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाची जोड दिल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये यश नक्की मिळेल असा सल्ला सत्कारार्थी पियूष ने उपस्थित विद्यार्थ्यांना दिला प्रशासकीय कार्यालये सामान्य लोकांसाठी अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी मी काम करेन असे पियुष ने नमूद केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनाही त्याने मनमोकळेपणे उत्तरे दिली.
या सत्कार समारंभासाठी पियुषचे वडिल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. भगवानराव साळुंखे, आई सौ. शशिकला साळुंखे उपस्थित होते. पियुषच्या यशासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विकास काकतकर यांनी त्याचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थीनी भक्ती मुथा हिने सुत्रसंचालन केले.

मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली.

0

पुणे-पुण्यात धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे चातुर्मास चालू असलेल्या दिगंबर जैन मुनीश्री प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांची कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दुपारी भेट घेतली आणि मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मुनीश्रींनी पृथ्वीराज चव्हाण यांना विविध पुस्तके व ग्रंथ भेट दिले. दि.१२ ऑगस्ट पासून येथे सुरु होणाऱ्या मुनिश्रींच्या ‘ज्ञानगंगा महोत्सवा’त मी आवर्जून येईन असे पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड होते. याप्रसंगी संयोजक सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल व कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे पुष्प्गुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी जितेंद्र शहा, सुजाता शहा, अजित पाटील, अभय कोठारी, आनंदी शहा आदी उपस्थित होते.

ग्रेडपे -वेतन कपातीने पालिका कर्मचारी मेटाकुटीला-(व्हिडीओ)

0

पुणे- ग्रेड पे च्या प्रश्नाने होणाऱ्या वेतनकपाती च्या समस्येने पुणे महापालिकेचे कर्मचारी मेटाकुटीला आले असून कायमची डोक्यावर असलेली वेतन कपातीची तलवार बाजूला करणारा कोणताही उपाय अद्याप न सापडल्याने यापुढे संपाचे हत्यार उपसण्या शिवाय गत्यंतर उरलेले नाही असा पवित्रा कर्मचारी संघटना घेण्याच्या मार्गावर दिसत आहेत . कालच काही कर्मचाऱ्यांच्या झालेल्या वेतन कपातीच्या आदेशामुळे आज पुन्हा सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या हिरवळीवर निदर्शने करत निषेध नोंदविला आणि महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यापुढे पुन्हा आपले गाऱ्हाणे मांडले .आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आश्वासन मिळविले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना  शासनाच्या ग्रेड पे नुसारच वेतन द्यावे या राज्य शासनाच्या एका जुन्या आदेशाचा आधार घेत अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनी प्रमोशन देताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात सुरु केली आहे . एकीकडे अनधिकृत पणे काम करणारे कर्मचारी, मोठ्या संख्येने असलेल्या रिक्त जागा आणि त्यात आता मुख्य सभेचे निर्णय झुगारून अधिकृत कर्मचाऱ्यांची या पद्धतीने होणारी वेतन कपात या त्रांगड्यात पालिकेची बजबजपुरी होते आहे . प्रशासनाने मुख्य सभेचे याबाबतचे निर्णय डावलल्यानंतर कर्मचाऱ्यांनी  गेल्या महिन्यात महापालिकेसमोर मोठे आंदोलन केले होते .आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची  भेट घेऊन त्यांच्या समोर देखील हा मुद्दा मांडला होता . त्यानंतर वेतन कपातीचे प्रशासनाचे धोरण स्थगित होईल असे कर्मचाऱ्यांना वाटले .पण प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे कालच्या एका आदेशान्वये स्पष्ट झाले . एवढेच नव्हे तर आता यापुढे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर  शासनाचा ग्रेड पे लागू करून वेतनकपातीची तलवार तळपू लागली आहे . भाजप सत्ताधारी त्यांची जाहीर साथ असताना  १८ हजार कर्मचारी या असणातोशाने धुमसताना दिसत आहेत . या पार्श्वभूमीवर वेतन कपातीची हि तलवार आता कायमची बाजूला करण्यासाठी संपाचे हत्यार उपसावे काय ? अशा प्रश्नांवर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झडू लागली आहे . यावर जाहीर पणे अधिकृतपणे कोणतीही भूमिका कर्मचारी संघटनांच्या  प्रतिनिधींनी स्पष्ट केली नसली तरी उग्र आंदोलनाचा मात्र इशारा दिला आहे .  सत्ताधारी विविध पण छुप्या मार्गाने या असंतोषाचे बळी ठरत आहेत .  विरोधी पक्षांनी याबाबत घेतलेली ‘देखते रहो ‘ ची भूमिका आणि कर्मचाऱ्यांच्या लटकत्या समस्या यामुळे पालिकेचे प्रशासन देखील डबघाईला येणार आहे हे निश्चित .
या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी संघटनेचे एक प्रतिनिधी बापू पवार यांची माय मराठी ने घेतलेली हि मुलाखत ……

मेट्रो प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – मोहोळ (व्हिडीओ)

0

पुणे – पौडफाटा उड्डाणपूलावरून थेट शिवणेपर्यंत आता मेट्रो करण्यासाठी स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत त्यासंबंधीच्या प्रकल्प अहवाल करण्याबाबतच्या  प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.मेट्रो पुण्याच्या चारही दिशेला व्हावी,प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी  यासाठी आमचे प्रयत्न असतील असे यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले .

ते म्हणाले कि ,कोथरूड गाव, कर्वेनगर, वारजे, डहाणूकर कॉलनी, नवसह्याद्री, हिंगणे, हॅपी कॉलनी, वारजे जकातनाका परिसर, कमिन्स कॉलेज परिसर हा सध्या मोठ्या लोकसंख्येचा भाग झाला आहे. तसेच या परिसराला आता शिवणे, उत्तमनगर ही गावेही जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात होणारे औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा विस्तार आणि वाढते नागरिकरण लक्षात घेता मेट्रो शिवणेपर्यंत धावावी, असा प्रस्ताव स्थायी समोर मी ठेवला होता  त्याला स्थायीने मंगळवारी मंजुरी दिली. मेट्रोच्या या विस्तारित प्रकल्पासाठी अहवाल तयार करण्याला “महामेट्रो’ला सांगण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानुसार येथील कामालाही लवकरच सुरूवात होईल.

 

सिंगापूर शासनाकडून पुणे महानगर प्रदेशाची विकास पाहणी ; आराखडा प्रक्रिया सुरु

0

पुणे-पुणे महानगर प्रदेशाचा अत्याधुनिक विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने
सिंगापूर शासनाच्या वतीने सुरबाना जूरोंग संस्थेच्या टीमकडून भौगोलिक क्षेत्राची पाहणी दि. २३ ते २५
जुलै दरम्यान पूर्ण करण्यात आली.विकास आराखड्यातील संभाव्य स्थळाची पाहणी केल्यानंतर

पीएमआरडीएच्या मुख्य सभागृहामध्ये दि.२६ जुलै २०१८ रोजी पाहणी टीम आणि पीएमआरडीए अधिकारी

वर्गासोबत सयुंक्त कार्यशाळा संपन्नझाली. यावेळी महानगर आयुक्त किरण गित्ते, नियोजन विभागाचे महानगर नियोजनकार विवेकखरवडकर, सुरबाना जूरोंग संस्थेचे संचालक आंनदन करुणाकरण, क्रिसिल संस्थेचे प्रकल्प

वयवस्थापक रीदल दमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.


पीएमआरडीए हदीतील नगरपरिषद क्षेत्र, म्हाळुंगे नगर रचना योजना, विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ),
औद्योगिक विकास क्षेत्र, प्रदेशातील धरण क्षेत्र, पश्चिम घाट क्षेत्र, पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग परिसर,
टाऊनशिप आदी क्षेत्र अग्रस्थानी ठेऊन या विकसनशील क्षेत्राची विशेष करून पाहणी करण्यात आली.
दि.२६ जुलैला संपन्न झालेल्या सयुंक्त कार्यशाळेमध्ये प्रदेश विकास आराखडा तयार करण्यासाठी चर्चेअंती
सिंगापूरटीमला एक समयबद्ध कार्यक्रम देण्यात आला. याप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत सामाजीक व आर्थिक
सर्वेक्षण अहवाल, ऑक्टोबर महिन्यापर्यंत कन्सेप्ट प्लॅन आणि मार्च २०१९ पर्यंत प्रारूप विकास आराखडा
तयार करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त श्री किरण गित्ते यांनी दिली.

प्रियदर्शिनी गोविंद यांच्या ‘भरतनाटयम’चे सादरीकरण पुण्यात

0
‘संप्रदाय- अनफोल्डींग द ट्रॅडीशन्स’
 
पुणे :‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलाकार प्रियदर्शिनी गोविंद यांच्या भरतनाट्यम चे सादरीकरण ४ ऑगस्ट रोजी प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
‘संप्रदाय- अनफोल्डींग द ट्रॅडीशन्स’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
‘नृत्ययात्री’ संस्थेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर, येथे ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे, अशी माहिती ‘नृत्ययात्री’ संस्थेच्या संस्थापक मेघना साबडे यांनी दिली.
प्रियदर्शिनी गोविंद, सध्याच्या पिढीतील भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. संगीत नाटक अकॅडमी २०१२ च्या त्या विजेत्या आहेत.