‘ अवर्षणाच्या काळात ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल ‘

Date:

पुणे :
ऊसशेती मध्ये ‘पीएसएपी ‘ हे संशोधित तंत्रज्ञान पूरक द्रव्याच्या स्वरूपात  दिल्यांनतर  १६० टन  एकरी विश्वविक्रमी उत्पादन आले असून  पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात आणि साखर उद्योगाच्या प्रतिकूल परिस्थितीत  ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ऊस शेतीला तारेल  अशी माहिती  ईशा ऍग्रो सायन्सेस ‘ या संशोधन संस्थेचे  संस्थापक आणि कॅटॅलीस्ट सायन्स  या शास्त्राचे  संशोधक प्रशांत नांदर्गीकर यांनी   पत्रकार परिषदेत  दिली .
या क्रांतिकारी संशोधनाची प्रत्यक्ष उपयुक्तता सिद्ध झाल्यावर माध्यमांसमोर प्रथमच जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन  पुणे श्रमिक पत्रकार संघात  करण्यात आले होते  .
सांगली जिल्ह्यातील प्रशांत लटपटे यांनी त्यांच्या सावळजवाडी येथील ऊस शेतीत हे तंत्रज्ञान वापरून १६० टन एकरी ऊस उत्पादन घेऊन विश्वविक्रम केला आहे . हा विश्वविक्रम या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला .
या पत्रकार परिषदेत  कॅटॅलीस्ट सायन्स संशोधक  प्रशांत  नंदर्गीकर    ,(‘पीएसएपी ‘ टेक्नॉलॉजी ),डॉ . डी . जी .हापसे (माजी संचालक ,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ),संदीप पाटील (संचालक ,इशा ऍग्रो सायन्सेस प्रा . लि . ),नितीन देशपांडे (सुक्रोटेक इंजिनियरिंग प्रा . लि ),ईशा  नंदर्गीकर उपस्थित होते  .

नंदर्गीकर म्हणाले ,’ ‘पीएसएपी ‘  म्हणजे ‘पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘  हा मोलेक्युल होय . हे  मोलेक्युल बिनविषारी ,पर्यावरण स्नेही उत्पादन  पावडर स्वरूपात वापरता येते . हे तंत्रज्ञान साखर उद्योगाला सद्याच्या अडचणीतून बाहेर काढू शकते .’पीएसएपी ‘  हे एकरी ४  ते ५ किलो या प्रमाणात वापरता येते . चार ते पाच फवारण्यातून देता येते . ‘पीएसएपी ‘ हे पिकांवर येणाऱ्या जैविक ,अजैविक ताणावर काम करते . आंतरिक रोग प्रतिकारक क्षमता वाढवते . त्यामुळे पीक सक्षम  होते  आणि उसाची गुणवत्ता वाढते . याचे कोणत्याही पिकावर दुष्परिणाम होत नाहीत .
१४ वर्षांपूर्वी ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचे शास्त्रज्ञ प्रशांत नंदर्गीकर यांनी शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर फॉस्फरसला कॅटॅलिटिक तंत्राने ऍक्टिव्हेट केले . नंतर त्याला स्प्लिट करून पोटॅश जोडला . चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने या मोलेक्युल चा उदय झाला . ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा प्रथम वापर  ‘प्रोफाईट ‘ नावाने नाशिकमध्ये द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला . आता हे तंत्र द्राक्ष ,डाळिंब उत्पादक शेकतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे .
‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर ६ वर्षांपूर्वी ‘इशा ऍग्रो सायन्सेस ‘च्या पुढाकाराने उसावर सुरु झाला . ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ४ वर्षे चाचण्या घेतल्यावर सकारात्मक परिणाम दिसले . पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच उत्तर प्रदेश गन्ना अनुसंधान केंद्र येथे ३ वर्षे ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला . प्रति एकर ५ किलो ‘पीएसएपी ‘ वापरून सर्वसाधारण १० टन वाढीव ऊस उत्पादन आणि ०. ३ टक्क्याने साखर उतारा वाढल्याचे नोंद झाले आहे .
प्रशांत लटपटे यांना राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली . लटपटे यांनी ७७ गुंठ्यांमध्ये या तंत्राचा वापर केला . आजमितीस त्यांना एकरी १६० टन ऊस उत्पादन मिळाले आहे . ऊस ५० दिवसांचा झाल्यावर प्रत्येकी ७ दिवसांनी ‘पीएसएपी ‘ फवारणीची सुरुवात केली . एकूण ८ फवारण्या केल्या . ‘पीएसएपी ‘ चा एकूण वापर एकरी १० किलो केला . एकरी उसाची संख्या ३५ ते ४० हजार निघाली . पेऱ्यांची सरासरी संख्या ४८ ते ५५ नोंद झाली . उसाचे सरासरी वजन ३. किलोपासून ६ किलोपर्यंत नोंदले गेले .
अनेक मान्यवर ऊस तज्ज्ञांनी या विक्रमाची नोंद घेतली आहे . महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे ,सांगली विभागाचे उप कृषी संचालक मकरंद कुलकर्णी ,कृषी अधिकारी श्री . मेडीदार,श्री . चव्हाण ,श्री .बडगुजर ,,राहुल माने ,यांनी  भेट देऊन विश्वविक्रमी उत्पादनाची नोंद घेतली  आणि प्रशंसा केली .
आय . आय .एस . आर . (लखनौ ) येथील डॉ . योगेश थोरात ,डॉ . ज्ञानेश्वर बोरसे ,महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ . विकास खैरे ,डॉ . श्रीहरी हसबनीस ,डॉ . दिलीप काठमाळे ,डी . एस .टी . ए येथील ऊस तज्ज्ञ डॉ . सुभाष शिंदे ,मच्छिन्द्र भोकरे ,बारामती एग्रो चे ऊस विकास अधिकारी प्रवीण भाट ,इशा एग्रो सायन्सेस चे संचालक संदीप पाटील ,मयूर जयस्वाल ,ऊस अधिकारी विजय नवनाळे यांच्या उपस्थितीत डॉ . ज्ञानेश्वर हापसे यांनी १६० टन विश्वविक्रमी ऊस उत्पादन निघाल्याचे नुकतेच जाहीर केले .
पाणीटंचाई ,अवर्षणाच्या काळात साखर उद्योगाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी   ‘ पीएसएपी ‘ तंत्रज्ञान ,त्यातून दिलेला ‘ऍक्टिव्ह फॉस्फरस ‘ हा आपण दिलेली भेट ठरणार आहे ,असे नंदर्गीकर यांनी यावेळी सांगितले .
संदीप पाटील म्हणाले ,”पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर आम्ही साखर कारखान्याबरोबर संलग्न काम करून ,त्याचा प्रसार कारखान्याच्या  ऊस उत्पादक सभासदांमध्ये करतो . गोदावरी  बायो रिफायनरी (समिरवाडी ) या कारखान्या सोबत  ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ चे काम सुरु झाले असून पहिल्या टप्प्यात ५ हजार एकर आणि दुसऱ्या टप्प्यात २० हजार एकर क्षेत्रावर ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे .
या संलग्न प्रयत्नामुळे दोन वर्षे अवर्षणात अडकलेला हा कारखाना ‘पीएसएपी ‘ तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्व परिस्थितीत येऊ लागल्याचे या पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ‘इशा एग्रो सायन्सेस ‘ ने हेल्पलाईनची  स्थापन केली असून 09372618677 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे...

धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत...

अमेरिकेच्या धमकीनंतर 7 देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये पोहोचले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमक्यांनंतर...