रुग्णवाहिकांना मार्ग द्या,जीव वाचवा स्केटिंगद्वारे चिमुकल्यांची जनजागृती !
पुणे –वाहतुकीत अडलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग न मिळाल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर हेल्प रायडर्सग्रुपतर्फे आयोजित दुचाकी रॅलीमध्ये चिमुकल्यांनी स्केटिंगद्वारे रुग्णवाहिकांना मार्ग द्या, रुग्णांचा जीव वाचावा या घोषणा देत जनजागृती केली.
प्रजासत्ताक दिनी शनिवार दि. २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता झाँशी राणीलक्ष्मीबाई चौक,जंगली महाराज रस्ता येथून गिव्ह वे सेव्ह लाईफ या जनजागृती दुचाकी रॅलीचा शुभारंभ झाला. ही रॅली महापालिका भवन मार्गे, शिवाजीरस्ता , शनिवारवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई, स्वारगेट येथून टिळक रस्ता ,अभिनव चौकातून बाजीराव रस्ता येथून शनिपार चौक तेथून लक्ष्मी रस्ता मार्गे अलका टॉकीज चौक येथे पोहचल्यानंतर त्यात विनर्स स्केटिंग अकॅडमीचे वय वर्षे सहा ते ११ वर्षांची मुले- मुली सहभागी होत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता , मॉर्डन कॉलेजवरून जंगली महाराज रस्ता या मार्गावर स्केटिंगद्वारे घोषणा देत जनजागृती केली. झाँशी राणी लक्ष्मीबाई चौक येथे रॅलीचा समारोप झाला.या उपक्रमाचे संयोजन हेल्प रायडर्स ग्रुपचे प्रशांत कनोजिया, सुदीन जायाप्पा , अजित जाधव, प्रवीण पगारे, बाळासाहेब ढमाले, राहुल वाघवले, दर्शन किराड,डॉ. रोहित बोरकर, अतुल भारती, सचिन ननावरे, बाळा अहिवळे, अमोल शिंदे, संतोष पोळ, संदीप कुदळे, सचिन डाकले, समीर गांधी,प्रदीप खळदकर ,श्रीकांत कुंभारे , निलेश मारणे , सागर इंगळे आदींनी केले.