पुणे-कल्याणी स्कूलचा ‘मॅड अबाउट’ सीरिज हा सिग्नेचर इव्हेंट येथे संपन्न झाला . अगोदर ‘मॅड अबाउट सायन्स’ असे नाव असणारा हा कार्यक्रम 2015 मध्ये केवळ थोडेसे विद्यार्थी व शिक्षक यांच्यापासून सुरू झाला. तेव्हापासून, या कार्यक्रमाने मोठी पसंती मिळवली आहे आणि अधिकाधिक लोकप्रियता मिळवली आहे. या वर्षी, कल्याणी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मॅड अबाउट द वर्ल्ड’चे आयोजन केले.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून, शाळा दरवर्षी एक विशिष्ट विषय निवडते आणि ज्युनिअर के. जी. ते ग्रेड IX पर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक त्या विषयावर आधारित प्रकल्प, संशोधन, वादविवाद, चर्चा व काम करतो. त्यानुसार, वर्षभर ते याची तयारी करतात व हिवाळी सुटीसाठी शाळा बंद होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी साजरीकरण करतात.
संचालिका दीक्षा कल्याणी व संपूर्ण कल्याणी कुटुंबाकडून सातत्याने पाठिंबा; आणि प्राचार्या निर्मल वद्दन यांचे उत्कृष्ट नेतृत्व यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा परिचय झाला आहे. ‘मॅड अबाउट’ सीरिज त्यातीलच एक आहे.
मॅड अबाउट द वर्ल्ड हा उपक्रम म्हणजे पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी जागरुकता वाढवण्यासाठी केलेला एकत्रित प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे, जगातील विविध देशांचा आढावा घेण्यात आला आहे – या देशांतील सण, अन्नपदार्थ, संगीत, फॅशन व जगण्याची एकंदर पद्धत.
कल्याणी स्कूलमधील विद्यार्थ्यांची तयारी व वर्षभरातील परिश्रम यांचे प्रतिक आहे – सर्जनशील व परफॉर्मिंग आर्ट स्वरूपामध्ये कौशल्यांचे सादरीकरण. हे एकजुटीचे आणि संपूर्ण जगातील एकपणाचे साजरीकरण होते. हे प्रयत्न प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतील आणि चांगुलपणा निर्माण करतील, अशी अपेक्षा आहे.