Home Blog Page 3026

पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना १० लाखांचे गृहपयोगी साहित्य

0

पुणे : दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील इस्टेट आगीतील पीडित कुटुंबीयांना १० लाखांच्या गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पाण्याचा पिंप, हंडा-काळाशी, पातेले, परात, चमचे असे गृहपयोगी साहित्याचा समावेश होता. एकूण ३०० कुटुंबाना हे साहित्य वाटण्यात आले.

मांगीरबाबा देवस्थान ट्रस्ट, जुना पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमाला दि मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुबभाई शेख, स्थानिक नगरसेविका सोनाली लांडगे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सचिव बाबुराव घाडगे, संजय कदम, माजी नगरसेवक अयाज काझी, संतोष लांडगे, स्थानिक कार्यकर्ते सुशील सर्वगोड, शोभा झेंडे, निखिल कांबळे, अमोल ओव्हाळ, महादेव साळवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, “सामाजिक जाणिव आणि कर्तव्य भावनेतून बँकेतर्फे हे कार्य होत आहे. गरिबीच्या चक्रातून बाहेर पाडण्यासाठी झोपडपट्टीतल्या मुलांनीही शिकले पाहिजे. व्यसनांपासून दार राहिले पाहिजे. स्वतःची प्रगती साधायची असेल, तर शिक्षणावाचून दुसरा तरणोपाय नाही, हे आपण लक्षात घ्यावे.”

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “आग दुर्घटनेच्या दिवसापासून विविध स्तरांतून येथील नागरिकांना मदत केली जात आहे. परंतु, त्यांना पक्की घरे मिळायला हवीत. त्यासाठी पाठपुरावा करीत असून, लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सर्वांना हक्काची घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

महेश शिंदे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे यांनी पीडितांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगत जळीतग्रस्तांना आधार दिला. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी पक्षाचे पदाधिकारी कोणतीही मदत कमी पडू देणार नाहीत, असे आश्वासनही दिली. याच भागातील नगरसेविका सोनाली लांडगे यांनीही आपण सदैव सोबत असल्याचे सांगितले. मदत मिळालेल्या नागरिकांनी दोन्ही संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

पुण्यात महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

0

पुणे-: महावितरण अंतर्गत आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला गुरुवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता स्वारगेट येथील कै. बाबूराव सणस क्रीडांगणावर सुरवात होत आहे. तीन दिवसीय या स्पर्धेमध्ये महावितरणमधील सुमारे 768 खेळाडू सहभागी होत आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (वित्त) श्री. जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचालन व प्रकल्प) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण, कार्यकारी संचालक (प्रकल्प व मानव संसाधन) श्री. चंद्रशेखर येरमे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे उपस्थित राहणार आहेत.

महावितरण अंतर्गत 16 परिमंडलाचे एकूण 8 संघ तसेच 592 पुरुष व 176 महिला खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम, कुस्ती, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोला फेक, थाळी फेक, भाला फेक, ब्रीज, टेनिक्वाईट या खेळांचे पुरुष व महिला गटात सामने होणार आहेत. स्वारगेटमधील सणस क्रिडांगण व नेहरू स्टेडीयम, हिराबाग येथील डेक्कन क्लब, एसपी कॉलेजजवळील स्काऊट ग्राऊंड या ठिकाणी हे सामने होतील. या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान यंदा पुणे परिमंडलाला मिळाला असून या स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार काम पाहत आहेत. शनिवारी, दि. 29 डिसेंबरला दुपारी 4 वाजता सणस क्रीडांगण येथे या स्पर्धेचा समारोप होणार आहे.

‘एक निर्णय’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा दिमाखात संपन्न

0

नववर्षासाठी प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो, एखादा निर्णय घेतो. असाच एक निर्णय अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला. ‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. नव्या वर्षात त्यांचा ‘एक निर्णय’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट येत्या १८ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

‘हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असून त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मी आता एक एक पाऊल टाकत आहे. माझ्या सगळ्या आप्तस्वकीयांची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंतचा हा प्रवास करू शकलो. चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

चित्रपटाच्या कथेला पूरक आणि पोषक अशी चार वेगवेगळ्या मूडची गाणी ‘एक निर्णय’ या चित्रपटात आहेत. अंजली मराठे, ऋषिकेश कामेरकर, निहिरा जोशी-देशपांडे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले या सुप्रसिद्ध गायकांनी ही गाणी गायली असून, गाण्यांचे गीतकार वैभव जोशी तर संगीतकार कमलेश भडकमकर आहेत. रोहन श्रीरंग देशमुख याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे. ‘आपण केलेल्या अनेक कामांपैकी काही ठराविक कामं अशी असतात जी लोकांसमोर येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत असतो. तसंच या चित्रपटासाठी लिहिलेली गीते लोकांसमोर येण्याची मी वाट बघत होतो’ अशा भावना गीतकार वैभव जोशी यांनी व्यक्त केल्या. तर ‘खूप दिवसांनी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी ‘एक निर्णय’ मुळे मला मिळाली, त्यात वैभव जोशी सारख्या प्रतिभावान कवीचे शब्द समोर असल्यामुळे संगीत देण्याचा हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता’ असं म्हणत कमलेश भडकमकर यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.

सुबोध भावे, मधुर वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, कुंजीका काळवींट या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडे यांचे असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक याचं असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. स्वरंग प्रॉडक्शनची ही पहिलीच निर्मिती आहे.

१८ जानेवारीला ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अगोदर सनबर्न ..त्यानंतर मिळेल गावकऱ्यांना पाणी ..बावधन मध्ये पोलीसीराज (व्हिडीओ)

0

पुणे- पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम नंतर … आता अगोदर सनबर्न ..होवू द्यात , नंतर पाईपलाईनचे काम   काम सुरु करा.. सनबर्न होईपर्यंत  रस्ते खोदून कोणतेही काम करू नका असा अजब तऱ्हेचा  गजब कारभार हिंजेवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी राबवीत असून या साठी चक्क त्यांनी ग्रामपंचायत आणि भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींंना देखील चुकीचे गुन्हे दाखल करत धाकात ठेवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप येथील नगरसेवक किरण दगडे यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेवूनही अद्याप पोलीसिराज आहे तसेच असल्याने आता सनबर्न आणि बावधन च्या  पाईपलाईन चे काम यावरून या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकरता येणार नाही .विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात एकाबहुआयामी बांधकाम व्यावसायिकानेच सन बर्न च्या यशस्वीतेसाठी शड्डू ठोकल्याने पोलीस त्यांच्या पाठीशी आणि गाव करी त्यांच्या समोर असा सामना रंगू नये म्हणजे झालं .
या संदर्भातील हकीकत अशी कि, आजतागायत विविध संस्था संघटना  यांनी सनबर्न ला आपला विरोध कायम ठेवला याबाबत वारंवार पत्रके काढली ,निवेदने दिली .. पण सरकारी पातळीवरून अद्याप काहीही दाखल घेतली गेली नाही . आता याचा फटका चक्क भाजपच्या बावधन च्या सर्पांचा असलेल्या पियुषा दगडे आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक असलेले त्यांचे पती ..प्रख्यात मुळशी पॅटर्न सिनेमाचे निर्माते किरण दगडे यांना हिंजेवाडी पोलिसांच्या नव्या पॅटर्नची अनुभूती घ्यावी लागते आहे . या संदर्भात त्यांनी कियेक पाणी तक्रारींचा पानगुच्छ समोर ठेवला. जेव्हा ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु केले तेव्हा … काही जणांनी त्यास विरोध करत काम करणाऱ्यांना मारहाण करून पिटाळून लावले .तेव्हा ग्रामपंचायतीचे सदस्य , सरपंच यांनी हे काम करणाऱ्यांची तक्रार घेऊन , त्यांना पोलीस बंदोबस्तात काम करू द्यावे असे पोलिसांना कळविले . पण झाले उलटेच .. 2 दिवसानंतर त्यांना समजले पोलिसांनी अशी कुठलीच तक्रार नोंदवून घेतली नाही . उलट अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर पणे खोदाई केल्याबद्दल गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत  आणि लोकप्रतिनिधी यांनाच दणका दिला . याबाबत जाब विचारायला गेलेल्याला .. तुला अटक करेल असा दम भरला. त्यानंतर गेलेल्या नगरसेवकाला ‘ सन बर्न ‘ होऊन जाऊ द्यात नंतर कामे करा, असा झक्कास सल्ला दिला .विशेष म्हणजे आपल्या तक्रार अर्जांना पोहोच हि दिली जात नाही अशी तक्रार घेऊन नगरसेवकाला उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली . त्यावर केवळ पोहोच मिळाली पण… पोलीसीराज  कायम … आता आम्ही पालकमंत्री बापटांना साकडे घालू, लोकांना आम्ही नव्या वर्षात तरी रोज पाणीपुरवठा करू असे स्वप्न दाखविले होते ते आम्हास पुरे करू द्यात असे सांगू …ग्राम सभा  बोलावू .. आणि रीतसर पाणी पुरवठ्याचे ग्रामपंचायतीचे काम अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवीची मागणी करू .. असे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी सांगितले …

प्रियांका चोप्राचे लग्न ‘सर्वाधिक चर्चित सेलेब्रिटी विवाह’

0

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियांका चोप्रा सातत्याने आपल्या लग्नाच्याविषयीच्या बातम्यांनी सर्वत्र चर्चेचा विषय होती.  इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि प्रियांकाचे लग्न ह्या ग्लोबल आयकॉनला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय बनवून गेले.प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. जोधपुरमध्ये पारंपरिक पध्दतीने लग्न करण्यापासून ते मुंबईमध्ये रिसेप्शनपर्यंत तीन आठवडे चाललेल्या प्रियंकाच्या ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ ने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर नुकत्याच झालेल्या बॉलीवूड विवाहांमध्ये ‘सर्वाधिक चर्चित विवाह’ असण्याचा मान पटकावलाय.

आंतरराष्ट्रीय मैगझिन आणि मीडियाने प्रियांका-निकच्या लग्नाचे फोटो, व्हिडीयो चालवले. जे ह्याअगोदरच्या बॉलीवूड लग्नांच्याबाबतीत कधीच घडले नव्हते.एवढेच नाही तर मुंबई झालेल्या रिसेप्शनचे फोटोसूध्दा सोशल मीडिया, डिजीटल आणि न्यूज प्रिंटमध्ये ट्रेंड झाले. यामुळेच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या कव्हरेजला मागे टाकत प्रियांका आणि निकचे लग्न सर्वाधिक चर्चित बनले. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विन कौल सांगतात, “निक जोन्स आणि प्रियांका चोप्रा दोघांचे लग्न दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा डिजिटल न्यूज, फेसबुक, न्यूजप्रिंट, ट्विटर, इंस्टाग्राम आणि वायरल न्यूजव्दारे चांगलेच गाजले. ”

अश्वनी कौल सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

३४ वा महान कीर्तन दरबार विविध धार्मिक कार्यकमानी तीन दिवस उत्साहात संपन्न

0

पुणे-गुरुनानक फाऊंडेशनच्यावतीने ३४ वा  महान कीर्तन दरबार विविध धार्मिक कार्यकमानी तीन दिवस उत्साहात संपन्न झाला . रास्ता पेठमधील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर गुर तेग बहादूर नगर मध्ये हा महान कीर्तन दरबार संपन्न झाला . श्री गुरु ग्रंथ साहेबांचा अखंड पाठाने सुरुवात झाली . कथा कीर्तन , गुरबानी विचार मांडण्यात आले. पहिल्या दिवशी गणेश पेठ येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा येथून दारूवाला पूल  , अपोलो सिनेमा , के इ एम हॉस्पिटल ,समर्थ पोलीस ठाणे , क्वार्टर गेट , सायकल सोसायटी यामार्गे प्रभात फेरी काढण्यात आली .हि प्रभात फेरी टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर गुर तेग बहादूर नगर मध्ये समाप्त झाली . पहिल्या दिवशी लहान मुलांचा कीर्तन दरबार झाला .यामध्ये ३०० मुले सहभागी झाले होते . यावेळी लहान मुलावर संस्कार , कविता , विविध स्पर्धा घेण्यात आल्या . यामधील विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण झाले .

या महान कीर्तन दरबारमध्ये तीन दिवस  हरमीत सिंग , जगतार सिंग , जुजार सिंग , महिन्दर सिंग आदींनी कीर्तनातून गुरु ग्रंथ साहेबांचे संदेश देण्यात आला . त्यानंतर आरदास म्हणन्यात आली . भारतीय सेनेतर्फे  अशोक चक्र प्रधान प्राप्त व सीमेवर लढताना अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल व शीख धर्माच्या सेवेसाठी गुरुनानक फाऊंडेशनच्यावतीने यंदाच्या वर्षी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सरदार मनजितसिंग कोहली यांना ” श्री गुरुनानकदेवजी पुरस्कार ” देउन सन्मानित करण्यात आले . निवृत्त लेफ्टनंट कर्नल सरदार मनजितसिंग कोहली हे भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग कोहली यांचे धाकटे बंधू आहेत . तसेच , सरदार परविंदरसिंग भाटिया यांनी सन  २००८ मध्ये नांदेड येथे झालेल्या   ” ३०० साल गुरु दे नाल ”  याकरिता विशेष सेवा केल्याबद्दल त्यांना  ” समाजसेवक पुरस्कार  ” देण्यात आला . भारतभर त्यांनी २८८ शहरात फिरून जागृती यात्रा काढून पूर्ण नानक नाम सेवा संगत याना एकत्रित केले . त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच, विशेष सामाजिक कार्याबद्दल मनजितसिंग विरदी यांचा  ” विशेष सामाजिक कार्यकर्ता  ” म्हणून सन्मानित करण्यात आले .

या महान कीर्तन दरबारचे आयोजन  गुरुनानक फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरजितसिंग राजपाल , परमजितसिंग राजपाल , संतोकसिंग राजपाल , भोलासिंग अरोरा , रणजितसिंग अरोरा , गुरुविंदरसिंग राजपाल , बॉबी सहानी , रणजितसिंग कालडा व अन्य पदाधिकाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले .   या महानकीर्तन दरबारमध्ये  माजी आमदार मोहन जोशी ,  नगरसेवक रविंद्र धंगेकर , रोहित पवार  आदी मान्यवर उपस्थित होते . 

जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे(संपूर्ण भाषण – व्हिडीओ)

0

पंढरपूर: ‘युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे. आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. मला सत्ता नकोय. जागा वाटपात मला स्वारस्य नाही. राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात,’ असा घणाघात करतानाच पिक विम्याचं कंत्राट खासगी कंपनीला दिलं. राफेलमध्ये घोटाळा झालाय. किती पापं करणार? कडुलिंबालाही किड लागलीय. हे पहिल्यांदाच असं घडतंय. करणार काय? हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागलेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

हिंमत असेल तर शिक्षा करून दाखवा
‘शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणं गुन्हा असेल तर तो गुन्हा करणारच. न्याय मागणं आणि सरकारला धारेवर धरणं गुन्हा असेल तर हा गुन्हा करणारचं. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा,’ असं आव्हान देतानाच तुमची मस्ती इथे नाही चालणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र तुमची मस्ती खपवून घेणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांच्या ठिकऱ्या उडाल्या
उद्धव यांनी सभेच्या सुरुवातीलाच पाच राज्यातील निकालावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, असं सांगतानाच आम्ही जगज्जेते आहोत असा समज असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाच राज्यातील निकालांनी ठिकऱ्या उडवल्या, अशी टीकाही त्यांनी केली.

देवाच्या नावानं जुमला कराल तर ठोकून काढू
तुम्ही अच्छे दिनचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. त्याबद्दल तुम्हाला एकवेळ माफ करू. इतर मुद्द्यावरही तुम्हाला माफ करू, पण आमच्या देवाच्या नावानं जर जुमला केला तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

पासवान, नितीशकुमारांनी राम मंदिरावर भूमिका मांडावी
जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपनं गुडघे टेकलेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे, असं सांगतानाच राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान त्यांनी दिलं. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझं तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे…?
>> या मैदानावर सभा घेण्याची कोणी हिम्मत करत नाही. म्हणून येथे सभा घेतली. कारण बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र दुसऱ्या मैदानावर सभा घेऊच शकत नाही.
>> शेतकऱ्यांसह सध्या अनेक समस्या आहे.कशावर बोलावे, कशावर नाही असा प्रश्न आहे.
>> जगज्जेते असल्याचा समज एका पक्षाने पसरवला होता. पंचायत समिती असो की, लोकसभा आम्हीच जिंकणार असेच सांगितले जात होते.
>> जगज्जेते असलेला जो समज पसरवला होता त्याच्या ठिकऱ्या पाच राज्यांनी उडवून टाकल्या.
>> पाच राज्यांपैकी मिझोरम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली
>> छत्तीसगडमध्ये बहुसंख्य आदिवासी आहेत. त्याठिकाणी पर्याय नसल्याने छत्तीसगडने आधी घर स्वच्छ करायचे म्हणून विरोधात मतदान केले.
>> महाराष्ट्रानेही हेच धाडस दाखवावे.
>> राममंदिर बांधणारच पण झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो.
>> आज पंढरपुरातही त्याचसाठी आलो आहे. तू झोपला असला तरी हिंदू जागा आहे, हे मला कुंभकर्णाला सांगायचे आहे.
>> कुंभकर्णा वेळेवर जागा हो नाही तर पेटलेला हिंदू तुला जागा करेल
>> सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार
>> हल्ली पहारेकरीही चोऱ्या करायला लागले आहेत
>> ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं वाकडं केलं, त्यांचं वाकडं कर असं विठुरायाला साकडं घातलं
>> मोदींनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण नंतर तेच म्हणतील हा निवडणुकीचा एक जुमला होता.
>> देशात शस्त्र खरेदी करण्यात घोटाळा होतो. सैनिकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळला जातो.
>> सरकारी कंपनी असताना खासगी कंपनीला कंत्राट का दिले जाते.
>> युती करायची की नाही ते जनताच ठरवेल
>> राम मंदिराचा मुद्दा मुद्दाम घेतला आहे. 20 वर्षांपासून फक्त निवजडणुका आल्या की आश्वासन दिले जाते.
>> सोहराबुद्दीनच्या हत्येच्या कटातील आरोपी निर्दोष सुटले, पण राममंदिर संबंधित खटले आजही सुरू आहेत.

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारणी करता जनजागृतीसाठी उद्धव ठाकरे सोमवारी महासभा घेऊन चंद्रभागा नदीची महाआरजी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले आहे.

अर्थिक नाहक खर्च न करता सत्यशोधक पद्धतीने विवाह करावे -रघुनाथ ढोक

0
पुणे- सप्तपदी माळी वधु वर सुचक केंद्र आणि अतुल व यश चाकणकर आयोजित वधु वर मेळावा श्री धारेश्वर बँक्वेट येथे  संपन्न झाला.
याप्रसंगी 100 वधु वरांनी सहभाग घेतला.याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ मंजिरी धाडगे यांचा व महाराष्ट्र शासनाच्या फुले साहित्य चरित्र ,साधने प्रकाशन समिती वर रघुनाथ ढोक यांची निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अक्रृरशेठ कुदळे,विकास दांगट,जेष्ठ समाजसेवक दत्तात्रय चाकणकर,रामराज्य बँकेचे बाळासाहेब रायकर ,रमेश खेडेकर ,सतिश चाकणकर, समीर धाडगे उपस्थित होते.
यावेळी मंजिरी धाडगे म्हणाले की वरांची संख्या खूप वाढली असून वधु ची संख्या सर्व समाजामध्ये कमी होत चालली आहे .मुलामुलींनी मोठया अपेक्षा ,शिक्षण या वर जास्त विचार न करता  तडजोड भूमिका घ्यावी तर ढोक यांनी  काळाची गरज म्हणून मेळावा सहभाग घेऊन नाहक खर्च न करता वेळ ,श्रमाची बचत करून सत्यशोधक  पद्धतीने व सामुदायिक  विवाह केले पाहिजे असे आवाहन  केले.
मेळाव्याची सुरवात सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले यांचे अखंड गीत गाऊन केले तर मेळावा यशस्वी करण्यासाठी सौ व श्री.किशोर भास्कर,दत्ता बनकर,हरिभाऊ दुधाळ ,अतुल चाकणकर ,आकाश ढोक ,नीता पाटील,श्रीमती कांडपीळे ,सुत्रसंचालन बारामती च्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती आशा नवले यांनी केले.

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता दशकपूर्ती सन्मान २०१८’ जाहीर

0

शिवकुमार डिगे ,अन्वर राजन ,डॉ . सुमंत पांडे ,संजय यादवराव  ठरले मानकरी

दशकपूर्ती सन्मान सोहळ्याचे २८ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजन ,सामाजिक योगदानाबद्दल दहा जणांचा होणार सन्मान 

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ जाहीर झाले आहेत.

गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे शिवकुमार डिगे (माजी धर्मादाय आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे  निबंधक -रजिस्ट्रार ,मुंबई  ),अन्वर राजन (सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ,पुणे ),  डॉ . सुमंत पांडे (संचालक ,जलसाक्षरता केंद्र ,यशदा ,पुणे ), ,संजय यादवराव (कोकण भूमी प्रतिष्ठान,मुंबई  ), डॉ. जे . बी . गारडे  (नामवंत दंत शल्य चिकित्सक,पुणे ) यांना  ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ ने गौरविण्यात येणार आहे .

किशोर धारिया (पश्चिम घाटातील पर्यावरणस्नेही पर्यटन ),राजेंद्र आवटे (ग्रामीण भागातील उद्योग संधी निर्माण ),संजय भंडारी (इलेक्ट्रॉनिक वेस्ट रिसायकलिंग )  यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता  दशकपूर्ती सन्मान’साठी करण्यात आली आहे.

संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी  पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’  च्या गुणवंत सहकाऱ्यांसाठी असलेल्या  ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी  डॉ . शैला बूटवाला (प्राचार्य,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय )आणि  जुलेखा शेख (ऑफिस सुप्रीटेंडेंट ,आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय ) यांची निवड करण्यात आली आहे.

‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१८’ चे वितरण अ . भा . मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसादिवशी  हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो .  यावर्षी डॉ . पी.ए.इनामदार यांचा ७४ वा वाढदिवस असून, सन्मानाचे  दशकपूर्ती वर्ष आहे.  सन्मानचिन्ह ,शाल ,पुष्पगुच्छ  असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

10  वर्षातील पुरस्कार सोहळ्या साठी आलेले  प्रमुख पाहुणे

निवडले गेलेले मान्यवर आणि त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे-

2009  प्रमुख पाहुणे : मोहन धारिया

  सन्मान :

  1. सारंग गोसावी (काश्मीरमधील शैक्षणिक सामाजिक काम)
  2. मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे सनदशीर लोकशाही पद्धतीचे आंदोलन करणारे व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, विलासबाबा जवळ (जावळी)

2010 प्रमुख पाहुणे : डॉ.विजय भटकर

 सन्मान :

  1. पुणे वाहतूक पोलिस शाखेला फेसबुकचा प्रभावी वापर केल्याबद्दल
  2. महामार्गांवर अपघातात मदत करणारे वाहनचालक फतेह महंमद मुजाहिद (खेडशिवापूर)

2011  प्रमुख पाहुणे : सिंधूताई सपकाळ

 सन्मान :

  1. अन्न वाया जाऊ न देणारी ‘बियाँड सेल्फ संस्था’
  2. कचरामुक्तीचा पुण्यात यशस्वी प्रयोग राबविणार्‍या ‘जनवाणी’ संस्थेच्या संचालक किशोरी गद्रे
  3. राज्यातील पहिला महिला साखर कारखाना काढणार्‍या अ‍ॅड. वर्षा माडगुळकर (सातारा)

2012 प्रमुख पाहुणे : डॉ.एस.एन.पठाण

 सन्मान :

  1. ‘अक्षरधारा’चे संस्थापक रमेश राठीवडेकर
  2. दृष्टीहीन संस्थांच्या निधी संकलनात आणि ब्रेल पुस्तक निर्मितीमध्ये मदत करणार्‍या सकीना बेदी
  3. माण देशातील दुष्काळाच्या व्यथा ‘सोशल मिडिया’तून सातत्याने पोहोचविणारे पत्रकार-छायाचित्रकार नागेश गायकवाड (आटपाडी)
  4. हरविलेल्या वाहन शोध प्रक्रियेसाठी संकेतस्थळ निर्माण करणारे अजय खेडेकर (पुणे)

2013 प्रमुख पाहुणे : संजय नहार

 सन्मान :

  1. आधुनिक तंत्रज्ञानाला ग्रामविकासाशी जोडण्याच्या कामाबद्दल डॉ. सुधीर प्रभू (अमेरिका)
  2. अनिता गोखले-बेनिंजर -पुणेे डी.पी., बी.डी.पी. संदर्भात घेतलेल्या पर्यावरणप्रेमी भूमिकेबद्दल
  3. विनोद बोधनकर आणि ललित राठी यांना ‘सागर मित्र’ संस्थेच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा निर्मूलन कार्यात शाळांचा सहभाग घेतल्याबद्दल

2014 प्रमुख पाहुणे : डॉ. बाबा आढाव

 सन्मान :

  1. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (वंचितांसाठी राजकीय-सामाजिक काम)
  2. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने
  3. कवी रमेश गोविंद वैद्य
  4. राज्याचे वनसंरक्षक सुनील लिमये
  5. भंगार मालाच्या व्यवसायातून यशस्वी उद्योजिका झालेल्या बाळू मावशी धुमाळ

2015 प्रमुख पाहुणे : डॉ. विश्‍वंभर चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते )

 सन्मान :

  1. अनंतराव अभंग- ‘मिशन फॉर ट्रास्फॉर्मेशन ऑफ रूरल एरिया’ (‘मित्र’) संस्थेचे प्रमुख, एक हजार शहरे ‘हरित, विकसित शहरे’ करण्याच्या संकल्पनेबद्दल
  2. प्रा. शमसुद्दीन तांबोळी -मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते
  3. सुनील जोशी -संघटक, जलबिरादरी पुणे (दुष्काळी भागातील नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल)
  4. डॉ.मंदार अक्कलकोटकर – (आयुर्वेदतज्ज्ञ, वृक्षप्रेमी व वनीकरण प्रसारक)

२०१६ :प्रमुख पाहुणे :डॉ कुमार सप्तर्षी 

 सन्मान :डॉ.सतीश देसाई, हेरंब कुलकर्णी (शिक्षक, सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि लेखक), संजय पवार (नाटककार आणि ज्येष्ठ लेखक), बाबा शिंदे (‘पिंगोरी’ गावाचा चेहरा जलसंधारणाच्या माध्यमातून बदलणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार)

 २०१७: प्रमुख पाहुणे  : डॉ . माणिकराव साळुंखे  (भारती विद्यापीठ कुलगुरू )

 सन्मान :चंद्रकांत दळवी, मुकेश माचकर, सुवर्णा गोखले आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’

२०१८ : प्रमुख पाहुणे  : डॉ ;लक्ष्मीकांत देशमुख (आय एस  , मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष )

  सन्मान :शिवकुमार डिगे (माजी धर्मादाय आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे  निबंधक -रजिस्ट्रार  ), डॉ . सुमंत पांडे (जलसाक्षरता केंद्र ,यशदा ,पुणे ), अन्वर राजन (सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते ,पुणे ),संजय यादवराव (कोकण भूमी प्रतिष्ठान,मुंबई  ), डॉ. जे . बी . गारडे  (नामवंत दंत शल्य चिकित्सक,पुणे )

कल्याणी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा ‘मॅड अबाउट द वर्ल्ड’ हा सिग्नेचर इव्हेंट संपन्न

0

पुणे-कल्याणी स्कूलचा  मॅड अबाउट सीरिज हा सिग्नेचर इव्हेंट येथे संपन्न झाला . अगोदर मॅड अबाउट सायन्स असे नाव असणारा हा कार्यक्रम 2015 मध्ये केवळ थोडेसे विद्यार्थी व शिक्षक यांच्यापासून सुरू झाला. तेव्हापासून, या कार्यक्रमाने मोठी पसंती मिळवली आहे आणि अधिकाधिक लोकप्रियता मिळवली आहे. या वर्षी, कल्याणी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मॅड अबाउट द वर्ल्डचे आयोजन केले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून, शाळा दरवर्षी एक विशिष्ट विषय निवडते आणि ज्युनिअर के. जी. ते ग्रेड IX पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक त्या विषयावर आधारित प्रकल्प, संशोधन, वादविवाद, चर्चा व काम करतो. त्यानुसार, वर्षभर ते याची तयारी करतात व हिवाळी सुटीसाठी शाळा बंद होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी साजरीकरण करतात.

संचालिका दीक्षा कल्याणी व संपूर्ण कल्याणी कुटुंबाकडून सातत्याने पाठिंबा; आणि प्राचार्या निर्मल वद्दन यांचे उत्कृष्ट नेतृत्व यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा परिचय झाला आहे. मॅड अबाउट सीरिज त्यातीलच एक आहे.

मॅड अबाउट द वर्ल्ड हा उपक्रम म्हणजे पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी जागरुकता वाढवण्यासाठी केलेला एकत्रित प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे, जगातील विविध देशांचा आढावा घेण्यात आला आहे – या देशांतील सण, अन्नपदार्थ, संगीत, फॅशन व जगण्याची एकंदर पद्धत.

कल्याणी स्कूलमधील विद्यार्थ्यांची तयारी व वर्षभरातील परिश्रम यांचे प्रतिक आहे – सर्जनशील व परफॉर्मिंग आर्ट स्वरूपामध्ये कौशल्यांचे सादरीकरण. हे एकजुटीचे आणि संपूर्ण जगातील एकपणाचे साजरीकरण होते. हे प्रयत्न प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतील आणि चांगुलपणा निर्माण करतील, अशी अपेक्षा आहे.

पिंपरी चिंचवड भागात उद्यम विकास बँकेचा छोट्या व्यावसायिकांना फायदा व्हावा – महापौर राहुल जाधव.

0
पुणे-एखाद्या भागात सहकारी बँकांचा शाखा विस्तार होणे हे त्या परिसराच्या आर्थिक सुबत्तेचे व त्या परिसराच्या विकासाचे लक्षण असून पिंपरी चिंचवड भागात उद्यम विकास सहकारी बँकेच्या अधिकाधिक शाखा व्हाव्यात यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे वचन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.उद्यम बँक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील बँक असून संघ संस्कारित स्वयंसेवक संचालक असून ते बँक चालवत असल्याने त्यांची समाजात विश्वासाहार्यता असून ते सचोटीने व्यवहार करतील अशी खात्री वाटते असे ही मा जगताप म्हणाले.चिंचवड गावातील केशवनगर काकडे पार्क येथे उद्यम बँकेच्या शाखेच्या स्थलांतर समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर राहुल जाधव,बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,संचालक महेश लडकत,दिलीप उंबरकर,पांडुरंग कुलकर्णी,मनोज नायर,सीताराम खाडे,राजन परदेशी,महेंद्र काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे,नगरसेवक अमोल थोरात,प्रमोद नसाल,विजय लांडे,शिवाजी शेडगे,विजय साबळे इ मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्यम बँकेमार्फत छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध व्हावे आणि त्यांना बँकेचा आधार वाटावा असा व्यवहार व्हावा अशी अपेक्षा महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केली ,तसेच बँकेच्या प्रगतीसाठी मदत करू असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडताना समाजातील सर्व स्तरांना कर्ज उपलब्ध करून देऊ असे सांगितले.तसेच बँकेने १२५ कोटींचा टप्पा गाठला असून ७७ कोटी कर्जवाटप केले आहे व सातत्याने अ दर्जा मिळविला आहे असे ही ते म्हणाले.
ए टी एम,फ्रँकिंग,वीज बिल व एल आय सी प्रीमियम भरण्याची सुविधा,व सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून,बँकेच्या दहा शाखांमधून दैनंदिन व्यवहार चालतात असे ही संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले,सीताराम खाडे यांनी सूत्र संचालन तर पांडुरंग कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

महिला व अंध-अपंगास प्रोत्साहन देणारे भीमथडीमधिल अनोखे स्टॉल

0

पुणे –
बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ असावी, बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर होता यावे, उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, असा उदात्त हेतू असणार्या भीमथडीने १३व्या वर्षात पदार्पण केले आहे. विविध संंकल्पनांनी नटलेल्या अनोख्या स्टॉल्सला यावर्षी देखील पुणेकरांकडून प्रचंड प्रेम मिळाले,  यातील २ अनोख्या  स्टॉल्सने यावेळी पुणेकरांचे विशेष लक्ष आकर्षित केले.

१७ जुन २०१९ पासुन कार्यरत असणार्या क्षितिज दिव्यांग विरंगुळा पुनर्वसन केंद्राने गेल्या तीन वर्षांपासून अंधजनांना रोजगार मिळावा आणि संस्था स्वयंपूर्ण होउन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करता यावे या उद्येशाने संस्थेची स्थापना केली आहे. वेस्ट मधून बेस्ट उपक्रमाअंतर्गत अंध-अपंग लोकांद्वारे बनविल्या वस्तू विकणारा हा स्टॉल भीमथडी सिलेक्ट मधे पहावयास मिळेल. मजुश्री कुलकर्णी यांना १२ वर्षापुर्वीया संस्थेची सुरुवात केली होती. चॉकलेट, हॅन्डमेड, ज्वेलरी, गुहसजावटीच्या वस्तू, बॅग्ज पिशव्या, खास विदर्भातील चटण्या आणि वेस्ट मधून बेस्ट प्रोडक्ट आदि सर्व या स्टॉलवरती पहावयास मिळेल.भीमथडीमध्ये लोकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

दूसरा स्टॉल म्हणजे मदर क्विल्ट्स,  एचआयव्ही पॉझिटिव्ह   व गरजू महिलांना आर्थिक लाभ मिळावा ह्या उद्येश्याने मदर क्विल्ट्सची सुरुवात झाली, इरकल गोधडी, बाळाची दूपटी हॅडलूम आणि रिसायकल संकल्पना असणारे विविध वस्त्रप्रकार या  स्टॉलवर पहावयास मिळाले, संस्थेचे संस्थापक निरज बोराटे आणि तुषार पाखरे यांनी २०१४ मध्ये मदर क्विल्ट्सची सुरुवात केली होती निरज बोराटे म्हणतात कि, आज ९ वेगवेगळ्या देशामध्ये आणि भारतात देखील खुप मोठ्या प्रमाणात आमच्या वस्तूंना मागणी आहे. आम्ही एचआईव्ही पॉजीटिव्ह आणि गरजू महिलांना प्रोत्साहित करतो, कारण आपल्या समाजाच्या मानसीकतेमुळे आजही त्यांना कुठेच काम मिळत नाही. लोक त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देतात. भीमथडीमधून आम्हाला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे मागिल दोन वर्षांपासून आम्ही भीमथडीशी जोडले गेलो आहोत. आणि मागिल वर्षिच्या तुलनेत यावर्षी आम्हाला पुणेकरांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आमच्या या अनोख्या पुढाकारास भीमथडीमुळे प्रोत्साहन मिळत आहे.

‘ अवर्षणाच्या काळात ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल ‘

0
पुणे :
ऊसशेती मध्ये ‘पीएसएपी ‘ हे संशोधित तंत्रज्ञान पूरक द्रव्याच्या स्वरूपात  दिल्यांनतर  १६० टन  एकरी विश्वविक्रमी उत्पादन आले असून  पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात आणि साखर उद्योगाच्या प्रतिकूल परिस्थितीत  ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल  अशी माहिती  ईशा ऍग्रो सायन्सेस ‘ या संशोधन संस्थेचे  संस्थापक आणि कॅटॅलीस्ट सायन्स  या शास्त्राचे  संशोधक प्रशांत नांदर्गीकर यांनी   पत्रकार परिषदेत  दिली .
या क्रांतिकारी संशोधनाची प्रत्यक्ष उपयुक्तता सिद्ध झाल्यावर माध्यमांसमोर प्रथमच जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन  पुणे श्रमिक पत्रकार संघात  करण्यात आले होते  .
सांगली जिल्ह्यातील प्रशांत लटपटे यांनी त्यांच्या सावळजवाडी येथील ऊस शेतीत हे तंत्रज्ञान वापरून १६० टन एकरी ऊस उत्पादन घेऊन विश्वविक्रम केला आहे . हा विश्वविक्रम या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला .
या पत्रकार परिषदेत  कॅटॅलीस्ट सायन्स संशोधक  प्रशांत  नंदर्गीकर    ,(‘पीएसएपी ‘ टेक्नॉलॉजी ),डॉ . डी . जी .हापसे (माजी संचालक ,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ),संदीप पाटील (संचालक ,इशा ऍग्रो सायन्सेस प्रा . लि . ),नितीन देशपांडे (सुक्रोटेक इंजिनियरिंग प्रा . लि ),ईशा  नंदर्गीकर उपस्थित होते  .

नंदर्गीकर म्हणाले ,’ ‘पीएसएपी ‘  म्हणजे ‘पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘  हा मोलेक्युल होय . हे  मोलेक्युल बिनविषारी ,पर्यावरण स्नेही उत्पादन  पावडर स्वरूपात वापरता येते . हे तंत्रज्ञान साखर उद्योगाला सद्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकते .’पीएसएपी ‘  हे एकरी ४  ते ५ किलो या प्रमाणात वापरता येते . चार ते पाच फवारण्यातून देता येते . ‘पीएसएपी ‘ हे पिकांवर येणाऱ्या जैविक ,अजैविक ताणावर काम करते . आंतरिक रोग प्रतिकारक क्षमता वाढवते . त्यामुळे पीक सक्षम  होते  आणि उसाची गुणवत्ता वाढते . याचे कोणत्याही पिकावर दुष्परिणाम होत नाहीत .
१४ वर्षांपूर्वी ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ प्रशांत नंदर्गीकर यांनी शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर फॉस्फरसला कॅटॅलिटिक तंत्राने ऍक्टिव्हेट केले . नंतर त्याला स्प्लिट करून पोटॅश जोडला . चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने या मोलेक्युल चा उदय झाला . ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा प्रथम वापर  ‘प्रोफाईट ‘ नावाने नाशिकमध्ये द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला . आता हे तंत्र द्राक्ष ,डाळिंब उत्पादक शेकतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे .
‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर ६ वर्षांपूर्वी ‘इशा ऍग्रो सायन्सेस ‘च्या पुढाकाराने उसावर सुरु झाला . ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ४ वर्षे चाचण्या घेतल्यावर सकारात्मक परिणाम दिसले . पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच उत्तर प्रदेश गन्ना अनुसंधान केंद्र येथे ३ वर्षे ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला . प्रति एकर ५ किलो ‘पीएसएपी ‘ वापरून सर्वसाधारण १० टन वाढीव ऊस उत्पादन आणि ०. ३ टक्क्याने साखर उतारा वाढल्याचे नोंद झाले आहे .
प्रशांत लटपटे यांना राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली . लटपटे यांनी ७७ गुंठ्यांमध्ये या तंत्राचा वापर केला . आजमितीस त्यांना एकरी १६० टन ऊस उत्पादन मिळाले आहे . ऊस ५० दिवसांचा झाल्यावर प्रत्येकी ७ दिवसांनी ‘पीएसएपी ‘ फवारणीची सुरुवात केली . एकूण ८ फवारण्या केल्या . ‘पीएसएपी ‘ चा एकूण वापर एकरी १० किलो केला . एकरी उसाची संख्या ३५ ते ४० हजार निघाली . पेऱ्यांची सरासरी संख्या ४८ ते ५५ नोंद झाली . उसाचे सरासरी वजन ३. किलोपासून ६ किलोपर्यंत नोंदले गेले .
अनेक मान्यवर ऊस तज्ज्ञांनी या विक्रमाची नोंद घेतली आहे . महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे ,सांगली विभागाचे उप कृषी संचालक मकरंद कुलकर्णी ,कृषी अधिकारी श्री . मेडीदार,श्री . चव्हाण ,श्री .बडगुजर ,,राहुल माने ,यांनी  भेट देऊन विश्वविक्रमी उत्पादनाची नोंद घेतली  आणि प्रशंसा केली .
आय . आय .एस . आर . (लखनौ ) येथील डॉ . योगेश थोरात ,डॉ . ज्ञानेश्वर बोरसे ,महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ . विकास खैरे ,डॉ . श्रीहरी हसबनीस ,डॉ . दिलीप काठमाळे ,डी . एस .टी . ए येथील ऊस तज्ज्ञ डॉ . सुभाष शिंदे ,मच्छिन्द्र भोकरे ,बारामती एग्रो चे ऊस विकास अधिकारी प्रवीण भाट ,इशा एग्रो सायन्सेस चे संचालक संदीप पाटील ,मयूर जयस्वाल ,ऊस अधिकारी विजय नवनाळे यांच्या उपस्थितीत डॉ . ज्ञानेश्वर हापसे यांनी १६० टन विश्वविक्रमी ऊस उत्पादन निघाल्याचे नुकतेच जाहीर केले .
पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात साखर उद्योगाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी   ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ,त्यातून दिलेला ‘ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘ हा आपण दिलेली भेट ठरणार आहे ,असे नंदर्गीकर यांनी यावेळी सांगितले .
संदीप पाटील म्हणाले ,”पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर आम्ही साखर कारखान्याबरोबर संलग्न काम करून ,त्याचा प्रसार कारखान्याच्या  ऊस उत्पादक सभासदांमध्ये करतो . गोदावरी  बायो रिफायनरी (समिरवाडी ) या कारखान्या सोबत  ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ चे काम सुरु झाले असून पहिल्या टप्प्यात ५ हजार एकर आणि दुसऱ्या टप्प्यात २० हजार एकर क्षेत्रावर ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे .
या संलग्न प्रयत्नामुळे दोन वर्षे अवर्षणात अडकलेला हा कारखाना ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व परिस्थितीत येऊ लागल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ ने हेल्पलाईनची  स्थापन केली असून 09372618677 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे .

सनबर्न फेस्टिवल रद्द व्हावा यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना निवेदन

0

पुणे- शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने ऍड .राहुल म्हस्के,गिरीश गुरनानी यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. विनोद तावडे साहेब यांना ता. मुळशी येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत निवेदन दिले यावेळी  मंत्री तावडे  यांनी सनबर्न फेस्टिवल ला सांकृतिक खात्या तर्फे कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही याचे आश्वासन दिले.

सनबर्न फेस्टिव्हल रद्द करा, पुण्यात होणाऱ्या  सनबर्न फेस्टिव्हलला पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध आहे ,
‘सनबर्न फेस्टिव्हल’ हा दारूड्या संस्कृतीचा व मली पदार्थांचा खुला बाजार आहे. हा  समाजविघातक सनबर्न फेस्टिव्हल दि. 29 ते 31 डिसेंबर 2018 रोजी बावधान, पुणे येथे होणार आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही.सनबर्न फेस्टिव्हलला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री 10 वा. बंद केले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते.. यामुळे तरूण पिढीवर प्रचंड वाईट परिणाम होतात. या वाईट संस्कृतीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन व आमली पदार्थाचे सेवन करून दररोज धिंगाना करत फिरतात.पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे व महाराष्ट्राला चांगली दिशा देणारे शहर आहे. पुणे जिजाऊ – शिवरायांचे, महात्मा फुले व जेधे -जवळकरांचे आणि 12 मावळा प्रांत असे पुरोगामी शहर आहे. शिक्षणाचे ‘हब’ असून सर्व धर्मांची संस्कृती जपणारे शहर आहे. याच पुण्यात हा धर्मद्रोही उत्सव चालणार नाही.कोर्टाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार स्पिकर लावून, वेळेची मर्यादा पाळून आदेश पाळले जातात. मात्र सनबर्न फेस्टिव्हलवर कोणतेही नियम व अटी पाळले जात नाहीत. असे या निवेदनात म्हटलेले असल्याचे गिरीश गुरनानी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्याचे प्रयत्न -शिक्षणमंत्री विनोद तावडे

0

महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशनात संस्थाचालकांशी साधला संवाद   

पुणे – महाराष्ट्र शासन हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याला वेळोवेळी संस्थाचालकांनी सहकार्य केले आहे. यापुढेही शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यामध्ये सर्व संस्थाचालकांचा सकारात्मक सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन शालेय, उच्च, तंत्रशिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते आज आळंदी येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय दळणवळण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. यावेळी कार्यकारिणी सदस्य अजित वडगावकर, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर, कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर,  माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, कोणतीही संस्था चालवणे हे सोपे काम नसते. एखादी संस्था उभी केल्यानंतर ती  शासकीय नियमांप्रमाणे चालवणे आवश्यक असते. हे सर्व काम सोपे व्हावे यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती अवलंबली आहे. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत. शिक्षण म्हणून विचार करत असताना सर्वच विषयांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक असते. शिक्षक, शिक्षणसंस्था व पदाधिकारी आणि शासन हा एकच परिवार आहे. आपण एकत्र आल्यास अधिकाधिक गुणी विद्यार्थी महाराष्ट्रात घडतील, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला.

श्री. तावडे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यकाळात आपण केवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार न करता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,  यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचा कोणत्या विषयात रस आहे, त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहे, या बाबीचा अभ्यास करणे आता महत्त्वाचे बनले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग तसेच स्पोकन इंग्लिश या बाबींवर भर दिला आहे. शासनाच्या धोरणामुळे चांगल्या शिक्षणसंस्था मजबूत होणार आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.

यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी उपस्थितांमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधला. तसेच त्यांचे शंकानिरसन केले. शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशन आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दोन दिवस चालणार असून त्याचा समारोप रविवारी (दि. 23) होणार आहे.

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वजलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. गौरव महाराष्ट्राचा महाविजेता युवा गायक कौस्तुभ गायकवाड यांनी यावेळी ईशस्तवन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यानंतर विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, अजित वडगावकर व विजय नवल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कार्यकारिणी सदस्य अशोक मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.