पुणे-न्यू इंग्लिश स्कूल-रमणबाग प्रशालेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष . शरद कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रीडा प्रकल्पाअंतर्गत कि‘केट कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस व विविध मैदानी स्पर्धा या खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता वाढावी तसेच उत्तमोत्तम खेळाडू तयार व्हावेत हा या क्रीडा प्रकल्पाचा हेतू आहे. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. तिलोत्तमा रेड्डी, उपमुख्याध्यापिका श्रीम. जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक श्रीम. कोलते व फर्ग्युसन महाविद्यालयाचे फीजिकल डायरेक्टर गौतम सोनावणे, सचिन गाडगे तसेच रमणबाग प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्रीम. पांढारकर उपस्थित होते.
रमणबाग प्रशालेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रकल्पाचे उद्घाटन
कोंढवा पोलिस निरीक्षकाच्या बदली विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे आंदोलन
पुणे – भाजपाचे आमदारावर 50 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनंतर पोलीसांनी सर्व तपास करुन आमदारावर व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु, सत्ताधारी भाजपने या प्रकाराचा योग्य तपास करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची बदली केली. अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील व कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यानी पारदर्शक कारभार करावा पुण्यातील भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्याचा पोलिसांच्या कार्यपध्दतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची या प्रकाराला मुक समंती आहे, खंडणीखोरांना व गुन्हेगारांना पाठिशी घालतात, अशी पुणेकरांची भावना आहे. मुख्यमंत्र्याकडे गृहखाते असल्याने त्यांनी पारदर्शकपणे या प्रकरणाचा तपास करावा पुणेकरांच्या मनातील शंका दूर करावी.
त्यानंतर भाजपाने सत्तेचा गैरवापर चालवला असून भाजप आमदारावर व त्याच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल होउन देखील ते मोकाट फिरत आहे. त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे महिलांनी बोलताना सांगितले.
यावेळी नगरसेविका नंदा लोणकर, नितिन कदम, अभय छाजेड, बापू पठारे, प्रशांत जगताप, राकेश कामठे, भोलासिंग अरोरा, बापू डाकले, , वनराज आंदेकर, भैय्यासाहेब जाधव आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कॉंग्रेसतर्फे ‘संवाद’ कार्यकर्ता दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
पुणे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व
पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या वतीने चारूज् फार्म, तरवडे चाकण, एम.आय.डी.सी.
लिंक रोड, पुणे येथे दि. २१ व दि. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी दोन दिवसीय ‘संवाद’
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये पदाधिकारी व
कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाची विचारधारा व महत्व याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण
आयोजित केले असून वेगवेगळे तज्ञ, नेते मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातून पहिल्यांदा
पश्चिम महाराष्ट्रात पुणे येथे या शिबीराची सुरूवात होणार आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये
तज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनपर भाषणे, प्रोजेक्टद्वारा माहिती व एकत्रित चर्चा आणि संवाद
असे कार्यक्रमाचे स्वरूप राहणार आहे. सदर शिबीर पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर
एकत्रित होणार असून या नंतर ब्लॉक स्तरावर एक दिवसीय शिबीर होणार आहे. या
शिबीराच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा, पक्षाची ध्येय धोरणे कार्यकर्ता लोकांपर्यंत
पोहचविणार आहे.
या शिबीराचे उद्घाटन दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वा.माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सर्व आजी – माजी
मंत्री, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये
पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे व पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी .
सोनलबेन पटेल यांनी दिली. या पत्रकार परिषदेस म.प्र.काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय
छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, गोपाळ तिवारी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती
मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या सचिव तथा मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष मुकुंद जाधवर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची राज्य स्थरीय बैठक पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे नुकतीच झाली असून दरम्यान या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असे सांगून अध्यक्ष जाधवर म्हणाले की, मंत्रालयीन स्थरावरील संघटनेचे काम अधिक सुलभ व्हावे आणि राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्काच्या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून सदर नियुक्ती करण्यात येत आहे असे स्पष्ट केले. दरम्यान मुलाणी म्हणाले की, राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय विविध विभागात आस्थापनेवर व कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असून मंत्रालयीन पातळीवर सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताचे शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आदी साठी मंत्रांकडे सतत पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करणे असे सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले. तसेच मंत्रालयातील अनेक विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांच्या कामाचा समान काम, समान वेतन असा मोबदला मिळत नाही, एकीकडे कंत्राटे घेणाऱ्या खाजगी संस्था आणि दुसरीकडे सरकारकडून या कंत्राटी कर्मचारी घोर फसवणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष मुकुंद जाधवर, कोषाध्यक्ष विकास डेकाडे, उपाध्यक्ष प्रमोद अहिरराव, जिल्हा परिषद आरोग्य संघटना अध्यक्ष अरुण खरमाटे, राष्ट्रीय किसान क्रांती महासंघ समन्वयक संदिप गिड्डे सह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लक्ष्याला समर्पित सोनी मराठीचा लक्ष्मीकांत बेर्डे स्पेशल
तो आला, त्यांनी पाहिलं, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला… आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका ‘लक्ष्या’… दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्या या विनोदाच्या बादशाहाची ची एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती… या कलाकाराला जाऊन तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. २६ ऑक्टोबर १९५४मध्ये जन्माला आलेल्या आणि प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्या या विनोदातल्या अवलियाच्या जन्मतिथीनिमित्त आदरांजली म्हणून, या बादशाहाचे सिनेमे आठवडाभर सोनी मराठी या वाहिनीवरून दाखवले जाणार आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डेसाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमाला ‘विनोदाचा बादशाह लक्ष्या’ हे नाव देण्यात आलं असून या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या धमाल सिनेमांची रंगत प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून २७ ऑक्टोबरपर्यंत रोज दुपारी ३ वाजता प्रेक्षक आपल्या लाडक्या लक्ष्याच्या काही अजरामर कलाकृती पाहू शकणार आहेत. यात ‘एकापेक्षा एक’ ‘चिकट नवरा’ ‘रंग प्रेमाचा’, ‘लपवा छपवी’ ‘इजा, बिजा, तिजा’ आणि ‘बजरंगाची कमाल’ या सिनेमांचा समावेश आहे.
गेली दोन दशकं प्रेक्षकांचं लक्ष्यावरचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही… ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टी गाजवली. याचा प्रभाव एवढा होता की , लक्ष्याच्या हिंदी पदार्पणावेळी ‘लक्ष्या आला रे…!’ चा डंका पिटण्यात आला होता. मराठी हिंदी विनोदी नटांना पुरून उरलेल्या अशा लक्ष्याचे चित्रपट सोनी मराठीवर पाहता येणार आहेत.
तेव्हा रसिकांना हसवण्याचा विडा उचललेल्या लक्ष्याच्या जन्मतिथीनिमित्त आपल्या लाडक्या लक्ष्याच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घ्या २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरमध्ये फक्त सोनी मराठीवर…
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करणार- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे- सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येणार असून या स्वयंसेवकांनी निवडणूकीशी संबंधित कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा उप निबंधक बी. टी. लवंड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण संस्थेचा निवडणूक विषयक कामात सहभाग घेण्याच्या दृष्टिने पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष-सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावरआधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मतदारांची नोंदणी, दुरुस्ती व वगळणी याबाबत कार्यवाही केली जात आहे. गृहनिर्माण संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदार राहत असल्याने त्यांना निवडणूक विषयक कामकाजात सहभागी करुन घेऊन या संस्थांमधील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तेथील गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष किंवा सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक (बूथलेव्हल व्हॉलंटीयर्स) घोषित करण्यात येणार आहे. संस्थेतील नवीन मतदारांची नावे नोंदणी करण्यासाठी आणि संस्थेतील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी व मतदार यादीतील सध्याची नावे, पत्ता व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी व मतदार यादीतील सध्याची नावे, पत्ता व फोटोतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी या स्वयंसेवकांची मदत महत्त्वाची ठरणार आहे. संस्थांकडून आलेल्या यादीनुसार मतदार यादी अद्ययावत झाली किंवा नाही, याचा दर आठवड्याला आढावा घेणार असल्याचेही श्री. राम यांनी सांगितले.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित करुन त्यांना निवडणूक विषयक कामात सहभागी करुन घेण्याचा हा अभिनव उपक्रम प्रथमच राबविला जात असून याला यश येईल,अशी आशा जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केली.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी मतदार यादी अद्ययावत होण्यासाठी हा प्रयत्न असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी- चिंचवड भागातील महत्त्वाच्या भागात बैठका घेण्यात येणार आहेत. शहरात 16 हजार 360 गृहनिर्माण संस्था असून 6 उपनिबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या अखत्यारित मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या 7 दिवसांत मतदारांचे 18 हजार अर्ज प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅकॉर्डियन आणि सिंथेसायझर वादनाची स्वरमधूर सायंकाळ
सई ताम्हणकरने विकत घेतली कुस्ती टीम..आता बोला …
बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मालकीची एखादा खेळाडू संघ असणे, आता नाविन्याचे राहिले नाही, शाहरूख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी ह्या बॉलीवूड स्टार्सच्या आयपीएलमध्ये स्वत:च्या टीम आहेत. तर अभिषेक बच्चनकडे कब्बडी टीम आहे, मात्र आता पहिल्यांदाच एका मराठी सुपरस्टारच्या मालकीचाही खेळाडूंचा संघ असणार आहे. आणि ती अभिनेत्री आहे, अर्थातच सई ताम्हणकर.
महाराष्ट्र कुस्ती दंगल ह्या कुस्ती लीगमध्ये सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. ह्यामूळे आता सई ताम्हणकर अशी एकुलती एक मराठी अभिनेत्री असेल, जिच्याकडे एखादी स्पोर्ट्स टीम आहे.
सूत्रांच्या अनूसार, सई ताम्हणकर नेहमीच काहीतरी वेगळ करण्याचा विचार करते.. तिच्या ह्या पठडीमोडित काढत, रूढिबध्द नसलेल्या विचारसरणीमूळेच तिने अनेक मोठ-मोठे मानमरातब आजपर्यंत मिळवलेले आहेत. ती मराठी सिनेसृष्टीला लाभलेली ग्लोबल स्टार आहे. आणि तिने एक कुस्ती टीम खरेदी केल्याने आता कुस्तीलाही ग्लॅमर लाभेल, हे निश्चित.
सई ताम्हणकर ह्याविषयी सांगते, “मी मुळची सांगलीची. त्यामूळे कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेशी मी अवगत आहे, पहलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात, किंवा कोणता डाव कधी टाकावा ह्याचे चांगले ज्ञान आहे. पण हे ज्ञान कधी ना कधी अशा पध्दतीने उपयोगाला येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझी परिस्थिती नसल्याने मला चांगला व्यासपीठ मिळू शकले नाही, असं कोणताही कुस्तीपटू किंवा कोणत्याही खेळाडूने ह्यापूढे बोलू नये, हाच माझा ही टीम खरेदी करण्यामागे उद्देश आहे.”
सई ताम्हणकर पूढे म्हणते, “ह्या कुस्ती लीगमध्ये असलेल्या टीमओनर्समध्ये मी एकुलती एक महिला टीमओनर असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं, यासाठी माझा प्रयत्न असेल.”
आयुक्तांनी काढताच बॉयकॉट अस्त्र : प्रशासनाच्या विरोधातील तहकुबी झाली निशस्त्र (व्हिडीओ)
पुणे- कॉंग्रेस ,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे असे विरोधी पक्ष तर नेहमीच सांगत आलेत कि सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश नाही , त्यांचे अधिकारी ऐकत नाहीत ..हल्ली भाजपच्या नगरसेवकांकडून त्यास दुजोरा देणारी वक्तव्ये होऊ लागलीत .प्रशासनाची सर्वच पातळीवर होणारी बदनामी आणि त्यात आज मुख्य सभेत भाजप नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी प्रशासनावर अओप करत आंदोलनाचा इशारा दिला ,नंतर थेट प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांचा निषेध करणारी तहकुबी मांडली,भाजपच्या राजाभाऊ बराटेंनी तीस अनुमोदन दिले ..पण .. या तहकुबी संदर्भात महापौरांच्या डायस भोवती जमा झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ..आयुक्त सौरव राव यांनी ..तत्क्षणी ,आणि आमचाही काही मान अभिमान आहे कि नाही , बॉयकॉट करू आम्ही … असे स्पष्ट सुनावताच ..तहकुबी चा प्रभाव नाहीसा झाला ..अन अखेर भाजपच्या नगरसेवकांवर तहकुबी मागे घेण्याची नामुष्की कोसळली . आयुक्त सौरव राव यांनी दिलेला हा झटका अनेकांना हलवून गेला आहे.मात्र तो दिल्यानंतर खुलाशाची संधी मिळताच त्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना आपण कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही असेही स्पष्ट केले.
पालिकेच्या अंदाजपत्रकाला मंजुरी होऊन 7 महिने झाली तरी प्रभागातील कामे होत नसल्याने सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांने प्रशासनाच्या अकार्यक्षमेच्या निषेधार्थ सभा तहकुबी दिली. मात्र या तहकूबी मुळे सत्ताधारी भाजप प्रशासनाकडुन काम करुन घेण्यात आणि सत्तेचा गाडा हाकण्यात अपयशी ठरल्याचे सिद्ध होणार होते.
आमच्या प्रभागात अद्याप पर्यंत अवघ्या 5 कामाच्या निविदा लागल्या असून निविदा लावण्याच्या सूचना कनिष्ठ अभियंत्यांना दिल्यास ते थेट आत्महत्या करण्याची धमकी देतात. आम्ही काम कसं करायचं असा सवाल शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी सर्वसाधारण सभेत केला. सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलल तर ते जाणीवपुर्वक कामे करत नाहीत. प्रशासन मनमानी पद्धतीने बदल्या करत आहे. प्रभाग समितीत केवळ चर्चा होते. त्यात कामे होत नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करुन टाका. कामे होत नसतील तर नागरिकांना काय उत्तरे दयायची असे सवाल मेंगडे यांनी अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर भाजप नगरसेवक राजेंद्र बराटे, राजाभाऊ लायगुडे यांच्यासह काही नगरसेवकांनी यावरून प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर या सर्व नाराज नगरसेवकानीं थेट प्रशासनाच्या अकार्यक्षतेच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली. त्यामुळे सत्तेत असूनही कामे होत नसल्याने भाजपची सभागृहाताच मोठी अडचण झाली.
भाजपची कोंडी
सत्ताधारी नगरसेवकानीच विकासकामे होत नसल्याने तहकुबी दिल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे सभा तहकुबी मान्य झाल्यास उद्या मुख्यमंत्र्या समोरच पक्षाची अडचण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही तहकुबी मागे घ्यावी यासाठी भाजपच्या ज्येष्ट नगरसेवकासह महापौरांनीही मेंगडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र ते ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली अखेर अर्धातास मेंगडे यांना समजाविण्यात आल्यानंतर त्यांनी सभा तहकुबी घेण्यास तयारी दर्शविली. तसेच सभा तहकुबी नंतर हे नाराज नगरसेवक पाच मिनिटातच सभागृह सोडून बाहेर निघून गेले.खुलासा करताना आयुक्त सौरभ राव म्हणाले, या प्र्भाग समितीमध्ये आता पर्यत 105 निविदा निघाल्या आहेत. त्यातील 77 निविदाच्या वर्क ऑर्डर निघाल्या आहे. निविदा कमी निघाल्या आहेत. हे प्रकार आपल्या पर्यंतही येत असल्याने आपण स्वतः उद्या कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण घेणार असून त्यांना कामे तातडीनं मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या जातील असे स्पष्ट केले. तसेच लोकसभा आचारसंहिते पूर्वी सर्व कामे मार्गी लागतील याची जबाबदारी माझी असल्याचे राव यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनीच तहकुबी मांडल्यामुळे भाजपची कोंडी झाली. या तहकुबीकडे दुर्लक्ष होण्यासाठी अखेर अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याकडे लक्ष वळविण्यात आले . भाजपच्या नगरसेविका मानसी देशपांडे आणि वर्षा तापकीर या महापौरांशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्तांची चर्चा सुरु होती. माझ डोके हँग झाले आहे असे आयुक्त राव म्हणाले. तर अतिरिक्त आयुक्त शीतल उगले म्हणाल्या, तुम्हाला आमची अकार्यक्षमता दाखवु. असे नगरसेविका मानसी देशपांडे यांनी सभेत सांगितले. त्यावर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना लक्ष केले. नगरसेवक मुख्यसभेत आपल्या घरची कामे आणत नाहीत; ती नागरिकांची असतात, त्यामुळे ती मार्गी लावली जावीत. अशा प्रकारे नगरसेवकांच्या सुचने नंतरही अधिकारी कामे करत नसतील तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच या पुढे नगरसेवकांना अशा प्रकारचे प्रश्न मुख्यसभेत विचारण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेशही महापौरांनी या वेळी दिले.
दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरानी टिकवले : खा. नारायण राणे
मोबाईल कंपन्यांकडे करोडोचे जाहिरात शुल्क थकीत -नाना भानगिरे
पुणे- आपल्या प्रभागात असंख्य जाहिरात होर्डिंग बेकायदेशीर रित्या उभारण्यात आले असून त्यावर तातडीने कारवाई करावी तसेच मोबाईल कंपन्यांकडून थकीत असलेले करोडोचे जाहिरात शुल्क वसूल करावे अशी मागणी आज मुख्य सभेत नगरसेवक नाना भानगिरे यांनी केली .
श्रीमती नीता केळकर मराविमं सूत्रधारी कंपनीच्या संचालक
पुणे-श्रीमती नीता केळकर यांची मराविमं सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
श्रीमती केळकर मुळच्या सांगलीच्या रहिवासी असून सिव्हील इंजिनियर आहेत. तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमात सुध्दा त्यांचा सहभाग असतो.
श्रीमती केळकर यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून केलेल्या नियुक्तीने मराविमं सूत्रधारी कंपनीत असलेली स्वतंत्र संचालकाची रिक्त जागा पुर्ण झाली आहे.
संचालकांच्या बैठकीला ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया, सुनील पिंपळखुटे संचालक (वित्त), विश्वास पाठक, प्रकाश पागे व राजेंद्र गोयंका उपस्थित होते.
नवजीवन सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
उद्योगमहर्षी रसिकलाल धारीवाल आणि दिग्दर्शक सुरज बडजात्या पहिल्या ‘पुलकभूषण’ पुरस्काराचे मानकरी
पुणे-उद्योगमहर्षी रसिकलाल एम.धारीवाल आणि प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुरज बडजात्या यांना
यंदाचा पहिला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील ‘पुलकभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. देशातील प्रतिष्ठेचा
हा पुरस्कार रविवार दि. 21 ऑक्टोबर 2018 रोजी सायं. 4 वाजता दिगंबर जैन मुनिश्री प.पु. 108 पुलकसागरजी
महाराज यांच्या मंगल उपस्थितीत धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ,
कर्वे नगर, पुणे येथे समारंभपूर्वक दिला जाणार आहे. चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे
पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याअध्यक्ष मिलिंद फडे व उपाध्यक्ष चकोर
गांधी यांनी दिली . या प्रसंगी समितीचे सचीव जितेंद्र शहा आणि सहचिटणीस संजय नाईक उपस्थित होते .
राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, शाकाहार-अहिंसा या मानवी
मुल्यांशी असणारी वैचारिक बांधिलकी, समाजात सातत्याने पायाभूत व दिशादर्शक काम, समाजातील दुर्बल घटकांना
शैक्षणिक व वैद्यकीय साहाय्य देण्यासाठी संस्था व सुविधांची उभारणी अशा विविध निकषांवर आधारित दरवर्षी दोन
स्त्री अथवा पुरूष व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणताही धर्म, प्रांत, भाषा,
लिंग याचा भेद न करता हा पुरस्कार दरवर्षी घोषित होऊन मुनिश्री पुलकसागर महाराज यांच्या दरवर्षी होणार्या
चातुर्मास स्थळी या पुरस्काराचे वितरण केले जाईल.
रसिकलाल एम. धारीवाल – केवळ जैनच नव्हे तर सर्वच धर्मियांमध्ये आस्था बाळगणारे दानशुर
उद्योगमहर्षी हा नावलौकिक मिळवलेले रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,
धर्मसंस्कार अशा विविध क्षेत्रात सातत्याने महत्वाचे योगदान दिले. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे त्यांचा जन्म
1 मार्च 1939 ला झाला. वडिल माणिकचंद यांच्या अकाली निधनानंतर मातोश्री श्रीमती मदनबाई यांच्या
मार्गदर्शनाखाली त्यांनी खडतर जीवन प्रवास सुरू केला. मात्र उद्यमशीलता, कर्तबगारी, जिद्द, दूरदृष्टी आणि धार्मिक
संस्कार या पंचसूत्रीच्या आधारे त्यांनी सर्वच क्षेत्रात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी उभारलेल्या माणिकचंद उद्योग
समुहाने देशात मानाचे स्थान मिळविले आहे. पानमसाला, तंबाखू उत्पादने, माउथ फ्रेशनर, इलेक्ट्रिकल स्विचेस,
ऑफसेट प्रिंटिंग, फ्लेग्जिबल पॅकिंग, बांधकाम व्यवसाय, पवनचक्या, ऑक्सिरिच मिनरल वॉटर, चहा आणि काडेपेटी
अशा महत्वपूर्ण क्षेत्रात त्यांच्या सर्व उत्पादनांनी केवळ दबदबा निर्माण केला असे नाही तर गुणवत्तेवर सदैव भर
देऊन त्यांनी सर्व उत्पादने सदैव अग्रेसर ठेवली. त्यांचा व्यवसाय पुणे, दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैद्राबाद, बडोदा आणि
आसाम येथे विस्तारला आहे. देशामध्ये अनेक उत्पादनांची त्यांचे वितरक म्हणून मोठी वितरण व्यवस्था त्यांनी
उभारली. त्यांची अनेक उत्पादने 50 हून अधिक देशात निर्यात होतात. ‘उंचे लोग-उंची पसंद’ हे त्यांचे ब्रँड नेम सर्वत्र
लोकप्रिय झाले.
उद्योग महर्षी रसिकलाल एम. धारीवाल यांनी उद्योगाप्रमाणेच सामाजिक जबाबदारीची जाण ठेऊन अनेक
समाजोपयोगी उपक्रम उभे केले. तसेच समाजासाठी चांगले काम करणार्या संस्थांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले.
शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कायमस्वरूपी समाजोपयोगी कामे
उभारतानाच भूकंप, पूर अशा राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्यावेळी देखील माणिकचंद उद्योगसमूह मदत करण्यासाठी
सदैव पुढे सरसावला. लाखो गरजू, तरूण नागरिकांच्या चेहर्यावरील हास्य व समाधान हेच उद्योगसमूहाचे यश असे
ते मानत राहिले.
शैक्षणिक पातळीवर त्यांनी अनेक संस्था उभारल्या तसेच हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या मिळण्याची
व्यवस्था केली. शिरूर, पुणे येथे अनेक महत्वपूर्ण शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केल्या. त्याचबरोबर पुण्यात मुलींचे
वसतीगृह, चांदवड (नाशिक) व तळेगाव येथे मुलांचे वसतीगृह उभारून त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी सोय केली.
त्याचप्रमाणे शिरूर, पावापुरी (बिहार), चिंचवड, गणेगाव, उदयपूर, अलिगड, पुणे, उज्जैन, वैजापूर, इंदौर अशा विविध
ठिकाणच्या शिक्षण संस्थांचे देखील माणिकचंद उद्योगसमूह आधारस्तंभ आहेत. गरजू विद्यार्थ्यांना चांगली
शिष्यवृत्ती देता यावी यासाठी त्यांनी आठ कोटी रुपयांचा ट्रस्ट निर्माण केला.
वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प उभारले. माणिकचंद उद्योग
समुहाने गरीब रुग्णांसाठी माफक दरात अथवा निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यासाठी अद्ययावत इस्पितळांची निर्मिती
केली. तसेच देशातील अनेक इस्पितळांना मोठा आर्थिक सहयोग दिला. त्यातूनच पुण्यात नर्सिंग कॉलेज व होस्टेलही
सुरू झाले. पुणे, नगर, औरंगाबाद, अलिगड, पालिठाणा अशा अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली हॉस्पिटल्स् अद्ययावत
करण्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले.
सामाजिक पातळीवर लातूर व गुजरातचा भूकंप,आंध्रमधील वादळ, कारगिल युद्ध अशा प्रत्येक वेळी
माणिकचंद उद्योगसमूह मदतीसाठी पुढे सरसावला. अलिगड व पानशेत येथे वृद्धाश्रमही उभारलेले.
धार्मिक पातळीवर, पालिठाना येथील शत्रूंजय तिर्थ, शिखरजी येथे धर्मशाळा, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात,
राजस्थान, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील धार्मिक स्थळांना आर्थिक सहाय्य करून त्यांनी मोठे योगदान दिले.
सुरज बडजात्या – 22 फेब्रुवारी 1965 मध्ये जन्मलेले सुरज बडजात्या यांनी शालेय व
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट सृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. ज्येष्ठ दिग्दर्शक
महेश भट यांचा ‘सारांश’, दिग्दर्शक हिरेंद्र नाग यांचा ‘अबोद’, टिव्ही सिरीयल ‘पेईंग गेस्ट’ आणि दिग्दर्शक एन. चंद्रा
यांच्या ‘प्रतिघात’ यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले. याच काळात लेखक व दिग्दर्शक म्हणून
ही ते नावारूपास आले. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘मै प्रेम की दिवानी हूँ’, ‘विवाह’
आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनात त्यांनी आपल्यातील गुणांची चमक दाखवली. राजश्री
प्रोडक्शन समवेत त्यांनी अनेक टिव्ही मालिकांमध्ये प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून काम केले.
1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. एवढेच नव्हे तर
गेल्या 70 वर्षातील देशातील 10 यशस्वी चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला. या चित्रपटामुळे त्यांना अनेक पुरस्कार
मिळाले. 1994 मध्ये राजश्री प्रोडक्शनचा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने केवळ रौप्य
महोत्सवच साजरा केला असे नाही तर देशातील पहिल्या 10 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. या चित्रपटाने तब्बल 5
फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले. तसेच अन्य पुरस्कारांप्रमाणेच सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक व पटकथा संवाद लेखक म्हणून
त्यांना गौरवले गेले.
1999 मध्ये सुरज बडजात्यांनी कथा, संवाद आणि दिग्दर्शित केलेला ‘हम साथ साथ है’ या राजश्री
प्रौडक्शनच्या चित्रपटाने देखील अनेक विक्रम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा तिसरा चित्रपट कौटुंबिक चित्रपट
म्हणून गाजला. 2006 मध्ये ‘विवाह’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देशभर गाजला. या चित्रपटाने देशात 25
ठिकाणी रौप्य महोत्सव साजरा केला.
‘प्रेम रतन धन पायो’ हा 2015 मधील प्रदर्शित झालेला आणि सुरज बडजात्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट
देशभर हाऊसफूल होत राहिला. या चित्रपटाद्वारे सुरज बडजात्या आणि अभिनेता सलमान खान 18 वर्षानंतर एकत्र
आले होते. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ही याची ख्याती बनली.
कौटुंबिक आणि चांगले संस्कार करणार्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून सुरज बडजात्यांनी नावलौकिक
मिळवला. साधेे, खुसखूशीत निखळ मनोरंजन करणार्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यात सुरज बडजात्या नेहमी
आघाडीवर राहिलेत. कुशाग्र बुद्धीमत्ता, परिस्थितीचे भान आणि कुटुंबसंस्था बळकट होण्यासाठी संस्कारित दृष्टीकोन
देणारे सुरज बडजात्या हे हिंदी चित्रपट सृष्टीला मिळालेले मौलिक रत्नच आहेत.
रेनो जाहीर करीत आहे कॅप्चर रेंजवर उत्सवी आकर्षक किंमत
नवी दिल्ली -भारतातील अव्वल युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रॅंड रेनोने कॅप्चर श्रेणीवर आकर्षक किंमत आणि नवीन फीचर्स जाहीर केली आहेत. एसयूव्हीचा एकूण अनुभव सुधारताना, रेनो कॅप्चर मध्ये आता आरएक्सटी ( RXT) पेट्रोल, आरएक्सटी ( RXT) डीझेल आणि प्लॅटिन डीझेल मध्ये रूफ रेल हे स्टॅंडर्ड फिचर असणार आहे. वाहनाची एक वेगळी श्रेणी निर्माण करताना, ज्याला आकर्षक एक्सप्रेसिव्ह डिझाईन, प्रिमियम आणि श्रेणीतील सर्वोत्तम फिचर, आधुनिक तंत्रज्ञान, भारताची सर्वात स्टायलिश एसयूव्ही, रेनो कॉप्चर उत्कृष्ट किमतीत उपलब्ध असून अद्वितीय सौदा यात आहे. रेनो कॅप्चर मध्ये आकर्षक फ्रेंच डिझाईन आहे जो रेनोच्या नवीन डिझाईनचा डीएनए आहे. जागतिक स्टायलिंगचे कल लक्षात घेऊन रेनो कॅप्चर मध्ये या प्रकारातील सर्वात रूंद आणि लांब स्वरूप आणि 210 एमएमचा बेस्ट इन क्लास ग्राउंड क्लिअरन्स, याद्वारे भारतातील परिस्थिती आणि ग्राहक प्राधान्ये यांनाही लक्षात घेण्यात आले आहे. याला इलीव्हेटेड ड्रायव्हिंग पुझिशनची जोड आहे ज्यामुळे रॅपराउंड व्हिजिबिलिटी मिळते जो आरामदायकपणाचा नवीन उच्चांक आहे.
स्टार्टींग व्हेरीयंट पासून रेनो कॅप्चर मध्ये 50 प्रिमियम फिचर्सनी परिपूर्ण स्वरुपात येते ज्यात प्रोजेक्टर हेडलॅंप्स, सी-शेप्ड सफायर एलइडी डीआरएल्स, संपूर्ण स्वयंचलित तापमान नियंत्रण कुलिंग वेन्ट्स सहित, युएसबी आणि ऑक्स-इन आणि ब्ल्यूटूथ® याची एकत्रित ध्वनी यंत्रणा, पुश बटण स्टार्ट विथ रिमोट सेन्ट्रल लॉकिंग, ड्युएल एअरबऍग्स, ऍंटीलॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) विथ इलेक्ट्रिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (इबीडी) आणि ब्रेक असिस्ट आणि रेअर डेफॉगर विथ व्हायपर यांचा समावेश होतो.
प्राईस लिस्ट
व्हेरीयंट किंमत
आरएक्सइ (RXE) पेट्रोल 9,99,999
आरएक्सएल (RXL ) पेट्रोल 11,07,999
आरएक्सटी (RXT) पेट्रोल
ड्युएल टोन 11,45,999
आरएक्सइ ( RXE) डीझेल 10,99,999
आरएक्सएल (RXL) डीझेल 12,47,999
आरएक्सटी (RXT) डीझेल
ड्युअल टोन 12,66,999
प्लॅटाइन डीझेल ड्युएल टोन 13,24,999



