पुणे-पुणे महानगर प्रदेशाचा अत्याधुनिक विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने
सिंगापूर शासनाच्या वतीने सुरबाना जूरोंग संस्थेच्या टीमकडून भौगोलिक क्षेत्राची पाहणी दि. २३ ते २५
जुलै दरम्यान पूर्ण करण्यात आली.विकास आराखड्यातील संभाव्य स्थळाची पाहणी केल्यानंतर
पीएमआरडीएच्या मुख्य सभागृहामध्ये दि.२६ जुलै २०१८ रोजी पाहणी टीम आणि पीएमआरडीए अधिकारी
वर्गासोबत सयुंक्त कार्यशाळा संपन्नझाली. यावेळी महानगर आयुक्त किरण गित्ते, नियोजन विभागाचे महानगर नियोजनकार विवेकखरवडकर, सुरबाना जूरोंग संस्थेचे संचालक आंनदन करुणाकरण, क्रिसिल संस्थेचे प्रकल्प
वयवस्थापक रीदल दमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
पीएमआरडीए हदीतील नगरपरिषद क्षेत्र, म्हाळुंगे नगर रचना योजना, विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ),
औद्योगिक विकास क्षेत्र, प्रदेशातील धरण क्षेत्र, पश्चिम घाट क्षेत्र, पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग परिसर,
टाऊनशिप आदी क्षेत्र अग्रस्थानी ठेऊन या विकसनशील क्षेत्राची विशेष करून पाहणी करण्यात आली.
दि.२६ जुलैला संपन्न झालेल्या सयुंक्त कार्यशाळेमध्ये प्रदेश विकास आराखडा तयार करण्यासाठी चर्चेअंती
सिंगापूरटीमला एक समयबद्ध कार्यक्रम देण्यात आला. याप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत सामाजीक व आर्थिक
सर्वेक्षण अहवाल, ऑक्टोबर महिन्यापर्यंत कन्सेप्ट प्लॅन आणि मार्च २०१९ पर्यंत प्रारूप विकास आराखडा
तयार करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त श्री किरण गित्ते यांनी दिली.