Home Blog Page 3004

‘कोण होणार करोडपती’ लवकरच सोनी मराठीवर

0

नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी

सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची

गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम

म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी

टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही

आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं

नवं पर्व घेऊन येत आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या  सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा

असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार ? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा

करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार?आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स

कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न  आता सगळ्यांच्या मनात आहेतच.  यासगळ्याच गोष्टी हळूहळू

उलगडणारआहेत… लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ च्या नव्या पर्वात…

आमची सोसायटी – अलंकार सोसायटी

0
साल १९७१ …  एरंडवणे भागातील गणेशनगर ते कर्वेनगर या भागात जाण्यासाठी ओढ्याचा वापर करावा लागत असे . सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या कर्वेनगरमध्ये पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यानंतर या भागात जाण्या येण्याचा संपर्क तुटत होता. ह्या गोष्टीवर आज कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु १९७१ साला पर्यंत हेच इथले वास्तव होते .
ह्या भागातील सर्वात जुन्या १९६३ साली स्थापन झालेल्या प्रतिथयश अश्या आमच्या अलंकार सहकारी गृह रचना संस्थेने स्वतःच्या मालकीच्या जागेतूनच नव्हेतर स्वखर्चाने गणेशनगर — ते कर्वेनगर भागास जोडणारा पूल १९७१ साली बांधला व त्या नंतर कर्वेनगरचा खऱ्या अर्थाने विकास सुरु झाला. नुसता पूल बांधला असे नव्हेतर स्वतःच्या मोकळ्या जागेतून अन्य सोसाट्यांना जाण्या साठी रास्ता उपलब्ध करून दिला. कर्वेनगर भागाच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकीतून अलंकार पोलीस चौकी साठी सुद्धा सोसायटीच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील काही जागा दिली .
आज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री दत्त  मंदिराची उभारणी सुद्धा अलंकारसोसाटीने स्वतःच्या जागेत केली . परंतु आमच्या सोसायटीला एवढे दिवस स्वतःचे क्लब हाऊस नव्हते, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्री खाडिलकर यांनी दिली.
“अलंकार सोसायटी च्या क्लब हाऊसचा भूमिपूजन समारंभ संपन्न “
——————————————————————
२४ जानेवारी २०१९ रोजी चतुर्थीच्या शुभदिनी अलंकार सोसायटीच्या क्लब हाऊसचे भूमिपूजन नगरसेविका सौ मंजुश्रीताई संदीप खर्डेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . या कामात असणारे असंख्य अडथळे नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर  यांनी दूर केले व त्यामुळेच हे क्लब हाऊस पूर्णत्वास जात आहे .
सोसाटीचे अध्यक्ष श्री सुधीर खाडिलकर यांनी सभासदांना व उपस्थितांना क्लब हाऊस ची माहिती दिली. क्लब हाऊसचे वास्तुविशारद श्री प्रकाश कुलकर्णी व भा ज प चे शहर उपाध्यक्ष श्री संदीप खर्डेकर यांचा त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व मदतीबद्दल सोसाटीचे अध्यक्ष व सचिव सौ रजनी जोशीराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सोसाटीचे संस्थापक सदस्य श्री अरविंद जोशीराव प्रसिद्ध वास्तुविशारद श्री बाळासाहेब अधिकारी, श्री पारसनीस, तसेच प्रसिद्ध ज्वेलर्स अक्षय गाडगीळ,श्री योगेश कुलकर्णी व संस्थेचे सभासद मोट्या संख्येने उपस्थित होते . संस्थेच्या सचिव सौ रजनी जोशीराव यांनी आभार प्रदर्शन केले .

‘गांधीजींची पुनर्भेट’ विशेषांकाचे बुधवारी प्रकाशन

0
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. ३० जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.१५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, लोकशाहीसाठी समंजस संवाद व डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्क आणि गांधी व्हिजन फिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेषांक प्रकाशित होत आहे.
कोल्हापूर येथील ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे व ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या हस्ते ‘गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे व बार्शी येथील प्रा. रुपाली नारकर यांची विशेष उपस्थिती असणार आहेत, असे लोकशाहीसाठी समंजस संवादचे संपादक अरुण खोरे, डॉ. विकास आबनावे व इतर संयोजकांनी कळविले आहे.

रुग्णवाहिकांना मार्ग द्या,जीव वाचवा स्केटिंगद्वारे चिमुकल्यांची जनजागृती !

0
पुणे –वाहतुकीत अडलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग न मिळाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर हेल्प रायडर्सग्रुपतर्फे आयोजित दुचाकी रॅलीमध्ये चिमुकल्यांनी स्केटिंगद्वारे रुग्णवाहिकांना मार्ग द्या, रुग्णांचा जीव वाचावा या घोषणा देत जनजागृती केली.  
 प्रजासत्ताक दिनी शनिवार दि. २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता झाँशी राणीलक्ष्मीबाई चौक,जंगली महाराज रस्ता येथून गिव्ह वे सेव्ह लाईफ या जनजागृती दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला.  ही रॅली महापालिका भवन मार्गे, शिवाजीरस्ता , शनिवारवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई, स्वारगेट येथून टिळक रस्ता ,अभिनव चौकातून बाजीराव रस्ता येथून शनिपार चौक तेथून लक्ष्मी रस्ता मार्गे अलका टॉकीज चौक येथे पोहचल्यानंतर त्यात विनर्स स्केटिंग अकॅडमीचे वय वर्षे सहा ते ११ वर्षांची मुले- मुली सहभागी होत फर्ग्युसन महाविद्यालय  रस्ता , मॉर्डन कॉलेजवरून जंगली महाराज रस्ता  या मार्गावर  स्केटिंगद्वारे घोषणा देत जनजागृती केली. झाँशी राणी लक्ष्मीबाई चौक येथे रॅलीचा समारोप झाला.या उपक्रमाचे संयोजन  हेल्प रायडर्स ग्रुपचे प्रशांत कनोजिया, सुदीन जायाप्पा , अजित जाधव,  प्रवीण पगारे, बाळासाहेब ढमाले, राहुल वाघवले, दर्शन किराड,डॉ. रोहित बोरकर, अतुल भारती, सचिन ननावरे, बाळा अहिवळे, अमोल शिंदे, संतोष पोळ, संदीप कुदळे, सचिन डाकले, समीर गांधी,प्रदीप खळदकर ,श्रीकांत कुंभारे , निलेश मारणे , सागर इंगळे आदींनी केले. 

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

0
पुणे : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत शिकत आहे. सान्वीने प्रांजल पानसे व अन्वी बांगर यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, गुवाहाटी, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण १५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तीनवेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले सिद्धू क्षेत्री हे सान्वीचे वडील असून, त्यांच्याकडून ती या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.

कीर्तनातून उलघडवले ; सामाजिक स्तरावर दानमहात्म्य

0

पुणे-संगीताला एक अनोखी अशी परंपरा लाभली आहे. कीर्तनाचे २ संप्रदाय आहेत त्या पैकी नारदीय कीर्तन नुकतेच औंध येथील अक्षरबनहॉल येथे जेष्ठ कीर्तनकार कीर्तन विशारद ह भ प निवेदिता नचिकेत मेहेंदळे यांचे सुश्राव्य आणि संस्कृतने परिपूर्ण अभ्यासपूर्ण कीर्तनसादर झाले.
प्रथम उत्तररंगात ‘आर्त भूता द्यावे दान खरे पुण्य त्या नावे ‘या मधून दानाचे महत्व त्यांनी निरुपणातून मांडले. यात रक्तदान ,नेत्रदान,अन्नदान ,अर्थदान असे दानाचे प्रकार आणि महत्व सामाजिक दृष्ट्या दाखले देऊन स्पष्ट केले.त्या नंतर उत्तररंगात श्रीकृष्ण दान हेआख्यान अत्यंत रंगतदार सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळवली.
अंती माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा संदेश या माध्यमातून सर्व श्रोत्यांना देण्यात आला.यावेळी निवेदिता यांना दमदारतबलासाथ तन्मयी मेहेंदळे यांची लाभली तर हार्मोनियमची सुरेल साथ माणिक दामले यांची लाभली. या संपूर्ण मैफलीचे आयोजनशैलजा दामले आणि सहकारी यांनी केले.या कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती .

‘सीएम चषक’ची फायनल मुंबई, पुणे आणि अहमदनगरमध्ये मंगळवार पासून

0

> राज्यभरातून ४३ लाख लोकांनी सहभाग घेतला> एकूण ८,०२,०७१ सामने आयोजित> स्पर्धक सुमारे १,९१,९११ तास खेळले

> प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १५,००० प्रतियोगी> जिल्हास्तरीय सामन्यांत ५००० विजेते> राज्यस्तरावर एकूण १२९ विजेते

> ३५ हजारहून अधिक तरुण तरुणी येणार मुंबईत> राज्यस्तरीय अंतिम समारोपाच्या तयाऱ्यांनी घेतला वेग

मुंबई: महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषक’चे राज्यस्तरीय अंतिम सामने मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात पार पडतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून एकूण ४५ लाखांहून अधिक स्पर्धकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष, आमदार योगेश टिळेकर आणि मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वात ‘सीएम चषक’च्या समारोपाची तयारी जोमाने सुरु आहे. क्रिकेटचा राज्यस्तरीय अंतिम सामना अहमदनगरमध्ये २९ जानेवारी (मंगळवार)पासून सुरु होणार आहे. सीएम चषक’च्या सांगता सोहळ्यात ३ फेब्रुवारीला युवा महासंगमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यतील सुमारे ३५ हजारांहून जास्त तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येतील.

‘सीएम चषक’ स्पर्धेत क्रीडा आणि सांस्कृतिक अशा एकूण १२ स्पर्धांमध्ये गाव, गल्ली आणि सोसायट्यांसहित प्रत्येक शाळा, कॉलेज आणि विधानसभा तसेच जिल्हास्तरांवर ८,०२,०७१ सामने आयोजित करण्यात आले. या स्पर्धा एकूण १,९१,९११ तासांपर्यंत चालल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरासरीने १५,००० स्पर्धकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, ज्यात राज्यस्तरावर एकूण ३७,००० स्पर्धक विजेते घोषित झाले. जिल्हा स्तरावर ५००० स्पर्धक विविध स्पर्धामध्ये विजेते झाले. राज्यस्तरावर एकूण १२९ विजेते घोषित होतील. स्पर्धेच्या अंतिम समारोप सोहळ्यात महाराष्ट्र स्तरावरच्या विजेत्यांना २८ लाखांची पारितोषिके प्रदान केली जातील.

युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विधायक टिळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सीएम चषक’मधील क्रिकेटचे राज्यस्तरीय अंतिम सामने २९ ते ३१ जानेवारीपर्यंत अहमदनगर मध्ये आणि कुस्तीचे राज्यस्तरीय सामने पुण्यात ३१ जानेवारी रोजी होतील. व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, कॅरम, ऍथलेटिक्स, रांगोळी, पेंटिंग, गायन आणि नृत्य स्पर्धांचे अंतिम सामने २ व ३ जानेवारीला मुंबईत होतील. या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीतल्या सामन्यांसाठी मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ‘सीएम चषक’च्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ३५ हजारांहून जास्त तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येतील, असे भारतीय यांनी सांगितले.

कोथरूड मध्ये तिरंगा सन्मान रॅली

0

पुणे-
‘भारतमाता की जय’,’वंदे मातरम्’; अशा घोषणा देत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुमारे ५०० हून अधिक युवकांनी काढलेल्या ‘तिरंगासन्मान मोटर सायकल रॅली’मुळे सारा कोथरूड ,बाणेर , बालेवाडी पाषाण परिसर दुमदुमून गेला. तारका फौंडेशनचे अध्यक्ष युवा नेतेआशिष कांटे यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीची सुरुवात कोथरूड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून झाली.सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा सलग सहा तास चाललेल्या या रॅली मध्ये आग्र भागी असणाऱ्या जीप मध्ये भारताचामोठा तिरंगा ध्वज फडकत होता.
वाहतुकीला अडथला न येऊन देता ३-३च्या रांगेत मोटर सायकलवरून चाललेल्या या युवकांनी हातात तिरंगी झेंडे आणि विविध घोष वाक्यांचेफलक घेतले होते.;आपला परिसर स्वच्छ ठेवा,;पर्यावरणाचे रक्षण करा,बेटी बचाव -बेटी पढाव,मुलगा होवो अथवा मुलगी पेढेच वाटा -अशाप्रकारचे विविध सामाजिक संदेश देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
अतिशय शिस्तबद्ध रीतीने कोथरूड ,कर्वेनगर ,पौडरस्ता, चांदणी चौक ,पाषाण ,सुतारवाडी ,सोमेश्वरवाडी ,बाणेर आणि बालेवाडी अशीमार्गक्रमणा करीत पाषाण येथील श्री शिव छत्रपतींच्या पुतळ्यापाशी या विराट रॅलीचं समारोप झाला. या प्रसंगी देशाने आणि समाजानेमाझ्यासाठी काय केले या ऐवजी मी देशासाठी आणि समाजासाठी काय केले हा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजेअसे सांगून या विराट रॅलीचेसंयोजक आशिष कांटे यांनी तरुणांनी संघटीत व्हावे .आणि त्यातून निर्माण झालेल्या उर्जेतून समाजातील प्रश्न आणि मतदार संघातील विकासाचे प्रश्नसोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या प्रसंगी माजी नगर सेविका सौ सुषमा प्रमोद निम्हण , अशोक दळवी, निलेश सुतार , मयूर सुतार , समीर उत्तरकर ,अमित खाणेकर,संदीप कुंबरे , किशोर मारणे, तुकाराम जाधव , अमर भगत ,कुमार खळदकर ,अजिंक्य सुतार ,कुमार पाषाणकर आदि मान्यवर उपस्थित होते .

महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा संपन्न

0

पुणे-महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचा राज्यस्तरीय स्नेह मेळावा  संपन्न झाला . या स्नेहमेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ सुभाष साळुंके यांच्याहस्ते करण्यात आले . तर महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते  दत्ता साने यांच्याहस्ते करण्यात आले .

या स्नेहमेळाव्यास महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव  हेंद्रे , उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम , खजिनदार तानाजी सुर्वे , हवेली पुणेचे नायब तहसीलदार संजय भोसले ,राज्य महावितरणचे अभियंता शिवाजी वायफळकर , कामगार उपायुक्त अंकुशराव मोरे , माजी नगरसेविका सुरेखा निकम , गीतांजली सारगे, जयश्री हेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ सुभाष साळुंके यांनी सांगितले कि , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आपण आज शासनामध्ये उच्च पदावर काम करू शकलो . शासकीय सेवेतून समाजकारण करता येते . समाजातून स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी निर्माण केले पाहिजेत . त्यासाठी तरुणांना मार्गदर्शन आपण करू असे आश्वासन दिले .

यावेळी महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव  हेंद्रे यांनी सांगितले कि , समाज विकासासाठी समाजातील अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मार्गदर्शन करावे . तसेच , समाजहिताच्या दृष्टीने वधू वर सूचक विनामूल्य सेवा सुरु केली . समाजासाठी समाजहिताच्या दृष्टीने जोशी समाज धर्म शाळा विनामूल्य देण्यात येईल . समाजातील अडीअडचणी  समाजातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्ननाने सोडविल्या जातील . असे महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव हेंद्रे यांनी सांगितले .

यावेळी डॉ सुभाष साळुंके , संजय भोसले , बाळासाहेब श्रीपती हेंद्रे , गीतांजली सारगे , सुरेखा निकम , अश्विनी सावंत , जयश्री हेंद्रे , तानाजी सुर्वे , तानाजी पारगे , सुभाष साळुंके भानुदास मोरे , गणेश जोशी आदि मान्यवरांना शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले . तसेच ,महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांच्याहस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले .

या  स्नेहमेळाव्यामध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासराव  हेंद्रे सूत्रसंचालन रविंद्र जोशी तर आभार संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांनी मानले . 

जुन्नर महाविद्यालय व डॉ.मंडलिक यांना पुरस्कार

0
जुन्नर/आनंद कांबळे
 जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना अनुक्रमे “उत्कृष्ठ महाविद्यालय”(ग्रामीण) व “उत्कृष्ठ प्राचार्य” पुरस्कार देवून रोटरी इंटर नॅशनल पुणे डीस्ट्रीकट,यांनी सम्मानित केले.
रोटरी इंटर नॅशनल समाजातील शैक्षणिक,औद्योगिक,शास्त्र,इंजिनिअरिंग,आर्थिक क्षेत्रातील विशेष कार्य करणा-या संस्था.व व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करत असते.जुन्नर तालुक्यातील आदिवासी,डोंगराळ व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचा बौधिकच नव्हे तर सामाजिक व आर्थिक दर्जा वाढविण्यासाठी गेले पन्नास वर्ष श्री शिव छत्रपती महाविद्यालय कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व विश्वस्थांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी महाविविद्यालायाचा विकास करत असून पुणे विद्यापीठ क्षेत्रात एक नामवंत आणि उपक्रमशील महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाचा नाव लौकिक आहे.
महाविद्यालयात अकरावी ते संशोधनापर्यंतचे शिक्षण दिले जात आहे.त्या शिवाय बीबीए,बीसीए,आय.टी.व इलेक्ट्रोनिक्स,अभ्यासक्रम अद्यावत संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून चालविले जातात.परंपरागत शिक्षणाबरोबर महाविद्यालयाने विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी युजीसी प्रस्तुत जी.आय.एस.टॅव्हल.अॅड.टुरिझम,Functional English,Enviornment protection,Womens study Centre,Humanright, Remidial Coaching ,Financial Accounting Etc.सुरु केले आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवत मार्च २०१८ मध्ये १२ वी सायन्स चा निकाल ९७.५ % लागला.आहे विद्यापीठ परीक्षेत कु.श्रेया सर्जीने,कु.प्रियांका शिंदे ( रसायनशास्त्र) कु.पोर्णिमा गवारी (गणित) यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.तर एम.एस्सी.प्राणीशास्त्र विषयाचा निकाल १००% लागला.विद्यार्थांना शिक्षणाची विविध शाखातून ज्ञानाची दारे उघडी केल्याने महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी परदेशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत देखील आहे.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेंना,कमवा व शिका योजना,महिला अभ्यास केंद्र,विद्यार्थी व विद्यार्थिनी कल्याण मंडळ,वाड्मय मंडळ,प्रभावीपणे विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक हे संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची धुरा प्रभावीपणे सांभाळीत आहे.त्यांनी इंग्रजी विषयात पीएचडी.केलेली असून जपान,श्रीलंका,इंडोनेशिया इ.देशात भारतीय संस्कृती कार्टून फिल्मस आणि पर्यावरण व मानवी जीवन या विषयावर व्याख्याने दिली असून ३७ शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेली चार पुस्तके लिहिली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदातून रिसर्च पेपर सादर केले आहेत.तसेच त्यांनी पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना “आदर्श कार्यक्रम अधिकारी” इतर संस्थांकडून उत्कृष्ठ अभ्यास “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यार्थी शाररिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी महाविद्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असू अद्यावत प्रयोगशाळा सहकार महर्षी कै.शिवाजीराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारत डौलाने उभ्या आहेत.तसेच इंडोर गेम सभागृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी संस्थेचे अध्यक्ष.मा.अॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब व संस्था पदाधिकारी मार्गदर्शनाखाली अध्यक्षांचे प्रतिनिधी,प्रा.व्ही.बी.कुलकर्णी.प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक मदत करत असतात. या सर्व गोष्ठींचा विचार करून रोटरी इंटरनॅशनल महाविद्यालयास “उत्कृष्ठ महाविद्यालय व प्र.प्राचार्य. डॉ.मंडलिक यांना “उत्कृष्ठ प्राचार्य”पुरस्कार बहाल केले आहेत त्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्य यांचे विविध संस्थांकडून मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.

ईस्ट -वेस्ट फ्युजन ‘ ने जिंकली रसिकांची मने !

0

पुणे :पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणाऱ्या ‘सूर मिलाफ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन ‘ढेपे वाडा ‘ (गिरीवन ,मुळशी ) येथे २७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले होते .

भारतीय संस्कृतीतील कला जोपासण्यासाठी तसेच वृद्धिंगत व्हावी यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडील गायन आणि तालवाद्यांतील सुरांचा एक अनोखा मिलाफाचा कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला होता . ‘उदय ईस्ट -वेस्ट फ्युजन बॅण्ड ‘ ने हा कार्यक्रम सादर केला .

झेक रिपब्लिक देशातील जॉन कॅन्कले ,( सॅक्सोफोन -बासरी ),विनीत अंतुरकर(गायन ,गिटार ) ,भूपाल लिमये (मेंडोलीन) ,नीरज प्रेम ( कॅनडा ) ,उदय रामदास (गायन ,तबला )या मिलाफ कार्यक्रमात सहभागी झाले .

जुन्या मराठी वाडा संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या आलिशान दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही फ्युजन मैफिल रंगली . हंसध्वनी ,चारुकेशी ,खमाज या भारतीय रागदारीवर आधारित रचना सादर झाल्या . जॅझ ,वेस्टर्न क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या . आफ्रिकन ,मराठी लोकसंगीतही रसिकांना मोहवून गेले . भैरवी रागाने मैफलीची सांगता झाली . या सर्व सादरीकरणाला रसिकमंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला .सूत्रसंचालन ऋचा ढेपे यांनी केले .

जॉन कॅन्कले म्हणाले ,’भारतीय संस्कृती आणि संगीत महान असून ढेपे वाड्यामुळे जुन्या एकत्रित कुटूंब पद्धतीचा प्रत्यय येतो . वेगळ्या वातावरणात या मैफलीचा आनंद वेगळाच होता . ‘नितीन ढेपे म्हणाले ,’संगीत आणि कलेला भाषा ,देशाच्या सीमा नसतात ,हेच या मैफलीमुळे सिद्ध झाले . अशा आगळ्या वेगळ्या संकल्पना ढेपे वाड्यात सादर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे .’ढेपे वाडा ‘चे संचालक नितीन ढेपे ,ऋचा ढेपे यांनी कलाकारांचा सत्कार केला .

आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे- हणमंतराव गायकवाड

0

पुणे : “शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना भेटलो आहे. त्यातील अनेकांच्या उपचाराच्या पद्धती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन झाले, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल. चांगल्या कल्पना घेऊन येणाऱ्या आयुर्वेदाचार्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहू,” असे प्रतिपादन भारत विकास ग्रुप इंडियाचे (बीव्हीजी) अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.

वैद्य हरिश पाटणकर यांच्या संकल्पनेतून बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशार्युवेद’ या भारतातील पहिल्या आयुर्वेदिय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्रातर्फे ‘इनोव्हेटिव्ह आयुर्वेद’वर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर सभागृहात झालेल्या परिसंवादावेळी बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. दत्ताजी गायकवाड, लायन्स क्लबचे श्रीराम भालेराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नेत्रचिकित्सक डॉ. स्नेहल पाटणकर यांचे ‘आयुर्वेदिय केश परिक्षण पद्धती व महत्त्व’ या विषयावर बीजभाषण झाले, तर वैद्य हरिश पाटणकर यांनी ‘केश व त्वचा विकारांवरील आयुर्वेदिय चिकित्सा’ या विषयावर मार्गदर्शन केले. आयुर्वेदात इनोव्हेशन करु इच्छिणार्‍यांसाठी ‘इन्व्हेस्टर्स-इनोव्हेटर्स मीट’चेही यावेळी आयोजन केले होते.

हणमंतराव गायकवाड म्हणाले, “शास्त्रांमध्ये समृद्ध असलेले आयुर्वेद संशोधनाच्या माध्यमातून लोकाभिमुख केले पाहिजे. लोकांच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी नवनवीन कल्पना राबवून आयुर्वेद स्वस्त आणि परिणामकारक केले पाहिजे. यामध्ये इनोव्हेशन आणि इन्व्हेंशन करू इच्छिणाऱ्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. बीव्हीजी अनेक आयुर्वेदिक उत्पादनांसाठी प्रयत्नशील आहे. नवीन तंत्रज्ञान आणि पारंपरिक शास्त्र याच्या मिलाफातूनच ‘इनोव्हेटिव्ह आयुर्वेद’ उदयाला येणार आहे.”

डॉ. स्नेहल पाटणकर म्हणाल्या, “केसांच्या आजार निदानासाठी आधुनिक तंत्राचा वापर होत आहे. आयुर्वेदीय पद्धतीच्या उपचाराने केसांवर चांगला परिणाम होतो. केशायुर्वेदच्या माध्यमातून केसांचे आरोग्य कसे सांभाळता येईल, यावर नियमित संशोधन सुरु आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे केसांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही.”

वैद्य हरीश पाटणकर म्हणाले, “आयुर्वेद हे खूप व्यापक आरोग्यशास्त्र आहे. पाच हजार वर्षांची परंपरा असलेले आयुर्वेद जगाला आकर्षित करीत आहे. त्यामुळे जगभरातील लोकांना समजेल अशा स्वरूपात आयुर्वेदाची मांडणी केली पाहिजे. त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन व्हायला हवे.”

यावेळी ‘केशायुर्वेद’च्या उपकेंद्र प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच ‘आयुर्वेद इन कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विवेक आंबरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार पंकज पाटणकर यांनी मानले.

आयुर्वेदात दुर्धर आजारांना बरे करण्याची क्षमता- महापौर मुक्ता टिळक

0

पुणे : “आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेद ही शाश्वत अशी शास्त्रोक्त उपचारपद्धती असून, भारतीयांनी आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

ऍलोपॅथिक डॉक्टर असलेल्या गौरी अभ्यंकर-कर्वे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे साकारलेल्या ‘आयुर्ब्लीस’ या आयुर्वेद व पंचकर्म केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता टिळक बोलत होत्या. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ. गौरी अभ्यंकर-कर्वे, शारंगधर फार्माचे संचालक आणि सनदी लेखापाल मुकुंद अभ्यंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुक्ता टिळक म्हणाल्या, “ऍलोपॅथी व आयुर्वेद याचा संगम होतोय, ही आनंदाची बाब आहे. आज अनेक उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे अशा पारंपरिक उपचारांना आधुनिकतेची जोड मिळाली, तर सर्वांनाच त्याचा लाभ होऊ शकेल. स्टार्टअप, इनोव्हेशनच्या काळात डॉ. गौरीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.”

माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, “आपले आरोग्य अंतर्बाह्य सुंदर ठेवण्याचे काम आयुर्वेद करते. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्रतिबंधात्मक उपचार देण्यासह आरोग्याला शिस्त लावण्याचे काम आयुर्वेद करते. आपण सर्वानी त्याचा अवलंब केला पाहिजे.”

डॉ. गौरी अभ्यंकर-कर्वे म्हणाल्या, “रुग्णाच्या प्रकृतीचा अभ्यास करून आधुनिक व पारंपरिक उपचारपद्धतीचा मेळ घालत त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. योगासह आहार नियोजन आणि आयुर्वेदिक उपचारांना आधुनिक पद्धतीने प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

सिनेअभिनेत्री ईशा कोपीकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

0

मुंबई (प्रतिनिधी):- निवडणुकांचा रणसंग्राम जसजसा जवळ येऊ लागलाय तसतसे शिवसेना भाजपमधील वातावरण तापू लागले आहे, त्यातच भाजपने रविवारी राष्ट्रीय स्तरावरच्या वाहतूक संघटनेची घोषणा करत शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा दुपारी पार पडला. याच वेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीचे पक्षात स्वागत केले.

या सोहळ्याला संघटनेचे प्रमुख आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, खासदार अमर साबळे, आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हन हे उपस्थित होते.

वाहतुकदारानी सुरक्षित, फायदेशीर, प्रदूषण मुक्त वाहतूक करावी, यासाठी भाजप सरकारने नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून जलवाहतूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

मुळात साडेसात लाख मेंबर्सशिप असलेल्या हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना ही शिवसेना प्रणित होती परंतु राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने संघटनेचे नेते हाजी अरफात शेख यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा पासून वाहतूक सेनेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. भाजपने आता या संघटनेची घोषणा करत सेनेवर कुरघोडी केली आहे, असे मानले जाते.
त्यातच ईशा कोपीकर हीचा प्रवेश संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करेल, असा विश्वास हाजी अरफात शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
माझ्यासाठी हा अत्यंत अविस्मरणीय आणि महत्वाचा क्षण असल्याचा ते म्हणाले. मी वाहतुकदारांसाठी पूर्वीही लढत होतो आताही लढतो आहे आणि भविष्यातही अखेरपर्यंत लढत राहीन असे ते म्हणाले. माझे वडील जेव्हा इस्पितळात कोमामध्ये अखेरचा जीवन संघर्ष करत होते तेव्हाही मी ताज हॉटेलच्या कामगारांसाठी लढत होतो आजही तीच स्तिथी आहे आमच्या कुटुंबाचे मुख्य पीर बाबा मखमली यांनी अखेरचा स्वास घेतला आहे, त्यांचा दफनविधी अजून बाकी आहे, तरी मी राष्ट्रीय स्तरावर वाहतुकदारांच्या संघर्षासाठी आज ईथे उभा आहे, संघटनेची मशाल अशीच तेवत ठेवा, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थीत रिक्षा, टॅक्सी, टेम्पो आणि ट्रक चालक मालक वाहतुकदारांना केले.

” संविधान रॅली ” संपन्न

0

पुणे-प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल मंगळवार पेठ  लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने ” संविधान रॅली ” संपन्न झाली . मंगळवार पेठमधील लुम्बिनी बुध्द विहार येथे झालेल्या या कार्य्रक्रमाचे उदघाटक जेष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्याहस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या  ” संविधान रॅली ” चे आयोजन अखिल मंगळवार पेठ  लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय वारभुवन व  छाया वारभुवन यांनी केले होते . या कार्य्रक्रमास सदानंद शेट्टी , मुख्तार शेख , संजय बालगुडे नगरसेविका सुजाता शेट्टी , नगरसेविका पल्लवी जावळे , मनोज पिल्ले , सिध्दार्थ चव्हाण , प्रकाश आवाड , दत्ता पोळ , निलेश आल्हाट , नितीन वाघमारे , नितीन चव्हाण , संजय वारभुवन , बबन कांबळे , सचिन वाघमारे , महानंदा डाळींबे , विकार अहमद शेख , मिलिंद बनसोडे , सुखदेव शिंदे , फय्याज शेख , अमर पवार , दत्तात्रय साबळे , विनय चव्हाण , राजू कांबळे , आनंद रणपिसे , अनिल आवाड , सूरज भालेराव , राजू शिंदे , अविनाश रणसिंग , चिमाजी चव्हाण , शब्बीर शेख , राहुल कांबळे , युसूफ शेख   आदी मान्यवर उपस्थित होते .

या  ” संविधान रॅली ” ची सुरुवात मंगळवार पेठमधील लुम्बिनी बुध्द विहार करण्यात येऊन कडबा कुट्टी वजनकाटा , भीमनगर , कमला नेहरू रुग्णालय , पंधरा ऑगस्ट चौक , नरपतगीर चौक मार्गे जुनी पुणे जिल्हा परिषद मार्गे ससून चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समाप्त झाली . यावेळी बौद्धाचार्य नितीन वाघमारे यांनी  सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली . यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अखिल मंगळवार पेठ  लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय वारभुवन  व छाया वारभुवन यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो अशा घोषणा देण्यात आल्या .