Home Blog Page 3012

सिंगापूरचे भारतातील पर्यटन उद्योगातील समूहांना बळकटी आणण्यासाठीचे विशेष प्रयत्न

0

एसटीबी इंडियाकडून कॉरपोरेट्सचा अनुभव वाढविण्यासाठी चर्चेसाठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी एमआयसी सेमिनार आणि व्यापार प्रतिबद्धता कार्यक्रम

मुंबई : आशियातील सर्वात प्रमुख कार्यक्रमांचे विक्रमी आयोजनाचा लौकिक असलेल्या सिंगापूरने ज्ञान, कल्पना आणि व्यवहारिक हस्तांतरणासाठी नवोन्मेषी संकल्पनांना विचारात घेऊन बैठका, अधिवेशनं, चर्चासत्रे, प्रदर्शन आयोजित करण्यासाठी एमआयसीईचे आयोजन केले आहे. पर्यंटन उद्योगातील नवीन शक्यता विचारात घेऊन जागतिक बँकेने व्यवसायासाठी (जगातील व्यापारिक 2018 अहवाल, जागतिक बँक) जगातील सर्वात सोपे व सोयीचे स्थान म्हणून सिंगापूरला मान्यता दिली आहे आणि 2018 मध्ये प्रतिष्ठित टीटीजी ट्रॅव्हल अवार्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बीटीएमईसी सिटी असे नामकरणदेखील केले गेले आहे. सिंगापूरने 2.46 दशलक्ष अभ्यागतांचे 2017 मध्ये केले तर बीटीएमआयसी अभ्यागतांचा आकडा 2018 च्या पहिल्या सहामाहीत 1.3 दशलक्ष इतका होता.

201 9 मध्ये भारतातील पहिले एमआयसीई इव्हेंट बंद करून सिंगापूर टूरिझम बोर्ड (एसटीबी) ने “मिटिंग अँड इंटेन्सिव्ह ट्रव्हल टू सिंगापूर – फोर्जिंग न्यू पॉसिबिलिटीज ” या विषयावर मुंबईत एक विचार मथन करणारे चर्चासत्र आयोजित केले होते. या कार्यक्रमात सीव्हेंटचे विपणन आणि भागीदारी विभागाचे प्रमुख गोकुल बजाज यांनी प्रामुख्याने व्यवस्थापकीय स्तरावर उपाययोजना म्हणून क्लाउड-आधारित एंटरप्राइझ इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मसह एक मुख्य भाष्य प्रस्तुत केले. “आपल्या उद्योगातील लोकांना उत्तमरित्या जोडण्यासाठी एमआयसीई इंडस्ट्रीचे तंत्रज्ञान कसे प्राप्त करू शकेल?” या विषयावर यानिमित्ताने चर्चा झाली. गोकुल बजाज, सुश्री एकता त्यागी, उपाध्यक्ष व एम्वे इंडियाच्या विशेष कार्यक्रमाच्या प्रमुख, एस. डी. नंदकुमार, अध्यक्ष व कंट्री हेड – बीटूबी – एसओसीटी ट्रॅव्हल लि. यांनी या चर्चेत भाग घेतला. या कार्यक्रमाचे परिक्षण जी. बी. श्रीथर, प्रादेशिक संचालक (दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका), सिंगापूर पर्यटन मंडळ यांनी केले.

आशियातील आउटडोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लुडोविक ओडियर यांनी आयोजित केलेल्या लेगो सिरीयस प्लेमुळे एम अँड आय ट्रॅव्हलर्सच्या विभिन्न उपक्रमांविषयी उपस्थितांना जाणून घेता आले. जेणेकरून प्रवाशांना सिंगापूरमध्ये उच्च, प्रभावी तसेच कार्याचा अनुभव घेता येईल तसेच त्याच्या प्रतिबद्धतेसाठी नेमके काय करता येईल, याचा विचारविनिमय यावेळी करण्यात आला. उपस्थित असलेल्या नवीन एमआयसीई स्थळांवर, एसटीबी द्वारे प्रदान केलेल्या प्रोत्साहन योजना आणि एम आणि आय गटांसाठी सिंगापूरमध्ये उपलब्ध विविध प्रकारचे रोमांचकारी बाबीदेखील यानिमित्ताने उपस्थितांना जाणून घेता आल्या. या कार्यक्रमात 150 भारतीय ट्रॅव्हल एजंट आणि 40 सिंगापूर हॉटेल, एअरलाइन्स, आकर्षणे, गंतव्य व्यवस्थापन कंपन्या (डीएमसी) आणि क्रूझ ऑपरेटरनी प्रतिनिधित्व केले.

सिंगापूर टूरिझम बोर्डने, एमईसीई प्रवाशांच्या पसंतीच्या स्थानासाठी सिंगापूरमधील काही स्थळांना निश्चित केले आहे. याबाबत एसटीबीच्या प्रयत्नांविषयी बोलताना, सिंगापूर पर्यटन मंडळाचे क्षेत्रीय संचालक (दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका) जी. बी. श्रीथर म्हणाले की, सिंगापूर व्यापारवृद्धीसाठी मध्यस्थ आणि कॉर्पोरेट्सनी समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद, गेल्या काही वर्षांत आम्ही एम अँड आय ट्रव्हलर्सच्या निर्यातीत निरंतर वाढ नोंदविली गेल्याचे पाहत आहे. त्यामुळे या वैचारिक तसेच कृतींना बळकटी आणण्यासाठी एमआयसीईचे चर्चासत्र हे प्रासंगिक आहे, एम अँड आय मधील गटांना त्यांच्या प्रवासाच्या अनुभवांना आणि कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी आवश्यक बाबींना तसेच त्यांच्या भूमिकांना आम्ही विचारात घेत आहेत. व्यापार सहभाग कार्यक्रमाने भारतीयांना प्रवास घडवून आणणा-या उद्योजकांना नवनवीन कल्पनांची देवाणघेवाण करण्यास आणि सिंगापूर पर्यटन भागीदारांशी संबंध आणखी मजबूत करण्यास सक्षम केले. आम्ही यावर्षी सिंगापूरला चांगल्या संख्येने एम आणि आय गटांना आमंत्रित करण्यास आनंदी आणि उत्सुक आहोत.

जानेवारी ते नोव्हेंबर 2018 पर्यंत एमआयसीईसह सर्व पर्यटकांना विचारात घेता सिंगापूरने 1.32 दशलक्ष भारतीय अभ्यागतांचे स्वागत केले, जे 2017 मध्ये याच कालावधीपेक्षा 14.4% जास्त आहेत. भारत अद्याप सिंगापूरचे तिसरे सर्वात मोठे स्त्रोत आणि बाजारपेठ राहिला आहे.

‘मतदार जागृती परिषद’ तर्फे २० जानेवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन

0
पुणे :’मतदार जागृती परिषद’या मंचातर्फे  २० जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी पुण्यात सभेचे आयोजन   करण्यात आले आहे . ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा होणार असून अनेक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक ,धर्मगुरू त्यात सहभागी होवून विचार मांडणार आहेत .
 डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे .
रविवार, दिनांक २० जानेवारी २०१९,सकाळी ११ वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पत्रकार भवन शेजारी,नवी पेठ, पुणे येथे ही सभा होणार आहे .
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते),डॉ. सर्जेराव निमसे (मा. कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड),श्रीरंजन आवटे (युवा लेखक-कार्यकर्ते ),मौलाना निजामुद्दीन (धर्मगुरू),संजय सोनवणी (लेखक, विचारवंत ),सुरेश खोपडे (निवृत्त पोलीस महानिरीक्षक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे वक्ते सहभागी होणार आहेत .

‘ रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर ‘ चे १९ जानेवारी रोजी हडपसर येथे उद्घाटन

0
पुणे :मज्जा संस्थेशी निगडित  अर्धांगवायू आणि इतर आजारांवर उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन  करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त  ‘ रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर ‘ ची स्थापना हडपसर येथील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.
या सेंटरचे उद्घाटन  शनीवारी १९ जानेवारी रोजी ,सकाळी सव्वानऊ वाजता  सहयाद्री हॉस्पिटल ,हडपसर येथे होणार आहे. ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘ने यासाठी पुढाकार घेतला असून ४० लाख खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.
 ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘ च्या अध्यक्ष अमृता देवगावकर ,माजी अध्यक्ष गणेश जाधव ,गिरीश मठकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .
 बायोडेक्स बॅलन्स सिस्टिम, बायोडेक्स सीट टू स्टँड ट्रेनर, पाब्लो सिस्टिम, इन्फ्रारेड लेझर थेरपी, मॅट्रीक्स रिदम थेरपी, लिव्हा को- ऑर्डिनेशन डायनॉमिक थेरपी मशीन अशी उपचार सामग्री पुण्यात प्रथमच उपलब्ध होत आहे .रुग्णांना सवलतीच्या दरात या सुविधा उपलब्ध होतील .
रोटरी  क्लब  डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डॉ .शैलेश पालेकर यांच्याहस्ते सेंटर चे उद्घाटन होणार आहे .माजी प्रांतपाल अभय गाडगीळ ,सह्याद्री हॉस्पिटल ग्रुप चे अध्यक्ष डॉ चारुदत्त आपटे उपस्थित राहणार आहेत .रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१,३८०० ,रोटरी क्लब आकुर्डी ,रोटरी क्लब पाषाण ,रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांनी या प्रकल्पात ग्लोबल ग्रांट पार्टनर म्हणून सहकार्य केले आहे .

पक्ष्यांच्या गावात १९, २० जानेवारी रोजी किलबिल संमेलन

0

पुणे :

शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या *स्कायसायक्यू (SkySciQ)* तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे पौड रोड ,भोर राजगड, वनराई, 95 बिग एफएम, इत्यादी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या “पक्षी संवर्धन – शोधनिबंध” स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ दिनांक 19, 20 जानेवारी रोजी भोरमधील स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्रात घेण्यात येणार आहे.

विद्यार्थी, पालकांची उत्सुकता जागृत करणारे आणि त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे, हे अभिनव किलबिल संमेलन पक्ष्यांचे गाव या नावाने उदयास येत असलेल्या पिसावरे (भोर) गावी संपन्न होत आहे.

पर्यावरण रक्षणार्थ विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो निसर्गप्रेमी विद्यार्थी आणि शिक्षकांचा ह्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्था प्रमुख श्रीमती दीप्ती मोहन पुजारी यांनी सांगितली.

या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करून त्या पक्ष्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, स्पर्धेच्या निकषानुसार त्यांना आलेले अनुभव आणि सुचलेल्या उपाययोजना आपल्या शब्दांत लिहून तो शोधनिबंध संस्थेकडे सादर केला आहे.

सदर निबंधांपैकी निवडक निबंधाचे सादरीकरण विद्यार्थी या संमेलनात करणार आहेत. ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना एकूण 4 लाख रुपयांची शिष्यवृत्ती ह्या स्पर्धेच्या निमित्ताने स्कायसायक्यु संस्था देणार आहे. ह्यासोबतच ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, डॉ गिरीश जठार, डॉ संजीव नलावडे इत्यादी अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे.

*पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील करिअर संधी* ह्या विषयावर शनिवारी दुपारी 4.30 ते 6.30 या वेळात ह्या तज्ज्ञासोबत चर्चासत्र आयोजित केले असून, ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम जे बंड्या करणार आहेत.

हा चर्चासत्राचा कार्यक्रम सर्व पक्षीप्रेमींसाठी खुला आहे.

पुणे महापालिकेचे 6085 कोटींचे अंदाजपत्रक सादर

0

 

पुणे : महापालिका आयुक्तांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ३९७ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने त्यात ४७३ कोटींनी  वाढ करत ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, चालू वर्षांत महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे २०१९-२० या वर्षाचे अंदाजपत्रक ६ हजार कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा पार करणार का याबाबत उत्सुकता होती. मात्र आयुक्तांनी ५ हजार ८५ कोटींचे अंदाजपत्रक करीत हा टप्पा पार केला आहे.

आयुक्तांच्या बजेटमधील नवीन प्रकल्प व योजना : 

*पालिकेच्या प्रकल्पांचे व योजनांचे त्रयस्त संस्थेमार्फत अवलोकन करण्याबरोबरच सामाजिक संस्थाकडूनही केले जाणार अवलोकन

*कामाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी सामाजिक व परिणामकारक अवलोकन करण्यावर भर

*एचसीएमटीआर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार

*पीएमपीएमएल ताफ्यात ई- बस, सीएनजी व वातानुकूलीत बसचा समावेश होणार

*मेट्रो, प्रधानमंत्री आवास योजना, समान पाणीपुरवठा योजना, जायका प्रकल्प पूर्ण करण्यास विशेष प्रयत्न

*पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसाठी पुरेशा निधीची तरतूद

पालिकेचे ३० टक्के उत्पन्न वाढीसाठी पुढील गोष्टींवर भर : 

* समाविष्ट गावामधील मिळकतींना  मिळकत कर लावणे

*मिळकतकर न लावलेल्या शहरातील मिळकतींचा शोध घेऊन या मिळकतींना कर लावणे

*अनधिकृत इमारतींमधील घरांना एक पट दराने कर आकारणी केली जाणार असल्याने कर भरणाऱ्यांची संख्या वाढणार

*थकीत पाणीपट्टी वसूल करण्यावर भर

*पालिकेच्या मालकीच्या मिळकतींचा जास्तीत जास्त वापर

*आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधुनिकीकरण करून उत्पन्न वाढवणे

– जाहिराती मधून 111 कोटीचे उत्पन्न अपेक्षित

– अंधांसाठी ऑडियो लायब्ररी

– शिक्षकांचे वेतन पहिल्यांदाच संगणकीकरणाद्वारे देणार

– शाळांमध्ये रोबोटिक्स लॅब आणि संगीत वर्ग

– शिक्षण मंडळ 329 कोटी तरतूद. 5 नवीन मॉडेल स्कुल सीएसआर आणि महापालिका करणार

– शिवसृष्टीसाठी प्रयत्न करणार

– बाणेर येथे आर. के लक्ष्मण कलादालन

– घोले रस्ता येथे पहिली सिटी लायब्ररी. दृक-श्राव्य स्वरुपात पुस्तके उपलब्ध होणार

– व्यवसायिक प्रशिक्षणासाठी 7 नवीन लाईट हाऊस उभारणार  

– स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी

– पालिकेच्या 34 इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प

– कोथरूड भागात ‘बोलणारी झाडे’ प्रकल्प

– तुकाई माता उद्यानात लिली आणि रॉक पार्क

– सुगम्य भारत योजने अंतर्गत उद्यानात विशेष सुविधा

– 2019-20 मध्ये पहिले घर वाटप करण्याचे उद्दिष्ट

– आवास योजनेत 21 हजार घरे बांधणार

– 23 गावात लोकल एरिया प्लॅन राबविणार. लोकल एरिया प्लॅनसाठी केंद्रकडून मिळणार अनुदान

– 11 गावातील बांधकामे अधिकृत करणार

– 11 गावाचा ईएलयु जाहीर करणार

– 11 गावात नवीन टीपी स्कीम राबविणार

– महापालिका उभारणार बर्न वॉर्ड

– आणखी 3 ठिकाणी डायलिसीस सुविधा देणार

– आरोग्य विभाग 246 कोटी

– प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी प्रत्येक विभागाचा स्वतंत्र ऑनलाईन डॅशबोर्ड करणार

– नागरिकांची मते, तक्रारींसाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करणार

सिंहगड रस्ता धायरीला वाय आकाराचा पूल

– औंध सांगावी रस्त्यावर नवा आणखी एक पूल

– राजाराम पूल येथे आर्ट प्लाझा

– हडपसर आणि रामटेकडी येथे भुयारी मार्ग. बोपोडी चौकात भुयारी मार्ग

– वडगाव शेरी येथील नवीन पार्किंग तळ विकसित करणार

– 12 जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करणार

– 100 किलोमीटरचे रस्ते पाहिल्या टप्प्यात सुरक्षित करणार

– 1400 किलोमीटर रस्त्याचे रोड असेंट मॅनेजमेंट सिस्टम नुसार रस्त्याचा बदल करणार

– 100  किलोमीटर रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट करणार

– 1 जानेवारी 2020 पासून उरुळी देवाची यातील कचरा डेपो बंद करणार

–  एचसीएमटीआर रस्ता 211 कोटी रुपयांची तरतूद

– असा होणार 2019-20 चा खर्च

* सेवकवर्ग 1665 कोटी
* कर्ज- व्याज परतफेड 78 कोटी
* वीज, देखभाल दुरुस्ती 255 कोटी
* पाणी खर्च 170 कोटी
* इतर खर्च 1095 कोटी
* औषध – घसारा 200 कोटी
* प्रभागस्तरीय- 34 कोटी
* क्षेत्रीय कार्यालय 82 कोटी
* भांडवली कामे 1843 कोटी
* पाणी पुरवठा प्रकल्प 707 कोटी

– असे येणार 6085 कोटीचे उत्पन्न 
* एलबीटी अनुदान 200 कोटी
* जीएसटी अनुदान 1808 कोटी
* मिळकतकर 1721 कोटी
* पाणीपट्टी 450 कोटी
* अनुदान 239 कोटी
* बांधकाम शुल्क 750 कोटी
* कर्ज रोखे 200 कोटी
* इतर 602 कोटी

– पीएमपीसाठी 375 कोटी तरतूद

– 200 कोटीचे नवे कर्ज रोखे घेणार

– नदी सुधारणासाठी 80 कोटी

– उत्पन्नात 30 टक्के वाढ करणार

– नवीन कर आकारणी मिळकती वाढविणार

– कर रचना बदलणार

 

परस्पर संवाद, समुपदेशातून होईल व्यसनमुक्ती- मुक्ता पुणतांबेकर

0

पुणे : “अपेक्षांच्या ओझ्यातून येणारा ताण, ‘टेस्ट’ घेण्याची उत्सुकता, सामाजिक दबाव यातून माणूस व्यसनांच्या जाळ्यात अडकतो. याशिवाय, आजचे तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आभासी माध्यमातून बाहेर पडून परस्परांतील संवाद आणि व्यसनांच्या आहारी गेलेल्यांचे योग्य समुपदेशन यातूनच व्यसनमुक्ती शक्य होईल,” असे प्रतिपादन मुक्तांगण व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी केले.

समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी आणि नीती-मूल्यांच्या शिक्षणातून समाजस्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता पुणतांबेकर ‘व्यसनाधीनता आणि आपण’ या विषयावर बोलत होत्या. संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, उद्योजक यशराज पारखी, बॉल स्टेट युनिव्हर्सिटीच्या मिलर कॉलेज ऑफ बिझनेसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुशील शर्मा, बॉल स्टेट युनिव्हर्सिटीतील डॉ. मारी तेरेसा, इनोसर्वचे सहसंस्थापक राहुल जैन आदी उपसाठो होते.

मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, “कामामुळे, अपेक्षाभंगामुळे येणारा ताण, सामाजिक प्रतिष्ठा, वाईट संगत यामुळे तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. पालकांकडून त्यांना पुरेसा वेळ दिला जात नाही, हेही कारण त्यामागे आहे. ग्रामीण आणि शहरी बायकांमध्ये व्यसने वाढत आहेत. त्यांच्याकडून सुपरवूमेन बनण्याची आकांक्षा त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तरुणाई इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात असून, सोशल मीडिया, पॉर्नसाईट्स यामध्ये अडकली जात आहे. त्यामुळे त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन व भूमिका महत्त्वाची आहे. एकमेकांमध्ये संवाद वाढायला हवा.’’

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “तंबाकू, दारू, गुटखा, जंक फूडचे सेवन, सोशल माध्यमांचा अतिवापर, स्क्रीनचे व्यसन यासह मनातील वाईट विचार, सायबर गुन्हेगारीला बळी पडणे, त्यातून निर्माण होणारा ताण-तणाव, नात्यांमधील दुरावा अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ, मार्गदर्शकांना बोलावून त्यामार्फत विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांच्या मनाची मशागत करून सदृढ, सुंदर मन घडविण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी एकमेकांशी चांगले वागावे, संवाद ठेवावा, यासाठी नीतिमूल्यांची शिकवण दिली जाणार असून, त्याची सुरुवात सूर्यदत्ता ग्रुपच्या विद्यार्थी-शिक्षकांपासून केली जाणार आहे. त्यानंतर ही चळवळ देशव्यापी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच एका ऍपची निर्मिती केली जाणार आहे.”

भावना व्यक्त करण्याचे मार्ग बदलले

0

काही वर्षांपूर्वी नव-या मुलीच्या मनाची घालमेल ही अगदी लग्न ठरल्यापासूनच्या क्षणापासून असायची. घरच्यांनाही चिंता असायची, आणि मग सासरी जाण्याचा क्षण जवळ येताना भावनांचा बांध फुटायचा. पण आताच्या मोबाईल आणि फेसबुकच्या जमान्यात ही परिस्थिीती बदलली आहे हे मात्र खरे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलीच्या घरच्यांना ही काळजी असायची. आता स्वतंत्र संसार असतो त्यामुळे सासरी अ‍ॅडजस्टमेंट करण्याचा प्रश्‍न तसा येत नाही. मुलीही आता मुलांइतक्याच शिकलेल्या सवरलेल्या आहेत. आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्य आहे, बहुतेक ठिकाणी स्वयंपाकाला बाई आहे मग माहेरी स्वयंपाक करत होत्या की नाही किंवा स्वयंपाक येत होता का याचा प्रश्‍नच येत नाही. आणि आता यु- टुब वरून ही नवीन पदार्थ शिकण्याची सोय झाली आहेच की. आणि त्यातूनच अंगावर पडले की शिकतात अनुभवातून.   माझी एक जीवाभावाची मैत्रीण आहे. लग्नाआधी  तिला स्वयंपाक काही विशेष येत नव्हता. शिक्षणाच्या निमित्ताने ती हॉस्टेलवर होती 4 वर्षे आणि त्याच दरम्यान तिच्या आईचे ही निधन झाले. घरात बाकी कोणी बाई माणूस नाही त्यामुळे स्वयंपाक शिकायचाच राहीला. लग्न करुन ती अमेरिकेला गेली. वडिलांना चिंता हिचे कसं होणार? पण हळूहळू सगळं शिकली. आता ती फेसबुकवर चॅटिंग करताना एकेक मजेशीर अनुभव सांगते आणि काही गोष्टी विचारून पण घेते. आज तिच्या वडिलांचे डोळे हे सगळं ऐकताना सुखाने पाणावतात. मोबाईलसारख्‍या संवादांच्‍या साधनांमुळे विवाहित मुलींना  कधीही घरच्यांशी संपर्क साधणे सहज सोपे झाले आहे.

थोडक्यात, काय तर मुलींची माहेराविषयी माया पातळ झाली नाही तर,   विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात सगळ्या सोयी सुविधा आल्या.  प्रत्यक्ष भेटी-गाठीतून होणारा आनंद आणि त्यामुळे व्यक्त होणा-या भावना व्यक्त करण्याचे मार्ग मात्र बदलले गेले आहेत.

– पुर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

पुण्याचं पाणी बंद केलं तर पोलिसात तक्रार करू पाटबंधारे ला महापौरांचा इशारा

0

पुणे : जलसंपदा विभागाने काल पुर्वसूचना न देता पुण्याचे पाणी बंद केल्याने महापाैर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज तातडीची बैठक घेतली. त्यात जर पुन्हा अशा पद्धतीने जलसंपदा विभागाने पुण्याचे पाणी बंद केले तर पाेलिसात तक्रार दाखल करु असा भावनिक इशारा टिळक यांनी जलसपंदा अधिकाऱ्यांना दिला.पुण्याच्या पाण्यावरुन राजकारण पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. बुधवारी जलसंपदा विभागाने पर्वती जलशुद्धीकरण विभागाला देण्यात येणारे पाणी अचानक बंद केले. त्याचे तीव्र पडसाद उपटले. महापाैर मुक्ता टिळक यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेत पुण्याची पाणी कपात करण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या. महापाैर म्हणाल्या, काल अचानक पाणी पुरवठा बंद करुन पुणेकरांना दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला. त्यामुळे आज जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत मी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली. अशा पद्धतीने पाणी बंद करण्याचा अधिकार पाठबंधारे विभागाला नाही. आम्हाला पाेलिसात जाण्याची वेळ जलसंपदा विभागाने आणू नये. 1350 एम एल डी पाणीपुरवठा पुणे पालिकेला केला जाताे. ताे यापुढेही असाच सुरु ठेवण्याचे पत्र पालिका आयुक्त पाठबंधारे खात्याला देणार आहेत.जलसंपदा विभागाला पाणी कपात करायची असेल तर मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. ताेपर्यंत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊ नयेत. पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन देखील टिळक यांनी केले.

पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी

0

पुणे–बेसुमार पाणी वापरणाऱ्या पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाने दणका दिला असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे पुण्यातील सिंहगड रस्ता, नवशा मारुती-चुनाभट्टीजवळील परिसर जलमय झाला आहे. जलकेंद्राच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरातील आठ ते दहा घरांमध्ये पाणी शिरले आहे.

कालवा सल्लागार समिती, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बेसुमार पाणी वापरणाऱ्या महापालिकेला जलसंपदा विभागाने तिसऱ्यांदा दणका दिला आहे. पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा विभागाकडून बंद करण्यात आले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ- वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल 2 तास हे पाणी वाहत होते. या बिघाडामुळे परिसरातील काही भागांमधील रस्त्यावर चार फूट पाणी साचले होते.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद असल्याने सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत होता. मात्र, त्यात अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली.

हेल्मेट सक्ती संदर्भात ..महापौरांची डबल ढोलकी (व्हिडीओ)

0

पुणे-भाजपचे शहर अध्यक्ष सांगतात आमचा शहरात हेल्मेट सक्ती राबवायला विरोध आहे ,सभागृहनेते सांगतात ,आमचा विरोध आहे ,आम्ही सक्ती विरोधात  महापालिकेत तहकुबी मांडू .. आणि या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौरांनी मात्र हेल्मेटसक्ती वर काहीशी असपष्ट ,दुटप्पी ..सोप्याच शब्दात सांगायचं तर डबल ढोलकी भूमिका घेतल्याचे आज दिसले आहे . या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या मुख्य सभेत कोण कोण नगरसेवक हेल्मेट सक्तीच्या बाजूने पोलिसांना दंडवसुलीसाठी कौल देतील आणि कोण कोण नगरसेवक  नागरिकांवर कारवाई करू नये म्हणून हेल्मेट सक्तीच्या विरोधात कौल देणार हे स्पष्ट दिसणार आहे …. भाजपचे संदीप खर्डेकर ,राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील ,कॉंग्रेस चे रमेश बागवे या शिवाय अंकुश काकडे ,शांतीलाल सुरतवाला ,संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे ,मनसे च्या रुपाली पाटील आशिष साबळे आदींनी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आंदोलने केलीत आणि त्यासाठी इशारेही दिलेत . या सर्व परिस्थितीत महापौरांच्या आजच्या वक्तव्याने हेल्मेट सक्ती संदर्भात  ..महापालिकेतील  नेत्यांमधून नेमक्या प्रतिक्रीया उमटतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे … तोवर पहा .. भाजपचे शहर अध्यक्ष गोगावले काल काय म्हणाले होते … सभागृह  नेते भिमाले काल काय म्हणाले होते .. आणि आज नेमक्या यावर महापौर काय म्हणाल्यात …

व्यवसायकर विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन

0

पुणे,दि.16 :- महाराष्ट्र व्यवसायकर कायदा- १९७५अन्वये नावनोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक, संस्था, धंदा, व्यापारी किंवा व्यावसायीक यांना व्यवसायकर नोंदणी प्रक्रियत सहकार्य करण्यासाठी व्यवसायकर विभाग, यांच्याकडून विशेष नोंदणी अभियान ९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत राबविण्यात येत आहे.व्यवसायकर कादयाअंतर्गत नावनोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक, संस्था, धंदा, व्यापारी किंवा व्यावसायीक इत्यांदींना व्यवसायकराची नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरीता शासनआपल्या दारी या उपक्रमानुसार, व्यवसायकर अधिकारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करुन घेतली जाणार आहे. तसेच नोंदणीकरीता बाजारपेठा, मॉल, व्यावसायीक केंद्रे, औद्योगिक वसाहती या ठिकाणी नोंदणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

त्याबाबतचे ठिकाण, तारीख www.mahagst.gov.in  या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. याबरोबरच वस्तु व सेवाकर भवन, तळ मजला, विमानतळ रोड, येरवडा, पुणे ४११००६, येथे मदत कक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी अनोंदीत नावनोंदणी, नोंदणी करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसायकर पुणे विभागाचे अप्पर राज्यकर आयुक्त विलास इंदलकर, राज्य सहआयुक्त प्रदीप चिन्नी व राज्यकर उपायुक्त श्रीमती मनिषा वाघमोडे यांनी केले आहे.

दोन वर्षात 3200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील – ऊर्जामंत्री

0

– एकूण 8 विषयांची अढावा बैठक

– इन्फ्रा-2, आयपीडीएस, दिनदयाल उपाध्याय,एचव्हीडीएस योजनेची कामेमार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

– ग्रामपंचायतींसह सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर येणार

मुंबई : येत्या दोन वर्षात महावितरणद्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील अशी माहीती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयत झालेल्या एका बैठकीत दिली. या बैठकीत महावितरणच्या 16 झोन मधील प्रत्येक मुख्य अभियंताकडून 200 मेगावॅट सोलर प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, विश्वास पाठक उपस्थित होते.

राज्यातील सर्व नळयोजना, उपसासिंचन योजना (खाजगी व शासकीय) तसेच ग्रामपंचायत मधील सर्व शासकीय इमारती (शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, आरोग्य केंद्रे) सौर ऊर्जेवर आणाव्यात या बाबत ऊर्जामंत्री यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा संवर्धन धोरणा अंतर्गत या योजना राबवण्यात याव्या तसेच या योजनेकरीता 500 कोटीचे बजेट तयार करून मंत्रीमंडळा समोर सादर करण्याचे निर्देशही ऊर्जामंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ऊर्जासंवर्धन धोरणा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महावितरण कडून या योजना राबविण्यात येतील.

या बैठकीत एचव्हीडीएस, इन्फ्रा – 2, दिनदयाल उपाध्याय व आय‍पीडीएस योजनेबाबतही आढावा घेण्यात आला. मार्च 2019 पर्यंत इन्फ्रा 2, दिनदयाल उपाध्याय तसेच आयपीडीएस योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री यांनी महावितरणला दिले. मुंबई, नवीमुंबई, पनवेल, कल्याण, औरंगाबाद, चंद्रपूर, ठाणे व नांदेड विभागात आयपीडीएसची कामे महानगर पालिकेद्वारे रस्ता पुर्नस्थापना दर मान्य न केल्यामुळे पूर्ण झाली नाहीत ती पूर्ण कराव्यात तसेच एचव्हीडीएस योजनेत ज्या भागात विद्युत वाहक यंत्रणा पोहचणे शक्य नाही त्या भागात सोलार कृषी पंप देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. राज्यात 750 मेगावॅट सोलार प्रकल्प महाजनकोद्वारे राबवण्यात येणार आहेत. यापुढे सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरण कडून तर महाजनको कडून मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड

0

मुंबई : महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर श्री. भालचंद्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी दि. १५ जानेवारी २०१९ रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

श्री. भालचंद्र खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दि. २३ ऑगस्ट १९८९ रोजी चंद्रपूर परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून ते दि. २३ एप्रिल २००७ रोजी काटोल विभागात रुजू झाले. दि. २२ फेब्रुवारी २००८ ते दि. ५ मे २०११ पर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून काँग्रेसनगर विभाग येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कॉग्रेसनगर विभागाने राज्यातील पहिल्या तीन विभागात स्थान पटकाविले होते, यादरम्यान त्यांनी कॉग्रेसनगर विभागात पायाभुत सुविधा उभारण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले.

दि. ९ मे २०११ रोजी त्यांची अधीक्षक अभियंता पदावर मुंबई मुख्यालयात बढती झाली. त्यानंतर गणेशखिंड शहर मंडल कार्यालय येथे ते अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. मुंबई मुख्यालयात प्रारंभी मुख्य अभियंता (वितरण) आणि त्यानंतर मुख्य अभियंता (वाणिज्य) या दोन्ही पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. दि. १६ मे २०१७ रोजी त्यांची प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात निवड झाली.

प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत असताना सौभाग्य योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी तेथील गावकऱ्यांसोबत चर्चा करून ऊर्जीकरणाची कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच राज्यात एचव्हीडीएस योजनेचे काम सर्वप्रथम नागपूर विभागात त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले.

नवीन वीजजोडण्यासाठी ऑनलाईनव्दारे दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार अर्ज

0

मुंबई : शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाईनव्दारेच करावे, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून मागील दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार ३४८ ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केले असून त्यांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

नवीन ग्राहकांना पारदर्शकपणे व त्वरित वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणने मोबाईल ॲप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१८ पासून नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाईनव्दारेच करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ग्राहकांना ऑनलाईनव्दारे अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोडवून ऑनलाईनव्दारेच अर्ज करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ या दोन महिन्यांत महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ९३ हजार ९० ग्राहकांचे तर मोबाईल ॲपव्दारे १४ हजार २५८ ग्राहकांचे नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय ऑनलाईन संबंधित विविध स्त्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे २ लाख २४ हजार २४२ नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्राहकांनी नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन सुविधेचाच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी केले आहे.

स्त्री संतांच्या कार्याचे होणार भरतनाट्यम नृत्य नाटिकेतून दर्शन !

0
पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या   सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘भारतीय कला केंद्र ‘ प्रस्तुत  ‘ समर्पण   ‘ या  भरतनाट्यम नृत्य नाटिकेचे   शुक्रवारी ,१८ जानेवारी  रोजी आयोजन   करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे  सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल ,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली .
संत कान्होपात्रा ,संत मुक्ताई ,संत जनाबाई या ३ स्त्री संतांची कार्याची  रूपे मांडणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत .  मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची असून लेखन अनघा काकडे यांचे आहे . नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे यांचे आहे . संगीत स्मिता महाजन यांचे आहे . अनुश्री केतकर ,श्रिया एकबोटे ,प्रज्ञा कदम ,बिलंदी कुलकर्णी ,भार्गवी अत्रे ,श्रद्धा पवळे ,आदी सहभागी होणार आहेत .
 भारतीय विद्या  भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे .