पुणे: प्रत्येक भारतीय पुरूषाने आपल्या परिवारा करता स्वतःच्या स्वास्थ्य संदर्भात फिट राहण्याची गरज असून यासाठी प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आज बिअरडोथोन सिझन 2 या half मॅरेथॉन पुण्यात आयोजित करण्यात आली होती.
पुरूषानी स्वतःच्या फिटनेस संदर्भात जागरूक राहावे आणि आरोग्यदायी जीवन जगावे यासाठी एक प्रोत्साहन म्हणून बिअरडोथोन half मॅरेथॉन चे निमित्त होते.
बिअरडोथोन मध्ये 2000 लोकांनी सहभाग घेतला होता यामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला .या मॅरेथॉन मध्ये 5 कि. मी., 10 कि. मि. आणि 21 कि. मी. अंतरावर रेस झाल्या.
ह्या half मॅरेथॉन चा flag off प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि फिटनेस चे प्रोत्साहक मिलिंद सोमन यांच्या पत्नी अंकिता कोवंर – सोमन यांनी केला.
परिवारासाठी रहा फिट- बीर्डो-थॉन 2018 हाफ मॅरेथॉनस्पर्धा संपन्न (व्हिडीओ)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाह 14 आणि 15 नोव्हेंबर ला..
मुंबई-दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांनीही संयुक्तरित्या आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर रविवारी पोस्ट केली. त्यानुसार, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी हे दोघे विवाह करणार आहेत. “कुटुंबियांच्या स्नेहाशीर्वादाने आम्हाला हे कळविण्यात आनंद होत आहे की आमचा विवाह 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी निश्चित झाला आहे.” असे लिहिताना दोघांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सर्वच चाहत्यांचे आणि मित्र-परिवाराचे आभार मानले आहे.
विरुष्काच्या लग्नापासूनच होती या दोघांची चर्चा…
सोशल मीडियावर अपलोड होताच त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. गतवर्षी डिसेंबरमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह झाला. तेव्हापासून या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला अशी चर्चा उडाली. या दरम्यान त्यांनी गुपचूप लग्न केले असेही ऐकण्यात आले होते. परंतु, आता रणवीर आणि दीपिकानेच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या लग्नाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करून सर्वच चर्चांना विराम लावला आहे
उदबत्तीसारखं आयुष्य जगावं-पुलकसागरजी महाराज ; ‘पुलकभूषण’ पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
पुणे-“आपलं आयुष्य हे दुसर्याच्या जीवनात प्रकाश देणारं असावं. पण त्यापेक्षाही जर आपण उदबत्तीसारखं आयुष्य जगलं तर कितीही मोठा वारा आला तरी आपल्या चांगल्या कामाचा सुगंध दुरवर दरवळत राहतो. दिवा विझवता येतो किंवा वार्याने विझतो. पण उदबत्ती विझवता येत नाही किंवा वाराही तिला विझवू शकत नाही, अशी उदबत्ती सारखी सुगंधीत जीवन असे धारीवाल आणि बडजात्या कुटुंबियांचे आहे” असे गौरवोद्गार दिगंबर जैन मुनीश्री प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांनी आज येथे काढले. मुनीश्रींचा पुण्यात चालू असलेल्या चातुर्मासपर्वात धर्मानुरागी रसिकलाल एम. धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झालेल्या पहिल्या प्रतिष्ठेच्या ‘पुलकभूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. दानशूर उद्योगमहर्षी कै. रसिकलाल एम. धारीवाल यांच्या वतीने त्यांची पत्नी श्रीमती शोभा धारीवाल व कन्या जान्हवी धारीवाल यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी कुटुंबियांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला. मुनीश्री पुलकसागर महाराजांच्या हस्ताक्षरातील चांदीच्या फ्रेममधील मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी हजारो जैन भाविकांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर धुमधुमून गेला.
याप्रसंगी मुनीश्री म्हणाले की, या दोघांवरही ईश्वराचा वरदहस्त आहे. त्यांच्याकडे संपत्ती आहे. असे असूनही त्यांनी संस्कार सांभाळून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. धारीवाल यांनी केलेली सामाजिक कामे आणि बडजात्या यांच्या चित्रपटाची नावे लोकांच्या तोंडी असतात. पण या दोघांची नावे संतांच्या तोंडी असतात हे विशेष. रसिकलाल धारीवाल यांनी वर्तमान युगात आपल्याकडे असलेले भांडार समाजासाठी खुले करून कोट्यावधी रुपयांचे दान केले व नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे जेवढी जोरात हवा येईल तेवढा त्यांच्या कार्याचा सुगंध दुरवर पसरेल. बडजात्या हे चित्रपट दुनियेत आहेत. या प्रभावी माध्यमाचा वापर करून ते चांगले कौटुंबिक संस्कार समाजात रूजवतात. या सगळ्यांचं श्रेय बडजात्या कुटुंबाला एकत्रित बांधुन ठेवणार्या उषा बडजात्या यांना आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी श्रीमती शोभा धारीवाल म्हणाल्या, जीवनातील कठीण प्रसंगात मुनीश्रींचा परिचय झाला. जीवनातील सत्य स्विकारण्याची ताकद त्यांच्यामुळे मला व कुटुंबाला मिळाली. त्यामुळेच आज या चार्तुमासपर्वाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी मला पार पाडता आली आणि यामुळे मला एक चागले काम करता आले. यानिमित्ताने चार्तुमास संयोजन समितीच्या रूपाने एक चांगला परिवार मला मिळाला.
जान्हवी धारीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे समाजाकडून मिळालेले पुन्हा समाजाला देण्याचे काम केले. हे काम आपण असेच पुढे सुरू ठेवणार आहोत. माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचे नाव मोठे केले तसे मी माझ्या वडिलांचे नाव मोठे करीन.
याप्रसंगी सुरज बडजात्या म्हणाले, आमचा एक चित्रपट चांगला चालला. त्यानंतर आम्ही घरी स्नेहभोजन आयोजित केले होते. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आले होते. पण स्नेहभोजनाप्रसंगी ‘काहीच’ नाही असे बघून अनेकजन न जेवता परत गेले. तर काहींनी ‘ही काय जीवनशैली आहे काय’ असे उद्गार ही काढले. मात्र ‘असेच स्नेहभोजन’ तुम्हाला सन्मान मिळवून देईल असे कुटुंबातील ज्येष्ठांनी सांगितले. असे कौटुंबिक व संस्कारी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे व त्यात यश मिळवणारे सूरज बडजात्या यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री प्रदीप जैन म्हणाले की, धर्म हे समाज जोडण्याचे काम करतो. त्यामध्ये जोडण्याच्या आशयाला खूप महत्व आहे. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा कायम रहावा यासाठीची पहिली बैठक पुण्यात झाल्याची आठवण त्यांनी याप्रसंगी सांगितली. याप्रसंगी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मल सेठी उपस्थित होते.
प्रारंभी नृत्याविष्कार झाल्यावर मुंबईच्या सीमा गंगवाल यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे केले. यानंतर कै. रसिकलाल एम. धारिवाल यांचे कर्तृत्व अधोरेखीत करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच मंगलाचरण नृत्याविष्कार स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक – वैष्णवी शहा ग्रुप, द्वितीय क्रमांक – जिनेंद्र ग्रुप आणि पारस ग्रुप, तृतीय क्रमांक – पूर्वाशहा ग्रुप, उत्तेजनार्थ – श्राविका महिला मंडळ, जैन जागृती सखी मंच, पार्श्व पद्मावती मंडळ आणि संगिनी ग्रुप. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजित पाटील यांनी केले.
तत्पूर्वी आज सकाळी माणिकबाग जैन मंदीर येथून भव्य शोभायात्रा निघाली. त्यामध्ये बँड, रथ, बग्गी यासह पारंपारिक पोशाखातील हजारो जैन स्त्री-पुरूष भावीक सहभागी झाले होते. ही शोभा यात्रा महालक्ष्मी लॉन्स येथे आल्यावर तेथे डोक्यावर मुकुट परिधान केलेले 1008 स्त्री पुरूष (इंद्र व इंद्रायणी) यांनी महाअर्चना विधान महोत्सव पूजा सुरू केली. याप्रंसगी अन्य हजारो जैन भावीक उपस्थित राहिले होते. महाअर्चना विधान महोत्सव पूजा दि. 22 व 23 रोजी सकाळी 7 ते 10 यावेळेत महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न होईल अशी माहिती सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीत जागांमध्ये घट,पण सर्वात मोठा पक्ष भाजपच ‘ : सिध्देश्वर मारटकर यांचे भाकित
“संवाद”कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न
पुणे= शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी आयोजित “संवाद” या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला निघोजेगांव, तालुका:- खेड , जिल्हा:- पुणे याठिकाणी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला . राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस , राज्याच्या सहप्रभारी श्रीमती. सोनलबेन पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी पुणे शहराध्यक्ष श्री. रमेश बागवे , पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री. सचिनसाठे,आमदार शरद रणपिसे,माजी आमदार मोहन जोशी,दीप्ती चौधरी, अभय छाजेड,अरविंद शिंदे व वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे शिबीर आजपासून दोन दिवस सुरू राहणार आहे.
पालिका रूग्णालयात आता मोफत बेबी किट
पुणे : महानगरपालिकेच्या प्रसुतिगृहांमध्ये जन्माला येणाच्या नवजात बालकांना मोफत बेबी कीट देण्यात येणार आहे. त्याची सुरूवात शनिवारी कमला नेहरू रूग्णालयातून महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्या हस्ते करण्यात आली. या शिवाय, पालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या मात्र, बेड वरून उठता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच इतर रूग्णांना हे डायपर मोफत दिले जाणार आहेत.
महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा राजश्री नवले, स्थानिक सभासद योगेश समेळ,नगरसेविका सुजाता शेट्टी तसेच पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, डॉ.संजीव वावरे, कमला नेहरु रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहुल गागरे व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवजात अर्भकांना देण्यात येणाच्या बेबी कीट मध्ये बेबी सोप, मसाज ऑईल, शांपू, कंगवा व नवजात बालकांचे संगोपनाकरीता उपयुक्त असलेल्या अन्य साहित्याचा समावेश आहे.
‘ टाकाऊ गोष्टीतून टिकाऊ कला वस्तू’ ( बेस्ट आऊट ऑफ वेस्ट ) प्रदर्शनाला प्रतिसाद
एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत सात भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश
कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलताव याला, तर हाँग काँगच्या वांग हाँग यी कोडी यांना अग्रमानांकन
पुणे, दि.21 ऑक्टोबर 2018: एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात मुलांच्या गटात सुशांत दबस, क्रिश पटेल, सुभाष पर्मसीवम, निशांत दबस यांनी तर, मुलींच्या गटात प्रियांशी भंडारी, अर्चिता महलवाल, प्रेरणा विचारे या सात भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या सातव्या मानांकित सुशांत दबसने अव्वल मानांकित फर्दिन कुमरचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-3असा पराभव करत मुख्य फेरी गाठली. सुभाष पर्मसीवमने तिसऱ्या मानांकित डेनिम यादवचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. सहाव्या मानांकित निशांत दबसने चौथ्या मानांकित संदीप व्हीएमचा 6-4, 6-2असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात सातव्या मानांकित प्रियांशी भंडारीने विधी जैनचा 6-1, 6-3असा तर, सहाव्या मानांकित अर्चिता महलवालने तिसऱ्या मानांकित मालविका शुक्लाचा 6-4, 2-6, 6-0 असा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित प्रेरणा विचारेने आठव्या मानांकित यशस्विनी पन्वरवर 6-2, 6-2असा विजय मिळवला. उझबेकिस्तानच्या अव्वल मानांकित सेवील युलदाशिवने भारताच्या पाचव्या मानांकित भक्ती शहाचा 6-4, 6-4असा पराभव केला.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी आज खेळाडूंची मानांकन यादी आज जाहीर केली. कुमार गटात जागतिक क्र.61 असलेल्या कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलताव याला, तर जागतिक क्र.49 असलेल्या हाँग काँगच्या वांग हाँग यी कोडी यांना अनुक्रमे मुले व मुलींच्या गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावचा सामना वाईल्डकार्डद्वारे प्रवेश केलेल्या आर्यन भाटियाशी होणार असून मुलींच्या गटात वांग हाँग यी कोडीचा सामना 16 वर्षाखालील गटातील राष्ट्रीय विजेती व वाईल्डकार्डद्वारे प्रवेश केलेल्या गार्गी पवारहिच्याशी होणार आहे. मुख्य फेरीसाठी मुलांच्या गटात आर्यन भाटिया, तेजस्वी मेहरा, अर्थव निमा, प्रसन्ना बागडे यांना, तर मुलींच्या गटात गार्गी पवार, काव्या सव्हेनी, भक्ती परवानी, शरण्या गवारे यांना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
एचसीएल कॉर्पोरेशन आणि शिव नादर फाऊंडेशनचे धोरण व्यवस्थापकीय सुंदर महालिंगम म्हणाले कि, आम्ही क्रीडा व संगीत क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून या माध्यमातून खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांनी कारकीर्द समृद्ध करण्याचे तत्वज्ञान एचसीएलने ठेवले आहे. क्रीडा उमक्रमांचा एक भाग म्हणून एचसीएल गेल्या तीन वर्षांपासून टेनिसला पाठिंबा देत आहे आणि आम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी करून अव्वल कुमार भारतीय खेळाडूंना आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी व आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहे. तसेच, हि स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची अशी स्पर्धा असून सहभागी खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतील, अशी आशा आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:मुले:
सुशांत दबस(भारत,7)वि.वि.फर्दिन कुमर(भारत,1)7-6(5), 6-3;
क्रिश पटेल(भारत,2)वि.वि.कुशन शाह(भारत,5)6-3, 6-3;
सुभाष पर्मसीवम(भारत)वि.वि.डेनिम यादव(भारत,3)6-3, 6-4;
निशांत दबस(भारत,6)वि.वि.संदीप व्हीएम(भारत,4)6-4, 6-2;
मुली:
सेवील युलदाशिव(उझबेकिस्तान,1)वि.वि.भक्ती शहा(भारत,5)6-4, 6-4;
प्रियांशी भंडारी(भारत,7)वि.वि.विधी जैन(भारत) 6-1, 6-3;
अर्चिता महलवाल(भारत,6)वि.वि.मालविका शुक्ला(भारत,3)6-4, 2-6, 6-0;
प्रेरणा विचारे(भारत,4)वि.वि.यशस्विनी पन्वर(भारत,8)6-2, 6-2
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: 1.डॉस्टनबीके ताशबुलताव(कझाकस्तान), 2.फोमीन सेर्गेय(उझबेकिस्तान), 3.हॅन सीओन याँग(कोरिया), 4.सिद्धांत बाँठिया(भारत), 5.मेघ भार्गव पटेल(भारत), 6.सच्चीत शर्मा(भारत), 7.मन शाह(भारत), 8.सुकसुमराम टी(थायलंड);
मुली: 1. वांग हाँग यी कोडी(हाँग काँग), 2. हिमरी सातो(जपान),3. मनचया सवांगकिइ(थायलंड), 4.प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया), 5.मना कावामुरा(जपान), 6. फुना कोझाकी(जपान), 7.जियाकी वांग(चीन), 8.मई नपात निरुदोर्न(थायलंड)
खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये वाढले गवत; नागरीकांच्या जिविताला सापांचा धोका
‘त्या ‘ चार मृत्यूंना प्रशासनच जबाबदार – अविनाश बागवे (व्हिडीओ)
पुणे-जाहिरात फलकांविषयी असलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांना एनकेन मार्गे सहाय्यभूत कामकाज करणारे महापालिकेचे प्रशासन जुना बाजार होर्डिंग दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा ठपका कालच्या मुख्य सभेत पुन्हा कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला . या दुर्घटनेत गेलेल्या लोकांचे प्राण ,त्यांच्या कुटुंबावर कोसलेली आपत्ती हि कधी न भरून येणारी आहे त्यामुळे हे प्रकरण आता विसरता येणारे नाही आणि या संदर्भात कोणावर काय कारवाई केली ? या पुढे काय कशी दक्षता घेतली आहे ? असे सवाल हि त्यांनी केले … पहा आणि ऐका.. त्यांच्याच शब्दात … नेमके त्यांनी काय म्हटले आहे .
होर्डिंग दुर्घटना – चार मृत्यूंना आयुक्त कार्यालय आणि सुप्रा जबाबदार -अरविंद शिंदे (व्हिडीओ)
पुणे- जुना बाजार दुर्घटनेला रेल्वे ,रेल्वेचे पोलीस ,तसेच महापालिकेतील आयुक्त कार्यालय आणि सुप्रा नावाची कंपनी जबाबदार असल्याचा घनघनाती आरोप काल महापालिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला . हा आरोप करताना मंत्री पंकजा मुंडे यांचा पुण्यात कोट्यावधीचा इंटरेस्ट असल्याचा आरोप हि त्यांनी केला .
नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले ..ते पहा आणि ऐका.. जुना बाजार दुर्घटनेवरील शिंदे यांचे हे अनकट भाषण ….
आरक्षणापेक्षा ज्ञान-कौशल्येच करतील आपले रक्षण -अभिनेते मनोज जोशी
म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर, पितांबरी प्रॉडक्ट्सचे रवींद्र प्रभुदेसाई, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, मंडळाचे उमाकांत जोशी, अशोक जोशी, अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे डॉ. जितेंद्र जोशी, ‘चिंटू’कार चारुहास पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र प्रभुदेसाई, वसंत नगरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक श्रीकांत जोशी यांनी केले. सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी केले. मंजुषा वैद्य यांनी आभार मानले. अजय कुलकर्णी, जयंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पवार साहेबांचा शब्द कोणतेही सरकार डावलत नाही -अजित पवार
दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना सुरु करा… अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन ! – किसान सभा
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – दुष्काळाचे संकट कोसळत असल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतीत आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्हयात पावसाने पाठ फिरवल्याने पिके हातची गेली आहेत. मराठवाड्यातील जयकवाडी, विष्णुपुरी, निम्न पैनगंगा, दुधना, बाभळी आदी जलसाठ्यामध्ये पुरेसे पाणी नसल्याने येत्या काळात पिके तर बरबाद होतीलच शिवाय मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचाही अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. रोजगाराची टंचाई व मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न जटील होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने अधिक विलंब न करता दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी किसान सभेने केली आहे.
राज्यात पावसाने दडी मारल्याच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने विदर्भ, मराठवाडा व खान्देशात शेतकरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध जिल्हयात होत असून नांदेड येथे मराठवाडा स्तरीय मेळावा होत आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून या मेळाव्यासाठी प्रतिनिधी उपस्थित आहेत. किसान सभेने या मेळाव्यामध्ये, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना 30 जून 2018 पर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती द्या, कर्जमाफीसाठी दीड लाखाची मर्यादा रद्द करा, कर्जाचे नियमित नूतनीकरण केलेल्या शेतक-यांनाही संपूर्ण कर्जमुक्ती द्या, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या, पीक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करा, दुष्काळात होणा-या पाणी, अन्न, चारा व रोजगाराची टंचाई दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करा, रोजगार हमीची कामे सर्वत्र उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा, दुष्काळात ग्रामीण जनतेला पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या, आधारभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी पुरेशी सरकारी केंद्र सुरू करा, उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करा, दारूच्या कारखान्यांना पाणी देणे तातडीने थांबवा या मागण्या केल्या आहेत, असे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले म्हणाले. केंद्र सरकारने 2016 साली दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुष्काळ व्यवस्थापन संहिता जाहीर केली. जुनी आणेवारी पद्धत बंद करून, या नव्या संहितेप्रमाणे आता दुष्काळ जाहीर होणे सरकारला अपेक्षित आहे. पर्जन्यमान, रिमोट सेन्सिंग द्वारे पिकपेरा क्षेत्र व मातीतील आद्रता यांचे परीक्षण, जलसाठे व भूजलस्तरांची स्थिती, चारा उपलब्धता,पिण्याच्या पाण्याची परिस्थिती, रोजगार व स्थलांतर या निकषांच्या आधारे आता दुष्काळ ठरविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. नवी पद्धत अत्यंत जटिल व वेळखाऊ असल्याने अनेकदा दुष्काळाची परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर करणे अशक्य होऊन बसणार आहे. परिणामी दुष्काळग्रस्त भागांना केंन्द्र सरकारची मदत मिळणार नाही. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या दुष्काळ संहितेतील जटीलता तातडीने दूर करण्याची मागणी किसान सभा करत आहे. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही किसान सभेने दिला आहे.
नुकताच नांदेड येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात हा इशारा देण्यात आला. किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले, विजय गाभणे, अर्जुन आडे, शंकर शिडाम, उद्धव पौळ, रामकृष्ण शेरे, विलास बाबर, गोविंद आर्दड, किशोर पावर, दीपक लिपणे, उत्तम माने, मुरलीधर नागरगोजे, सुधाकर शिंदे, तानाजी वाघमारे, भगवान भोजणे, भाऊसाहेब झिरपे, अंकुश बुधवंत, सुरेश काचगुंडे आदी शेतकरी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विदयालयात भोंडला संपन्न
पुणे-माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विदयालयात भोंडला संपन्न झाला. यावेळी इ. १ ली ते ४ थी ‘नवरात्रोत्सव’ या विषयावर विशेष परिपाठ सादर केला. कार्यक‘माची सुरुवात ईशस्तवनाने झाली. काही गाणी तसेच नृत्यसादरीकरण झाले. नवरात्र, त्याचे महत्व, विविध शक्तीपीठे याबद्दलची माहिती मुलांनी मोजक्या पण अतिशय समर्पक शब्दांत सांगितली . इ. ३ री तील सुकृत दीक्षित या विदयार्थ्याने सिंथेसायझर या वादयावर सुरेल असे ‘मायभवानी’ हे प्रसिध्द गाणे सादर केले. एका वर्गात नवरात्रोत्सव निमित्त सुशोभन केले होते त्यात देवीची आयुधे, शक्तीपीठे, दागिने, घट, भोंडल्याची चित्रे तसेच छोटे पुतळे यांतून नवरात्रीची माहिती सांगितली होती. हे सर्व साहित्य मुलांनी स्वत: तयार केलेले होते नात्यांच्या दहा माळा म्हणजेच आई, आजी, मावशी, आत्या, बहीण, नणंद, सासू, मैत्रीण, लेक, कामवाल्या मावशी अशा नात्यांच्या दहा माळांविषयीची माहिती येथे देण्यात आली होती.

विविध गुणदर्शनात शाळेच्या मु‘याध्यापिका मा. सौ. कल्पना धालेवाडीकर व सौ. मंजुषा खेडकर यांनी देवीचा गोंधळ सादर केला. यावेळी देवीची ९ रुपे समोर दाखविण्यात आली. कार्यक‘माचे सुत्रसंचालन सौ. माधुरी ठकार यांनी केले. मा. मु‘याध्यापिकांसह काही शिक्षिकांनी सर्व मुलांसमोर ‘श्रीसूक्त’ पठण केले बालवाडी ते इ. ७ वी च्या सर्व मुलींचा भोंडला झाला. यांत काही पारंपारिक गाणी घेण्यात आली. त्याचप्रमाणे समाजप्रबोधन व्हावे म्हणून इंटरनेट वर आधारित आधुनिक गाणे ही म्हटले खेळगट ते वरिष्ट गटापर्यंतच्या मुलीेंचे कुमारिकापूजन वर्गावर्गात झाले. नंतर सर्व विदयार्थ्यांना खिरापत वाटण्यात आली.










