Home Blog Page 3090

कॅन बायोसिस च्या मातीतील सेंद्रिय कर्ब सुधार प्रकल्पाच्या कामाची घेतली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (TDB), दिल्ली ने दखल

0

पुणे-भारतात पंजाब आणि हरियाणा या राज्यात भाताची लागवड मोठया प्रमाणात होते. भात काढणीनंतर भाताचे
काड जाळले जाते. याने प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषण होते. तसेच भात काडातील असलेल्या कर्ब् तसेच इतर
मूलद्रव्यांचा ऱ्हास होतो. ह्या मूलद्रव्यांचा उपयुक्त वापर झाल्यास जमिनीची प्रत सुधारण्यास हमखास मदत
होऊ शकते. काड गोळा करून त्याची कुजवन करणे हे प्रात्यक्षिकतेत बसणे अवघड आहे. या समस्येला उपाय
पुणे यथील कॅन बायोसिस प्रा. लि. या कंपनी ने शोधला आहे, ज्यांनी शेतीउपयुक्त जिवाणूंनी समृद्ध असे
“स्पीड कंपोस्ट” नावाचे सेंद्रिय खत तयार केले आहे. हे खत नियंत्रण मंडळ (FCO) मान्यताप्राप्त असून इकोसर्ट
(ECOCERT) प्रमाणित आहे. मागील तीन वर्षांपासून पंजाब आणि हरियाणा येथे १०,००० हेक्टर क्षेत्रावर, त्याच
जमिनीत, १५-२० दिवसात काडाची यशस्वीरीत्या कुजवन करण्यात कॅन बॉयोसिस ला यश मिळाले आहे.
सद्य परिस्थितीत भात काड जाळल्याने उद्भवलेली समस्या व त्यावर कॅन बायोसिस कंपनी च्या या कामाची
दखल घेत टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड (TDB), दिल्ली ने दि. 27 मार्च 2018 रोजी कॅन बायोसिस पुणे या
कंपनीशी एक करार केला आहे. या कारान्वये टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड, दिल्ली, हे कॅन बायोसिस, पुणे यांना
“इन सिटू अक्सेलरेटेड अँड सस्टेनेबल राईस स्ट्रॉ डिकंपोझीशन” या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करतील.
ह्या प्रकल्पान्वये २०१८ वर्षात २५००० हेक्टर , २०१९ वर्षात ५०००० हेक्टर तर २०२० वर्षात १ लाख हेक्टर व
२०२१ या वर्षात २ लाख हेक्टर शेतजमिनीवर भात काडाचे खतात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच
खत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या मातीच्या भौतिक, रासायनिक तसेच जैविक घटक बदलावाचे बारकाईने
विश्लेषण केले जाणार आहे.
या तंत्रज्ञानाचे मुख्य फायदे म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव थेट मातीमध्ये मिसळले जातात, जे काडातील
सेल्युलोज, स्टार्च आणि सिलिका यांचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यास मदत करतात. या तंत्रज्ञानामध्ये यंत्र
आणि पाणी यांचे किमान वापर यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान भात पीक तसेच इतर पिकात ही काडाचे रूपांतर
खतात करण्यासाठी शेतक-यांना एक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय आहे. विशेषतः जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढून
जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत मिळेल. तसेच वापर झालेल्या जमिनीची सेंद्रिय तथा रासायनिक
खतांची व पाण्याची ग्रहण क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने तयार झालेल्या
खताचा वापर पुढील पिकास होऊन जमीन सुधारून उत्पन्न वाढण्यास मदत मिळते. तसेच जमिनीचा पोत
सुधारण्यासही मदत मिळते.
जमिनीवरील शेतीकचरा त्याच ठिकाणी कमी वेळेत कुजवण्याने शेतकरी कचऱ्याला जाळणे नक्कीच टाळेल. या
प्रकल्पान्वये मृदा संवर्धन व संपन्नता तर सुधारेलच, याचबरोबर कचरा जाळल्याने वातावरणातील वायू
प्रदूषणही आटोक्यात आणण्यास मदत मिळेल

माय मराठीसाठी साहित्य परिषद ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

0

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नाही. आम्ही नोव्हेंबरअखेर राज्य सरकारची वाट पाहू, अन्यथा या प्रश्‍नावर न्याय मागण्यासाठी समविचारी व्यक्ती व संस्थांना सोबत घेऊन न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी आज पुण्यात स्पष्ट केले.

मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळविण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. मात्र अद्याप या बाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. साहित्य परिषदेच्यावतीने विविद पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठावर हा विषय उपस्थित करण्यात आला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव करण्यात आला, साहित्यिकांची बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देण्यात आले.

साहित्य परिषदेच्या राज्य तसेच परराज्यातील शाखांच्यावतीने एक लाख पत्रे पंतप्रधानांना पाठविण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात प्रयत्न करण्याची विनंती करण्यात आली. पुस्तकांचे गाव भिलारला कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले व पंतप्रधानांची भेट मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीच हालचाल होत नाही. साहित्यिांकासोबत पंतप्रधान मोदी यांची भेट घडवून आणण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन सहा महिने होऊन गेले तरी पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत वाट पाहून नंतर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने घेतल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले.

होंडाने ठाणे येथे केले 13व्या ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कचे उद्घाटन

0

होंडाचा ठाणे महापालिका यांच्याशी सहयोग

  • होंडाचे रस्ते सुरक्षा प्रशिक्षक सर्व वयोगटांतील व्यक्तींना मोफत शिक्षण देणार
  • ठाण्यातील महिलांना केवळ 4 तासांमध्ये टू-व्हीलर चालवण्यासाठी सबल करण्यासाठी होंडाने दाखल केला ड्रीम रायडिंगउपक्रम
  • होंडाने चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कसाठी दाखल केली रस्ते सुरक्षा हेल्पलाइन 7738-424-602
प्रमुख वैशिष्ट्ये:

 

होंडा मोफत प्रशिक्षण देऊन रस्ते सुरक्षेमध्ये योगदान देणार आहे

Øबालकांसाठी: ‘सेफ्टी विथ फन’ शिकण्यासाठी सायकलिंग, मूलभूत उपक्रम व सीआरएफ 50 मोटरसायकलवर प्रत्यक्षातील अनुभव

Øमहिलांसाठी: केवळ 4 तासांमध्ये स्वतंत्र टू-व्हीलर चालक बनण्याची संधी मिळेल

Øनव्या चालकांसाठी: होंडाच्या रायडिंग सिम्युलेटर्समुळे गाडी चालवण्याच्या मूलभूत बाबी समजण्यासाठी व रस्त्यावरील 100 संभाव्य धोके जाणण्यासाठी मदत होईल

Øअधिक माहितीसाठी 7738-424-602 येथे कॉल करा किंवा ड्रीम रायडिंगसाठी dreamriding@ctpthane.in येथे नोंदणी करा

 

ठाणे: रस्ते सुरक्षेबद्दल असलेली बांधिलकी आणखी बळकट करत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) ठाणे येथे, ठाणे महापालिकेच्या सहयोगाने व महाराष्ट्र पोलिसांच्या पाठिंब्याने 13व्या ट्रॅफिक-ट्रेनिंग पार्कचे आज उद्घाटन केले. हे पार्क पार्क व्ह्यू सोसायटीसमोर, कावेसर, घोडबंदर, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र येथे आहे.

होंडाने ड्रीम रायडिंगहा विशेष उपक्रमही सुरू केला आहे. आता, 18 वर्षांवरील कोणत्याही स्त्रीला स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. या विशेष उपक्रमांतर्गत, होंडाच्या महिला सेफ्टी इन्स्ट्रक्टरच्या विशेष गटातर्फे महिलांना केवळ 4 तासांमध्ये स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. आता ठाण्यातील महिलांना dreamriding@ctpthane.in येथे मोफत नोंदणी करून किंवा 7738-424-602 या हेल्पलाइनवर कॉल करून, रायडर बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल सुरू करता येईल.

चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले युवा सेनेचे (शिवसेनेचा विभाग) अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया व अन्य सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

यानिमित्त बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “होंडा सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देते व या बांधिलकीमार्फत आम्ही अंदाजे 21 लाख भारतीयांना रस्ते सुरक्षेच्या महत्त्व, याचे धडे दिले आहेत. होंडा 2 व्हीलर्सला जिल्ह्यामध्ये सुरक्षेविषयी जागृती करण्याचा उपक्रम अधिक सक्षम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही ठाणे महापालिका यांचे आभारी आहोत. हा उपक्रम प्रौढ व युवा पिढी या दोन्हींवर भर देणार आहे. बालकांना लहान वयामध्ये जागरुक केल्यास, त्यांना समाजातील सेफ्टी चॅम्प्स बनवणे शक्य होईल. भारतातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्ही टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.”

 ठाण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथील होंडा 2 व्हीलर्सच्या मुख्य उपक्रमांमध्ये समाविष्ट आहेत:

Ø 3 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कमध्ये होंडाने विशेष प्रकारे तयार केलेल्या व सुरक्षित वातावरणाद्वारे प्रत्यक्षातील रायडिंग स्थितीची प्रतिकृती साकारली आहे.

Ø येथे, होंडा महिला व बालके यासह सर्व वयोगटांमध्ये रस्ते सुरक्षाविषयक जागृती करणार आहे. त्यासाठी शास्त्रीय मोड्युलचा वापर केला जाणार असून त्यामध्ये प्रत्यक्षातील ज्ञान (गाडी चालवण्याचा अनुभव) व पुस्तकी ज्ञान (गाडी चालवण्याचे योग्य पोश्चर, वाहतुकीच्या खुणा व रस्ताविषयक नियम) या दोन्हींचा समावेश असेल.

Ø विशेषता महिलांसाठी ड्रीम रायडिंग उपक्रम होंडाने सुरू केला आहे. गाडी चालवताना अत्यंत आरामदायीपणा व आत्मविश्वास देत, होंडा सेफ्टी इन्स्ट्रक्टर (महिला व पुरुष) रायडरना गाडी चालवण्याचे अचूक तंत्र शिकवणार आहेत.

Ø मुलांसाठी कस्टमाइज्ड रोड सेफ्टी मोड्युल – शाळेतील मुलांमध्ये सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या सवयी रुजवण्यासाठी व त्यांना जागरुक करण्यासाठी, होंडाच्या रस्ते सुरक्षा मोड्युलमध्ये 5 ते 8 वर्षे वयोगटातील बालकांसाठी सापशिडीसारखे मूलभूत उपक्रम समाविष्ट आहेत. 9 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांसाठी, होंडाने आयात केलेली सीआरएफ 50 मोटरसायकल समाविष्ट केली आहे. यामुळे या मुलांना प्रत्यक्षातील रायडिंगद्वारे सुरक्षितपणे गाडी चालवण्याची संकल्पना शिकता येईल. युवकांसाठी, सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी थेअरी सेशन्सही घेतली जातात.

Ø होंडाच्या प्रोप्रायटरी रायडिंग ट्रेनर व स्मार्ट क्लासरूममुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होते – व्हर्च्युअल रायडिंग सिम्युलेटरमुळे 16 वर्षे वयावरील व्यक्तींना रस्त्यावर प्रत्यक्ष गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरील 100 संभाव्य धोक्यांचा अनुभव घेता येणार आहे. नव्याने गाडी चालवण्यास शिकणाऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे, व्हर्च्युअल अनुभव घेतल्याने त्यांनावाहतुकीविषय धोक्यांचा अंदाज वर्तवला येईल व त्यानुसार प्रतिसाद देता येईल.

Ø 18 वर्षांपुढील वयाच्या व सध्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तींसाठी जिमखाना व नॅरो प्लँक असून, त्याद्वारे रायडर धमाल पद्धतीने आपले कौशल्य तपासू शकतात.

Ø चिल्ड्रेन ट्रेनिंग पार्क या अतिरिक्त वैशिष्ट्यामध्ये ओपन एअर अम्फिथिएटर, ट्रॅफिक एज्युकेशन मिनिएचर्स, प्राथमिक बालकांसाठी तयार केलेले विशेष ट्रॅक, कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष बिटुमन ट्रॅक व बालके/सहभागींसाठी खास कॅफेटिरिया यांचा समावेश आहे.

 होंडाची रस्ते सुरक्षेविषयी बांधिलकी:

जबाबदार कॉर्पोरेट म्हणून निभावत असलेली भूमिका आणखी अधोरेखित करण्यासाठी, होंडा 2001 पासून रस्ते सुरक्षेला चालना देत आहे. आतापर्यंत होंडाने 21 लाखांहून अधिक भारतीयांना रस्ते सुरक्षेचे धडे दिले आहेत. या कारणासाठी होंडाने एकूण 13 ट्रॅफिक पार्क दत्तक घेतली आहेत – दिल्ली (2), जयपूर, चंडीगड, भुवनेश्वर, कटक, येवला (नाशिक), इंदूर, हैदराबाद, लुधियाना, कोईम्बतूर, कर्नल व नव्याने उद्घाटन करण्यात आलेले ठाणे.

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्या – मुनिश्री पुलकसागर महाराज

0

पुणे-“पर्यावरण आणि मनुष्याचे नाते जन्मापासून मृत्युपर्यंत जुळलेले असते. जन्मल्यानंतर लाकडाच्या पाळण्यात तुम्हाला झुलवलेले असते. तर मृत्युनंतर तुमचे अंतिम संस्कार तुमच्यावर लाकडांच्या चितेवरच होत असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटकात पर्यावरणाचा समावेश आहे. मग आपण त्या पर्यावरणाशी नाते कसे काय तोडू शकतो? पर्यावरणाची हेळसांड केल्याने त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्व अनेक संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगितले आहे. भगवान महावीरांनीदेखील 2600 वर्षापूर्वी जलसंधारणाचे महत्व सांगितले आहे. तुम्ही देखील पर्यावरणाच्या रक्षाणासाठी पुढाराकार घ्या. पर्यावरणाचा अर्थ केवळ झाडे लावणे, प्राण्यांची शिकार न करणे इतकाच नाही तर पर्यावरणाचा अर्थ एक इंद्रियापासून, पंचइंद्रिय असलेल्या जीवांना जीवनदान देणे हा आहे. एका झाडाला, पक्षांना पाणी द्या, जनावराला अन्न द्या यातूनच संत आहाराचे पुण्य लाभेल,” असा संदेश मुनिश्री प.पु. 108 पुलकसागर महाराज यांनी गुरूवारी दिला.

मुनिश्री प.पू. 108 पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यातील धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे चालू आहे. सकल जैन वर्षायोग समितीतर्फे येथे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील एकोणीसाव्या पुष्पात मुनिश्री पर्यावरण विषयावर बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, उत्कर्ष गांधी, सुदीन खोत, संजीव नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सनीज् वर्ल्डचे चेअरमन व माजी आमदार विनायक निम्हण, ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे, आज का आनंद वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आनंद अगरवाल व त्यांच्या पत्नी सौ. रितू अगरवाल, गायिका आणि अभिनेत्री सुश्मिता भंडारी, गायक मोहन भंडारी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना महिला शहरप्रमुख सविता मते, शिवसेना महिला उपशहरप्रमुख कांचन कांबळे यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले व प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महावीर शहा आणि परिवार यांच्यातर्फे कलशस्थापना करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड येथील पार्श्वपद्मावती महिला मंडळातर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

मुनिश्री पुढे म्हणाले, मुक्या प्राण्यांची शिकार करून स्वत:ला बहादूर म्हणवणे ही मुर्खता आहे. स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे ही अनावश्यक हिंसा आहे. भगवान महावीरांनी यासाठी मनाई केली आहे. युद्ध करायचेच असेल स्वत:मधील वाईट प्रवृत्तींशी करावी. तुमच्याकडे मुबलक पाणी आहे. परंतु दुसरीकडे पाण्याच्या एक एक थेंबासाठी लोक तरसतात. येणार्‍या काळात जर विश्वयुद्ध झालेच तर ते पाण्यावरूनच होईल. त्यामुळे पाण्याचे महत्व समजून ते जपून वापरा. डोळ्यांमधील अश्रू थांबवायचे असेल तर नळाचे पाणी वाचवून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे असे ते म्हणाले.

“हिंदू आणि जैन धर्मानुसार अंत्यविधीच्या वेळी लाकडाची चिता बनवली जाते. परंतु त्या चितेचा वापर करण्याचा अधिकार तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात किमान 100 झाडे लावत नाही. पर्यावणाचे रक्षण कराल तरच सुदृढ आयुष्य जगाल” असे मुनिश्रींनी सांगितले.

याप्रसंगी सनीज् वर्ल्डचे चेअरमन व माजी आमदार विनायक निम्हण यांनी मुनिश्री यांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. याप्रसंगी विनायक निम्हण म्हणाले, खडकी येथील जैन संघाच्या माध्यमातून जैन समाजाशी जुळण्याची संधी मला मिळाली. या समाजाचे विचार देशाला दिशा देण्याचे काम करतात. तर अशा विचारांना समाजापर्यंत पोहचविणारे मुनिश्रींच्या दर्शनामुळे नागरिकांसाठी विकासाचा मार्ग खुला होतो.

ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांनी मुनिश्री यांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. याप्रसंगी अरुणा ढेरे म्हणाल्या, भारतीय प्राचीन परंपरेचे मूल्य आजही समाजात खोलवर रूजले आहे. त्यामुळेच जगात अनेक वाईट घटना घडूनही समाज सुदृढपणे चालत आहे. याचे श्रेय या परंपरांना दिले पाहिजे. प्राचीन मौखिक परंपरेचे प्रतीक असणार्‍या मुनिश्रीसारख्या संतांनी समाजात या मूल्य आणि परंपरांना कायम ठेवले आहेत.

या प्रवचनात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे मंडपाजवळ 2 सप्टेंबर पर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू आहे. यानिमित्त आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक बसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा महोत्सवातील मुनिश्रींच्या प्रवचनाचे अखेरचे 22वे पुष्प गुंफले जाईल. त्यानंतर लगेचच सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत जिनशासनाचे महास्तोत्र श्री उवस्सहग्गर स्तोत्र याचे सामुहिक पठन संपन्न होणार आहे. यासाठी पुरूषांसाठी सफेद व महिलांसाठी केसरी वस्त्र हा ड्रेसकोड असणार आहे. भाविकांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल आणि कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.

जॅकलिन फर्नांडीस डाबर हनीची नवी ब्रँड अॅम्बेसेडर

0

‘स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेद्वारे जॅकलिन करणार ‘डाबर हनी’ चा प्रसार

मुंबई-भारतातील सर्वात विश्वसनीय आरोग्यवर्धक उत्पादने बनविणाऱ्या डाबर इंडिया ने आज डाबर हनी साठी बॉलीवुड अभिनेत्री जॅकलिन फर्नाडीस हीची  ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. जॅकलिन आता डाबर हनी चा प्रसार करणार असून लवकरच तिच्या उपस्थितीत ‘स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे.

 दरम्यान, ”जॅकलिन फर्नांडिसच्या रूपाने डाबर हनी ला नवा  चेहरा मिळाला आहे. याबद्दल आम्ही आनंदी आहोत”  अशी भावना डाबर इंडिया लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक प्रशांत अग्रवाल यांनी व्यक्त केली. नवीन जीवनशैली आणि  आहाराच्या माध्यमातून आज भारतीय नागरिक स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दशकांपासून डाबर हनी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. दररोज सकाळी गरम पाण्यात मिश्रण करून अथवा नाष्ट्याबरोबर किंवा जेवणामध्ये डाबर हनीचा समावेश सध्या साखरेला पर्याय म्हणून केला जात आहे असे अग्रवाल यांनी सांगितले.


जॅकलिन फर्नांडीस हिने डाबर हनी सोबत सहयोगाबाबत सांगितले की, “जेव्हा डाबर ने मला त्यांचे डाबर हनी या उत्पादनाच्या प्रसारासाठी सहयोग देण्याविषयी संपर्क साधला तेव्हा या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधणे मला नेहमीच आवडणार अशी आशा मी त्यांच्याकडे व्यक्त केली,  स्टे फिट, फील यंग’ या मोहिमेसाठी सुध्दा मी त्यांना तत्काळ होकार दिला.” तंदरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम, आरोग्यदायी आहार, आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. मात्र सोबतच दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात डाबर हनी सुध्दा घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे डाबर हनी चा प्रसार करण्यास आणि त्यांच्यासोबत सलग्न होण्यास आनंद होत आहे.”  अशी भावना जॅकलिन ने व्यक्त केली.

 

“आरोग्याच्या दृष्टीने ‘फिट’ म्हणून प्रतिमा असलेले  एम एस धोनी , बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी यांचे डाबर हनीला काळानुरूप सहकार्य लाभले. हीच परंपरा पुढे नेत डाबर हनीच्या प्रसारासाठी तंदुरुस्त अशा जॅकलिन फर्नांडिसला ब्रँड अँबेसॅडर पदी नियुक्त करताना आनंद होत आहे” असे अग्रवाल यांनी सांगितले. “जॅकलिन हीची अभिनेत्री म्हणून ओळख तर आहेच सोबत ती तंदुरुस्त देखील आहे. सुदृढ असलेल्या जॅकलिन च्या तंदुरुस्तीपासून प्रेरणा घेऊन ग्राहक डाबर हनी ला नेहमीच स्वीकार करतील” अशी आशा प्रशांत अग्रवाल यांनी व्यक्त केली.

पुणे परिमंडलातील 28 लाख वीजग्राहकांना व्याजापोटी 58 कोटींचा परतावा

0

पुणे : महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील 27 लाख 69 हजार लघुदाब वीजग्राहकांना नियमानुसार 58 कोटी 51 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. गेल्या जून व जुलै महिन्यातील वीजदेयकांत ही रक्कम समायोजीत करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील 3 लाख 16 हजार वीजग्राहकांकडे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची 77 कोटी 87 लाख रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार बँकेच्या बेस रेटनुसार व्याज देण्यात येते. त्यानुसार पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक (एलटी), कृषीपंपधारक तसेच इतर अशा 27 लाख 69 हजार वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी 58 कोटी 51 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 20 लाख 98 हजार वीजग्राहकांना 46 कोटी 82 लाख रुपयांचा तर मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील 6 लाख 71 हजार वीजग्राहकांना 11 कोटी 69 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

यंदा अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी एप्रिल/ मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही लघुदाब वर्गवारीतील 3 लाख 16 हजार वीजग्राहकांकडे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची 77 कोटी 87 लाख रुपये थकबाकी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येते. अद्यापही ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव भरलेली नाही त्यांनी सुरक्षा ठेव भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. पुणे परिमंडलातील लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाईन पेमेंटची सोय महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोदरेजच्या ‘यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओ’चा पुण्यात विस्तार

0

फर्निचरची सहनिर्मिती करण्याच्या ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीकडून पुण्यात दुसऱ्या स्टुडिओची उभारणी

 पुणे ऑफिस आणि घरातील फर्निचर क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी आणि आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज कंपनीने औंध भागात आपला दुसरा यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओ उभारला आहे. सुमारे चौदाशे चौरस फूट जागेवर उभ्या राहिलेल्या या शोरूममध्ये अंतर्गत सजावटीतील तज्ञांनी उत्तम घरांचे नमुने सादर केले आहेत. यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओचे प्रमुख व कंपनीचे उपाध्यक्ष मनोज राठी यांनी या स्टुडिओचे उद्घाटन केले.

 व्यक्तिगत आवडीनिवडीस महत्त्व असलेल्या सध्याच्या युगात, ग्राहक स्वतःसाठी खास बनविण्यात आलेले फर्निचर घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी होम डिझाईन स्टुडिओतर्फे डिझायनर तंत्रज्ञ व स्थानिक सुतार यांचे एक पथक तयार करण्यात येते व ग्राहकाच्या आवडीनुसार, त्याच्या जागेला अनुरुप असे नवीन स्टाईलप्रमाणे फर्निचर बनवून देण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक व अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकाच्या घराची व त्याला हव्या असलेल्या फर्निचरची आभासी प्रतिकृती बनविण्यात येते. त्याच्या आधारे अंतिम निर्णय घेऊन फर्निचर प्रत्यक्षात तयार करण्यात येते.

 या प्रसंगी गोदरेज इंटिरिओ विभागाचे सीओओ अनिल माथूर म्हणाले, की यू अॅण्ड अस ही एक अशी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे, जिच्यामध्ये फर्निचरच्या डिझाईन टीममध्ये ग्राहक थेट सहभागी होतो आणि स्वतःच्या विशेष गरजांनुसार फर्निचर बनवून घेतो. ग्राहकांची क्रयशक्ती वाढत असताना जागतिक स्तरावरील वैविध्यपू्र्ण डिझाईन्सची माहिती मिळाल्यामुळे ग्राहकाचा चोखंदळपणा वाढत आहे. अशावेळी त्याला स्वतःच्या मतानुसार फर्निचर बनवून घेण्याची संधी मिळत आहे. यू अॅन्ड असचा पहिला स्टुडिओ पुण्यात सुरू झाल्यानंतर हा औंधमधील दुसरा स्टुडिओ थोड्याच अवधीत सुरू झाला, यावरून या संकल्पनेला देशभरात किती चांगला प्रतिसाद मिळतो, हे दिसून येते.

 यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओचे प्रमुख व कंपनीचे उपाध्यक्ष मनोज राठी म्हणाले, की पुण्यात आमचा ब्रॅन्ड मजबूत होत असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटते. यापुढील काळात, मॉल्समध्ये मोठ्या स्वरुपात आणि शहराच्या उपनगरांमध्ये लहान स्वरुपात स्टुडिओ उभे करण्याचे आमचे धोरण राहील. तसेच, ग्राहकांशी भागीदारी करणे आणि सहयोगी पध्दतीने, विश्वासाने त्यांच्या घरच्या अंतर्गत आणि फर्निचरच्या गरजा भागविण्यासाठी अंदाज व अद्वितीय उपाय देणे आहे, यावर आमचा भर राहणार आहे.

 यू अॅन्ड असने अलीकडेच नवीन ओळख आणि सुधारीत ब्रँड लोगोचे अनावरण केले आहे.  या नव्या लोगोमधून घरगुतीपणा व घरातील उबदारपणा सूचित करण्यात येतो. ग्राहकांना जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी हा नवा लोगो त्यांना उद्युक्त करतो. लोगोमधील ‘&’ (अॅन्ड) या अक्षरातून ग्राहकाचा फर्निचर निर्मितीमध्ये असणारा सहभाग दर्शविण्यात आला आहे.

 यू अॅन्ड अस हा एक गोदरेज समुहाचा उपक्रम असल्याने, गुणवत्ता, योग्य वेळेत वितरण आणि टिकाऊपणा या गोष्टी यामध्ये अंगभूतच आहेत. ग्राहकाने स्वतः सर्व फर्निचरचे नियोजन करणे आणि बनवून घेण्याचा खटाटोप करणे या गोष्टींची गरज यू अॅन्ड असमुळे राहात नाही. आम्ही ती जबाबदारी पूर्ण करतो. शिवाय, एकदा काम हाती घेतल्यानंतर पुन्हा खर्च वाढवून सांगण्याची कंपनीची पध्दत नसल्यामुळे ग्राहकाला तो मोठा आधार मिळतो. एकदा चर्चा होऊन योजना तयार झाल्यावर, चार ते सहा आठवड्यांत ग्राहकाच्या घरात फर्निचर बसवून झालेले असते.

 यू अॅन्ड अस डिझाइन स्टुडिओबद्दल

गोदरेज इंटरियोने आपल्या यू अॅन्ड अस डिज़ाइन स्टुडिओच्या माध्यमातून फर्निचर डिझाईनची नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. आमच्या उत्पादनांचे नवनवीन प्रकार, त्यातील आमचे कौशल्य आणि ग्राहकाच्या नेमक्या गरजा ओळखण्याचे आमचे धोरण यातून फर्निचरची सह-निर्मितीकरण्याची ही आमची संकल्पना आहे. यू अॅन्ड असमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या आधुनिक फर्निचरचे डिझाईन स्वतःच तयार करण्याची संधी देतो आणि त्यांच्या कल्पनांना एकत्र करून अत्याधुनिक डिझाईन स्टुडिओमध्ये आमच्या कौशल्याने ते बनवून घेतो.  यातून आम्ही एक अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असे व्यवसाय मॉडेल निर्माण करीत आहोत. यू अॅन्ड अस डिझाइन स्टुडिओमध्ये ग्राहकाला चिरंतन गुणवत्तेचा अनुभव मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

सुदर्शन वाल्मिकी वडार मोर्चाचा पुणे जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

पुणे-आंबेडकरी मोर्चा प्रणित सुदर्शन वाल्मिकी वडार मोर्चाचा  पुणे जिल्हा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला . पुणे येथे झालेल्या या मेळाव्याचे सुदर्शन वाल्मिकी वडार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे , सुदर्शन वाल्मिकी वडार मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष नरेश लोट , महेश जिवाल, ऍड. सुभाष माच्छरे , आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड , ऍड. मनिषा रोटे , ऍड. सागर चरण , कमलाकर गायकवाड , अमर चवरे , अनिल कांबळे , आशा गायकवाड , अनिल धोतरे , काशिनाथ शिनोरे , सोनू निकाळजे , राहुल माने , सचिन भिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते .

बाबासाहेबानतंर या समाजाला दिशा खरी आंदोलनाची दिशा तळागाळातील कार्यकर्त्यांनी दिली . त्यांचा त्याग व परिश्रम हाच खरा आंबेडकरी बाणा आहे . आता कार्यकर्ते नेत्यांना नव्हे तर समाजाला मजबूत करण्यासाठी योग्य राजकीय निर्णय घेतील . असे मार्गदर्शनपर भाषणात आंबेडकरी मोर्चा प्रणित सुदर्शन वाल्मिकी वडार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आपले विचार मांडले . 

इतिहासाची मोडतोड;पुणे महापालिकेविरोधात पोलीसात तक्रार दाखल ….

0

पुणे- भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईट वरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्ट ने पोलिस आयुक्त पुणे, पोलिस निरीक्षक सायबर सेल पुणे यांच्या कडे पुणे महानगरपालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदी चे आदेश दिले होते. व स्वातंत्र्याचा लढा त्या वेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सार्वजनिक रित्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम इ सन 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक रित्या बसविला व उत्सव साजरा केला.


1894 मध्ये लोकमान्या बाळ गंगाधर टिळक यांनी प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटी विरूध्द व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा ऊभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.
भाऊसाहेब रंगारी यांनी त्या काळात ईको फ्रेंडली मुर्ती बनविली तीच आजही बसविली जाते. फक्त आणि फक्त क्रांतीच्या संकल्पनेतून उभारलेल्या गणेशोत्सवाचे प्रतिक म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब यांनी साकारलेली दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करणारी श्रींची ईको फ्रेंडली लढाऊ काव्यातील मूर्ती.आशीर्वाद देण्यासाठीचा हात ही संकल्पनाच यावेळी राबवली गेली नाही, कारण जे काय ते लढूनच घ्यायचे आहे. आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी आणि या त्यांच्या सोबत्यांनी अवलंबला त्याच शिकवणीतून आजच्या काळातही उभारलेल्या संविधानिक लढ्याला यश आले म्हणावे लागेल.

पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे काल महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बारा च्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून “1892 सालात भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली” असा मजकूर होता हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.
महानगरपालिकेच्या या कृत्या विषयी व इतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेऊन समाजाची दिशाभूल केली म्हणून पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली आहे अशी माहिती भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्ल्गार अॅड मिलींद द पवार व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेन्द्र गुप्ता विश्वस्त सुरज रेणुसे विश्वस्त बाळासाहेब निकम यांनी कळविले आहे.

जनमित्र ताहीरभाई काझींच्या स्मृतींना उजाळा

0


पुणे-सामाजिक कार्यकर्ते ,स्वर्गीय ताहीर बद्रुद्दीन काझी यांच्या मित्रत्वाच्या स्वभावाचे आणि लोक जोडण्याच्या कलेचे अनेक पैलू उलगडत त्यांच्या स्मृतींना येथे उजाळा देण्यात आला .
जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील कमल नयन बजाज उद्यानासमोरील रस्त्याला स्व. ताहीर भाई यांचे नाव देण्यात आले . स्व. ताहीर बद्रुद्दीन काझी रस्ता असे नामकरण करणारा फलक नुकताच समारंभपूर्वक लावण्यात आला .स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे ,नगरसेवक आदित्य माळवे ,तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद ,संतोष लांडगे,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी उपमहापौर आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आयझ काझी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . रवींद्र नितनवरे ,संजय कांबळे,राजू जोशी,मुकेश कोरबोलू,संजय खडसे, यांनी ताहीर भाई यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला .या परिसरातील सर्वधर्मीय नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ,पत्रकार यावेळी उपस्थित होते .ताहीर भाई यांचे चिरंजीव बिलाल काझी यांनी आभार मानले .

क्रीडा दिनानिमित्त पुण्यात सुरु होणार स्पोर्टस्‌ नर्सरी

0
पुणे- राष्ट्रीय  क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुण्यामध्ये स्पोर्टस्‌ नर्सरीला आज प्रारंभ करण्यात आला. या स्पोर्टस्‌ नर्सरीमुळे  क्रीडा क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यापासून तर ते क्रीडा क्षेत्रात उच्च स्तरीय कामगिरी करण्यापर्यंत सर्वांना या नर्सरीमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. 
या स्पोर्टस्‌ नर्सरीचे उद्घाटन आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती टेनिसपटू अंकिता रैना तसेच, ऑलंपिकपटू बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानिटकर आणि ऑलंपिकपटू मुष्टियोध्दा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे  क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  
स्पोर्टस्‌ नर्सरीविषयी अधिक माहिती देताना स्पोर्टस्‌ नर्सरीचे मेंटॉर महेंद्र गोखले आणि सुंदर अय्यर यांनी सांगितले की, अशाप्रकारची ही पहिलीच स्पोर्टस्‌ नर्सरी असून याचे कार्य पीवायसी हिंदू जिमखाना आणि निगडी प्राधिकरण या ठिकाणी प्रामुख्याने सुरू होणार आहे. अशाप्रकारच्या 25स्पोर्टस्‌ नर्सरी या वर्षाअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.  
सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, स्पोर्टस्‌ नर्सरीमध्ये चार वेगवेगळ्या पद्धतीने काम केले जाईल. यातील पहिल्या विभागात 4 वर्षांवरील मुलांसाठी त्यांची मोटरस्कील्स्‌, तसेच धावणे, उड्या मारणे आणि आयकॉर्डिनेशन(मेंदू डोळे व हात यांचा समन्वय)विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. या स्पोर्टस्‌ नर्सरीमध्ये नावाप्रमाणेच 4वर्षे किंवा त्यावरील मुलांना क्रीडा प्रशिक्षण घेण्याची मुळ कल्पना आहे. आमच्या अभ्यासाप्रमाणे या वयोगटातील मुले मैदानावर कोणतेही लक्ष न ठेवता बराच काळ विनाकारण वाया घालवताना दिसून आले असल्याचे अय्यर यांनी सांगितले. 
महेंद्र गोखले म्हणाले की, आम्ही एक अभ्यासक्रम तयार केला असून त्यानुसार सुरूवातीला धावणे, फेकणे, उड्या मारणे, झेलणे असे मुक्त  क्रीडा  प्रकार देण्यात येणार असून मुले जसजशी मोठे होतील तसेतशी त्यांना फुटवर्क, कॅलिस्ट्रेनिक्स किंवा चपळतेसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम देण्यात येणार आहे. 
सध्याच्या परिस्थितीत मुलांना त्यांच्या विकासाच्या वयात योग्य क्रीडा प्रकाराची निवड करता येत नाही आणि या नकारात्मक अनुभवामुळे ही मुले नाऊमेद होऊन  क्रीडा  क्षेत्राकडे पाठ फिरविण्याची शक्यता असते. म्हणून 7व्या वर्षी मुलांना एक रिपोर्ट कार्ड देणार असून त्यामध्ये मुलांच्या शारिरीक क्षमतेनुसार त्याने कोणता खेळ स्विकारावा यासंबंधी अचूक विश्लेषण केलेले असणार आहे. आमच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा मुलगा 7व्या वर्षी क्रीडा क्षेत्रात प्रवेश करताना अन्य खेळाडूंच्या तुलनेत खुपच पुढे असेल. 
त्याचीच पुढील पायरी म्हणून स्पोर्टस्‌ नर्सरी त्यातील तज्ञांनी विकसित केलेल्या विश्लेषण प्रक्रियेनुसार मुलासंबंधी विशिष्ट माहिती गोळा करणार आहे. त्यामध्ये हेल्थ रिस्क ऍप्रायझल किंवा मुव्हमेंट स्क्रीन्स आणि परफॉर्मन्स टेस्ट यांचा समावेश आहे. 
जगातील क्रीडा महासत्ता असलेल्या देशांनी याआधीच जागतिक दर्जाच्या ऍथलिटस्‌साठी आवश्यक असलेल्या शारिरीक क्षमतेचे निकष निश्चित केले आहेत आणि हे निकष विविध देशांमधील हवामान आणि भौगोलिक परिस्थितींवर निश्चित होत असतात. हे सर्व निकष खेळाडूंमधील गुणवत्ता शोधून त्यांचा विकास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याच धर्तीवर स्पोर्टस्‌ नर्सरीत सहभागी होणार्‍या सर्व क्रीडाप्रकारांमधील ऍथलीटस्‌ना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे महेंद्र गोखले यांनी सांगितले. 
दुसर्‍या विभागात खेळाडूंचे उद्दिष्ट, गरजा व क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार खेळाडूंच्या क्षमतेची विश्लेषण करण्याची प्रक्रिया राबविली जाईल. (उदा.हेल्थ रिस्क ऍप्रायझल किंवा परफॉर्मन्स टेस्ट).
जागतिक स्तरावर  क्रीडा क्षेत्रातील महासत्तांना आव्हान देण्यात भारताला येत असलेले अपयश हे शास्त्रशुद्ध शारिरीक शिक्षण आणि डाटा ऍनालिसिस अशा गोष्टींच्या अभावामुळे निर्माण झालेली समस्या आहे. 19 ते 23 वयोगटातील 50टक्कयांहून अधिक भारतीय खेळाडू स्पोर्टस्‌मुळे येणार्‍या दुखापतीमुळे मागे राहतात. शारिरीक तंदरूस्ती व क्षमतेच्या विकासाऐवजी केवळ कौशल्याकडे लक्ष दिल्यामुळे या अडचणी येत असल्याचे गोखले यांनी निदर्शनास आणले. 
शारिरीक क्षमतेच्या चाचणीमध्ये खेळाडूच्या स्नायू व हाडांच्या रचनेबरोबरच वेगाने हालचाल करण्याची क्षमता व तंदरूस्ती याच्या परिक्षणाचा समावेश आहे. हे सर्व परिक्षण शाळांमध्ये, स्पोर्टस्‌ अकादमीमध्ये किंवा महाविद्यालयात स्पोर्टस्‌ नर्सरीच्या तंज्ञांकडून केले जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले. 
तिसर्‍या विभागात उद्योन्मुख गुणवान खेळाडूंना क्रीडा  क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी बजावण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच त्यासाठी खेळाडूंची बलस्थाने व कच्चे दुवे शोधून सुधारणा घडवून आणण्याकडे लक्ष दिले जाईल. याच विभागात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष पुरविले जाईल. 
चौथ्या विभागात  क्रीडा क्षेत्रात करीअर करू इच्छिणार्‍या खेळाडूंना विद्यमान किंवा माजी  खेळाडू यांच्याकडून मार्गदर्शन केले जाईल. तसेच यावेळी अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षकांनादेखील मार्गदर्शन केले जाईल. हा संपूर्ण कार्यक्रम ऑस्ट्रेलियन स्ट्रेन्थ ऑड कंडिशीनिंग असोसिएशन तर्फे प्रमाणित केला जाणार आहे.
शारिरीक विश्लेषणामध्ये स्नायू व हाडांच्या रचनेबरोबरच वेगाने हालचाल करण्याची क्षमता तसेच, शारिरीक क्षमता व तंदरूस्तीसाठी विविध निकषांचा समावेश आहे. स्पोर्टस्‌ नर्सरीने नियुक्त केलेल्या तज्ञांव्दारे शाळा किंवा स्पोर्टस्‌ अकादमीमध्ये हे विश्लेषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

इस्कॉनच्या 40 व्या वर्धापन सोहळ्या निमित्त अलौकिक नृत्याविष्कार!

0
मुंबई -इस्कॉनच्या 40 व्या वर्धापन सोहळ्या निमित्त अभिनेत्री-नर्तिका ग्रेसी सिंग यांनी इस्कॉन, जुहू येथे आपल्या टीमसह नृत्याविष्कार सादर केला. कवी नारायण अग्रवाल द्वारा आयोजित या कार्यक्रमास अभिनेत्री हेमा मालिनी, डॉ. राजन शंकरन, द अदर सॉंगच्या डॉ. मेघना शाह, डॉ.सोमा घोष, सुभंकर घोष, विवेक प्रकाश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लगान मधील गौरी असो वा कृष्णाच्या प्रेमात तल्लीन झालेली राधा परिधान केलेल्या प्रत्येक वेशभूषेत तितकीच अलौकिक दिसणारी अभिनेत्री ग्रेसी सिंग म्हणते की, “आज हा इथे साकारलेला नृत्याविष्काराचा शो माझ्यासाठी विशेषतः कठीण होता कारण मी सहसा एक तासाचा शो करते परंतु हा दोन तासांचा शो होता.आज मी माझ्या नृत्यात भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि बॅलेट शैलीचा समावेश केला होता आणि हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. तथापि इस्कॉनसाठी अशाप्रकारचे कार्य करण्याची एक दिव्य संधी मला मिळाली. आज येथे नृत्य सादर करताना जणू काही कृष्णचं आमच्यासोबत स्टेजवर अवतरला आल्याची भावनाचं मला फार सुखावून जाणारी होती.” 

लोकसभा उमेदवारीसाठी अन्य पक्षात जाण्याची मला गरज नाही -खासदार काकडे (व्हिडीओ)

‘काकडे हाऊस ‘वर लोटला जनसागर

पुणे-खासदार संजय काकडे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छ्या देण्यासाठी ‘विद्यापीठ रस्त्यावरील’काकडे हाऊस ‘ वर आज त्यांच्या चाहत्यांनी ,कार्यकर्त्यांनी आणि पुणेकरांनी मोठी गर्दी केली .काकादेन्च्या वाढ दिवसामुळे या परिसरात प्रचंड वाहने पार्क झाली होती . पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न केले .

असंख्य केक ,असंख्य पुष्पगुच्छ आणि प्रचंड गर्दी यामुळे काकडे हाऊस गजबजून गेले होते . विविध पक्षांमधील ,आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून काकडे यांना शुभेच्छ्या दिल्या आणि  देण्याचा प्रयत्न केला . काकडे यांनी प्रत्येकाला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सेल्फी घेण्यासाठी कार्यकर्ते थांबून राहत असल्याने गर्दीत वाढ कायम राहिली .

वाढदिवसानिमित्त ‘मायमराठी ‘ शी बोलताना खासदार काकडे म्हणाले कि ,पुण्यातील वाहतूक समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे .हि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ..सुरळीत वाहतूक पुण्याची कशी होईल यासाठी उपाय योजना करण्यास माझे प्रथम प्राधान्य असणार आहे . कचरा ,पाणी  आणि आरोग्य या विषयावर देखील मी विविध स्तरावर कामे करण्याचा संकल्प केला आहे .

२०१९ च्या निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले ,पुण्याची लोकसभा मी लढणार आहेच आणि भाजप च मला उमेदवारी देईल याबाबत माझी खात्री आहे . उमेदवारीसाठी अन्य पक्षात जाण्याची मला गरज नाही …..

पहा हा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट ……

मनपा कर्मचाऱ्यांचा स्मार्ट सिटीच्या उभारणीत मोलाचा वाटा….महापौर मुक्ता टिळक.

0
पुणे – देशातील राहण्याजोगे सर्वोत्तम शहर असे नावलौकीक ही पुण्यनगरीने मिळविले आहे यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मनपा च्या अधिकारी,कर्मचारी व कामगारांचा मोलाचा वाटा आहे असे महापौर मुक्ता टिळक यांनी येथे सांगितले. .
क्रिएटिव्ह फौंडेशन ने खचलेला डी पी रस्ता व ड्रेनेज चेंबर दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,विश्वस्त सतीश कोंडाळकर उपस्थित होते. “श्री खर्डेकर म्हणाल्याप्रमाणे संपूर्ण शहरातील वाहिन्यांचे मॅपिंग होणे गरजेचे असून ते काम सुरु आहे व लवकरच सर्व नकाशे उपलब्ध होतील आणि भावी काळात अश्या Crisis च्या वेळी त्याचा मोठा उपयोग होइल असे ही महापौर म्हणाल्या.मी माझ्या प्रभागात होणाऱ्या सर्व कामांचे नकाशे माझ्याकडे ठेवत असते त्याचे अनुकरण सर्वांनी करावे असे सांगतानाच ” नगरसेवक आपल्या भागातील कामे झाल्यावर त्याचे फोटो अहवालात टाकतात आणि ते टाकले ही पाहिजे पण सौ मंजुश्री आणि संदीप खर्डेकर यांनी ज्यांनी काम केले त्यांच्या कामगिरीची आठवण ठेवुन त्यांचा सत्कार घडवुन आणला हे अतिशय स्तुत्य असुन त्याचे सर्वांनी अनुकरण करावे असे ही त्या म्हणाल्या.अधिकाऱ्यांनी मनात आणले तर ते काय करु शकतात हे येथील कामाने दाखवून दिले असल्याचे ही त्या म्हणाल्या.
राजाराम पुलाजवळ डी पी रस्ता व ड्रेनेज चेंबर खचल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाला होती,त्यातून याच दरम्यान जोरदार पाऊस ही पडत होता,या ठिकाणी असलेल्या विविध वाहिन्या व विशेषत: एम एन जी एल ची गॅस पाईपलाईन या सर्व विपरीत व धोकादायक स्थितीत ज्या कर्मचारी व कामगारांनी अहोरात्र काम केले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.या १० दिवसांत मनपाचे विविध खात्यांचे अधिकारी,पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शब्दशः जीव ओतून काम केले,याचा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि आपल्या पुण्याचा एक नंबर कायम टिकेल असे काम करावे असे ही श्री खर्डेकर म्हणाले.तसेच या सर्व काळात गिरीजा हॉटेल चे मालक विशाल सणस व मॅजेंटा लॉन चे मालक श्री रानडे यांना प्रचंड त्रास झाला (त्यांच्याच दारात रस्ता खचल्याने व चिखलाने राडा झाल्याने) मात्र त्या दोघांनीही हे आपल्या पुण्याचे काम आहे त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देउ केले – असे नागरिक आणि हे सर्व कर्मचारी स्मार्ट पुण्याचे शिल्पकार आहेत असे ही खर्डेकर म्हणाले.
मी नगरसेविका होण्यापूर्वी प्रशासनाच्या बाबत साशंक होते, सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत असाच सार्वत्रिक समज असतो मात्र मी येथे रोज येत होते आणि त्या ८/१० दिवसांत सर्वांनी मिळून जे काम केले ते अवर्णनीय आहे असे स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
यावेळी पोकलेन व जे सी बी ऑपरेटर मनोज यादव,गवंडी गणेश कोलार,प्लंबर आनंद पवार,मनपा चे मुकादम सुमीत बोरकर आणि ड्रेनेज चे ज्युनियर इंजीनियर राजेश धुमाळ यांचा शाल व भेटवस्तू देउन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार आमच्यासाठी मोलाचा असून शासकीय सेवेत असे प्रसंग आमच्या वाटयाला येत नाहीत मात्र हा कार्यक्रम आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देउन गेला असे ड्रेनेज चे एक्झीक्युटिव्ह इंजीनियर श्री बेंद्रे म्हणाले.
यावेळी कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,सुवर्णाताई काकडे,सुलभाताई जगताप,माणिकताई दीक्षित,संगीताताई आदवडे,सुधीरकाका नाईक,रमेश चव्हाण,जयेश सरनौबत,गणेश चव्हाण व इतर नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पै कॉलेज ऑफ वेदा’च्या विद्यार्थीनींनी बांधली बस चालकांना राखी !

0

पुणे :‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्टस डिझाईन अँड आर्ट’ (VEDA ) च्या वतीने पुणे महानगरपालिका आणि ‘महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग’ च्या बस चालकांना राखी बांधण्यात आली.

‘वेदा’ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी सांभाळण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट बस स्थानकातील बस चालकांना राखी बांधून त्यांना मिठाई देण्यात आली.

‘भारतीय सणांपैकी रक्षाबंधन हा सण देखील सर्व बांधवांना एकत्रित आणण्याचा आहे, या जागरूकतेसाठी आम्ही हा उपक्रम राबविला’, अशी माहिती ‘पै कॉलेज ऑफ वेदा’ चे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी पत्रकाद्वारे दिली.