स्त्री संतांच्या कार्याचे होणार भरतनाट्यम नृत्य नाटिकेतून दर्शन !
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘भारतीय कला केंद्र ‘ प्रस्तुत ‘ समर्पण ‘ या भरतनाट्यम नृत्य नाटिकेचे शुक्रवारी ,१८ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल ,अशी माहिती भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली .
संत कान्होपात्रा ,संत मुक्ताई ,संत जनाबाई या ३ स्त्री संतांची कार्याची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत . मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची असून लेखन अनघा काकडे यांचे आहे . नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे यांचे आहे . संगीत स्मिता महाजन यांचे आहे . अनुश्री केतकर ,श्रिया एकबोटे ,प्रज्ञा कदम ,बिलंदी कुलकर्णी ,भार्गवी अत्रे ,श्रद्धा पवळे ,आदी सहभागी होणार आहेत .
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे .