Home Blog Page 3099

कॉसमॉस बँकेच्या ५०० खातेदारांंच्या खात्यातून पळविले ९४ कोटी – ऑनलाईन दरोडा

पुणे-गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हर हॅक करून सुमारे ५००  खातेधारकांच्या खात्यातून  तब्बल ९४ कोटी रुपये हॉंगकॉंग येथील बँकेत ट्रान्सफर करण्यात  (पळवून नेण्याची ) आल्याची माहिती समोर आली आहे.  डेबिट कार्ड आणि रुपी कार्डाची ची माहिती चोरण्याचा घटना घडली आहे.या सर्व प्रकारामुळे बँकक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.तर कॉसमॉस सह  बँकेत खाती असणारे खातेदार यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे . कॅशलेस आणि इंटरनेट या प्रकारचे तोटे थेट ग्राहकांच्या माथी बसणार आहेत कि काय ? आपले पैसे सुरक्षित राहण्यासाठी बॅंका हा पर्याय निवडणाऱ्या नागरिकांना हा प्रश्न या पुढे सतावत राहणार आहे .

हा प्रकार ११ ऑगस्टला दुपारी ३ ते रात्री १० आणि १३ ऑगस्टला सकाळी साडेअकरापर्यंत घडला. ११ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात कॅनडा सह २४ देशातून केवळ २ तासात ८० कोटी रुपये काढले गेले. तर १३ ऑगस्टला दुपारी १३ कोटी ९२ लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळविण्यात आले व तातडीने ते काढून घेतले गेले.

याबाबत बँकेकडून  सांगितले की, शनिवारी जेव्हा हा सायबर हल्ला झाला त्यात एकाचवेळी इतके इंटरनॅशनल व्यवहार होत असल्याचे पाहून व्हिसा कार्ड देणाऱ्या कंपनीने ही बाब रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तातडीने कॉसमॉस बँकेला याची कल्पना दिली. रविवारी संपूर्ण दिवस बँकेचे अधिकारी व तज्ज्ञ या सर्व व्यवहाराची माहिती घेत होते. त्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा झालेल्या सायबर हल्ल्यात १३ कोटी ९२ लाख रुपये हाँगकाँगला वळविण्यात आले.

याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती आणि हाँगकाँग मधील एएलएम ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय आहे. तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर कोणीतरी मालवेअरचा हल्ला करुन बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहार केले. याद्वारे ७८ कोटी रुपयांचे व्यवहार भारताबाहेर  झाले आहेत. तसेच रुपे कार्डचे २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे भारताबाहेर गेले आहेत. असे एकूण १४ हजार ८४९ व्यवहारांसाठी ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व एनपीसीआय यांना कॉसमॉस बँकेने मान्यता दिल्याचे भासवून कोणी तरी त्या अप्रुव्ह केल्याचे भासवून त्याद्वारे ८० कोटी रुपये काढून घेतले होते. हे सर्व व्यवहार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत घडले.

त्यानंतर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन रिक्वेस्टस व्हिसा व इनिशिएट करुन हाँगकाँग येथील हॅनसेंग बँकेच्या एएलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले. अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला गंडा घातला असून या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भाजपच्या आमदार,खासदार ,नगरसेवकांची तोंडंं शिवलीत काय ?

पुणे-  पीएमआरडीए-पालिकेचा गळा दाबत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तोंडंं शिवलीत काय ? असा सवाल महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे .  मेट्रो मार्गा  लगत ५०० मीटर परिसरातील बांधकाम विकसन परवानग्या आणि शुल्क वसुलीचे अधिकार स्वतः कडे मागून  पीएमआरडीए महापालिकेचा आर्थिक दृष्ट्या गळा दाबु पाहत असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे  यांनी आज केला याप्रकरणी त्यांनी  पीएमआरडीएला तर खडसावलेच पण त्याबरोबर पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या आठ आमदार आणि खासदार यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा हि धिक्कार  केला आहे …. पहा नेमके तुपे यांनी काय म्हटले आहे ….

मालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये कविता राम या गायिकेचे नाव

0

मालिकांना त्यांच्या शीर्षक गीतामुळे अनेकदा ओळख मिळते. त्यामुळे मालिकांच्या निर्मितीमध्ये शीर्षक गीत हे फार महत्वाचे असते.  मालिकांच्या शीर्षक गीतांच्या यादीमध्ये अनेक मोठ्या गायकांच्या नावाचा समावेश असून कविता राम या गायिकेचे नाव सामील झाले आहे. झी मराठीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बाजी’ या मालिकेसाठी कविता यांनी आपला आवाज दिला आहे. या शीर्षक गीताबरोबरच कविता यांनी ‘बाजी’मधील अजून दोन गाण्यांनासुद्धा आवाज दिला आहे. कविता यांना वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायला आवडत असून त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांतील गीतांना आवाज दिला आहे. या गाण्याबद्दल कविता यांना विचारले असता त्या म्हणाल्या की,”एका गाण्याच्या संदर्भात ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांच्याकडे गेले असता त्यांना माझा आवाज आवडला. आणि त्यांनी मला ‘बाजी’चे शीर्षक गीत गाण्याची संधी दिली. ‘बाजी’चे शीर्षक गीत गायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी बाब आहे.” अल्पावधीतच ‘बाजी’ मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

भारतीय चिंतनावर आधारिक शिक्षण व्यवस्था आवश्यक

0
पुणे- स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या शाळा शासकीय झाल्या. परंतु बि‘टिश शिक्षण पध्दती तशीच सुरू राहीली. शिक्षण प्रणालीत भारतीय, राष्ट्रीय, सांस्कृतिक पध्दतीने ज्ञानदान होणे आवश्यक असते. येणार्‍या काळात भारतीय चिंतनावर आधारित बदल शिक्षण व्यवस्थेत झाले असते तर आज सामाजिक परिरिस्थती अधिक एकात्मिक झाली असती, असे मत अहमदाबादच्या पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलगुरु इंदुमती काटदरे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनानिमित्त या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त करणारे विद्यार्थी, क‘ीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी आणि एम. ङ्गिल, पीएच. डी. परीक्षेतील यशस्वी कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक‘माचे अध्यक्ष होते. सोसायटीचे संचालक किरण शाळिग‘ाम, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ व्यासपीठावर उपस्थित होते.
श्रीमती काटदरे पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्था निर्माण करणे हे प्रमुख उद्दीष्ट होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध क्षेत्रांत गुणवान व कर्तृत्वसंपन्न व्यक्ति असाव्यात म्हणून अनेक संस्था सुरू झाल्या. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रीय शिक्षण हा विषय लावून धरल्यास नजिकच्या दहा वर्षांत मोठा बदल दिसून येईल. राष्ट्रप्रेमाने अधिक भारावलेली युवकांची पीढी निर्माण होईल.
बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. डॉ. सविता केळकर व प्रा. मंजुषा गोखले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. ए. कुलकर्णी यांनी आभार मानले.

युएचएफएफ व ग्रोफिटर यांच्या संयुक्त विद्यमाने मेक पुणे द फिटेस्ट सिटी इन इंडिया या नव्या मोहिमेचे आयोजन

0

पुणे: आपले पुणे शहर हे देशांतील सर्वात आरोग्यपूर्ण आणि तंदरुस्त शहर बनावे, अशा तीव्र इच्छेने एकत्र आलेल्या 2016 मध्ये मधुकर तळवळकर, रोहन पुसाळकर, अभिमन्यू साबळे आणि स्मिता शितोळे यांनी स्थापन केलेल्या युनायटेड हेल्थ अँड फिटनेस फोरम(युएचएफएफ) व ग्रोफिटर यांच्या संयुक्त विद्यमाने मेक पुणे द फिटेस्ट सिटी इन इंडिया या नव्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना युनायटेड हेल्थ अँड फिटनेस फोरम(युएचएफएफ)या संस्थेचे संचालक मधुकर तळवळकर, रोहन पुसाळकर, अभिमन्यू साबळे, स्मिता शितोळे आणि ग्रोफिटरचे संचालक सन्मती पांडे यांनी सांगितले कि,  मेक पुणे द फिटेस्ट सिटी इन इंडिया या नव्या मोहिमेअंतर्गत युएचएचएफशी संबंधित सर्व जिमच्या माध्यमातून एक व्यायामाबाबत सल्ला व मार्गदर्शन, आहाराशी संबंधितमाहिती, समुपदेशन, बीएमआय व इनबॉडी अॅनालिसिस याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आठवड्यातून किमान 3दिवस कोणताही एक खेळ खेळणे, धावणे, पोहणे,ट्रेकिंग, जॉगिंग, सायकलिंग किंवा व्यायामशाळेत व्यायाम करण्यास सांगितले जाणार आहे. तसेच ठराविक मुदतींनंतर सर्व सहभागी सदस्य, कॉर्पोरेट, कॉलेज, हौसिंग कम्युनिटी यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.यात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.

युएचएफएफ हि ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणारी एक स्वयंसेवी संघटना असून देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. तंदरुस्ती, आरोग्य आणि स्वास्थ्य यासाठी सर्व नागरिकांना प्रेरणा देण्याचेलक्ष ठेवून हि संस्था कार्य करते. या मोहिमेच्या माध्यमातून फिटनेस हे लक्ष नसून ती आपली जीवनशैली असावी, असे आम्ही सर्वांच्या मनात ठसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे  (युएचएफएफ)चे संचालक मधुकर तळवळकर यांनी सांगितले.

युएचएफएफचे रोहन पुसाळकर म्हणाले कि, सर्व नागरिक, जिम, फिटनेसप्रेमी आणि फिटनेससाठी काम करणाऱ्या संस्थांचे सर्व सदस्य यांच्याशी संपर्क साधून त्यांना तंदरुस्ती आणि उत्तम आरोग्यासाठीशिक्षित करणे हे साधेसुधे लक्ष या संस्थेने ठेवले आहे. हे लक्ष साध्य करण्याकरिता आम्ही चार मार्गांनी प्रयत्न करत असून यामध्ये एक म्हणजे सदस्य, नागरिक आणि विविध संघटना व समाज यांना एकाप्रक्रियेतून जाण्यासाठी प्रवृत्त करणे, दुसरे म्हणजे आरोग्य व फिटनेस इंडस्ट्रीला आधार देणे, तिसरे म्हणजे आरोग्यपूर्ण जीवनशैली असण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांना एकमेकांशी संपर्क, प्रशिक्षणमाहिती, ज्ञान व प्रेरणा देणे, चौथे म्हणजे फिटनेस बाबत जागरूक असणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करणे यांचा समावेश आहे.

अभिमन्यू साबळे आणि स्मिता शितोळे यांनी सांगितले कि,अनावश्यक खर्च, व्यायामाची कमतरता, आहार आणि विहाराच्या चुकीच्या सवयी आणि तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याच्या सवयी, यामुळे मानवी आरोग्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या धोका निर्माण झाला आहे. या सर्व सवयींना जीवनशैलीशी संबंधित आजार असे म्हटले जाते. यासंबंधीच्या जागतिक आरोग्य अहवाल 2014 नुसार 58लाख लोकांचाया आजारांमुळे मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण मृत्यूंपैकी 60टक्के मृत्यू या आजारांमुळे होतात. यातील महत्वाचे आजार म्हणजे डायबिटीस(टाईप 2)भारतांतील 4कोटी नागरिकांना मधुमेह असून त्यात बालकांचाही समावेश आहे. नॉन इन्सुलिन प्रकारचा मधुमेह असून खाण्याच्या चुकीच्या सवई, व्यायामाची कमतरता आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे हा मधुमेह होतो.स्थूलपणा 2005 ते 2015 या काळातभारतातील स्थूल नागरिकांची संख्या दुप्पट झाली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार 10कोटी लठ्ठ नागरिकांची संख्या असून त्याची संख्या दरवर्षी 33 ते 51टक्क्यांनी वाढत आहे. भारतात 10कोटी लोकांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे. ताणतणाव, लठ्ठपणा खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा आजार होतो. भारतात हृदयविकाराने  होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 30 ते 40टक्के मृत्यू 34 ते 64 वयोगटातील असतात.तसेच 5कोटी हुन अशोक लोकांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत.  आरोग्यपूर्ण आणि तंदरुस्त जीवनशैली, समतोल आहार आणि नियमित व कसून व्यायाम हे या आजारांवरील सोपे उपायआहेत.त्यामुळे आपण महागड्या वैद्यकीय उपचार प्रक्रिया, विमा यावर खर्च होणारे हजारो रुपये वाचवू शकतो.

पाश्चात्य देशात नियमित व खडतर फिटनेस व्यायामप्रकारात सहभागी असणाऱ्या नागरिकांची संख्या 15-18टक्यांपर्यँत आहे. भारतात हि संख्या 1टक्क्यांपेक्षाही कमी आहे. ही  परिस्थिती सुधारण्याचेआव्हान युएचएफएफने स्वीकारले आहे. त्यामुळे पुण्यातील देशातील सर्वात तंदरुस्त बनविणे हे ध्येय युएचएफएफने  फिटनेस प्लेज(तंदरुस्ती प्रतिज्ञा) हा नवीन उपक्रम सुरु केले आहे.किमान 50हजारनागरिकांना आरोग्यपूर्ण आणि तंदरुस्त जीवनशैलीची देण्याचे आमचे लक्ष आहे. या मोहिमेतील सहभाग पूर्णपणे विनामुल्य असून नावनोंदणीसाठी आणि माहितीसाठी www.uhff.fit/ www.uhff.fit/ipledge यावेबसाईटवर संपर्क साधण्याचे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

राज्यघटना जाळणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – खासदार संजय काकडे

खासदार काकडे यांचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र

पुणे, दि. 13 ऑगस्ट : भारतीय राज्यघटनेची प्रत जाळण्याचे कृत्य करणाऱ्या श्रीनिवास पांडे व त्याच्या सहकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केली असून याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना आज पत्र पाठविले आहे.

पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल भंडारे व त्यांचे सहकारी आणि बोपोडी औंध रोड संविधान संरक्षण समितीचे संजय कांबळे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी खासदार संजय काकडे यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी खासदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खासदार काकडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून राज्यघटना जाळणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

मेट्रोच्या मार्गालगतच्या बांधकाम विकास परवानगी चे अधिकार पीएमआरडीए ने मागितले …

0

पुणे – “पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प उभारला जाणार आहे. हा मार्ग पालिका हद्दीतून जातो. या प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूस बांधकाम विकास परवानगीचे अधिकार “पीएमआरडीए’ला मिळावेत, अशी मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेसमोर अडचणी वाढल्या असून शासनाने महापालिकेकडून प्रस्ताव मागविला आहे.

“पीएमआरडीए’च्या प्रस्तावाबाबत महापालिकेने मात्र नकारात्मक भूमिका घेतली असून “पीएमआरडीए’ला उत्पन्नास मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता सद्यस्थिती अहवाल तयार करण्यात येत असून तो राज्यशासनास पाठविण्यात येणार आहे. “पीएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे 8 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा प्रकल्प “पीपीपी’ अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर उभारला जाणार आहे. त्यासाठी “पीएमआरडीए’ने शासनाकडे या महापालिका हद्दीतील विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए)चा दर्जा मागितला आहे. तसेच मेट्रो मार्गापासून दोन्ही बाजूस 500 मीटरपर्यंतच्या हद्दीत बांधकाम परवानगीसाठीचे विशेष प्राधिकरण म्हणून अधिकारांची मागणी केली आहे. त्यानुसार, शासनाने हा प्रस्ताव महापालिकेस पाठवत याबाबत अभिप्राय मागविला आहे. महापालिकेने अजून त्यावर कोणताही निर्णय घेतला नसला, तरी वस्तुस्थिती दर्शक अहवाल आयुक्तांसमोर ठेवला आहे.

काय म्हटले आहे अहवालात?
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने या भागातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. त्यात प्रामुख्याने असे अधिकार “पीएमआरडीए’ला दिल्यास त्याचा महापालिकेच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. हा मार्ग प्रामुख्याने स्मार्ट सिटीसाठी केंद्राने निवड केलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी भागातून जातो. त्यामुळे त्या ठिकाणी आधीच महापालिकेने विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यातच “पीएमआरडीए’ला मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस 500 मीटर पर्यंत बांधकामाचे अधिकार दिल्यास उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालिका प्रशासनाची कोंडी
“पीएमआरडीए’च्या प्रस्तावावार राज्य शासनाच्या अभिप्रायामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे. हिंजवडी येथील आयटी सिटी तसेच बाणेर-बालेवाडीचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने या भागात बांधकाम व्यवसायाला चालना मिळण्यास सुरूवात झाली असून पालिकेस उत्पन्न मिळत आहे. मात्र, आता पुन्हा त्यातील काही भाग “पीएमआरडीए’ला दिल्यास पालिकेची आर्थिक कोंडी आणखी वाढण्याची भीती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने बांधकाम शुल्काचे उत्पन्न 600 कोटींवर आले आहे. त्यातच, या वेगाने विकसित होणाऱ्या मार्गातील बांधकाम परवानगीही “पीएमआरडीए’च्या ताब्यात गेल्यास आर्थिक अडचणीत भर पडण्याची शक्‍यता आहे.

स्वातंत्र्यदिनी एकात्मता रॅलीचे आयोजन; शहीदांच्या कुटुंबियांसह जवानांचा विशेष सहभाग

0
पुणे :शहीद जवानांच्या कुटुंबियांसह देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जायबंदी झालेल्या जवानांचा विशेष सहभाग असलेल्या एकात्मता रॅलीचे आयोजन स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवारातर्फे या एकात्मता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,यंदा हे सातवे वर्ष आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथून सकाळी ९ वाजता या रॅलीला प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री कालिंदा महाडिक  , शहीद शूरवीर जवान सौरभ फराटे यांची आई मंगल फराटे  व वडील नंदकुमार फराटे ,बंधू रोहित फराटे तसेच धुळ्याचे जवान चंदू चव्हाण , साताऱ्याचे अमित घोरपडे यांचा विशेष सहभाग असणार आहे. देशभक्तीपर गीतांमधून शहिदांच्या स्मृती जागविल्या जाणारआहेत. राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथून ही रॅली गजानन महाराज चौक मार्गे शिंदे हायस्कुल, तावरे कॉलनी चौक येथून  राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल येथे दुपारी १ वाजता समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये  नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले आहे.

युथ एक्सचेंज प्रोग्रॅम 2018-19 रशियासाठी महाराष्ट्रातून पुण्याच्या सर्वेश नावंदे ची निवड

0

पुणे-रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातीलअद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून २५
युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात आली आहे. यात पुण्याच्यासर्वेश सुभाष नावंदे या युवकाची निवड करण्यात आली आहे..देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावरएअर विंग मध्ये सर्वोत्तम कॅडेट म्हणून यापूर्वी सर्वेश ची निवड झालीहोती. या अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून निवड झालेला सर्वेश हाएकमेव युवक आहे.18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यत हा दौरा रशिया या देशातअसणार आहे. सर्वेश १९ वर्षाचा असून तो मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड,पुणे येथे बी.एस.सी तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याचे 1 ली ते12 पर्यंतचे शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कुल पुणे येथेझाले आहे, सर्वेश चे आई वडील हे दोघे हि क्रीडा खात्यातउच्चपदावर कार्यरत आहेत वडील सुभाष नावंदे हे तालुका क्रीडाअधिकारी – आंबेगाव – पुणे येथे तर सौं कविता नावंदे – निंबाळकरया क्रीडा मंत्री विनोद तावडे यांचे कडे मंत्रालय मुंबई येथेक्रीडा विभागाचे विंशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . मोठाभाऊ समाज कार्यकर्ता आहे. या दोन्ही भावंडयांना घरातूनच देश सेवा
व सामाजिक बांधिलकीचे लहान पणापासूनच बाळकडू / धडे दिलेगेले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्येपुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे 26 जानेवारी 2018 रोजी सहभागीझाला होता. यास भारतातून एअरफोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्या गुणवत्तेवरून आज त्याचे भारत व रशिया या दोनदेशातील युवकांचे युथ एक्सचेंज प्रोग्राम साठी निवड झाली आहे.

भारत रशिया युवक आदान प्रदान कार्यक्रमाविषयी अधिक माहिती

भारत आणि रशियाचे आंतरराष्ट्रीय संबंध जुने आहेत, तेआणखी दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाची भूमिका
बजावतो. या कार्यक्रमातून दोन्ही देशांच्या तंत्रज्ञानाचे आदान प्रदानकरण्यासाठी . मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हाअभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातीलरशियन तंत्रज्ञान अद्ययावत आणि सक्षम आहे. या तंत्रज्ञानाचाअभ्यास करून त्याची भारतीय संरक्षण यंत्रणेत उपयोग करता येऊशकतो का याचा अभ्यास करण्यासाठी या तरुणांना या अभ्यासदौऱ्यासाठी भारताच्या वतीने पाठवले जाते. या प्रोग्रॅमसाठी भारतातून 25 युवकांची निवड झाली त्यात
महाराष्ट्रातुन सर्वेश एकमेव युवक आहे. सध्या या बाबत सर्वेश पूर्व प्रशिक्षणसाठी करिअप्पा परेड ग्राउंडदिल्ली येथे सराव करीत आहे ,दि 18 ऑगस्ट रोजी पूर्ण 25 जणांचासंघ रशिया येथे रवाना होणार आहे त्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक
कल्याण मंत्री विनोद तावडे , क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, राज्याचे राष्ट्रीय छात्र सेना चे प्रमुख ऍडीशनल
डायरेक्टर जनरल युद्ध सेवा मेडल व विशेष सेवा मेडल असलेले गजेंद्र प्रसाद, राज्याचे एन.सी.सी चे संचालक कमोडोर श्री
बालकृष्णन, निवृत्त ब्रिगेडियर मा.श्री.बोधे., मॉडर्न गणेशखिंडमहाविद्यालयाचे संस्था चालक श्री एकबोटे, प्राचार्य डॉ खरात राष्ट्रीयसेवा योजना प्रमुख श्री सपकाळ, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्रीमानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ मिलिंद भोई, श्री शंतनूजगदाळे, श्री प्रवीण निकम, श्रीमती तपस्वी गोंधळी , व राज्यपुरस्कारथी श्री विनीत मालपुरे, श्रीम. खुशबू चोपडे, पूनम ढगे स्नेहलशिंदे , काजल भुसारी या सर्वांनी सर्वेशला शुभेच्छा दिल्या

पालकांच्या सर्मपणाची पाल्यांनी जाण ठेवावीः- रजा मुराद

0
पुणेः-  पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालक दिवस-रात्र झटत असतात. त्यांचे संपूर्ण जीवन पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्मपीत असते, पाल्यांनी पालकांच्या या सर्मपण भावनेची जाण ठेवली पाहिजे असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी व्यक्त केले.
येथील  डॉ. संजय चोरडिया यांनी त्यांच्या माता-पित्यांच्या स्मरनार्थ स्थापलेल्या बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आदर्श माता-पिता पुरस्कारयंदा

 नवलखा उद्योगसमुहाचे बिर्दीचंदजी आणि शांताबाई नवलखा यांना आज प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि प्रसिद्ध योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ योगगुरू डॉ. दत्ता कोहिनकर, प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ  डॉ. दीपक शिकारपूर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. संजय चोरडिया, सुक्ष्मा चोरडीया, कोहिणूर उद्योग समुहाचे कृष्णकुमार गोयल, काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते अभय छाजेड, बांधकाम व्यवसायीक भारत देसडला आदी मान्यवर उपस्थित
होते.
यावेळी कमलदेवी प्रकाशचंदजी कर्णावट यांना समाज रत्न पुरस्कार,  रामलालजी शिंगवी यांना समाजभूषण पुरस्कार, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि रांका ज्वेलर्सचे ओमप्रकाश रांका यांना समाजभूषण पुरस्कार, विलास राठोड यांना मानव सेवा पुरस्कार आणि जैन जागृती मासिकाला उत्कृष्ट मासिकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तसेच यावेळी दहावी आणि बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या सत्कारांचे स्वरूप आहे.
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद त्यांच्या मनोगतात पुढे म्हणाले, मला विद्यार्थी दशेत पाठ्यक्रम अभ्यासात विशेष गती नव्हती. पंरतू जीवनात संधी मिळताच मी आयुष्यात स्वतःला सिद्ध करुन दाखविले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मिळालेल्या संधीचे सोन केले पाहिजे. शिक्षक आणि पालक आपल्या यशोशिखराचा पाया असतात.त्यांनी आपल्यावर केलेल्या संस्कारामुळेच आपण चारित्र्यव्यक्ति म्हणुन समाजात नाव कमवतो. ती संस्कारांची पाळमुळे आपण जपली पाहिजे, आणि त्या पाळमुळांना कुठे धक्का पोहचेल असे वर्तन आपले नको. तसेच आपल्याला मिळालेल्या शिक्षणाच्या संधीतून आपण सक्षम होऊच, पंरतू जे रसत्यावर भटकत आहेत, जे शिक्षणाच्या गंगेपासून वंचित आहेत अशांना देखील आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
प्रसिद्ध योगाचार्य डॉ. संप्रसाद विनोद त्यांच्या मनोगतात म्हणाले, भारतात कुटुंब आणि गुरु-शिष्य परंपरा आहेत. गुरु त्याच्या शिष्यांवरुन ओळखला जातो. उपदेश करणारे आयुष्यात अनेक भेटतात पंरतू आपल्या शेजारी बसून आपल्या पातळीवर येऊन मार्गदर्शन करणारे केवळ गुरु आणि पालकच असतात. पुर्वी घराघरातून सहज संस्कार केले जायचे पंरतू आज संसस्कारांचे देखील वर्ग लावावे लागतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

श्री क्षेत्र ओतूरला पहील्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री कपर्दीकेश्वरचरणी हजारो भाविक – तांदळाच्या कलात्मक पिंडीचे दर्शन

0
ओतुर  ( संजोक काळदंते )-
श्री क्षेत्र ओतूर (ता.जुन्नर) येथे श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती श्री कपर्दीकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.
पहिल्या सोमवारी यात्रेनिमित्त शालेय दिंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात गावातील सर्व शाळांनी सहभाग घेतला.
  शिवलिंगावर करण्यात आलेल्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक भक्त आले होते. मंदिर सकाळी सहा वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.श्री कपर्दिकेश्वर शिवलींगावर अभिषेक व महाआरती  सपत्निक        मयुर ढमाले,आत्माराम गाढवे,रघुनाथशेठ तांबे,किरण   पानसरे,प्रमोद लोखंडे यांच्या हस्ते झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,वैभव तांबे,सचिन तांबे,प्रा.गणेश दामा आदी उपस्थित असल्याचे पुजारी गोविंदकाका डुंबरे,अनिलकाका तांबे,दत्तात्रयकाका शिंदे यांनी सांगितले.
या देवस्थानला ऐतिहासिक महत्व असल्याने व तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा असल्याने येथे प्रतिवर्षी भाविंकांची गर्दी होत असते त्याचप्रमाणे येथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सद्गुरू चैतन्य महाराज संजीवन समाधी आहे याही समाधीचे भाविकांनी या निमित्ताने दर्शन घेतले.श्रावणी सोमवार निमित्त मोठी यात्रा भरली होती.आलेल्या भाविक भक्तांच्या येण्या जाण्यासाठी नारायणगाव एस.टी.आगाराच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.आलेल्या भाविकांना चैतन्य गुरुकृपा फेब्रीकेशन्स मित्र मंडळ,कालिदास काका जोशी,ज्ञानेश्वर वाघोले,पांडुरंग ताजणे,पांडुशेठ वाकर  यांच्या वतीने खिचडी , केळी,पेढे,फराळ वाटप करण्यात आले.शालेय दिंडी स्पर्धेत सहभागी बालदिंडी मधील वारक-यांना अविनाश ताजणे यांनी केळी वाटप केले तर यात्रानिमित्त भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक कार्यरत होते.मोठी गर्दी भरली असल्याने ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक,आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात ठेवला होता यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पहील्या श्रावणी सोमवारची यात्रा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली.

अमीर खानच्या पाणी फौन्डेशन च्या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी …

0

पुणे-२०१४ च्या निवडणुकीपूर्वी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रख्यात अभिनेता अमीर खान याच्या पाणी फौंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप सोहळ्यात  राजकीय रंग जुगलबंदी रंगविण्याचा चांगला प्रयत्न केला .जात पात ,गट तटाच्या लढाईत अडकलेला महाराष्ट्र पाणी जिरवण्याचे मात्र विसरून गेला असे या सर्व जुगलबंदीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित  होते.

राज ठाकरे –

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.

अजित पवार –

आमिर जी तुम्ही खुप चांगलं काम करत आहात. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत आहे. असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला. तसेच काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायच्या असतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारं वर्ष निवडणुकांचं असलं तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणं आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिकं घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचं आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकलं पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –

पूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा अशी घोषणा देण्यात आली होती, परंतु गावागावांमध्ये इतके गटतट तयार करण्यात आले की या घोषणे ऐवजी लोक अडवा आणि एकमेकांची जिरवा असे वातावरण निर्माण झाले. परंतु पानी फाऊंडेशनने जाती धर्माच्या पुढे जात सर्वांना एकत्र करत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खान यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सध्याच्या सामाजिक परिस्तिथीवर मार्मिक भाष्य देखील केले.

जलसंधारण हे फक्त सरकारच्या भरोष्यावर होत नाही तर ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, म्हणून सरकारकडून जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली. अमिर खान यांनी ही योजना जन आंदोलनात परिवर्तित केली. शिवाजी महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. त्यांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं. गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिलं आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेलं. पिकांच पॅटर्न निश्चित करणं आवश्यक आहे. पूर्वी जलसंधारण म्हणजे नदी नाले केवळ खोल केले जायचे. परंतु पानी फाऊंडेशन ने शास्त्रीय पद्धतीने हे काम केले. वॉटर कप मध्ये आम्ही राजकारण आणणार नाही, पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खानला केली.

धनगर आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

0

परभणी- धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  या युवकाने  १२ आॅगस्ट रोजी १ वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्टपासून समाजबांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यातच गोमेवाकडी येथील योगेश राधाकिशन कारके (२०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोमेवाकडी येथील कार्यकर्ते रविवारी सेलू येथे आरक्षणाच्या बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच योगेश याने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा सुरू केला आहे. 
योगेश याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून बी. शिंदे यांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स मॅसेज लिहिला होता. त्यात धनगर आरक्षणासाठी मी जीव देत आहे, असे म्हटले आहे. मात्र रेंजच्या कारणावरून हा मॅसेज सेंट झाला नसावा, अशी माहिती बीट जमादार चवरे यांनी दिली.

कठडा तोडून कार पाण्यात कोसळली; कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू

0

पुणे-फुरसुंगीत सोनार पुलावरून कठडा तोडून एक सँट्रो कार पाण्यात कोसळली. यामध्ये एका कराटे प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात आज (रविवार) पहाटे घडला.

नितीन कुंभार, (वय 48, राहणार – सासवड), असे मयत कराटे शिक्षकाचे नाव आहे. नितीन हे आपल्या कारमध्ये एकटे लोणीवरून फुरसुंगी येथे जात असताना ही घटना घडली. पोलिसांना सकाळी 6.55 ला या घटनेची माहिती मिळाली. तो पर्यंत तेथील नागरिकांनी मिळून वर काढले होते. अपघाताचे कारण आद्यत स्पष्ट झालेले नसून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

विद्यार्थ्यानी उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील व्हावे- विश्वेश कुलकर्णी

0

पुणे  :  विद्यार्थ्यानी उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील व्हावे  असे  मत  यशस्वी एकेडमी  फॉर स्किल्स संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी  व्यक्त  केले.

ते पिंपरी येथील टाटा मोटर्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे  नीम योजनेअंतर्गत ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचेप्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या  विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्र प्रदान करतानाबोलत  होते.यावेळी  बोलतानाते पुढे म्हणाले की, स्किल इंडिया मिशन अंतर्गत उद्योगजगतातील प्रत्यक्ष कामाच्या अनुभवामुळे  रोजगारक्षम  पिढी तयार होत आहे, टाटा  मोटर्ससारखे उद्योगसमूह पुढाकार  घेऊन युवापिढीला  रोजगारक्षम करण्यासाठी  सातत्याने प्रयत्नशील असतात ही बाब निश्चितच आशादायी आहे.

नॅशनल एम्पलॉयबिलिटी एन्हान्समेंट मिशन  अर्थात  ‘नीम’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना प्रत्यक्ष औद्योगिक आस्थापनेत  ऑन  द  जॉब  ट्रेनिंगची संधी  मिळत असल्याने विद्यार्थ्याना अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होते, विशेषतः  टाटा मोटर्सचे   पदाधिकारी जयदीप  देसाई व अनुराधा दास  यांच्या प्रयत्नामुळे मुलींनादेखील  असेम्ब्ली लाईनवरचे  तांत्रिक प्रशिक्षण प्राप्त  करण्याची संधी मिळाली असेही त्यांनी  सांगितले.         याप्रसंगी  प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या १०२ विद्यार्थ्याना   प्रशस्तीपत्र प्रदानकरण्यात आले. यामध्ये ४२ मुले व ६० मुलींचा

समावेश आहे. यावेळी आपल्या मनोगतात टाटा मोटर्स कंपनीचेपीव्हीबीयू प्लांट हेड  जयदीप देसाई यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना सांगितले की,  ‘नीम’ सारख्या योजनांच्या  अंमलबजावणीमुळे  युवकांना  प्रत्यक्ष कंपनीत चालणारी कामकाज पद्धती जवळून पाहता येते,विशेष बाब  म्हणजे  प्रशिक्षणातील बहुतांश विद्यार्थी हे  ग्रामीण  भागातून आलेले व कोणत्याही  तांत्रिक  ज्ञानाचा अनुभव नसलेले  असून यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.तसेच या  ऑन  द  जॉब  ट्रेनिंगमुळे   विद्यार्थ्यांना तांत्रिक  ज्ञानासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वाससुद्धा वाढल्याचे दिसत आहे.  यावेळी त्यांनी प्रशिक्षण देणाऱ्या यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सर्व सुपरवायजर व प्रशिक्षकांबद्दलही गौरवोद्गार काढले.   याप्रसंगीं जयश्रीडफळ  व परमेश्वरचव्हाण  या विद्यार्थ्यानीही आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाला  टाटा मोटर्सचे कौशल्य विकास विभाग प्रमुख श्रीनिवासन,  पीव्हीबीयू वरिष्ठ मनुष्यबळव्यवस्थापिका अनुराधा दास, ‘यशस्वी’संस्थेचे  संचालक  मकरंद  कुलकर्णी   यांच्यासह विविध पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  टाटा  मोटर्स पीव्हीबीयूचे कौशल्य विकास प्रशिक्षणविभागाचे उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी तर  आभार  प्रदर्शन मनुष्यबळ व्यवस्थापन  विभागाचे उपमहाव्यवस्थापक अजय धुरी  यांनी  केले.