Home Blog Page 3073

महापालिकेत सल्लागार नेमणुकीतला हा घ्या घोटाळा (व्हिडीओ)

0

पुणे-पालिकेत  करोडो रुपयांच्या विविध  प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी   महापालिका तज्ञ सल्लागार नेमून त्यांच्या मार्फत माहिती घेऊन नागरिकांसाठी चांगले प्रकल्प देण्याचा प्रयत्न महापालिका करते .मात्र महापालिकेत सल्लागार म्हणून नियुक्ती मिळवा आणि मालामाल व्हा; हा फंडा हि राबविला जात असल्याची चर्चा बहुतेकदा ऐकायला येते . अशाच एका तथाकथित सल्लागाराला ‘बेनकाब’ करण्याचा पुरेपूर प्रयत्न नगरसेवक अविनाश बागवे यांनी केल्या नंतर प्रशसकीय पातळीवर चक्क कागदपत्रांची हेराफेरी झाली,पळवापळवी झाली अन प्रकरण दडपण्याचे प्रयत्न जोमाने सुरु झाले .पण आता बागवे यांनी आयुक्त सौरव राव यांना ‘महापालिकेत सल्लागार नेमणुकीतला  हा घ्या घोटाळा’ असे सांगत या प्रकरणी साकडे घातले आहे .

महापालिकेचे  सत्यम कन्सल्टंट या तांत्रिक सल्लागार संस्थेला पाच कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडीटचे काम मिळावे यासाठी प्रशासनाकडून या संस्थेसाठी अनेक त्रुटी डावलून नियम धाब्यावर बसून काम दिल्याचा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत केला.या प्रकरणी त्यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन तथाकथित सल्लागारासह,दोषी असलेल्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नगरसवेक अविनाश बागवे यांनी सांगितले, की महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या पाच कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांचा प्रामुख्याने छोटे पूल, कल्व्हर्ट, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी पालिकेने निविदा मागविली होती. त्यामध्ये सत्यम कन्सल्टंट या संस्थेची निविदा सर्वात कमी दराची आल्याने पाच महिन्यांपूर्वी ती स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी या कंपनीने सादर केलेले आयकर रिटर्न, कर्मचार्‍यांचा प्रॉव्हीडंड फंड, अनुभव दाखला, संचालक यादी ही आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच एकच कंपनी असताना दोन पॅन नंबर असल्याचे मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु प्रशासनाकडून यावर फार काही स्पष्टीकरण मिळाले नाही आणि स्थायी समितीत ठराव मंजूर झाला.

या संदर्भात सर्वसाधारण सभेतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यावर खुलासा करताना पथविभागाने संबधित फाईल गहाळ झाली असून अज्ञात व्यक्तिविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले. परंतु पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा वाघचौरे यांनी ही फाईल पथ विभागाच्या बारनिशीतून सत्यम कन्सल्टंटच्या प्रतिनिधीने परस्पर नेल्याचे पत्र वरिष्ठांना दिले होते. बारनिशितून परस्पर फाईल नेल्याप्रकरणी सत्यम कन्सल्टंटच्या संबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाराजकीय दबावामुळेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेउन निवेदन दिले. सत्यम कन्सल्टंट कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना या कामी मदत करणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. आयुक्तांनी याप्रकरणी सत्यम कंपनीने मिळविलेला आयकर दाखला व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याचे बागवे यांनी सांगितले.

शाकाहाराच्या शपथेची ‘गोल्डन बुक’मध्ये नोंद

0

पुणे : शाकाहार, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतल्याची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ॐ गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी ९३,५५० लोकांना शाकाहाराची शपथ दिली होती. एकाचवेळी जवळपास लाख लोकांनी शाकाहाराचा संकल्प करण्याच्या या घटनेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. सादर कार्यक्रमाला जगभरातील २०० पेक्षा अधिक संत उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “शाकाहारासाठी केलेल्या या संकल्पाची नोंद जागतिक स्तरावर झाल्यामुळे आनंद वाटतो. सुखी जीवनासाठी शाकाहार आणि व्यसनमुक्ती अतिशय गरजेची आहे. धार्मिक उत्सवात आपण व्यसनमुक्ती व शाकाहाराचे पालन करतो. विज्ञानानेही शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आहार असल्याचे सिद्ध केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शाकाहाराला पर्याय नाही. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील.”

नेत्रतर्पण शिबिराचा २०० जणांना लाभ

0

पुणे : ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात जवळपास २०० जणांनी नेत्रतर्पण केले. ३५ डॉक्‍टर्सच्या टीमने यामध्ये सहभाग घेतला.

लायन्स क्लब इंटरनॅशनलचे उपप्रांतपाल अभय शास्त्री, लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष श्रीकांत बाहेती, सचिव राजेश सोनी, पुखराज संचेती, मनोहर कुटुंबे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनीही नेत्रतर्पण करून घेतले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य स्नेहल पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाले. शेठ ताराचंद रुग्णालयाजवळील वाहतूक पोलीस आणि रास्ता पेठ पोलीस स्थानकातील पोलीस यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
 
नेत्रतर्पण उपचारामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते, तसेच चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सतत संगणकावर काम करणारे, उन्हात आणि धुळीत प्रवास करणारे यासह सर्वच नागरिकांनी नेत्रतर्पण केले पाहिजे. डोळ्यांना ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करण्याचे काम नेत्रतर्पण करते. या उपचारासाठी २०-२५ मिनिटांचा वेळ लागतो, असे डॉ. हरिश पाटणकर व स्नेहल पाटणकर यांनी सांगितले. अभय शास्त्री यांनीही लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलने आयोजिलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

मेघराज भोसलेंच्या नटराज पॅनेलचा दणदणीत विजय

0

पुणे : समस्त नाट्य वर्तुळाचे लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नटराज पॅनेलने विजयावर आपली एकहाती मोहोर उमटवली.  पॅनेलचे सर्व 19 उमेदवार निवडून आले. रंगधर्मी , नटराज आणि लोकमान्य अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती, परंतु खरी लढत डॉ. सतीश देसाई ,शुभांगी दामले ,निकिता मोघे,मोहन कुलकर्णी,नंदकुमार काकिर्डे   यांच्या रंगधर्मी आणि नटराज या पॅनेल मध्ये होईल असे दिसत होते . मात्र नटराज पॅनेलने बाजी मारली.रंगधर्मी पॅनेलच्या दिग्गजांना हार पत्करावी लागली.मेघराज  भोसले, विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, प्रकाश पायगुडे, जयमाला इनामदार, रजनी भट, वृषाली कुलकर्णी असे नटराज पॅनेलचे सर्वच 19 उमेदवार निवडून आले. जयमाला इनामदार यांना अधिक मते पडली.

टिळक स्मारक मंदिर येथे रविवारी बारापर्यंत मतमोजणी सुरू होती. पुणे शाखेच्या 19 जागांसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.  सकाळी ते दुपारी चारपर्यंत एकूण 811 इतके मतदान झाले. त्यानंतर मतमोजणीस सुरूवात झाली. मतमोजणीसाठी दहा टेबल मांडण्यात आली होती. तरीही निकाल लागण्यास रात्रीचे साडे बारा वाजून गेले.  माजी अध्यक्ष सतीश देसाई यांच्या रंगधर्मी आणि प्रदीपकुमार कांबळे यांच्या ‘ लोकमान्य’ पॅनेलला हार पत्करावी लागली.

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0
विविध संघटनांची मागणी; आमरण उपोषण आणि उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा
पुणे : शहरातील जुना बाजारजवळील शाहीर अमर शेख चौकात लोखंडी होर्डिंग कोसळून झालेला अपघातामध्ये चार निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले आहेत, तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेले पुणे महानगर पालिकेचे अधिकारी, ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, रेल्वे अधिकारी, होर्डिंग मालक आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शहरातील सामाजिक संघटनांनी केली आहे. त्याचबरोबर येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत शहरातील लोखंडी व इलेक्ट्रॉनिक होर्डिंग काढून टाकावेत, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे देण्यात आले असून, येत्या 23 ऑक्टोबरपर्यंत या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही, तर आमरण उपोषण आणि उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) वाहतुक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली एकूण 12 संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये भारत बहुजन ग्रुप, अखिल बंजारा सेवा संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष (युवक), माथाडी कामगार सेना, दलित पँथर, कैकाडी समाज युवक संघटना, लहुजी शक्तीसेना, ओमसाई प्रतिष्ठान, दिव्य लहुजी सेवा संघटना, सम्यक क्रांती मोर्चा, रिपब्लिकन कामगार सेना, पतित पावन संघटना यांचा समावेश आहे. अजीजभाई शेख, अ‍ॅड. मुकेश शहारे, सागर जाधव, नितीन भालेराव, अतुल कांबळे, समीर राठोड, संदीप सोनवणे, किशोर कांबळे, बाबासाहेब नागटिळे, विराज अवधुते, उमेश कोकरे, किरण जाधव, कृष्णा साळुंके, संदीप सकट स्वप्नील आरणे यांच्या उपस्थितीत हे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना देण्यात आले. दोघांनीही निवेदन स्वीकारुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले आहे.

पुणे महापालिकेचा ४२ वा प्रभाग ; लोहगाव व मुंढवा,हडपसर,फुरसुंगीची मतदारसंख्या सर्वाधिक

0

नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर; दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले
पुणे-नव्याने समाविष्ट ११ गावांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहणार असून महिलांसाठी एक जागा राखीव असेल. लोहगाव व मुंढवा, हडपसर, फुरसुंगीची मतदारसंख्या सर्वाधिक असल्याने लोहगाव व मुंढवा, हडपसर, फुरसुंगीच्या मतदारांचे प्रभागावर वर्चस्व राहणार आहे. फुरसुंगी-लोहगाव या या विचित्र प्रभाग रचनेवर १२ ऑक्टोबर पर्यंत हरकती/सूचना मागवण्यात येणार असून १७ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यात येणार आहे तर अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबर २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेनुसार या प्रभागाची लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे.
“फुरसुंगी-लोहगाव” पुणे महापालिकेचा ४२ वा प्रभाग असणार आहे दोन सदस्यांचा हा प्रभागातून एक महीला प्रतिनिधित्व करू शकणार आहे. दोन्हीही सदस्य सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील समाविष्ट भागाप्रमाणे चतुर्सिमा दर्शविण्यात आल्या आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा गावांमधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही. दरम्यान, या वाढीव हद्दवाढीसाठी प्रभाग रचना तयार करणे गरजेचे असल्याने पालिका प्रशासनाने त्यासाठी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. हापालिकेने केलेल्या पत्रव्यवहारानुसार निवडणूक आयोगाने या समाविष्ट परिसरासाठी दोन सदस्यांना परवानगी दिली आहे. या दोन सदस्यांचा एक प्रभाग तयार करण्यात यावा, असेही आयोगाने स्पष्ट केल्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यांत ही गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.

विचित्र प्रभाग रचनेस विरोध;सर्व गावांचा समावेश केल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी
समाविष्ट 34 गावांच्या निवडणुका एकत्रितपणे घ्याव्यात अशी मागणी हवेली तालुका कृती समितीने केली आहे. फक्त ११ गावामध्ये निवडणुका घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे धायरी येथील समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. समाविष्ट ११ गावांच्या प्रभाग रचनेनुसार धायरी व इतर लगतच्या भागातून अल्प मतांमुळे लोकप्रतिनिधीत्व निवडून येऊ शकणार नाही. नव्या प्रभाग क्र ४२ मध्ये लोहगाव व मुंढवा,हडपसर, फुरसुंगी भागाचे वर्चस्व राहणार असून समावेश झालेला भागातील लोकप्रतिनिधीना राजकीय लाभ मिळणार नसल्याचे प्रभाग रचनेवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान महापालिका हद्दीत चौतीस गावांचा समावेश करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. या पार्श्वभूमीवर या गावांच्या समावेशाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी अकरा गावे महापालिका हद्दीत घेणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने न्यायालयात सादर केले होते. ‘उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पूर्णत: महापालिका हद्दीत घेण्यात आली आहेत. लोहगांव, साडेसतरा नळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे महापालिका हद्दीमध्ये अंशत: समाविष्ट करण्यात आली होती.उर्वरित तेवीस गावांचा समावेश करताना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, घनकचरा व्यवस्थापन, प्रस्तावित वर्तुळाकार मार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचा विचार करण्यात येईल आणि तीन वर्षांत त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल,’ असे राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.उरुळी देवाची, फुरसुंगी, लोहगांव (उर्वरित), शिवणे (उत्तमनगर), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगांव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री आणि धायरी या गावांचा समावेश करण्यात आला होता. तर अजून तेवीस गावांच्या समावेशाची प्रतीक्षा आहे. महापालिका हद्दीत गावांचा समावेश करावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर आणि जगदीश मुळीक आग्रही होते. पालकमंत्री गिरीश बापट यांचा मात्र गावांच्या समावेशाला विरोध होता. त्यामुळे ही गावे टप्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील काही गावे या आमदारांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांची आग्रही भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गावांच्या समावेशाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सादर केल्यामुळे अकरा गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याची अधिसूचना काढण्यात आली. मात्र उर्वरित तेवीस गावांच्या समावेशासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित तेवीस गावांच्या समावेश केल्यानंतर पुन्हा सुधारीत प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रभाग संख्येत वाढ होऊन नगरसेवकांची संख्या देखील १० ते 15 ने वाढ होईल. महापालिकेचे क्षेत्रफळाच्या आकारात मोठ्या प्रमाणत वाढ होऊन महापालिकेचे देखील विभाजन सरकारच्या विचारात आहे. आगामी काळात या बदलाचा परिणाम राजकारणावर निश्चितच होईल.

युएसके फाउंडेशनने स्वीकारली समृद्धी व समर्थच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी!

0

तातडीची मदत म्हणून एक लाखाची मदत-

डॉ. उषा काकडेंकडून होर्डिंग कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शिवाजी परदेशींच्या कुटुंबियांचे सांत्वन-

पुणे: होर्डिंग कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांची बारावी विज्ञान शाखेत शिकणारी समृद्धी व चार वर्षांचा समर्थ आई-वडिलांचे छत्र हरविल्याने अक्षरश: पोरकी झालेत. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच भविष्यातील वाटचालीची गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली असतानाच युएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी पोरक्या झालेल्या या दोन्ही मुलांना मोठा आधार दिला आहे. तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश समृद्धी व तिच्या आजीकडे सुपूर्त करतानाच या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे डॉ. उषा काकडे यांनी यावेळी सांगितले.

आईच्या अस्थि विसर्जन करून येत असलेल्या वडिलांवर गेल्या शुक्रवारी होर्डिंग कोसळून काळाने घाला घातला, वडील शिवाजी परदेशी यांचा यामध्ये मृत्यू झाला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. समृद्धी बारावी विज्ञान शाखेत शिकत असून तिचा भाऊ समर्थ हा अवघा चार वर्षांचा आहे. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या समृद्धी व समर्थच्या घरात वयस्कर आजी आहे. मणक्यात अंतर पडल्याने त्यादेखील काम करु शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत आलेल्या समृद्धी, समर्थ व तिच्या आजीची युएसके फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांनी आज त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश देत समृद्धी व समर्थच्या पुढील संपूर्ण शिक्षणाचा खर्च आपण करु असे सांगून त्यांना धीर दिला.

लहानग्या समर्थला आपल्या आई-वडिलांचे नेमके काय झाले आहे हे समजत नाही. तो वारंवार आई-वडील कोठे गेलेत? ते घरी कधी येणार आहेत? असे प्रश्न करीत असतो. डॉ. उषा काकडे यांच्या भेटीवेळी देखील त्याच्या चेहऱ्यावरील भाव उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारेच होते. डॉ. उषा काकडे यांनी त्याला कडेवर घेत त्याला धीर दिला. तसेच, यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण आली तर, माझ्याशी संपर्क साधा असेही डॉ. उषा काकडे यांनी समृद्धी व तिची आजी रुख्मिणी यांना सांगितले. भाजपचे माजी नगरसेवक मनीष साळुंके यांनी या भेटीचे नियोजन केले होते.

टेबल टेनिस महिला गटात मनिका बात्रा, पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरकर, सुतीर्था मुखर्जी यांची आगेकूच

0

पुणे- सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटात मनिका बात्रा, पूजा सहस्त्रबुद्धे-कोपरकर, सुतीर्था मुखर्जी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात पहिल्या फेरीत ठाण्याच्या दिपित पाटीलने छत्तीसगडच्या तनिमय दास चौधरीचा 3-0(11-6, 11-9, 11-6)असा एकतर्फी पराभव करून दुसरी फेरी गाठली. मुंबईच्या रेगन अलबुकरने उत्तर प्रदेशच्या अभिनव बेलवालचा 3-1(8-11, 13-11, 13-11, 11-6)असा पराभव करून आगेकूच केली. मंदार हार्डीकरने कडवी झुंज देत  पीएसपीबीच्या अनुक्रम जैनचा 3-2(8-11, 10-12, 11-5, 11-4, 11-6)असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. उत्तरप्रदेशच्या सार्थक सेठने कर्नाटकच्या श्रेयस कुलकर्णीचे आव्हान 3-1(9-11, 11-5, 11-7, 11-9)असे मोडीत काढले.

महिला गटात दुसऱ्या मानांकित पीएसपीबीच्या
मनिका बात्रा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दिल्लीच्या वंशिका भार्गवाचा 4-0(11-9, 11-6, 11-4, 12-10)असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. अतितटीच्या झालेल्या लढतीत अव्वल मानांकित हरियाणाच्या सुतीर्था मुखर्जीने देना बँकेच्या ममता प्रभूचा 4-3(13-11, 6-11, 11-7, 4-11, 9-11, 12-10, 11-8)असा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. पीएसपीबीच्या तिसऱ्या मानांकित पूजा सहस्त्रबुद्धे कोपरकरने तामिळनाडूच्या शानमती सत्यमूर्तीचा 4-0(11-5, 11-2, 11-8, 11-7)असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: पुरुष गट: 
मंदार हार्डीकर(महाराष्ट्र ब) वि.वि अनुक्रम जैन(पीएसपीबी)3-2(8-11, 10-12, 11-5, 11-4, 11-6)
भावेश आपटे(महाराष्ट्र ब) वि.वि जयदिप दास(आयए ऑड एडी) 3-0(11-9, 11-9, 11-8)
चिन्मय सोमय्या (महाराष्ट्र ब) वि.वि संतोष अरास्विली(छत्तीसगड) 3-2(7-11, 11-8, 8-11, 11-4, 11-9)
मार्तंड बिनिवाले(महाराष्ट्र अ) वि.वि रोहन जोशी(मध्य प्रदेश) 3-0(13-11, 11-7, 11-9)
रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) वि.वि अभिनव बेलवाल(उत्तर प्रदेश) 3-1(8-11, 13-11, 13-11, 11-6)
दिपित पाटील(महाराष्ट्र अ) वि.वि तनिमय दास चौधरी(छत्तीसगड) 3-0(11-6, 11-9, 11-6)
असिफ हक(आरबीआय) वि.वि शुभम अंब्रे(महाराष्ट्र अ) 3-1(13-11, 10-12, 5-11, 11-6)
सुरजीत दास(ईएसआयसी) वि.वि रवी जोशी(एलआयसी) 3-1(11-8, 11-8, 4-11, 11-5)
सौरव साहा(हरयाणा) वि.वि सनत बोकील(महाराष्ट्र ब) 3-0(11-5, 11-3, 11-4)
जिग्नेश जैस्वाल(गुजरात) वि.वि बालकृष्णन भारत कृष्णन(आरबीआय) 3-2(11-3, 11-3, 8-11, 10-12, 11-5)
सार्थक सेठ(उत्तर प्रदेश) वि.वि श्रेयस कुलकर्णी(कर्नाटक) 3-1(9-11, 11-5, 11-7, 11-9)
सौवीक कर(आरएसपीबी) वि.वि राजेश रामनाथन(एलआयसी) 3-2(14-16, 7-11, 11-5, 11-4, 11-4)
सोहम भट्टाचार्य(सीबी) वि.वि शाश्वत सलाम(आयए ऑड एडी) 3-1(11-6, 11-9, 9-11, 11-5)
तोशीफ हक(ईएसआयसी) वि.वि केवल मकवाना(गुजरात) 3-0(11-4, 11-6, 11-7)
श्रेयाल तेलंग(कर्नाटक) वि.वि तन्मय राणे(महाराष्ट्र ब) 3-0(11-4, 11-5, 11-6)
सुभाष मानी(आयए अँड एडी) वि.वि झुबीन तारापोरेवाला(महाराष्ट्र अ) 3-1(11-8, 7-11, 11-2, 11-2)

पहिली फेरी: महिला गट: 
मनिका बात्रा(पीएसपीबी)वि.वि.वंशिका भार्गवा(दिल्ली) 4-0(11-9, 11-6, 11-4, 12-10);
सुतीर्था मुखर्जी(हरियाणा)वि.वि.ममता प्रभू(देना बँक) 4-3(13-11, 6-11, 11-7, 4-11, 9-11, 12-10, 11-8);
पूजा सहस्त्रबुद्धे कोपरकर(पीएसपीबी)वि.वि.शानमती सत्यमूर्ती(तामिळनाडू) 4-0(11-5, 11-2, 11-8, 11-7);
मधुरिका पाटकर(पीएसपीबी)वि.वि.प्रणिता गर्लपट्टी(तेलंगणा) 4-0(11-6, 12-10, 11-6, 11-3);
शैलू नुर्बाशा(आंधरप्रदेश)वि.वि.स्वस्तिका घोष(महाराष्ट्र ब) 4-2(9-11, 6-11, 11-4, 11-9, 13-11, 11-6)

गांधी भवन मध्ये गाजला मानवतावादी ‘ सुफी दरबार

0
पुणे :एकाहून एक सरस सुफी रचना सादर करून पवन श्रीकांत नाईक यांच्या ग्रुपने ‘ सुफी दरबार ‘ कार्यक्रम गांधी भवन येथे गाजवला !
सुफी वेशातील प्रामुख्याने हिंदू युवकांनी या रचना सादर करून सर्वांना गानसमाधीची अनुभूती दिली.
हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी गांधीभवन येथे झाला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अल्लाह अल्लाह,मरहबा या मुस्तफा या ‘ जिक्र’ प्रकारातील रचनांनी त्यांनी प्रारंभ केला. ‘ये नाझ, ये अंदाज ‘ , ‘ बेखुद किये देते है ‘, झुले झुलेलाल, किन्ना सोणा अशा एकाहून एक बहारदार सुफी रचनांनी हा सुफी दरबार सजला.
संवादिनीवर कल्याण मुरकुटे, नरसिंग देसाई, पंकज नाईक, स्मिता राणा ( सतार ), कुलदीप चव्हाण ( बेन्जो ), हर्षद भावे ( तबला ) यांनी साथसंगत केली.
पवन नाईक यांना गायकीत डॉ. रिझवान शेख, नवरतन वर्मा, संकेत गांधी, मुलांशू परदेशी, उध्दव म्हस्के, अविनाश तिजोरे, पवन तळेकर, हरीश कुटे, श्रयस शिंत्रे, उज्ज्वला कुलकर्णी, राधिका परदेशी, यांनी साथ दिली.
वीणा दिघे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
‘ सुफी विचार  ईश्वर आणि माणूस यातील अंतर कमी करते, आणि प्रेमभाव निर्माण करतो. हा संप्रदाय लोकांना जोडतो ‘ असे अन्वर राजन यांनी प्रास्ताविकात सांगीतले.यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, संदीप बर्वे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध सामाजिक संस्थांना १८०० ० किलो मोफत धान्य वाटप

0

पुणे-जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक आयोजित युवाचार्य महेंद्रऋषीजी  व उपाध्यय प्रवर.प्रविणऋषीजी  . यांच्या जन्मदिवसानिमित्त ६० विविध सामाजिक संस्थांना १८०० ० किलो मोफत धान्य वाटप सौ. प्रमिला नौपतलाल सांकला  चॅरिटेबल ट्रॅस्टच्या अध्यक्षा समाजभूषण प्रमिलाबाई नौपतलाल सांकला यांच्याहस्ते  करण्यात आले . महर्षीनगरमधील महावीर प्रतिष्ठानच्या सभागृहात हे मोफत धान्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी आगमवेता साध्वी श्री वैभवश्रीजी. यांनी आशीर्वचन दिले . व सामाजिक करणाऱ्या संस्थांबद्दल गौरवद्गार काढले . अशा सामाजिक  सेवा करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा करीत आहे . समाजाने देखील यात पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला पाहिजे . असे आगमवेता साध्वी श्री वैभवश्रीजी यांनी सांगितले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण विजयकांत कोठारी , बी. जे. भंडारी ट्रस्टच्या ट्रस्टी सुश्राविका विमलबाई बंडूलालजी भंडारी , सुश्राविका संगिताबाई प्रमोदजी छाजेड  , महावीर फूड बँकेचे  संस्थापक प्रा. अशोक पगारिया , पुणे शाखा अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा , जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा , कार्याध्यक्ष विजय पारेख , खजिनदार संजय कटारिया , सेक्रेटरी प्रमोद छाजेड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

यामध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील सामाजिक  ,कर्ण बधीर ,  अंध , अपंग , वृध्दाश्रम , कर्करोग काम करणाऱ्या अशा  ६०  सामाजिक संस्था मोफत धान्य वाटप करण्यात आले . यामध्ये १०० किलो गहू , १०० किलो तांदूळ , ४० किलो पोहे , १० किलो रवा ,२० किलो  साखर , चहा ५ किलो , १० किलो तूरडाळ, ५ किलो मुगडाळ , ५ किलो तेल , ५ किलो गूळ आदी वाटप करण्यात आले .

समाजात अनेक सामाजिक संस्था काम करतात परंतु या सामाजिक संस्थांमधील मुलांची भूक भागविण्याचे काम जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँक हे मोफत धान्य वाटप करीत असतात वर्षातून दोनदा हे धान्य वाटप केले जाते . यासाठी जय आनंद ग्रुप व महावीर फूड बँकचे सर्व सदस्य मनापासून या सामाजिक उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतात .  गेली १५ वर्षापासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो . अशी माहिती महावीर फूड बँकेचे पुणे शाखा अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा यांनी दिली . 

गांधीजींची हत्या फाळणीच्या कारणाने झालेली नाही – संजय सोनवणी

0
आरएसएस हिंदुंचा नाही वैदिकांचा .. 
पुणे-महात्मा गांधी यांची  हत्या हि देशाच्या फाळणीच्या कारणाने झाल्याचा गैरसमज पसरविला गेला आहे ,मात्र खरे कारण ते नाही ,जर फाळणीच्या कारणाने गांधी हत्या झाली असती तर ,जीनांची देखील हत्या झाली असती ,पण केवळ गांधी हिंदू होते आणि हिंदू च्या हाती देशाचे नेतृत्व जाते आहे म्हणून वैदिकांनी त्यांची हत्या केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदु धर्माचे नव्हे तर वैदिक धर्माचे प्रतिनिधित्व करतो.हे येथील हिंदूंनी समजून घेतले पाहिजे असे मत  इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी येथे व्यक्त केले. ते आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “आरएसएसचा वैदिकवाद- हिंदू एकत्रीकरणातील मुख्य अडसर” या विषयावरील पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या व्याख्यानात बोलत होते.
ते म्हणाले,’पुरुषप्रधान जन्माधारित विषमतेच्या वैदिक तत्वज्ञानाचा पुरस्कार संघ करत आला आहे. राजसत्तेवर धर्मसत्तेचे वर्चस्व असले पाहिजे हा संघ-तत्वज्ञानाचा गाभा राहिलेला आहे. संघाचा राष्ट्रवाद हा हिंदु नसून वैदिक राष्ट्रवाद आहे. हिंदुंचा धार्मिक व सांस्कृतीक इतिहास हा सर्वस्वी वेगळा राहिलेला असुन त्याचा वैदिक धर्माशी काहीही संबंध नाही. हिंदुंचा कधी ढाल तर कधी शस्त्र म्हणून वापर करत संघाने वैदिकत्व जपले आहे. हिंदुंनी संघापासुन सावध रहायला हवे
ब्रिटिशकालात वैदिक आणि हिंदु या दोन धर्मांना एकच समजण्याची गफलत झाल्याचा गैरफायदा संघाने उचलला. आर्य सिद्धांताला वैदिकांनी उचलुन धरले. रामालाही त्यांनी आर्य मानत तो दक्षीण भारतावरचा पहिला आक्रमक व वैदिक संस्कृती तेथे नेणारा म्हणून संघाने रामाला उचलुन धरले व राम मंदिराचा चर्चेने सुटु शकणारा विषय उग्र करत देशात हिंसाचाराला निमंत्रण दिले. संघप्रणित सरकार ्सत्तेत आल्यापासुन वैदिक संस्कृतीचे महात्म्य व सिंधु संस्कृती वैदिक आर्यांचीच निर्मिती आहे असे ठसवण्याचे शासकीय पातळीवर जोमाने प्रयत्न सुरु झाले. हिंदुंचा आर्थिक, सामाजिक व राजकीय इतिहास संघाच्या दृष्टीने बिनमह्त्वाचा ठरला. लोहार, वडार, सुतारांसारख्या अनेक व्यावसायिक हिंदू जातींनी साधलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल मात्र मुग गिळून बसले. प्रत्यक्षात “वैदिकत्व” जपत “हिंदुत्व” हे नांव स्वार्थासाठी त्यांनी वापरले असेही सोनवणी म्हणाले.
वैदिक धर्मियांनी आपली पाळेमुळे शोधण्यासाठी गेली दिडशे वर्ष आटापिटा चालवला आहे. हिंदुंना संघाच्या वैदिकत्वापासुन फारकत घेत आपला राजकीय, सामाजिक व आर्थिक इतिहास स्वतंत्रपणे शोधला पाहिजे, अन्यथा वैदिकांचे फुट सोल्जर अशीच त्यांची ओळख राहील आणि न्युनगंडातच जगावे लागेल असेही सोनवणी अनेक मुद्द्यांना हात घालत म्हणाले.
सतीश पानपत्ते यांनी प्रास्ताविकात आदिम हिंदु महासंघाच्या स्थापनेमागील कालसुसंगत हिंदुहितवादी भुमिका स्पष्ट केली आणि हिंदुंना आत्मभान देण्यासाठी या संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले.

दळवी मेमोरिअल करंडक टेनिस स्पर्धेत अरमानी नलावडे, अभय नागराजन यांना विजेतेपद

0

पुणे- ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित  व एमएसएलटीएच्या मान्यतेखाली पीसीआय/एपीआय ओम दळवी मेमोरिअल 10 वर्षाखालील करंडक टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात अरमानी नलावडे हिने, तर मुलांच्या गटात अभय नागराजन या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबईच्या चौथ्या मानांकित अरमानी नलावडेने अव्वल मानांकित पुण्याच्या देवांश्री प्रभुदेसाईचा 3-5, 4-2, 4-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अभय नागराजनने सहाव्या मानांकित अर्चित धुतचा 4-2, 4-0असा पराभव करून विजेतेपद मिळवले. अभय हा जीआयएस केम्बरीज स्कुलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून पोलीस रिसर्च सेंटर येथे प्रशिक्षक सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील गटातील तिसरे विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीसीआय/एपीआयचे संचालक भगवानदास अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मारुती राऊत आणि सुपरवायझर प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
अभय नागराजन(1)वि.वि.देव तुराकिया(5)6-0;
अर्चित धुत(6) वि.वि. शार्दुल खवळे 6-5(7-3);
अंतिम फेरी: अभय नागराजन(1)वि.वि.अर्चित धुत(6) 4-2, 4-0;

10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
देवांश्री प्रभुदेसाई(1)वि.वि.पार्थसारथी मुंडे(3) 6-4;
अरमानी नलावडे(4)वि.वि.भक्ती मैन्दरकर 6-2;
अंतिम फेरी: अरमानी नलावडे(4)वि.वि. देवांश्री प्रभुदेसाई(1)3-5, 4-2, 4-1.

पीएमआरडीए आयोजित कार्यशाळेच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकासकामे पोहचणे सोपे – आमदार संग्राम थोपटे

0

अनधिकृत बांधकाम प्रतिबंध, नियंत्रण निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना , बांधकाम परवानगी कार्यशाळा  
पुणे– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडए) आयोजित अनधिकृत बांधकाम प्रतिबंध, नियंत्रण निष्कासन व प्रधानमंत्री आवास योजना व बांधकाम परवानगीच्यावतीने आयोजित कार्यशाळेत रीतसर बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई व आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरे बांधण्यास अनुदान (बीएलसी) स्वरूपातील सर्वेक्षण व माहिती उपस्थित कार्यशाळेच्या माध्यमातून वेल्हा तालुक्यातील ग्रामस्थांना देण्यात आली.

हि  कार्यशाळा आज वेल्हेतील कोंढावळे येथील लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी आमदार संग्राम थोपटे, पंचायत समिती सभापती संगीता जेधे, उपसभापती दिनकर सरपाले, पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, गटविकास अधिकारी मनोज यादव, तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी पंचायत समिती सभापती सीमा राऊत, सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘पीएमआरडीए विकासाच्या दृष्टिकोनातून नेमके काय करते याची माहिती नागरिकांना असणे गरजेचे आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तळागाळाच्या जनतेपर्यंत विकासकामे पोहचत आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग जोडण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. पीएमआरडीए हे नियोजन करणारे प्राधिकरण आहे.
पंतप्रधान आवास योजना उत्कृष्ट आहे, त्यासाठी वेल्हे तालुक्यात होणाऱ्या घरकुलांसाठी एक कार्यशाळा राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे गायरान जागा विकासासाठी शासनाने उपलब्ध करून दयाव्यात. वेल्हे जोड़ रस्त्यांची कामे पीएमआरडीएच्या माध्यमातून राबविली जावीत असे आमदार थोपटे यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मिलिंद पाठक म्हणाले की, ‘वेल्हा तालुक्यात रहिवासी नसलेले नागरिक विनापरवानगी सदनिका बांधण्याचे काम करीत आहेत. अनधिकृत बांधकामांना आळा बसायला हवा. नागरिकांनी बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांची माहिती तहसीलदार, ग्रामसेवक, व पोलीस पाटलांनी वेळोवेळी पीएमआरडीएला द्यावी. ‘

जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी कार्यशाळा सादरीकरणाच्या माध्यमातून पीएमआरडीए बांधकाम परवानगी कशा प्रकारे देते तसेच अनधिकृत बांधकाम नागरिकांनी केल्यास नेमके कोणत्या निकषांनुसार कारवाई केली जाणार आहे याविषयी माहिती दिली. वेल्हा हा झपाट्याने नागरीकरण व विकसित होणारा भाग असल्याने येथील गावठाण हद्द व झोन बदलाची माहिती नागरिकांना हवी. नागरिकांच्या सोयीसाठी नसरापूर येथे लवकरच पीएमआरडीएचे कार्यालय होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना हि आर्थिक दुर्बल घटकांसाठी फायदेशीर व परवडणारी आहे. त्यासाठी अनुदान कशा स्वरूपात उपलब्ध होणार आहे याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वेल्हा ग्रामस्थांच्या  शंकांचे निरसन करण्यात आले.

लक्ष्मण जगतापांचे धाबे दणाणले -शेवटपर्यंत भाजपतच राहणार म्हणाले …

पुणे–काय झाले कोणास ठाऊक, पिंपरी चिंचवड च्या राजकारणातील ‘टायगर’म्हणून ओळख असणाऱ्या आ. लक्ष्मण जगताप यांचे कशामुळे धाबे दणाणले ,याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे ,त्याला कारण हि तसेच घडले आहे , शेवट पर्यंत भाजपमध्येच राहील ‘ असे स्पष्टीकरण ते करू लागले आहेत . यामुळे राजकीय वर्तुळात  चर्चा सुरु झाली ,’ काय झाले ,कशामुळे दणाणले धाबे ?’ असा सवाल होऊ लागला आहे .अंदर तो अपनी मार्जीसे आवोगे ,मगर जावोगे ..नही.. या  फिल्मी डॉयलॉगचा  देखील आता जगताप यांच्या स्थितीमुळे चर्चेत उल्लेख होवू लागला आहे .
आमदार जगताप पुन्हा राष्ट्रवादीत जाऊन मावळातून निवडणूक लढविणार – अशा वृत्तानंतर त्यांच्यावर याबाबत प्रसिध्दीपत्रककाढण्याची वेळ आली आहे. या पत्रकात नमूद केले आहे की, मी यापुढे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपामध्येच राहून भाजपासाठीच शेवटपर्यंत कार्यरत राहणार आहे. माझ्या या पुढच्या सर्व निवडणुकाही मी भाजपातर्फेच लढणार आहे. त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी आणि अन्य पक्षही हद्दपार झाले आहेत. त्यामुळेच विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थतेतूनच माझ्या विरोधात अशा अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. माझ्या विरोधकांनी सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी अशा काही चुकीच्या सर्व्हेंचा आधार घेतला आहे. चुकीचा प्रचार आणि प्रसार करणे त्यांचा नित्याचाच ‘उद्योग’ आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही विरोधकांची ही खेळी माहीत झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्याच जोरावर भाजपाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपाला पोहचविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मी भाजपामध्ये शेवटपर्यंत राहणार असून यापुढच्याही सर्व निवडणुका भाजपातर्फेच लढविणार असल्याचे आमदार जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
राष्ट्रवादीकडून नगरसेवक स्थायी समीतिचा अध्यक्ष ,महापौर ,आमदार अशी पदे भूषवून सध्या भाजपसारख्या पक्षात जाऊन त्यांनी आपल्या पूर्वीच्याच नेत्यांना गेल्या निवडणुकीत शह दिला असला तरी ,’ आता मात्र त्यांनी पुन्हा पुन्हा कोणालाही शह द्यावा ,अशी स्थिती उरली नसावी म्हणून त्यांच्यावर असे पत्रक काढण्याची वेळ आली असावी असे भाजप मधील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड मधील राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन
– चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मावळमधून लढविण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.
– शिवसेनेशी युती झाल्यास विद्यमान खासदार म्हणून सेनेकडे मावळ लोकसभा कायम राहील.
– मावळ लोकसभा मतदारसंघात आमदारांचे संख्याबळही भाजपचे मित्रपक्षापेक्षा मावळमध्ये अधिक आहे. पिंपरी-चिंचवडसह पनवेल या मतदारसंघातील महापालिका व वडगाव मावळ आणि लोणावळा नगरपरिषद पक्षाच्या ताब्यात आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या मावळवर भाजपचा दावा युती होण्याच्या दृष्टीकोनातून टिकणारा नाही.
– भाजप-सेना युती झाल्यास सेनला मतदारसंघ गेल्यावर मावळमधून भाजपकडून लढविण्याची इच्छा आमदार लक्ष्मण जगताप यांना सोडून द्यावी लागेल.
– गेली 14 वर्षे आमदार असलेले लक्ष्मण जगताप मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील त्यांची पहिलीच टर्म आहे. जिल्ह्यातून मावळ विधानसभेचे आमदार भेगडे भाजपमधून सलग ३ वेळा निवडून आलेले आहेत. भेगडे देखील मंत्रिपदाचे हक्कदार आहेत. तर अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री यांच्या जवळचे मानले जातात, पालिकेतील महापौरपदी समर्थकांची निवड करून वर्चस्व सिद्ध केलेले असून ते देखील महामंडळ अथवा मंत्रिपदाचे दावेदार आहेत.
– आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या समर्थकांना पालिकेतील प्रमुखपदी/महापौरपदी नियुक्ती करता आलेली नाही.
– मंत्रिपदाचे प्रबळ हक्कदार आहेत परंतु भाजपमधील निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत त्यांचा समावेश होत नाही.
– आझम पानसरे स्थायी समिती अध्यक्ष, महापौर झाले पण त्या पुढे त्यांना राजकीय दृष्ट्या अपेक्षित यश मिळाले नाही. महापालिका विजयात महत्वाचा वाटा उचलला असताना ही आझम पानसरे यांच्यावर भाजाप मध्ये ही अन्याय होतो आहे ही भावना समर्थकांमध्ये आहे. आझम पानसरे देखील चांगल्या पदाचे आशावादी आहेत. त्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनाही काहीही देता आले नाही याचे देखील शल्य राहणारच.
– २०१४ निवडणुकपूर्व भाजपमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार मंत्रिमंडळ प्रतिक्षेत आहेत तसेच यांना महामंडळही दिलेले नाही-
डॉ. अनिल बोंडे, डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्र पाटणी, किसन कथोरे, डॉ. सुनील देशमुख, स्रेहलता कोल्हे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, प्रकाश भारसाकळे, अमल महाडिक, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रशांत ठाकूर, संजय सावकारे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हे भाजपात बाहेरून आलेले आमदार आहेत. यापैकी देशमुख व ठाकूर वगळता कुणालाही मंत्रीपद वा साधे महामंडळदेखील मिळालेले नाही.
– राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. साधारणत: नऊ नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील. त्यात बाहेरून आलेल्यांपैकी किमान दोघांना तरी संधी दिली पाहिजे अशी मागणी आहे तरी देखील भाजपच्या मंत्रिपद निवड प्रक्रियेतील काही निकष/पात्रतेत आमदार लक्ष्मण जगताप व अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा समावेश होत नाही.
– कोणत्याही पक्षात जाणार नाही ; भाजपामध्येच शेवटपर्यंत कार्यरत राहणार असल्याचा आमदार लक्ष्मण जगताप यांचा खुलासा

– वरील सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कोणतेही मंत्रिपद व साधे महामंडळदेखील मिळणार नाही, समर्थकांची महत्वाच्या पदावर निवड करून घेता येत नाही, जागा वाटपात भाजपला मावळ लोकसभा मिळाला नाही तर खासदारकी लढविण्याची इच्छा पूर्ती करता येणार नाही, लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार सोडून द्यावा लागेल. महापालिकेतील एक हाती सत्ता केंद्र नाहीं, या सर्व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करणे आवश्यक आहे असे काही जाणकारांचे मत आहे.

कोथरूड नवरात्र महोत्सवात यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

0

पुणे-क्रिएटिव्ह फौंडेशन व कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने गत बारा वर्षे आयोजित केल्या जाणाऱ्या कोथरूड नवरात्र महोत्सवास दिनांक १० ऑक्टोबर ला घटस्थापनेने प्रारंभ होत असून अनेक दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.यावेळी महोत्सवाच्या सह संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,उत्सव प्रमुख विशाल भेलके व उमेश भेलके उपस्थित होते.घटस्थापना ही कोथरूड मधील डी पी रस्त्यावर शिवतारा गार्डन समोर होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

दिनांक १२ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून यावेळी सांस्कृतीक क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल संवाद चे सुनिल महाजन व निकिता मोघे यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.पुलं गदिमा आणि सुधीर फडके ह्या अजरु त्रयीच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या रचनांवर आधारित “लेणे प्रतिभेचे” हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.या कार्यक्रमाचे संयोजन सुनिल महाजन यांचे असून संजीव मेहेंदळे,योगिता गोडबोले व प्रतिभा थोरात यांच्या गायकी चा आविष्कार ऐकायला मिळणार आहे.
शनिवार १३ ऑक्टोबर रात्रौ ९ वाजता प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे व हेमंत बर्वे यांचा स्वतंत्रते भगवती हा कार्यक्रम सादर केला जाईल.महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या दोघांना सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवार १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सहकुटुंब पहावा असा दर्जेदार लावण्यांचा कार्यक्रम ” तुमच्या साठी काय पण ” सादर केला जाईल.
मंगळवार १६ ऑक्टोबर रोजी बालजत्रा,बुधवार १७ ऑक्टोबर रोजी तृतीयपंथीयांच्या हस्ते वाघजाई देवीची आरती व त्यांना साडी वाटप असा कार्यक्रम होइल तर गुरुवार १८ ऑक्टोबर रोजी मंगळागौर,दांडिया व भोंडल्याचा कार्यक्रम होइल.असे संदीप खर्डेकर,विशाल भेलके व उमेश भेलके यांनी सांगितले.मंगळवार २३ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेस दांडिया व दुग्धपान कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होइल.
हे सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार असून सर्व कार्यक्रम मोफत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.मोफत प्रविशिकेसाठी रसिकांनी संदीप खर्डेकर ९८५०९९९९९५ , विशाल भेलके ९०११०२३०२३ ,उमेश भेलके 9890154050,या क्रमांकावर संपर्क करावा असे ही त्या म्हणाल्या.